आजकाल माणूस एकमेकापासून दुरावत चालला आहे.
आपल्या शेजार्यासाठी आपण कितीसे करतो.
पण शेकडो मैलवर राहणारी सौदी अरेबियातील काही महान माणसे आपल्या प्रेमाची छाया
केवळ आपल्या देशापुरतीच मर्यदित न ठेवता आपल्या प्रेमाची पाखर भारतीयांवरही घालत आहेत.
हे कार्य अव्याहतपणे गेली काही वर्षे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद इथे सुरू आहे.
सौदी अरेबियन लोकांच्या विशाल हृदयामुळे येथल्या अनेक जणांना केवळ प्रेमच नव्हे तर
पैसासुद्धा मिळाला आहे.
मात्र एवढे सारे करूनही या कामाची जाहीरात होणार नाही याचीदेखील काळजी घेतली जाते.
केवढी ही प्रसिद्धीपरांमुखता.
शेवटी काही पत्रकारांनी कसून शोध घेतल्यानंतर हे कार्य खर्या अर्थाने उजेडात आले आहे.
काम करणारा काम करीत राहतो, तो प्रसिद्धीची पर्वा करीत नाही.
जाणत्या लोकांचेच हे कर्तव्य आहे की अशा कामावर फोकस टाकावा !
प्रतिक्रिया
14 Jan 2013 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा
14 Jan 2013 - 1:45 am | तुषार काळभोर
जाणत्या लोकांचेच हे कर्तव्य आहे की अशा कामावर फोकस टाकावा !
14 Jan 2013 - 2:18 am | काळा पहाड
कोण म्हणतं कि मुस्लीम धर्म बदलत्या काळा बरोबर जुळवून घेवू शकत नाही?
14 Jan 2013 - 8:25 pm | आशु जोग
आपल्या देशातील सौदीप्रेमी आणि लादेनप्रेमींचे म्हणणे काय आहे
हे जाणून घ्यायची इच्छा आहे
14 Jan 2013 - 8:38 pm | पैसा
त्या मुलींची सुटका करण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का?
14 Jan 2013 - 9:02 pm | सोत्रि
लेखाचे नक्की प्रयोजन कळले नाही. नक्की काय म्हणायचे/मांडायचे आहे?
ही संस्कृती नसून पौरुषिय गंडाची विकृती आहे. ती फक्त सौदीतच आहे असे नाही. सर्वत्र आहे. नेमक्या त्याच स्वरुपात नसली तरी वेगवेगळ्या प्रकारांत. तो मी नव्हेच हे नाटक ह्यावरच चक्क साठाव्या दशकात अत्र्यांनीं लिहीले होते. सर्व धनाढ्य राष्ट्रांतील लक्ष्मीपुत्रांनी बनवलेले 'वर्ल्ड्स ब्रोथेल', बँकॉक काय किंवा मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्हा काय. हे सर्व ह्याच पौरुषिय गंडाच्या विकृतीची प्रतिके आहेत.
त्यामूळे लेख जमला नाही असे वाटले.
-(सुसंकृत) सोकाजी
14 Jan 2013 - 9:15 pm | मुक्त विहारि
त्यांनी योग्य ती काळजी घेवुन लेख टाकला आहे..
14 Jan 2013 - 9:22 pm | आशु जोग
> त्यामूळे लेख जमला नाही असे वाटले
एक ठाव माफी
(नम्र) जोग
14 Jan 2013 - 9:17 pm | मुक्त विहारि
तरी पण काही माकडे म्हणणारच... आमचीच XX लाल...
14 Jan 2013 - 9:50 pm | पिंपातला उंदीर
वासना ही वासना असते. त्याला धर्म किंवा देशाची बंधन नसतात. आपल्या देशात अनेक नेपाळी आणि बांगलादेशी पोरींच्या आयुष्याची होळी zआलि आहे. आकडेवारी पुढे दिली आहे. ज्याप्रमाणे सोत्रि म्हणतात त्याप्रमाणे ही पौरूशीय विकृती आहे आणि ही universal आहे.
http://articles.cnn.com/1996-08-23/world/9608_23_india.nepal.prostitutes...
http://acontrarioicl.com/2012/11/02/human-trafficking-and-prostitution-i...
14 Jan 2013 - 10:28 pm | दादा कोंडके
15 Jan 2013 - 7:26 pm | चिरोटा
+१.मुख्य म्हणजे स्थानिक पोलिस आयुक्त्/उपायुक्ता/ACP/DCP ह्या लोकांचा खिसा गरम केल्याशिवाय ह्या गोष्टी होवू शकत नाहीत.