चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
3 Mar 2013 - 3:31 am

"मोदक, तू कॉमर्स बॅकग्राऊंडचा असूनही आयटी कंपनी मध्ये कसे काय..?"

या प्रश्नाचे नेमके उत्तर काय द्यावे हा क्रायसीस बरीच वर्षे मागे लागला आहे. नेमके (म्हणजे समोरच्याला अपेक्षीत!) उत्तर दिले गेले नाही तर, "हल्ली काय, कुणीही आयटीमध्ये भरती होतात!" असे बोचरे टोमणे बसतात ;-) असे टोमणे बर्‍याचदा ऐकून सध्या अवलंबलेला मार्ग म्हणजे "मी एक्सेल वर काम करतो" हे सांगायचे.

'एक्सेल' चे नाव काढले की लोकांच्या दोन प्रकारच्या प्रतिक्रिया असतात,
एक म्हणजे, "एक्सेलवर काय असते काम करण्यासारखे..?" यातल्या बर्‍याच जणांना 'एक्सेल = डेटा एन्ट्री' असेही का वाटते देव जाणे.
दुसरी प्रतिक्रिया म्हणजे, "एक्सेल..???" कित्ती भारी ना..? सगळे फॉर्मुले येतात..?" टाईप्स.

या सर्व प्रकारात असे लक्षात येते आहे की लोकांच्या मनामध्ये एक्सेलबद्दल अनेक गैरसमज आहेत, मायक्रोसॉफ्ट ऑफीस ज्या ज्या कॉम्प्यूटरवर असते त्या त्या सर्व कॉम्प्यूटरवर एक्सेल असते त्यामुळे 'अतिपरिचयात अवज्ञा' या न्यायाने एक तर एक्सेल वापरले जात नाही किंवा वापरले तरी साधी कामे पार पाडण्यासाठी साधे सोपे मार्ग उपलब्ध असूनही केवळ माहिती नसल्याने असूनही आपण तेच काम करण्यात प्रचंड वेळेचा अपव्यय करतो.

नमनाला घडाभर तेल घालून इथून पुढे मला जे थोडेफार एक्सेल येते ते टप्प्या टप्प्याने शिकवण्याचा प्रयत्न करतोय.

बर्‍याच एक्सेल संज्ञा या इंग्रजीमध्ये वापरल्या आहेत व त्याअनुषंगाने आजूबाजूचे शब्द आलेले आहेत, त्यामुळे "मराठी सेंटेन्समध्ये इंग्लीश वर्डस यूज केले" या सबबीखाली धाग्याला अवांतराचे ग्रहण लागू नये अशी अपेक्षा आहे.
आत्तापर्यंत लिहिलेल्या विविध विषयांवरच्या धाग्यांपेक्षा हा थोडा वेगळा प्रयत्न आहे.. सांभाळून घ्यालच!

आणखी एक - सर्व वाचकांना एकाच पातळीवर आणण्यासाठी सुरूवातीचे धागे माहितीपर आहेत. दैनंदिन कामात एक्सेल वापरणार्‍यांना हे सर्व 'खूप बेसीक' वाटू शकेल, आपण हळूहळू नवीन फंक्शन्स शिकत जावूया - एकत्र!

एक्सेल - अतिसंक्षिप्त ओळख.

(मी मुद्दाम एक्सेलच्या जन्मापर्यंत जात नाहीये; एकतर त्याचा या धाग्यामध्ये फारसा उपयोग नसणार आहे आणि ती माहिती अंतर्जालावर सहज उपलब्ध आहे!)

एक्सेल म्हणजे एक स्प्रेडशीट आहे, ज्यामध्ये टॅब्यूलर फॉरमॅटमध्ये डेटा मेंटेन केलेला असतो.
बाजारात एक्सेलप्रमाणे अनेक अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहेत परंतु मायक्रोसॉफ्टशी संलग्नता, त्यामुळे जवळजवळ सर्वच कॉम्प्यूटरमध्ये असलेली उपलब्धता आणि अत्यंत साधे स्वरूप यांमुळे एक्सेल बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे.
मिनिटॅब, IBM SPSS वगैरे अ‍ॅप्लीकेशन बर्‍याच बाबींमध्ये एक्सेलपेक्षा जास्ती उपयोगी असूनही त्यांचा वापर कमी आहे याचे कारण हेच. (तसेच या अ‍ॅप्लीकेशन्स साठी पैसे मोजावे लागतात!)

एक्सेल व्हर्जन्स.

सध्या एक्सेल २०१० हे अद्ययावत व्हर्जन असून एक्सेल २००७, एक्सेल २००३ आणि एक्सेल २००० ही या आधिची व्हर्जन्स आहेत. (एक्सेल २००० वर कुणी मिपाकराने काम केले असल्यास एक्सेल २००० ते एक्सेल २०१० चा प्रवास लिहून काढावा ही आग्रहाची विनंती - एक रोमहर्षक कहाणी आहे ती!)

मी एक्सेल २०१० वरती काम करतो त्यामुळे सर्व स्क्रीनशॉट एक्सेल २०१० चे आहेत.

आपण आता एक्सेलशीटकडे वळूया.

एक्सेलशीट ओपन करण्यासाठी Start --> All Pragrams --> Microsoft Office --> Microsoft Excel 2010 असा मार्ग वापरावा. (एक्सेल २००३, एक्सेल २००७ साठी हाच मार्ग आहे)

आता तुमच्यासमोर बर्‍याच उभ्या आडव्या रेषा आणि त्यांपासून बनलेले अनेक चौकोन दिसत असतील. हीच एक्सेल शीट.

.

१) Name Box - या ठिकाणी; सद्यस्थितीला कर्सर कोणत्या Cell मध्ये आहे ते समजते.

२) Formula Bar - फॉर्म्यूला बारमध्ये Cell मध्ये असलेला नंबर किंवा माहिती किंवा जे असेल ते दिसते. वरील स्क्रीनशॉटमध्ये Cell L9 मध्ये असलेला स्टँडर्ड डेव्हीएशन चा फॉर्म्यूला दिसत आहे.

३) Quick Access Toolbar - या टूलबार मध्ये आपल्याला हवे असणारे महत्वाचे शॉर्टकट्स साठवून ठेवता येतात व हवे त्या वेळी लगेचच वापरता येतात.

४) Column Name - एक्सेल शीटवर दिसणारे A, B, C पासून XFD पर्यंत दिसणारे उभे चौकोन म्हणजे Columns आहेत.

५) Ribbon Menu and Tabs - रिबन मेन्यू २००७ व्हर्जन पासून अस्तित्वात आला. २००७ च्या आधिच्या एक्सेलमध्ये एखाद्या फंक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी बराच क्लिकक्लिकाट करायला लागायचा. तो टाळण्यासाठी २००७ पासून या प्रकारचा मेन्यू डिझाईन केला गेला.

६) Workbook Name - सध्या वापरात असलेले वर्कबूक कोणते आहे ते इथून ओळखता येते.

७) Row Number - एक्सेल शीटवर दिसणारे १, २, ३ पासून १०,४८,५७६ पर्यंत दिसणारे आडवे चौकोन म्हणजे Rows आहेत.

८) Cell - सद्यस्थितीला कर्सर कोणत्या चौकोनात आहे तो चौकोन म्हणजे Cell.
Column चे नाव आणि Row चा नंबर मिळून Cell Reference तयार होतो. (या उदाहरणार L9)

९) Vertical Scrollbar - एक्सेलशीटमध्ये उभे; वरखाली स्क्रोल करण्यासाठी हा स्क्रोलबार वापरतात.

१०) Range - ज्यावेळी आपण एकावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्ती Cells सिलेक्ट करतो त्यावेळी तो Cell समुह म्हनजेच रेंज.

११) Worksheet Name - Excel Workbook मध्ये असलेल्या वेगवेगळ्या Excel Sheet चे नाव इथे वाचता येते.

१२) Range Stats - आपण माऊसच्या सहाय्याने सर्वच्या सर्व नंबर्स सिलेक्ट केले असतील तर सिलेक्ट केलेल्या आकड्यांच्या संबंधीत पुढील गोष्टी विनासायास या ठिकाणी समजतात.
अ‍ॅव्हरेज, आकड्यांची संख्या, लहान आकडा (Minimum within Range), मोठा आकडा (Maximum within Range), आकड्यांची बेरीज.

१३) Horizontal Scrollbar - एक्सेलशीटमध्ये आडवे; डावीकडून उजवीकडे स्क्रोल करण्यासाठी हा स्क्रोलबार वापरतात.

१४) Page View - सध्या एक्सेल शीट कोणत्या फॉरमॅटमध्ये दिसत आहेत ती इथे कळते. तसेच एक्सेल शीट 'पेज लेआऊट' आणि 'पेजब्रेक' फॉरमॅटमधून बघता येते.

१५) Zoom - एक्सेल शीट ची झूम लेव्हल किती आहे ते इथे कळते.

क्रमशः

**********************************************
हा धागा मुद्दाम लहान ठेवला आहे, सुरूवातीचे दोन तीन धागे अशाच माहितीवर आधारित असतील.

सूचनांचे स्वागत आहे, पुढील धाग्यांमध्ये त्याप्रमाणे बदल करता येतील.

Vlookup, Pivot Table वगैरे गोष्टी आपण शिकणार आहोत परंतु सध्या सर्वांना एका पातळीवर आणूया नंतर एकत्र शिकायला जास्ती मजा येईल असे वाटते.

महत्त्वाचे - धाग्यामधल्या कोणत्याही गोष्टीसंदर्भात काही कळाले नाही तर शंकासमाधान होईपर्यंत प्रश्न विचारले तरी हरकत नाही. मात्र एखादा भाग आत्ता कळाला नाही तर नंतर त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या इतर बाबी न कळण्याची दाट शक्यता आहे!

अतीमहत्वाचे - 'Microsoft Certified Excel Specialist' असूनही मला एक्सेल संपूर्णपणे येते हे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल, तस्मात्; माझ्याकडून एखादी चूक झाल्यास अवश्य नजरेस आणून द्यावी. आनंदाने सुधारणा करून घेण्यात येईल.
**********************************************

शिक्षणमाहिती

प्रतिक्रिया

क्या बात, मोदकसाहेब, क्या बात!

Microsoft Certified Excel Specialist

__/\__

दीपा माने's picture

3 Mar 2013 - 4:50 am | दीपा माने

तुमच्या उदार शिकवणीचे स्वागत आहे.

दादा कोंडके's picture

3 Mar 2013 - 5:11 am | दादा कोंडके

एक्सेल या टूल साठी मायक्रोसॉफ्टचे सगळे गुन्हे माफ आहेत. अगदी डेटा एंट्री ऑपरेटर ते शास्त्रज्ञापर्यंत उपयोगी असं दुसरं कोणतही टूल दुसरं नसेल. म्याथ्स जर चांगलं असेल आणि वीबी येत असेल तर कुठल्याही एडवान्सड सिम्युलेशन टूलच्या तोंडात मारेल इतके चांगले रिझल्ट एक्सेल मधून येतात. पावरफूल ब्याक एंड आणि उत्तम गुइ. याची मोठ्ठी त्रुटी म्हणजे ६५५३५ क्वालम्सचं लिमिट होती पण २००७ नंतर ते लिमिट २^२४ झाल्याने कितीतरी इंजिनीअरींग टूलचा धंदा बसला. :)

पुढच्या भागाची वाट बघतोय.

नन्दादीप's picture

3 Mar 2013 - 7:42 am | नन्दादीप

+१

मोदक's picture

3 Mar 2013 - 12:21 pm | मोदक

एक्सेल २००३ मध्ये ६५५३६ Columns नसून ६५५३६ Rows होत्या व २५६ Columns होते.

या ६५५३६ पण एक मजा होती, २५६ (Row Count) चा वर्ग म्हणजे ६५५३६. :-)

मात्र हे असोसिएशन नंतरच्या व्हर्जनमध्ये नाहीये.

मोदक's picture

3 Mar 2013 - 12:23 pm | मोदक

अ र्र र्र र्र

या ६५५३६ पण एक मजा होती, २५६ (Row Count) चा वर्ग म्हणजे ६५५३६.

इथे Row Count ऐवजी Column Count असे वाचावे. ;-)

दादा कोंडके's picture

3 Mar 2013 - 5:39 pm | दादा कोंडके

बरोबर. प्रतिसाद प्रकाशीत केल्यावर लगेच चुक लक्षात आली.

नंतर १०२४^२ एव्हडी झाली.

लॉरी टांगटूंगकर's picture

3 Mar 2013 - 12:18 pm | लॉरी टांगटूंगकर

एडवान्सड सिम्युलेशन टूलच्या तोंडात मारेल इतके चांगले रिझल्ट एक्सेल मधून येतात.
+१००
या केपेब्लीटीज उशिरा कळल्या,
मी मॅटलॅबवर केलेलं काम पण एकानी एक्सेलवर करून दाखवल्यावर गोट्या कपाळात गेलेल्या...

दादा कोंडके's picture

3 Mar 2013 - 5:45 pm | दादा कोंडके

खरंय. एक्सेल मध्ये म्याट्रीक्स म्यानिप्युलेशनसाठी काहीच फ्वार्म्युली उपलब्ध आहेत पण बहुतेक वेळी ते चालून जातात. ऑफीसमधला एक एक्सेल चांपिअन म्याथक्याड वगैरे टूलले डेमो द्यायला आलेल्यांच्या तोंडाला फेस आणत असे. ;)

पण म्याटल्याबच्या टूल ब्वाक्सेसमुळे क्वाम्प्लेक्स प्रश्न सोडावला सोपे जातात.

मोदक's picture

3 Mar 2013 - 5:53 pm | मोदक

ऑफीसमधला एक एक्सेल चांपिअन म्याथक्याड वगैरे टूलले डेमो द्यायला आलेल्यांच्या तोंडाला फेस आणत असे

खर्र खर्र सांगतो दादानू.. अशी एखाद्याची टोपी उडवायला लै लै मजा येते. :-D

आणि व्हिक्टीम जर क्लायंट साईडचा असेल तर आपले जीएम / AVP लोकंसुद्धा गालातल्या गालात हसत मजा बघत बसतात!

लीलाधर's picture

3 Mar 2013 - 7:19 am | लीलाधर

हजर बरं का. एक लंबर धागा काढलाय राव पुढील भाग येउद्यात लौकर.

अरे वा!, शिकवणीला आम्ही आलं तर चालेल का गुरुजी?
लिलाधरा, थांब की! लगेच दुसर्‍या यत्तेत जायला आम्हाला जमणार नै! तुझं काम लै फाष्ट!

लीलाधर's picture

3 Mar 2013 - 8:30 am | लीलाधर

थांब की
@ रेवती आज्जे मी थांबलेलोच आहे. मी जरी घाई केली तरी मनोज सर माझं ऐकणार कुठे आहेत ? त्यांचा अजेंडा फिक्स आहे की :))

नन्दादीप's picture

3 Mar 2013 - 7:42 am | नन्दादीप

HLOOK UP , VLOOKUP या बद्दल शिकायला आवडेल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Mar 2013 - 12:04 pm | ज्ञानोबाचे पैजार

मास्तर,
मॅक्रो पण कसे वापरायचे ते शिकवा

प्रसाद गोडबोले's picture

3 Mar 2013 - 9:29 pm | प्रसाद गोडबोले

व्ही बी ए म्यॅक्रो वरील लेखाची आतुरतेने वाट पहात आहे !

नीलकांत's picture

3 Mar 2013 - 8:02 am | नीलकांत

मोदक मास्तर , लेख उत्तम झाला आहे. आता नियमीत पुढचे लेख येऊ द्या. तुमच्या शाळेत नाव घातले आहे. :)

पप्पु अंकल's picture

3 Mar 2013 - 8:18 am | पप्पु अंकल

आता तरी व्यवस्थित शिकेन म्हणतो

पुष्करिणी's picture

3 Mar 2013 - 8:35 am | पुष्करिणी

हजर आहे. गृहपाठ पण द्या रोज.

मन१'s picture

3 Mar 2013 - 8:43 am | मन१

उपयुक्त......
आभार.

पिंपातला उंदीर's picture

3 Mar 2013 - 9:11 am | पिंपातला उंदीर

धडपडत रडत पडत एक्सेल वापरतो पण त्यात काय राम नाही. फारच उपयुक्त धागा. बुकमार्क करून ठेवला आहे. आन् दो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2013 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदका मस्त रे, शिकायला आणि समजून घ्यायला आवडतंच.
लेखनाचं स्वागत. पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

3 Mar 2013 - 9:15 am | चौकटराजा

मी लहान असताना, मुलाना काय काय आले पाहिजे याचा एक अभ्यासक्रम होता. भीमरूपी, रामरक्षा, गीतेचा १५ वा अध्याय. नक्षत्रांची नावे वगैरे. तरूण झालो. नोकरी साठी करायचा अर्ज, बॅक खात्याची विम्याची ओळख असे त्या अभ्यास क्रमाचे स्वरूप झाले. आता माझे असे मत आहे की ( ठाम) मुलाना स्तोत्रे वगैरे शिकविण्यात वेळ दवडू नका. जनरल नॉलेज ( जगातील सर्वात लांब प्लाटफॉर्म खरगपूर हे उदाहरण )हे सर्वात कमी उपयुक्त असते असा माझा अनुभव आहे. मग काय हवे शिकवायला. आरोग्य, कायदा, संगणक वापर व अर्थ व्यवहार हे चार खांब त्याच्या मनात घट्ट रोवावयास हवेत. आजच्या जगात हे खरे " संस्कार" ठरणार आहेत. सुदृढ,सभ्य,व सम्यक पिढी घडू शकेल. त्यात हे एक्सेल चे ज्ञान आले. आपले घरगुती कामात, अर्थव्यवहारातही एक्सेल सारख्या साधनांचा खूप उपयोग होतो. असा अनुभव आहे. सॉर्ट हे यातील एक बलस्थान आहे. याची स्क्रिप्ट शिकल्यास सोनेपे सुहागा.
मोदक - जे आपणासी ठावे ......शहाणे करावे सकळजन या उक्तीची अंमलबजावणी आल्याबद्द्ल धन्यवाद !

धन्या's picture

3 Mar 2013 - 6:41 pm | धन्या

काळानुरुप संस्कारांची व्याख्या बदलायला हवी.

चित्रगुप्त's picture

4 Mar 2013 - 7:10 am | चित्रगुप्त

छान. छान.
शिकायला हवे एक्सेल असा विचार करता करता वर्षे उलटली. आता तुम्ही शिकवत आहात तर शिकायलाच हवे.

अभ्या..'s picture

3 Mar 2013 - 12:23 pm | अभ्या..

मला एमेस ऑफीस मधले एकही अ‍ॅप्लीकेशन नीट वापरायला येत नाही. आता ट्राय करीन. धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

3 Mar 2013 - 12:36 pm | संजय क्षीरसागर

संकेतस्थळाचा एक सुयोग्य वापर!

मोदक's picture

3 Mar 2013 - 12:37 pm | मोदक

संकेतस्थळाचा एक सुयोग्य वापर!

प्रचंड सहमत!!!!!!!! :)

एक्सेलबरोबर जास्त काही करायला जमत नाही. या लेखमालेच्या माध्यमातून बरेच काही कळेल ही आशा..मस्त उपक्रम हो मोदूगुर्जी!!!

सस्नेह's picture

3 Mar 2013 - 1:13 pm | सस्नेह

आमची एक शेणखा.., आपलं शंका !
एका सोम्यागोम्याने मला वर्कशीट दिलंय त्यात VLOOKUP वापरलंय.
आता मला त्याची रेंज कशी शोधायची ते सांगाल का ?

मोदक's picture

3 Mar 2013 - 1:57 pm | मोदक

=Vlookup(Lookup_Value,Table_Array,Column_Index_Number,Range_Lookup)

यातील "टेबल अ‍ॅरे" म्हणजेच रेंज.

यातून रेंजचे नाव दिसते पण लोकेशन ?

Vlookup फॉर्म्यूला इथे पेस्ट कर!

संपूर्ण वर्कशीटच तुला मेल करते.

मोदक's picture

3 Mar 2013 - 11:04 pm | मोदक

ओके...

त्या फॉर्म्यूलामध्ये रेंजला नाव देवून ("Name Function" पाथ- Formulas Tab --> Name Manager) table_array म्हणून वापरली आहे.

वरती एकमेव डायग्राममध्ये जो नेमबॉक्स आहे (क्रमांक १), त्या नेमबॉक्सच्या उजव्या बाजूच्या छोट्या बाणाला क्लिक करून तिथे हवे ते नाव सिलेक्ट केल्यास कर्सर आपोआप रेंजच्या ठिकाणी जाईल. ही रेंज नेम फंक्शनमधूनच बदलता येते.
(आणि हो.. तुम्ही पाठवलेल्या फाईलमधील रेंज गंडलेली आहे, असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. :-D)

एक काळजीपूर्वक सल्ला - मला एक्सेलशीट्स / डेटा व्यनी करताना आपापल्या कंपनीची डेटा शेअरींग आणि सिक्यूरीटी पॉलिसी तपासून मगच शक्य असेल तर फाईल्स पाठवा. अन्यथा डमी डेटा तयार करून पाठवावा, आपण Real Life Scenarios 'Replicate' करून पाहू.

अनऑथोराईज्ड डेटा शेअरींग ही खूप जोखमीची बाब आहे!

धन्या's picture

3 Mar 2013 - 11:13 pm | धन्या

एक काळजीपूर्वक सल्ला - मला एक्सेलशीट्स / डेटा व्यनी करताना आपापल्या कंपनीची डेटा शेअरींग आणि सिक्यूरीटी पॉलिसी तपासून मगच शक्य असेल तर फाईल्स पाठवा. अन्यथा डमी डेटा तयार करून पाठवावा, आपण Real Life Scenarios 'Replicate' करून पाहू.

अनऑथोराईज्ड डेटा शेअरींग ही खूप जोखमीची बाब आहे!

ऑफीसचं किंवा क्लायंटचं ईमेल अकाऊंट वापरुन या भानगडी करुच नयेत. अगदी अनावधानाने झालेली छोटीशी चूक नोकरी घालवू शकते.

मोदक's picture

3 Mar 2013 - 11:19 pm | मोदक

खरे आहे.. हे बघितलेल्या अनुभवाचे बोल आहेत.

आमच्या एका परममित्राकडून अनावधानाने ही चूक झाली. दहा ठिकाणी "सॉरी! परत असे करणार नाही" चा मेल पाठवावा लागला त्याला.

आणि एच आर ने गंभीरतेचा आव आणून दम दिला तो वेगळाच!

सर्वजण काळजी घ्या हो !

सस्नेह's picture

4 Mar 2013 - 1:53 pm | सस्नेह

ही रेंज नेम फंक्शनमधूनच बदलता येते.
existing name function edit करायचे की नवीन name function बनवायचे ? कृपया सोदाहरण स्पष्ट करावे.
काळजीपूर्वक सल्ल्याबद्दल अधिक धन्यवाद.
आपल्या व सर्वांच्या माहितीसाठी : आपणास पाठवलेले वर्कशीट सँपल डेटा वापरून बनवलेले होते ज्या माहितीचा प्रत्यक्ष आकडेवारीशी काहीही संबंध नाही ! मूळ मुद्दल सुरक्षित आहे ..!a

मोदक, तुला ह्याबद्दल बोलणारच होतो. लेखमालिका वाचून सर्व सराव लिबरऑफिसच्या एक्सेलवर करण्याचा प्रयत्न करेन. बघूया लिबरऑफिस एक्सेल किती पॉवरफुल आहे.

मला एक्सेलमध्ये काही अडलं की मी चंदूला विचारतो. आता मोदकरावांना पण त्रास देणार...

चंदू एक्सेलमधला बाप माणूस आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2013 - 5:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

मायक्रोसॉफ्टची एक्सेल ही सर्वोत्तम देण आहे.

अशा बहुगुणी टूलची सुगम शास्त्रीय ओळख करून देण्याचा हा तुमचा उपक्रम खचितच स्तुतीपात्र आहे.

पैसा's picture

3 Mar 2013 - 5:52 pm | पैसा

दहा एक वर्षे एक्सेल हापिसात सतत वापरलं आहे. अगदी त्या १९९७ का काय त्या जुनाट एडिशनपासून. पण बारकाईने शिकायला आवडेल. तसंच त्यातले किती प्रयोग ओपन ऑफिसच्या कॅल्क मधे करता येतात हे तपासायचे आहे.

तसंच त्यातले किती प्रयोग ओपन ऑफिसच्या कॅल्क मधे करता येतात हे तपासायचे आहे.

पैसातै, करीयरच्या सुरुवातीला बँकेत न जाता आयटीत गेली असतीस तर आज एखादया बडया आयटीची कंपनीची रीटायर्ड सीईओ असतीस. तुला सांगतो, आज आयटीमधल्या बहूतांशी पोरापोरींमध्ये याच्या दहा टक्केही नविन काही जाणून घेण्याची उत्सुकता नसते. :(

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Mar 2013 - 12:57 am | विश्वनाथ मेहेंदळे

खरे आहे रे. पैसाताई आता थोडे programming शिकल्या तर मिपाच्या तांत्रिक समितीत जरूर हातभार लावू शकतात.
(No sarcasm at all)

पैसा's picture

4 Mar 2013 - 10:35 am | पैसा

पण हरकत नाही. ते सुद्धा शिकावे म्हणते!

दादा कोंडके's picture

4 Mar 2013 - 4:09 pm | दादा कोंडके

सहमत. म्हणजे मिपा जे वारंवार बंद तरी पडणार नाही. ;)

धन्या's picture

3 Mar 2013 - 6:57 pm | धन्या

प्रचंड क्षमता असलेल्या परंतू तितकंच दुर्लक्षिलेल्या या गुणी अ‍ॅप्लिकेशनबद्दल तुमच्यासारख्या या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीकडून वाचायला मिळण्यासारखं दुसरं भाग्य ते कोणतं?

एरव्ही सी शार्प या प्रोग्रामिंग लॅग्वेजचे गोडवे गाणारा मी. दोन महिन्यांसाठी बेंचवर आलो. बरेच दिवस रिकामा आहे हे पाहून एका मॅनेजरने पकडलं आणि एक एक्सेल शीट चिपकवून दिली. म्हणे या एक्सेल शीटमधले ग्राफ वापरुन असं असं प्रेझेंटेशन बनवण्यासाठी मॅक्रो लिही. बिलेबल प्रोजेक्टवर असतो तर "असली फडतूस कामं मी करत नाही" असं म्हणून मी त्या मॅनेजरला फाटयावरच मारला असता. बेंचवर असल्यामुळे जनाची नाही पण मनाची लाज वाटून मी हो म्हटलं.

व्हीबीए (व्हिज्युअल बेसिक फॉर अ‍ॅप्लिकेशन्स) नावाची संगणक भाषा वापरुन मला एक्सेल मॅक्रो लिहायचा होता. सुरुवात जरी नाखुशीने केली होती तरी तो प्रकार प्रचंड आवडला. मी लिहिलेला कोड एक्सेल शीटमधून चार्ट उचलून ते पीपीटीवर ठेवत होता. एक्सेल शीटमधल्या सेल्समधून टेक्स्ट उचलून त्याचे बुलेट पॉइंटस बनवत होता. अमेझिंग !!!

सध्या मॅक्रो या प्रकारात माझे विविध प्रयोग चालू आहेत.

तुर्तास एव्हढेच. एक्सेल मॅक्रोबद्दल सविस्तर असे मोदुराव लिहीतीलच. ;)

चौकटराजा's picture

4 Mar 2013 - 9:08 am | चौकटराजा

धन्या , मी आता मॅक्रो कसा करायचा हे विसरून गेलो आहे. व्ही आरेस घेऊन दहा वर्षे झाली. पण पीसी ला " मायला गुलाम आहेस आमचा तू लेका ! " असे बजावून सांगायला मॅक्रो हे एक मस्त साधन होते यात शंका नाही.

विटेकर's picture

4 Mar 2013 - 12:34 pm | विटेकर

पपट. म्हणजे वैताग ! त्यापेक्शा एक्सेल म्हन्जे होम्पीच ! जरा सविस्तर sangal या मक्रो बद्दल ?
मेल केली तरी चालेल vitekar@gmail.com

अनन्न्या's picture

3 Mar 2013 - 7:00 pm | अनन्न्या

प्रश्न विचारण्याएवढे कळत नाही. पण या माहितीचा माझ्या कुवतीनुसार अभ्यास करीन. फक्त शिकवणी अर्धवट सोडू नका.

सूड's picture

3 Mar 2013 - 7:12 pm | सूड

मस्त !! आता पुभाप्र !!

तो घालवून तुमची शिकवणी लावणार (आणि थोडीफार ज्ञानप्राप्ती झाल्यावर तुम्हाला मोदकांची गुरूदक्षिणा देणार :-) )
धागा सुरू केल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

५० फक्त's picture

3 Mar 2013 - 8:12 pm | ५० फक्त

लई भारी रे..

अवांतर - शंकासमाधान होईपर्यंत प्रश्न विचारले तरी हरकत नाही - हे म्हणजे धाग्याची शंभरी निश्चित.

सस्नेह's picture

3 Mar 2013 - 8:51 pm | सस्नेह

MSOffice चे सर्वात जास्त उपयुक्त अन विस्तृत व्याप्ती असणारे अंग म्हणजे Excel !
पुढच्या भागांची उत्कंठापूर्ण प्रतीक्षा आहे.

सुनील's picture

3 Mar 2013 - 9:13 pm | सुनील

अरे वा! एक्सेलशी संबंध अगदी दररोजचा. बर्‍याच शंकादेखिल आहेत त्या पुढील लेखांतून फिटतील असे वाटते (आणि न फिटल्या तर विचारीनच ;) )

एक्सेल हे तांत्रिकदृष्ट्या मायक्रोसॉफ्टचे असले तरी त्याचा इतिहास पार ८० च्या दशकातील लोकप्रिय लोटस १-२-३ पर्यंत पोचतो. अर्थात प्रस्तुत लेखमालेत त्याचा आढावा घेण्याची गरज नाही!

पुढील लेखांच्या प्रतीक्षेत!

प्रसाद गोडबोले's picture

3 Mar 2013 - 9:32 pm | प्रसाद गोडबोले

अतिषय सुंदर माहीतीपुर्ण लेखन !!

पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत (विषेशतः म्यॅक्रो विषयक )!!

किसन शिंदे's picture

3 Mar 2013 - 11:38 pm | किसन शिंदे

मायक्रोसाॅफ्ट एक्सेल म्हणजे आमच्या प्रचंड आवडीचा विषय! जाॅबला सुरूवात केल्यापासून ते आजतागयत प्रत्येक वेळी काही ना काही नविन शिकतोच आहे. काही दिवसांपुर्वी 'VLOOKUP' शिकल्यानंतर कोण आनंद झाला होता. माझा बाॅस एक्सेलमधला बापमाणूस आहे. त्याचे फाॅर्मयुले शिकतानाच दमछाक होतेय, इतके कठीण असतात.

या लेखमालेतून खूप काही शिकायला मिळेल अशी आशा आहे.

कवितानागेश's picture

4 Mar 2013 - 12:25 am | कवितानागेश

छान लेख.
@ पिन्गू आणि पैसाताई: लिब्रेऑफिस आणि ओपन ऑफिस-कॅल्क दोन्ही 'थकेले' आहेत ! user friendly नाहीत.:P

@ पुष्करिणी: पहिल्या बेन्चवर बसून गॄहपाठ वगरै भानगडी करुन पहिला नम्बर काढणार्‍या मुलीचा निशेध!

पहिला धडा वाचला गुरुजी! ही माहिती होती.
आता दुसरा धडा येईल तेंव्हा वाचण्यात वाचू.

स्पंदना's picture

4 Mar 2013 - 7:54 am | स्पंदना

वाचनखुण साठवली आहे.

मी नुसती एक्सेल शीट ओपन करुन धा चुका करुन एक बरोअबर युज शिकत गेले. आता मी जे काही करते ती नेमकं कस करायच ते शिकाय्ला मिळेल. धन्यवाद मोदकभाऊ!

स्पा's picture

4 Mar 2013 - 9:50 am | स्पा

मस्त रे मोदकेश :)

अस्मी's picture

4 Mar 2013 - 10:29 am | अस्मी

एकदम मस्त लेख!!
मॅक्रो, डेटा वॅलिडेशन, व्हॉट-इफ...पुढील भागांतून खूप काही शिकायला मिळेल!!

तर्री's picture

4 Mar 2013 - 10:32 am | तर्री

मागच्या अनेक चांगल्या उपक्रमासार्खाच उत्तम मालिका ....
पु.भा.प्र.

झकासराव's picture

4 Mar 2013 - 11:16 am | झकासराव

अरे हे कलर कसं करायचं पासुन अनहाइड कसं करायचं एवढच शिकलोय मी.
ते ही विचारुन विचारुन.
डिटेल्स आता शिकवणीत शिकलं जाइल. :)
शिकवणी फारच आवडल्यास (ह्याची खात्रीच आहे), मोदकरावाना आकुर्डीतल्या जयश्री हॉटेल म्धील मिसळ खिलवली जाइल. :)

वेल्लाभट's picture

4 Mar 2013 - 11:26 am | वेल्लाभट

स्तुत्य उपक्रम. एक्सेल हे खरंच कित्ती भारी आहे, ते एक्सेल वर काम केलेलाच खरं जाणू शकतो. मी त्यातला एक असल्याने मी हे सांगू शकतो.

छान सुरुवात आहे, मोदक भाऊ.

ई-पूर्वाई's picture

4 Mar 2013 - 11:43 am | ई-पूर्वाई

प्रगत (Advanced ) आलेखीकारणाची (ग्राफिंग/ चर्टिङ्ग ) पण ओळख करून द्यावी हि विनंती. अगदी अलीकडेच एका इन्व्हेस्ट्मेण्ट बँक ने ४ वेळा मुलाखती घेऊन पाचव्या वेळी एक ग्राफिकॅल प्रेसेण्टेशन करायला सांगितले.तेव्हा साधे ग्राफ्स बघून ऑफर केली नव्हती (आणि "आपण प्रेसेण्टशन मध्ये फारच साधे आलेख वापरलेत आणि बराचसा डेटा प्रगत एक्सेल माहित नसल्यामुळे tabulate केलात" असा feedback दिला होता) त्यामुळे एक्सेल ने इंगा तर दाखवलाच आहे... :-(

ई-पूर्वाई's picture

4 Mar 2013 - 11:44 am | ई-पूर्वाई

*प्रगत आलेखीकरण*

महेश हतोळकर's picture

4 Mar 2013 - 12:01 pm | महेश हतोळकर

चौ.रा. म्हणल्याप्रमाणे excel शिकणं हि आजची अत्यावश्यक बाब झाली आहे. माझी हालत तर

When I started my carrier I aimed to excel in my work. Now I work in excel.

अशी आहे.

धन्यवाद मोदक. अत्यंत स्तुत्य उपक्रम.

विटेकर's picture

4 Mar 2013 - 12:39 pm | विटेकर

शुभेच्छा !
एक्सेल भयानक आवडते .. पण पूर्ण येते असे म्हणनार नाही .. विशेषतः मायक्रो..लैच बोम्ब आहे .. तसेच फोरकाश्ट आणि इतर सांखिकी फले वापरताना गंडायला होते .. त्यावर विषेष शिकवणी घेता यील का?

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2013 - 12:58 pm | पिलीयन रायडर

हजर आहे सर...
आणि शिस्तीत लक्ष पण देत आहे!

मैत्र's picture

4 Mar 2013 - 1:31 pm | मैत्र

एक्सेल आवडते. काही प्रमाणात बरे जमते पण काही लोक इतके सुंदर पद्धतीने रिपोर्ट्स / टेबल्स मांडतात ती कला आहे जी काही फार जमत नाही.
खूप पूर्वी सोप्या मांडणीसाठी एक्सेल शिकलो आणि गोडी वाढत गेली.
काही काळापूर्वी सिस्टिम मधून तिकीटांचा (प्रॉब्लेम) विदा घेऊन त्यातून विविध टेबल तयार करून त्यावर एकावर एक पिव्होट वापरून तयार ग्राफ / चार्ट बनवण्याचे टेम्प्लेट (मराठी?) केले होते. मजा आली.
काही विशेष अनुभवी लोकांनी चक्क पूर्णतः मजकूर असलेली आणि लिंक करून अतिशय उत्तम चालणारी सुंदर टेम्प्लेट्स रिक्वायरमेंट्स साठी बनवलेली पाहिली.
गेल्या वर्षी एका मोठ्या अभ्यासक्रमात एक्सेलचे बिल्ट इन आणि बाहेरचे अ‍ॅड इन प्रोग्रॅम्स वापरून विविध प्रकारचा सेन्सिटिव्हिटि अ‍ॅनॅलिसिस / सॉल्व्हर्स पाहून जबरा वाटलं. पण ते तेवढ्या कोर्सपुरतं राहिलं.
पुढे शिकण्याची इच्छा आहे.
चंदू च्या संस्थळावर पॉवर पिव्होट हा प्रकार पाहिला. हा म्हणजे पिव्होट जे एकपेक्षा जास्त तक्त्यांचा विदा वापरून त्याचा एक छोटा विदागार पिव्होटपुरता बनवून हवा तसा रिपोर्ट देऊ शकते. २०१० / २०१३ पासून ही जबरदस्त सोय आलि आहे.

मोदकराव -- पुढच्या भागांची आतूरतेने वाट पाहतो. अतिशय उत्तम विचार आहे ही लेखमाला काढण्याचा.
एक्सेल स्पेशालिस्ट यावर गुगललं पण नेमकी कुठली पुस्तकं / माहिती सर्वोत्तम ठरेल आणि ही टेस्ट भारतात देण्याचं सोयीचं ठिकाण मिळालं नाही. बंगळुरात एकही सेंटर नाही पाहून अतिशय आश्चर्य वाटलं.
याबद्दल पण अजून माहिती मिळाली तर खूप आवडेल.

मृत्युन्जय's picture

4 Mar 2013 - 1:59 pm | मृत्युन्जय

चांगला उपक्रम आहे मोदका. तुला अनेक शुभेच्छा आणी धन्यवाद. आम्हा अडाण्यांचा एक्सेल चा वापर टेबलांमधुन बेरजा वजाबाक्या करण्यापुढे जात नाही. त्यामुळे हे वाचुन शिकतो आता

स्मिता.'s picture

4 Mar 2013 - 2:16 pm | स्मिता.

अत्यंत माहितीपूर्ण उपक्रमाची छान सुरुवात केलीयेस रे मोदका! माझ्या बाबतीत एक्सेल म्हणजे अतिपरिचयात् अवज्ञा असंच आहे.
व्हिबी मॅक्रोज् शिकण्याची कधीपासून फार इच्छा आहे. पुढच्या भागांची वाट बघतेय.

नि३सोलपुरकर's picture

4 Mar 2013 - 4:54 pm | नि३सोलपुरकर

अत्यंत स्तुत्य उपक्रम.

पुढील लेखांच्या प्रतीक्षेत

मोदकशेट खरच असा चांगला उपक्रम सुरु केल्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन.

अमोल केळकर's picture

4 Mar 2013 - 5:24 pm | अमोल केळकर

Vlookup शिकण्यास इच्छूक

अमोल केळकर
मला इथे भेटा

अतिशय उपयुक्त आणि माहीतीपुर्ण लेख.
धन्यवाद :)

चांगली व उपयोगी लेखमालीका चालू केली आहे, धन्यवाद मोदक!

सुमीत भातखंडे's picture

7 Mar 2013 - 11:40 am | सुमीत भातखंडे

उत्तम सुरुवात. वाचतोय

दहा वर्ष एक्सेल वापरते आहे - पण गरज पडेल तसं शिकत गेल्यामुळे अनेक गोष्टीं अर्धवट माहिती आहेत. तुमच्या लेखमालेतून नीट शिकणं होईल आता.

आयुष्य's picture

11 Apr 2015 - 11:20 pm | आयुष्य

याचा भाग एक वाचला याचे पुढील भाग प्रकाशित करण्यात आले आहेत का?
प्रकाशित झाले असल्यास
त्या भागाचे दुवे मिळाले तर एक्सेल शिकण्यास फार मदत मिळाली असती. धन्यवाद... आपला मित्र आयुष्य

संदीप डांगे's picture

12 Apr 2015 - 2:45 pm | संदीप डांगे

शिरीरंगभाऊ मंजे मिपाचे गुगल हायेत असं मी या ठीकानी झाईर करतो...

अत्रुप्त आत्मा's picture

12 Apr 2015 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा

अणुमोदण अणुमोदण अणुमोदण

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2015 - 8:41 pm | श्रीरंग_जोशी

मी एक सामान्य मिपाकरच हाये.

बाकी मी जालावर शोधण्यासाठी बिंगत असतो.

त्यांचं 'बिंग' असं फोडू नका...

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2015 - 10:58 pm | श्रीरंग_जोशी

MiPa on Bing

आयुष्य's picture

12 Apr 2015 - 11:59 pm | आयुष्य

श्रीरंग साहेब आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद...
हे दुवे मी जतन करून ठेवतो. आपण केलेल्या
सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो...।