मला आवडलेले पुस्तक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
27 Aug 2008 - 6:01 pm

मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत.
पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत.
त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत. कोठेही असली तरी प्रसंगी अखंडीत वाचीत जावे हे ब्रीद आपण सारेच पाळत असतो.
चला मग आपण आपल्याला आवडलेली पुस्तके शेअर करुयात. जमले तर मुम्बै/पुण्यात एखादा पुस्तक कट्टा / शेअर लायब्ररी सुरु करुया.
निदान सुरुवात तरी करुया

चाकोरी बाहेरची पुस्तके या नन्तर एक नवा धागा मला आवडलेले पुस्तक / ते का आवडले तेही साम्गायचे आहे.
एका प्रतिसादात केवळ एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा म्हणजे त्या पुस्तकात काय आवडले हे सांगता येईल

तोत्तोचानः अनु चेतना गोसावी
एका लहान मुलीची कथा
लहान मुलाना एक व्यक्ती म्हणुन वागणुक द्यायला हवी .
मुलाना घालुन पाडुन बोलण्यापेक्षा " तू खरोखर एक चांगली मुलगी आहेस" हे वाक्य त्या मुलीच्या मनात एक आत्मविष्वास जागवते.
शाळेने नाकारलेले हायपर ऍक्टीव्ह मुलगी आणि तिच्या नव्या शाळेतली तिच्या सारखीच मुले
त्यांच्या शाळेतले वातावरण. युद्धावेळचे वातावरण त्याचा लहान मुलांवर होणारा परिणाम या सर्वांचे
वर्णन.
केवळ मनोरंजन न होता मुलांच्या जगात डोकावयाचे संधी देणारे पुस्तक.
"तारे जमीन पर" पहाताना मला या पुस्तकाची आठवण होत होती .
संग्रही असावेच असे पुस्तक.

वावरआस्वाद

प्रतिक्रिया

मृगनयनी's picture

27 Aug 2008 - 6:09 pm | मृगनयनी

नक्कीच... आपण... हा उपक्रम सुरु करुया.....
इथे बर्‍याच जणांना ... त्याची जाण आहे..
:)

विजुभाऊ's picture

28 Aug 2008 - 12:00 pm | विजुभाऊ

विस्तारीत धागा या इथे http://www.misalpav.com/node/3256
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विशाल कुलकर्णी's picture

9 Jul 2009 - 12:24 pm | विशाल कुलकर्णी

हेन्री शॅरियर यांचं "पॅपिलॉन" खुप आवडलं होतं. ही त्यांची सत्य जीवनकथा आहे. मनुष्यवधाच्या आरोपाखाली लेखकाला फ्रेंच गिनियाच्या भर समुद्रातील एकाकी बेटावर असलेल्या, मृत्युचं साम्राज्य म्हणुन ओळखल्या जाणार्‍या तुरुंगात पाठवलं जातं. तिथुन त्यांच्या साहसी पलायनाची ही कथा. सात वेळा अपयश येवुन शेवटी लेखक तिथुन पळ काढण्यात यशस्वी झाले. त्यानंतरचे त्यांचे पुनर्वसनाचे प्रयत्नही तेवढेच रोमांचक आणि रंजक आहेत.
या पुस्तकाचा पुढचा भाग ही आला होता "बँको" या नावाने. पण तो तेवढासा रुचला नाही.

तसेच "गंथर बान्हमान" या जर्मन नाझी आर्मीतल्या वॉर कुरिअरचे "डेझर्टर" ही खुप सुरेख आहे. हिटलर आणि रोमेलच्या कृर आणि कठोर युद्धनीतीमुळे सर्वसामान्य सैनिकांची होणारी ससेहोलपट यात खुप प्रखरपणे आली आहे. ऐन युद्धतळाहुन 'गंथर' यांनी आपल्या एका सहकार्‍यासह मोटारसायकल वरुन पळ काढला. पण त्या सहकार्‍याछा मध्येच मृत्यु झाल्याने त्यांना पुढचा काही हजार मैलाचा प्रवास एकट्यानेच करावा लागला. हे पुस्तकही अतिषय रोमांचकारी आहे.

मराठीतील म्हणाल तर राजा शिवछत्रपती हे शिवशाहीरांचे पुस्तक, रविंद्र भटांचे आळंदीच्या दैवी भावंडांच्या जिवनावरील "इंद्रायणीकाठी" आणि विद्या सप्रे यांचं भक्त मीरेच्या जिवनावरील "कृष्णमयि", स्वा. सावरकरांचं "माझी जन्मठेप" आणि गोपाळ गोडसेंचं " गांधीहत्या आणि मी", तसेच आचार्य रजनिशांचं "स्वर्ण पाखि था जो कभी" हे भारतभुमीविषयक पुस्तक ही मनापासुन आवडलेली.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

वाचलेली सगळी पुस्तकांची यादी करणे शक्यच नाही , पण तरीही..

कादंबरी :
१. रथचक्र : श्री. ना. पेंडसे
२. क्यालिडोस्कोप : अच्युत बर्वे
३.रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर
४. ब्र : कवित महाजन.
५.बलुत : दया पवार
६.स्वामी : अर्थात रणजीत देशमुख
७. ईजाळं : ऊत्तम बंडू तुपे
८.राहीच्या स्वप्नांचा ऊलगडा : भारत सासणे
९.धर्मांनंद : जयवंत दळवी.
१०. बनगरवाडी : धाकटे माडगुळकर

कादंबरी : अनुवादित
१.वंशव्रुक्ष : एस. एल्.भैरप्पा ( कादंबरीचा राजा) अनु: ऊमा कुलकर्णी.
२.पाडस : अनु : राम पटवरधन
३. नेमसेक : जुंपा लाहीरी
४. अरण्यक : बिभुती भूशण बंदोपध्याय
५. संस्कार : यु. आर. अनंतमूर्ती

आठवणी /(आत्म)चरीत्राऐवजी / तत्सम
१.तो प्रवास सुंदर होता : के.र्.शिरवाडकर
२."रामुभैया च्या आठवणी" (नाव आठवत नाही :क्षमा) : रवी दाते.
३.के.ई.एम. वार्ड नं १६ : डॉ.रवी बापट.
४.पोरवय : गुरूदेव टागोर : अनु : पु.ल.
५.आहे मनोहर तरी : सुनिताबाई देशपांडे.
६.माझ्या जीवनाची सरगम : सी.रामचन्द्र.
७.ईडली ऑर्किड आणि मी : विट्टळ कामत.
८. मैत्र : पु. ल.
९. बायंडर चे दिवस : कमलाकर सारंग
१०. कार्यरत : डॉ. अनिल अवचट

प्रवास-वर्णन
पु.लं ची चार : अपूर्वाई / पूर्वरंग / बंगचित्रे / जावे त्यान्च्या देशा /
{ म्हैस !(?)}

कथासंग्रह
१. काजळ माया : जी.ए.
२. सांज शकुन :जी.ए
३.पिंगळा वेळ : जी.ए.
४.रक्त चन्दन :जी .ए.
५. हंस अकेला : मेघना पेठे

नाटक
१. आत्मकथा : महेश एलकुंचवार
२.पुरूष : जयवंत दळवी
३. सूर्याची पिल्ले : वसंत कानेटकर
४.किरवंत : प्रेमानंद गज्वी.
५.ती फुलराणी : पु.ल.
६. लग्न : जयवंत दळवी
७. घाशिराम कोतवाल : विजय तेंडुलकर
८. तुज आहे तुज पाशी : पु.ल.
९.रायगडाला जेव्हा जाग येते : वसंत कानेटकर
१०. नटस्म्राट : शिरवाडकर

खाता -खाता "वाचण्याबद्दल" बोलणे आणि "खाण्याबद्दल" वाचणे आवड्त असेल , तर अवश्य भेटु या म्हटलं !!!

विसोबा खेचर's picture

27 Aug 2008 - 6:13 pm | विसोबा खेचर

मला आवडलेले पुस्तक -

व्यक्ति आणि वल्ली!

लेखक - पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.

आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.

विसोबा खेचर's picture

27 Aug 2008 - 6:39 pm | विसोबा खेचर

ह्यातली व्यक्तिचित्र इतकी जिवंत वाटतात, तुम्हाआम्हाला नेहमी कुठेना कुठे भेटणारी वाटतात हेच हे पुस्तक आवडण्याचं प्रमुख कारण आहे. इतक्या जिवंत आणि जिवाभावाच्या वाटणार्‍या व्यक्तिरेखा अन्य कुठल्याच पुस्तकात मला दिसल्या नाहीत!

आपला,
(गजा खोत प्रेमी) तात्या.

शितल's picture

27 Aug 2008 - 6:16 pm | शितल

हो तोत्तोचान मी वाचले आहे, मला ते आवडले होते अजुन चिपर बाय डसन हे ही मस्त आहे.
मला आवडलेली पुस्तके
नॊट विदाऊट माय डॊटर
दि ग्रेट एस्केप
चारचैघी (नाव लक्षात येत नाही पण हेच असावे )(शांता शेळके यांनी अनुवादित केले आहे.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2008 - 7:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"नॉट विदाऊट माय डॉटर" हे बेट्टी महमूदीचं पुस्तक, अंगावर काटा आणतं. ही गोरी, अमेरीकन बाई एका ईराण्याशी लग्न करते. चार वर्ष छान जातात, पण पुढे तो कट्टर ईस्लामिक बनतो. हे दोघे आणि यांची छोटी मुलगी ईराण मधे जातात आणि तिथे या मायलेकींना कोंडलं जातं. बेट्टी तिथून कशी निसटते, विथ हर डॉटर याचं खूप छान वर्णन... जरूर वाचावं असं...

ऋषिकेश's picture

27 Aug 2008 - 10:34 pm | ऋषिकेश

अप्रतिम पुस्तक.
तिथकीच भेदक कथा.. इस्लामचे कायदे, बायको आणि मुलीला प्रॉपर्टी या प्रकारात मोडणं, तिथला लोकांच्या सवयी/तपशील (जसे एकाच परातीत जेवणे, स्त्रीयांचे बुरखे आतून शेंबडाने बरबटलेले असणे वगैरे) नेमके टिपले आहेत... एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारे पुस्तक वाचायचे असेल तर हे त्या यादी अग्रक्रमाने येईल.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मदनबाण's picture

28 Aug 2008 - 7:43 am | मदनबाण

बेट्टी महमूदीचं पुस्तक अंगावर काटा आणणारचं आहे..तिची धडपड वाचताना फारच अस्वस्थ वाटलं..खरचं जबरदस्त अनुभव आहे.

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

विजुभाऊ's picture

20 Oct 2013 - 5:19 pm | विजुभाऊ

नॉट विदाउट माय डॉटर. हे पुस्तक फारच एकांगी वाटले. त्या अमेरीकन स्त्रीने जे भोगले ते खरे असेल पण त्यात तीने नवर्‍याची बाजू कुठेच मांडलेली नाही

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2008 - 10:09 pm | प्रभाकर पेठकर

'नॊट विदाऊट माय डॊटर'

हा चित्रपट पाहिला आहे. जबरदस्त आहे.

शितल's picture

27 Aug 2008 - 11:00 pm | शितल

दि ग्रेट एस्केप हे पुस्तक ३ कैद्यांनी केलेल्या सुटके वर आहे.
त्यांचे तुरूंगातुन पलायन त्याचे त्यांनी केलेले प्लॆनिंग, मग एक दोन वेळ फसलेला प्रयत्न, आणि शेवटी तुरूंगातुन पळुन जाण्यात यशस्वी झाल्यावर पायी केलेला प्रवास ह्याचे वर्णन अप्रतिम आहे.
आणि
चौघीजणी ह्या पुस्तकात गरीब घरातल्या ४ बहिणींची मस्त कथा आहे.
त्याचे असणारे एकमेकींवरचे प्रेम आणि त्यांनी गरीब परिस्थित कसे दिवस काढले अजुन बरेच खुप सुंदर आहे पुस्तक आहे.

इनोबा म्हणे's picture

27 Aug 2008 - 6:30 pm | इनोबा म्हणे

आवडते पुस्तक

झपाटलेल्या गोष्टी
लेखकः रत्नाकर मतकरी
याच्याबद्दल काय सांगू?एकदा वाचूनच पहा.

(पिंपळावरचा) इन्या वेताळ
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आगाऊ कार्टा's picture

27 Aug 2008 - 6:43 pm | आगाऊ कार्टा

रत्नाकर मतकरी यांची जवळजवळ सगळे गूढकथा संग्रह मी वाचले आहेत.
पण मला आवडलेले पुस्तक "ऐक.. टोले पडताहेत".
यातील सर्व कथा छोट्या पण अतिशय परिणामकारक आहेत.
संपूर्ण कथेला शेवटच्या परिच्छेदात कलाटणी देण्याचे मतकरींचे तंत्र मला खूप आवडते.

विजुभाऊ's picture

8 Jul 2009 - 11:52 am | विजुभाऊ

मतकरींची जेवणावळ" कथा लहानपणी चोरून वाचली होती. तो थरार कित्येक महिने गेला नव्हता.
बरेच वर्षानी ती कथा पुन्हा अचानक हाती पडली. आणि नक्की त्यातल्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला तो थरार जाणवला होता हे कळाले नाही.
हातातून काहीतरी निसटून गेल्या सारखे वाटले :(

विजुभाऊ's picture

27 Aug 2008 - 6:34 pm | विजुभाऊ

पुस्तक का आवडले / इतरानी ते का वाचावे तेही लिहा.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आगाऊ कार्टा's picture

27 Aug 2008 - 6:35 pm | आगाऊ कार्टा

मला आवडलेले पुस्तक -
संभाजी -- लेखक - विश्वास पाटील
ही एक अतिशय छान ऐतिहासिक कादंबरी आहे.
विश्वास पाटील यांची शैली इतकी छान आहे की ते प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहतात.
ही कादंबरी वाचताना संभाजी महाराजांचे उमदे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.
पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणातील संभाजी महाराजांचे औरंगजेबाने केलेले हाल पाहून तर अंगावर काटा उभा राहतो.
संभाजी महाराजांविषयीचे पसरलेले अथवा जाणूनबुजून पसरवलेले गैरसमज लेखकाने अतिशय परखडपणे दूर केले आहेत.

आचार्य बाबा बर्वे's picture

27 Aug 2008 - 6:55 pm | आचार्य बाबा बर्वे

बटाट्याची चाळ
लेखक:आपले भाईकाका- पु. लं देशपांडे

कोलबेर's picture

27 Aug 2008 - 7:36 pm | कोलबेर

कोसला
लेखक : भालचंद्र नेमाडे
मला (माझ्या आवडीला) आवडले. इतरांनी ते वाचावे(च) असा माझा आग्रह नसतो.

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 8:00 pm | आजानुकर्ण

याशिवाय जरीला, झूल, हूल, बिढार ही सर्व आवडली होती.

(मला (माझ्या आवडीला) आवडले. इतरांनी ते वाचावे(च) असा माझा आग्रह नसतो असे म्हणणारा) आजानुकर्ण

भडकमकर मास्तर's picture

27 Aug 2008 - 11:18 pm | भडकमकर मास्तर

( वैयक्तिक मत )
जरीला कोसलापेक्षा जास्त छान वाटले....
येकदम झकास...
उरलेली नेमाडे यांची पुस्तके वाचली नाहीयेत..

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 11:34 pm | आजानुकर्ण

मास्तर,

सहमत आहे. मला स्वतःलाही कोसलापेक्षा तुलनेने इतर पुस्तके जास्त आवडली. मात्र कोसला कमी दर्जाचे आहे असे नाही.

आपला,
(प्राचार्य) आजानुकर्ण नेमाडे

विसोबा खेचर's picture

27 Aug 2008 - 11:34 pm | विसोबा खेचर

कोसलाचं कौतुक खुद्द भाईकाकांनीही केलं होतं! नेमाड्यांनी भाईकाकांचा जन्मभर दुस्वास केला परंतु भाईकाका इतक्या मोठ्या मनाचे की त्यांनी नेमाड्यांच्या दुस्चासाकडे दुर्लक्ष करून कोसलाचं कौतुकच केलं!

जयवंत दळवींनी जेव्हा याबाबत विस्तृत लिहिलं होतं तेव्हा मला भाईकाकाद्वेष्ट्या नेमाड्यांची कीव आली! बिच्चारे नेमाडे!

असो,

तात्या.

बेसनलाडू's picture

28 Aug 2008 - 12:02 am | बेसनलाडू

कोसला एकंदर चांगले आहे पण प्रसंगी शब्दबंबाळ, नशाबाज वाटू लागते. विशेषतः अजंठाच्या लेण्यांतील बुद्ध दर्शनाच्या वेळी. त्यातील काही वाक्ये खासच आहेत, जसे 'माझ्या कवडीइतक्या दु:खानं त्याचं वाळवंटाइतकं दु:ख मोजवत नाही' वगैरे. पण त्याच वेळी '...तिथे रक्ताचे तेंब टपटपू लागतात. माझी बधीर जीभ ते चाटू लागते ...' वगैरे नक्कीच शब्दबंबाळ वाटले.
(रक्तबंबाळ)बेसनलाडू
दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'बुद्धदर्शन' नावाच्या धड्यात हे सगळे होते आणि उपरोल्लेखित वाक्ये नेहमी प्रश्नपत्रिकेत संदर्भासह स्पष्ट करायला यायची ;)
(स्मरणशील)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

28 Aug 2008 - 12:21 am | आजानुकर्ण

बेलाशेठ,

बुद्धदर्शनाचा प्रसंग हा कोसलातील अत्युच्च प्रसंग आहे. अजिंठाला जाण्यापुर्वी पांडुरंगच्या बहिणीचा ज्या परिस्थितीत मृत्यू झाला ती लक्षात घ्या. 'तिच्यासोबत तिचं छोटंसं गर्भाशयही गेलं आणि खानेसुमारीची प्रचंड मोठी रांग नाहीशी झाली' अशा अर्थाचे वाक्य वाचून आम्ही हादरलो होतो. हे सगळं दडपण मनावर असताना सांगवीकरला अजिंठ्यामध्ये सुचलेले विचार हे एक मोठे तत्त्वज्ञान आहे. मला तरी ते शब्दबंबाळ न वाटता अल्पाक्षरी वाटले. बरेच काही सांगायची इच्छा असूनही शब्द जवळ नाहीत म्हणून सांगवीकरने तो प्रसंग आवरता घेतला असे वाटले.

आपला,
(सुरेश) आजानुकर्ण

बेसनलाडू's picture

28 Aug 2008 - 12:22 am | बेसनलाडू

कर्णा,
शब्दबंबाळपणाचा आक्षेप/मत फक्त ठराविक वाक्यांपुरताच मर्यादित आहे. एकंदर पुस्तक, व्यक्ती, प्रसंग इ. चांगले आहे तसेच काही अल्पाक्षरी वाक्येही फारच सूचक आणि चांगली आहेत, हे कबूल केलेच आहे.
(सहमत)बेसनलाडू

भाग्यश्री's picture

27 Aug 2008 - 10:43 pm | भाग्यश्री

तोत्तोचान, चिपर बाय डझन,
शाळा, झेन गार्डन -> मिलिंद बोकील,
नॉट विदाऊट माय डॉटर, चौघीजणी(ओरिजिनल नॉव्हेल - Little Women by Louisa May Alcott) अनुवाद शांता शेळके.
माझे लंडन, चिनिमाती, दक्षिणरंग, मेक्सिकोपर्व्,इजिप्तायन्,ग्रीकांजली,तुर्कनामा - प्रवासवर्णनं -> मीना प्रभु..
पुलंची सर्व, एकेकाळी वपुंची सर्व..गौरी देशपांडे, सानिया यांची सर्व.. आहे मनोहर तरी, सोयरे सकळ -> सुनीता देशपांडे
fountainhead, all dan brown collection, all of jeffery archer, हॅरी पॉटर सिरीज..
मोस्ट फेव : The goal by Dr. Eliyahu Goldratt

एंडलेस लिस्ट.. !

लिहीता लिहीता एका पुस्तकाची अट लक्षातच राहीली नाही! :|

मेघना भुस्कुटे's picture

27 Aug 2008 - 10:25 pm | मेघना भुस्कुटे

मस्त धागा आहे विजुभौ. आपल्याला एखादी गोष्ट करावी असं वाटत असताना दुसर्‍या कुणी ती करावी आणि आपल्याला कसल्याही कष्टांविना आयती मिळावी, याहून जास्त सुखाचं काही असतं का?!

माझं सध्याचं आवडतं पुस्तक -

(कित्तीतरी लोकांना हे नाव सुचवून सुचवून दमले. कुण्णी म्हणता कुण्णी वाचलं नाही. मग शेवटी मीच खरडतेय त्याच्याबद्दल. :()

नाटक - एक पडदा आणि तीन घंटा
नाटकातील काल आणि अवकाश यांचा अभ्यास
राजीव नाईक
अक्षर प्रकाशन

काही काही नाटकं एका रात्रीत घडतात. काही जवळपास पन्नास-साठ वर्षांचा कालावधी साकारतात. काही किती काळात घडतात याला काही महत्त्वच नसतं. काही नेमक्या कोणत्या काळात घडतात, यावर नाटकाचं नाटकपण ठरतं. काही एकाच वेळी दोन काळांत. काही काळाच्या गोठलेल्या पोकळीत. त्यासाठी वापरलेल्या नाट्यांतर्गत क्लृप्त्या तर कितीक. हे काळाचं झालं.
काही नाटकं राजमहालात घडतात. काही बेडरुममधे. बरीचशी दिवाणखान्यात! शिवाय त्यांचे प्रयोग निरनिराळ्या मंचांवर होतात. कमानी सेट, ग्रीक नाट्यघर, निकट मंच, कधी थेट रस्त्यावर होणारं पथनाट्य. पीटर ब्रुक यांच्या महाभारतासारखी काही तळ्याकाठचा उसना अवकाश नाटकासाठी वापरणारी. हा अवकाश.
या स्थळ-काळाचे लागेबांधे काय असतात नाटकातल्या आशयाशी? त्यामुळे प्रेक्षकांना नक्की काय बदल जाणवतो? कसं ठरतं हे सगळं?
निरनिराळ्या नाटकांची उदाहरणं देत अगदी साध्यासोप्या भाषेत केलेली ही चिकित्सा एखाद्या कादंबरीइतकी मनोरंजक आहे. त्यामुळे घाट आणि निरनिराळी साधनं यांच्याही फार चटकन परिचय होतो आणि ते सिनेमे पाहताना वा इतर पुस्तकं वाचतानाही फार फार उपयोगी पडतं.

भडकमकर मास्तर's picture

27 Aug 2008 - 11:31 pm | भडकमकर मास्तर

कित्तीतरी लोकांना हे नाव सुचवून सुचवून दमले. कुण्णी म्हणता कुण्णी वाचलं नाही. मग शेवटी मीच खरडतेय त्याच्याबद्दल
त्या बर्‍याच मंडळींपैकी मी एक आहे...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नीधप's picture

8 Jul 2009 - 7:23 pm | नीधप

ते वाचलंय. एकेकाळी केलेल्या अभ्यासाचं टेक्स्ट आहे ते.
राजीव सरांचंच 'खेळ नाटकाचा' हे ही जरूर वाचा.
यातल्या बर्‍याच गोष्टी आम्हाला(ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथील त्यांनी शिकवलेली पहिली बॅच) 'प्रयोगाचे सौंदर्यशास्त्र' आणि 'जागतिक रंगभूमी' हे शिकवताना त्यांनी मांडलेली निरीक्षणे आहेत.
वाचल्यावर परत एकदा सरांच्या लेक्चरला बसल्यासारखं वाटलं. मरायचो आम्ही त्यांच्या लेक्चरसाठी. वाट बघत असायचो. क्लिष्ट विषय सहजपणे समजावून देणे अगदी डोक्यात पक्का बसेल असा समजावून देणे हे त्यांनीच करावं.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2008 - 10:37 pm | प्रभाकर पेठकर

मला आवडलेलं सर्वात पहिलं पुस्तक, 'मी पाहिलेला रशिया' लेखकः जादूगार रघुवीर.
फार लहानपणी वाचलं आहे.
आवडण्याचे कारण त्या वयात (इयत्ता ७वी किंवा ८वी) जादूगार रघुवीर हे माझे दैवत होते. दूसरे कारण घरबसल्या परदेशदर्शन.
आईने लावलेली वाचनाची आवड जोपासताना पुढील आयुष्यात अनेक पुस्तके आवडली, पण विजूभाऊंनी एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचे बंधन घातले आहे.

शितल's picture

27 Aug 2008 - 11:09 pm | शितल

शोभा डे यांचे स्पाऊज हे पुस्तक देखिल सुरेख आहे.
नवरा बायकोंचा नात्याची विण छान मांडली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2008 - 11:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आई..........आई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती आपली आई.  आईबद्दल आपण कितीही बोललो, लिहिले तरी ते व्यक्त होत नाही, अर्थात आईचं प्रेम अनुभव, सर्वच मिळण्यासाठीही नशीब असावं लागतं.  मॅक्झिम गार्कीच्या आईपासून साने गुरुजींच्या शामच्या आईपर्यंत ....यशवंताच्या आईपासून नारायन सुर्व्यांना बाळगणार्‍या आईपर्यंत. कितीही वाचायला मिळालं तरी ते अपुर्णच वाटत असते.
Book_Image
'आई समजून घेतांना' हे उत्तम कांबळेचे (दै. सकाळचे संपादक ) पुस्तक वाचतांना आणखि एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी तानत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वतःसाठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वतः अतिशय कष्ट घेऊन मुलांचा वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई.  ' तुझ्या लहाणपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाचा चॉकलेटचा एकच घास करतो तुला मागचं दिवस कसं आठवत नाही'' लेखकाला वारंवार भुतकाळात नेणारी लेखकाची आई. भाकरीच्या तुकड्यासाथी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते. लेखक आणि त्यांच्या आईचा संवाद सतत तुसड्यासारखा दिसतो. उदा. लेखकाने विचारले जेवलीस का ? ती  म्हणायची, ढकलंलं दोन तुकडं पोटात...कशी आहेस ? असे विचारल्यावर म्हणायची 'कसंचं काय, मरण जवळ आलंय.....'' डॉक्टरांकडे जाऊया का ? ' डॉक्टर का कुणाचं मरण कायमचं रोखतो ? असे संवाद पुस्तकात जागोजागी दिसतात. अर्थात ती असे का बोलते त्याचा शोध लेखक घेतांना त्यांना जाणवते की, आईने अपार घेतलेले कष्ट तिच्यासमोर आजच्या सुखात भुतकाळातील  भाकरी मिळवण्याची युद्धगाणी आठवायची आणि लेखक 'आई' ने घेतलेल्या कष्टाच्या आठवणी रमुन जातो. पैसे नसल्यामुळ डोक्याचे केसांचा पु़ंजका विकुन मिळालेल्या पैशातून बुड्ढी के बाल (मिठाई ) मुलांना देणारी आई.  फ्लॅट मधे राहत असल्यामुळे लेखकाच्या आईला बोलण्यासाठी जेव्हा कोणी मिळत नाही तेव्हा रस्त्यावर कोणत्याही बाईमाणसाशी गप्पा मारणारी लेखकाची आई.  असे करतांना ऑकवर्ड वाटणारा लेखक. टी. बी. झाल्याचे कळलेले पाहुन स्वतःहुन नातवंडापासून दूर राहणारी लेखकाची आई. या आणि अशा कितीतरी प्रसंगातून ' आई समजून घेतांना लेखाकाची दमझाक होते. पुस्तक वाचल्यानंतर तोंडावर पुस्तक टाकून शुन्य अवस्थेत वाचकांना घेऊन  जाणार्‍या पुस्तकांपैकी हे नक्कीच नाही.   हे पुस्तक वाचतांना मधेच कंटाळा येतो. पुस्तक सोडून द्यावेसे वाटते. तरीही एक वेगळे पुस्तक वाचण्यासाठी वाचकांनी हे पुस्तक चुकवू नये असेही प्रामाणिकपणे वाटते.

विजुभाऊ's picture

28 Aug 2008 - 9:54 am | विजुभाऊ

हा प्रतिसाद मस्तच
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

रामदास's picture

27 Aug 2008 - 11:21 pm | रामदास

बार्बेरीअन्स ऍट द गेट.
सिल्वेर बेअर्स.
ब्युटीफूल माईंड.
जत्रा साप्ताहीकात क्रमशा कादंबरी यायची.प्र. वा.बोधे(कोयनानगर)नावाचे लेखक होते.या लेखकांच्या सगळ्या कादंबर्‍या.एव्हढा ओरीजीनल स्टफ परत वाचला नाही.

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 11:24 pm | आजानुकर्ण

रामदासशेठ,

जत्रा वाले बोधे प्रा. व. बा. बोधे होते असे पुसटसे आठवते.

आपला,
(विसरभोळा) आजानुकर्ण

रामदास's picture

27 Aug 2008 - 11:55 pm | रामदास

प्रा. बोधे असं लिहायचं होतं.
वयानुसार लिहीणं /वाचणं/ऐकणं यात बर्‍याच गमती जमती होतात.
मॉर्गन स्टॅनले च्या ऐवजी एकदा ऑर्गन स्टॅनले लिहीलं होतं.

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Aug 2008 - 11:34 pm | डॉ.प्रसाद दाढे

यादी खूप मोठी आहे विजूभाऊ
प्रभाकर पे॑ढारकरा॑चे रार॑ग ढा॑ग (मौज प्रका.) हे माझे अतिशय आवडते पुस्तक आहे. लेखक स्वतः पटकथा लेखक व दिग्दर्शक असल्याने (शिवाय वडील साक्षात भालजी पे॑ढारकर!) हे पुस्तक वाचता॑ना आपण एखादा चित्रपट पाहात आहोत असे वाटते. अतिशय ओघवती शैली आणि अचूक शब्द फेक ही पे॑ढारकरा॑ची खासियत. सगळ्यात महत्वाचे कथासार- स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीला जी गोष्ट पटली नाही त्याच्याविरूद्ध सगळ्या सिस्टीमशी लढा द्यायची कथानायकाची जिद्द पाहून मन स्तिमीत होते.
मी ती काद॑बरी खूपदा वाचली. ऍक्च्युअल रार॑ग ढा॑ग व त्याच्याशी स॑बधित काही सत्य माहीती माझ्या हाती लागल्यावर मी अशा निष्कर्षाप्रत आलो की ही गोष्ट बरीचशी खरी आहे. मी लेखकाची भेटही घेतली व खातरजमा करून घेतली.
ह्या निता॑तसु॑दर काद॑बरीवर चित्रपट होणे अत्य॑त गरजेचे आहे.

यादी बरीच मोठ्ठी आहे, तरीही काही निवडक लेखकांची निवडक पुस्तके सांगतो ...

१. भाईकाका : एक शुन्य मी [ त्यांचे सगळ्यात मास्टरपीस ], व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी.
२. गोनीदा : कुण्या एकाची भ्रमणगाथा, महाराष्ट्रदर्शन, अजुन एक आह एपण नाव आठवत नाही.
३. ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते.
४. प्र. के. अत्रे : मी कसा घडलो, साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा.
५. फ्रीडम ऍट मिडनाईट : लॉरी कॉलीन्स आणि डोमनीक लाऽपेरी
भारतीय स्वातंत्रसंग्रामाचे एका त्रयस्थाच्या दॄष्टीतुन केलेले विवेचन. गांधी, गोडसे, नेहरु , जीना व ब्रीटीश सत्ताधार्‍यांचे
अनेक आपल्याला माहित नसलेले पैलु सापडले. अप्रतिम !
६. संभाजी -- लेखक - विश्वास पाटील
७. वि. ग. कानिटकर : नाझी भस्मासुराचा उदयास्त,
८. बाकी शुन्य : कमलेश वालावलकर
९. शिरीष कणेकर : डो. कणेकरांचा मुलगा, डॉलरच्या देशा [ अप्रतिम ]
१०. अविनाश धर्माधिकारी : अस्वस्थ दशकाची डायरी

अशी लिस्ट पुर्ण होऊच शकणार नाही.
पण "इति लेखनसीमा"

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

दांडेकर

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 11:46 pm | आजानुकर्ण

फ्रीडम ऍट मिडनाईट : लॉरी कॉलीन्स आणि डोमनीक लाऽपेरी

अजिबात आवडले नाही.

आपला,
(स्वतंत्र) आजानुकर्ण

छोटा डॉन's picture

27 Aug 2008 - 11:51 pm | छोटा डॉन

कर्णा, आपल्या अभ्यासाबद्दल आदर आहे आणि मताबद्दलही ...
पण न आवडल्याची कारणे द्यावीत म्हणजे आपल्याला तुलना करणे सोपे जाईल ...
"अजिबात आवडले नाही" म्हणुन विषय पुर्ण होत नाही ....

असो. हा विषय आणि धागा वादाचा नाही ...

तरी "न आवडल्याची " कारणे व स्पष्टीकरण दिल्यास आम्हाला आनंद होईल ...

शेवटी काय तर कोलबेर म्हणतात तेच खरे , मला (माझ्या आवडीला) आवडले. इतरांनी ते वाचावे(च) असा माझा आग्रह नसतो.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 11:54 pm | आजानुकर्ण

सध्या थोडा गडबडीत आहे. मात्र ते नाव वाचून काही जुन्या जखमांवरची खपली निघाली आणि रक्त भळभळून वाहू लागले म्हणून प्रतिक्रिया दिली.

आपला,
(जखमी) आजानुकर्ण

छोटा डॉन's picture

27 Aug 2008 - 11:56 pm | छोटा डॉन

गडबडीत असाल तर काही हरकत नाही, नंतर कधीतरी ...
जर "ती जखम" पुन्हा भळभळुन वाहणार असेल त्यर टाळलेलेच बरे नाही का ?

पण आपल्याबरोबर चर्चेला मजा आली असती.
असो. पुन्हा कधी तरी.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मुक्तसुनीत's picture

27 Aug 2008 - 11:47 pm | मुक्तसुनीत

ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते.

हे म्हणजे "सोबतचे पहिले पान" का ?

छोटा डॉन's picture

27 Aug 2008 - 11:54 pm | छोटा डॉन

पुस्तकाचे नाव खरचं आत्ता आठवत नाही.
खुप जुने होते, माझ्या आजोबांनी विकत घेतलेले, मी वाचताना पार चिंध्या चिंध्या झाल्या होत्या ....

तरीही वडीलांना फोन करुन नाव विचारेन आणि "मिपावर" टाकेन ...

अवांतर : "सोबती" हे बेहर्‍यांनी चालवलेले मासीक / पाक्षीक असावे ...
त्यातल्याच निवडक लेखांचा हा संग्रह असण्याची शक्यता आहे. नक्की माहित नाही.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आजानुकर्ण's picture

27 Aug 2008 - 11:56 pm | आजानुकर्ण

सोबत हे नाव. बाईंडरच्या वेळी लालन सारंग आणि विजय तेंडुलकरांवर अतिशय घाणेरडे आरोप सोबत मधून झाले होते. विशेषतः शंकर सखाराम यांचे लेख व भाषणे.

आपला,
(नाट्यकर्मी) आजानुकर्ण बाईंडर

मुक्तसुनीत's picture

27 Aug 2008 - 11:59 pm | मुक्तसुनीत

माझ्या मते "सोबतचे पहिले पान" सारख्या संग्रहातून बेहर्‍यांची केवळ एकच बाजू समोर येते : समाज-संघटक , अनिष्ट-प्रथांचे विरोधक वगैरे. बाकी बेहर्‍यांची किर्ती एक "बुली" म्हणूनच होती.

छोटा डॉन's picture

28 Aug 2008 - 12:01 am | छोटा डॉन

नावाबद्दल थोडेसे कंफ्युजन होतेच मला तरी पण तुटक आठवत होते म्हणुन टाकले ...

बाकी ते "सखाराम बाईंडर" चे म्हणाल तर मला जास्त काही वावगे वाटाले नाही.
कुणा एकाची बाजु घेताना दुसर्‍यावर टीका करावीच लागेल. टीका फक्त जास्तच बोचरी व जहरी होती इतकेच.
पण त्यांची शैलीच तशी होती.

आदरणीय बाळासाहेब ठाकरे व बेहरे हे दोघेही "बिनधास्त व सडेतोड" लिखाणासाठी प्रसिद्ध आहेत. भाषेच्या सभ्यतेविषयी आणि साजाविषयी त्यांची मते काहीशी टोकाची आहेत.
ज्यांचा त्यांचा स्वभाव...
[ त्या दोघांचेही एकदा वाजले होते पण तो प्रश्न निराळा ]

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विकास's picture

28 Aug 2008 - 12:03 am | विकास

ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते.

कदाचीत आपल्याला "हार आणि प्रहार" या लेख संग्रहाबाबत बोलायचे असावे. तो चांगला आहे. अर्थात ते आता वाचताना त्या काळातली पूर्वपिठीका माहीती असणे महत्वाचे आहे.

छोटा डॉन's picture

28 Aug 2008 - 4:55 pm | छोटा डॉन

आजच मी माझ्या वडीलांना फोन करुन पुस्तकाचे नाव विचारले ...
ते "हार आणि प्रहारच" आहे.
पटकन शंकानिरसन केल्याबदाल "विकासरावांना" धन्यवाद ..

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ's picture

28 Aug 2008 - 9:56 am | विजुभाऊ

कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्ताकाबद्दल लिहावे

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

छोटा डॉन's picture

28 Aug 2008 - 8:10 pm | छोटा डॉन

२. गोनीदा : कुण्या एकाची भ्रमणगाथा, महाराष्ट्रदर्शन, अजुन एक आह एपण नाव आठवत नाही.

ज्याचे नाव आठवत नव्हते ते आठवले.
"दास डोंगरी राहतो" असे काही तरी आहे. एकदम मस्त, समर्थ रामदासांवर आहे.
चांगली गोष्ट म्हणजे हे पुस्तक ठिकठिकाणी त्यांच्या "श्लोकांनी" सजवलेले आहे त्यामुळे एकदम रसाळ वाटते.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनीषा's picture

27 Aug 2008 - 11:50 pm | मनीषा

वास्तव रामायण
लेखक - डॉ. प. वि. वर्तक

यात त्यानी आकाशातील ग्रह-ता-यांच्या स्थिती वरुन रामायणाची कालनिश्चिती केली आहे.
तसेच रामायणातील अनेक घटना , ज्या आपण केवळ पुराण कथा म्हणून ऐकतो/ वाचतो आणि काही वेळा त्याचा विपर्यास केला जातो, त्याचे अतिशय तर्कशुद्ध विश्लेश्ण केले आहे.
तसेच रामायण हे नुसते काल्पनीक पुराण नसुन सत्यकथा आहे या बद्दल सुद्धा खूप चांगली माहिती दिली आहे.
तसेच रामायण नक्की कुठे घडले.. सीतेला शोधण्यासाठी राम कुठे आणि कसा गेला हे सुद्धा त्यानी अनेक पुरावे देउन सांगीतले आहे..

विकास's picture

28 Aug 2008 - 12:00 am | विकास

मला देखील वास्तव रामायण आवडले. तसेच त्यांचे स्वयंभू पुस्तकपण छान आहे.

अर्थात दोन्ही पुस्तकात काही गोष्टी अवास्तव आहेत पण त्यामुळे संपूर्ण पुस्तकाची व्हॅलीडीटी कमी झाली असे वाटत नाही... उ.दा. शिवलींगाबद्दल खूप चांगली माहीती देत असताना अचानक त्याचा संबंध अणूभट्टीशी लावणे कारण त्याचा अकार पण तसाच असतो. :)

विसोबा खेचर's picture

28 Aug 2008 - 12:14 am | विसोबा खेचर

लेखक - डॉ. प. वि. वर्तक

म्हणजे सूक्ष्मरुपाने मंगळावर वगैरे जाणारे तेच ना? ;)

आपला,
(नुकताच सूक्ष्मरुपाने शनीवर जाऊन शनिदेवासोबत शनीग्रहावरची स्कॉच पिऊन आलेला!) तात्या.

विकास's picture

28 Aug 2008 - 12:22 am | विकास

नुकताच सूक्ष्मरुपाने शनीवर जाऊन शनिदेवासोबत शनीग्रहावरची स्कॉच पिऊन आलेला

ध्वनीरुपाने येणारे तात्या माहीती आहेत. आता जरा काळजी वाटते मागे पुढे कुठे तात्या उभे नसतील न अशी :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Aug 2008 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

होय! मी पण त्यांच्याबद्दल असंच काही ऐललेलं आहे.

वास्तव रामायण, स्वयंभू, उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरुपण (हे संपूर्ण वाचून झाले नाही, एकदोनच भाग वाचलेत)
पुस्तके आचंबित करणारी वाटतात. ते बनवाबनवी करीत असतील असे वाटत नाही. त्यातील माहिती त्यांनी कशी शोधून काढली असावी ह्याबद्दल त्यांच्याशीच चर्चा करुन जास्ती समजून घेता यायला हवे.
ग्रह गणित, संस्कृत इ.चा त्यांचा व्यासंग चांगलाच आहे. वेगळ्या नजरेने रुढ गोष्टींकडे बघायची त्यांची शैली हटके आहे.

मी वर्तकांशी स्वतः तीन-चार वेळा भेटून बोललो आहे. माणूस शांत आणि साधा आहे. ते संशोधक वृत्तीचे आहेत. पण काही वेळा प्रचारकी थाटाचे थोडेसे अतिआग्रही/दुराग्रही वाटावे असे बोलणे व लिखाण. अर्थात माझे थोड्या वाचनाने आणि परिचयाने झालेले हे मत आहे. ही पुस्तके वाचूनही बरीच वर्षे झाली. पुन्हा वाचायची इच्छा आहे.
रामायण, महाभारताची कालनिश्चिती, त्यातले शास्त्रीय संदर्भ इ. वर त्यांचे बरेच पेपर्सही प्रसिद्ध झालेले आहेत.

चतुरंग

विकास's picture

28 Aug 2008 - 12:58 am | विकास

पुस्तके आचंबित करणारी वाटतात. ते बनवाबनवी करीत असतील असे वाटत नाही.

एकदम मान्य!

मी वर्तकांशी स्वतः तीन-चार वेळा भेटून बोललो आहे. माणूस शांत आणि साधा आहे. ते संशोधक वृत्तीचे आहेत.
मी त्यांना भेटलेलो नाही पण तीन भाषणे लहान (- म्हणजे मी लहान) असताना ऐकलेली आहेत. त्यांच्याबद्दल पुणेकरांकडून बरेच गंमतशीर किस्से ऐकलेले आहेत.

पण काही वेळा प्रचारकी थाटाचे थोडेसे अतिआग्रही/दुराग्रही वाटावे असे बोलणे व लिखाण.
"प्रचारकी" म्हणजे कुठल्या अर्थाने या वर आपले अनुभव सारखे आहेत का वेगळे ते ठरवावे लागेल ;) पण अजूनही लक्षात आहेत. त्यात फक्त एकच वाटते की थोडेफार "तर्कट" आहेत.

रामायण, महाभारताची कालनिश्चिती, त्यातले शास्त्रीय संदर्भ इ. वर त्यांचे बरेच पेपर्सही प्रसिद्ध झालेले आहेत.

१००% मान्य!

अधिक माहितीसाठी इथे पाहू शकता.

=)) त्यांचे संकेतस्थळ जर विश्वामित्राने बघितले तर तो ढसाढसा रडेल अथवा साक्षात ब्रम्हदेवाकडे तक्रार घेऊन जाईल" "जी पदवी मिळायला मला हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागली, सरते शेवटी अहंभाव सोडावा लागला, ती पदवी म्हणजे ब्रम्हर्षी नाही , पण ब्रम्हश्री ही नवीन पदवी वर्तकांसाठी तयार केलीस का?

प्राजु's picture

28 Aug 2008 - 12:01 am | प्राजु

सुधा मूर्ती यांचे वाईज ऍण्ड आदर वाईज.. तसेच त्यांचेच गोष्टी माणसांच्या...
वाईज ऍण्ड आदर मध्ये सुधा मूर्तींना इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने समाजकार्य करताना आलेले माणसांचे अनुभव लिहिलेले आहेत. तर सुधा मूर्तीना लहानपणापासून ज्या व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव पाडला त्यांच्याबद्दल लिहिले आहे. या पुस्तकात जे आर डी टाटा, रतन टाटा, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम , नारायण मूर्ती.. यांच्याशिवाय बर्‍याच मोठमोठ्या व्यक्तींबद्दल लिहिले आहे. अतिशय सुंदर पुस्तके आहेत दोन्ही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Aug 2008 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही आवडलं हे पुस्तक. मोठ्या लोकांबरोबरच छोट्या, सामान्य लोकांकडूनही शिकता येतं ते पण लिहिलं आहे त्यांनी!

विकास's picture

28 Aug 2008 - 12:16 am | विकास

एका प्रतिसादात केवळ एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा म्हणजे त्या पुस्तकात काय आवडले हे सांगता येईल

२ विज्ञान कादंबर्‍या स्तके एकाच प्रतिसादात सांगून प्रतिसादाची संख्या मर्यादीत करत आहे. तेंव्हा क्षमस्व!

फाउंडेशन मालीका - आयझॅक ऍसिमोव्ह. रोबोची संकल्पना त्यात शेवटी शेवटी आली आहे असे धरले जाते (मला विशेष जाणवले नाही, पण त्या काळात वाटले असेल). बाकी त्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा संबंध आपण आपल्या जगाला लावू शकतो. मिपावर सुरवातीस मी यावर लिहीले होते. आवडते वाक्य - "व्हायलन्स इज द लास्ट रेफ्यूज ऑफ इन्कॉपिटंट". (पेशन्स ठेवून) शेवटच्या पुस्तकापर्यंत वाचल्यास, "चराचर सृष्टीएकमेकांशी संलग्न आहे आणि त्या अर्थाने विश्व हे एकच जीव आहे ," असा यात अर्थ समजतो.

२००१ ए स्पेस ओडीसी - आर्थर सी क्लर्क. यात हॅल कॉम्प्यूटरचा जो आत्ताच्या काळातील सूपर काँप्यूटर आहे आणि स्पेसशिपचे वर्णन आहे जेंव्हा काहीच अस्तित्वात नव्हते. यात शेवटी - पुनरपी जननम पुनरपी मरणम ही संकल्पना सांगितली आहे.

मराठीत "यक्षाची देणगी" हे नारळीकरांचे पुस्तक आवडले होते.

वाचक's picture

28 Aug 2008 - 7:58 am | वाचक

अवांतरः HAL ही अक्षरे सांकेतिक स्वरुपात IBM कडे बोट दाखवतात असा एक दावा आहे - बघा IBM च्या आधीचे प्रत्येक अक्षर म्हणजे HAL :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Aug 2008 - 10:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

२००१ ए स्पेस ओडीसी हा चित्रपट पहाताना मला तीनदा झोप लागली. शेवटी मी प्रयत्न सोडून दिला. :-)

२००१ ए स्पेस ओडीसी हा चित्रपट पहाताना मला तीनदा झोप लागली. शेवटी मी प्रयत्न सोडून दिला.

बहुतांशी पुस्तकांवरून काढलेल्या चित्रपटांप्रमाणेच ह्या संदर्भात घडले आहे. चित्रपट ग्रेट नाही आहे. शिवाय तो बराच जुना आहे, त्यातील सेटींग्ज पण जुन्या स्टाईलची, (बहुतेक वेळेस कथेमुळे) फक्त दोन व्यक्तींवर चित्रित केलेली असल्याने ते समजत नाही.

धमाल मुलगा's picture

28 Aug 2008 - 10:48 am | धमाल मुलगा

मी आयझॅक ऍसिमॉव्ह घेऊन ऑफिसच्या बसमध्ये वाचायचो,तेव्हा आजुबाजुच्या बर्‍याच भिवया आश्चर्य /आदर की आणखी काही कोण जाणे ह्या भावना घेऊन वर चढायच्या. तेव्हा मनाला छान गुदगुल्या व्हायच्या, आणि नाकावरचा चष्मा आणखी पुढे ओढुन मी सभोवतालास कस्पटासमान मानुन पुस्तकात शिरायचो......
...पण खरं सांगु, कथारुप जरी असलं, तरी माझ्या बालबुध्दीला काही झेपला नाही बॉ ऍसिमॉव्ह. बर्‍याचजणांच्या गप्पा ऐकुन 'फाऊंडेशन' घेतलं खरं, पण अजुनही शेवटची काही प्रकरणं वाचायची बाकीच आहेत.
शैली थोडीशी बोजड वाटली. हां पण 'सायकोहिस्ट्री'चं कव्हर मात्र छान!

मैत्र's picture

28 Aug 2008 - 3:48 am | मैत्र

गोनीदांचं छोटंसं पुस्तक आहे. त्यांची सगळीच पुस्तकं सुंदर आहेत पडघवली, मॄण्मयी, रानभुली, कुण्या एकाची भ्रमणगाथा, जैत रे जैत... पण हा बुधा त्याच्या अतिशय साध्या निसर्गाच्या जवळ अशा आयुष्यानं फार कुठे तरी हलवून जातो..
जरूर वाचा...
नियम मोडून दुसरं पुस्तक म्हणजे विजय देवधरांचं अनुवादित डेझर्टर...

गणा मास्तर's picture

28 Aug 2008 - 6:41 am | गणा मास्तर

पुलंचे 'एक शुन्य मी'. अगदी प्रत्यकाने वाचावेच असे पुस्तक आहे.

सुचेल तसं's picture

28 Aug 2008 - 8:32 am | सुचेल तसं

फक्त एक पुस्तक निवडणं शक्य नाही....

१) व्यक्ति आणि वल्ली, असा मी असा मी = पु.ल.देशपांडे
२) माणदेशी माणसं, बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
३) शाळा - मिलिंद बोकील
४) आणि मी - मंगला गोडबोले
५) पार्टनर - व.पु.काळे
६) दिवसेंदिवस - शं. ना. नवरे (एका लग्न न झालेल्या मुलाची डायरी.... मस्त आहे.)
७) अनुवादितः डेझर्टर, पॅपिलॉन, नॉट विदाऊट माय डॉटर
८) गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

sachin_Pune's picture

28 Aug 2008 - 10:48 am | sachin_Pune

प्रकाश नारायण संत - शारदा संगीत, पंखा, वनवास

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Aug 2008 - 11:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि एक आहे ना पुस्तक त्यांचं, झुंबर; चारही छान आहेत पुस्तकं. मलापण आवडली ती पुस्तकं.

शिप्रा's picture

28 Aug 2008 - 11:49 am | शिप्रा

एक होता कार्व्हर
अनुवाद :- वीणा गव्हाणकर..
हयामध्ये जॉर्ज कार्व्हर ह्या अमेरिकेतिल निग्रो शास्त्रज्ञाच्या जिद्दिचि कथा आहे.. वाचायला सुरवात केलि आणि पुर्ण करुनच उटले..

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

अभिषेक पटवर्धन's picture

28 Aug 2008 - 1:48 pm | अभिषेक पटवर्धन

जी. ए. च्या पुस्तकान्चा कुणीच कसा उल्लेख केला नाही. त्यान्च्या सगळ्या पुस्तकातल मला आवडलेल ' माणसे: अरभाट अणि चिल्लर'. मी शाळेत असताना वाचल होत, पण अजुनी त्यातले सन्वाद जसेच्या तसे लक्शात आहेत. इथे कोणी वाचलय का?

नीधप's picture

8 Jul 2009 - 7:49 pm | नीधप

स्टुडीओ - सुभाष अवचट यांचे पुस्तक. माझे अतिशय आवडते.
सृजनाची प्रक्रीया, कलाकार म्हणून वाढणे, कलाकाराच्या व्यक्तित्वातली गंमत... आणि अजून बरंच काही या पुस्तकात आहे.
तसं काही हे आत्मचरीत्र नाही पण त्यांच्या जगण्याच्या अनुभवाशी निगडीत आहे.

हे पुस्तक म्हणजे सिप बाय सिप हळू हळू घशात उतरणारी आणि कणाकणाने हळूहळू नशा चढवणारी ही एक वाईन आहे असं म्हणायला हरकत नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सचीन जी's picture

8 Jul 2009 - 7:59 pm | सचीन जी

१. शाळा - मिलिंद बोकील
२. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत
३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर
४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे
५. बरसात चांदण्याची - सु.शि.

बाकी या यादीत व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.

सचीन जी's picture

8 Jul 2009 - 8:00 pm | सचीन जी

१. शाळा - मिलिंद बोकील
२. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत
३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर
४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे
५. बरसात चांदण्याची - सु.शि.

बाकी सर्व प्रतिक्रियांमधे व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.

नीधप's picture

8 Jul 2009 - 8:03 pm | नीधप

'लस्ट फॉर लाइफ'
कादंबरीचे मूळ लेखक - आयर्व्हिंग स्टोन
स्वैर अनुवाद 'व्हिन्सेंट व्हॅन गॉग'
- माधुरी पुरंदरे

अप्रतिम पुस्तक. कलंदर आणि झपाटलेला अश्या चावून चोथा झालेल्या शब्दांच्या कैक योजने पलिकडे असलेल्या रंग आणि रेषा जगणार्‍या गॉग च्या आयुष्यावरची कादंबरी. प्रत्येकाने वाचावी अशी.
गॉग आवडत असेलच तर परत त्याच्या प्रेमात पडाल. (त्याच्याबाबत प्रेमात पडणे नाहीतर पाठ फिरवणे ह्या दोनच गोष्टी होऊ शकतात. हा ठिक आहे म्हणत गॉगला ओलांडू शकत नाही आपण.)

गॉग माहीत नसेल तर नवीन जग तुमच्यापुढे उलगडेल.

गॉग आवडत नसेल तर तुम्हाला तो समजायला मदत होईल.

काही असो. वाचा नक्की.

अवांतरः कोणी अ‍ॅमस्टरडॅमला असेल, जाणार असेल तर तिथलं गॉग म्युझियम न चुकता बघा.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

भोचक's picture

10 Jul 2009 - 2:37 pm | भोचक

सहमत. हे पुस्तक खूपच छान आहे. लहानपणीच वाचले होते. तेव्हापासून गॉग मनात रुतून बसलाय.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

विमुक्त's picture

10 Jul 2009 - 2:49 pm | विमुक्त

माची वरला बुधा .... गो.नि.दा.

फार छान लिहीलय.... भटकायची आवड असल्या मुळं मला ते जाम आवडत... आणि गो.नि.दा. एकदम सोप्या भाशेत लिहीतात...

तर्री's picture

10 Jul 2009 - 11:05 pm | तर्री

वाचलेली सगळी पुस्तकांची यादी करणे शक्यच नाही , पण तरीही..

कादंबरी :
१. रथचक्र : श्री. ना. पेंडसे
२. क्यालिडोस्कोप : अच्युत बर्वे
३.रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर
४. ब्र : कवित महाजन.
५.बलुत : दया पवार
६.स्वामी : अर्थात रणजीत देशमुख
७. ईजाळं : ऊत्तम बंडू तुपे
८.राहीच्या स्वप्नांचा ऊलगडा : भारत सासणे
९.धर्मांनंद : जयवंत दळवी.
१०. बनगरवाडी : धाकटे माडगुळकर

कादंबरी : अनुवादित
१.वंशव्रुक्ष : एस. एल्.भैरप्पा ( कादंबरीचा राजा) अनु: ऊमा कुलकर्णी.
२.पाडस : अनु : राम पटवरधन
३. नेमसेक : जुंपा लाहीरी
४. अरण्यक : बिभुती भूशण बंदोपध्याय
५. संस्कार : यु. आर. अनंतमूर्ती

आठवणी /(आत्म)चरीत्राऐवजी / तत्सम
१.तो प्रवास सुंदर होता : के.र्.शिरवाडकर
२."रामुभैया च्या आठवणी" (नाव आठवत नाही :क्षमा) : रवी दाते.
३.के.ई.एम. वार्ड नं १६ : डॉ.रवी बापट.
४.पोरवय : गुरूदेव टागोर : अनु : पु.ल.
५.आहे मनोहर तरी : सुनिताबाई देशपांडे.
६.माझ्या जीवनाची सरगम : सी.रामचन्द्र.
७.ईडली ऑर्किड आणि मी : विट्टळ कामत.
८. मैत्र : पु. ल.
९. बायंडर चे दिवस : कमलाकर सारंग
१०. कार्यरत : डॉ. अनिल अवचट

प्रवास-वर्णन
पु.लं ची चार : अपूर्वाई / पूर्वरंग / बंगचित्रे / जावे त्यान्च्या देशा /
{ म्हैस !(?)}

कथासंग्रह
१. काजळ माया : जी.ए.
२. सांज शकुन :जी.ए
३.पिंगळा वेळ : जी.ए.
४.रक्त चन्दन :जी .ए.
५. हंस अकेला : मेघना पेठे

नाटक
१. आत्मकथा : महेश एलकुंचवार
२.पुरूष : जयवंत दळवी
३. सूर्याची पिल्ले : वसंत कानेटकर
४.किरवंत : प्रेमानंद गज्वी.
५.ती फुलराणी : पु.ल.
६. लग्न : जयवंत दळवी
७. घाशिराम कोतवाल : विजय तेंडुलकर
८. तुज आहे तुज पाशी : पु.ल.
९.रायगडाला जेव्हा जाग येते : वसंत कानेटकर
१०. नटस्म्राट : शिरवाडकर

खाता -खाता "वाचण्याबद्दल" बोलणे आणि "खाण्याबद्दल" वाचणे आवड्त असेल , तर अवश्य भेटु या म्हटलं !!!

विजुभाऊ's picture

19 Sep 2016 - 2:29 pm | विजुभाऊ

बर्‍याच काळानंतर हा धागा वाचताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
यातले खूप थोडेजण अजुनमिपोआवर कार्यरत आहेत