विक्रांत वरील किस्सा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
12 Jan 2013 - 11:38 am

मी विक्रांत या विमानवाहू नौके वर २ वर्षे(१९९०-९१ ) डॉक्टर म्हणून कार्यरत होतो.तेंव्हाचे प्रसंग खाली देत आहे .
विक्रांत वरील आयुष्य फार गमतीचे होते.१९६१ मध्ये भारतीय नौदलात सामील झाल्यापासून ती पूर्ण वेळ समुद्रात उभी असल्याने नौकेवर गंज पकडणे प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे नौसैनिकांना कायम गंज साफ करणे आणि त्यावर रंग लावणे हि कामे करावी लागतात.त्यामुळे नौसैनिकांना कायम गंज साफ करणे आणि त्यावर रंग लावणे हि कामे करावी लागतात एकदा वार्षिक तपासणी (annual inspection)पूर्वी एक सैनिक एका छोटयाशा बंद ८ फूट x ६ फूट खोलीत रंग लावत होता.विक्रांतचा सर्वात वरील भाग हा विमाने उतरण्यासाठी केलेली धावपट्टी असे.म्हणून त्यावर पूर्ण काळा न घसरणारा रंग लावलेला असतो. त्यामुळे वरती उन्हाचा चटका आणि पूर्ण उष्णता शोषणारा काळा रंग शिवाय आत मध्ये चालणारे डीझेल जनरेटर यामुळे आतमध्ये तापमान ४५" से पोहोचते.आणि पूर्णवेळ समुद्रात उभे राहण्यामुळे सापेक्ष आर्द्रता ८०-९०% असते. इतक्या उष्णतेत काम करायला लागल्यामुळे नौसैनिक बरयाच वेळा खाकी ओवर ड्रेस (overall) च्या आतील सर्व कपडे काढून टाकीत असत.
रंग लावण्यापूर्वी अगोदरचा रंग काढण्यासाठी तो टरपेंटाईन (thinner) ने पृष्ठभाग स्वच्छ करीत होता. अचानक वीज गेली आणि अंधार झाला. त्या नौसैनिकाला जेवणापूर्वी रंगकाम पूर्ण करण्याचे आदेश असल्यामुळे त्याने एक मेणबत्ती घेतली.ती पेटवण्यासाठी त्याने काडी ओढली तो काय?आत मध्ये बाष्पीभवन झालेल्या टरपेंटाईन चा स्फोट झाला. आणि तो नौसैनिक ३३% भाजला.त्याला तशाच परिस्थितीत माझ्या दवाखान्यात आणले गेले. या अगोदर मी स्फोटात काळी झालेली किंवा भाजलेली माणसे फक्त सिनेमात बघितली होती.१००० माणसात मी एकटाच डॉक्टर होतो.प्रसंगावधान ठेवणे आवश्यक होते. मी ताबडतोब त्याला दोन्ही हातात सलाईन चा कॅन्यूला लावला. दोन्ही बाजूनी सलाईन जोरात सुरु केले. त्याला पेथीडीन चे इन्जेकशन दिले.या वेळेस त्याला सलाईन लावणे महत्वाचे असते कारण एकदा हातापायाला सूज आली तर नस सापडणे फार कठीण होते.कोणताही कपडा न काढता मी त्याला निर्जंतुक कापसामध्ये गुंडाळले.जननेंद्रिये सोडून त्याच्या शरीराचा संपूर्ण पुढचा भाग भाजला होता.(underwear) असल्यामुळे फक्त तेवढा भाग वाचला होता.त्याला नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात ताबडतोब हलवले.
पुढे त्याच्या २ प्लास्टिक सर्जरी झाल्या आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन नौदलात रुजू झाला
सल्फ्युरिक आम्लामुळे डोळा भाजल्याची कथा परत केंव्हा तरी.
सुबोध खरे सर्जन कमांडर(निवृत्त)

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

योगप्रभू's picture

12 Jan 2013 - 11:47 am | योगप्रभू

आपले लेखन वाचण्यास उत्सुक आहे.
कृपया या धाग्याच्या शीर्षकात 'विक्रांतवरील माझे अनुभव' असा बदल करु शकाल का?

वरील आठवण ही 'किस्सा' या सदरात वाचणे पटत नाहीय.

सुबोध खरे's picture

12 Jan 2013 - 1:07 pm | सुबोध खरे

आपले म्हणणे मान्य आहे

प्रचेतस's picture

12 Jan 2013 - 11:52 am | प्रचेतस

मिपावर स्वागत.

भारतीय नौसेनेतील तुमच्या अनुभवांविषयी वाचण्यास उत्सुक.

मेघनाद's picture

12 Jan 2013 - 12:12 pm | मेघनाद

नक्कीच टाका....त्यामुळे आमच्या सारख्या सामान्य जनांना नौसेने बद्दल माहिती मिळेल.

आदूबाळ's picture

12 Jan 2013 - 12:19 pm | आदूबाळ

कमांडर साहेब, पुढच्या आठवणींची वाट पहातो आहे!

भाजल्यानंतरही त्या सैनिकाचे कपडे न काढण्याचं कारण नीटसं कळलं नाही...

सुबोध खरे's picture

12 Jan 2013 - 1:05 pm | सुबोध खरे

साहेब माणूस जेंव्हा भाजतो तेंव्हा कपड्या बरोबर जंतू सुद्धा जळतात आणि म्हणून त्याचे अर्धवट जळलेले कपडे निर्जंतुक होतात. म्हणून ते कपडे रुग्णालयात निर्जंतुक खोलीत जाईपर्यंत न काढणे श्रेयस्कर असते

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2013 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार

विक्रांत वरील आयुष्य फार गमतीचे होते.

असे लिहिल्यावरती खाली ही घटना लिहिणे काही पटले नाही.

सुबोध खरे's picture

12 Jan 2013 - 2:13 pm | सुबोध खरे

साहेब इंटरेस्टिंग चे मराठी भाषांतर पटकन जे सुचले ते लिहिले .आपण एखादा चांगला शब्द सुचवाल काय ?

सुबोध खरे's picture

12 Jan 2013 - 2:14 pm | सुबोध खरे

साहेब इंटरेस्टिंग चे मराठी भाषांतर पटकन जे सुचले ते लिहिले .आपण एखादा चांगला शब्द सुचवाल काय ?

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2013 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार

'रोचक' हा शब्द कसा वाटतो सर ?

जेनी...'s picture

12 Jan 2013 - 9:38 pm | जेनी...

नाहि पटला हा शब्द .
गमतिचे शब्द सहज अनुभवातुन आलेलं लिखान दर्शवतो .
तर रोचक हा शब्द जानुन्बुजुन शब्द्खेळ करत लिहिल्यासारखा वाटतो .

सुब्बुकाका अजुन अनुभव वाचायचेच आहेत .

>>माणूस जेंव्हा भाजतो तेंव्हा कपड्या बरोबर जंतू सुद्धा जळतात आणि म्हणून त्याचे अर्धवट जळलेले कपडे निर्जंतुक होतात. म्हणून ते कपडे रुग्णालयात निर्जंतुक खोलीत जाईपर्यंत न काढणे श्रेयस्कर असते

लॉजिक सॉलिड आहे. माहिती नव्हतं. पुढील अनुभव वाचण्यास उत्सुक.

लीलाधर's picture

12 Jan 2013 - 2:04 pm | लीलाधर

मिपावर स्वागत.

भारतीय नौसेनेतील तुमच्या अनुभवांविषयी वाचण्यास उत्सुक.

पैसा's picture

12 Jan 2013 - 2:14 pm | पैसा

मिपावर स्वागत. तुमच्याकडून असे आणखी अनुभव वाचायला आवडतील.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Jan 2013 - 1:02 am | निनाद मुक्काम प...

मिपावर स्वागत
आपल्या अनुभवाच्या सोबतीला भारतीय नेवी विषयी माहिती व दिल्यास खूप बरे होईल.
आणि सर
मिपा नियमित वाचा इंग्रजी शब्दांचे प्रती मराठी शब्द जे आपल्या वास्तविक जगतात सहसा वापरले जात नाहीत किंवा जे ह्या अजून बोली भाषेत कानावर कधीही न गेलेले
मराठी शब्द येथे तुम्हाला सापडतील व पुढे नैसर्गिकरीत्या ते तुमच्या लेखनात व तोंडी येतील ,
थोडक्यात ह्या बाबतीत तुमचा गटणे होईल
मी झालो आहे.
मी स्वतः जात मानत नाही ,

फारच रोचक माहिती.

आनंद भातखंडे's picture

14 Jan 2013 - 10:51 am | आनंद भातखंडे

आपले अनुभव वाचायला आवडतील.

विलासिनि's picture

14 Jan 2013 - 1:45 pm | विलासिनि

आणखी अनुभव वाचण्यास उत्सुक.

विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू सुबोध सर, "आणखी अनुभव वाचण्यास उत्सुक" या पठडीतले प्रतिसाद हे प्रतिसादकर्त्यांच्या सब कॉन्शियस मनाने "सुबोध खरे सर्जन कमांडर(निवृत्त)" याला दिलेले प्रतिसाद आहेत असं मला राहून राहून वाटत आहे. :)

सुबोध खरे's picture

14 Jan 2013 - 6:07 pm | सुबोध खरे

साहेब आपण म्हणता ते मान्य आहे. मला पण असेच वाटते कि मी नुसत्या जिलब्या टाकीत आहे.उजवा मेंदू काम करीत नाही त्यामुळे १४ विद्या आणि ६४ कला यापैकी कोणतीच कला/ विद्या आली नाही म्हणून लष्करात भरती झालो होतो. एकदा श्री मंगेश पाडगावकर यांच्याशी विस्तृत बोलणे झाले तेंव्हा त्यांनी हे अनुभव लिखाणाचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार जवळ जवळ ३ वर्षांनी हा प्रयत्न केला. पण तो मला स्वतः ला सुद्धा फारसा रुचत नाही.श्री रणजीत चितळे यांचे उत्कंठावर्धक लेख पाहून एक केविलवाणा प्रयत्न केला होता. क्षमस्व.
मेरी खता मुआफ़ मै भूलेसे आ गया यहान
वरना मुझे भी है खबर मेरा नही है ये जहान
डूब चला ठ नींद मी अच्छा किया जागा दिया

पैसा's picture

14 Jan 2013 - 7:53 pm | पैसा

निराश होऊ नका सर. चितळे साहेबांच्या लिखाणातही आताची सफाई हळूहळू आली आहे. आम्ही सागळेच इथे हौशी लेखक वाचक आहोत. अनुभवातील सच्च्चेपणा महत्त्वाचा. इतर सफाई हळूहळू येईलच! लेखनासाठी धन्यवाद आणि शुभेच्छा! फक्त २ लेखांमधे काही काळ जाऊ द्द्या. म्हणजे तुम्हालाही जास्त विचार करून लिखाण करता येईल.

सुबोध खरे's picture

14 Jan 2013 - 6:07 pm | सुबोध खरे

साहेब आपण म्हणता ते मान्य आहे. मला पण असेच वाटते कि मी नुसत्या जिलब्या टाकीत आहे.उजवा मेंदू काम करीत नाही त्यामुळे १४ विद्या आणि ६४ कला यापैकी कोणतीच कला/ विद्या आली नाही म्हणून लष्करात भरती झालो होतो. एकदा श्री मंगेश पाडगावकर यांच्याशी विस्तृत बोलणे झाले तेंव्हा त्यांनी हे अनुभव लिखाणाचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार जवळ जवळ ३ वर्षांनी हा प्रयत्न केला. पण तो मला स्वतः ला सुद्धा फारसा रुचत नाही.श्री रणजीत चितळे यांचे उत्कंठावर्धक लेख पाहून एक केविलवाणा प्रयत्न केला होता. क्षमस्व.
मेरी खता मुआफ़ मै भूलेसे आ गया यहान
वरना मुझे भी है खबर मेरा नही है ये जहान
डूब चला ठ नींद मी अच्छा किया जागा दिया

अशुद्ध लेखनाबद्दल क्षमस्व.
डूब चला था नींद मे अच्छा किया जगा दिया

श्रीयुत खरे, खफ वर प्रतिसाद दिला म्हणून इथे द्यायला अळमटळम केली. परत प्रसंग वाचला. आपले प्रसंगावधान वाखाणण्याजोगे आहेच यात शंकाच नाही.

सुबोधजी, एक नंबर लेखन. आर्म्ड फोर्सेस मधील लोकांनी आपले अनुभव स्वतःच शब्दांकित करणे किमानपक्षी मराठी वाङ्मयात तरी खूप दुर्मिळ आहे. और आंदो, असे प्रत्यक्षदर्शी "बीन देअर, डन दॅट" पठडीचे अनुभव वाचायला फार आवडतात.

मराठे's picture

14 Jan 2013 - 7:47 pm | मराठे

छान

स्वराजित's picture

16 Jan 2013 - 2:01 pm | स्वराजित

आपला लेख आवडला.

ऋषिकेश's picture

16 Jan 2013 - 2:40 pm | ऋषिकेश

चांगले प्रसंगावधान.
इतके जिवंत अनुभव आहेत. वाचायला आवडते आहे. थोडा अधिक वेळ देऊन विस्ताराने सांगितलेत तर अजून मजा येईल

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jan 2013 - 2:47 pm | बिपिन कार्यकर्ते

डॉक्टर, मी वाचतोय हां! लिहा अजून... आणि सविस्तर लिहा. तुमच्याकडे वेगळेच अनुभव असणारेत! लिहा पटकन!

गामा पैलवान's picture

15 May 2015 - 9:43 pm | गामा पैलवान

३३ % भाजूनही पुढे पूर्ण तंदुरुस्त होणे हा केवळ चमत्कार वाटतो आहे. तुम्ही ज्या वेगवान हालचाली केल्यात त्यांचंच हे फळ दिसंत आहे. ४० % च्या पुढे भाजलेला माणूस सहसा वाचत नाही (ऐकीव माहिती). ३३ % म्हणजे काहीतरी अपंगत्व निश्चित येणार असं असतांना तो पार बरा होणं हे आश्चर्यजनक आहे.

आपला नम्र,
-गामा पैलवान

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 May 2015 - 10:53 am | कैलासवासी सोन्याबापु

डॉक्टर साब और एक्सपीरियंस शेयर कीजिए प्लीज! जबराट अनुभव असतात मेडिकल ऑफिसर म्हणुन!!! अजुन येऊ द्या