माझे घर पूर्व पश्चिम असल्याने घरातून सूर्योदय आणि सूर्यास्त नेहमीच बघायला मिळतो. सूर्य मावळत असताना संधीप्रकाश असतो तेव्हा आकाश निरभ्र असेल तर लाल , गुलाबी , केशरी रंगाच्या छटा तर फारच सुरेख दिसतात. हा मावळतीचा सूर्य डोळ्यांना नेहमीच सुखावतो.
गेल्या आठवड्यात असेच छान सूर्यास्ताचे दर्शन झाले आणि ते दॄष्य कॅमेर्यात टिपण्याचा मोह अनावर झाला.
प्रतिक्रिया
25 Aug 2008 - 2:04 pm | ऋचा
ultimate!!!!!!!!!
no words............... @)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
25 Aug 2008 - 2:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे विषय शिकवण्यासाठीपण हे फोटो चांगले आहेत. फोटो म्हणून किती चांगले आहेत ते तज्ञांनी ठरवावं, मला आवडले!
अवांतरः तुम्ही सूर्योदय बघता? :o
25 Aug 2008 - 2:15 pm | ईश्वरी
>>तुम्ही सूर्योदय बघता?
मला वाटलंच कोणीतरी हा प्रश्न विचारणारच :)
मुलीची सकाळची शाळा असल्याने डब्यासाठी लवकर उठणे होतेच. पण तरिही वर्षातून अगदी केव्हातरीच पाहणे होते.
मात्र आकाश स्वच्छ असेल तर सूर्यास्त नेहमीच बघायला मिळतो.
ईश्वरी
25 Aug 2008 - 2:04 pm | पक्या
सर्व फोटो सुरेख. २रा आणि ३रा तर खासच. कॅमेरा बराच झूम केल्याने सूर्याचे रंग खुलून दिसतायेत.
25 Aug 2008 - 2:11 pm | मराठी_माणूस
मस्त फोटो. भाग्यशालि आहात , हे सुंदर दृश्य रोज पाहु शकता.
25 Aug 2008 - 2:13 pm | अनिल हटेला
मस्त फोटो आहेत !!
पण इतके विविध रंगी फोटो सुर्या चे आज पहिल्यांदाच पाहतोये !!
१ ले जास्त आवडले ............
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Aug 2008 - 2:28 pm | सूर्य
सुंदर रंग. मस्त आहेत फोटो.
- सूर्य.
26 Aug 2008 - 4:29 am | रविराज
असेच म्हणतो.
25 Aug 2008 - 2:36 pm | मिंटी
मस्त आहेत फोटो.............
खुप आवडले...................:)
25 Aug 2008 - 2:43 pm | प्रभाकर पेठकर
अस्तावायला उत्सुक सूर्य क्रमांक १ आणि २ एकदम मस्त.
25 Aug 2008 - 2:55 pm | अद्वैत जोशी
हे खरोखर फोटो आहेत की पेन्टिग्स??
झकास .......
25 Aug 2008 - 4:03 pm | ध्रुव
सर्व फोटो सुरेख, त्यातही ३ रा फारच भारी वाटला. सुर्याच्या रंगात ज्या वेगवेगळ्या छटा आल्या आहेत, त्या जबरी.
अवांतरः कुठला कॅमेरा वापरता?
--
ध्रुव
25 Aug 2008 - 11:21 pm | ईश्वरी
>>कुठला कॅमेरा वापरता?- ध्रुव,
कॅनन चा PowerShot S5 IS डिजीटल कॅमेरा. ८.० मेगा पिक्सेल , १२ x ऑप्टीकल झूम
ईश्वरी
25 Aug 2008 - 11:23 pm | लिखाळ
फोटो छान आणि वेगळेच आले आहेत.
कॅननचे (त्यात पॉवरशॉट सिरिजचे) रंग चांगले येतात हे ऐकून होतो.. आता पाहिले !
--लिखाळ.
26 Aug 2008 - 2:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> कॅननचे (त्यात पॉवरशॉट सिरिजचे) रंग चांगले येतात हे ऐकून होतो.. आता पाहिले !
माझ्याकडे आहे, S3 IS त्याचेही रंग छान येतात, कधीतरी इथे टाकेन वेळ मिळाला की!
25 Aug 2008 - 4:13 pm | राघव१
एकदम बेश्ट!! पहिला अन् तिसरा जास्त आवडलेत.
राघव
[स्वगत:
राघवा... तुझ्या जिंदगीवर थू आहे लेका! ना मजेदार खाऊ शकत अन् ना धड चांगली दृष्यं बघू शकत!! जेव्हा निसर्ग आपले रंग उधळत असतो तेव्हा एकतर तुझी मध्यरात्र झालेली असते किंवा हापिसात मान मोडत असतोस..!!]
25 Aug 2008 - 4:16 pm | स्वाती दिनेश
मस्त फोटो..फार सुंदर!
स्वाती
25 Aug 2008 - 4:38 pm | चिंतामणराव
खुप छान ........आवडले फोटो
चिंतामणराव .....आमचा हरी आहे...
25 Aug 2008 - 5:41 pm | शितल
सर्वच फोटो सह्ही.. आहेत.
पहिला फोटो तर अगदी मस्त..
25 Aug 2008 - 6:09 pm | विसोबा खेचर
सगळेच सुर्यास्त क्लास!
ईश्वरी, तु देखील चांगली छायचित्रकार आहेस हे माहितीच नव्हत! :)
अजूनही फोटू येऊ देत...
तात्या.
25 Aug 2008 - 7:39 pm | अंकुश चव्हाण
खरच, सुर्यास्ताची सर्वच छायाचित्रे सुन्दर आहेत.
25 Aug 2008 - 7:52 pm | प्राजु
पहिले २ फोटो अतिशय आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Aug 2008 - 11:17 pm | ईश्वरी
प्रतिसादाबद्द्ल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
>>ईश्वरी, तु देखील चांगली छायचित्रकार आहेस हे माहितीच नव्हत! अजूनही फोटू येऊ देत...
तात्या , ही सर्व कॅमेर्याची करामत. मी काढलेल्या फोटोंच्या कलेक्शन मधील अजून काही चांगले फोटो नक्कीच टाकीन.
ईश्वरी
26 Aug 2008 - 1:10 am | धनंजय
पहिल्या फोटोइतका तरी झूम असल्याशिवाय सूर्यचंद्रांचे फोटो काढू नये, असे माझे मत आहे.
येथे झूमचा फार चांगला उपयोग दिसतो आहे.
फोटो दाखवल्याबद्दल धन्यवाद.
अवांतर : १२-एक्स ऑप्टिकल झूमने शेवटचे दोन फोटो काढले असतील हे ठीक वाटत नाही. त्यावर ४-एक्स डिजिटल झूमही वापरला असावा. शिवाय तुमच्या कॅमेर्याच्या इमेज-स्टॅबिलायझेशनचाही तुम्हाला फायदा झाला. या प्रकारे चंद्राचा फोटो तुम्ही काढू शकणार नाही, असे माझे भाकीत आहे :-)
26 Aug 2008 - 1:48 am | कोलबेर
ह्या बाबतीत किंचीत असहमत. झूम केलेला सूर्य मस्त दिसतो ह्यात वादच नाही परंतू कधी कधी बाकीचा देखावा देखिल छान असेल तर छोटा सूर्य देखिल उठून दिसतो. थोडक्यात, 'संपूर्ण चित्र' हे कसे कंपोज केले आहे ह्यावर अवलंबून आहे असे मला वाटते
उदा खालिल चित्रे पहा. दोन्हीही चित्रे जालावरुन साभार घेतली आहेत.
डिजीटल झूम वापरल्यास चंद्राची चित्रे (इतकी स्पष्ट) येणार नाहीत ह्याच्याशी सहमत!
26 Aug 2008 - 2:19 am | धनंजय
सूर्य जर "उत्सवमूर्ती" असेल, तरच ३५-मिमि कॅमेर्यावर ३०० तरी झूम लागेल.
वरील उदाहरणांत "उत्सवमूर्ती" खडक आणि बोटी आहेत. पहिल्या फोटोत तर सूर्य अति एक्स्पोझरने जाळला आहे - त्यामुळे तो एक तपशील-नसलेला संदर्भबिंदू आहे, हे स्पष्टच आहे. दुसर्या फोटोत पॅनोरामा घेऊन सूर्य लक्ष ठेवण्याचे मध्यवर्ती केंद्र नाही, हे लक्षात येते. (१/३ वर काय आहे? क्षितिजरेषा आणि एका होडीचे शीड...)
(क्षितिजाजवळील) सूर्य किंवा चंद्राकडे बघत असताना ते आहेत त्यापेक्षा मोठे भासतात, हा दृष्टिभ्रम आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. "नॉर्मल" (५० मिमि) भिंगाने चित्र टिपले तर टिपलेले "खरे" चित्र मनातील "भ्रामक" चित्रापेक्षा वेगळे (कंटाळवाणे) असते. मनातला ठसाच लक्षवेधक/सौंदर्यपूर्ण असतो, त्यामुळे फोटोने तो भ्रम निर्माण करायचा प्रयत्न करावा. म्हणून बर्यापैकी जास्त झूम लागतो.
26 Aug 2008 - 2:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला S3 IS वापरताना डीजीटल झूम + IS वापरून चांगले फोटो नाही मिळाले, पण फक्त ऑप्टीकल झूमनेच काढले आहेत. पण मला ईश्वरीच्या फोटोत डीजीटल झूम वापरलंय असं नाही वाटत.
>> शिवाय तुमच्या कॅमेर्याच्या इमेज-स्टॅबिलायझेशनचाही तुम्हाला फायदा झाला. या प्रकारे चंद्राचा फोटो तुम्ही काढू शकणार नाही, असे माझे भाकीत
>> आहे
बरोब्बर! पूर्ण ऑप्टीकल झूमनेही चंद्र हलतो IS वापरूनसुद्धा! (चंद्रग्रहणाचे काही फोटो त्यामुळे खराब झाले) :-(
कारण आपली पृथ्वी फारच भरभर फिरते स्वतःभोवती!
26 Aug 2008 - 10:35 pm | धनंजय
ईश्वरी यांच्या कॅमेर्यात सर्वात कमी अँगल (कर्णात - डायागोनलमध्ये) ~२.५ ते ३ डिग्री येतो (३५ मिमि एक्विव्हॅलंट फोकल लेंग्थ ४३२ मिमि आहे). सूर्याचे कोनीय आकारमान १/२ डिग्री आहे. त्यामुळे ऑप्टिकल झूमने फारफारतर सूर्याचा आकार फोटोच्या एक चतुर्थांश येऊ शकेल. शेवटच्या फोटोत सूर्य त्यापेक्षा खूपच मोठा आहे (फोटोचा साधारणपणे अर्ध्या कर्ण व्यापला आहे.) म्हणून वाटते की डिजिटल झूम असावा.
पळा आता : दुर्बीणवालीशी ऑप्टिक्सबद्दल हुज्जत घालणे म्हणजे महा डेंजर काम...
26 Aug 2008 - 10:39 pm | कोलबेर
फोटो क्रॉप केलेला देखिल असू शकतो की ;) बाकी मांडलेले गणित पाहून (डोक्यावरुन गेले तरी) थक्क!!
27 Aug 2008 - 12:02 am | वैद्य (not verified)
बाकी मांडलेले गणित पाहून (डोक्यावरुन गेले तरी) थक्क!!
ज्याला गणित येते, त्याला सर्व काही येते. असे आम्ही नाही, स्वातीताईंचे आजोबा म्हणतात. आम्ही सहमत आहोत.
-- वैद्य
27 Aug 2008 - 5:19 am | ईश्वरी
ऑप्टिकल झूम वापरला आहे . ४- एक्स. ते आधी सांगायचे राहिले.
मॅक्स झूम ने इमेज शेक होते. त्यामुळे २-३ फोटो ब्लर किंवा हलल्यासारखे आले . ते इथे टाकले नाहीत.
बाकी धनंजयांनी मांडलेले गणित पाहून मीही थक्क ! :)
>>फोटो क्रॉप केलेला देखिल असू शकतो की
नाही क्रॉप केला नाहिये. जसे फोटो आलेत तसेच इथे टाकले आहेत. त्यावर कसलेही एडिटिंग केले नाही.
ईश्वरी
27 Aug 2008 - 1:41 pm | ऋषिकेश
बाकी मांडलेले गणित पाहून (डोक्यावरुन गेले तरी) थक्क!!
मी ही (अनेक वेळेप्रमाणे यावेळीही) थक्क!
असे थक्क करणे हीच तर धनंजयची ओळख आहे. त्यांनी थक्क केले नाहि तरीही थक्क व्हायला होते आजकाल :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
27 Aug 2008 - 2:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
... सर्वात कमी अँगल (कर्णात - डायागोनलमध्ये) ~२.५ ते ३ डिग्री येतो (३५ मिमि एक्विव्हॅलंट फोकल लेंग्थ ४३२ मिमि आहे). सूर्याचे कोनीय आकारमान १/२ डिग्री आहे...
कूल ... आय एम इंप्रेस्ड!
मी पण ते गणित केलं नव्हतं ... माझ्याकडे एस ३ आहे आणि त्यात आणि ईश्वरींच्या कॅमेय्रात फार काही फरक नाही (इथे महत्त्वाच्या असणाय्रा गोष्टींमधे) आणि मी सूर्याचे, चंद्राचे फोटो काढून झाले आहेत म्हणून ... माझं ऍनॅलिसिस सेमी-ऍनॅलिटीकल होतं.
पळा आता : दुर्बीणवालीशी ऑप्टिक्सबद्दल हुज्जत घालणे म्हणजे महा डेंजर काम...
=))
आमी काय बांदत नाय ते, आमी फक्त वापरते. आनी मी आता रेडो दूर्बीन वापरते, त्यात एक नसता भिंग, त्यात ३०-३० असतात येकदं!
अदिती
अवांतर: फोटो क्रॉप केलेला असणार हा माझाही अंदाज होता (पण आता थोडा उशीर झाला त्यामुले सिंगल ऑथर्ड पेपर नाही येणार) ;-)
(१_६ आळशी) अदिती