बरे बोलता सुख वाटते ! हे तो प्रत्यक्ष कळते ! आत्मवत् परावे ते ! मानित जावे ॥
कठिण शब्दे वाईट वाटते ! हे तो प्रत्ययास येते ! तरी मग वाईट बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥
आपणास चिमोटा घेतला ! तेणे कासाविस झाला ! आपणावरुन दुसर्याला ! राखत जावे ॥
पेरिले ते उगवते !बोलण्यासारिखे उत्तर येते ! तरी मग कर्कश बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥
श्री मद् दासबोध् दशक १२,समास 10
तीळ गुळ घ्या ! गोड गोड बोला ॥
प्रतिक्रिया
13 Jan 2013 - 5:23 pm | पैसा
संक्रांतीच्या शुभेच्छा!
13 Jan 2013 - 6:32 pm | निवेदिता-ताई
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
14 Jan 2013 - 2:27 am | स्पंदना
प्रपात...
चला काटेरी हलव्या सारखे करकरीत अन गोड रहा.
14 Jan 2013 - 9:46 pm | समयांत
अतिशय निर्मम होता येते दासबोधातल्या शब्दांमुळे.
14 Jan 2013 - 6:26 pm | विटेकर
तिळगुळ घ्या गोड बोला !
चित्र शिवथर घळीतील आहे का ?
समर्थांच्या मूर्ती समोरुन काढलेले ?
14 Jan 2013 - 9:46 pm | विकास
तुम्हाला आणि मिपा कुटूंबाला संक्रांतीच्या शुभेच्छा!
दासबोधातील त्याच दशक-समासातील अजून थोडे:
आपल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें । परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ॥ २७ ॥
दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन । हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥
15 Jan 2013 - 9:35 pm | शुचि
चांगले श्लोक या निमित्ताने वाचावयास मिळाले. बापू मामा व विकास यांचे श्लोकांबद्दल विशेष आभार.
20 Jan 2013 - 5:19 pm | बापू मामा
या सारख्या किती तरी ओव्यांतून समर्थांनी बोलणे, वागणे मार्दवपूर्ण, नेमस्त असावे असा उपदेश केलेला आहे, जसे
कठीण शब्द बोलो नये I कठीण आज्ञा करू नये I कठीण धिरत्व सोडू नये I काही केल्या II
राखे सकलांचे अंतर I उदंड करी पाठांतर I नेमस्तपणाचा विसर I पडणार नाही II
सकळास नम्र बोले I मर्यादा धरून चाले I सर्व जन तोषविले I तो सत्वगुण II
सकळ जनांसी आर्जव I नाही विरोधाचा ठाव I परोपकारी वेची जीव I तो सत्वगुण II
नीच उत्तर सहाणे I प्रत्योत्तर न देणे I आला क्रोध सावरणे I तो सत्वगुण II
शब्द कठीण न बोले I अतिनेमेसी चाले I योगी जेणे तोषविले I तो सत्वगुण II
नम्रपणे पुसो जाणे I नेमस्त अर्थ सांगो जाणे I बोला ऐसे वर्तो जाणे I उत्तम क्रिया II