गर्दभ लीला!
एक जंगल होते. त्यातील एका भागात गाढवाचं राज्य होते. इतर अन्य भागात राहात. गर्दभांच्या राज्याची आपापसातील गोष्टी सोडवतानाची रीत नेहमीच खिंकाळण्याची व हमरीतुमरीवर येण्याची असे. एकदा अन्य रानातून गर्दभाच्या राज्याच्या महत्वाच्या व्यक्तीस पाहुणचारला बोलावले गेले. त्या गर्दभांनी प्रवेश करताच आपली गाऱ्हाणी गाऊन इतरांना उपदेश केले की चर्चेचा घोळ न घालता, आपापसातील समस्या गायन-नर्तनाच्या, क्रीडांगणातून कशा सुटतात असे आळवून सांगितले. ते ऐकून इतरांनी करतल रव करून 'अहो रूपम् - अहो ध्वनिम्, वाहवा म्हणुन प्रशंसोद्गार काढले. त्यामुळे अत्योल्लासाने शेफारून गर्दभराजांनी उपस्थितांच्या पार्श्वभागास लत्ता प्रहारांनी यथेच्छ लाली लाल केले. पण निमंत्रित मान्यवरांना खडसावायचे कसे अशी सभ्यता आड येऊन, तोंडावर संभावित हास्य व पार्श्वभूमीवर लत्ताप्रहारांच्या कळा दाबून पुन्हा क्रिडास्पर्धाचे निमंत्रण देऊन आपला पाहुणचार संपन्न केला व मिणमिणणारे दिवे हाती धरून विदा केले.
प्रतिक्रिया
24 Dec 2012 - 9:37 am | श्री गावसेना प्रमुख
खरच गाढवांचच राज्य आहे इथे.
24 Dec 2012 - 12:12 pm | अपूर्व कात्रे
त्याच पाकी मंत्र्याच्या भारत भेटीवर पाकिस्तानच्या लेखकाने लिहिलेला लेख आजच्या Indian Express मध्ये आला आहे.
31 Dec 2012 - 9:26 pm | शशिकांत ओक
एका पाकी पत्रकाराने त्याची उडवलेली खिल्ली त्यांच्यासाठी ठीक आहे. अशा आचरट व बेजबाबदार मंत्र्याला भारत सरकारने बोलावयाचे काय कारण होते? याचे उत्तर मिळत नाही...त्याला बोलवून त्याच्या मुक्ताफळांच्या लाथा खायला बोलावले होते असे लक्षात राहते.
7 Jan 2013 - 10:28 pm | शशिकांत ओक
दादा दाऊद कासकारंचे व्याही खास क्रिकेट पहायला पधार रहे हैं...असा पुकारा झाला. फारच गवगवा झाला व नको ते सवाल विचारले गेले तर फजिती व्हायाची असे वाटून कराचीचे विमानतळ न सोडल्याने एका गर्दभ लीलेला आपण मुकलो.
7 Jan 2013 - 10:38 pm | पैसा
पाकिस्तानवर पूर्ण बहिष्कार घालायला पाहिजे आहे. क्रिकेट मॅचेस खेळवायची काय गरज होती?
8 Jan 2013 - 8:36 pm | मदनबाण
पाकड्यांच्या मिजाशीला आपले ** सरकार कारणीभूत आहे.जो आपल्या पाठीत सतत खंजीर खुपसतो त्याचे तळवे चाटण्याची चाटुगिरी करायची कशाला ? अरे राष्ट्रप्रेम,राष्ट्राभिमान काही आहे की नाही यांच्या रक्तात ?
देशातल्या लोकांनाही क्रिकेटचे भारी प्रेम,पण पाकड्यांच्या सोबत कशाला ? ते काय गळाभेट घेतात का ? की तुमच्या राष्ट्राच्या प्रगतीला / सुरक्षेला हातभार लावतात ? त्यांनी केलीली आत्ता पर्यंतची सर्व कारस्थाने पाहुन देखील त्यांच्या संघाबरोबर खेळण्याची इच्छा होतेच कशी ? इतके आपण ** आहोत काय ?
आजच जम्मूच्या पूंछ भागात पाकिस्तानी सैनिकांनी २ भारतीय सैनिकांना ठार केल्यानंतर त्यांचं डोकं धडापासून वेगळं केलं आणि त्यातील एकाचं डोकं घेऊन परत गेले.
आधी कॅपट कालिया आणि त्याचे सहकारी असेच हाल हाल करुन ठार मारले गेले,ज्यांना अजुनही न्याय मिळाला नाही,त्यात आजच्या घटनेची भर पडली आहे. क्रिकेट शौकिन नागरिकांना आपल्या देशातल्या जवानांच्या बलिदाना बद्धल काहीच वाटु नये ? इतके या देशातील लोकांचे रक्त गोठले आहे ?
गाढव लाथ मारते यात गाढवाचा दोष नसुन, गाढव लाथ मारते आहे हे माहित असुन सुद्धा त्याच्या बुडाचा मुका घ्यायची इच्छा असणार्यांचा आहे.
8 Jan 2013 - 8:54 pm | सोत्रि
+१
- (भारत सरकार पाकिस्तानला काय प्रत्युत्तर देतेय ह्याची वाट बघणारा) सोकाजी
8 Jan 2013 - 10:01 pm | श्रीगुरुजी
"गाढव लाथ मारते यात गाढवाचा दोष नसुन, गाढव लाथ मारते आहे हे माहित असुन सुद्धा त्याच्या बुडाचा मुका घ्यायची इच्छा असणार्यांचा आहे."
अगदी! इस्राइलपासून भारताने निदान स्भाभिमान तरी शिकावा. पॅलेस्टाईनच्या लोकांनी इस्राईलचा १ सैनिक जरी मारला, तरी त्याच्या बदल्यात इस्राइलचे सैन्य त्यांच्या ३-४ जणांना मारून परत येतात. भारताचे आज पाकड्यांनी २ सैनिक मारले. त्याच्या बदल्यात भारताने एखाद्या पाकी ठाण्यावर हल्ला करून निदान १०-१२ पाकडे सैनिक तरी मारावेत. असे २-४ वेळा झाल्याशिवाय पाकड्यांची खुमखुमी जिरणार नाही.
पण असे होणार नाही. त्याऐवजी आपले पंतप्रधान व गृहमंत्री भारतीयांना शांततेचे आवाहन करून पाकिस्तानला (तोंडी) कडक इशारा देतील व एक निषेधाचा खलिता पाठवतील. बास. विषय संपला. यानंतर पुन्हा एकदा शांतता बोलणी, अमन की आशा, पीपल टू पीपल काँटॅक्ट, भारत्-पाकिस्तान मैत्री क्लबवाल्यांच्या टीव्हीवर मुलाखती व त्यात "सर्वसामान्य पाकड्यांना भारताविषयी कसे प्रेम आहे" वगैरेची उजळणी होईल. आणि दुर्दैवाने हीच मंडळी २०१४ मध्ये भरघोस मताधिक्याने निवडून येतील.
8 Jan 2013 - 11:21 pm | अर्धवटराव
>>त्याच्या बदल्यात भारताने एखाद्या पाकी ठाण्यावर हल्ला करून निदान १०-१२ पाकडे सैनिक तरी मारावेत. असे २-४ वेळा झाल्याशिवाय पाकड्यांची खुमखुमी जिरणार नाही.
-- पाकिस्तान ला खुमखुमी आहे, व ति जिरु शकते असं समजणं म्हणाजे फार भाबडेपणा झाला. पाकि (किंवा कुठलही) सैन्य काहि उद्देश मनात ठेऊन असली कामे करतात. त्याला स्ट्रॅटॅजीक उत्तर आपलं सैन्य निश्चित देत असणार.
>>. त्याऐवजी आपले पंतप्रधान व गृहमंत्री भारतीयांना शांततेचे आवाहन करून पाकिस्तानला (तोंडी) कडक इशारा देतील व एक निषेधाचा खलिता पाठवतील.
-- दार्शनीक लेव्हलला तेच करणे अपेक्षीत आहे. अॅक्चुअल सीमेवर भारत काय प्रत्युत्तर देतो हे प्रसारमाध्यमांकरवी आपल्यापर्यंत कधीच पोचणार नाहि... ते अपेक्षीतही नाहि.
एखादी बातमी येते कि पाकिसैन्याने भारताच्या सिमेवर फायरींग केली व त्यात आपले २ जवान शहीद झाले. प्रत्युत्तरात भारताने देखील फायरींग केली... बस्स बातमी एव्हढ्यावर संपते. तिकडले किती मेले वा जायबंदी झाले हा आकडा आपण अधिकृतपणे देऊ शकत नाहि. पण आपल्या गोळ्या अगदीच व्यर्थ गेल्या असं नाहि ना म्हणता येणार.
अर्धवटराव
12 Jan 2013 - 9:35 pm | सुनील
सहमत.
म्हणूनच अशा बातम्या/लेख "दुसर्याच्या" चष्म्यातून (मिठाच्या खड्यासहित) पहाव्यात!
13 Jan 2013 - 12:20 am | शशिकांत ओक
आता ज्यांनी आपल्या जवानाचे शिर भंजन केले त्यांचे शीर जेंव्हा भारतात आणले जाते ते खरे प्रत्युत्तर ठरेल.
24 Oct 2013 - 1:10 am | ग्रेटथिन्कर
श्रीगुरजी ,९८ ते २००४ पर्यंत केंद्रात फारच स्वाभिमानी लोक होते नै..
कंदहार विमान अपहरण
संसदेवर हल्ला
हाजपेयी की अमन कि बसयात्रा
या यांच्या शौर्यगाथा नै का.
8 Jan 2013 - 11:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आपली संरक्षण यन्त्रणा हजारो कोटी रुपये खर्च करते ते जातात कुठे? जर का आपल्याकडे त्यांच्यापेक्शा चांगली शस्त्र आणि सैन्य आहे तर मग एकदाच ह्या डुकरांचा बन्दोबस्त का नाही करत. जरी समजा पाकिस्तान ला चिन नि पाठिम्बा दिला तरी सुद्धा अणुबोम्ब च्या धाकाखाली त्यान्ना दाबून ठेवायच. साला अस रोज रोज मरण्यापेक्शा लढुन मेलेलं काय वाईट?
(देशाचे वाटोळे होताना पाहाणारा आणि हात चोळत बसणारा) मन उधाण वार्याचे.
12 Jan 2013 - 7:56 pm | नितिन थत्ते
भारत सरकार आणि भारतीय सैन्य सीमेपाशी नेमके काय करत असते हे सरकार मला रोजच्या रोज कळवत नाही हे खरे आहे. त्यामुळे सरकार/सैन्य काहीच करत नाहीये असे मानायला मी मुखत्यार आहे.
लोकसभा, राज्यसभा असे त्यांचे कामकाज दाखवण्यासाठी चॅनेल सुरू केले गेले आहेत. तसेच भारत पाक सीमा, वाघा बॉर्डर, अरुणाचल सीमा, काश्मीर येथील घटना रोजच्या रोज थेट प्रक्षेपित करण्यासाठी वेगवेगळे चॅनेल सुरू करावेत अशी मागणी मी येथे नोंदवत आहे.
12 Jan 2013 - 8:29 pm | पिंपातला उंदीर
एक पुरवणी निषेध. पाकिस्तान ला पाकडे असे न म्हंतल्याबद्दल
12 Jan 2013 - 8:19 pm | अनन्न्या
मी सोनिया या देशाची चालवती प्रधानमंत्री म्हणून पाक हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहे.
चला रे पाकडयानो, आता करा हल्ले, माझा निषेध खलिता टाकून झालाय.
23 Oct 2013 - 8:14 pm | शशिकांत ओक
वा मिया शरीफ,
जेंव्हा अमेरिकेत जाऊन ओबामा काकांच्या गालाला स्पर्ष करून कानाच्या पुढे पंजांना मुडपून 'सदके जावा' असे म्हणता व भारताच्या मागेलागून 'काश्मीरबाबत तेवढं तुम्हीच आमच्या बाजूने मधे पडा' अशी शिकायत करता तेव्हा तुमची 'देहाती औरतां दी गल' केलेली चालते वाटतं ....
अल जवाहिरी, हफीज सईद व दाऊद यांच्यावर ओसामा सारखी कारवाई करून खातमा करायची तयारी त्रिकुट देशांनी एकत्र येऊन केली जावी. कदाचित तशी सुरवातही झाली असेल.
23 Oct 2013 - 8:23 pm | प्रचेतस
काय काका, धागा उगाचच वर काढून जाता काय?
23 Oct 2013 - 10:30 pm | विद्युत् बालक
खेडेगावात एक म्हण आहे " पाण्यात जरी हगले तरी काही वेळानंतर ते वर येते " तसाच काहीसे झाले असावे बहुदा !
23 Oct 2013 - 10:28 pm | शशिकांत ओक
मित्रांनो, विषयाला धरून नव्या काही घटनांचा आढावा घेणारा धागा आधी असल्याचे पाहून त्यातून लेखन केले आहे.
24 Oct 2013 - 12:21 am | विनोद१८
....जे प्रश्न शान्ततेने, चर्चेने, अहीन्सेने, पान्ढरी कबुतरे उडवऊन, एक्मेकान्च्या गळ्यात गळे घालून तुझ्या गळा माझ्या गळा सारखी गाणी गाउन, एकदिलाने चेन्डुफळी खेळुन सुटत असतील तर कशासाठी दारुगोळा वाया घालवून परकीय चलनाचा चुराडा करायचा म्हणतो मी ??? अहो सीमेवर हे असे कधी कधी व्हायचेच की, कशासाठी आपण आपला रक्तदाब एव्हढा वाढवायचा ??? आपली सहनशक्ती अजुन वाढवावी लागेल आपल्याला, आपले विश्वबन्धुत्व जोपासण्यासाठी आणि शेजार्याचे र्हूदयपरीवर्तन होण्यासाठी, तोपर्यन्त जरा धिराने घ्यायला काय हरकत आहे हो ????
विनोद१८
24 Oct 2013 - 8:20 pm | शशिकांत ओक
विनोद 18,
कळवळा जाणवला. धीराने घ्या.. पण किती?
24 Oct 2013 - 9:53 am | मदनबाण
ओक काका एक चांगला सल्ला देतो... एक मेणबत्त्तीचा छोटासा कारखाना टाका, नफा होण्याची पूर्ण खात्री आहे बघा.
पाकिस्तान आपल्या जवानांना हाल हाल करुन ठार मारतो,त्यांची मुंडकी छाटतो,हल्लीच्या काळातच इतके जवान यांनी ठार मारले आहेत की आता अजुन एक जवान मेला ही रोजचीच बातमी वाटावी !
आपल्या देशातल्या लोकांना कसे काहीच वाटतं नाही ? आपले योद्धे असे टिपुन मारले जात आहेत त्या बद्धल राग का नाही ? फक्त मेणबत्ती पेटवली की झाल ?
असो... तुम्ही मेणबत्त्यांचा छोटासा कारखाना टाकाच,फायदा नक्की होईल.
जाता जाता :--- ज्यांना देशभक्ती,राष्ट्रभक्ती,राष्ट्रप्रेम या बद्धल उत्सुकता असेल त्यांनीच फक्त खालचा व्हिडीयो पहायचे कष्ट घ्यावेत.
24 Oct 2013 - 11:52 pm | भटक्य आणि उनाड
आवड्ला,,,,
24 Oct 2013 - 8:58 pm | शशिकांत ओक
मित्रा, खरे आहे.
असे ऐकतो. मेणबत्या चिनी बनावटीच्या असाव्यात व कारखान्यासाठी टेंडर भरायला पाकीस्तानी नागरिकत्वाचा परवाना हवा. दिल्लीच्या इंडिया गेटवर, बाघा सीमेवर अशा मोक्याच्या ठिकाणी आशा अमन काश्मीर की असा बोर्ड लाऊन विकायला परवानगी दिली जावी. इतक्या माफक अटी पूर्ण झाल्या की कामाला लागायला हरकत नाही.
धाक असा दाखवावा लागतो.
24 Oct 2013 - 10:37 pm | विद्युत् बालक
अहो तो गोरा माणूस कायानीची (कायानीच आहे न तो?) बिलियन डॉलर देवून पण अजून भारताची पूर्णपणे वाट का लावली नाही म्हणून खरडपट्टी काढत असेल :D
27 Oct 2013 - 12:33 am | शशिकांत ओक
याबाबत 'ते' काय म्हणतात ते ऐका...
प्लॅन