आठवणींनी जीव माझा
बेचैन किती जाहला?
सखये तुझा कुठे तो...
माझाही न राहिला.
दूर किती दूर जाशी
लागे मज हुरंहूरं
शांत आहे ही तृप्तता
की भावनांचे काहूरं?
वेड असे भीत आहे
हाक कशी देऊ मी?
का तुझिया स्मरणाने
फक्त तृप्त होऊ मी???
आसवांचे नजराणे
का मागे प्रीत ही?
सहजाच्या जगण्याची
का अल्लड रीत ही?
दु:ख्ख असे आज नाही
जरी न तुझा राहिलो
देवालयी पुष्पांसम
निर्माल्य अता जाहलो.
वेड्या त्या उद्यानी
तार कुणी छेडिली?
कृष्ण नव्हे कृष्ण अन्
राधा हि न राधा राहिली...
प्रतिक्रिया
6 Mar 2013 - 6:18 am | स्पंदना
.
आत्माजी? सुरेख भाऊ!
फक्त पहिल्या कडव्यात "जीवा"बद्दल बोलताय ते लक्षात येत नाही. अन "माझा हि" जरा चुकलय का? ते 'ही' हवंय. अन ते माझा ला जोडुन हवंय.
हे अन शेवटच कडव काव्याची उच्च्त्तम पातळी गाठतात.
मस्त रे आत्मुस! मस्त भावा! लिहित रहा.
6 Mar 2013 - 7:27 am | धन्या
अशा कविता लिहिणारेही पुणेकरच.
6 Mar 2013 - 9:48 am | मोदक
मस्त कविता हो बुवा..
धन्या, नक्की पुणेकर का..? त्या असिधा(व्हावामा)विजि संघाचे काय झाले? ;-)
9 Mar 2013 - 1:27 am | धन्या
ईकडे नर्हे आंबेगांवपर्यंत आणि तिकडे मोशीपर्यंत पुणे आहे.
6 Mar 2013 - 8:26 am | प्रचेतस
वा बुवा, वा.
सुंदर कविता.
6 Mar 2013 - 9:00 am | पैसा
छान लिहिताय! हल्ली तुम्हाला तुमचा सूर सापडलेला दिसतोय.
9 Mar 2013 - 1:28 am | धन्या
असंच काही नाही. कदाचित त्यांचा सूर हरवलाही असेल म्हणून ईतक्या सुंदर कविता लिहित आहेत ते. ;)
6 Mar 2013 - 9:52 am | मिसळलेला काव्यप्रेमी
वाह बुवा... भन्नाट
या साठी एक मस्तानी लागू तुम्हाला.
6 Mar 2013 - 10:35 am | फिझा
सुंदर कविता.
6 Mar 2013 - 11:02 am | अग्निकोल्हा
फक्त हीच ओळ कवितेच्या गाभ्याशी विसंगत वाटली. पण एकुणच कविता अप्रतिम. बहुदा शेवटचा पॅरॉ समजुन घेण्यात माझिच चुक होत असेल.
8 Mar 2013 - 10:26 pm | अत्रुप्त आत्मा
सर्वांचे धन्यवाद...!
8 Mar 2013 - 10:51 pm | सस्नेह
थांबा हो ! इतक्यात नका निर्माल्य होऊ.
देवाला जरा सुवास तर घेऊ द्या...!
8 Mar 2013 - 11:42 pm | अधिराज
वाह! क्या बात है!
9 Mar 2013 - 6:14 am | चौकटराजा
विडंबनाचा आला कंटाळा
वाल्याचा वाल्मिकी झाला
एक सूर प्रितीचा हरवला
परि कवनास सूर गवसला
बुवा आमची कविता कशी वाटते. पण सांप्रत आपण कहर चालविला आहे. राधा या नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का ? ( इथे डोळा बारीक केलेली स्मायली ! ) .
9 Mar 2013 - 8:43 am | धन्या
हे कधी झालं. बुवा बोलले नाहीत काही.
कदाचित पुर्ण शब्दच चुकीचा असेल. राधा हे कवी जयदेव याने गीतगोविंद या काव्यात उभं केलेलं काल्पनिक पात्र आहे असं वल्ली म्हणतो. ;)
9 Mar 2013 - 9:08 am | चौकटराजा
काही वेळा काल्पनिक प्रियेवर ही प्रेम करण्यात मजा असते राव ! नवरंग चित्रपटात " मोहिनी" त गुंतलेला कवि बरंच काही उत्त्तम काव्य करून जातो. बुवाही आता राहकवि असले तरी राजकवि होतील एक दिवस !
9 Mar 2013 - 8:21 am | अन्या दातार
अप्रतिम कविता हो बुवा. :-)
9 Mar 2013 - 9:22 am | ५० फक्त
लई भारी ओ बुवा,धन्यवाद
अभासिंधाव्हावामा संघातर्फे
9 Mar 2013 - 9:25 am | प्रचेतस
>>>> अभासिंधाव्हावामा संघातर्फे
ते मधले जिपा राहिले काय?
अभासिंधाव्हावामाजिपा संघातर्फे
9 Mar 2013 - 3:57 pm | धन्या
ओ पिमचिनवाले, एकदा तरी अशी तरल, भावस्पर्शी, हळूवार, मृदू, मयुरपंखी कविता लिहा आणि मग आमच्या संघाला जिलेबीपाडू संघ म्हणा.
9 Mar 2013 - 6:21 pm | चौकटराजा
हॅ हॅ हॅ , धन्या तुम्हाला सियाचिन म्हणायचे आहे का ? कारण जिलबीचे व्यापारी चांद्या पासून बांद्या पर्यंत पसरले आहेत.
9 Mar 2013 - 9:53 am | इन्दुसुता
कविता हुरहुर लावून गेली.
अवांतरः
"सहजाच्या जगण्याची
का अल्लड रीत ही?"
हे 'सहज' कोण म्हणे? आपले मिपावरचे सहज मामा तर नव्हेत? :D
9 Mar 2013 - 10:45 am | इरसाल
एकही स्मायली नसल्याने आमचा पास.
9 Mar 2013 - 11:00 am | jaypal
"आठवण" काढीत चला
10 Mar 2013 - 12:28 am | जेनी...
गुर्जि पीरमात पडलेत राव !
१०१टक्का .....
व्हय नावं गुर्जि ?? ;)
12 Mar 2013 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा
@गुर्जि पीरमात पडलेत राव !
१०१टक्का ..... >>> =)) बालिका... महा डँबिस =))
आंम्ही गेली १५ वर्ष पिरेमात पडूनच आहोत... :-p
अता उचला कुणितरी...असं म्हणायची येळ आलीया. =))
19 Mar 2013 - 4:12 pm | प्यारे१
>>>>आंम्ही गेली १५ वर्ष पिरेमात पडूनच आहोत...
अता उचला कुणितरी...असं म्हणायची येळ आलीया.
तर बुवांचे वय किती????
19 Mar 2013 - 7:18 pm | अत्रुप्त आत्मा
@तर बुवांचे वय किती????>>> ३६ :-p :-p :-p
19 Mar 2013 - 7:35 pm | अभ्या..
हे वर्ष जाउ द्या मग. आकडा जरा रिस्की आहे =))
12 Mar 2013 - 12:33 am | ५० फक्त
बुवा कविता पुन्हा एकदा वाचली, तुम्ही ते आपलं विडंबनाचंच बघत जा, नका उगा काहीतरी हळवं लिहित जाउ, विवि फार बोअर होतं आहे,
विवि म्हणजे गविंचा भाउ नव्हे, विना विडंबन.
12 Mar 2013 - 12:49 am | किसन शिंदे
ते विडंबन वैगेरे राहू द्या हो बुवा, नेहमी असंच काहितरी लिहित चला.
ओरिगनल काव्य!
19 Mar 2013 - 7:29 pm | प्रशांत
सुंदर कविता.
12 Mar 2013 - 12:50 am | धन्या
या ओळी खुपच अर्थगर्भ आहेत. ;)
19 Mar 2013 - 1:58 pm | बॅटमॅन
वाह आत्मूस वाह!!!! छान कविता. साधी-सरळ-नेमकी :)
21 Mar 2013 - 6:05 pm | कान्होबा
खुप छान आहे आणि सत्याता आहे