आवडती जाहिरात

समयांत's picture
समयांत in जनातलं, मनातलं
20 Dec 2012 - 12:17 am

प्लॅटिनमच्या लव्ह बँड ची सध्याची जाहिरात मला खूप आवडते. त्यात नक्की काय घडतंय हे कळत नाही, पण दोघांमधला डोळ्यांतून डोळ्यांमध्ये केलेला संवाद खूप भावून जातो.
त्यामध्ये ती परदेशी जात असल्याने पॅकअप चालू असते, असा माझा कयास आहे. मॉम आणि डॅड अशी लेबलं असलेली शर्टस् एकमेकांमध्ये दिली जातात, यात बहुदा चुकीचं लेबल किंवा शर्ट एक्सचेंज होऊन जातं. नंतर एक पिवळी टॅक्सी एका ओव्हरब्रीजखालून जातांना दाखवली जाते. या पाठीमागे संथ सुंदर संगीत सुरू असते. मग बॅग उचलणारा तो किती उमदा दाखवला आहे आणि फक्त त्याच्या प्रेझेन्सने तिथलं वातावरण गंभीर होऊन जाते, तिला रडू कोसळेल असंही वाटू लागतं. पण त्याऐवजी ती त्याच्या कडे बघत पुढे जाऊन त्याने आपला पेन खिश्यात ठेवला आहे कि नाही बघते, मग तोच चुकीचा का आवडता शर्ट पाहून तिचा ताण सौम्य होतो. याहीपुढे नवीन शर्ट असल्याने कॉलरची पुठ्ठ्याची टेप तशीच राहते, असा काहीही करून त्याचा निष्काळजीपणा अखेरी तिच्या नजरेस पडतो. तो मात्र डोळे माफक झुकवून दिलगिरी व्यक्त करतो.

शेवटी ती मागे वळून पुढे जात असता, तेव्हा तो उभा असतो असा कि हताश त्याच्या प्रेमाशिवाय तो तिथे अपूर्ण आहे...

कलाआस्वादमाध्यमवेध

प्रतिक्रिया

तपशीलात थोडीशी गल्लत झाली असावी असं वाटलं, लग्नानंतर प्रथमच ती एकटी भारतात चालली आहे, आणि आई-वडिलांसाठी घेतलेल्या कपड्यांत, तिने त्याच्या साठी घेतलेला शर्ट, तो चुकून तिच्या बॅगेत घालतोय असं दिसल्यावर ती तो शर्ट काढून त्याला देते, आणि तो शर्ट परिधान करून तो तिला विमानतळावर सोडायला येतो तेंव्हा तिला त्यातली कॉलरची पुठठ्याची पट्टी दिसते असा काहीसा प्रसंग आहे असं वाटतं. बाकी जाहिरातीत बॅकग्राउंड संगीत सोडलं तर काही विशेष वाटलं नाही, पण अखेर beauty lies in the eyes of the beholder हेच खरं, तेंव्हा तुम्हाला ती जाहिरात भावली यातच निर्मात्यांचं यश म्हणायचं. (तुम्ही बहुतेक प्लॅटिनम बँड घेणार असं वाटतं ;-))

समयांत's picture

20 Dec 2012 - 1:39 pm | समयांत

धन्यवाद :),
तिचं निवेदन आणि मागून येणारं संगीत यांच निटसं कानांनी ग्रहण न केल्याने ती परदेशी चाललीय असं वाटलं. असं अडाणी राहूनही काही गोष्टी आवडून जातात त्यात मजा और असते. तुम्ही सर्व नीट सांगितलंय यामुळे बरं वाटलं, विशेष तुम्हांला जरी नाही वाटलंय पण समोरच्याला ते कित्ती विशेष आहे हे ओळखलंत, यात विशेष सर्व आलं.
तुम्ही बहुतेक प्लॅटिनम बँड घेणार असं वाटतं .... नोप्स असं नाही ;)
आणखी एक मला आवडणारी जाहिरात म्हणजे, जेम्सची. एक माणूस जेम्स गोळ्यांनी बनवलेलं म्युरल बघत असतो आणि त्याच्या आवडीच्या रंगाची गोळी ऩकळत तो तिथून काढतो मग भराभर सर्व म्युरल कोसळून पडतं. तेव्हा बिचार्‍या माणसाचा चेहरा अगदीच केविलवाणा होतो, इतर म्युझियमचे केअर टेकर्स या मोठ्या पण बिचार्‍या माणसाकडे पाहत राहतात.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Dec 2012 - 11:21 am | घाशीराम कोतवाल १.२

आमच्या पर्‍याच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....

(परायक पाठलागाचा फॅन )घाश्या कोतवाल

समयांत's picture

21 Dec 2012 - 11:35 am | समयांत

मला इथले प्रोटोकॉल्स अजून माहीत नाही आहेत, असो परा म्हणजे परिकथेतील राजकुमार का?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2012 - 11:46 am | परिकथेतील राजकुमार

रे कोतवाला.

इथे आमच्या आवडत्या जाहिरातीं विषयी लिहायला फार आवडले असते. मात्र आम्हाला आवडणार्‍या जाहिराती सरकारला का आवडत नाहीत हेच कळत नाही. लगेच त्यांच्यावरती बॅन येतो. :( बरं हे एका देशाच्या नाही तर अजूनही बर्‍याच देशांच्या सरकारच्या बाबतीत देखील घडते. त्यामुळे सध्या आम्ही ह्या विषयावरती न बोलण्याचे ठरवले आहे.

समयांत's picture

21 Dec 2012 - 3:01 pm | समयांत

इथे आमच्या आवडत्या जाहिरातीं विषयी लिहायला फार आवडले असते,
लिहा ना प्लीझ त्यासाठीच मी माझ्या आवडत्या जाहिरातीं त्यासाठी इथे टाकतोय.
सरकार म्हणजे कोण पण?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2012 - 3:04 pm | परिकथेतील राजकुमार

इकडे असे काही लिहिले तर इथल्या शीशु वर्गातील पोरांना काय वाटेल ?

शिशुवर्गातल्या पोरांची भारी काळजी तुम्हाला, पोरींची नाही.असो.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2012 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार

आम्ही फक्त १८ ते २५ ह्या वयोगटातील पोरींची काळजी घेतो.

इरसाल's picture

21 Dec 2012 - 3:22 pm | इरसाल

दिल्लीत एव्हढ घडुनही लोक असे करतात म्हणुन मिपालही शरम वाटली असेल आज

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Dec 2012 - 11:44 am | घाशीराम कोतवाल १.२

परिकथेतील राजकुमार हो तेच ते त्यांना सिनेमा आणि जाहिराती पाहाण्याचा जाम आवड आहे

इतक्यातच पाहिलेल्या दोन जाहिराती:

जास्त वयाचा एक बिझनेसमन टाईप इसम कँडल लाईट डिनरवर आपल्या अजूनही तुलनेत तरुण दिसणार्‍या पत्नीला एक सॉलिटेर अंगठी देण्यापूर्वी सेल्फ क्रिटिकल मोडमधे बोलतो. मग तिला विचारतो की तू मला सोडून पळून तर जाणार नाहीस ना. तेव्हा ती अंगठी बघून "किमान दहा वर्षं तरी नाही पळून जाणार" असं सांगते. तेव्हा तो "दहा वर्षं.. उफ.." असा संकटात पडल्याचा भाव आणतो. त्यानंतर तिचं "ऑय.." इतकं झकास आहे की यंव रे यंव.

याखेरीज दोन वृद्ध छोट्या टॅझो किंवा तत्सम खेळण्यांच्या एक्सचेंजवरुन लहान पोरांप्रमाणे हुज्जत घालत असतात. त्यातला एकजण एका टॉयच्या बदल्यात पाच मागतो. बाकी संवाद अगदी सिरियस बिझनेस निगोसिएशनसारख्या सुरात.. मजेदार वाटतं.

समयांत's picture

21 Dec 2012 - 4:28 pm | समयांत

धन्यवाद गवि
ती दुसरी जाहिरात जेम्स गोळ्यांचीच आहे, मला सुध्दा त्यातली कल्पना आवडते अगदी भारतीय वाटते.

किसन शिंदे's picture

21 Dec 2012 - 6:00 pm | किसन शिंदे

याखेरीज दोन वृद्ध छोट्या टॅझो किंवा तत्सम खेळण्यांच्या एक्सचेंजवरुन लहान पोरांप्रमाणे हुज्जत घालत असतात. त्यातला एकजण एका टॉयच्या बदल्यात पाच मागतो. बाकी संवाद अगदी सिरियस बिझनेस निगोसिएशनसारख्या सुरात.. मजेदार वाटतं.

माझी आवडती जाहिरात. :D

यंव रे यंव म्हणजे काय असतं ते ??

वादळ's picture

21 Dec 2012 - 11:22 pm | वादळ

धारा तेलाची ति जुनी जाहिरात जलेबी वाली अनि टाइम्स ओफ इन्डिया ची

समयांत's picture

23 Dec 2012 - 9:03 pm | समयांत

वादळ,
धन्यवाद. धारा तेलाची जिलेबीची जाहिरात ही सर्वांसाठी ऑल टाईम फेव्हरिट असावी. त्या जाहिरातीतल्या मुलग्याची चांदी झाली असावी. ;)
टाइम्स ची कोणती जाहिरात मला लक्षात नाही आले, जरा सांगाल का पूर्ण?
बाकी टाइम्स ऑफ इन्डिया बद्दल माझं मत तसं पूर्वग्रहदूषित आहे.

वादळ's picture

23 Dec 2012 - 11:13 pm | वादळ

टाइम्स ऑफ इन्डिया बद्दल मला जास्त माहीत नाही पन त्यांची तुम चलो तो हिन्दुस्तान चले हे गाणं असलेलि जाहिरात आहे.लिन्क देता येत नाहिये मला,पण युट्युब वर जाहीरात आहे.

आनन्दिता's picture

24 Dec 2012 - 1:46 am | आनन्दिता

ती नाही का ती.. सर्फ एक्सलची... दोन छोटी बहिण भाऊ असतात... शाळेतुन घरी येत असतात... बहिण चिखलात पड्ते न ललु लागते.. मग भाऊ त्या चिखलाच्या ड्बक्याला " ए क्या रे तुने मारा इसको " असं म्हणुन जे बदड्तो.... अन् शेवटी दाग अच्छे है असं सांगतात ,, ती जहिरात आवड्ते मला..

नानबा's picture

25 Dec 2012 - 9:01 am | नानबा

मला आवडलेली जाहिरात म्हणजे एका प्रसिद्ध अल्कोहोल ब्रॅंडची. सुमित राघवन बायकोसाठी हि-याची अंगठी घ्यायला शोरूममध्ये गेला आहे. काऊंटरवरचा माणूस त्याला १ कॅरेट, ३ कॅरेट अशा हि-याच्या अंगठ्या दाखवतो, आणि सहज विचारतो, "कब है ऍनिव्हर्सरी?" सुमित राघवन सांगतो, "कल थी. " हे ऐकून काऊंटर वरच्या माणसाचे भाव क्षणात बदलतात, आणि तो ५ कॅरेटची अंगठी काढून दाखवतो. शेवटी लाईन येते, "मेन विल बी मेन".. लय भारी जाहिरात. दोघांच्या चेह-यावरचे भाव, ऍनिव्हर्सरी कल थी कळल्यावर दुस-या माणसाच्या भावातला बदल, आणि संपूर्ण जाहिरातीत मागे मंद आवाजात ऐकू येणारी "प्यार की राह मे चलना सिख" ही गझल. एक नंबर. याच ब्रॅंडच्या इतर जाहिराती पण असल्याच जबराट..

कोल्हापुरवाले's picture

25 Dec 2012 - 11:10 am | कोल्हापुरवाले

त्यान्चिच अजुन १ ,ज्या मधे सुमित त्यच्या बायकोचे नाव आठवत आसतो.
फुलाचे नाव काय आसत?..... ऱोज .....आणी एन्ड ला तो "रोज डाल्रीन्ग" म्हण्तो...

दुसरी जाहीरात !!

ज्या मधे तो विचारतो...क्या हुआ?.... त्याचा मित्र म्हण्तो कुछ नही....वाईफ का टुर क्यान्सल हो गया.
शेवटी लाईन येते, "मेन विल बी मेन"..

वपाडाव's picture

25 Dec 2012 - 1:24 pm | वपाडाव

मालक, लिफ्ट मध्ये २०व्या माळ्यावर जाउन तळघाराला परत येणार्‍या माणसाची जाहिरात विसरलात का?
http://www.youtube.com/watch?v=4XQ7x7c2hkQ

नानबा's picture

25 Dec 2012 - 9:05 am | नानबा

ही आणखी एक लय विनोदी, बरीच जुनी आणि लोकांच्या विस्मृतीत गेलेली दंगा जाहिरात..

http://www.youtube.com/watch?v=pf1_zf542xI

समयांत's picture

25 Dec 2012 - 7:40 pm | समयांत

प्रथम
प्रथम ती जाहिरात इथे सांगा तरी काय आहे, तो दंगा आपल्या शब्दांत ऐकायला खरी मजा येईल आणि मिपाकर ती जुनी जाहिरात आपण परत स्मृतीत आणल्याबद्दल आभार मानतील. असो. लिंक मला तरी बघता आली नाही, येथील प्रस्थापित मिपाकरांनी ती पाहिली असावी बहुतेक ;)

मदनबाण's picture

25 Dec 2012 - 10:09 am | मदनबाण

ह्म्म... माझा आवडता विषय ! :)

सगळ्यात पहिल्यांदा मला सध्याची आवडलेली जाहिरात इथे देतो, ती आहे ICICI Bank - Love surprises यांची. जाहिरातीतले संगीत,जिंगल,लोकेशन आणि चिंटुकली मुले आणि एकुण जाहिरातीची कल्पनाच मला फार आवडली. :)

https://www.youtube.com/watch?v=yX45sau4EHM

या खालील दोन्ही जाहिराती मध्यप्रदेश टुरिझमच्या आहेत्,यातील कल्पकता आणि जिंगल दोन्ही मुळे मला या फार आवडल्या.:)

https://www.youtube.com/watch?v=8OkKNx0rhQc

https://www.youtube.com/watch?v=9OwwFEqnw7Y

समयांत's picture

25 Dec 2012 - 8:06 pm | समयांत

मदनबाण
धन्यवाद आपल्या आवडत्या जाहिरातींबद्दल, पण मला फक्त नाव ऐकून मजा नाही आली ब्वॉ.
जिंगल्स मध्ये ती अमित त्रिवेदीने कॉम्पोझ केलेली मन उछ्ल उछ्ल जाय भारी आवडते.
दरेक बीट्सला असणारे मस्त अ‍ॅनिमेशनमुळे मनही तसंच उडू लागतं :) ;)

कोल्हापुरवाले's picture

25 Dec 2012 - 11:01 am | कोल्हापुरवाले

तशी जुनि जहिरात आहे ही,मेन्टोस चोकलेट चि
येकदम सुपर होति... मणसाची उत्र्क्रान्ती दखवलि होति.
गाधअजुन पर्य्न्त लक्श्यात राहिलेलि

वपाडाव's picture

25 Dec 2012 - 1:26 pm | वपाडाव

ही कॅडबरीची जाहिरात मला लय आवडते...
http://www.youtube.com/watch?v=UbIFGCo1Kq8

समयांत's picture

25 Dec 2012 - 8:00 pm | समयांत

वपाडाव
हा.. सिदला बघू पण आधी त्या जाहिरातीतल्या बाकी डिटेल्सना बघू.
आपल्या शब्दांत ऐकायला आवडेल. ;)

वपाडाव's picture

26 Dec 2012 - 6:51 pm | वपाडाव

ते मला सांगता नाही यायचं...
मेलडी खाओ खुद जान जाओ...

नानबा's picture

25 Dec 2012 - 8:23 pm | नानबा

आवं, म्या लय प्रयत्न केला, पन मला हिकडं लिंकच देता येत न्हाई बगा.... कसं करायचं थोडं सांगा की...

स्पा's picture

25 Dec 2012 - 8:31 pm | स्पा

चान चान

समयांत's picture

25 Dec 2012 - 8:41 pm | समयांत

चान चान सांकेतिक काही आहे का? बर्‍याच 'नवमिपाकर' धाग्यांवर पाहिलेय मी.
असो. आपली एखादी आवडती जाहिरात? ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Dec 2012 - 6:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

चान चान सांकेतिक काही आहे का? बर्‍याच 'नवमिपाकर' धाग्यांवर पाहिलेय मी.

स्पा, तुला ते 'नवमिपाकर' म्हणताहेत बहुतेक ;-)

असो. आपली एखादी आवडती जाहिरात?

त्यांना स्वतःचीच जाहिरात (करायला) आवडते.

कवितानागेश's picture

26 Dec 2012 - 9:44 pm | कवितानागेश

मला स्पाची ही जाहिरात आवडते. ;)

बॅटमॅन's picture

31 Dec 2012 - 2:30 pm | बॅटमॅन

मलापण.

स्पा's picture

31 Dec 2012 - 4:49 pm | स्पा

धन्यवाद

किसन शिंदे's picture

26 Dec 2012 - 11:40 pm | किसन शिंदे

ते जाऊ द्या हो दक्षिण मुंबईकर्..तुमची आवडती जाहिरात कोणती ते सांगा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Dec 2012 - 4:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे

जाउ द्या हो मध्य मुंबईकर्(खरे तर मध्य भारतकर), आम्ही हल्ली खूपच पेटलेले असल्याने आमच्याकडून खूप चुका होतात आताशा. त्यामुळे राहू देत ;-)

किसन शिंदे's picture

27 Dec 2012 - 11:06 pm | किसन शिंदे

आम्ही हल्ली खूपच पेटलेले असल्याने आमच्याकडून खूप चुका होतात आताशा. त्यामुळे राहू देत

ब्वॉर्रर्र!! ;)

अभ्या..'s picture

25 Dec 2012 - 8:59 pm | अभ्या..

चान चान चा अर्थ ना ?
त्याचा अर्थ असा आहे की की नव्याची नवलाई आता सोडा.
रोज रोज गजरा काय गप्प पिशव्या घेऊन भाजी आणायला पळा.

समयांत's picture

25 Dec 2012 - 9:10 pm | समयांत

आणखी बाहेर आलेत सांकेतिक शब्द, अरे पूर्ण वाक्यंच आलंय की. :-D
मिपाची परिभाषा लयी डेन्जर आहे बा!

वपाडाव's picture

26 Dec 2012 - 6:46 pm | वपाडाव

आपण विदर्भवासी आहात का?

समयांत's picture

30 Dec 2012 - 2:25 pm | समयांत

विदर्भाशी माझा संबंध यानिमित्ताने 'प्रस्थापित' झाला.
नुकतीच पाहिलेली वाईट्ट जाहिरात म्हणजे, इन्वेस्टेमेंटच्या तक्रारी घेऊन आलेला नोकरदार माणूस आणि त्याला लटकवत ठेवणारी टेबलापलीकडची दरवेळेस बदलणारी मंडळी, त्यांचीही बदलणारी वाक्ये फक्त काम पुढे ढकलणे कॉमन. सेबीची आहे. :~

सध्या एक जाहिरात शोधत आहे, जी सापडत नाहीये... तो पर्यंत खालील जाहिरात पाहु शकता ! ;)
Tata DOCOMO - Bus Stop
https://www.youtube.com/watch?v=IiicXtqFoMQ

समीरसूर's picture

26 Dec 2012 - 4:50 pm | समीरसूर

खूप इंटरेस्टींग विषय!

माझ्या आवडत्या जाहिराती:

गुड डे बिस्कीटांची - दोन मुले एका गाडीमागे धावताय आणि ती गाडी बिस्कीटाचे पुडे पाडतेय. त्या मुलांचा गुड डे होतो. खूप मस्त कनेक्शन जुळवलं आहे. ब्रँड लक्षात राहतो एकदम!

जेम्स - वर सांगीतल्याप्रमाणे म्युरल बघतांना गोळी काढणे आणि शेवटी इतकं घडूनही ती गोळी तोंडात टाकणे. मस्त जमली होती जाहिरात.

कॅडबरी - मुलगा मुलीकडे शुभ काम करण्याआधी गोड काहीतरी मागतो...मुलगी झकासच होती. कॅडबरीने काय हुशारीने सेगमेंट्स तयार केले आहेत. लहान मुले, टीनेजर्स, प्रौढ, वृद्ध्...सही ब्रँडींग!

मॅक्स इंश्युरन्स - एजंटच्या मागे लपलेला राक्षस खोटं बोलायला सांगतो...पण एजंट खोटं बोलत नाही.

कोक - एक जाहिरात होती; एका मुलाला दिवाळीसाठी घरी जायचं असतं आणि तो रस्त्यात लिफ्ट मागत उभा असतो. कोक ओपन हॅपीनेस!

मारुति - कितना देती है? जबरदस्त कनेक्शन!

डोकोमो - अधुरी कहानी - "मोहिनी, मोहिनी...ये तुम क्या कर रही हो..मोहिनी..." बायको संतापते. नवरा झोपेत पुढे म्हणतो, "मोहिनी बॅलन्स शीट मे एन्ट्री ऐसे करते हैं क्या?" - मस्त आयडिया पण ब्रँड कनेक्शन खास जमले नव्हते.

बजाज डिस्कवर - एक अॅड सीरीज यायची. डिस्कवर इंडिया की काहीतरी. त्यात ते एखाद्या प्रसिद्ध ठिकाणावर बजाज डिस्कवर कशी जाऊ शकते वगैरे दाखवायचे. कनेक्शन जमले होते.

नोकरी.कॉम - हरी साडू - मस्त स्टोरी आणि आयडिया.

सायकल ब्रँड अगरबत्ती - भगवान है!

बाकी निरमा, एमडीएच की देगी मिरच, ऑरेंजी बुलबुले, हो शुरु हर दिन ऐसे हे जिंगल्स खूप छान असल्याने ब्रँडस लक्षात राहिले आणि जाहिरातींचा उद्देश सफल झाला. नुसती जाहिरात लक्षात राहिली आणि ब्रँडच लक्षात नाही राहिला तर जाहिरात फार उपयोगात पडत असेल असे वाटत नाही. असो. प्रतिक्रिया छान आहेत. चालू द्या. मजा येतेय. :-)

दादा कोंडके's picture

26 Dec 2012 - 5:33 pm | दादा कोंडके

टिवी बघायचं काही हजार वर्षांपुर्वीच सोडून दिलं असल्यानं शक्य असल्यास युट्युब लिंका द्याव्यात.

आपण तर डीरेक्टरीच उघडली की.
आपली प्रतिक्रिया पण मस्त आहे ;) धन्यवाद
हा धागा कितपत आवडतो आणि टिकतो ते मिपा ब्रँड ठरवेल.
:)

लेझर ब्लेड्स तकनीक का अनोखा चमत्कार.. शेविंग की दुनिया में नया उपहार.. ज्यादा तेज धार..

भरपूर फसल लाये सरदार.. लक्ष्मी का है ये वरदान.. नवयुग का संदेश है सरदार.. सरदार..

जुन्या काळात घुसलं तर आवडल्या नावडलेल्या पेक्षा डोक्यात घुसून राहिलेल्या बर्‍याच आठवतात. नवीन काळातली ब्रिटानिया बिस्किटांची बहुधा.. ट्रक ड्रायव्हर स्पीड ब्रेकरवरुन नेमके एकदोन पुडे बाहेर सांडून जात असतो पोरांसाठी..

परिकथेतील राजकुमार's picture

26 Dec 2012 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार

जळणाला लाकूड, गुरांना चारा, गाठीला पैका घरच्या घरी, सामाजिक वनीकरण येता दारी,

गवि's picture

26 Dec 2012 - 6:04 pm | गवि

-फिनोलेक्सनं आणलं पाणी शेतं पिकली सोन्यावाणी.

-लाडा लाडा सबमर्सिबल पंप

-महाबीज बियाणे- संकरित बियाणे..

-दो बकेट पानी अब बचाना है रोजाना.

-टायगर कडक पत्ती चहा.. वाघासारख्या मर्दांसाठी..

-पनामा.. मला जे हवं ते मी मिळवतोच..

-मला काहीतरी घ्यायचंय, मलाही काहीतरी घ्यायचंय.. काय घ्यायचंय? रेडिओ.. कोणता? फिलिप्स.

लाडा पंप पाहून गतजन्मीच्या आठवणींनी डोळे पाणावले. मगदूम चहा, जीएस चहा ताजा/माझा चहा, राधिका हायस्कूल रोड मिरज, इ.इ.इ. एवंगुणविशिष्ट अनेकोत्तम झैराती आठवल्या.

मदनबाण's picture

26 Dec 2012 - 7:08 pm | मदनबाण

Nogi
हे पण आठवल ! ;)

गवि's picture

26 Dec 2012 - 7:18 pm | गवि

@ब्याटम्यानः

महाद्वार रोड कोल्हापूर इथली साडी शोरूम कुठली तेच आठवेना तेजायला.

डिंपल साडी हाऊस का?

एग्झॅक्टलि गविशेठ!!! सप्तरंगी साड्यांचा, साड्यांचा खजिना पहा, डिंपऽल साडी हौस, डिंपऽल होऽओऽऽ!!!

ह भ प's picture

26 Dec 2012 - 6:20 pm | ह भ प

मनातलं बोललात प.रा. शेठ!! अगदी अगदी हिच टाकणार होतो..

तिमा's picture

26 Dec 2012 - 6:13 pm | तिमा

बघता बघता मिपाचे 'चेपु' कधी झाले कळलेच नाही. चान चाललंय !

समयांत's picture

30 Dec 2012 - 2:32 pm | समयांत

काय जाहिरात आहे, मिपाची कि चेपुची हो? ;)

प्रियाकूल's picture

26 Dec 2012 - 6:19 pm | प्रियाकूल

"पोरीsssss,ए पोरी,पावनं आलं बग."
भाऊ लोक चिडवायचे..तुला पण असचं बोलवतो आम्ही तू मोठी झाली कि. त्यामुळे चांगली लक्षात आहे.

मी-सौरभ's picture

26 Dec 2012 - 7:08 pm | मी-सौरभ

च्या सगल्या झैराति भारी असतात, स्पेशली ति पकडे रहना छोडना नही वाली तर भारीच :)

मालोजीराव's picture

26 Dec 2012 - 8:20 pm | मालोजीराव

- स्कूल चले हम

- स्वच्छतेतून समृद्धीकडे (संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान)

- पप्पू डोंट बी शाय

सुजित पवार's picture

26 Dec 2012 - 8:31 pm | सुजित पवार

सपट चहा चि जाहिराति रेडिओ वरचि..
फेविकोल च्या सर्व जाहिराति
हमारा बजाज...ये जमि ये आसमान... http://www.youtube.com/watch?v=vP8pzgPvGIs
पुरब से सुर्य उगा.... http://www.youtube.com/watch?v=Va_ml6k7_Fk
जरासि हसि प्यार जरासा..अमुल टेस्ट ऑफ इन्डीआ...http://www.youtube.com/watch?v=RW9DSUbZX34

इष्टुर फाकडा's picture

26 Dec 2012 - 8:38 pm | इष्टुर फाकडा

समस्त पुरुष जातीला आवडेल अशी जाहिरात :

इष्टुर फाकडा's picture

26 Dec 2012 - 8:40 pm | इष्टुर फाकडा

अर्र मुद्याचं राहिलंच की,

हि घ्या

मी-सौरभ's picture

27 Dec 2012 - 4:08 pm | मी-सौरभ

हमदर्द का टॉनिक सिंकारा :)

कसला विचार करतोस रामैय्या ?
.
.
पुढ्च्या ओळी मी सांगायला नको. जुनी रडिओ वरची जाहिरात आहे, सिमेंटच्या पत्र्याची.

किसन शिंदे's picture

27 Dec 2012 - 11:08 pm | किसन शिंदे

पुढ्च्या ओळी मी सांगायला नको. जुनी रडिओ वरची जाहिरात आहे, सिमेंटच्या पत्र्याची.

दुरदर्शनवर सातच्या बातम्यांआधी हि जाहिरात बर्‍याच वेळा पाहिली आहे.

श्रीरंग_जोशी's picture

27 Dec 2012 - 11:18 pm | श्रीरंग_जोशी

एव्हरेस्ट सीमेंट की चादरे....

एव्हरेस्ट बडी मजबूत,
एव्हरेस्ट बरसों चले...

स्व दारासिंग हे त्यात अ‍ॅस्बेस्टॉसचा पत्रा डोक्यावर घेऊन उभे राहायचे मग त्यावर माकडे उड्या मारायची, जोराचा पाऊसही पडायचा....

नंदन's picture

30 Dec 2012 - 3:23 pm | नंदन

आयपीएल - मनुरंजन का बाप : http://www.youtube.com/watch?v=UaJEnnvfVEY

ऋषिकेशच्या सर्वेक्षणावरून आठवलेली ही जाहिरातः
http://www.youtube.com/watch?v=B8RuO2564hE

नंदन's picture

30 Dec 2012 - 3:25 pm | नंदन

ही अजून एक - http://www.youtube.com/watch?v=lE38MxQLYwo

बॅटमॅन's picture

31 Dec 2012 - 2:30 pm | बॅटमॅन

काऽऽय झालं???

बाळ रडत होतं.

वुड्वर्ड्स ग्राईप वॉटर दे त्याला. तू लहान असताना मीही तुला हेच देत होते.

ही झैरात लै आवडायची-पार पणजीपर्यंत कॅरॅक्टर्स दाखवली असल्यामुळे. मी माझ्या पणजीला पाहिले असल्यामुळे ती जाहिरात विशेष आवडायची.

नंतर आम्ही कैकदा त्या जाहिरातीमधील "वुड्वर्ड्स ग्राईप वॉटर दे त्याला." ऐवजी "दोन लाथा घाल त्याला" हे वाक्य घालून पुढे मग "तू लहान असताना मीही तुला हेच देत होते" अशी पुस्ती जोडत असू.

चला.. या निमित्ताने मग,
-बाळाला द्या बॉन बॉन बाळ होईल गुटगुटीत छान..
-डाबर जनम घूंटी (की घुट्टी)
-जीपला ग्राईप वॉटर
-जीवदया नेत्रप्रभा नेत्रप्रभा.. (जीवद्या असा वाचायचो मी जाहिरातीतला शब्द)
-पोरवाल नेत्रांजन.

बहुधा यापैकी बर्‍याचशा जाहिराती एसटी बसच्या सर्वात पुढच्या लांब सीटच्या वरती मध्यभागी पत्र्याच्या प्लेटवर असायच्या का?

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2012 - 2:39 pm | टवाळ कार्टा

"बाळाला द्या बॉन बॉन बाळ होईल गुटगुटीत छान.."
याची २ विडंबने आठवली ;)

कापावी लागतील, त्यामुळे मनातच असूदेत.. :)

बॅटमॅन's picture

31 Dec 2012 - 2:52 pm | बॅटमॅन

बहुधा यापैकी बर्‍याचशा जाहिराती एसटी बसच्या सर्वात पुढच्या लांब सीटच्या वरती मध्यभागी पत्र्याच्या प्लेटवर असायच्या का?

हो अगदी अगदी..

दिव्यश्री's picture

7 Jan 2013 - 11:13 pm | दिव्यश्री

बेबी क्रिम......
http://www.youtube.com/watch?v=GNVeKJj8roU

बेबी शाम्पू....
http://www.youtube.com/watch?v=5jVPEJQI52s

वाह ताज.....
http://www.youtube.com/watch?v=6vV92WYS2Mk

कॅड्बरी जेम्स-रन्गीन पान्डा.....
http://www.youtube.com/watch?v=iE1-FIZMy3s

हमारा बजाज.....:)
http://www.youtube.com/watch?v=xEV8MWd1p3M

सन्जयखान्डेकर's picture

9 Jan 2013 - 11:11 am | सन्जयखान्डेकर

कॅड्बरी ची जाहिरात ज्यात एक मुलगी क्रिकेट मैदानात नाचत जाते, अमुलच्या सर्व आणि फेव्हिकोलच्या सर्व जाहिराती प्रेक्शणिय.

नि३सोलपुरकर's picture

9 Jan 2013 - 12:17 pm | नि३सोलपुरकर

कुकर ची जाहीरात (बहुतेक प्रेस्टीज ची असेल) बेगग्राउंड ला गाण वाजायचं "चंदन सा बदन..चंचल ...

@इष्टुर फाकडा साहेब : मस्त जाहीरात आहे धन्स.

आणी वर तिमा यांच्या प्रतिसादाशी १०१% बाडीस.

मदनबाण's picture

25 Aug 2013 - 4:58 pm | मदनबाण

सध्या माझी आवडती जाहिरात टाटाच्या नॅनो कारची आहे
Celebrate Awesomeness {With Lyrical }

जॅक डनियल्स's picture

25 Aug 2013 - 10:01 pm | जॅक डनियल्स

मला सगळ्या जगातल्या जाहिराती बघायला खूप आवडतात. म्हणजे लोकं जशी सिनेमाची गाणी बघतात तश्या मी तूनळी वर जाहिराती बघतो. माझा स्पष्ट मत आहे की, भारतात ज्या जाहिराती आहेत त्यांची लोकांपर्यंत पोहोचायची क्षमता खूप जास्त आहे. त्या खूप डोकं लावून केलेल्या कलाकृती आहेत. इकडच्या अमेरिकेतील जाहिरीती फार गरीब असतात, फक्त चांगल्या बायका आणि गाड्या दाखवतात, बाकी कलाकृती सारखे काही नसते.
ही खालची जाहिरात बघा, वेदर पेंट ची जाहितात आहे,
वेदर पेंट जाहिरात

मदनबाण's picture

31 May 2014 - 11:16 am | मदनबाण

सध्या आवडल्या गेलेल्या जाहिराती देतो :-
Imperial Blue ची Men will be Men ची नविन जाहिरात :-

आता OLX ची O Womaniya आणि याचाच सिक्वेल.

जाता जाता :- OLX च्या O Womaniya चे वरिजनल गाणं.

आत्मशून्य's picture

31 May 2014 - 5:19 pm | आत्मशून्य

कोणाला आठवते काय ?

काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी व्हॉट्सअपवर पाठवलेली ही सुंदर जाहिरात... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- EnUchimandai... :- Vettaikaran