मुली शोधाण्यातले frustration
नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे
माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे
पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे )
मुलगी type १
डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :(
मुलगी type २
मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
२-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे
लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद
मुलगी type ३
engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता
त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked
उरलेल्यांपैकी बर्याच
matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार
दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे
जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत???
(पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
प्रतिक्रिया
हा हा हा!!!!
=)
अजुन तरी नाही ;)
टवाळा, कुठल्याच लग्नाळु मुलीला दुसर्या मुलीचा दाखला देऊन 'अशी मुलगी हवी' हे आवडणार नाही. ती खरच बोलण्यात straight forward असेल तर म्हणेल की, 'मग मुक्ता बर्वेशीच का लग्न करत नाही?'. कधीही एका स्त्रीची दुसर्या स्त्रीशी तुलना करु नका, विषेशतः तुम्हाला "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" अशी स्त्री बायको म्हणुन हवी असेल तर. तेव्हा लग्नासाठीचे ढोबळ गुण जमले तर लग्न करुन टाका. कारण सहजीवनातली तडजोड लग्नानंतर एकमेकांच्या नकळत होतच रहाते.
कशाला एव्हड चिवडत बसतो टवाळा,जी पोरगी आवडली तिला स्पष्ट तु कसा आहेस त्याची कल्पना दे,ते तिला पसंत असेल तर हो म्हनेल्,नाही तर नाही..संपला विषय...
Thinking out of the box does not work everywhere !!
वडिल धारि लोकन्चे ऐका. And follow their way. You wanted to have thrill in love / getting loved by some girl. Alas .. Time has passed.
अर्रे काय बाजार लावलाय
फक्त एकीला "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" याचा अर्थ समजला नाही तर तीला'च' फक्त मु.ब. चे उ.दा. दिलेले
चायला सगळे असे बोलत आहेत की जसा मी प्रत्येकीलाच सेम सांगतो :(
म्हणजे तुम्ही प्रत्येकीला वेगळ्या अपेक्षा सांगताय की काय??
त्यामुळेच त्या सगळ्या कन्फ्युज होतायत... :P
खिक् :))
=))
टवाळा एक सल्ला
माझ्या अनेक मित्रांचे वधू संशोधन तुझ्याच मार्गाने झाले ते पाहून मला जे सुचले ते सांगतो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी एकदा फक्त आभासी जगतात वार्तालाप कर. ज्यात बी युवर सेल्फ .
त्यानंतर त्या मुलीला तुझ्या मध्ये रस असेल तर तुम्ही सरळ प्रत्यक्ष भेटा.
आणि पहिल्यांदा त्या मुलीशी सविस्तर स्वतः विषयी बोल आणि तिला ही बोलू दे
तुझे गुण दोष जे तुला तुझ्यात आढळतात ते तिला स्पष्ट सांग
तुझ्या गुणदोषांसहित जी तुला होकार कळवेल ती तुला खर्या अर्थाने योग्य पत्नी
म्हणून संसारात योग्य ठरेल.
माझ्या एका चुलत भावाला अश्या प्रत्यक्ष भेटीत मुलीने लग्नानंतर तुझे पुढचे बेत काय अश्या अर्थी काही प्रश्न विचारले , ह्यापैकी बहुतांशी प्रश्नाची उत्तरे त्याने आई बाबांना विचारून अश्या अर्थी दिली आणि त्या मुलीने त्याला नाकारला
कारण काय तर स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही.
आता माझ्या भावाच्या मते तो आई वडिलांसह कायम राहणार असल्याने एक कुटुंब म्हणून कोणताही निर्णय आजपर्यंत त्याने आई वडिलांसह एकत्र घेतला होता.
पुढे त्याला त्याच्या अनुरूप जोडीदार मिळाली.
सध्या हे गाणे ऐक ,
आणि शब्दांकडे विशेष लक्ष दे
आजकालच्या गाण्यात संगीत महत्त्वाचे आणि शब्द दुय्यम झाले आहेत.
>>तुझे गुण दोष जे तुला तुझ्यात आढळतात ते तिला स्पष्ट सांग
जो मुलगा ज्या वेळी इंप्रेशन पडायचे त्या वेळी स्वताचे दोष सांगतो (भले त्यामागचा हेतु चांगला असो, किंवा मुलगा कितीही चांगला असो) अशा मुलांना मुली "बावळट" समजतात
>>तुझ्या गुणदोषांसहित जी तुला होकार कळवेल ती तुला खर्या अर्थाने योग्य पत्नी
>>म्हणून संसारात योग्य ठरेल.
अजुनपर्यंतचा (स्वताचा आणि मित्रमंडळींचा) अनुभव हाच आहे की अरेंज लग्नात मुली पैसा, स्वताचे घर असणारा, शक्यतो लहान भावंडे नसलेला (जेणेकरुन जबाबदार्या नसणारा), घरच्यांची पसंती, good looking या प्रमाणे मुलगा निवडतात...स्वभाव, आवड-निवड वगरे गोष्टी "adjustments" मधे मोडतात
>>माझ्या एका चुलत भावाला अश्या प्रत्यक्ष भेटीत मुलीने लग्नानंतर तुझे पुढचे बेत काय अश्या अर्थी काही प्रश्न >>विचारले , ह्यापैकी बहुतांशी प्रश्नाची उत्तरे त्याने आई बाबांना विचारून अश्या अर्थी दिली आणि त्या मुलीने त्याला >>नाकारला
>>कारण काय तर स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही.
>>आता माझ्या भावाच्या मते तो आई वडिलांसह कायम राहणार असल्याने एक कुटुंब म्हणून कोणताही निर्णय >>आजपर्यंत त्याने आई वडिलांसह एकत्र घेतला होता.
म्हणजे त्या मुलीने नकार देताना तुझ्या भावाशी ओपनली बोलणे केले नाही...तसे झाले असते तर कदाचीत त्या दोघांना एकमेकांची बाजु समजुन घेता आली असती...पण मुलगी कितीही शिकलेली असो "हे असेच आहे"
मुलीच्या घरच्यांनी/मुलीने पत्रिका जुळती आहे की नाही याचा आग्रह धरला तर काय करणार?
माझा स्वताचा पत्रिकेवर अजिबात विश्वास नाही (ज्यांचा आहे त्यांना माझा एकच प्रश्न...स्वताच्या मुलांना शाळेत घालताना मुहुर्त बघता का? किंवा जॉब इंटर्व्हुला जाताना , कंपनी मधे रुजु होताना मुहुर्त बघता का?)
>>मुलीच्या घरच्यांनी/मुलीने पत्रिका जुळती आहे की नाही याचा आग्रह धरला तर काय करणार?
माझी काहीच हरकत नाही
केळकर साहेब नुसत्या शुभेच्छा काय देता
तुमच्या अनुदिनी मध्ये लग्न लवकर जमण्यासाठी स्तोत्र दिले आहे ते टवाळास द्यावे.
ह्या वर्षीची आमची सकाळ तुमच्या अनुदिनी मुळे एकदम धार्मिक वातावरणात पार पडली त्याबाबतीत तुम्हाला धन्यवाद
हे एवढे सल्ले वाचल्यावर वाटलं, थोडी घाईच झाली. पण काय करणार, तेव्हा मिपा नव्ह्ते. पुढच्या जन्मासाठी सल्ले वाचून ठेवलेत.....
जाम विनोदी धागा आहे! :D
(बहुतेक) वामन चोरघड्यांनी लिहीलेली एक गोष्ट आठवली ती थोडक्यात सांगतो.
गावातला एक मास्तर असतो. त्याची वहाण वापरून वापरून जुनी झाली असते. शाळेबाहेरच्या चांभाराकडे खरेदी करायला जातो. मास्तराची अपेक्षा असते तशीच वहाण त्याच्याकडे असते. बरीच घासाघीस होते. भाव जमत नाही. मास्तर चांभाराला सांगतो "दुपारी तालुक्याला जातोय बघ याच भावात चांगली व्हाण घेतो की नाय" तालुक्याला गेल्यावर जी वहाण पसंत पडते ,भाव जमत नाही. दुसर्या दुकानात भाव बरे पण वहाण पसंत पडत नाही. दहा दुकानं फिरून मास्तर जुनीच वहाण घालून परत येतो. एश्टीतून उतरता उतरता वहाणेचा अंगठा प्राण सोडतो. आली का पंचाईत ? फिरून मास्तर शाळेबाहेरच्या चांभाराकडे येतो आणि सकाळी नाकारलेली वहाण मुकाट विकत घेतो.गोष्टीच्या शेवटी लेखकांनी एक तात्पर्य सांगीतले आहे ते असे की शंभर मुली बघणार्या मुलाचे लग्न शेवटी यथातथा मुलीशीच कसे होते ते आज मला कळले.
यातून तुम्हाला उपदेश काहीही देत नाही पण सांगायचं इतकंच की अंगठा तुटेपर्यंत थांबू नका.
दिवस बदलल्याचे द्योतक म्हणजे तुमचा प्रतिसाद. ;) आज एका होऊ घातलेल्या वराला तुम्ही हे सांगताय. पूर्वी हाच सल्ला मुलींना मिळत असे. "पहिल्या वरा तूच बरा."
पण त्यांनी वहाण नाकारल्याचं कुठेच म्हटलं नाही. वहाणाच त्यांना आंगठा दाखवत आहेत :(
बायदवे मुलींची तुलना वहाणांशी केल्याबद्दल तुमचा निषेध!! (माझ्याकडून द्विशतकासाठी मदत)
बायको ही नोकरीसारखी, काय समजलेत?
दुसरी चांगलं प्रोफाईल देते म्हणुन पहिली सोडण्यात काहीएक अर्थ नसतो.
शेवटी सगळ्या नोकर्या आणि सगळ्या बायका सारख्याच!
काय समजलास वात्रटा?
>"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker
एकदा तुम्हाला ती आवडली की स्वतःचं सगळं मन बिनदिक्कत तिच्यासमोर उघडं कर.ओ नका ओ, का बिचार्याची वाट लावायला निघालाय? टवाळा बाळा, असले सल्ले तू अजिबात ऐकू नको.
मन बिन उघडं करा ते ठीक आहे, पण इथला आयडी अन पासवर्ड नका सांगु. , लग्नाआधी घरच्या संगणकाची हार्ड डिस्क स्वच्छ करुन घ्या, मोबाईलमधलं कार्ड फॉर्मट करुन घ्या. असो.
"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" हे सगळे 'गुण' बघून लग्न केल्यानंतर हेच तुम्हाला 'अवगुण' न वाटो म्हणजे झाले.
"मुकेपण" हा बायकोत सगळ्यात मह्त्वाचा गुण आहे असं आमचे एक मावसआजोबा सांगायचे!!!
आता गेले ते, तेंव्हा आता त्यांच्याविरूद्ध पाशवी मोर्चा काढण्यात काही अर्थ नाही!!!
:)
बाकी 'वात्रट कार्ट्याला' आपण झक मारली आणि हा आयडी घेतला असं झालं असेल!!
अरे तुझा तो फक्त आयडी आहे, इथे वीस हजार मिपाकर तोच गुण घेऊन मौजूद आहेत!!!!
:)
रोझ विथ रोझ ही कमेंट वाचुन ती कन्या मनातल्या मनात ' टवाळच दिसतोय कार्टा ' असं म्हणाली असेल काय.??
एक निरागस अंदाज आपला..!!
त्याने टवाळ हा शब्द वापरला हेच चुकलं असावं...
म्हणुन आम्ही वात्रट हा शब्द सुचवला....
वात्रट (किंवा चावट)मुलं आवडतात कन्यांना असं आम्हाला वाटतं....
आमची ही तर आम्हाला सदैवच वात्रट म्हणते!!!!
:)
आमची ही तर आम्हाला सदैवच वात्रट म्हणते!!!!कलियुग, दुसरं काय! 'हे' वरून 'वात्रट', किती ही अधोगती!! बर हे फक्त प्रायव्हेट मध्ये की पब्लिक मधे पण? आमचे वात्रटराव दिसले का कुठे म्हटल्यावर समोरचा आडवाच!!!
वात्रट (किंवा चावट)मुलं आवडतात कन्यांना असं आम्हाला वाटतं....पिडां काका हे ईतकं सगळं माहित असुन तुम्ही तुमचं नाव डांबिस का ठेवुन घेतलय..? पिवळा चावट असं का नाही ठेवलं? :)
पिडां काका हे ईतकं सगळं माहित असुन तुम्ही तुमचं नाव डांबिस का ठेवुन घेतलय..? पिवळा चावट असं का नाही ठेवलं?हॅ कैच्या कै! आम्ही जिथे चावटपणा करतो तिथे पिवळा डांबिस नांव लावत नाय काही!!!!! :) आम्ही मिपावर चावटपणा करायला येत नाही, इरसाल डांबिसपणा करायला येतो. म्हणून ते तसं नांव!! :)
काका मी आलो.
हसून हसून मेले .. फुटले.._^_
मग
लग्नाचा बाजार
नक्की बघा
http://www.misalpav.com/node/36586
कधीच नाही
"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" हे सगळे 'गुण' बघून लग्न केल्यानंतर हेच तुम्हाला 'अवगुण' न वाटो म्हणजे झाले.
>> +१
शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे गुण खरंच असले मुलीत तर चालणार आहेत का ते विचारून घ्या. आमच्याकडे नवर्याला हे गुण आवडले होते पण आता लग्नानंतर त्याच्या आयशीबापाशीला चालत नसल्याने मलाच बदलायला सांगतो दरवेळी. 'जब वी मेट' मधली मीत सगळ्यांना प्रेयसी म्हणून हवी असते. पण लग्न केल्यावर तीची अलका कुबल व्हावी अशीच अपेक्षा असते सगळ्यांची (निदान स्वानुभवावरून माझा तरी असाच समज झाला आहे).
शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे गुण खरंच असले मुलीत तर चालणार आहेत का ते विचारून घ्या. आमच्याकडे नवर्याला हे गुण आवडले होते पण आता लग्नानंतर त्याच्या आयशीबापाशीला चालत नसल्याने मलाच बदलायला सांगतो दरवेळी. 'जब वी मेट' मधली मीत सगळ्यांना प्रेयसी म्हणून हवी असते. पण लग्न केल्यावर तीची अलका कुबल व्हावी अशीच अपेक्षा असते सगळ्यांची (निदान स्वानुभवावरून माझा तरी असाच समज झाला आहे).यावर एक कच्कून वैयक्तिक प्रतिसाद मारता आला अस्ता मला :) जे तुम्च्याकडे झाले ते माझ्याकडेही होईलच असे का वाटते?
ही पण नाण्याची एक बाजू आहेच टकोजी.तिने लिहिलेल्या प्रमाणे घरं मीही पाहिली आहेत.अगदी जाॅली वाटणारे आईबाप साबासाबु म्हणून टोटली वेगळी माणसं असू शकतात.हे तू पर्सनल लावून घेतो आहेस.पण ही पण एक नेहमी आढळणारी वस्तुस्थिती आहे.तुझ्याकडे असेल असे नाही.पण अशी माणसं असतात.डबल स्टॅन्डर्ड्स असणारी.
यावर एक कच्कून वैयक्तिक प्रतिसाद मारता आला अस्ता मला :)
जे तुम्च्याकडे झाले ते माझ्याकडेही होईलच असे का वाटते?
>> मी माझे वैयक्तीक लिहिले आहे. तुमच्याकडेही असेच होईल असे म्हणत नाहीये. पण सासुसासरे झाल्यावर स्वतःच्याच आईवडीलांचे वागणे बघून थक्क झालेला मित्र आहे. आपले आईवडील आपल्या बायकोशी असे का वागतात हे त्यालाच कळेना झाले होते. आता तुम्ही माझा मित्रच मुर्ख होता वगैरे म्हणणार असाल तर इथेच थांबुयात. पण तुमच्या "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" ह्या अपेक्षा आणि तुमच्या पालकांच्या सुनेकडून असलेल्या अपेक्षा सेम आहेत ना किंवा एकमेकांना पुरक आहेत ना हे पडताळून पाहायला सांगणे म्हणजे वैयक्तीक अपमान वगैरे होत असेल तर ___/\___ माफ करा.
अगदी जाॅली वाटणारे आईबाप साबासाबु म्हणून टोटली वेगळी माणसं असू शकतात.हे तू पर्सनल लावून घेतो आहेस.पण ही पण एक नेहमी आढळणारी वस्तुस्थिती आहे.तुझ्याकडे असेल असे नाही.पण अशी माणसं असतात.डबल स्टॅन्डर्ड्स असणारी.
>> अनुमोदन.
बरं...मग मुलगी पहायला जाताना तिला काय विचारावे आणि मुलगी फायनल कशी करावी याबाबत सांगता का?
तुमच्या आणि तुमच्या पालकांच्या अपेक्षा एकमेकांना पुरक आहेत का हे पडताळतांना पाहायला गेलेल्या मुलीला काय विचारणार? मी सुचवलेली चर्चा तुम्ही त्याआधीच करणे अपेक्षित आहे.
तुम्ही आणि तुमच्या पालकांनी एकमेकांना लग्न होऊन घरात येणार्या मुलीकडून प्रत्येकाच्या काय काय अपेक्षा आहेत हे समोरासमोर बसून बोललात तर कदाचित भविष्यातले गुंतागुंतीचे प्रसंग टळतील असे सुचवायचे होते.
परंतु तुम्हाला जर राग आला असेल आणि त्यामुळे तुम्ही मुद्दाम वाकड्यात शिरणार असाल तर इथेच थांबते.इतर संस्थळांप्रमाणे इथेही स्वप्रतिसाद संपादनाची सोय असती तर माझे आधीचे प्रतिसादही काढून टाकले असते. शुभेच्छा !!
अर्र...तसे नाही...जर समजा माझ्या पालकांच्या अपेक्शा माझ्या अपेक्शांसारख्याच असतील तर पुढे काय असे विचारायचे होते
"पुढे काय" म्हणजे मुलगी फायनल कशी करावी हे का?
मुलाच्या पालकांच्या आणि मुलीच्या अपेक्षा जुळणे पण महत्त्वाचे असते! कारण लग्न एका माणसाशी झालं तरी पूर्ण परिवाराशी त्यासोबत जुळवुन घेणे महत्त्वाचे असतेच. मुलं समहाऊ अॅडजस्ट करतात.दोन्हीकडून थपडा खात! पण हे टाळायचे असेल तर तिचे करिअर,तिच्या आवडी,ती घरात काय करु शकते ,न करु शकत असल्यास जे पर्याय असतील उदा पूर्ण वेळ कामासाठी, स्वयंपाक इ साठी मदत घेणे इ निर्णय तिला घेताना सासरचे लोक किती साथ देऊ शकतात हे जमणेदेखील महत्त्वाचे आहे.नाहीतर माझ्या आईने नोकरी करुन सणवार, चारी ठाव स्वयंपाक केलाय मग हिला न जमायला काय झालं टाइप अॅटिट्युड प्राॅब्लेम घरात सुरु होऊ शकतात.याबद्दल वेळीच बोलणे इष्ट असते.लग्नानंतर मला घरकाम अजिबात आवडत नाही.मी करणार नाही असे सांगितल्यास घरात कल्चरल शाॅक बसु शकतो!
तिला तिचे छंद इ जोपासायला किती प्रोत्साहन असू शकणार आहे.लग्न ठरताना आमच्याकडे सगळे ओपन माइंडेड म्हणणारे लोकच ती कुठे प्रोजेक्ट साठी,ट्रेक इ साठी निघाली की डोक्यावर आठ्या घालुन पाहू शकतात!
मुलाच्या मैत्रिणीचे कौतुक असणाऱ्या आयांना सुनेचे मित्र घरी आलेले आवडत नाहीत!
किती उदाहरणं इतक्या वर्षात निरनिराळ्या मैत्रिणींची पाहिली आहेत.लग्नाआधी बोलण्याच्या गोष्टी फक्त मुलीशीच नाही तर तिच्या अनुषंगाने पालकांच्या अपेक्षा जाणून घेणेही आवश्यक आहेच.प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर!!
अग्दी अग्दी...पण काय करायला हवे यापेक्षा कसे करावे हे कोणी सांगेल का
कसे म्हणजे? बो लु न!!
काय बोलुन
चार युक्तीच्या गोष्टी ताबडतोब सांगा