श्री निसर्गदत्त महाराज या औलीयाची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा लेख.
एक अत्यंत सामान्य माणूस सुद्धा सिद्ध होऊ शकतो याचा दाखला म्हणजे महाराज. आपल्याला त्यांच्या जीवनात डोकावण्याच कारण नाही. ते सामन्याहून सामान्य होते, त्यांची शैक्षणिक, आर्थिक किंवा कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नव्हती इतकी माहिती पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मराठी होते. त्यांनी स्वतः तपासलेलं आणि त्यांच्या सिद्धत्वाची अपूर्व झलक दाखवणारं एकमेव पुस्तक म्हणजे 'सुखसंवाद'. साधकांच्या विविध प्रश्नांना समोरासमोर दिलेल्या उत्तरांच ते संकलन आहे.
महाराज कोणत्या साधनेनं सिद्धत्वाला पोहोचले हे जाणणं उपयोगी आहे. शांत बसून 'मी आहे' या जाणिवेवर स्थिर राहणं ही एकमेव साधना त्यांना बोधाप्रत घेऊन गेली.
त्यांच्या शब्दात :'मी आहे' या शुद्ध असण्यावर मन एकाग्र करणे आणि त्यातच राहाणे ही गुरूंची सूचना मी पाळली. केवळ 'मी आहे' ही जाणिव मनात धरून मी तासंतास बसत असे. लवकरच शांती, आनंद आणि सखोल सर्वव्यापी प्रेम ही माझी सहजस्थिती बनली. त्या स्थितीत मी, माझे गुरू, माझे रोजचे जीवन आणि सभोवतालचे जग सारे अदृश्य झाले. केवळ शांती आणि अथांग मौन उरले.(सुखसंवाद - ५१)
'जागणे, झोपणे आणि परत जागणे सतत चालू असते पण हा अवस्था पालट मला घडत नाही. त्या अवस्था फक्त घडतात एवढेच. मला केव्हाच काही घडत नाही. काहीतरी अपरिवर्तनीय, गतिहीन, स्थिर, सुमेरूवत, खडकासारखे अभेद्य आहे. घनदाट सच्चिदानंद स्वरूप आहे. मी त्या वेगळा कधीच नसतो. कोणताही छळ किंवा आपत्ती मला स्वरूपापासून विचलित करू शकणार नाही. ही अवस्था संपूर्ण स्थिर आणि कायमची आहे. मी काही केले तरी ती सुमेरूवत स्थिर असते. एकदा तुम्हाला सत्यस्वरूपाची प्रचिती आली की तुम्ही त्यात स्थिर होता'. (सुखसंवाद -४२)
या गृहस्थाचा आत्मविश्वास कमाल आहे आणि त्यांचे शब्द प्रत्येक साधकाला अपरिमित दिलासा आहेत.
ते म्हणतात : 'मी आहे' हा साधा भाव सर्वात उत्तम. त्यावर धीमेपणानं स्थिर राहा. येथे धीमेपणा हा सुज्ञपणा आहे. अपयशाचा विचार करू नका. या कार्यात अपयश येऊच शकत नाही'. (सुखसंवाद - ५१)
'मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही सर्वव्यापी, सर्वातीत, सदवस्तू आहात - त्याप्रमाणे वागा. विचार, भावना, कृती ऐक्याने होऊ द्या. मग मी जे म्हणतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल. प्रयत्नाची गरज नाही. विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे वागा'. (सुखसंवाद - ५१)
'मी सध्या चौऱ्याहत्तर वर्षांचा आहे तरी मी चौऱ्याहत्तर वर्षांपूर्वीचे अर्भक आहे. मला स्पष्ट जाणवते की सर्व बदल होऊनही मी ते मूल आहे. माझ्या गुरूंनी मला सांगितले, "आत्ता देखील जे मूल तू आहेस तेच तुझे स्वरूप आहे.
'मी हे आहे' किंवा 'मी ते आहे' अशा कल्पनेमुळे बिघडण्यापूर्वी 'मी आहे' हे जेथे अजून शुद्ध आहे, अशा शुद्ध असण्याच्या स्थितीत मागे जा". तुमचे ओझे तुमच्या खोट्या तद्रूपतेमुळे आहे. त्याचा त्याग करा'. (सुखसंवाद - ५१)
_______________________________
रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांची उत्तरं सिद्ध कशी देतो, तो कसं जगतो हे सुखसंवादाच्या निमित्तानं आपल्याला कळू शकतं. आगदी आपल्यातलामाणूस आपल्याला सांगतोय असे हे संवाद आहेत.
कोणताही सिद्ध तीन गोष्टी साधत असतो : एक, तुम्हीच सत्य आहात हे तुम्हाला सांगणं; दोन, आपण सत्य नाही असं वाटण्याला तुमच्या ज्या धारणा कारणीभूत आहेत त्या दूर करणं आणि तीन, सत्य आणि आपण यांची स्वतःच्या प्रतिभेनं सांगड घालून देणं!
सत्य जरी एक असलं आणि अनेकांनी ते अनेक प्रकारे सांगितलं असलं तरी ज्या सिद्धाशी आपलं ट्युनिंग जमतं तो आपल्याला भावतो.
'स्व'चा गौरव महाराज कसा करतात ते पाहा :
प्रथमच तुम्ही जाणले पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा, तुमचा स्वतःचा देखील पुरावा तुम्हीच आहात. तुमचे अस्तित्व कोणी सिद्ध करू शकत नाही कारण त्याच्या अस्तित्वाला प्रथम तुम्हीच बळकटी आणली पाहिजे. तुमच्या असण्याबद्दल आणि जाणण्याबद्दल तुम्ही कोणाचे देणे लागत नाही. तुमच्या लक्षात असू द्या की तुम्ही संपूर्णपणे स्वयंसिद्ध आहात. तुम्ही कोठून येत नाही किंवा कोठे जात नाही. तुम्ही कालातीत असणे आहात, जाणिव आहात. (सुखसंवाद - ३७)
सिद्धत्वाच्या स्थितीचं ते किती साधेपणानं वर्णन करतात ते पाहण्यासारखं आहे :
'मी जगाशी एकरूप आहे तरीही त्यापलिकडे आहे असे जाणल्यामुळे मी सर्व भीती आणि इच्छा यापासून मोकळा झालो. मोकळा व्हावे असे मी बुद्धिने ठरवले नाही. मला असे अढळले की मी अनपेक्षितपणे, विनासायास मोकळा आहे. तेंव्हापासूनच इच्छा आणि भिती यांचापासूनची ही मोकळीक टिकून आहे.
आणखी मला असे अढळले की मी प्रयत्न करण्याची जरूरी नाही. विचारामागोमाग घटना विनाविलंब आणि अविरोधपणे घडते. विचार स्वयंपूर्ण होतात. सर्व गोष्टी योग्य रितीने आणि सहजपणे जमून जातात.
मुख्य बदल मनात झाला. मन गतिहीन, मौन झाले. ते जलद प्रतिसाद देते पण प्रतिसादाला चिरस्थायी करू पाहात नाही. स्वयंस्फूर्ती हीच जीवनपद्धती झाली. खरे नैसर्गिक झाले आणि नैसर्गिक खरे झाले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपरंपार स्नेह, दुर्बोध आणि शांत सर्वप्रकाश, सर्वव्यापी प्रेम, स्वयंसिद्ध झाले आणि त्यामुळे सर्व चित्तवेधक, सुंदर, अर्थपूर्ण आणि प्रेम करण्याजोगे बनले. (सुखसंवाद - ५७)
_______________________________
अहंकार या सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल महाराज काय सांगतात ते अफलातून आहे :
'अमकातमका मी ही कल्पनाच फोल असल्यामुळे ती सातत्य चाहते. आपले नित्यस्वरूप मात्र असतेच त्याला सातत्याची गरज नाही. पण ' मी अमकातमका ' असे मानल्यामुळे ती भावना घट्ट टिकवून ठेवण्यासाठी आपण ती वागवेल तसे वागतो. तिच्या मर्जीशिवाय कुठलाही व्यवहार तिला कबूल नसतो. क्षणोक्षणी ती वेगळे रूप घेते आणि आपला व्यवहार नित्य, अखंडीतपणे चालूच ठेवते. ही अनर्थकारी परंपरा कायमची थांबवण्यासाठी मी अमकातमका ही कल्पना एकदाच कायमची सोडणे हाच एक रामबाण उपाय आहे.
देह आणि देहाचे नांव याचा अंगीकार केला नाही, ती कल्पना सांडली तर स्वच्छ आपण, केवळ ज्ञान तेच शिल्लक राहते. अमूकतमूक म्हणून जाण नव्हे तर केवळ ज्ञान.' (सुखसंवाद - ६३)
_________________________________
मला वाटतं, न्यूनगंड हा अहंकाराचा सर्वात गहन पैलू आहे. मानवी अस्वास्थ्याचं ते मूळ कारण आहे. महाराज किती सहजपणे त्याचं निराकरण करतात ते पाहण्यासारखं आहे :
साधकानं विचारलंय ' मी काय शिकावे बरे? '
महाराज उत्तरतात : ' निश्चिंतपणे जगणे. ह्यासाठी तुम्ही जाणले पाहिजे की तुमचे स्वरूप अजिंक्य, निर्भय आणि सदाविजयी आहे. एकदा तुम्ही निश्चितपणे जाणले की आपल्या कल्पनेखेरिज कोणीच आपल्याला त्रास देऊ शकत नाही, मग तुम्ही आपल्या इच्छा, भिती, पूर्वधारणा याकडे दुर्लक्ष करता आणि केवळ सत्याने जीवन जगता' (सुखसंवाद - २९)
_____________________
कुणालाही स्वत:प्रत आणतील अशी त्यांची ही वक्तव्यं अफलातून आहेत :
'शाश्वताला जाणणे म्हणजे शाश्वत होणे, संपूर्ण होणे, विश्वातील सर्वासहित विश्वरूप होणे. प्रत्येक घटना ही संपूर्णाचा परिणाम आणि व्यक्तता असते आणि संपूर्णाशी तिचा मूलभूत मेळ असतो. संपूर्णाचा सर्व प्रतिसाद योग्य, प्रयत्नरहित आणि तात्कालिक असतो. ' (सुखसंवाद - १७)
'आपल्या असण्याबद्दल पूर्णपणे जागृत राहा म्हणजे तुम्ही जाणिवपूर्वक आनंदात राहाल. तुम्ही आपले मन जे तुम्ही जे नाही त्याकडे लावता त्यामुळे तुम्ही सुस्थितीची, खुशालीची जाणिव गमावून बसता.' (सुखसंवाद - २५)
' स्वतःला जाणायचे आहे असे तुम्ही म्हणता. तुम्ही स्वतःच आहात, तुम्ही जे आहात त्या वेगळे तुम्ही असूच शकत नाही. जाणणे असण्याहून वेगळे असते काय? स्वतःची व्याख्या आणि स्वतःचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्याखेरीज तुम्ही स्वतःच्या असण्यानेच स्वतःला जाणू शकता. (सुखसंवाद - ९९)
____________________________________
साधकाला निश्चित दिशा देणारं त्यांचं हे उत्तर उद्धृत करून लेख संपन्न करतो.
एका साधकानं विचारलंय : 'अध्यात्मिक प्रगतीची लक्षणं कोणती? '
आणि महाराज अत्यंत सहजपणे सांगतात : ' निश्चिंतपणा, आराम, आनंदाची जाणिव, अंतर्यामी सखोल शांती आणि बाहेर भरपूर उत्साह!' (सुखसंवाद - ८९)
(लेख मनोगतवर पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
25 Apr 2013 - 8:05 am | मुक्त विहारि
वाचत आहे..
25 Apr 2013 - 9:57 am | पैसा
यांच्या संवादाबद्दल आणखी वाचायला आवडेल.
25 Apr 2013 - 10:12 am | मोदक
वाचतोय...
आणखी येवूद्यात.
25 Apr 2013 - 12:23 pm | कवितानागेश
चांगली ओळख.
अजून माहिती इथे आणि इथे सापडेल.
25 Apr 2013 - 1:03 pm | मन१
काही कळेना झालय.
25 Apr 2013 - 1:26 pm | संजय क्षीरसागर
आणि तुम्हाला उपयोगी होईल असं स्पष्टीकरण मी देईन. प्रश्न मात्र नेमका हवा.
25 Apr 2013 - 1:30 pm | चौकटराजा
मनरे तू काहे ना धीर धीरे
ओ अधीरात्मा ग्यान पावेगा सबक सीखेगा
थोडा सब्र करे
चौरास्वामी
25 Apr 2013 - 1:31 pm | अत्रुप्त आत्मा
रे मना धीर धर...लवकरच कळेल !
25 Apr 2013 - 1:48 pm | संजय क्षीरसागर
ते तर अध्यात्मात नेहमीच सांगितलं जातं. तुम्ही आत्ता, या क्षणी सत्य आहात. सब्र म्हणजे अवधी आणि अवधी म्हंटल की काल येतो. आपण देह आणि काल जाणणारे आहोत त्यात बद्ध असलेली व्यक्ती नाही. आणि तेच तर अध्यात्माचं मूळ सूत्र आहे.
25 Apr 2013 - 1:52 pm | संजय क्षीरसागर
या पुस्तकाचा `आय एम दॅट' हा मॉरिस फ्रिडमननं केलेला जगप्रसिद्ध इंग्रजी अनुवाद अध्यात्मातला मानदंड मानला गेलाय. त्याच्या आतापर्यंत त्याच्या तीस-चाळीस आवृत्या निघाल्यात आणि ते पुस्तक दोन पाश्च्यात्य युनिवर्सिटीजमधे फिलॉसॉफिला टेक्स्टबुक आहे.
पण मुद्दा तो नाही. मुळात सुखसंवाद हे मराठी भाषेतलं अष्टावक्रसंहितेच्या तोडीचं सांख्ययोगावरचं महाराजांच भाष्य आहे. आतापर्यंत एकाही सिद्धानं अशी समारोसमोर आणि एकामागोमाग एक उत्तरं दिलेली नाहीत. ओशोंनी (किंवा एकहार्टनं) डायलॉग साधलेला नाही. ते साधकांच्या प्रश्नावर वन-वे बोलले आहेत किंवा बोलतात. त्यांची वक्तव्यं निरूपणासारखी आहेत.
मजा म्हणजे महाराजांचे साधकही तितक्याच तोडीचे आहेत. बरेचसे साधक पाश्चात्य आहेत आणि त्यांच्याकडे कमालीची क्लॅरिटी आहे. त्यांच्या प्रश्नांना महाराजांनी दुभाषामार्फत उत्तरं दिलीयेत. आणि त्यांनी रोजच्या जगण्यातले एकसोएक प्रश्न विचारून महाराजांच्या आकलनाचा सखोल वेध घेतलाय. सगळं पुस्तक महारांनी स्वतः एडिट केलंय आणि त्यांच्या मराठीचा डौल पाहण्यासारखा आहे. लेखातल्या वाक्यातून तुम्हाला त्याची कल्पना येईल.
आणि सर्वात महत्त्वाचीये ती महाराजांची भाषा. मराठीत इतका शुद्ध आणि प्रभावी सांख्ययोग (साधनारहित सत्याचा बोध) माझ्या वाचनात नाही. ते पुस्तक नुसतं वाचून त्या गृहस्थाच्या आकलनाची कमाल वाटते. तुम्ही त्यांना कसेही गुंतवा ते पुन्हा तुम्हाला स्वतःप्रत आणतात. प्रत्येक उत्तरातून तुम्हाला स्वस्थ करतात.
सतीश आव्हाड, सी-११, विश्वजीत सोसायटी, वीर सावरकर मार्ग, नौपाडा, ठाणे (प) फोन्स : ५३६ ०२२३ / ५४४ ८७८७ हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत (मूल्य रू.२२०)
26 Apr 2013 - 12:43 am | अग्निकोल्हा
अशक्य!
26 Apr 2013 - 12:48 am | प्यारे१
शु मुश्कील?
काय अडचण?
26 Apr 2013 - 2:04 am | अग्निकोल्हा
तुम्हाला अडचण वाटत नाही ?
26 Apr 2013 - 12:03 pm | संजय क्षीरसागर
जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, इट इज सिंपल :
खुद्द आपण कधीही कोणत्याही प्रश्नात सापडू शकत नाही कारण आपण देह आणि मन यापेक्षा वेगळे आहोत. म्हणजे आपल्याला देह आहे, देहात मन आहे पण आपण त्या वेगळे आहोत.
आता प्रश्न म्हणजे काय ते पाहू. (इथे चर्चा होतात तसले) नैतिक किंवा निव्वळ बौद्धिक प्रश्न सोडा. ते सुटले काय आणि नाही काय त्यानं काही फरक पडत नाही. जो प्रश्न तुम्हाला गुंतवतो, जगणं मुश्किल करतो त्याचं रहस्य पाहू. मनाची किमया अशीये की त्या प्रश्नाविषयी ते तुमची धारणा निर्माण करतं की तो सुटला नाही तर तुमच्या अस्तित्वालाच धोकाय.
प्रश्नाचं स्वरूप काहीही असो; नोकरी जाण्याची शक्यता, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, असाध्य शारिरिक आजार, सामाजिक अवहेलना, तुम्हाला सतत येणारं अपयश किंवा तत्सम काहीही. प्रश्न वास्तविक असतो पण त्याही पुढे जाऊन तो सोडवणं तुमच्या आवाक्या बाहेर असतं आणि मन तुम्हाला पूर्णपणे पटवतं की आता तुमचं अस्तित्व धोक्यात आहे. मग तुमची संपूर्ण जाणिव त्यात अडकते. तुम्ही मानसिक आणि भावनिक दृष्ट्या त्यात गुरफटून जाता.
सिद्ध फक्त एकच काम करतो, मनावर किंवा शरीरावर कोणताही आघात झाला तरी तुम्हाला काहीही होणार नाही या वस्तुस्थितीची तुम्हाला नि:संशय खात्री पटवून देतो. कारण तुम्ही त्या दोहोंपेक्षा वेगळे आहात.
म्हणून तर महाराजांनी म्हटलंय :
याचा अर्थ प्रश्न सुटतो असा नाही, तुम्ही प्रश्नातून मोकळे होता. तुमचा अवरूद्ध झालेला श्वास मोकळा होतो. तुमची जाणिव जी प्रश्नाकडे असाहायपणे खेचली जात होती ती फिरून तुमच्याकडे येते. तुम्ही पुन्हा स्वतःशी कनेक्ट होता, स्वस्थ होता. आणि आता या स्वस्थचित्तदशेतून तो प्रश्न सोडवायला घेता (किंवा मग सोडून देता) कारण तुमच्या अस्तित्वाला कधीही धक्का पोहोचू शकत नाही हा उलगडा तुम्हाला झालेला असतो.
26 Apr 2013 - 4:31 pm | अग्निकोल्हा
हिच तर खरी गंमत आहे.. दि मोमेंट यु ट्राय टु अडरस्टेंड, यु आर डेस्टिन टु बी फेल. कारण तुम्ही मनामधे "सिध्दावस्थेचे" इन्सेप्शन करता. जे अस्तित्वातच नाहीये, दुसर्यान ठरवलय, सांगितलय ते त्यात घुसडता. मग त्या सोबत आपलं मन जे खेळ करत त्यात समरसुन जाउन आयुष्य कंठता.
नैसर्गीक सहजता हा फार महत्वाचा विषय आहे. हात आगित घेतला चटका बसला. अॅज सिंपल अॅज इट इज. उगा मी पणाच्या जाणीवमधे स्थिर झाल्यावर चटका बसतो/बसत नाही जाणवत नाही याला काही अर्थ नाही. ज्ञानाची ही नैसर्गीक सहजता फार महत्वाची, आणी म्हणुनच ती विदाउट कॉट्रिब्युशन ओफ इंडीविजुअल वा प्रयत्नरहीत असते.
उदाहरणार्थ तुमचं (अथवा कोणाचही) जन्माला येणे... आता या स्थित्यंतराच्या प्रक्रियेत तुमचं वैयक्तीक कॉट्रिब्युशन काय होतं ? शुन्य. तरीही ते घडलं... अस्तित्वाला आलं... ज्ञान पावलं... म्हणुनच ते वास्तव आहे सहज आहे, प्रत्यक्ष तुमचा जन्म असुनही त्यात तुमची कोणतीही लुडबुड खपवुन घेतली गेली नाही हे फार महत्वाच आहे. ज्ञानाच्या प्रक्रियेतही हेच लागु असतं... जो पर्यंत आपली लुडबुड/कॉट्रीब्युशन शुन्य होत नाही तो पर्यंत जो चालतो तो सगळा सावळा गोंधळ होय. थोडक्यात ही अवस्था प्रयत्न, धारणा, साधना, कृती आणि सर्वात महत्वाच म्हणजे इछ्चा याशिवायच आली पहिजे, तरच ति आली. अन्यथा नाही...
26 Apr 2013 - 6:16 pm | संजय क्षीरसागर
येस, सिद्धाची कॉपी करण्याच्या प्रयत्नात तुम्ही नेहमी अपयशी व्हाल कारण ती त्यानं सांगितलेल्या लक्षणांची कल्पना असेल. पण खुद्द तुम्हाला निर्धास्त वाटायला लागेल तेव्हा तुम्ही निश्चितपणे म्हणाल की `येस, आय अॅग्री. महाराजांची आणि माझी अवस्था एक आहे.' कारण की स्थिती निर्वैयक्तिक आणि सर्वकालीन आहे. तुम्ही केवळ ती स्थिती जाणता असं नाही तर स्वतः ती स्थिती होता. आता तुम्हाला कोणत्याही गुरूची किंवा कल्पनेची आवश्यकता नाही. इट इज अ फॅक्ट फॉर यू.
मृत्यू सिद्धालाही आहे. अहंकार असला काय आणि नसला काय त्यानं काही फरक पडत नाही. फरक इतकाच आहे की सिद्धाला देह मरतोय हे कळेल आणि ज्याला स्व गवसला नाही त्याला आपण मरतोय असं वाटेल.
अध्यात्मात हा विवाद पूर्वापार आहे. आपण व्यक्ती म्हणून जन्म घेतो, तसेच वाढवले जातो आणि जगतो. अचानक आपल्याला आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा होणं मला तरी अशक्य वाटतं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, जी स्थिती कल्पिलेली आहे किंवा प्रयत्न साध्य आहे ती केव्हाही भ्रम असेल पण महाराज म्हणतात तो तुमचा स्वतःचा अनुभव झाला तर तुम्ही प्रयत्नाविना त्या स्थितीत कायम राहाल.
व्यक्तिमत्व ही प्रत्येकाची वैयक्तिक कल्पना आहे आणि स्थिती हे निर्वैयक्तिक वास्तव आहे. प्रयत्न व्यक्तिमत्वापासून सोडवणूकीसाठी आहे, स्थितीत राहण्यासाठी नाही. थोडक्यात, काही न करता, बाय डिफॉल्ट आपण स्थिती आहोत. हा उलगडा झाल्यासरशी, तो तुमचा अनुभव होताच सहजता येते. त्या नंतर कोणत्याही साधनेची किंवा प्रयत्नाची गरज राहात नाही.
27 Apr 2013 - 8:05 pm | अग्निकोल्हा
मला इतकच जाणुन घेण्यात रस आहे की तुमच्या डिफॉल्ट स्थितीचा अनुभव तुम्ही केवळ जागेपणी घेताय की झोपेतही तसाच घेत असता ? याच उत्तर फार महत्वाच आहे बघा. नंतर उगाच जागे असणं अथवा झोपणं या स्थित्यंतराचा तुमच्या बाय डिफॉल्ट स्थितीच्या अनुभवात परिणाम घडत असेल तर त्याला बाय डिफॉल्ट का समजावे असा प्रश्न पडतो.
27 Apr 2013 - 10:35 pm | संजय क्षीरसागर
झोपेतही तसाच असतो.
27 Apr 2013 - 10:56 pm | अग्निकोल्हा
_/\_.
27 Apr 2013 - 11:04 pm | संजय क्षीरसागर
साधकानं कधीही झोपेवर प्रयोग करू नयेत. त्यानं नेहमी दिवस स्वास्थ्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
28 Apr 2013 - 12:19 am | अग्निकोल्हा
सर्वप्रथम, मी साधक नाही. प्रयोग तर अजिबात करत नाही. किम्बहुना जर का या धाग्यावरील माझे प्रतिसाद आपण खरोखरच वाचले असतील तर मुळातच माझा "डिफॉल्ट स्टेट" वगैरे वगैरे गाठण्यासाठी आपण प्रयत्न(जागे वा झोपलेले असताना) करावयाचे असतात या संकल्पनेवरच मुळात विश्वास नाही/विरोध आहे हे मी अतिशय स्पश्ट शब्दात लिहले असुनही आपण... असो...
27 Apr 2013 - 11:53 pm | प्यारे१
ग्लिफ,
याचं उत्तर मला असं वाटतं की तू म्हणतो आहेस त्या प्रकारेच असावं. ह्यात एक अॅडीशन मात्र घ्यावी वाटते ती म्हणजे
>>>थोडक्यात ही अवस्था प्रयत्न, धारणा, साधना, कृती आणि सर्वात महत्वाच म्हणजे इछ्चा याशिवायच आली पहिजे, तरच ति आली.
ह्या मध्ये सिद्धावस्था येण्यापूर्वीची साधनावस्था तू टाळत आहेस अथवा नाकारत आहेस. दासबोधात दिलेला बद्ध, मुमुक्षू, साधक नि सिद्ध हा क्रम सर्वसाधारणपणे असतो तो इथे नाकारला जातोय.
प्रयत्न, साधना, धारणा अथवा कुठलीही कृती ह्या सगळ्या सहकारी साधना आहेत. सगुणाचेनि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे असा विचार आहे. मी ध्यान करतो ही देखील कृत्रिम साधना आहे, पण इथे ह्या सगळ्याची गरज आहे. लक्षावधी लोकांमध्ये एखादाच रमण महर्षी असतो ज्यांना काहीही न करता म्हणजे (काहीही न करण्याची 'कृती' करुन) ज्ञान झालं. इथं लक्षात घ्यायला हवं की सिद्धावस्था म्हणजे आत्यंतिक शांतीची, सुखाची नि आनंदाची स्थिती ही अशीच मिळत नसते, ती कमवावी लागते मात्र त्या साठीच्या आधीच्या साधना कराव्याच लागतात. न करता अशी स्थिती येत असेल तर त्याला आत्ता न दिसणारं मात्र पूर्वी कधीतरी केलेलं पूर्वसंचित फळाला येण्याची वेळ यावी लागते.
मूळातच 'येकांती नाजूक कारभार' असल्यानं शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणं वस्तुसिद्धी विचारेण न कस्चित कर्मकोटीभि हा विचार महत्वाचा आहे.
मनाची चंचलता, बुद्धीची निर्णय क्षमता, चित्ताची अवधारणता शांत झाली की अहंकार देखील गप्प बसतो. त्यासाठी सर्वसामान्यांना साधना लागते. झाडावरचे फळ खाण्यासाठी मुंगीचा मार्ग देखील आहे नि पक्ष्याचा देखील. ह्यात आपापल्या क्षमतेनुसार मार्ग निवडून त्यावर मार्गक्रमणा करत फळाची प्राप्ती करणं महत्त्वाचं.
इत्यलम!
28 Apr 2013 - 1:18 am | अग्निकोल्हा
याचं उत्तर मला असं वाटतं की तू म्हणतो आहेस त्या प्रकारेच असावं.
डु यु रिअली थिंक माय नॉनसेन्स रिअली मेड इवन अ टिनी बिट ऑफ सेन्स ? माझ्याकडे कसलच उत्तर नाही कारण एखाद्या प्रश्नालाच मी अवास्तव महत्व देत नाही.
ह्या मध्ये सिद्धावस्था येण्यापूर्वीची साधनावस्था तू टाळत आहेस अथवा नाकारत आहेस. दासबोधात दिलेला बद्ध, मुमुक्षू, साधक नि सिद्ध हा क्रम सर्वसाधारणपणे असतो तो इथे नाकारला जातोय.
मुळात सिध्दावस्थेचीच अपेक्षा नाहिये तर साधनावस्था वा इतर फाफटपसारा विचारात घ्यायला हवाच कशाला ?
आत्ता न दिसणारं मात्र पूर्वी कधीतरी केलेलं पूर्वसंचित फळाला येण्याची वेळ यावी लागते.
तुम्हाला खरच वाटतं आकाशातला देव जन्मो जन्मिचे आकांटीग ठेवतो ? बिग ब्रदर इज नॉट वॉचिंग यु अॅट ऑल.. सिंपली बिकॉज हि डाँट नीड टु डु सो. पुर्वसंचित म्हणजे काय बुआ ? कर्माशी रिलेटेड आहे काय ? मला तर कोणतेही कर्म ना वाइट दिसतय ना चांगले सर्व काही एकच भासतय ? केवळ माणुसकी म्हणुन ज्या लोकांशी आपला संबध जितका जास्तिजास्त येत असतो त्यांना कमीकमी दुखावणे व ज्यांच्याशी कमीत कमी येत असतो त्याना जमेल तस फाट्यावर मारत राहणे यापलिकडे कोणत्याही मानवी कर्माचा आणखी कोणता नियम अथवा कल अस्तित्वात नाही.
उदाहरणार्थ पैशासाठी भावाचा मुडदा पाडु नका पण पैशासाठीच पल्याडल्या देशाच्या सापडेल त्याचे शिर उडवा.. तो पराक्रम, यात मेलात तर स्वर्ग, जगलात तर ऐशोआराम व सन्मान...चायला डोके ठिकाणावर आहे काय ? खर तर सरळ सोट नियम पाहिजे ना की जो खुन करेल तो गुन्हेगारच. मग युध्दात करा वा संसारात. पण नाही तेथे आपल्या हिसेंला/कृतिला समर्थन द्यायला पाप-पुण्याची शिदोरी लागते. म्हणे देशासाठी मुडदे पाडलेत ? सगळा भौतिक सुख व सुरक्षेशी निगडीत मामला आहे पण त्यातही आधिभौतिक प्रलोभनांची घुसड.. वरुन म्हणे कर्मफळ भोगावच लागतं... कोणत्याही कर्माचिच मुळात शाश्वत पाप-पुण्य अशी विभागणी मोजणी होउ शकत नसताना त्याच (जन्मो जन्मी) फल काय घंटा मिळणार ?
ह्यात आपापल्या क्षमतेनुसार मार्ग निवडून त्यावर मार्गक्रमणा करत फळाची प्राप्ती करणं महत्त्वाचं.
फळ मिळवायच असतं हाच भ्रम आहे. जे आहे ते सहज स्विकारा बस. भौतिक मोजमापात न सामावणार नाही असं काही ना मिळवायचय ना गमवायचय...
28 Apr 2013 - 1:20 am | प्यारे१
तथास्तु!
28 Apr 2013 - 1:33 am | अग्निकोल्हा
तुम्ही मला एखादि गोश्ट देउ केलित अन मी ती घेतली नाही तर ती कोणाकडे बरे राहिल ?
28 Apr 2013 - 1:38 am | प्यारे१
तथास्तु चा अर्थ आपल्या इच्छेनुसार होवो.
पुन्हा एकदा तथास्तु म्हणून पूर्णविराम घेतो.
तथास्तु चा वेगळा अर्थ निघत असल्यास मराठी अर्थाचा विचार व्हावा.
स्वगतः शैली ओळखीची वाटत असली तरी जास्तीच्या शुद्ध लेखनामुळे व अधिक क्लॅरिटीमुळे कौतुक वाटत आहे.
पू र्ण वि रा म !
28 Apr 2013 - 1:53 am | अग्निकोल्हा
अस्स है काय ? हे कंदी मैयतच न्हवतं.
पुन्हा सविनय नकार.
सविनय नकारचा अर्थ कळाला नसल्यास हिब्रुचा रेफरन्स घ्यावा.. तरीही लक्षात आलं नाही तर ? क्लॅरिटी एक्सपर्टला गाठा.
प्रगटः- मन फसवं आहे. त्यावर इतकं विसंबुन राहु नका.
28 Apr 2013 - 2:20 am | प्यारे१
खिक्क्क!
28 Apr 2013 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा
@तुम्ही मला एखादि गोश्ट देउ केलित अन मी ती घेतली नाही तर ती कोणाकडे बरे राहिल ?>>>



































28 Apr 2013 - 7:02 pm | प्यारे१
अ. आ.
जे म्हणायचंय ते लगेच, आता, इथेच म्हणा.
उद्या माझ्या आयडीवर मेगाब्ळॉक होणार आहे. :)
बाकी अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा.................
हे नक्कीच एक क्रियाविशेषण असलं पाहिजे. हे मला समज लंय पण तुम्हाला ग सोडल्याशिवाय समजणार नाही. ;)
29 Apr 2013 - 11:53 am | सामान्य वाचक
या मध्ये , निष्काम कर्मयोग हा मुद्दा आहे.
कर्माची गती लॉजीकल असली तरी अतिगहन असते.
वर वर चे वाचन किंवा विचार करून त्याचा मूळ गाभा लक्ष्यात येणे कठीण आहे.
30 Apr 2013 - 5:37 am | शुचि
गीता रहस्य मधील "कर्मविपाक" धडा (चॅप्टर ला काय म्हणतात?) सुंदरच आहे.
30 Apr 2013 - 8:34 am | अर्धवटराव
गीतारहस्यातला कर्मविपाक हे टिळकांचं जीवनसार आहे. वैचारीक तत्वांना नित्यव्यवहारात जगुन दाखवल्यामुळेच या ग्रंथाला इतकी उभारी आलेली आहे.
अर्धवटराव
30 Apr 2013 - 12:21 pm | सामान्य वाचक
श्री . हिराभाई ठक्कर यांचे ''कर्माणू सिद्धांत'' वाचले नसेल तर जरूर वाचा.
अतिशय सोप्या अणि सुंदर रीतीने कर्मयोग स्पष्ट केला आहे.
30 Apr 2013 - 1:15 pm | अग्निकोल्हा
कर्मयोगावर संजय क्षीरसागरचे प्रांजळ मत काय आहे हे वाचुन घ्यायला मला नक्किच आवडेल. संजय क्षीरसागर, यावर लिखाण हवच हं.
30 Apr 2013 - 2:18 pm | संजय क्षीरसागर
तो विषय आणि त्यातले मुद्दे मात्र कृपया इथे आणू नका. या लेखाचा विषय वेगळा आहे.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
30 Apr 2013 - 2:46 pm | अग्निकोल्हा
पण तुझ लिखाणमात्र मनाला खुप स्पर्शुन जातं, आणी त्यातही जास्त आवडते ति तुझी सर्वांना आनंद वाटत रहायची व्रुत्ति. माझं ते माझं, तसच माझं ते तुमचही म्हणन खरच इतक सोप नसतं रे. तुला ते उत्तम साधलय याच फारफार कौतुक आहे. तुझ्या लेखनातली जादु मोहिनी पाडते, अतिशय आनंद मिळतो तु लिहलेलं वाचायला. फारच रिफ्रेशिंग.
म्हणूनच जेंव्हा सदस्यांनी इथे विषयांतर करुन कर्मयोगावर (श्री़कृष्ण सोडुन) इतर लेखकांचे विवेचन वाचायचा मुद्दा उपस्थित केला तेव्हां सर्वप्रथम तुझच नाव डोळ्यासमोर आलं. त्यातले मुद्दे इथे आणनार नाहिच, उलट यावर एखादा स्वतंत्र लेखच लिही ही प्रेमाची विनंती केलि होती. असो.
1 May 2013 - 11:37 pm | संजय क्षीरसागर
कधी मूड आला तर कर्मयोगावर नक्की लिहीन
26 Apr 2013 - 9:55 pm | अर्धवटराव
+१
अर्धवटराव
26 Apr 2013 - 4:48 am | शुचि
आय अॅम दॅट चे काही एक्स्पर्ट्स वाचले होते.
26 Apr 2013 - 12:51 pm | संजय क्षीरसागर
मॉरिसनं आय एम दॅट मधे महाराजांच्या मराठीचा रंग उतरवण्याचा एकदम प्रामाणिक प्रयत्न केलाय पण मराठी ती मराठीच. निदान महाराजांसाठी तरी. ते ओशोंच्या हिंदी सारखं आहे. त्यांचं दोन्ही भाषांवर कमालीचं प्रभुत्त्व होतं पण त्यांच्या हिंदीतल्या अष्टावक्र महागीतेचा इंग्रजी अनुवाद असंभव आहे. ते सहाही वॉल्यूम्स निव्वळ कहर आहेत. जनका सारखा बुद्धिमान राजा, अष्टावक्रासारखा महान सांख्ययोगी आणि ओशोंच्या अभिव्यक्तीची कमाल!
महाराजांचं मला तितकंच कौतुक आहे. मराठी शिवाय दुसरी भाषा येत नाही पण जे सांगायला ओशो तीस मिनीटं घेतील, एकहार्ट दहा मिनीटं घेईल ते महाराज दोन वाक्यात सांगून मोकळे!
थोडक्यात काय तर आय एम दॅट ला सुखसंवादाची सर नाही.
26 Apr 2013 - 1:33 pm | यशोधरा
कुठे मिळेल हे पुस्तक?
26 Apr 2013 - 5:30 pm | संजय क्षीरसागर
पुण्यात अनमोल पुस्तक भांडार, बुधवार चौक
26 Apr 2013 - 4:35 pm | स्पा
शब्दांचे पोकळ बुडबुडे
26 Apr 2013 - 6:35 pm | संजय क्षीरसागर
जे लिहीलय तो माझा अनुभव आहे. नुसते उतारे कॉपी-पेस्ट केलेले नाहीत. माझा आयडी केव्हाही ब्लॉक होऊ शकतो. तो अजून चालू कसाये हेच आश्चर्य आहे. आणि मजा म्हणजे इतक्या अनिश्चिततेत मी शांतपणे लिहीतोय. वॉट एल्स कॅन बी अ प्रूफ ऑफ द स्टेट दॅट आय एम टॉकिंग अबाऊट? यू मे लूज अ लव्हली अपरच्युनिटी दॅट हॅज कम योर वे, अँड दॅट टू जस्ट फॉर फ्री.
26 Apr 2013 - 6:48 pm | पिलीयन रायडर
कुणाची तरी आठवण आली..!!
असो..
तर तुमचा मि.पा चा आयडी कधीही बॅन होऊ शकतो आणि तरी तुम्ही शांत आहात हे प्रुफ आहे असं म्हणताय..
मि.पा इतकं महत्वाचं आहे तुमच्यासाठी?
उत्तर नाही दिलत तरि चालेल.. मी आपलं टईमपास म्हणुन विचारलं..
26 Apr 2013 - 7:13 pm | अमोल खरे
>>उत्तर नाही दिलत तरि चालेल.. मी आपलं टईमपास म्हणुन विचारलं..
=)) =))
26 Apr 2013 - 8:02 pm | संजय क्षीरसागर
माझ्यासाठी नाही. केव्हाही काहीही होऊ शकतं ही अस्तित्वाची अनिश्चितता मला मंजूर आहे आणि त्यामुळे मी निर्धास्त आहे. स्वतःला अशा पोजिशनमधे इमॅजिन करून पाहा. तुम्हाला वास्तविकतेचं भान येईल आणि प्रतिसादातला उपहास निघून जाईल.
27 Apr 2013 - 7:48 pm | सामान्य वाचक
एकदा आपल्याशी या विषयावर चर्चा करायची आहे...
27 Apr 2013 - 10:40 pm | संजय क्षीरसागर
जे विचारायचंय ते लगेच, आता, इथेच विचारा.
27 Apr 2013 - 11:30 pm | राजेश घासकडवी
कशानेच काहीही फरक पडत नसेल, आणि कधीही काहीही होत असेल, तर हा आग्रह का?
28 Apr 2013 - 11:05 am | संजय क्षीरसागर
अशी विचारणार्याची चित्तदशा असेल तर त्याचं जीवन निष्प्रश्ण झालंय. ही इज रेडी फॉर एनीथिंग अँड नथींग अफेक्टस हिम. ते स्वरूपात स्थिर झालेल्याचं लक्षण आहे. पण त्यांना चर्चा करायची आहे म्हणजे ही नीडस सम क्लॅरिफिकेशन. अशा परिस्थितीत व्हाय नॉट नाऊ?
28 Apr 2013 - 6:34 pm | राजेश घासकडवी
हा प्रश्न त्यांच्याविषयी नव्हता. त्यांनी म्हटलं की सावकाश बोलू. घाई तुम्हीच करत आहात. मुद्दा असा, की तुम्ही त्या स्वरूपात स्थिर झाला नाही आहात. जे घडतंय त्याचा तुमच्यावर परिणाम होतो. म्हणूनच महाराजांच्या तत्वज्ञानाप्रमाणे तुम्ही स्वतःचा 'मी अमुक आहे' पासून तुमची मुक्ती झालेली नाही असं सांगायचं होतं. 'मी जगाला शहाणं करून सोडणारा आहे' अशी तुमची स्व-प्रतिमा तुमच्या प्रतिसादातल्या घाईवरून दिसली. तेवढीच दाखवून द्यायची होती.
28 Apr 2013 - 10:24 pm | संजय क्षीरसागर
मी त्यांना प्रामाणिकपणे `लगेच विचारा म्हटलं' कारण सत्य आता, इथे आहे, `नंतर' नाही. तप्तरतेचा अर्थ अहंकार होत नाही. माझ्या लेखनाची संपूर्ण जवाबदारी मी घेतो त्यामुळे इथले प्रश्न इथेच विचारले जावेत इतकीच अपेक्षा आहे.
28 Apr 2013 - 11:22 pm | राजेश घासकडवी
अहंकाराचा प्रश्नच येत नाही. स्वतःची प्रतिमा बाळगण्याबद्दलच हे सगळं आहे. महाराज म्हणतात की सगळ्याच स्वप्रतिमा टाळा. नुसते असा. आता तुम्ही 'स्वतःच्या लेखनाची जबाबदारी घेणारा' ही प्रतिमाही बाळगून आहातच की. जगाकडून किंवा इतरांकडून अपेक्षाही आहेत. म्हणजे तुम्ही त्या आदर्श अवस्थेला पोचलेला नाहीत आणि शिवाय आपण पोचलेलो नाही याची जाणीव तुम्हाला नाही.
अनेक तत्वज्ञ 'इच्छा सोडा, म्हणजे तुमचं भलं होईल' असं अनेकांना ठणकावून सांगतात. लोकं मानाही डोलवतात. पण त्या सांगणाऱ्याने आपली सांगण्याची इच्छा सोडलेली नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. 'स्वतःला जगण्याचं अंतिम ज्ञान झालंय' ही आत्मप्रतिमाही सोडलेली नाही. ही विसंगती दाखवायची होती.
29 Apr 2013 - 11:26 am | संजय क्षीरसागर
आपल्या अहंकाराविषयी कल्पना गमतीशिर आहेत. आता मी उत्तरं दिलं तर तुम्ही म्हणणार माझ्यावर परिणाम झाला आणि नाही दिलं तर अर्थ काढणार, तुमच्या निष्कर्शाला माझ्याकडे उत्तर नाही!
सत्य गवसलेला देहात आहे तोपर्यंत त्याची व्यक्ती वैशिष्ठ्य राहणारच.
महाराज भर प्रवचनात विड्या ओढायचे. ज्याचं लक्ष विडीकडे आहे तो म्हणेल, साधी विडी सोडता येत नाही आणि स्वतःला सिद्ध म्हणवतात. आणि जो सत्य शोधतोय त्याचं लक्ष वक्तव्याकडे असेल. फरक महाराजांना पडत नाही, बघणारा वंचित राहतो.
29 Apr 2013 - 11:48 am | सामान्य वाचक
माझ्या सध्या प्रतिसादावर इतका भडीमार पाहून माझी चर्चा करायची इच्छा संपली.
29 Apr 2013 - 11:51 am | मोदक
पुढचा भाग कधी..?
30 Apr 2013 - 3:12 am | राजेश घासकडवी
अहंकार हा शब्द मी वापरला नव्हता, तो तुम्हीच माझ्या तोंडी भरत आहात. मी मला काय म्हणायचं ते स्पष्ट केलं, तुम्ही लेबलं लावत बसायचं तर बसा.
उत्तर दिलं तरी पंचाइत आणि नाही दिलं तरी पंचाइत, यातूनच हा प्रश्न अनुत्तरणीय आहे हे लक्षात येत नाही का? तेवढं कबुल केल्याबद्दल धन्यवाद.
माझा मुद्दा असा आहे की कसलीच इच्छा न करता 'निव्वळ असणं' हे केवळ कोमातल्या व्यक्तीला शक्य आहे. असो. ही चर्चा माझ्याकडून थांबवावी म्हणतो. तुमचं चालू द्यात.
30 Apr 2013 - 10:39 am | संजय क्षीरसागर
उत्तर खाली दिलंय
28 Apr 2013 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख आणि प्रतिसाद वाचतोय.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2013 - 3:15 pm | संजय क्षीरसागर
सर्वात महत्त्वाच म्हणजे या प्रतिसादाचा त्या दोघांशी काहीएक संबंध नाही. तर त्यांनी मांडलेल्या अध्यात्मिक विचारप्रणालीशी आहे. आणि हा प्रतिसाद त्याच स्पिरिटनं वाचला जावा. कुणी सत्य शोधावं, कसं शोधावं किंवा शोधू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त माझं आकलन मांडतोय. त्यांच्या विचारांचा प्रतिवाद करत नाही.
ग्लीफनं म्हटलंय :
`बाय डिफॉल्ट' हे सत्याविषयी माझं आकलन आहे. आजपर्यंत अध्यात्मात हा शब्द वापरला गेलेला नाही. याचं कारण म्हणजे हा शब्द तितकासा प्रचलित नव्हता आणि दुसरं म्हणजे कंप्युटरमुळे आज तो लोकांना जितका चटकन समजू शकेल तसा पूर्वी समजण्याची शक्यता नव्हती.
तर मुद्दा असाये : सत्य ही मिळवण्याची गोष्ट नाही, ती स्थिती आहे. त्यामुळे कोणतीही क्रिया किंवा साधना तुम्हाला सत्याप्रत नेऊ शकत नाही. थोडक्यात थांबणं, तुम्ही चालण्यातनं जाणू शकणार नाही. त्यामुळे भक्तीमार्ग तंत्रमार्ग, योगसाधना, ध्यानधारणा, परिक्रमा किंवा कशानंही सत्याचं आकलन अशक्य आहे... इथे जरा विस्तार आवश्यक आहे.
सत्य ही स्थिती बाय डिफॉल्ट आहे. म्हणजे कोणताही सिद्ध येवो, जावो; तुम्ही साधना करा किंवा करू नका, पृथ्वी फिरो किंवा थांबो, दिवस असो की रात्र, इथे काय की चंद्रावर सत्य असेलच. सत्य सर्व आकार अंतर्बाह्य व्यापून आहे.
त्यामुळे मुळात आपणही सत्यच आहोत.
आपण स्वतःला व्यक्ती समजतो म्हणून स्थितीचा उलगडा होत नाही इतकंच. साधना सत्यप्राप्तीसाठी नाही कारण सत्य तर ऑलरेडी आहेच. साधना आपण व्यक्ती आहोत या भ्रमातून मुक्त होण्यासाठी आहे. ज्या क्षणी आपण व्यक्ती नाही हा उलगडा होतो त्याच क्षणी आपण सत्य आहोत हा उलगडा होतो.
त्यामुळे साधना करावी किंवा नाही हा खरा प्रश्न नसून साध्य काय आहे हा आहे. जर कुणी देव भेटेल, प्रसन्न होईल, त्याची कृपा आपत्ती दूर करेल अशा हेतूनं साधना करेल तर तो स्वतःला भ्रमात नेतोय कारण देव ही त्याचीच कल्पना आहे. त्यामुळे साधना तुमचा व्यक्तीमत्वाचा भ्रम दूर करते का हा खरा सवाल आहे.
प्यारेनं दुसरी बाजू मांडलीये :
हा लूप आहे. पहिली गोष्ट, सर्व स्मृती मेंदू व्यतिरिक्त कुठेही नाही आणि माणूस गेल्यावर ती हार्डडिस्क संपूर्ण फॉरमॅट होते. त्यामुळे पूर्वजन्म, त्याचं सुकृत वगैरे निव्वळ कल्पना आहेत त्यांना काही एक आधार नाही.
दुसरी गोष्ट, रमणांना साधना न करता उलगडा झाला म्हणजे त्यांनी मागल्या जन्मी साधना केली होती असं नाही. त्याचा अर्थ फक्त इतकाच की त्यांचा व्यक्तिमत्वाचा भ्रम साधना न करता दूर झाला. ही वॉज अॅन एक्सेप्शन आणि अगेन, एक्सेप्शन प्रूव्हज द रूल.
सिद्धत्वानंतर बुद्धाला साधक म्हणाले : तुम्ही अपूर्व आहात, अशी घटना करोडोत एखादी घडते. त्यावर बुद्ध म्हणाला, मी अपूर्व नाही, इतकी साधी, सोपी, सतत समोर असलेली गोष्ट तुम्हाला कशी दिसत नाही याचं मला आश्चर्य आहे.
28 Apr 2013 - 7:03 pm | प्यारे१
हो माऊली. चूक पदरात घ्या. :)
28 Apr 2013 - 10:06 pm | अग्निकोल्हा
.
28 Apr 2013 - 5:45 pm | अग्निकोल्हा
इथे संजय क्षीरसागर आणि अत्रुप्त आत्माची कडाक्याची जुगलबंदी झालीये त्याविषयी थोडं... सर्वात महत्त्वाच म्हणजे या प्रतिसादाचा त्या दोघांशी काहीएक संबंध नाही. तर त्यांनी मांडलेल्या विचारप्रणालीशी आहे. आणि हा प्रतिसाद त्याच स्पिरिटनं वाचला जावा. कुणी सत्य शोधावं, कसं शोधावं किंवा शोधू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त माझं आकलन मांडतोय. त्यांच्या विचारांचा प्रतिवाद करत नाही.
अत्रुप्त आत्मानं म्हटलंय :
हा आत्मा आहे, तो स्थल काल शरीर याला बांधला गेलेला नाही मुक्तआहेच पण तरीही अत्रुप्त म्हणुन वावरतो ? आता हे कसे ठरणार ? तर लॅक ऑफ क्लॅरीटी. ति त्याच क्ष्णी येते जेव्हां अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा होते.
संजय क्षीरसागरनं म्हटलंय :
इथे प्रश्न आयडी ब्लॉक व्हायचा नसुन अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा का म्हटले नाही हा येतो. लहानपणी गोश्टी वाचली होती गौतम बुध्द अन वाल्या कोळीची. बुध्दाला त्याने बोल लावले पण बुध्द मात्र शांतच बघुन त्याने प्रश्न केला की मी इतके डिवचुनही आपण शांत कसे ? बुध्दांनी फार सहज म्हटल तु मला एखादि गोश्ट देउ केलित अन मी ती घेतली नाही तर ती कोणाकडे बरे राहिल ? वाल्या म्हणाला माझ्याकडेच............. बिंगो. नेमकी हीच तर गंमत आहे... आज जिथे तिथे देणारे उगवलेत... समोरच्याला ते हवय का नको याचा विचारकराणारे अजिबात नाहीत अन हिच खरी "मी" (शाना) आहेची साधना होय. सर्व सत्य अवतरते. झकास क्लॅरीटी निर्माण करता येते मग जागे असा वा झोपलेले. लॉगीन असा वा गंडलेले... एकदा हा उलगडा झाला की प्रतिसाद लिहायला पुन्हा कशाचीच गरज उरता नाही. उचलला हात फोडला किबोर्डवर बस इतकच... एकदा तुम्ही निश्चितपणे जाणले की आपल्या कल्पनेखेरिज कोणीच इतरांना त्रास देऊ शकत नाही, मग तुम्ही आपल्या इच्छा, भिती, पूर्वधारणा याकडे दुर्लक्ष करता आणि केवळ याच सत्याने छळायला सुरुवात करता...
28 Apr 2013 - 10:57 pm | संजय क्षीरसागर
प्रतिसादात बुद्धाची जी गोष्ट तुम्ही सांगताय तो संदर्भ वेगळा आहे. बुद्धानं ते अपशब्दांबद्दल म्हटलं होतं की मी घेतलेच नाहीत तर देणार्याकडे राहतील. स्वतःच्या निरूपणाविषयी नाही. आणि इथे अपशब्दांचा प्रश्नच नाही.
तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर दिलं. तुम्ही ते घ्या किंवा सोडून द्या, यात छळण्याचा किंवा अहंकाराचा प्रश्न कुठे येतो?
28 Apr 2013 - 7:05 pm | jaypal
पाषवी षक्तिंना वश करायच आहे. अघोरी उपासना असली तरी चालेल. कुणी मदत करील का? मदत.....
28 Apr 2013 - 10:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग्लिफ यांची मतं चक्क पटन्यासारखी आहेत म्हणजे वाचक म्हणून प्रतिसाद आवडले. (डोक्यावर परिणाम झाला आहे का वगैरे असे व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद सोडले तर) दाद
द्यावे असे प्रतिसाद. धन्स
-दिलीप बिरुटे
29 Apr 2013 - 10:46 am | अमोल केळकर
छान माहिती :)
अमोल केळकर
29 Apr 2013 - 12:04 pm | रितुश्री
"'अमकातमका मी ही कल्पनाच फोल असल्यामुळे ती सातत्य चाहते. आपले नित्यस्वरूप मात्र असतेच त्याला सातत्याची गरज नाही. पण ' मी अमकातमका ' असे मानल्यामुळे ती भावना घट्ट टिकवून ठेवण्यासाठी आपण ती वागवेल तसे वागतो. तिच्या मर्जीशिवाय कुठलाही व्यवहार तिला कबूल नसतो. क्षणोक्षणी ती वेगळे रूप घेते आणि आपला व्यवहार नित्य, अखंडीतपणे चालूच ठेवते. ही अनर्थकारी परंपरा कायमची थांबवण्यासाठी मी अमकातमका ही कल्पना एकदाच कायमची सोडणे हाच एक रामबाण उपाय आहे. "
"आपल्या असण्याबद्दल पूर्णपणे जागृत राहा म्हणजे तुम्ही जाणिवपूर्वक आनंदात राहाल. तुम्ही आपले मन जे तुम्ही जे नाही त्याकडे लावता त्यामुळे तुम्ही सुस्थितीची, खुशालीची जाणिव गमावून बसता.""
हे एकदमं खरे .... मनाला पटते... पण ऱोजच्या जीवनात असे वागणे केवळ अशक्य होते.... :(
29 Apr 2013 - 12:49 pm | अग्निकोल्हा
एका एणारायचा घरातला हा खरोखर घडलेला किस्स्सा, सालाबादापर्माने त्याची आइ ५ महिन्याचा विसा मंजुर होउन उसगावात नातवाला भेटायला आली. नातवाचा समवयस्क मित्र (१२-१४ वय साधारण) अधुन मधुन घरी असायचा जेव्हां यांची कसलीशी धार्मीक पोथी का काही पुस्तक वगैरे वाचनही चालु असायच. आपल्या मित्राची ग्रॅनी असं रोज एकच पुस्तक सारख काय वाचत असते याचे त्या छोटा गोर्याला फार फार कुतुहल. एकदा शेवटी त्याने ते पुस्तक मागितलं बघायला. यांनीही फार प्रेमान दिलं... आत काय लिहलय समजायचा प्रश्नच न्हवता पण कव्हर बघुनच पोराला फेफरं आलं. त्या नंतर तो मुलगा परत कधिही घरामधे खेळायला आला नाही...
३-४ आठवड्यात एणारायला ही बाब लक्षात आलि जेव्हां त्या उसगावमधील पोराचा बाप याला वाटेत भेटला... याने सहज विचारला तुमचा डेनीस द मेनिस आजकाल आमच्या चिंटुकडे येत नाही खेळायला ? बोलावे की नको या संभ्रमात असतानाच तो बोलुन गेला डेनीस द मेनिस म्हणतो चिंटुज ग्रॅनी इज रिडींग सेक्सी बूक. आय सॉ अ नेकेड मॅन ऑन कव्हर पेज, हु अल्सो स्मोक पॉट/ युजिंग नार्कोटिक्स ? हे ऐकुन एणाराय सटपटला, श्रध्दास्थानाची काहिशी विटंबना बघुन सात्विक संतापाने खाडकन बोलुन गेला ओ..... जरा तोंड सांभळुन बोला... अहो असं काय म्हणताय ? ते फार मोठ्ठे संत आहेत आमचे. आणी त्यांची अवस्था फार फार वरची आहे.. त्यांना या गोष्टीने काही फरक पडत नसतो म्हणून ते असे असतात. राहिला प्रश्न नग्नतेचा तर त्याला नग्नता न्हवे विरक्ती म्हणतात. सन्यासी माणुस असाच असावा.
उसगावचा माणुस थोडासा आवाक्, पण लगेच सावरुन म्हणाला ठीक आहे, क्षमा करा मला व माझ्या मुलालाही. ते छोटसं पोरगंच आहे. वास्तव काय हे समजायला नक्किच चुकलं असणार. पण भावना दुखवल्या जाणार नसतिल मला फक्त इतकच विचारायच आहे तुमचे महाराज खरोखर इतके मोठे, ऑलरेडी पोचलेलेच व महान व्यक्तिमत्व आहे. सर्व अॅकॉम्प्लिश/सर्टीफाय झालेलं आहे. की ति व्यक्ती फसवा अतिसामान्य साधक अथवा केवळ अध्यात्मात वर जाण्यासाठी धडपडणारा/ प्रयत्नवादी जिव न्हवे... तर मग त्यांना समाज कसा उरफाटा आहे याची जाणीव नाही काय ?
समाजात किमान चारचौघामधे असताना सभ्यतेच्या, सुसंस्काराच्या चार गोश्टी स्वतःहोउन पाळणं ही जास्त महत्वाची शिकवण ठरत नाही काय ? त्यांची राहणी वागणुक सवयी यांचे अतिसामान्य अज्ञानी मानवांच्या मनावर विचारांवर कृतिंवर घडणारे परिणाम समजु शकत नाहीत काय ? हे सर्व शिष्टाचाराच्या सभ्यतेच्या सुसंस्कारांच्या प्रथा मोडणार्या का असाव्यात की तो असामान्य ठरण्याचा प्रमुख नियमच आहे ?
जर त्यांना असेच रहायच असेल तर एकांतवासात त्यांनी जरुर हवं तस रहावं, वागाव, बोलावं, जे पायजे ते करावं. पण जेव्हां चारचौघे भलेही स्वतः होउन दर्शनाला/त्रास द्यायला समोर येतात किमान तेव्हां तरी त्यांच्या समोर सुसंस्कारीत सामान्य वर्तणुकच ठेवणं हे समाजासाठी जास्त प्रशस्तच्व त्यांच्यासारख्या पोचलेल्या व्यक्तिला अतिशय सामान्य गोश्ट नाही का ? की सन्यासी असण हे सन्यासी दिसण्यापेक्षा कमी महत्वाच असतं ? यावर एणारायकडे खरतर उत्तरच न्हवत.. तरीही तो बोलुन गेला "इट्स काँप्लिकेटेड, यु वोंट अंडरस्टँड".
29 Apr 2013 - 3:12 pm | अवतार
जे सत्य मुळात चर्चा करून गवसणारच नाही त्यासाठी इतकी चर्चा कशाला?
तार्किक चर्चांनी अध्यात्माविषयी जाणता येईल पण स्वत:च्या जाणिवेत खोलवर उतरण्यासाठी धैर्य लागते. ते धैर्य कसे मिळवायचे हे साधकाला समजावतो तो खरा गुरु. पण त्याकरता साधकाचा गुरुवर विश्वास असावा लागतो. तो विश्वास तर्कशुद्ध स्पष्टीकरण देऊन निर्माण होत नाही. गुरु-शिष्य हे देखील एक नाते असते. कोणतेही नाते हे भावनांच्या ओलाव्याशिवाय टिकत नाही. तो भावनांचा ओलावा जर शिष्यापर्यंत पोचला नाही तर शिष्याला अध्यात्माचे ज्ञान मिळेल पण अनुभूती मिळणार नाही.
1 May 2013 - 2:50 pm | अत्रुप्त आत्मा
आध्यात्माचा जीवनवादी/व्यावहारिक अर्थ सांगणारा प्रतिसाद





1 May 2013 - 11:15 pm | संजय क्षीरसागर
स्वतःच्या जीवनातली उद्विग्नता सत्यशोधनासाठी पुरेसा प्रेरक आहे. अनेक ज्ञानीजनांना मृत्यूची अनिवार्यता अमृताचा शोध घेण्यासाठी कारण ठरली आहे. जाणिवेत उतरण्यासाठी धैर्य लागत नाही, जीवनाची सुरूवात आणि शेवट असा समग्र प्रवास सुस्पष्टपणे दिसण्याची गरज आहे.
सुरूवात साधक करतो. मग गुरू असला नसला काही फरक पडत नाही. बर्याच वेळा ग्रंथच गुरू ठरतात. आपल्याला सत्य गवसलं की नाही हा अंतीम निर्णय देखील शिष्याचा असतो. स्वतःच्या जीवनात आलेली शांती, कोणत्याही साधनेची अनावश्यकता आणि सरते शेवटी (केला असेल तर त्या) गुरूपासून देखील मुक्ती (त्याच्या विषयी कृतज्ञता राहतेच) ही सत्य गवसल्याची लक्षणं आहेत.
व्यक्तिमत्वाचा निरास हा उद्देश आहे. सत्य तर आपण आहोतच. एकावेळी, एका क्षणात, इतक्या लोकांशी संवाद साधता येणारं इंटरनेट सारखं उत्तम माध्यम (आणि ते ही टू-वे) असल्यावर चर्चेसाठी यापेक्षा उत्तम पर्याय नाही. मला तर तो ग्रंथापेक्षाही लाइव्ह वाटतो.
2 May 2013 - 8:08 pm | अवतार
अंतिम सत्याची जाणीव होणे म्हणजे आपल्या "स्व" ला निराकार जाणीवेत विलीन करणे. ह्यासाठी जीवनाचा शेवट नुसताच सुस्पष्टपणे दिसून भागत नाही. तो तर सर्वांनाच दिसत असतो. त्यापलीकडे जे अज्ञात विश्व आहे त्याला सामोरे जाण्यासाठी धैर्य लागतेच. कोणतीही गोष्ट जाणणे म्हणजे त्या गोष्टीला आपल्या इंद्रियांच्या कक्षेत आणणे. अंतिम सत्य हे इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येउच शकत नाही. त्यासाठी निराकाराच्या सागरात खोलवर बुडी मारावी लागते. पण ती क्रिया स्वेच्छेने घडायला हवी. "स्व" चे निराकारात विलीनीकरण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण त्यासाठी निव्वळ चर्चा किंवा ग्रंथ हे पुरेसे ठरत नाहीत. चर्चा आणि ग्रंथ यांचा मुख्य उद्देश वैचारिक आदानप्रदान हा असतो. ते तुम्हाला सागराची दिशा दाखवू शकतात पण त्यात विलीन होण्याची प्रेरणा देऊ शकत नाहीत. "स्व" चा अडथळा दूर करून ती प्रेरणा कशी जागृत करायची हे ज्ञान शुद्ध चैतन्याचा प्रकट आविष्कार असलेल्या व्यक्तीकडूनच मिळू शकते. ती व्यक्ती म्हणजेच गुरु. "शब्देविण संवादू" कसा साधायचा हे शब्दांच्या माध्यमातून सांगता येत नाही. त्यासाठी गुरु आणि साधकाच्या मनांच्या तारा जुळायला हव्यात. मग षड्ज सापडायला वेळ लागत नाही.
2 May 2013 - 10:05 pm | सुधीर
"गुरुविण अनुभव कैसा कळे" खरं असेल तुमचं म्हणणं कदाचित पण गुरु ही "व्यक्ती" असणंच महत्त्वाचं आहे का? आजकालच्या जगात गुरु वगैरे शोधणं कठीण वाटतं, म्हणून आपली एक शंका.
3 May 2013 - 12:49 am | संजय क्षीरसागर
बरोबर!
एकदम बरोबर!
का?
गुरू कोण हे कोण ठरवणार? शिष्यच.
कोण कुणाशी संवाद साधतो? मौन शिकून कसं येईल?
स्व शिष्यानंच निर्माण केलाय आणि त्यालाच त्याचं निरसन करायचंय. शिष्य जोपर्यंत त्याच्या अनुभवानं सत्य गवसल्याची घोषणा करत नाही तोपर्यंत गुरूनं शिष्याच्या सिद्धत्वाची घोषणा केली तरी तिचा काही उपयोग नाही.
गुरू उपयोगी असू शकतो पण असायलाच हवा असं नाही.
2 May 2013 - 10:10 pm | सुधीर
सध्या तरी हाच अनुभव आहे.
30 Apr 2013 - 10:38 am | संजय क्षीरसागर
निव्वळ असणं हे स्थिरत्वं आहे. तो डेड-लॉक नाही.
सत्याकडे तुम्ही या अँगलनं पाहा : शांतता आहे. ते `निव्वळ असणं' आहे. शांतता आपण नाकरू शकत नाही. ती ध्वनीचा स्त्रोत आहे. ध्वनीची निर्मिती, स्थिती आणि लय शांततेमुळेच शक्य आहे. आणि तरीही `शांतता कुठे आहे?' हे कधीही दर्शवता येणार नाही कारण ती स्थिती आहे, अभिव्यक्ती नाही.
याही पुढे जाऊन, शांतताच सार्वभौम आहे. तिचं प्रकट रूप ध्वनी आहे आणि ध्वनीचं अप्रकट रूप शांतता आहे. ती एकसंध अनिर्मित स्थितीच सारं चराचर अंतरबाह्य व्यापून आहे.
ज्याला शांतता हा सत्याचा पैलू गवसला तो शांततेशी एकरूप होतो, शांत होतो. याचा अर्थ तो बोलायचा बंद होतो किंवा कोमात जातो असा नाही. खरं तर त्याच्याच बोलण्यातून सत्याची अभिव्यक्ती होते. म्हणून तर सिद्धाचे शब्द महत्त्वाचे आहेत. सूज्ञाचं सारं लक्ष सिद्ध काय सांगतोय याकडे आहे, तो वागणूकीचा उहापोह करत नाही.
30 Apr 2013 - 10:42 am | Dhananjay Borgaonkar
तुमच्या महाराजांची ओळख आवडली. यावेळी आमचेच महाराज तेवढे महान हा आग्रह धरला नाहीत हे सगळ्यात जास्त आवडल हे मनापासुन नमुद करतो.
बाकी चर्चा चालुदेत.
30 Apr 2013 - 12:14 pm | संजय क्षीरसागर
आभारी आहे.
30 Apr 2013 - 12:33 pm | चेतन माने
हे आध्यात्मिक लोक स्वतः उमजलेलं दुसर्याला पटवायच्या भानगडीत का पडतात ???
तुम्हाला कोणी सांगितल हे सगळ्यांना पटवून द्याच म्हणून!!
माझ्या मते आध्यात्माच्या बाबतीत माणसाने स्वार्थी राहायला हवं उगाच दुसर्याला पटवायच्या नादात आपल्या डोक्याचा भुगा कश्यापायी!!
(अशावेळी मला एकच ओळ आठवते - "तुझे आहे तुझपाशी !"
30 Apr 2013 - 12:57 pm | संजय क्षीरसागर
एखादा उत्तर ध्रुवावर जाऊन आलेला इथे प्रवासवर्णन का टाकतो? एखादी पाककृती इथे का सांगितली जाते? कविता का प्रकाशित कराविशी वाटते? कारण प्रत्येकाला त्याचा आनंद शेअर करायचा असतो.
माझ्यावर जबरदस्ती कुठे आहे? एकेका सिद्धाला इथे मांडतांना मला आनंद आहे.
आपल्याला स्वच्छंद गवसावा अशी प्रत्येकाची आंतरिक इच्छा असते. ज्यांना समजेल असं वाटतं त्यांना उत्तरं द्यायची, नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. डोक्याला ताप अजिबात नाही.
तेच तर सांगतोय, तुझ्यापाशी कशाला? तुम्हीच सत्य आहात!
30 Apr 2013 - 1:24 pm | चेतन माने
अगदी अगदी !!
मी माझ्या आसपास असणार्या लोकांबद्दल बोलत होतो, सगळेच आपल्यासारखे समझदार कुठे आहेत.
आनंद वाटणे(शेअर करणे) चांगली गोष्ट आहे, ज्याला तो अनुभवासा वाटेल तो नक्कीच अनुभवेल ज्याला नाही वाटत त्याला राहूदे तसच .
30 Apr 2013 - 1:27 pm | बाळ सप्रे
आमचा बेंबट्या झालाय. गुरुदेव म्हणाले "He is the you in the I of the you. In which you in the I and I in the you are the you in the you."
वाचून हाय आणि लो दोन्ही ब्लडप्रेशर एकदम सुरु !!
30 Apr 2013 - 1:41 pm | संजय क्षीरसागर
द्राक्षंही नाहीत आणि रूद्राक्षही नाही!
पण याला दुसरी बाजूही आहे. ज्याला द्राक्षांची मजा घेतांना रूद्राक्ष सापडलं त्याचं जगणं सार्थक झालं!
30 Apr 2013 - 2:50 pm | अग्निकोल्हा
हम्म मंजे पुलंना फक्त एकच बाजु कळली म्हणायच की ?
ओह यु मीन फ्रॉम सेक्स टु एनलाइट्मेंट का ?
30 Apr 2013 - 3:29 pm | संजय क्षीरसागर
सत्य गवसलेला आनंदी होतो आणि आनंदी माणसाला सत्य गवसण्याची शक्यता सर्वात जास्त असते.
30 Apr 2013 - 4:13 pm | अग्निकोल्हा
.
1 May 2013 - 12:51 am | मोदक
सत्य आधी गवसते की आनंद..?