✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

झटपट न्याय

स
सुबोध खरे यांनी
Sat, 01/12/2013 - 13:47  ·  लेख
लेख
हि मी विशाखापट्टणंम च्या नौदलाच्या रुग्णालयात(कल्याणी नावाच्या) काम करत असतानाची गोष्ट आहे. तेथे नौदलाचे संगत नावाचे केंद्र मतीमंद मुलांसाठी चालवले जात होते. आम्ही तेथे त्या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गेलो होतो. एक १५ वर्षाची शारीरिक वाढ झालेली पण मानसिक दृष्ट्या मंद अशी मुलगी होती.तिला कावीळ झालेली आढळली म्हणून पुढील रक्त तपासणी केल्यावर तिला hepatitis b आहे असे आढळले. हि कावीळ रक्तातून होणारी होती.पण त्या मुलीला रक्त दिले गेल्याचा कुठलाही पुरावा नव्हता.मग पुढील तपासणीत एक भयानक गोष्ट उघडकीस आली. ती म्हणजे तिचा स्वतः चा जन्मदाता पिता तिला दारू पाजून तिच्याशी संभोग करीत असे आणि त्याला झालेला जंतुसंसर्ग शारीरिक संबंधातून मुलीला पोहोचला होता. आमची डोकी फिरून गेली होती आणि जर तो माणूस समोर आला असता तर आमच्यापैकी एखाद्याने त्याचा गळा पण दाबला असता. त्या मुलीच्या आईला बोलावण्यात आले तेंव्हा एक विदारक सत्य बाहेर आले. त्या बाईला अजून एक १० वर्षाची मतीमंद मुलगी होती.तिचा नवरा (त्या दुर्दैवी मुलीचा बाप) हा नौदलात cook (स्वयंपाकी) होता. त्या बाईला या संबंधाबद्दल विचारले तेंव्हा तिने तिला हे माहित असल्याची कबुली दिली.परंतु हा प्रश्न विचारला कि दो पागल बच्चीया लेके मै कहान जाउ?. आता नौदलात त्या कूक चे कोर्ट मार्शल करणे सहज शक्य होते.तसे करून त्याला नोकरीतून काढून टाकणे सोपे होते पण त्याने ते पूर्ण कुटुंब रस्त्यावर आले असते.स्वयंपाकी हा ८ वि पास असल्यामुळे त्याला बाहेर नोकरी मिळणे अशक्य होते आणि नौदलातून काढल्यावरही मुलीचा ताबा पित्याकडेच राहिला असता. तेंव्हा बर्याच विचारविनिमया नंतर त्या कूक ला निकोबार बेटावर तातडीने बदलीवर पाठवले गेले. अंदमान व निकोबार मधील निकोबार बेटावर कुटुंबाला नेण्याची सोय नव्हती त्यामुळे नौसैनिकांना आपल्या पूर्व स्थानी आपले घर ताब्यात ठवता येते.त्यामुळे आता त्याची(स्वयंपाकयाची) बायको विशाखापट्टणम ला राहणार होती आणि तो स्वयंपाकी निकोबार बेटावर पुढची ३ वर्षे वेगळा राहणार होता.त्यानंतर त्याला दुसरया नॉन फमिली स्टेशन वर पाठविणार होते. ६ वर्षानंतर तो निवृत्त होणार होता.त्यानंतर काय होणार हे त्या मुलीच्या नशीबावर होते. प्राप्त परिस्थितीत या पेक्षा वेगळा पर्याय काय होता?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
5391 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

काय देउ प्रतिसाद

लीलाधर
Sat, 01/12/2013 - 14:16 नवीन
:(
  • Log in or register to post comments

:(

पैसा
Sat, 01/12/2013 - 14:18 नवीन
भयानक आहे.
  • Log in or register to post comments

नौदलाने योग्य तो निर्णय घेतला

मृत्युन्जय
Sat, 01/12/2013 - 14:20 नवीन
नौदलाने योग्य तो निर्णय घेतला असे वाटते. त्यानंतर तो हरामी हालहाल होउन मेला असेल अशी अपेक्षा करण्याव्यतिरिक्त हातात काही नाही
  • Log in or register to post comments

श्या! कसल जीणं हे.

स्पंदना
Sat, 01/12/2013 - 15:02 नवीन
श्या! कसल जीणं हे.
  • Log in or register to post comments

विदारक अनुभव

दादा कोंडके
Sat, 01/12/2013 - 15:39 नवीन
प्राप्त परिस्थितीत या पेक्षा वेगळा पर्याय काय होता?
खरंय. शोषण करणारी व्यक्ती जर कुटुंबातलीच असेल तर मदत करणं अवघड असतं. धड दुर्लक्ष करू शकत नाही आणि न आयुष्यभर निस्तरू शकतो. यावरूनच ऐकलेला एक अनुभव आठवला, त्यांच्याकडे घरकाम करणार्‍या मुलीचा बाप दारूडा होता आणि आई आजारी असायची आणि घरात लहान भावंडं. हिचं वय असेल १५-१६. तिचा सख्खा मामा दर आठवडयाला यायचा काही पैसे द्यायचा अन ते या मुलीकडून वसूल करून जायचा. यांनी तिच्या आईला भेटून पैसे दिले, थोडसं कौंसलिंग केलं आणि मुलीचं लगेच लग्न करून द्या म्हणून सांगितलं. पण परिस्थिती बदलली नाहीच, त्या मुलीची सुटका तिची लहान बहीण थोडी मोठ्ठी झाल्यावरच झाली. :( या प्रसंगात सारासार विचार करून घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता.
  • Log in or register to post comments

त्याला नोकरीतून काढून टाकून

विलासिनि
Sat, 01/12/2013 - 15:42 नवीन
त्याला नोकरीतून काढून टाकून त्याच्या बायकोला नोकरी देणे शक्य नव्ह्ते का?
  • Log in or register to post comments

नोकरी

सुबोध खरे
Mon, 01/14/2013 - 13:12 नवीन
विलासिनी ताई त्याला कोर्ट मार्शल करून नोकरीतून काढून टाकणे अगदी सहज शक्य होते. मूळ तो स्वयंपाकी हा ८ वी पास होता तेंव्हा त्याची बायको अंगठा छाप असणार आणि सरकारी नोकरी फक्त अनुकंपा तत्वावर देत येतेअनुकंपा तत्वामध्ये हुतात्मा किंवा अपघाती मृत्यू आला तर सख्ख्या नातेवाईकाला नोकरी देण्याचा नियम आहे .गुन्हेगाराच्या कुटुंबाला कोणत्याही तत्वावर नोकरी देण्याची सोय सरकारी नियमामध्ये नाही. आपल्याला त्या स्त्री बद्दल कितीही सहानुभूती वाटली तरी आपल्या भावना निरुपयोगी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासिनि

खूप वाईट वाटते आपल्या भावना

विलासिनि
Mon, 01/14/2013 - 13:39 नवीन
खूप वाईट वाटते आपल्या भावना अश्या दडपून टाकण्याचे. सरकारी नोकरीतील माहीतीबद्द्ल आभार.
  • Log in or register to post comments

नगण्य

सुबोध खरे
Mon, 01/14/2013 - 20:00 नवीन
आपण क्षुद्र आहोत हे समजण्यासाठी एक तर पर्वतावर जा किंवा सरकारी कार्यालयात.
  • Log in or register to post comments

+१

शैलेन्द्र
Mon, 01/14/2013 - 20:05 नवीन
सुपर लाइक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अगदी!

मराठे
Mon, 01/14/2013 - 21:55 नवीन
अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भयाण!!! चर्र झाले वाचून.

शुचि
Tue, 01/15/2013 - 21:21 नवीन
भयाण!!! :( चर्र झाले वाचून.
  • Log in or register to post comments

!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/16/2013 - 14:53 नवीन
! प्राप्त परिस्थितीत तारतम्य वापरून मार्ग काढल्याबद्दल बरे वाटले.
  • Log in or register to post comments

देव परीक्षा पहात असतो

नर्मदेतला गोटा
Fri, 01/18/2013 - 22:56 नवीन
देव परीक्षा पहात असतो नाटकातल्या सर्वच पात्रांची !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा