Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुबोध खरे on Sat, 01/12/2013 - 11:38
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
मी विक्रांत या विमानवाहू नौके वर २ वर्षे(१९९०-९१ ) डॉक्टर म्हणून कार्यरत होतो.तेंव्हाचे प्रसंग खाली देत आहे . विक्रांत वरील आयुष्य फार गमतीचे होते.१९६१ मध्ये भारतीय नौदलात सामील झाल्यापासून ती पूर्ण वेळ समुद्रात उभी असल्याने नौकेवर गंज पकडणे प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे नौसैनिकांना कायम गंज साफ करणे आणि त्यावर रंग लावणे हि कामे करावी लागतात.त्यामुळे नौसैनिकांना कायम गंज साफ करणे आणि त्यावर रंग लावणे हि कामे करावी लागतात एकदा वार्षिक तपासणी (annual inspection)पूर्वी एक सैनिक एका छोटयाशा बंद ८ फूट x ६ फूट खोलीत रंग लावत होता.विक्रांतचा सर्वात वरील भाग हा विमाने उतरण्यासाठी केलेली धावपट्टी असे.म्हणून त्यावर पूर्ण काळा न घसरणारा रंग लावलेला असतो. त्यामुळे वरती उन्हाचा चटका आणि पूर्ण उष्णता शोषणारा काळा रंग शिवाय आत मध्ये चालणारे डीझेल जनरेटर यामुळे आतमध्ये तापमान ४५" से पोहोचते.आणि पूर्णवेळ समुद्रात उभे राहण्यामुळे सापेक्ष आर्द्रता ८०-९०% असते. इतक्या उष्णतेत काम करायला लागल्यामुळे नौसैनिक बरयाच वेळा खाकी ओवर ड्रेस (overall) च्या आतील सर्व कपडे काढून टाकीत असत. रंग लावण्यापूर्वी अगोदरचा रंग काढण्यासाठी तो टरपेंटाईन (thinner) ने पृष्ठभाग स्वच्छ करीत होता. अचानक वीज गेली आणि अंधार झाला. त्या नौसैनिकाला जेवणापूर्वी रंगकाम पूर्ण करण्याचे आदेश असल्यामुळे त्याने एक मेणबत्ती घेतली.ती पेटवण्यासाठी त्याने काडी ओढली तो काय?आत मध्ये बाष्पीभवन झालेल्या टरपेंटाईन चा स्फोट झाला. आणि तो नौसैनिक ३३% भाजला.त्याला तशाच परिस्थितीत माझ्या दवाखान्यात आणले गेले. या अगोदर मी स्फोटात काळी झालेली किंवा भाजलेली माणसे फक्त सिनेमात बघितली होती.१००० माणसात मी एकटाच डॉक्टर होतो.प्रसंगावधान ठेवणे आवश्यक होते. मी ताबडतोब त्याला दोन्ही हातात सलाईन चा कॅन्यूला लावला. दोन्ही बाजूनी सलाईन जोरात सुरु केले. त्याला पेथीडीन चे इन्जेकशन दिले.या वेळेस त्याला सलाईन लावणे महत्वाचे असते कारण एकदा हातापायाला सूज आली तर नस सापडणे फार कठीण होते.कोणताही कपडा न काढता मी त्याला निर्जंतुक कापसामध्ये गुंडाळले.जननेंद्रिये सोडून त्याच्या शरीराचा संपूर्ण पुढचा भाग भाजला होता.(underwear) असल्यामुळे फक्त तेवढा भाग वाचला होता.त्याला नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात ताबडतोब हलवले. पुढे त्याच्या २ प्लास्टिक सर्जरी झाल्या आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन नौदलात रुजू झाला सल्फ्युरिक आम्लामुळे डोळा भाजल्याची कथा परत केंव्हा तरी. सुबोध खरे सर्जन कमांडर(निवृत्त)
  • Log in or register to post comments
  • 7074 views

प्रतिक्रिया

Submitted by योगप्रभू on Sat, 01/12/2013 - 11:47

Permalink

सर प्लीज...

आपले लेखन वाचण्यास उत्सुक आहे. कृपया या धाग्याच्या शीर्षकात 'विक्रांतवरील माझे अनुभव' असा बदल करु शकाल का? वरील आठवण ही 'किस्सा' या सदरात वाचणे पटत नाहीय.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 01/12/2013 - 13:07

In reply to सर प्लीज... by योगप्रभू

Permalink

किस्सा

आपले म्हणणे मान्य आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 01/12/2013 - 11:52

Permalink

धन्यवाद सर

मिपावर स्वागत. भारतीय नौसेनेतील तुमच्या अनुभवांविषयी वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघनाद on Sat, 01/12/2013 - 12:12

Permalink

नक्कीच टाका....त्यामुळे

नक्कीच टाका....त्यामुळे आमच्या सारख्या सामान्य जनांना नौसेने बद्दल माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sat, 01/12/2013 - 12:19

Permalink

कमांडर साहेब, पुढच्या

कमांडर साहेब, पुढच्या आठवणींची वाट पहातो आहे! भाजल्यानंतरही त्या सैनिकाचे कपडे न काढण्याचं कारण नीटसं कळलं नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 01/12/2013 - 13:05

Permalink

कपडे

साहेब माणूस जेंव्हा भाजतो तेंव्हा कपड्या बरोबर जंतू सुद्धा जळतात आणि म्हणून त्याचे अर्धवट जळलेले कपडे निर्जंतुक होतात. म्हणून ते कपडे रुग्णालयात निर्जंतुक खोलीत जाईपर्यंत न काढणे श्रेयस्कर असते
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 01/12/2013 - 13:14

Permalink

ह्म्म

विक्रांत वरील आयुष्य फार गमतीचे होते.
असे लिहिल्यावरती खाली ही घटना लिहिणे काही पटले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 01/12/2013 - 14:13

In reply to ह्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

गमतीचे

साहेब इंटरेस्टिंग चे मराठी भाषांतर पटकन जे सुचले ते लिहिले .आपण एखादा चांगला शब्द सुचवाल काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 01/12/2013 - 14:14

In reply to गमतीचे by सुबोध खरे

Permalink

गमतीचे

साहेब इंटरेस्टिंग चे मराठी भाषांतर पटकन जे सुचले ते लिहिले .आपण एखादा चांगला शब्द सुचवाल काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 01/12/2013 - 14:50

In reply to गमतीचे by सुबोध खरे

Permalink

हो !

'रोचक' हा शब्द कसा वाटतो सर ?
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 01/12/2013 - 21:38

In reply to हो ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

नाहि पटला हा शब्द .

नाहि पटला हा शब्द . गमतिचे शब्द सहज अनुभवातुन आलेलं लिखान दर्शवतो . तर रोचक हा शब्द जानुन्बुजुन शब्द्खेळ करत लिहिल्यासारखा वाटतो . सुब्बुकाका अजुन अनुभव वाचायचेच आहेत .
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on Sat, 01/12/2013 - 13:17

Permalink

>>माणूस जेंव्हा भाजतो तेंव्हा

>>माणूस जेंव्हा भाजतो तेंव्हा कपड्या बरोबर जंतू सुद्धा जळतात आणि म्हणून त्याचे अर्धवट जळलेले कपडे निर्जंतुक होतात. म्हणून ते कपडे रुग्णालयात निर्जंतुक खोलीत जाईपर्यंत न काढणे श्रेयस्कर असते लॉजिक सॉलिड आहे. माहिती नव्हतं. पुढील अनुभव वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on Sat, 01/12/2013 - 14:04

Permalink

जय हिंद सर !

मिपावर स्वागत. भारतीय नौसेनेतील तुमच्या अनुभवांविषयी वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 01/12/2013 - 14:14

Permalink

स्वागत!

मिपावर स्वागत. तुमच्याकडून असे आणखी अनुभव वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sun, 01/13/2013 - 01:02

Permalink

मिपावर स्वागत

मिपावर स्वागत आपल्या अनुभवाच्या सोबतीला भारतीय नेवी विषयी माहिती व दिल्यास खूप बरे होईल. आणि सर मिपा नियमित वाचा इंग्रजी शब्दांचे प्रती मराठी शब्द जे आपल्या वास्तविक जगतात सहसा वापरले जात नाहीत किंवा जे ह्या अजून बोली भाषेत कानावर कधीही न गेलेले मराठी शब्द येथे तुम्हाला सापडतील व पुढे नैसर्गिकरीत्या ते तुमच्या लेखनात व तोंडी येतील , थोडक्यात ह्या बाबतीत तुमचा गटणे होईल मी झालो आहे. मी स्वतः जात मानत नाही ,
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Mon, 01/14/2013 - 00:28

Permalink

अशा आव्हानात्मक प्रसंगी प्रसंगावधान फार महत्त्वाचे!!

फारच रोचक माहिती.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आनंद भातखंडे

Submitted by आनंद भातखंडे on Mon, 01/14/2013 - 10:51

Permalink

स्वागत

आपले अनुभव वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

Submitted by विलासिनि on Mon, 01/14/2013 - 13:45

Permalink

आणखी अनुभव वाचण्यास उत्सुक.

आणखी अनुभव वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 01/14/2013 - 13:59

Permalink

विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू

विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू सुबोध सर, "आणखी अनुभव वाचण्यास उत्सुक" या पठडीतले प्रतिसाद हे प्रतिसादकर्त्यांच्या सब कॉन्शियस मनाने "सुबोध खरे सर्जन कमांडर(निवृत्त)" याला दिलेले प्रतिसाद आहेत असं मला राहून राहून वाटत आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 01/14/2013 - 18:07

In reply to विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू by धन्या

Permalink

पठडीतील प्रतिसाद

साहेब आपण म्हणता ते मान्य आहे. मला पण असेच वाटते कि मी नुसत्या जिलब्या टाकीत आहे.उजवा मेंदू काम करीत नाही त्यामुळे १४ विद्या आणि ६४ कला यापैकी कोणतीच कला/ विद्या आली नाही म्हणून लष्करात भरती झालो होतो. एकदा श्री मंगेश पाडगावकर यांच्याशी विस्तृत बोलणे झाले तेंव्हा त्यांनी हे अनुभव लिखाणाचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार जवळ जवळ ३ वर्षांनी हा प्रयत्न केला. पण तो मला स्वतः ला सुद्धा फारसा रुचत नाही.श्री रणजीत चितळे यांचे उत्कंठावर्धक लेख पाहून एक केविलवाणा प्रयत्न केला होता. क्षमस्व. मेरी खता मुआफ़ मै भूलेसे आ गया यहान वरना मुझे भी है खबर मेरा नही है ये जहान डूब चला ठ नींद मी अच्छा किया जागा दिया
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 01/14/2013 - 19:53

In reply to पठडीतील प्रतिसाद by सुबोध खरे

Permalink

तसे नाही

निराश होऊ नका सर. चितळे साहेबांच्या लिखाणातही आताची सफाई हळूहळू आली आहे. आम्ही सागळेच इथे हौशी लेखक वाचक आहोत. अनुभवातील सच्च्चेपणा महत्त्वाचा. इतर सफाई हळूहळू येईलच! लेखनासाठी धन्यवाद आणि शुभेच्छा! फक्त २ लेखांमधे काही काळ जाऊ द्द्या. म्हणजे तुम्हालाही जास्त विचार करून लिखाण करता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 01/14/2013 - 18:07

In reply to विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू by धन्या

Permalink

पठडीतील प्रतिसाद

साहेब आपण म्हणता ते मान्य आहे. मला पण असेच वाटते कि मी नुसत्या जिलब्या टाकीत आहे.उजवा मेंदू काम करीत नाही त्यामुळे १४ विद्या आणि ६४ कला यापैकी कोणतीच कला/ विद्या आली नाही म्हणून लष्करात भरती झालो होतो. एकदा श्री मंगेश पाडगावकर यांच्याशी विस्तृत बोलणे झाले तेंव्हा त्यांनी हे अनुभव लिखाणाचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार जवळ जवळ ३ वर्षांनी हा प्रयत्न केला. पण तो मला स्वतः ला सुद्धा फारसा रुचत नाही.श्री रणजीत चितळे यांचे उत्कंठावर्धक लेख पाहून एक केविलवाणा प्रयत्न केला होता. क्षमस्व. मेरी खता मुआफ़ मै भूलेसे आ गया यहान वरना मुझे भी है खबर मेरा नही है ये जहान डूब चला ठ नींद मी अच्छा किया जागा दिया
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 01/14/2013 - 18:10

In reply to पठडीतील प्रतिसाद by सुबोध खरे

Permalink

डूब चला ठ नींद मी अच्छा किया जागा दिया

अशुद्ध लेखनाबद्दल क्षमस्व. डूब चला था नींद मे अच्छा किया जगा दिया
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 01/14/2013 - 17:31

Permalink

श्रीयुत खरे, खफ वर प्रतिसाद

श्रीयुत खरे, खफ वर प्रतिसाद दिला म्हणून इथे द्यायला अळमटळम केली. परत प्रसंग वाचला. आपले प्रसंगावधान वाखाणण्याजोगे आहेच यात शंकाच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/14/2013 - 19:04

Permalink

सुबोधजी, एक नंबर लेखन. आर्म्ड

सुबोधजी, एक नंबर लेखन. आर्म्ड फोर्सेस मधील लोकांनी आपले अनुभव स्वतःच शब्दांकित करणे किमानपक्षी मराठी वाङ्मयात तरी खूप दुर्मिळ आहे. और आंदो, असे प्रत्यक्षदर्शी "बीन देअर, डन दॅट" पठडीचे अनुभव वाचायला फार आवडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Mon, 01/14/2013 - 19:47

Permalink

छान

छान
  • Log in or register to post comments

Submitted by स्वराजित on Wed, 01/16/2013 - 14:01

Permalink

आपला लेख आवडला.

आपला लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 01/16/2013 - 14:40

Permalink

चांगले प्रसंगावधान.

चांगले प्रसंगावधान. इतके जिवंत अनुभव आहेत. वाचायला आवडते आहे. थोडा अधिक वेळ देऊन विस्ताराने सांगितलेत तर अजून मजा येईल
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 01/16/2013 - 14:47

Permalink

डॉक्टर, मी वाचतोय हां! लिहा

डॉक्टर, मी वाचतोय हां! लिहा अजून... आणि सविस्तर लिहा. तुमच्याकडे वेगळेच अनुभव असणारेत! लिहा पटकन!
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 05/15/2015 - 21:43

Permalink

जबरदस्त डॉक्टरसाहेब!

३३ % भाजूनही पुढे पूर्ण तंदुरुस्त होणे हा केवळ चमत्कार वाटतो आहे. तुम्ही ज्या वेगवान हालचाली केल्यात त्यांचंच हे फळ दिसंत आहे. ४० % च्या पुढे भाजलेला माणूस सहसा वाचत नाही (ऐकीव माहिती). ३३ % म्हणजे काहीतरी अपंगत्व निश्चित येणार असं असतांना तो पार बरा होणं हे आश्चर्यजनक आहे. आपला नम्र, -गामा पैलवान
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 05/16/2015 - 10:53

Permalink

डॉक्टर साब और एक्सपीरियंस

डॉक्टर साब और एक्सपीरियंस शेयर कीजिए प्लीज! जबराट अनुभव असतात मेडिकल ऑफिसर म्हणुन!!! अजुन येऊ द्या
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com