हि मी विशाखापट्टणंम च्या नौदलाच्या रुग्णालयात(कल्याणी नावाच्या) काम करत असतानाची गोष्ट आहे.
तेथे नौदलाचे संगत नावाचे केंद्र मतीमंद मुलांसाठी चालवले जात होते. आम्ही तेथे त्या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गेलो होतो.
एक १५ वर्षाची शारीरिक वाढ झालेली पण मानसिक दृष्ट्या मंद अशी मुलगी होती.तिला कावीळ झालेली आढळली म्हणून पुढील रक्त तपासणी केल्यावर तिला hepatitis b आहे असे आढळले.
हि कावीळ रक्तातून होणारी होती.पण त्या मुलीला रक्त दिले गेल्याचा कुठलाही पुरावा नव्हता.मग पुढील तपासणीत एक भयानक गोष्ट उघडकीस आली. ती म्हणजे तिचा स्वतः चा जन्मदाता पिता तिला दारू पाजून तिच्याशी संभोग करीत असे आणि त्याला झालेला जंतुसंसर्ग शारीरिक संबंधातून मुलीला पोहोचला होता.
आमची डोकी फिरून गेली होती आणि जर तो माणूस समोर आला असता तर आमच्यापैकी एखाद्याने त्याचा गळा पण दाबला असता.
त्या मुलीच्या आईला बोलावण्यात आले तेंव्हा एक विदारक सत्य बाहेर आले. त्या बाईला अजून एक १० वर्षाची मतीमंद मुलगी होती.तिचा नवरा (त्या दुर्दैवी मुलीचा बाप) हा नौदलात cook (स्वयंपाकी) होता.
त्या बाईला या संबंधाबद्दल विचारले तेंव्हा तिने तिला हे माहित असल्याची कबुली दिली.परंतु हा प्रश्न विचारला कि दो पागल बच्चीया लेके मै कहान जाउ?.
आता नौदलात त्या कूक चे कोर्ट मार्शल करणे सहज शक्य होते.तसे करून त्याला नोकरीतून काढून टाकणे सोपे होते पण त्याने ते पूर्ण कुटुंब रस्त्यावर आले असते.स्वयंपाकी हा ८ वि पास असल्यामुळे त्याला बाहेर नोकरी मिळणे अशक्य होते आणि नौदलातून काढल्यावरही मुलीचा ताबा पित्याकडेच राहिला असता.
तेंव्हा बर्याच विचारविनिमया नंतर त्या कूक ला निकोबार बेटावर तातडीने बदलीवर पाठवले गेले.
अंदमान व निकोबार मधील निकोबार बेटावर कुटुंबाला नेण्याची सोय नव्हती त्यामुळे नौसैनिकांना आपल्या पूर्व स्थानी आपले घर ताब्यात ठवता येते.त्यामुळे आता त्याची(स्वयंपाकयाची) बायको विशाखापट्टणम ला राहणार होती आणि तो स्वयंपाकी निकोबार बेटावर पुढची ३ वर्षे वेगळा राहणार होता.त्यानंतर त्याला दुसरया नॉन फमिली स्टेशन वर पाठविणार होते. ६ वर्षानंतर तो निवृत्त होणार होता.त्यानंतर काय होणार हे त्या मुलीच्या नशीबावर होते.
प्राप्त परिस्थितीत या पेक्षा वेगळा पर्याय काय होता?
प्रतिक्रिया
12 Jan 2013 - 2:16 pm | लीलाधर
:(
12 Jan 2013 - 2:18 pm | पैसा
भयानक आहे.
12 Jan 2013 - 2:20 pm | मृत्युन्जय
नौदलाने योग्य तो निर्णय घेतला असे वाटते. त्यानंतर तो हरामी हालहाल होउन मेला असेल अशी अपेक्षा करण्याव्यतिरिक्त हातात काही नाही
12 Jan 2013 - 3:02 pm | स्पंदना
श्या! कसल जीणं हे.
12 Jan 2013 - 3:39 pm | दादा कोंडके
खरंय. शोषण करणारी व्यक्ती जर कुटुंबातलीच असेल तर मदत करणं अवघड असतं. धड दुर्लक्ष करू शकत नाही आणि न आयुष्यभर निस्तरू शकतो.
यावरूनच ऐकलेला एक अनुभव आठवला, त्यांच्याकडे घरकाम करणार्या मुलीचा बाप दारूडा होता आणि आई आजारी असायची आणि घरात लहान भावंडं. हिचं वय असेल १५-१६. तिचा सख्खा मामा दर आठवडयाला यायचा काही पैसे द्यायचा अन ते या मुलीकडून वसूल करून जायचा. यांनी तिच्या आईला भेटून पैसे दिले, थोडसं कौंसलिंग केलं आणि मुलीचं लगेच लग्न करून द्या म्हणून सांगितलं. पण परिस्थिती बदलली नाहीच, त्या मुलीची सुटका तिची लहान बहीण थोडी मोठ्ठी झाल्यावरच झाली. :(
या प्रसंगात सारासार विचार करून घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता.
12 Jan 2013 - 3:42 pm | विलासिनि
त्याला नोकरीतून काढून टाकून त्याच्या बायकोला नोकरी देणे शक्य नव्ह्ते का?
14 Jan 2013 - 1:12 pm | सुबोध खरे
विलासिनी ताई
त्याला कोर्ट मार्शल करून नोकरीतून काढून टाकणे अगदी सहज शक्य होते.
मूळ तो स्वयंपाकी हा ८ वी पास होता तेंव्हा त्याची बायको अंगठा छाप असणार आणि सरकारी नोकरी फक्त अनुकंपा तत्वावर देत येतेअनुकंपा तत्वामध्ये हुतात्मा किंवा अपघाती मृत्यू आला तर सख्ख्या नातेवाईकाला नोकरी देण्याचा नियम आहे .गुन्हेगाराच्या कुटुंबाला कोणत्याही तत्वावर नोकरी देण्याची सोय सरकारी नियमामध्ये नाही. आपल्याला त्या स्त्री बद्दल कितीही सहानुभूती वाटली तरी आपल्या भावना निरुपयोगी असतात.
14 Jan 2013 - 1:39 pm | विलासिनि
खूप वाईट वाटते आपल्या भावना अश्या दडपून टाकण्याचे. सरकारी नोकरीतील माहीतीबद्द्ल आभार.
14 Jan 2013 - 8:00 pm | सुबोध खरे
आपण क्षुद्र आहोत हे समजण्यासाठी एक तर पर्वतावर जा किंवा सरकारी कार्यालयात.
14 Jan 2013 - 8:05 pm | शैलेन्द्र
सुपर लाइक
14 Jan 2013 - 9:55 pm | मराठे
अगदी!
15 Jan 2013 - 9:21 pm | शुचि
भयाण!!! :( चर्र झाले वाचून.
16 Jan 2013 - 2:53 pm | बिपिन कार्यकर्ते
!
प्राप्त परिस्थितीत तारतम्य वापरून मार्ग काढल्याबद्दल बरे वाटले.
18 Jan 2013 - 10:56 pm | नर्मदेतला गोटा
देव परीक्षा पहात असतो
नाटकातल्या सर्वच पात्रांची !