मुली शोधाण्यातले frustration
नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे
माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे
पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे )
मुलगी type १
डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :(
मुलगी type २
मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
२-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे
लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद
मुलगी type ३
engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता
त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked
उरलेल्यांपैकी बर्याच
matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार
दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे
जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत???
(पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
प्रतिक्रिया
1 Jan 2013 - 9:13 pm | रामदास
आधीच तो धरूनी शस्त्र करी मी या अवस्थेत आहे
2 Jan 2013 - 12:11 am | पिवळा डांबिस
हा हा हा!!!!
=)
5 Jan 2013 - 10:35 pm | टवाळ कार्टा
अजुन तरी नाही ;)
1 Jan 2013 - 4:29 am | दीपा माने
टवाळा, कुठल्याच लग्नाळु मुलीला दुसर्या मुलीचा दाखला देऊन 'अशी मुलगी हवी' हे आवडणार नाही. ती खरच बोलण्यात straight forward असेल तर म्हणेल की, 'मग मुक्ता बर्वेशीच का लग्न करत नाही?'. कधीही एका स्त्रीची दुसर्या स्त्रीशी तुलना करु नका, विषेशतः तुम्हाला "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" अशी स्त्री बायको म्हणुन हवी असेल तर. तेव्हा लग्नासाठीचे ढोबळ गुण जमले तर लग्न करुन टाका. कारण सहजीवनातली तडजोड लग्नानंतर एकमेकांच्या नकळत होतच रहाते.
1 Jan 2013 - 12:10 pm | बाबा पाटील
कशाला एव्हड चिवडत बसतो टवाळा,जी पोरगी आवडली तिला स्पष्ट तु कसा आहेस त्याची कल्पना दे,ते तिला पसंत असेल तर हो म्हनेल्,नाही तर नाही..संपला विषय...
1 Jan 2013 - 1:28 pm | अभिजित - १
Thinking out of the box does not work everywhere !!
वडिल धारि लोकन्चे ऐका. And follow their way. You wanted to have thrill in love / getting loved by some girl. Alas .. Time has passed.
1 Jan 2013 - 2:01 pm | टवाळ कार्टा
अर्रे काय बाजार लावलाय
फक्त एकीला "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" याचा अर्थ समजला नाही तर तीला'च' फक्त मु.ब. चे उ.दा. दिलेले
चायला सगळे असे बोलत आहेत की जसा मी प्रत्येकीलाच सेम सांगतो :(
1 Jan 2013 - 4:59 pm | कवितानागेश
म्हणजे तुम्ही प्रत्येकीला वेगळ्या अपेक्षा सांगताय की काय??
त्यामुळेच त्या सगळ्या कन्फ्युज होतायत... :P
2 Jan 2013 - 4:42 am | इनिगोय
खिक् :))
2 Jan 2013 - 11:32 am | sagarpdy
=))
1 Jan 2013 - 5:25 pm | निनाद मुक्काम प...
टवाळा एक सल्ला
माझ्या अनेक मित्रांचे वधू संशोधन तुझ्याच मार्गाने झाले ते पाहून मला जे सुचले ते सांगतो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी एकदा फक्त आभासी जगतात वार्तालाप कर. ज्यात बी युवर सेल्फ .
त्यानंतर त्या मुलीला तुझ्या मध्ये रस असेल तर तुम्ही सरळ प्रत्यक्ष भेटा.
आणि पहिल्यांदा त्या मुलीशी सविस्तर स्वतः विषयी बोल आणि तिला ही बोलू दे
तुझे गुण दोष जे तुला तुझ्यात आढळतात ते तिला स्पष्ट सांग
तुझ्या गुणदोषांसहित जी तुला होकार कळवेल ती तुला खर्या अर्थाने योग्य पत्नी
म्हणून संसारात योग्य ठरेल.
माझ्या एका चुलत भावाला अश्या प्रत्यक्ष भेटीत मुलीने लग्नानंतर तुझे पुढचे बेत काय अश्या अर्थी काही प्रश्न विचारले , ह्यापैकी बहुतांशी प्रश्नाची उत्तरे त्याने आई बाबांना विचारून अश्या अर्थी दिली आणि त्या मुलीने त्याला नाकारला
कारण काय तर स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही.
आता माझ्या भावाच्या मते तो आई वडिलांसह कायम राहणार असल्याने एक कुटुंब म्हणून कोणताही निर्णय आजपर्यंत त्याने आई वडिलांसह एकत्र घेतला होता.
पुढे त्याला त्याच्या अनुरूप जोडीदार मिळाली.
सध्या हे गाणे ऐक ,
आणि शब्दांकडे विशेष लक्ष दे
आजकालच्या गाण्यात संगीत महत्त्वाचे आणि शब्द दुय्यम झाले आहेत.
5 Jan 2013 - 11:14 pm | टवाळ कार्टा
>>तुझे गुण दोष जे तुला तुझ्यात आढळतात ते तिला स्पष्ट सांग
जो मुलगा ज्या वेळी इंप्रेशन पडायचे त्या वेळी स्वताचे दोष सांगतो (भले त्यामागचा हेतु चांगला असो, किंवा मुलगा कितीही चांगला असो) अशा मुलांना मुली "बावळट" समजतात
>>तुझ्या गुणदोषांसहित जी तुला होकार कळवेल ती तुला खर्या अर्थाने योग्य पत्नी
>>म्हणून संसारात योग्य ठरेल.
अजुनपर्यंतचा (स्वताचा आणि मित्रमंडळींचा) अनुभव हाच आहे की अरेंज लग्नात मुली पैसा, स्वताचे घर असणारा, शक्यतो लहान भावंडे नसलेला (जेणेकरुन जबाबदार्या नसणारा), घरच्यांची पसंती, good looking या प्रमाणे मुलगा निवडतात...स्वभाव, आवड-निवड वगरे गोष्टी "adjustments" मधे मोडतात
>>माझ्या एका चुलत भावाला अश्या प्रत्यक्ष भेटीत मुलीने लग्नानंतर तुझे पुढचे बेत काय अश्या अर्थी काही प्रश्न >>विचारले , ह्यापैकी बहुतांशी प्रश्नाची उत्तरे त्याने आई बाबांना विचारून अश्या अर्थी दिली आणि त्या मुलीने त्याला >>नाकारला
>>कारण काय तर स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही.
>>आता माझ्या भावाच्या मते तो आई वडिलांसह कायम राहणार असल्याने एक कुटुंब म्हणून कोणताही निर्णय >>आजपर्यंत त्याने आई वडिलांसह एकत्र घेतला होता.
म्हणजे त्या मुलीने नकार देताना तुझ्या भावाशी ओपनली बोलणे केले नाही...तसे झाले असते तर कदाचीत त्या दोघांना एकमेकांची बाजु समजुन घेता आली असती...पण मुलगी कितीही शिकलेली असो "हे असेच आहे"
1 Jan 2013 - 6:20 pm | अमोल केळकर
लग्न जमण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा :)
अमोल केळकर
आम्हाला इथेही भेटू शकाल
1 Jan 2013 - 6:27 pm | प्रकाश घाटपांडे
मुलीच्या घरच्यांनी/मुलीने पत्रिका जुळती आहे की नाही याचा आग्रह धरला तर काय करणार?
5 Jan 2013 - 11:19 pm | टवाळ कार्टा
माझा स्वताचा पत्रिकेवर अजिबात विश्वास नाही (ज्यांचा आहे त्यांना माझा एकच प्रश्न...स्वताच्या मुलांना शाळेत घालताना मुहुर्त बघता का? किंवा जॉब इंटर्व्हुला जाताना , कंपनी मधे रुजु होताना मुहुर्त बघता का?)
>>मुलीच्या घरच्यांनी/मुलीने पत्रिका जुळती आहे की नाही याचा आग्रह धरला तर काय करणार?
माझी काहीच हरकत नाही
1 Jan 2013 - 6:31 pm | निनाद मुक्काम प...
केळकर साहेब नुसत्या शुभेच्छा काय देता
तुमच्या अनुदिनी मध्ये लग्न लवकर जमण्यासाठी स्तोत्र दिले आहे ते टवाळास द्यावे.
ह्या वर्षीची आमची सकाळ तुमच्या अनुदिनी मुळे एकदम धार्मिक वातावरणात पार पडली त्याबाबतीत तुम्हाला धन्यवाद
1 Jan 2013 - 6:34 pm | अनन्न्या
हे एवढे सल्ले वाचल्यावर वाटलं, थोडी घाईच झाली. पण काय करणार, तेव्हा मिपा नव्ह्ते. पुढच्या जन्मासाठी सल्ले वाचून ठेवलेत.....
1 Jan 2013 - 6:58 pm | यशोधरा
जाम विनोदी धागा आहे! :D
17 Feb 2013 - 10:12 pm | जेनी...
:-/
शी बै :-/
बिचार्याला मुलगी मिळेना .. अन हिला विनोदी वाटतय सग्गळं :-/
18 Feb 2013 - 10:46 am | श्री गावसेना प्रमुख
1 Jan 2013 - 9:31 pm | रामदास
(बहुतेक) वामन चोरघड्यांनी लिहीलेली एक गोष्ट आठवली ती थोडक्यात सांगतो.
गावातला एक मास्तर असतो. त्याची वहाण वापरून वापरून जुनी झाली असते. शाळेबाहेरच्या चांभाराकडे खरेदी करायला जातो. मास्तराची अपेक्षा असते तशीच वहाण त्याच्याकडे असते. बरीच घासाघीस होते. भाव जमत नाही. मास्तर चांभाराला सांगतो "दुपारी तालुक्याला जातोय बघ याच भावात चांगली व्हाण घेतो की नाय" तालुक्याला गेल्यावर जी वहाण पसंत पडते ,भाव जमत नाही. दुसर्या दुकानात भाव बरे पण वहाण पसंत पडत नाही. दहा दुकानं फिरून मास्तर जुनीच वहाण घालून परत येतो. एश्टीतून उतरता उतरता वहाणेचा अंगठा प्राण सोडतो. आली का पंचाईत ? फिरून मास्तर शाळेबाहेरच्या चांभाराकडे येतो आणि सकाळी नाकारलेली वहाण मुकाट विकत घेतो.गोष्टीच्या शेवटी लेखकांनी एक तात्पर्य सांगीतले आहे ते असे की शंभर मुली बघणार्या मुलाचे लग्न शेवटी यथातथा मुलीशीच कसे होते ते आज मला कळले.
यातून तुम्हाला उपदेश काहीही देत नाही पण सांगायचं इतकंच की अंगठा तुटेपर्यंत थांबू नका.
1 Jan 2013 - 9:36 pm | रेवती
दिवस बदलल्याचे द्योतक म्हणजे तुमचा प्रतिसाद. ;) आज एका होऊ घातलेल्या वराला तुम्ही हे सांगताय. पूर्वी हाच सल्ला मुलींना मिळत असे. "पहिल्या वरा तूच बरा."
2 Jan 2013 - 5:46 am | खान
पण त्यांनी वहाण नाकारल्याचं कुठेच म्हटलं नाही. वहाणाच त्यांना आंगठा दाखवत आहेत :(
बायदवे मुलींची तुलना वहाणांशी केल्याबद्दल तुमचा निषेध!! (माझ्याकडून द्विशतकासाठी मदत)
2 Jan 2013 - 8:56 am | पिवळा डांबिस
बायको ही नोकरीसारखी, काय समजलेत?
दुसरी चांगलं प्रोफाईल देते म्हणुन पहिली सोडण्यात काहीएक अर्थ नसतो.
शेवटी सगळ्या नोकर्या आणि सगळ्या बायका सारख्याच!
काय समजलास वात्रटा?
1 Jan 2013 - 11:48 pm | संजय क्षीरसागर
2 Jan 2013 - 4:06 am | काळा पहाड
ओ नका ओ, का बिचार्याची वाट लावायला निघालाय? टवाळा बाळा, असले सल्ले तू अजिबात ऐकू नको.
2 Jan 2013 - 11:46 pm | ५० फक्त
मन बिन उघडं करा ते ठीक आहे, पण इथला आयडी अन पासवर्ड नका सांगु. , लग्नाआधी घरच्या संगणकाची हार्ड डिस्क स्वच्छ करुन घ्या, मोबाईलमधलं कार्ड फॉर्मट करुन घ्या. असो.
2 Jan 2013 - 12:50 am | मराठे
"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" हे सगळे 'गुण' बघून लग्न केल्यानंतर हेच तुम्हाला 'अवगुण' न वाटो म्हणजे झाले.
2 Jan 2013 - 9:05 am | पिवळा डांबिस
"मुकेपण" हा बायकोत सगळ्यात मह्त्वाचा गुण आहे असं आमचे एक मावसआजोबा सांगायचे!!!
आता गेले ते, तेंव्हा आता त्यांच्याविरूद्ध पाशवी मोर्चा काढण्यात काही अर्थ नाही!!!
:)
बाकी 'वात्रट कार्ट्याला' आपण झक मारली आणि हा आयडी घेतला असं झालं असेल!!
अरे तुझा तो फक्त आयडी आहे, इथे वीस हजार मिपाकर तोच गुण घेऊन मौजूद आहेत!!!!
:)
2 Jan 2013 - 10:07 am | आनन्दिता
रोझ विथ रोझ ही कमेंट वाचुन ती कन्या मनातल्या मनात ' टवाळच दिसतोय कार्टा ' असं म्हणाली असेल काय.??
एक निरागस अंदाज आपला..!!
2 Jan 2013 - 10:23 am | पिवळा डांबिस
त्याने टवाळ हा शब्द वापरला हेच चुकलं असावं...
म्हणुन आम्ही वात्रट हा शब्द सुचवला....
वात्रट (किंवा चावट)मुलं आवडतात कन्यांना असं आम्हाला वाटतं....
आमची ही तर आम्हाला सदैवच वात्रट म्हणते!!!!
:)
2 Jan 2013 - 4:40 pm | काळा पहाड
कलियुग, दुसरं काय! 'हे' वरून 'वात्रट', किती ही अधोगती!! बर हे फक्त प्रायव्हेट मध्ये की पब्लिक मधे पण? आमचे वात्रटराव दिसले का कुठे म्हटल्यावर समोरचा आडवाच!!!
3 Jan 2013 - 1:02 am | आनन्दिता
पिडां काका हे ईतकं सगळं माहित असुन तुम्ही तुमचं नाव डांबिस का ठेवुन घेतलय..?
पिवळा चावट असं का नाही ठेवलं? :)
3 Jan 2013 - 1:31 am | पिवळा डांबिस
हॅ कैच्या कै! आम्ही जिथे चावटपणा करतो तिथे पिवळा डांबिस नांव लावत नाय काही!!!!!
:)
आम्ही मिपावर चावटपणा करायला येत नाही, इरसाल डांबिसपणा करायला येतो. म्हणून ते तसं नांव!!
:)
3 Jan 2013 - 9:42 am | इरसाल
काका मी आलो.
7 Jul 2016 - 2:54 am | सही रे सई
हसून हसून मेले .. फुटले.._^_
7 Jul 2016 - 10:16 am | वाल्मिक
मग
लग्नाचा बाजार
नक्की बघा
http://www.misalpav.com/node/36586
5 Jan 2013 - 11:22 pm | टवाळ कार्टा
कधीच नाही
7 Jul 2016 - 6:11 pm | पियू परी
"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" हे सगळे 'गुण' बघून लग्न केल्यानंतर हेच तुम्हाला 'अवगुण' न वाटो म्हणजे झाले.
>> +१
शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे गुण खरंच असले मुलीत तर चालणार आहेत का ते विचारून घ्या. आमच्याकडे नवर्याला हे गुण आवडले होते पण आता लग्नानंतर त्याच्या आयशीबापाशीला चालत नसल्याने मलाच बदलायला सांगतो दरवेळी. 'जब वी मेट' मधली मीत सगळ्यांना प्रेयसी म्हणून हवी असते. पण लग्न केल्यावर तीची अलका कुबल व्हावी अशीच अपेक्षा असते सगळ्यांची (निदान स्वानुभवावरून माझा तरी असाच समज झाला आहे).
7 Jul 2016 - 7:23 pm | टवाळ कार्टा
यावर एक कच्कून वैयक्तिक प्रतिसाद मारता आला अस्ता मला :)
जे तुम्च्याकडे झाले ते माझ्याकडेही होईलच असे का वाटते?
8 Jul 2016 - 8:07 am | अजया
ही पण नाण्याची एक बाजू आहेच टकोजी.तिने लिहिलेल्या प्रमाणे घरं मीही पाहिली आहेत.अगदी जाॅली वाटणारे आईबाप साबासाबु म्हणून टोटली वेगळी माणसं असू शकतात.हे तू पर्सनल लावून घेतो आहेस.पण ही पण एक नेहमी आढळणारी वस्तुस्थिती आहे.तुझ्याकडे असेल असे नाही.पण अशी माणसं असतात.डबल स्टॅन्डर्ड्स असणारी.
14 Jul 2016 - 4:20 pm | पियू परी
यावर एक कच्कून वैयक्तिक प्रतिसाद मारता आला अस्ता मला :)
जे तुम्च्याकडे झाले ते माझ्याकडेही होईलच असे का वाटते?
>> मी माझे वैयक्तीक लिहिले आहे. तुमच्याकडेही असेच होईल असे म्हणत नाहीये. पण सासुसासरे झाल्यावर स्वतःच्याच आईवडीलांचे वागणे बघून थक्क झालेला मित्र आहे. आपले आईवडील आपल्या बायकोशी असे का वागतात हे त्यालाच कळेना झाले होते. आता तुम्ही माझा मित्रच मुर्ख होता वगैरे म्हणणार असाल तर इथेच थांबुयात. पण तुमच्या "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" ह्या अपेक्षा आणि तुमच्या पालकांच्या सुनेकडून असलेल्या अपेक्षा सेम आहेत ना किंवा एकमेकांना पुरक आहेत ना हे पडताळून पाहायला सांगणे म्हणजे वैयक्तीक अपमान वगैरे होत असेल तर ___/\___ माफ करा.
अगदी जाॅली वाटणारे आईबाप साबासाबु म्हणून टोटली वेगळी माणसं असू शकतात.हे तू पर्सनल लावून घेतो आहेस.पण ही पण एक नेहमी आढळणारी वस्तुस्थिती आहे.तुझ्याकडे असेल असे नाही.पण अशी माणसं असतात.डबल स्टॅन्डर्ड्स असणारी.
>> अनुमोदन.
14 Jul 2016 - 5:02 pm | टवाळ कार्टा
बरं...मग मुलगी पहायला जाताना तिला काय विचारावे आणि मुलगी फायनल कशी करावी याबाबत सांगता का?
14 Jul 2016 - 6:06 pm | पियू परी
तुमच्या आणि तुमच्या पालकांच्या अपेक्षा एकमेकांना पुरक आहेत का हे पडताळतांना पाहायला गेलेल्या मुलीला काय विचारणार? मी सुचवलेली चर्चा तुम्ही त्याआधीच करणे अपेक्षित आहे.
तुम्ही आणि तुमच्या पालकांनी एकमेकांना लग्न होऊन घरात येणार्या मुलीकडून प्रत्येकाच्या काय काय अपेक्षा आहेत हे समोरासमोर बसून बोललात तर कदाचित भविष्यातले गुंतागुंतीचे प्रसंग टळतील असे सुचवायचे होते.
परंतु तुम्हाला जर राग आला असेल आणि त्यामुळे तुम्ही मुद्दाम वाकड्यात शिरणार असाल तर इथेच थांबते.इतर संस्थळांप्रमाणे इथेही स्वप्रतिसाद संपादनाची सोय असती तर माझे आधीचे प्रतिसादही काढून टाकले असते. शुभेच्छा !!
14 Jul 2016 - 6:49 pm | टवाळ कार्टा
अर्र...तसे नाही...जर समजा माझ्या पालकांच्या अपेक्शा माझ्या अपेक्शांसारख्याच असतील तर पुढे काय असे विचारायचे होते
14 Jul 2016 - 6:59 pm | मोदक
"पुढे काय" म्हणजे मुलगी फायनल कशी करावी हे का?
14 Jul 2016 - 8:04 pm | अजया
मुलाच्या पालकांच्या आणि मुलीच्या अपेक्षा जुळणे पण महत्त्वाचे असते! कारण लग्न एका माणसाशी झालं तरी पूर्ण परिवाराशी त्यासोबत जुळवुन घेणे महत्त्वाचे असतेच. मुलं समहाऊ अॅडजस्ट करतात.दोन्हीकडून थपडा खात! पण हे टाळायचे असेल तर तिचे करिअर,तिच्या आवडी,ती घरात काय करु शकते ,न करु शकत असल्यास जे पर्याय असतील उदा पूर्ण वेळ कामासाठी, स्वयंपाक इ साठी मदत घेणे इ निर्णय तिला घेताना सासरचे लोक किती साथ देऊ शकतात हे जमणेदेखील महत्त्वाचे आहे.नाहीतर माझ्या आईने नोकरी करुन सणवार, चारी ठाव स्वयंपाक केलाय मग हिला न जमायला काय झालं टाइप अॅटिट्युड प्राॅब्लेम घरात सुरु होऊ शकतात.याबद्दल वेळीच बोलणे इष्ट असते.लग्नानंतर मला घरकाम अजिबात आवडत नाही.मी करणार नाही असे सांगितल्यास घरात कल्चरल शाॅक बसु शकतो!
तिला तिचे छंद इ जोपासायला किती प्रोत्साहन असू शकणार आहे.लग्न ठरताना आमच्याकडे सगळे ओपन माइंडेड म्हणणारे लोकच ती कुठे प्रोजेक्ट साठी,ट्रेक इ साठी निघाली की डोक्यावर आठ्या घालुन पाहू शकतात!
मुलाच्या मैत्रिणीचे कौतुक असणाऱ्या आयांना सुनेचे मित्र घरी आलेले आवडत नाहीत!
किती उदाहरणं इतक्या वर्षात निरनिराळ्या मैत्रिणींची पाहिली आहेत.लग्नाआधी बोलण्याच्या गोष्टी फक्त मुलीशीच नाही तर तिच्या अनुषंगाने पालकांच्या अपेक्षा जाणून घेणेही आवश्यक आहेच.प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर!!
14 Jul 2016 - 9:06 pm | टवाळ कार्टा
अग्दी अग्दी...पण काय करायला हवे यापेक्षा कसे करावे हे कोणी सांगेल का
14 Jul 2016 - 9:24 pm | अजया
कसे म्हणजे? बो लु न!!
14 Jul 2016 - 10:44 pm | टवाळ कार्टा
काय बोलुन
14 Jul 2016 - 10:50 pm | अजया
वर दिलेले वाच.का तुझ्या कांदेपोह्याला प्ले बॅक द्यायला येऊ?
14 Jul 2016 - 10:54 pm | टवाळ कार्टा
एग्झ्यॅक्ट काय प्रश्न विचारायचे ते सांगा की
14 Jul 2016 - 11:01 pm | सूड
14 Jul 2016 - 11:05 pm | टवाळ कार्टा
तू गप रे....इतके सल्ले देणार्यांपैकी कोणाला खरोखर उपयोगी माहिती देता येते का ते बघतो आहे
14 Jul 2016 - 11:14 pm | अजया
ते सल्लेच उपयोगी माहिती आहे हे ही कळेना आणि म्हणे माझं लग्न करा =))))
दुसरा काहीतरी टाइमपास कर जा.
14 Jul 2016 - 11:33 pm | टवाळ कार्टा
मि मुलीला काय प्रश्न विचारायचे ते विचारतोय
15 Jul 2016 - 3:54 pm | चिनार
टका..
चार वर्ष झाले हा धागा काढून, अजून तुला मुलीला काय प्रश्न विचारायचे हे सुद्धा कळले नाही ?????
तुला एक प्रेमळ सल्ला देतो...,
असा समज की तू लाख चांगले प्रश्न विचारलेस आणि मुलीने तुला हवे ते उत्तर दिले जवळजवळ सगळ्याच प्रश्नांचे. पण ती धडधडीत खोटं बोलत असली तर ?? कसं ओळखणार ?? (अर्थात हे उलट पण होऊ शकते म्हणजे तू सुद्धा खोटं बोलू शकतोस. आता कोणी कशाला खोटं बोलेल असे बाळबोध प्रश्न तुला पडत नसतील अशी आशा करतो.
या प्रश्नोत्तरांनी काहीही होत नाही. संवाद होणं महत्त्वाचं. अर्धा-पाऊणतास एखाद्याशी बोलल्यावर बऱ्याच गोष्टी क्लियर होतात.
14 Jul 2016 - 11:55 pm | स्रुजा
तुझ्या इन्स्टिन्क्ट्स आणि गट फीलिंग वर हे अवलंबुन असणार आहे. तू तुझ्या आई बाबांना नीट ओळखतोस. काही स्वभाव विशेष लपत नाहीत. तिला ही तूच पहिल्यांदा घरात नीट ओळखणार आहेस, सो हे तू कसं हाताळतोस त्यावर अवलंबुन राहिल.
कांपोहे च्या कार्यक्रमात काय प्रश्न विचारणार तू यावर? हे सगळं आफटर मॅथ आहे आणि ते तुझ्या आतापर्यंत च्या व्यक्तिमत्वावर आणि तिच्या ही व्यक्तिमत्वावर अवलंबुन राहणार आहे.
एक मात्र सल्ला मला पटला नाही, पियु म्हणते ते खरं आहे की आई बाबांच्या अपेक्षा पण जुळल्या पाहिजेत पण ते सोयीस्कर असलं तरी रेलेव्हंट असेल च असं नाही. आज काल अनेक जण बाहेर च राहतात, नोकरी निमित्ताने देशा बाहेर किंवा शहराबाहेर वगैरे. रोजचं एकत्र राहणं नसलं की बर्याच गोष्टी इर-रेलेव्हंट होऊन जातात. शेवटी संसार मुला-मुलीला करायचा आहे त्यामुळे नवरा बायको ला दोघांनी नोकरी करणं गरजेचं वाटत असेल तर आईबाबांच्या विरुद्ध मताला थोडं बदलता आलं पाहिजे. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. कुणाला घरगुती मुलगी हवी असते कुणाला बाहेर चं सगळं बरोबरीने हँडल करणारी हवी असते. मुलींच्या ही वेगवेगळ्या अपेक्षा असतात. आणि आता लग्नाला बरीच वर्षं झाल्यावर सांगते, जोडीदाराकडुनच्या अपेक्षा बदलत राहतात. वयानुसार, परिस्थितीनुसार दोघांच्या प्राधान्यक्रमात एकत्र फरक पडु शकतो आणि कधी ते दोघं मिळुन ठरवतात की आता एकानेच नोकरी करु किंवा आता देश सोड्न बाहेर बघु नोकरी किंवा बास झालं भारतात परत जाऊ वगैरे. दोघांनी एकमेकांना ही मुभा दिली आणि कपल म्हणुन जी काही परिस्थिती आहे ती अॅड्जस्ट केली की झालं. या बाबतीत दोघांचा भावनांक सारखा हवा. आई बाबांना (दोघांच्या) तेवढं समजावुन सांगता आलं पाहिजे. आपल्या मस्ट हॅव अपेक्षा कोणत्या आणि नाईस टु हॅव कोणत्या हे कळायला पाहिजे आणि कोणत्या अपेक्षा कुठल्या विभागात टाकायच्या त्या आधी कळायला पाहिजे. आणि ते लग्न करणार्याला इतर कुणाहीपेक्षा जास्त कळतं, अगदी आपल्या पालकांपेक्षा पण.
15 Jul 2016 - 12:57 am | खटपट्या
प्रतिसाद पटला, तरी टका यांचा प्रश्न अनुत्तरीतच राहीला. की मुलीला पहाण्याच्या कार्यक्रमात काय प्रश्न विचारावेत?
माझ्या मते मुलगी पहाणे या कार्यक्रमात मुलगा आणि मुलगी या दोघांना स्कोप फारच कमी असतो. खरं तर हा कार्यक्रम बाकीच्या लोकांसाठीच असतो. मुलगा कसा आहे किंवा मुलगी कशी आहे हे बाकीचे बघून घेतात. जर फीजीकल पसंती झाली असेल आणि बाकीच्या अपेक्षा जुळत असतील तर मुलगा आणि मुलीने सरळ बाहेर भेटूनच आपापसात अपेक्षांबद्द्ल चर्चा करावी. अशा बाहेरच्या भेटीत मुलगी आणि मुलगा नि:संकोचपणे बोलू शकतात. आता अशा भेटीत काय प्रश्न विचारवे असे विचाराल तर, तीच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, तीच्या करीअरबद्द्ल तीचे काय विचार आहेत, वेगळे रहाण्याबद्दल काय विचार आहेत, खाण्यापिण्याच्या आवडी, तीचे मित्रमंड्ळ, तीचे आवडते विषय, आवडते कार्यक्रम, तीला फावला वेळ (तुम्ही दीलात तर) कसा घालवासा वाटतो, बाकीच्या बाबबतीच जसे की राजकारण, समाजकारण, कॉर्पोरेट जगत, सोशल मीडीया याबाबतीत तीची काही ठाम मते आहेत का, तीला वाचायला काय आवडते असे प्रश्न विचारुन तुम्ही तीच्या व्यक्तीमत्वाबद्द्ल जाणून घेउ शकता कींवा कमीतकमी अंदाज बांधू शकता.
शेवटी कीतीही अनुरुप शोधण्याचा प्रयत्न केलात तरी दोघांना प्रचंड अॅडजस्ट करावेच लागते हे ध्यानात असुद्या. स्वभाव रोजच्या सवयी, वैयक्तीक स्वच्छता, दैनंदीन खर्च, एकमेकांना वेळ देणे, दोघांनी एकमेकांच्या मतांचा आदर राखणे, इगो सांभाळाणे हे बाकीचे कळीचे मुद्दे असतातच.
शेवटी मुलगी तीचे घर सोडून संपूर्ण अपरीचीत लोकांबरोबर रहायला येणार असते हे ध्यानात घेउन आपण अॅडजस्ट झालो तर बर्याच गोष्टी सुरळीत होतात.
15 Jul 2016 - 1:24 am | स्रुजा
अजया आणि इतरांच्या सल्ल्यावर तो तपशील विचारत होता म्हणुन त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद लिहीला की या तपशीलात वेळेआधी आणि नवरा बायको सोडुन इतरांना सल्ले देणं शक्य नसतं, त्यांनी शक्य केलं तरी त्या सल्ल्याच्या मर्यादा ओळ्खुन असाव्यात नवरा बायको ने. हे एक, दुसरं असं की बघण्याच्या कार्यक्रमात समोर आलेलं फिनिश्ड प्रॉडक्ट नसतं. वेळोवेळी माणसं प्रगल्भ होत राहतात, एकमेकांच्या साथीने बदलतात , एकमेकांच्या आवडी निवडी जोपासतात, अंगीकारतात त्यामुळे त्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे महत्त्वाचं आहे. माझ्या मते व्यक्ती खुल्या मनाने बदल स्विकारु शकते का, नैतिक बैठक पक्की आहे का, वैचारीक बैठक पक्की आहे का आणि आहेत ते गुण आपल्याला पुरक आहेत का हे नीट बघुन घ्यावं. बाकी शिक्षण, जात-पात, रंग- रुप, वय, कौटुंबिक जडण घडण हे आधी बघुन च पुढे पाऊल टाकलेले असते त्यामुळे पुढच्या गोष्टी महत्त्वाच्या.
15 Jul 2016 - 1:26 am | स्रुजा
हे अगदी मान्य, फक्त याला मी अॅडजस्ट होणं मानत नाही, हेच माझ्या मते एकमेकांबरोबर प्रगल्भ होणं ( ग्रो वुइथ ईच आदर)
15 Jul 2016 - 9:15 am | प्रमोद देर्देकर
जाऊ दे टक्या तु आपली भीष्मप्रतिज्ञा घे बघु... कसा.
उगा डोक्याला शॉट नको आयुष्यभर...
15 Jul 2016 - 11:49 am | टवाळ कार्टा
जे सरळपणे विचारले त्याचे उत्तर सरळ आले तर तो फाउल धरत असतील माजघरात =))
15 Jul 2016 - 3:23 pm | अभ्या..
तुलाच कुणाला, काय, कसा प्रश्न विचारायचा कळत नाही अन दुसर्याला कशाला दोष देतो?
15 Jul 2016 - 3:32 pm | सूड
हे म्हणजे आता भरवताय ना मग चघळून पण द्या मी फक्त घशाखाली ढकलतो.
15 Jul 2016 - 3:56 pm | अजया
अगदी अगदी!
याला छापिल प्रश्नांची यादी हवीये!
15 Jul 2016 - 4:27 pm | टवाळ कार्टा
नाही देता येत?
15 Jul 2016 - 6:31 pm | मोदक
समजा इथे कोणी प्रश्नावली दिली तरी ती वाचण्यासाठी, समजण्यासाठी आणि त्या प्रमाणे प्रश्न विचारण्यासाठीही तुला मदत लागेलच. त्याचे वेगळे धागे काढणार की इथेच गाडी गाडी खेळणार आहेस?
15 Jul 2016 - 6:58 pm | पैसा
=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))
15 Jul 2016 - 7:25 pm | अजया
ठ्ठो =)))))
परफेक्ट!
15 Jul 2016 - 7:03 pm | स्रुजा
घ्या! एवढं सगळं रामायण झालं आणि म्हणे सीता कुणाचा बाप? ( सीता बाई होती हे पण नाही कळलं रे कर्मा)
15 Jul 2016 - 7:13 pm | पिलीयन रायडर
मी कधी दाखवायचा कार्यक्रम पाहिलेला नाही. पण इतरांचे अनुभव ऐकुन झालेले मत..
मुली बघणे म्हणजे हातात ५० प्रश्नांची प्रिंटाउट घेऊन मुलाखत घेतल्या सारखे प्रश्न विचारायचे नसतात हे तरी तुला माहिती असेलच. गप्पा मारायच्या असतात.. बोलण्या बोलण्यातुन साधारण माहिती आणि मतं जाणुन घ्यायची असतात. तसंही लग्नाआधी ४-५ वेळा भेटुन गप्पा मारल्या तरी जन्मभराची माहिती मिळत नसते. क्लिक व्हायला पाहिजे बास. माणुस.. त्याची मतं.. स्वभाव.. सवयी तशाही काळानुरुप बदलत असतात.
मी तुझ्याजागी असते तर आवडी निवडी विचारल्या असत्या. त्यातुन पुढे मग आयुष्यात काय करायला आवडेल हे विचारलं असतं. माझ्यासाठी धार्मिक मतं जाणुन घेणं महत्वाचं आहे, कारण मी नास्तिक आहे. माझ्यासाठी त्या व्यक्तिची स्त्रियांविषयक मतं जाणुन घेणंसुद्धा खुप महत्वाचं आहे. जसं की मला घरकाम, मुल सांभाळणे इ मुद्दे फक्त स्त्रीचीच जवाबदारी आहेत असं वाटत नाही. तेव्हा ह्यात माझ्या खांद्याला खांदा लावुन मदत करणारा नवरा मला हवा होता. मी लग्ना नंतर नाव बदलले नाही, मला तो चर्चेचाही मुद्दा वाटत नाही. पण तरीही हे आधीच मान्य असणारा नवरा हवा होता.
माझ्या घरच्यांना दिली जाणारी वागणुक हा माझ्यासाठी कळीचा मुद्दा होता. "मुलीकडचे" म्हणुन कायम पडती बाजु वगैरे काही कुणी घेणार नाही हे आधीच स्पष्ट करणे आवश्यक असते.
माझ्या सासरी बरीच विरुद्ध मते आहेत. पण तरी नवरा चार बाबतीत तडजोडीला तयार होता तर चार गोष्टीत त्याला माझ्याकडुन तडजोड अपेक्षित होती. जसं की गणपती-गौरी मध्ये पुढाकार. किंवा काही आर्थिक मुद्दे. त्यानी मला त्यांची कल्पना आधीच दिली. मलाही ते मान्य होतं.
ह्या व्यतिरिक्त पगाराची विभागणी - आर्थिक व्यवहार हा एक कळीचा मुद्दा असतो. तो बोलला गेलाच पाहिजे हे माझे मत. आयुष्यात दोघांचे गोल्स काय, कोण किती अॅम्बिशियस आहे ह्याची एकमेकांना कल्पना दिली पाहिजे. पुढे जाऊन मुलीचे आई वडील मुलीकडेच येऊन रहाणार असतील तर मुलाचे त्यावर मत काय हे आधीच मुलीला माहिती हवे. ज्याला हे मान्य नाही अशा माणसाला मी तरी बाकी ५६ गोष्टी असुनही नकार दिला असता. किंवा जिला नवर्याचे आई वडील सांभाळणं मान्य नाही तिला माझ्या नवर्याने नकार दिला असता.
काहींना नोकरी निमित्त फिरावे लागते. समजा उद्या तू लंडनलाच स्थायिक झालास तर स्वतःची नोकरी सोडुन यायची तयारी असलेली मुलगी तुला बघावी लागेल. किंवा मुलगी मोठ्या पदावर असेल तर तुझ्या नोकरीत तडजोडीची तुझी तयारी आहे का हे ही बघावे लागेल.
म्हणजे बघ आवडी निवडी, धार्मिक मतं, पालकांची जबाबदारी आणि अपेक्षा, घरकाम- स्वयंपाक, नोकरी, आर्थिक मुद्दे, मुल आणि त्याचे संगोपन असे काही महत्वाचे मुद्दे काढता येतील. ह्या सर्वांवर तिचे मत जाणुन घेणे आणि आपले तिला सांगणे हे दोन्ही महत्वाचे आहे.
अर्थात हे सगळं ठरवायला मला ५ वर्ष मिळाली. तुला त्यामानाने खुप कमी वेळ मिळेल. पण जे अत्यंत महत्वाचे आणि तडजोड न होऊ शकणारे मुद्दे आहेत ते आधीच स्पष्ट केले पाहिजेत. आता तुझ्या आयुष्यात ते मुद्दे काय हे तुलाच माहिती, ते इथे कोण कसं सांगणार?
शिवाय इतकं सगळं होऊनही पुन्हा आई-वडील वि. बायको अशी जुंपतेच. जनरेशन गॅप असतोच. तेव्हाही कमीत कमी त्रास होईल ह्या हिशोबाने तुझ्या अपेक्षा आई-वडील आणि बायको सगळ्यांना माहिती हव्यात. तशाच बायकोने सांगितलेल्या अपेक्षा सुद्धा तुझ्या घरच्यांना माहिती हव्यात. नवरा बायकोचेही पटेल्च असे नसते. कारण दाखवायचे कार्यक्रम म्हणजे काही लीगल अॅग्रीमेंट नाही की "असं कसं? तुम्ही हा प्रश्न विचारला नव्हतात दाखवायच्या कर्यक्रमात.. आता मी नाही मान्य करणार" असं आपण म्हणुन शकतो. आयुष्यात जे काही समोर येईल ते मिळुन निभवायची तयारी आहे का हेच सर्वात महत्वाचे.
म्हणून माझ्या मते किमान ४-५ भेटी झाल्याशिवाय लग्नाला होकार देउ नये. एका भेटीत तर काहीच फारसे कळणे शक्य नाही. पहिल्याच भेटीत आपण इतके मुद्दे नाही विचारु शकत... विचारु सुद्धा नयेत. आई वडीलांना इन्व्हॉल्व्ह न करुन घेता मुला मुलीने आधी शक्य तेवढे भेटुन - बोलुन घ्यावे आणि त्यात दोघांना काही पॉझिटिव्ह वाटलं तरच मग पालकांना भेटवावं. अर्थात हे माझ्या दिराच्या वेळेस मुली बघुन बघुन माझं मत झालंय.
मला आश्चर्य इतकंच वाटतं की मुली बघायला गेले ४ वर्ष झाले सुरवात करुनही तू असे बेसिक प्रश्न का विचारत आहेस?
15 Jul 2016 - 7:17 pm | मोदक
तुझ्याकडे भरपूर रिकामा वेळ आहे ते समजले होते. आता पटले सुद्धा. :)
(पळा..)
15 Jul 2016 - 7:32 pm | पिलीयन रायडर
स्वतःच घोडं गंगेत न्हालं म्हणुन दुसर्यांना असं बोलु नये हो मोदक!
15 Jul 2016 - 7:26 pm | स्रुजा
बयो त्याला प्रश्न दे प्रश्न ! आता तो विचारेन सगळं ठिक आहे पण तुमच्या माजघरात आर्थिक धार्मिक अपेक्षांचं काही स्क्रिप्ट असेल की नाही? ते द्या ! एक भेट झाल्यावर पुढची भेट कशी विचारायची तो डायलॉग दे. इथे आपण सगळे काय करायचं ते सल्ले देतोय, आपल्याला कसं करायचं हे माहिती नसल्याने टका चा धागा ४ वर्षं झाली तरी गाजतो आहे. :प
मी पण पळते आता. लंडनहुन कॅनडा फार लांब नाही यायचा एखादी दंबुक घेऊन.
15 Jul 2016 - 7:32 pm | पिलीयन रायडर
मी खरंच अपेक्षित प्रश्नसंच लिहावा म्हणते.
१. आपले नाव काय?
२. आपले वय काय?
३. आपले शिक्षण किती?
४. आपण मिपा सदस्य आहात का? असल्यास टका हा आयडी माहिती आहे का? (हो म्हणल्यास उठुन निघुन जावे!)
वगैरे वगैरे............
माजघरात सर्व वयोगटातल्या बाळांसाठी स्पुन फिडींग साठी रेडिमेड मटेरियल मिळेल!!
15 Jul 2016 - 7:39 pm | स्रुजा
आपले नाव नाही गं. ती जुनी पद्धत आहे. नीट वाच ना त्याचा लेख ..त्याला नवीन पद्धतीने लग्न करायचंय.
४था प्रश्न __________/\________ :) :) :) :) :) :) :) :) :)
15 Jul 2016 - 7:34 pm | टवाळ कार्टा
perfecto :)
15 Jul 2016 - 7:36 pm | अजया
अर्ध सहस्त्र प्रतिसादांबद्दल टकाला पिरालिखित १लाख अनपेक्षित चा प्रश्नसंच देऊन सत्कार करण्यात येत आहे.
15 Jul 2016 - 7:39 pm | सूड
चि. टक्कूमक्कूशोनुसाठी कन्यकेस विचारावयाच्या प्रश्नांची यादी!!
१) आपलं नाव काय?
२) आपलं शिक्षण किती?
३) आपणास स्वयंपाक करता येतो का?
असल्यास;
अ) शाकाहारी की मांसाहारी
ब) पारंपारिक की फास्टफूड
क) तुमच्याकडे भातात मीठ घालतात का? भात गुरगुट्या लागतो की फडफडीत? आमच्या घरी आंबेमोहरच चालतो, आपणास कोणत्या भाताची सवय आहे?
४) आपण मद्यपान आणि धुम्रपान करता का?
असल्यास;
अ) आवडता ब्रॅन्ड कोणता?
ब) महिन्यातून्/दिवसातून कितीवेळा
क) बीअरला आपण दारु मानता का? असल्यास संदर्भासहित स्पष्टिकरण द्या.
५) दाढी वाढवलेली आवडते की कसं?
६) पुरुषांच्या छातीवर केस असावे का?
अ) उत्तर हो असल्यास किती असावे?
ब) उत्तर नाही असल्यास, छातीवर केस असलेल्या बाप्यांनी काय करावं?
७) आपण दिवसातून कितीवेळा पाणी पिता? ३ ग्लासांपेक्षा कमी पित असाल तर प्रमाण वाढवा किंवा चांगला डिओ वापरा. मघापासून तुमच्या घामाचा दर्प येतो आहे.
८) घर स्वतःचे असल्यास इएमाय कसा वाटून घ्यायचा?
९) महिन्याच्या किराणा मालाचा खर्च कसा वाटून घ्यायचा?
१०) पाचतीनदोन, मेंढीकोट, भिकारसावकार यापैकी आवडता खेळ कोणता?
इच्छुकांनी आणखी भर घालावी...
15 Jul 2016 - 7:47 pm | पैसा
तुम्हाला कोणाला कळले नाहीये. त्याला आता हजारी धाग्याची स्वप्नं पडतायत. म्हणून गाडी गाडी खेळतोय. =))
15 Jul 2016 - 8:23 pm | टवाळ कार्टा
=))
8 Jul 2016 - 5:14 pm | गंम्बा
+११११११ पियु परी
2 Jan 2013 - 12:54 am | चित्रगुप्त
तुम्ही विणत असलेल्या ऑनलाईन धाग्याला लवकरात लवकर योग्य तो रतिसाद मिळो, ही शुभेच्छा.
2 Jan 2013 - 1:25 am | बॅटमॅन
रतिसाद =)) =))
5 Jan 2013 - 11:23 pm | टवाळ कार्टा
भारी ;)
2 Jan 2013 - 1:54 am | खटपट्या
नातेवाईकान्काच्या लग्नाला जाणे चालू करा. तिकडे जमायचा चान्स जास्त असतो. आणि समोरासमोर बोलताही येत.
2 Jan 2013 - 4:01 am | काळा पहाड
तुमचे वृषभ लग्न असावे असे दिसते. बादवे, तुम्ही कुठल्याही मुलीशी लग्न करा. ती तुमच्या डोक्यावर मिर्या वाटणार. फार honest, independent thinker वगैरे बघायला जाऊ नका. आ बैल मुझे मार अशी स्थिती व्हायची.
2 Jan 2013 - 6:24 am | श्रीरंग_जोशी
या विषयाचा मला शून्य अनुभव असल्याने त्याबाबत मी काहीच सांगू शकत नाही.
पण उमेदीच्या काळात मनासारखे न घडल्याने उद्विग्नता येण्याचे अनुभव मला चांगलेच आहे. अन माझ्या मते उमेदीच्या काळात असे अनुभव मिळणे हि फार उपयुक्त गोष्ट आहे. कारण त्यावेळी त्याचा धैर्याने सामना केल्यास आत्मविश्वास, संयम यासारखे महत्त्वाचे गुण विकसित होतात जे भावी आयुष्यात प्रचंड उपयोगी ठरतात.
माझ्या बाबतीत शिक्षण संपता संपता अनेक धक्के बसत होते. विद्यापीठाकडून पुन्हा पुन्हा संदेशच मिळत होता पेपर कसाही सोडवा, उत्तीर्ण होणे गृहीत धरू नका. पदवी मिळवताना संयमाचे अनेक धडे मिळाले. त्यामुळे तिची किंमत नंतर मिळवलेल्या अनेक गोष्टींपेक्षा अधिक वाटते.
असाच दुसरा अनुभव म्हणजे मी कमावता झाल्यावर आर्थिक आघाडीवर फारच अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांत वाढल्याने त्या गोष्टीची सवय असली तरी यावेळी केंद्रस्थानी मी होतो. त्यातून मी कमावलेल्या पैशाचा योग्य विनियोग करायला शिकलो.
संसार करणे हि याहूनही अधिक उद्विग्न करणारी गोष्ट असू शकते. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी परिस्थितीने आगाऊ प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे आहे असे समजावे व पुढे चालावे.
फार उशीर झालेला नसल्यास काही कालावधीकरिता हा उपक्रम पूर्णपणे थांबवावा व राहून गेलेल्या गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करावे. अनेक लोक विवाहानंतर राहून गेलेल्या गोष्टी करण्याची संधी मिळत नसल्याबद्दल तक्रार करत राहतात त्यामुळे नंतर उपरती होण्यापेक्षा संधी समोर असतानाच तिचा लाभ घ्यावा.
जोडीदार संशोधनासाठी व भावी आयुष्यासाठी धागाकर्त्यास मनापासून शुभेच्छा!!
2 Jan 2013 - 8:59 am | पिवळा डांबिस
विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, श्रीरंगराव,
असं म्हणून झाल्यवर पुढे आणखी जवळजवळ दोनशे शब्द टंकलेत की हो!!!!
हे म्हणजे मौनावर दोन तास प्रवचन देण्यासारखंच झालं!!!
:)
2 Jan 2013 - 9:16 am | श्रीरंग_जोशी
त्या तथाकथित २००(?) शब्दांत त्या विषयावर कुठे काही लिहिले आहे?
2 Jan 2013 - 10:25 am | पिवळा डांबिस
हा हा हा!
रायटिंग अ मिल्यन अबाउट नथिंग!!!
आता तुम्ही लवकरच मिपाचे मॉडरेटर होणार बघा....
:)
2 Jan 2013 - 10:53 am | नंदन
तुमच्या भविष्यवेधी नजरेपुढे नतमस्तक आहे ;)
2 Jan 2013 - 8:32 pm | Nile
+१.
पण, ते जोशी बिचारे "आम्हाला अनुभव नाही" असं म्हणून आम्ही अनुभवेच्छुक आहोत असे सांगत असताना आणि भावी मिसेस जोशी वाचत असण्याची शक्यता असताना, काकांनी त्यांचा असा पोपट करायला नको होता. ;-)
2 Jan 2013 - 8:40 pm | श्रीरंग_जोशी
# निळूभाऊ - सदर धागाकर्ता ज्या अनुभवातून जात आहे त्यातून मी कधीच गेलो नाही. याचा अर्थ असा नव्हे की मी अविवाहित आहे.
2 Jan 2013 - 9:59 pm | Nile
लग्न झालंय ना! मग असं बायकोसमोर घाबरून बोलल्यासारखे "यातला मला शून्य अनुभव आहे" काय म्हणताय? ;-) (ह. घे.)
2 Jan 2013 - 10:27 pm | श्रीरंग_जोशी
मित्रा सध्या धागाकर्ता जे करत आहे (विविध मार्गांनी जोडीदाराचा शोध घेणे) ते मी कधीच केले नाही मग मला शुन्य अनुभव असणारच ना.
बादवे - कांदेपोहे कार्यक्रमात विवाहेच्छुक तरूण म्हणून सहभागी व्हायची हौस मी गेल्या वर्षी नाटकात तशी भूमिका करून भागवली होती ;-).
बादवे - तु वि. कि अवि.?
3 Jan 2013 - 3:31 pm | वपाडाव
निळुभाउ जाणीवपुर्वक ह्या प्रश्नापासुन दुर राहिल्याने त्यांनी सर्व मिसेस. निळुभाउ होण्याइच्छुक तरुणींवर अन्याव केल्या आहे हे न्रीक्षण तीव्रपणे नोंदवुन मी रजा घेतो...
-वपाडाव फाटेकर
3 Jan 2013 - 6:37 pm | श्रीरंग_जोशी
निळुभाउ यांसी अनेक शुभेच्छा!!
4 Jan 2013 - 1:19 am | Nile
आम्ही या 'सत्कार्यास' योग्य, तरूण आणि उमदे उमेदवार कुमार वडापाव यांचे नाव पुढे करीत आहोत. तमाम उत्सुक आणि इच्छुक तरूणींने त्यांचा 'लाभ' घ्यावा. ;-)
4 Jan 2013 - 1:17 am | Nile
अहो आम्ही स.न.वि.वि. ;-)
14 Jul 2016 - 5:06 pm | वटवट
फुटलो राव... हसुन हसुन
2 Jan 2013 - 6:31 am | खटासि खट
लग्नाकडे गांभिर्याने न पाहणारी मुलगी मिळेल एक ना एक दिवस या विश्वासाचा आदर करा. अन्यथा तुम्ही गंभीर आहात हे पटवून द्या.
2 Jan 2013 - 10:56 am | अभिजित - १
Sit quietly on one day , rather night. Cut off all sort of connectivity ( Cell / internet / facebook etc ) . Think about what you are really looking for. Review your requirements. Many times because of pressure from friends / relatives you set your targets. But are they really feasible ? Above and all – are these really YOUR requirements ? or you are being forced for something higher ( or different ) than your capabilities / likings ? I am not doubting your capability.
OK … Independent / smart / outgoing / jolly. Who told you that you can’t get this kind of girl out ओf arranged marriage ? I got it. I am sure you can. But you insist on avoiding this old way. Why ?
After reading your article and your replies I feel your urge of getting loved by some girl. A girl who is not married to you !! And satisfaction of achieving something on your own instead of taking help of others ( which you ought to in arranged marriage ). Now decide what is more imp , target or how you achieve it.
Your requirements can be fulfilled in arranged marriage also. And you will fall in love with that girl too. She will do the same .. Then why you are begging on facebook / orkut / matrimony sites etc ?
Just because you work in IT does not make you class apart !! It may be true few years back, not now. Girls too do have options and you are getting sidelined. Not once, but many times. Why ? Think over it.
Wake up now !!
2 Jan 2013 - 4:15 pm | प्रभाकर पेठकर
मुलाबद्दल मुलीच्या अपेक्षा आणि मुलीबद्दल मुलाच्या अपेक्षा. अपेक्षा सतत बदलत राहतात. तिच स्त्री आणि तोच पुरुष. आधी प्रेयसी-प्रियकर असतात, पुढे पती-पत्नी होतात, त्या नंतर सासू- सासरे होतात आणि शेवटी आजी-आजोबा होतात. ह्या प्रत्येक पातळीवर त्यांच्या एकमेकाकडून अपेक्षा वेगवेगळ्या असतात. प्रियकर- प्रेयसी जितक्यावेळा 'आय लव्ह यू', 'आय लव्ह यू' करीत बसतील तसे आजी-आजोबा बसणार नाहीत. अपेक्षा बदललेल्या असतात. आजोबांच्या खोकल्यावर आजीने औषध द्यावे अशी आजोबांची अपेक्षा असते तर आजीच्या गुडघेदुखीवर आजोबांनी दोन सहानुभूतीचे शब्द बोलावेत अशी आजीची अपेक्षा असते. त्यातच प्रेम असतं. ही अगदी टोकाची उदाहरणं झाली अधेमधे अनेक रंगछटा पाहायला मिळतात. थोडक्यात काय अपेक्षा बदलत राहतात.
लग्नासाठी मुलगी किंवा मुलगा शोधताना असे कुठले कायमस्वरूपी निकष आहेत ज्याने संसार यशस्वी होईल? कुठलेच नाहीत. म्हणूनच लग्न हा एक 'जुगार' आहे असे म्हंटले आहे. कांही जणं हा जुगार जिंकतात पण बहुतांश हरतात (असं कानावर येणार्या तक्रारींवरून वाटतं). वयोमानानुसार अपेक्षा बदलणे गरजेचे असते. आणि त्या बदलतात.
कायमस्वरूपी काय राहते? तर दोघांचीही बौद्धीक परिपक्वता (मॅच्युरिटी). ती तेवढीच राहते किंवा, जास्त करून, वृद्धींगत होत जाते. तेंव्हा मला वाटतं लग्नासाठी मुलगी/मुलगा शोधताना, शक्य झाल्यास, ही बौद्धीक परिपक्वता (मॅच्युरिटी) तपासावी. कशी ते विचारू नका, ज्याने त्याने ठरवावे. बौद्धीक परिपक्वतेची (मॅच्युरिटीची) पातळी योग्य असेल तर, पुढील आयुष्यात येणार्या अनेक प्रसंगात समतोल विचार करण्यासाठी ती उपयोगी पडते. संसारात कुठले वाद किती ताणावेत, कुठले वाद टाळावेत, केव्हा नमतं घ्यावं, कुठल्या बाबी गांभिर्याने घ्याव्यात आणि कुठल्या हसण्यावारी सोडून द्याव्यात एवढे, दोघांनाही, कळल्यास संसार सुखाचा होण्यास प्रयास पडू नयेत असे वाटते.
'मुक्ता बर्वे' मुद्यावरून एक विचार मनांत आला. (म्हणजे अगदी 'व्यक्ती' नाही तर 'व्यक्तिमत्त्वा'चा विचार करून) जशी मुलाची अशी एखादी आदर्श मुलीची कल्पना असते तशीच मुलीचीही मुलाबद्दल असू शकेल. ती पण म्हणू शकते की मला 'अमिताभ बच्चन' सारखा ('व्यक्ती' नाही तर, त्याने साकारलेली 'व्यक्तिमत्व') नवरा हवा. कवी मनाचा, काळजी घेणारा, २५ गुंङांना एकाच वेळी झोडून काढणारा, गाणारा, नाचणारा इ.इ.इ. तर पंचाईतच व्हायची. आपली उडी 'अमोल पालेकर' किंवा 'फारूख शेख'च्या पुढे जायची नाही. त्यामुळे कोणी कोणाशी (व्यक्तिमत्त्वाशी) तुलना न करता जसे आहे तसे स्विकारण्याची मानसिक तयारी ठेवावी.
बाकी, एकमेकांना 'समजून' घेण्यात उभं आयुष्यही कमी पडतं. दोनचार भेटीत आणि दहाबारावेळा चॅट करून काय अंदाज बांधणार?
नाऊमेद करीत नाही पण जास्त चोखंदळपणा टाळावा. आखुड शिंगी, बहुदूधी, कमी चारा खाणारी गाय मिळत नसते.
2 Jan 2013 - 4:35 pm | काळा पहाड
जर मुलीची बौद्धीक परिपक्वता टवाळा एवढीच असेल, तर तिचं वागणं साधारणपणे शोले मधल्या बसंती सारखं किंवा अलिकडचं उदाहरण द्यायचं तर राखी सावंत प्रमाणे हवं. म्हणजे याने 'रोज विथ रोज' म्हटल्यावर तिचे प्रत्युत्तर 'रॅम्बो विथ पोएट'स हार्ट' असं काही तरी हवं. हे राम. बरं पुण्यासारख्या शहरात मागे धावायला झाडे तरी हवीत! तीही नाहीत. हिरो हिरोइन ने एलेक्ट्रीक च्या पोल च्या फेर्या मारणे हे फार चांगलं दिसत नाही, नाही का?
2 Jan 2013 - 6:51 pm | टवाळ कार्टा
_/|\_
19 Feb 2013 - 3:06 am | आजानुकर्ण
सहमत. (किंवा पावशेर दुधाकरता गाय/म्हैस पाळण्याचा त्रास करुन घेऊ नये).
2 Jan 2013 - 7:15 pm | चित्रगुप्त
हल्ली आपण 'आउट गोइंग, आणि 'फन लव्हिंग' असल्याचे बर्याच विवाहेच्छु मुली स्वतःच्या प्रोफाईल मधे लिहितात.
या दोन्ही विशेषणांचा नेमका अर्थ काय, हे कुणी उलगडून सांगेल काय ?
2 Jan 2013 - 8:18 pm | काळा पहाड
आउट गोइंग: सोमवार - गार्डन कोर्ट, मंगळ्वार - रुतुगंध, बुधवार - बारबेकयु नेशन, गुरुवार - चायना टाऊन, शुक्रवार - कोबे सिझलर्स, शनिवार - डॉमिनोज, रविवार - मॅकडोनल्ड्स.
ते दुसरं फन लव्हिंग नसून फॅन लव्हिंग असावं का? काहींचे बरेच फॅन असतात म्हणून विचार्तोय.
2 Jan 2013 - 10:00 pm | चित्रगुप्त
असे आहे होय? म्हणजे स्वयंपाक करता येत नाही, हे सांगण्याची आंग्ल पद्धत म्हणायची.
... आम्हाला आपले 'आउट गोईंग' म्हणजे 'बाहेरख्याली' आणि 'फनलव्हिंग' म्हणजे 'चंगीभंगी' हे शब्द आठवले होते.
2 Jan 2013 - 11:02 pm | टवाळ कार्टा
_/|\_ :D
3 Jan 2013 - 12:29 am | बॅटमॅन
लैच खंग्री मारलाय चित्रगुप्तजी. जियो!!
3 Jan 2013 - 1:35 am | पिवळा डांबिस
:)
जियो!!!!
3 Jan 2013 - 1:45 am | दादा कोंडके
खरचं. मला पण हा प्रश्न होता. बहुतेक मुली दुसर्यांचं प्रोफाईल कॉपी पेस्ट करत असतील.
बाकी एक फॉरवर्ड फिरत होता, त्यात मॅट्रीमोनिअल साइटीवरचे दिव्य इंग्रजीतले मुला/मुलींचे प्रोफाइल दिले होते. कुणाकडे असेल तर डकवारे.
सापडलं. काही भाग इथं देतोय.
hello….
My name Arthi….. i am a good charactarised woman. i want to run my life happily. i expect the good minded and clean habits boy to marry me soon…. who may be in the same caste . If anyone want to Marie to me u
can visit to my home (Ghar Chale aana……..???)
_________________________________________________
Hello
To Viewers My Name is Shekhar , I am single i don’t have female, I am not a good education but i working all field in bangalroe.. if u like me u welcome to my heart…when ever u want to meet pls visit my resident or send u letter.. Thanks yours Regards Shekhar
_________________________________________________
I want very simple girl. from brahmin educated family from orissa state she is also know about RAMAYAN, GEETA BHAGABATA, and other homework (Homework?)
_________________________________________________
Wants a woman who knows me better and can adjust with me forever. she may never create any difficulties in my life or her life by which the entire life can run smoothly. thank you (The principle of running life smoothly was never so easy!)
_________________________________________________
She should be good looking and should have a service. she Should have one brother and one sister. she should be educated. (ain’t it unique !! 1 brother 1 sister criteria !)
_________________________________________________
:)
3 Jan 2013 - 2:31 am | पिवळा डांबिस
आयच्यान सांगतो, आयडीचं नांव सार्थ केलंत!!!!
हसून-हसून डोळ्यात पाणी आलं हो!!!!
:)
3 Jan 2013 - 5:13 am | चित्रा
हाहा.
मस्त.
5 Jan 2013 - 12:36 pm | सस्नेह
हहपुवा..!
नवीन पिढी इतकी 'सु'संवादी आहे हे माहिती नव्हते...!
14 Jul 2016 - 5:09 pm | वटवट
इथेपण हसुन हसुन फुटलो.... हा हा
14 Jul 2016 - 6:46 pm | सूड
थांबा फेविक्विक आणतो.
3 Jan 2013 - 4:40 am | काळा पहाड
याचे नवीन आर्टीकल करा राव.
3 Jan 2013 - 5:14 am | आनन्दिता
हे हे हे...
काही दिवसांपुर्वी हे shadi.com वरचे खतरनाक प्रोफाइल्स वाचुन हहपुवा झाली होती.. कोंड्केंच्या प्रतिसादात अजुन काही मजेशीर नमुने अॅडवते आहे...
i am simple girl. I have lot of problemin my life because of my luck now i am looking one boy he care me
and love me lot lot lot
(I don't know why but this is one of my favorites)
~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~
i want a boy with no drinks if he wants he can wear jeans in house but while steping out of house he should give recpect to our cast
(by not wearing his jeans? Wat the hell...)
~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~
HYE I AM A GOOD LOKING GIRL,WHO HAS THE CAPABILITY TO MAKE ANY BODY TO LOUGH.I BELIEVE IN GOD AND ACCORDING TO ME FRIENDS ARE THE REAL MESSENGER OF GOD. THE 3 THINGS I AM LOOKING FROM A BOY
,THEY ARE
1.THEY MUST BELIEVE IN GOD.
2. THEY HAVE TO LIKE MY PROFFESION
3. THEY SHOULD NOT GET BORED WITH ME WHEN I WILL TRY
TO MAKE THEM LOUGH.
(all of us are loughing {laughing})
~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~
whatever he may be but he should feel that he is going to be someone groom and he must think of the future life if he is toolike this he would be called the man of the lamp
(I am clueless, I feel so lost. Can anyone tell me what this girl wants)
~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~
i love my patner i marriage the patner ok i search my patner and I love the patner ok thik hai the patner has a graduate
ok
(I am again clueless but I liked the use of "ok". The person is suffering from "Ok-syndrome")
~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~
iam pranati my family histoy my two brother two sister and father & mother sister completely married
(somebody please explain in comments section how to get married 'completely' ?) iam pranati my family histoy my two brother two sister and father & mother sister completely married
(somebody please explain in comments section how to get married 'completely' ?) completely
~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~
my name is farhanbegum and i am unmarried. pleaes you marrige me pleaes pleaes pleaes pleaes pleaes pleaes pleaes
(height of desperation! J )
~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~
4 Jan 2013 - 10:19 pm | श्रीरंग_जोशी
इंचा इंचा ने हा धागा द्विशतकाकडे वाटचाल करत आहे...
4 Jan 2013 - 10:27 pm | मराठे
सगळे एकापेक्षा एक हाईट्ट आहेत. एकदा कुठल्याश्या ढकलपत्रात वाचलेले. (जाता जाता: आजकाल ढकलपत्रांची जागा चेपुवरच्या पोस्टांनी घेतली आहे .. तेवढंच दु:खात सुख)
7 Jul 2016 - 3:12 am | सही रे सई
बास बास... आनन्दिता आणि दादा कोंडके यांचा मिळून एक नवीन धागा काढाच.
3 Jan 2013 - 12:24 pm | sagarpdy
बापू आडवे ! =))
15 Jul 2016 - 8:14 pm | अद्द्या
ताई , मी आता runतो .
female what???
5 Jan 2013 - 11:24 pm | टवाळ कार्टा
http://www.misalpav.com/comment/448365#comment-448365
3 Jan 2013 - 7:08 pm | शिवाजी नाठे
मिपाकराचे सल्ले ऐकुन हि लग्न लवकर न जमल्यास त्र्यबकेश्वर ला जाऊन शांती करुन घ्या !
4 Jan 2013 - 10:57 am | वपाडाव
honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker
शांती मध्ये हे सगळे गुण आहेत का? मग ती इतके दिवस अविवाहित कशी काय?
4 Jan 2013 - 2:21 pm | सूड
>>मग ती इतके दिवस अविवाहित कशी काय?
वरच्या प्रतिसादात शांती अविवाहित असल्याचं कुठेतरी म्हटलंय का ?
4 Jan 2013 - 2:36 pm | वपाडाव
मग तीचं टोपण नाव द्रौपदा तर नाही?
तसं असेल तर ह्याप्पी बड्डे टवाळार्जुन...!!
4 Jan 2013 - 8:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
+D +D +D
4 Jan 2013 - 10:26 pm | कवितानागेश
सापडला का काही उपाय शेवटी?
काय केल्यानी मुलगी लग्नाला 'हो' म्हणेल?
5 Jan 2013 - 12:55 am | उपास
ह्याला डिवचणे म्हणतात का रे भाऊ? :-)))
5 Jan 2013 - 11:26 pm | टवाळ कार्टा
याला बरेच काही म्हणतात
काड्या सारणे, तेल ओतणे, ...
;) (ह.घे.)
5 Jan 2013 - 4:52 am | बांवरे
धाग्या पेक्शा पर्तिसाद लई हशीवतातेत !
5 Jan 2013 - 10:38 pm | गोमट्या
देत आहे. फारच सुंदरले़ख.
18 Jan 2013 - 11:50 pm | नर्मदेतला गोटा
चांगल्या विषयाला फोडलीये
18 Jan 2013 - 11:50 pm | नर्मदेतला गोटा
चांगल्या विषयाला फोडलीये
21 Jan 2013 - 3:14 pm | प्रसाद गोडबोले
मित्रा , आता हा धागा तु चेछ्टा म्हणुन टाकला होतास की सीरीयसली ?
चेछ्टा म्हणुन टाकला असशील तर तु जोरदार यशस्वी झाला आहेस . अभिनंदन !
आता सीरीयसली लेहिले असशील तर तर मात्र तु गंडला आहेस ... इतकी पर्सनल गोष्ट मिपावर टाकतात का भावा ?
हायला इथे " कोणी तरी मेलं " असा धागा काढला तरी लोकं त्याचा विनोद करतील .( अर्थात काही प्रतिसादानंतर मी ही सामील हिईन त्यांन्ना =)) )
14 Feb 2013 - 6:43 pm | उपास
>>हायला इथे " कोणी तरी मेलं " असा धागा काढला तरी लोकं त्याचा विनोद करतील
अहो राष्ट्रकाकू, त्या अफजल गुरु ला फाशी दिल्याच्या धाग्यावर दंगा चालूच होता की.. सोयर नाही आणि सूतक त्याहून नाही! :))
15 Feb 2013 - 7:56 pm | प्रतिज्ञा
सगळ्या च इंजिनीअर मुली अश्या नसतात...
17 Feb 2013 - 12:58 pm | पिशी अबोली
यातले सगळे गुण तुमच्यात आहेत? बाआआआपरे..
ग्रेटच राव तुम्ही.. पण हे सगळे गुण असणार्या मुलींच्या या लिस्टमधे अजून एक गुण असतो.. mature..
असेल तुमच्यात,तर शुभेच्छा.. भेटेलच अशी मुलगी मग..
बाय द वे,एका मुलीला तुम्ही मुक्ता बर्वेच्या कॅरॅक्टर सारखी हवी असं म्हणता..दुसरीला डायरेक्ट रोझ सारखी म्हणून कॉम्प्लिमेंट..अपेक्षांची आणि स्वप्नांची रेंज काय हो तुम्च्या? मानलं..
17 Feb 2013 - 6:43 pm | प्यारे१
अबोली बोल्ली!
पयल्यांदाच काय?
17 Feb 2013 - 9:39 pm | पिशी अबोली
मग काय? फुलांच्या कुळातल्या उपमा देतायत टवाळराव..तेवढ्यापुरतं तरी बोलावं म्हटलं..
17 Feb 2013 - 10:21 pm | जेनी...
श्या :
काय हे ? :-/
काय रे जमतय का कुठे ?? कि मी बघुन देवु एखादी ...??
बघ .. नैतर काँटॅक्ट कर मला ..
आयविल हेल्प्यु .
17 Feb 2013 - 11:59 pm | रमेश भिडे
आमच्या एका मित्राला फार्फार गरज आहे मदतीची....काशी मदत करू शकाल आपण?
18 Feb 2013 - 12:01 am | पैसा
ओ तुम्ही कोणाला काय विचारताय? मदतीची काशी करेल ती नक्की! ;)
18 Feb 2013 - 12:04 am | अभ्या..
हेहेहेहेहे
चारोधाम वधुवर सुचक केंद्र
=)) =)) =))