प्रवास

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
25 Apr 2013 - 6:22 pm

प्रवास चालू आहे माझा
शून्याकडून क्षितिजाकडे
.
.
अथक,
अविरत
.
.
थांबता नाही येणार मला
खूप थकलोय, पण
थांबलो तर मन रागावेल
आणि पाय तर चालायला नकार देतायत
जाऊन जाऊन कुठे पोहोचणार?
क्षितीज तर एक रेघ..
आणि शून्य? ते काय?
सुरवात केलेल्या बिंदुला
गोल फिरून पोहचणारी
एक वळसे घेणारी रेघच ना?
.
.
मग का चालावे?
पण मन, ते का ऐकत नाही?
मनालाच ठाऊक
विचारले जरी
सांगता थोडीच येणार आहे त्याला?
आणि सांगितलेच तरी
कळणार कोणाला इथे?
जाऊ दे
त्यापेक्षा हा प्रवास काय वाईट आहे?
चालू ठेऊया
शून्याकडून क्षितिजाकडे
.
अथक,
अविरत

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२२/०५/२०११)
(हो, साधारण दोन वर्षांपूर्वी लिहीलेली हि कविता आहे.)

करुणशांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

25 Apr 2013 - 8:06 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

यशोधरा's picture

25 Apr 2013 - 8:12 pm | यशोधरा

अथक प्रवास..

किसन शिंदे's picture

25 Apr 2013 - 8:39 pm | किसन शिंदे

आवडली!!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Apr 2013 - 8:40 pm | अत्रुप्त आत्मा

मि.का.....सलाम हो.....!

पैसा's picture

25 Apr 2013 - 10:13 pm | पैसा

कविता आवडलीच!

स्पंदना's picture

26 Apr 2013 - 5:05 am | स्पंदना

थांबला तो संपला.
मिका किती गुढ विचार आहे हा! अन मजा म्हणजे आपल्या भोवतालचं भवतालही असच वर्तुळात फिरते आहे. पृथ्वी, आकाश, अवकाश....विचार करायला लागलं तर ...तरी सुद्धा पुन्हा गरगरतच!

चाणक्य's picture

26 Apr 2013 - 7:10 am | चाणक्य

आपण हे सगळं का करतोय , याला पर्याय नाही, करावं तर लागणार, वगैरे वगैरे..... भावना छान उतरल्या आहेत शब्दांत.

अभ्या..'s picture

27 Apr 2013 - 2:46 am | अभ्या..

छान जमलीय मिका. मस्त एकदम. :)

तिमा's picture

27 Apr 2013 - 10:03 am | तिमा

आपण सर्वांनी चालतच रहावे कारण विश्वाचे ज्ञात आकारमान १३.८ अब्ज प्रकाश वर्षे आहे .

संदर्भः http://www.aisiakshare.com/node/1736