अध:पतन

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
22 Feb 2013 - 5:22 pm

चंद्रकांत, माझ्याशी लग्न करशील ?
नाही मधू.. आपला फक्त हनीमून होऊ शकतो.

असले जोक्स एकमेकांना सांगणे ही हाईट असलेल्या काळातल्या झंपूतात्यांच्या हातात ती आमंत्रणपत्रिका पडताच ते तीनताड उडाले. हल्ली उडण्यात नवलाई अशी राहीलीच नव्हती. परवा रणछोडदास वाण्याच्या अमेरिकेतल्या मुलीने लग्न न करताच तसंच कुणाबरोबर रहायला सुरूवात केल्याची बातमी कानी पडली तेव्हां पण ते असेच उडालेले. रणछोडदास मात्र अरे बाबा त्येला लीव्ह इन रिलेशनशिप म्हणतेत, इटस लीगल असं कसंनुसं हसत सांगत होता. याच सज्जन गृहस्थानं याच पोरीचा देशी मित्र खालच्या जातीचा होता म्हणून त्याला गायब केल्याचं बोललं जात होतं.

प्रतापसिंह भोसलेंच्या मुलाने एका मित्राशीच लग्न केलं तेव्हांही झंपूतात्या असेच उडाले होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ते तसे राहतात असे प्रतापसिंह म्हणाले तेव्हां तात्या बुचकळ्यात पडले होते. मर्दानगी सिद्ध करण्यासाठी चार चार लग्न केलेला आणि तरीही अंगवस्त्र बाळगणा-या या तेजं:पुंज नरपुंगवाच्या कुलदीपकाने हे काय केले असे सहानुभूतीदर्शक विचार मनात येत असतानाच तात्यांनी तिथून काढता पाय घेतला.

इतके धक्के बसल्यानंतरही या आमंत्रणपत्रिकेने तात्या उडालेच होते. पत्रिकेतला मजकूरच तसा होता

मधूचंद्राच्या सोहळ्याचे आमंत्रण !!

अरे काय म्हणावं याला ! आता हे ही याची देही, याचि डोळा पहायला लागतंय कि काय !
रामा शिवा गोविंदा !

हे धरणीमाते, तू पुन्हा पोट फाडून मला उदरात का घेत नाहीस ?
नाही नाही. आता शांत बसून चालणारच नव्हतं. कुणाच्याही म्हणण्याची पत्रास न ठेवता हा सोहळा हाणून पाडायलाच हवा.
पण सोहळा असतो तरी काय याबद्दल तात्यांना अजिबातच कल्पना नव्हती. त्यामुळं तो हाणून कसा पाडावा हे समजत नव्हतं. आधी हा सोहळा काय आहे हे पहावं, कितपत अधं:पतन झालेय समाजाचे हे पहावे आणि मगच पुढील रणनीती आखावी असं तात्यांनी ठरवलं.

कालपरवाच्या बबड्या आणि बबडीचं लग्न झालं होतं. लग्नाचं आमंत्रण काकूंना होतं. तात्यांना घरीच कसलं तरी महत्वाचं काम असल्याने आमंत्रण असतं तरी ते गेलेच नसते. अलिकडे अशा ब-याच सोहळ्यांना ते जात नसत. घरचे सगळे गेले तरी एकटेच घरी थांबत असत. पण हे आमंत्रण मात्रं त्यांना एकट्यालाच होतं.

ठरल्या दिवशी, नव्हे रात्री तात्या मंडपात नव्हे रंगमहालात पोहोचले. अजूनही पूजाअर्चा होऊन नवपरिणित दांपत्य आपल्या खोलीकडे कूच करत असेल असा विधी असावा असे मनोमन त्यांना वाटत होते. पण इथे ना भटजी, ना पूजेचे साहीत्य. ना इतर व-हाडी ना कुछ. बरं वर रंगमहालापर्यंत कुणी अडवलेही नाही किंवा टोकलेही नाही. समोर सजवलेला मंचक पाहून तात्यांचं अंग शहारलं.. आणि त्यातच लाल वस्त्रांतल्या नववधूचं हातात दूधाचं ग्लास घेऊन आगमन झालं. थोड्याच वेळात शेरवानी घातलेल्या वराचंही विवक्षित स्थळी आगमन झालं. ते दोन तरूण जीव एकमेकांच्या जवळ येऊन बसले आणि..

तात्यांचं अंग थरथरू लागलं. त्यांना हे सर्व सहन होईना. आता ते बसल्याजागी जोरजोरात हलू लागले, झुलू लागले. आडवे होऊन लोळू लागले. त्यांच्या कानी फक्त इतकेच शब्द पडत होते

" अहो उठा, काय झालं तुम्हाला ?"

बायकोचा आवाज ऐकून दचकून झंपूतात्या उठून बसले. काकू आत गेल्या. तात्यांची आण्हिकं उरकून संगणकासमोर ते बसणार तितक्यात काकू कडाडल्या " मुलं मोठी झाली, आता बास कि ते ! झोपताना किमान त्या घाणेरड्या साईटस बंद तरी करायच्या ना म्हणते मी.. उगाच झोपेत चावळत सुटायचं !"

तात्यांमधला संस्कृतीरक्षक तोंडाचा आ वासून फक्त ऐकत होता.

मांडणीप्रकटनलेख

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Feb 2013 - 5:40 pm | पैसा

:D

तर्री's picture

22 Feb 2013 - 5:46 pm | तर्री

मस्त - सत्यास धरून आहे से वाटले . स्वानुभव की काय ह एक खवचट किडा वळवळला.

खटासि खट's picture

22 Feb 2013 - 8:28 pm | खटासि खट

:D :हाहा:
वाचकास आलेली अनुभूती ही प्रशंसा समजतो ;)

किसन शिंदे's picture

22 Feb 2013 - 6:02 pm | किसन शिंदे

हि हि हि..

अर्थातच मनी वसे ते स्वप्नी दिसे.

संजय क्षीरसागर's picture

22 Feb 2013 - 11:17 pm | संजय क्षीरसागर

स्वप्नाचा रेफरन्स आहे त्यामुळे अंधःपतन म्हणायचय की काय लेखकाला असं वाटून गेलं

तुमचा अभिषेक's picture

22 Feb 2013 - 9:03 pm | तुमचा अभिषेक

हा हा हा.. भन्नाट होते.. वाढवले का नाही... मजा आली असती..

अरे काय म्हणावं याला ! आता हे ही याची देही, याचि डोळा पहायला लागतंय कि काय !

त्यांच्या कानी फक्त इतकेच शब्द पडत होते

" अहो उठा, काय झालं तुम्हाला ?"

दोन्ही ठिकाणी एकदम खिक झाल दुसऱ्यावेळी जर ज्यास्तच...

हल्ली दोघांना इतका पूर्वानुभव असतो की चंद्रासमोर... मधूलाच लाजायला होतं.

अभ्या..'s picture

22 Feb 2013 - 11:31 pm | अभ्या..

:)

अग्निकोल्हा's picture

23 Feb 2013 - 12:29 am | अग्निकोल्हा

:D:D:D

अरे काय म्हणावं याला ! आता हे ही याची देही, याचि डोळा पहायला लागतंय कि काय !
रामा शिवा गोविंदा !

फार हसले या वाक्यावर!!!
आणि हेच झंपूकाका साईटी बघायचे आँ लब्बाड!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Feb 2013 - 5:21 am | निनाद मुक्काम प...

जबरा मस्त ,खुसखुसीत

छोटंसं पण छानसं, पटकन हसवुन सुद्धा बराच वेळ मनार रेंगाळणारं असं, धन्यवाद.

प्यारे१'s picture

23 Feb 2013 - 4:00 pm | प्यारे१

खुसखुशीत

अधिराज's picture

23 Feb 2013 - 4:31 pm | अधिराज

एक नंबर!! विचार प्रवर्तक लिखाण. कदाचित तात्या "सत्याचे प्रयोग" करत असावेत.

स्पंदना's picture

26 Feb 2013 - 5:29 am | स्पंदना

खुटखुटीत लिखाण!
मजा आली.

सस्नेह's picture

26 Feb 2013 - 2:12 pm | सस्नेह

लेख रंजक आहे. पण शीर्षकाचा संबंध कळला नाही..

अगं समाजाचं सो कॉल्ड 'अधःपतन' =))

खटासि खट's picture

27 Feb 2013 - 2:30 pm | खटासि खट

बरोबर. धन्यवाद शुचि

सस्नेह's picture

27 Feb 2013 - 2:53 pm | सस्नेह

मला वाटलं तात्या लोळत कॉटवरून खाली पडले हे अधःपतन..

ऋषिकेश's picture

26 Feb 2013 - 4:20 pm | ऋषिकेश

खिक्

चोराच्या मनात चांदणे. मस्त.