भगीरथ अभियंता होता ?? एक विचार

आप्पा's picture
आप्पा in जनातलं, मनातलं
14 Aug 2010 - 6:46 pm

नुकतेच भगीरथ ही रविंद्र भट लिखीत कादंबरी वाचली. कादंबरी बरी वाईट हे लिहीण्यासाठी हा धागा नाही पण त्यात जो विचार लेखकाने मांडला होता तो मिपा वाचकांना समजावा हा उद्देश.
लेखकाने मांडलेल्या मतानुसार, आर्य हे टोळ्याने भारतात आले. त्यापैकी एका टोळीचा नायक विश्वामीत्र होता. भारतातील मुळ रहिवासी हे शेती, व्यापार करावयाचे. त्यानी गावे वसविली होती. ते सुस्थीतीत रहात होते. आर्य हे आक्रमक होते. मुळ रहीवाश्याकडे आर्यांसारखी आधुनीक शस्त्रे नव्हती. आक्रमक आर्यानी अन्नासाठी मुळ रहिवाश्यावर आक्रमण केले. त्याना दास (दस्यु) बनविले. त्यांच्याकडुन शेती शिकली. त्यांच्या बरोबर विवाह संबध जुळवले. आपली राज्ये स्थापन केली.विश्वामित्राचे वंशज मनु याने अयोध्येची स्थापना केली. त्याचा पुत्र इक्ष्वाकु. इक्ष्वाकुच्या नावाने तो वंश प्रसिध्द झाला.
(याच वंशात पुढे श्रीरामाचा जन्म झाला.)
या वंशात सगर नावाचा राजा झाला. त्याच्या काळात भयंकर दुष्काळ पडला. त्याच्या मनात विचार आला हिमालयातील बर्फाचे पाणी जे उत्तरेकडे वाहुन जाते. ते जर वळवुन भारतात आणले तर येथे परत पाण्याचा दुष्काळ पडणार नाही.त्याने ६० हजार नागरीक घेऊन हिमालयाकडे प्रयाण केले. निसर्गाशी व रानटी टोळ्याशी लढता लढता त्याचे निधन झाले. पुढे त्याच्या वंशजानी हे कार्य चालु ठेवले. त्याचा खापर पणतु भगीरथ याने हे कार्य पुर्ण केले. बांध घालुन हिमालयातील दरीत पाणी अडवले. व बाजुच्या पर्वतातील गुहा आरपार कोरुन त्या गुहेतुन ते पाणी भारताकडे वळवले. या कामी भारतील इतर राजकुलांचे ही सहकार्य झाले. व मानवी प्रयत्नातुन गंगा भारतात आली.

वाङ्मयआस्वादमत

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

14 Aug 2010 - 6:58 pm | स्पंदना

काय माहिती नाही हो पण अस म्हणतात की कौरव हे टेस्ट ट्युब बेबीच पहिल उदाहरण .
आपल्या महाकाव्य लेखकांची भरारी इतकी उत्तुन्ग होती की ते त्यांच्या त्या वेळच्या शास्त्रीय भाषेत हे सर्व लिहित होते आणी आजची शास्त्रीय भाषा आन्ग्लौत्पन्न आहे, म्हणुन आपण त्या सर्व प्रकाराला भाकड कथा मानतो, देव जाणे.

पण एक सांगा अस एका दरीत जर गंगा उत्त्पन्न झाली असेल तर आज जो आपण पहातो तो उगम असा शंकराच्या जटेच्या आकाराच्या दगडातुन कसा बाहेर पडतो, अन या तुम्ही वर्णीलेल्या कादम्बरीतील गुहांचे ठाव ठीकाण सुद्धा असायला हवे नाही का?
काही अधिक उण असेल तर क्षमस्व!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2010 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कठोर प्रयत्नासाठी भगीरथाचे नाव दिले जाते. भगीरथाच्या काही आणखी कथा इथेही वाचायला मिळतील.

>>>>भगीरथ ही रविंद्र भट लिखीत कादंबरी वाचली
कादंबरीचीही जमेल तेव्हा ओळख करुन द्या.....!

-दिलीप बिरुटे

पाषाणभेद's picture

14 Aug 2010 - 8:08 pm | पाषाणभेद

आधुनिक इतिहासकारांच्या मते आर्य भारतात आलेच नव्हते. हिंदू हे आर्यांपासून झाले हा विचारही चुकीचा आहे. आर्य म्हणजे नवर्‍याचे संबोधन होते. जसे 'अहो' च्या ऐवजी आर्य. महाभारतातही पर्यायाने गीतेतही आर्य हा शब्द याच अर्थाने आलेला आहे. जाणकारांना भाष्य करावे.
बाकी भगीरथ अभियंत्याच्या जातकुळीचा असावा हे मान्य

अप्पा जोगळेकर's picture

15 Aug 2010 - 9:21 am | अप्पा जोगळेकर

प्रचंड गोंधळ आहे. मीआर्य या शब्दाचा अर्थ 'to till' म्हणजे शेती करणे असा आहे असं मी नेहरुंनी लिहिलं आहे असं मी इथे म्हटलं होतं. तसेच आर्य या शब्दाचा 'Noble' असाही अर्थ होतो असंही ऐकलं आहे.
आधुनिक इतिहासकारांच्या मते आर्य भारतात आलेच नव्हते.
याबाबतही खूप कल्ला चालू असतो. कास्ट जेनेटिक्स आणि लिंग्विस्टिक्स वापरुन दोन्ही बाजू एकमेकांशी भांडत असतात.

झंम्प्या's picture

14 Aug 2010 - 8:55 pm | झंम्प्या

सदरच्या लेखात उल्लेखलेली बाब हि तात्विक दृष्ट्या मनाला पटणारी आहे... ह्यालाच धरून अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते.. वाचकांना हे विषयांतर वाटेल पण तरीही नमूद कारावास वाटत... नुकतच इरावती कार्वेंचा युगांत पुस्तक वाचनात आलं... त्यांनी ह्या पुस्तकात महाभारतातील व्यक्तिरेखांचे खूप छान शास्त्रीय दृष्ट्या विवेचन केलेलं आढळत.. ह्या विवेचनावरून माझ्या वैयक्तित महाभारताविषयी असणार्या कल्पनांना तडा गेला व नवीन विचार, नवीन दृष्टी मिळाली महाभारताकडे पाहण्याची.. येथे लेखकाने जो मुद्दा मांडला आहे तो तात्विक दृष्ट्या पटण्यासारखा आहे अस माझं वैयक्तित मत आहे.....

प्रशु's picture

15 Aug 2010 - 7:17 am | प्रशु

दुर्गा भागवतांचं व्यासपर्व देखील वाचा, पे॑स आणी 'दुर्गाबाईशीं गप्पा' हे प्रतिभा रानडे ह्यांच पुस्तक देखील जरुर वाचा खुप छान माहीती मिळेल....

राजेश घासकडवी's picture

14 Aug 2010 - 11:09 pm | राजेश घासकडवी

गंगा ही या विशिष्ट मार्गाने गेली फक्त काही हजार वर्ष वाहाते आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्याला दुजोरा देणारा भूगर्भशास्त्रीय पुरावा काही आहे का? अन्यथा ही कवीकल्पना राहील.
दुसरी शक्यता अशी आहे की भगीरथाने जर एखाद्या नदीचं पाणी वळवून त्याच्या गावाकडे आणलं असेल तर त्या पाण्याला लोकांनी 'गंगाच जणू' असं म्हटलं असेल.
शेकडो मैल दूर, हिमशिखरांत जाऊन एखाद्या नदीचा ओघ बदलणे हे त्या काळच्या संसाधनांच्या, तंत्रज्ञानाच्या आणि विचारशक्तीच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटतं. साठ हजार माणसं कित्येक पिढ्या या कामाला लावायच्या - केवळ पाणी मिळवण्यासाठी - मग त्या काळात त्यांच्या शेतांचं काय? वगैरे प्रश्न उभे राहातात.

मृत्युन्जय's picture

15 Aug 2010 - 12:35 am | मृत्युन्जय

मान्य की ही कविकल्पना वाटते. पण फक्त तर्कशास्त्राच्या कसोटीवर तासुन बघायची असेल तर मूळ कथेपेक्षा जास्त तर्कशुद्ध वाटते की नाही?

राजेश घासकडवी's picture

15 Aug 2010 - 4:19 am | राजेश घासकडवी

माझ्यामते तर्कशुद्धता ही गरोदरपणासारखी असते - ती असते किंवा नसते. तुम्हाला शक्यता म्हणायचं आहे बहुतेक. तसं असेल तर बरोबर. 'गंगा नदी कुठल्यातरी स्वर्ग नावाच्या भागातून मानवाने, आपल्या प्रयत्नाने जमिनीवर आणली' हे सत्य मानलं तर ते या कथेत सांगितल्याप्रमाणे घडलेलं असण्याची शक्यता खूपच अधिक आहे.

पण मुळात जी कविकल्पनाच आहे, कथा आहे, तिला सत्याचा आधार शोधण्याचा प्रयत्न करणं हा द्राविडी प्राणायाम होतो. त्यापेक्षा मुळात त्या विधानातली नदी गंगा नव्हतीच, किंवा मुळात ती नदी नव्हतीच - छोटासा ओढा होता वगैरे गोष्टी अधिक संभाव्य आहेत. किंवा मनोरंजनासाठी कोणीतरी रचलेली कथा असेल, हे अधिकच शक्य आहे.

असा द्राविडी प्राणायाम करून अर्थातच उत्तम कथा होऊ शकेल कदाचित. पण कथेचं सौंदर्य तो प्राणायाम किती चांगला जमला आहे यावर ठरू नये असं मला वाटतं. याउलट चांगल्या कथेसाठी वाचक अनेक अशक्य गोष्टी चालवून घ्यायला तयार असतो.

स्वर्ग म्हणजे कदाचित हिमालय आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश असावा...तेथील लोकांची वयोमर्यादा इतरांपेक्षा जास्त असते असे म्हणतात....उदा. बौद्ध भिक्षु वगैरे लोक..

आता भगीरथाचे म्हणाल तर कदाचित त्याने तसा प्रयत्न केलाही असेल...कथेप्रमाणे त्याच्या वंशजांनी ते काम पूर्ण केले त्याने नाही...अगदीच अशक्य म्हणता येणार नाही...त्या नदीचे पाणी वळवण्यापूर्वी जे काही छोटे ओढे, नद्या असतील त्याचा वापर शेतीसाठी आणि इतर कामांसाठी केला असेल...दुष्काळ काही एवढा काळ टिकत नाही..म्हणूनच शक्य असावे असे वाटते.

बाकी, इतर जाणकारांनी आणि अभ्यासूंनी प्रकाश टाकावा.

आळश्यांचा राजा's picture

24 Aug 2010 - 3:45 pm | आळश्यांचा राजा

गंगा ही या विशिष्ट मार्गाने गेली फक्त काही हजार वर्ष वाहाते आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्याला दुजोरा देणारा भूगर्भशास्त्रीय पुरावा काही आहे का? अन्यथा ही कवीकल्पना राहील.
दुसरी शक्यता अशी आहे की भगीरथाने जर एखाद्या नदीचं पाणी वळवून त्याच्या गावाकडे आणलं असेल तर त्या पाण्याला लोकांनी 'गंगाच जणू' असं म्हटलं असेल.
शेकडो मैल दूर, हिमशिखरांत जाऊन एखाद्या नदीचा ओघ बदलणे हे त्या काळच्या संसाधनांच्या, तंत्रज्ञानाच्या आणि विचारशक्तीच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटतं. साठ हजार माणसं कित्येक पिढ्या या कामाला लावायच्या - केवळ पाणी मिळवण्यासाठी - मग त्या काळात त्यांच्या शेतांचं काय? वगैरे प्रश्न उभे राहातात.

पण मुळात जी कविकल्पनाच आहे, कथा आहे, तिला सत्याचा आधार शोधण्याचा प्रयत्न करणं हा द्राविडी प्राणायाम होतो.

वंदनीय गुरुजींशी सहमत!

(नम्र)

(वेळात वेळ काढून गुरुजींनी शक्यतो सर्वच धाग्यांवर (आपलं गुंत्यांवर) प्रतिसाद देऊन मेंदू सफाई अधिकार्‍यांचे कर्तव्य पार पाडावे असे कळकळीचे आवाहन करणारा!)

डावखुरा's picture

26 Aug 2010 - 10:48 am | डावखुरा

त्या काळच्या संसाधनांच्या, तंत्रज्ञानाच्या आणि विचारशक्तीच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटतं.???

ईजिप्त मध्ये पिरॅमिड चे मोठे शिळा़खंड कसे चढवले असतील? मला नाही वाट्त हे अशक्यप्राय..मनुष्यबळाच्या जोरावर व सामुहिक ईच्छाशक्तीच्या जोरावर काही ही अशक्य नाही...

भगीरथ वैग्रे इश्श्यू अपार्टः

गंगा ही या विशिष्ट मार्गाने गेली फक्त काही हजार वर्ष वाहाते आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्याला दुजोरा देणारा भूगर्भशास्त्रीय पुरावा काही आहे का?

हो, ह्याला ठोस पुरावा आहे. हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल नामक ११ खंडी भारताच्या समग्र इतिहासाची माला आहे. त्यातील प्रथम खंडात हे दिलेले आहे. चॅप्टर ४, "द जिऑलॉजिकल बॅकग्रौंड ऑफ इंडियन हिष्ट्री", पान क्र. ८२ ते ८7.

सारभूत वाक्ये खाली देतोय.

As noted above, by early Pleistocene time, the dominant features of India's geography had taken place and the country had almost acquired most of it present day form except that the land in front of the newly formed Himalayas formed a great longitudinal depression, comlementary to the mountains and parallel to them. This trough was at first occupied by salt-water lagoons, which were gradually freshened.

These lagoons were gradually filled by the waste of Himalayas by numerous streams descending from the mountain. This sedimentation continued for a very long time, and thus the narrow strip parallel to Himalayas was transformed into the great Indian plains. The thickness of the debris deposition is such that the bedrock is not found even at 2000 feet deep borings!!!!

The greater part of the Indo-Gangetic plains is built up of very late alluvial flood deposits of the Indus & Ganges river systems, borne down from himalayas and deposited at their foot. But most of this terrain became dry and firm enough to be habitable for man only some 5000-7000 years ago.

It has no mineral resources and has records for only the yesterday of geological time.

Ample evidence is found regarding the common ancestry of Ganga, Brahmaputra and Indus rivers, their reversal & capture before attaining their present state, which affected Indian History at many a turn and corner. It was this notable pre-historic river, named "Shivalik river" by the pilgrim, that flowed from the head of the Sind gulf to the Punjab and thence along the foot of the embryonic Himalaya chains, through Simla and Nainital and Assam. Post-Shivalik earth movements in North-West Punjab brought about a dismemberment of this river system into subsidiary systems:

1. Present day Indus from Hazara.

2. Five rivers of Punjab

3. Rivers in Ganges system that take a South-Eastern course.

The severed part of the Shivalik river became the modern Ganges, having in the course of time captured the transversely running Yamuna and converted it into its own affluent. Other Himalayan rivers like Alakananda, Gandak, Kosi, etc. which are really among the oldest water courses of North India, continued to discharge their water into this new river, irrespective of its ultimate destination.

The deltas of large rivers were formed early, but their outline and surfaces changed materially in the last few centuries. These rives brought a lot of silt from the Himalayas and as a result, elevated the level of their beds as well as that of the nearby flat country.

त्यामुळे , भगीरथ या एका माणसाने गंगा मृत्युलोकात आणली हे म्हणणे चूक असले तरी ती कथा एका खर्‍या नैसर्गिक घटनेवरती आधारलेली आहे याबद्दल शंका असू नये.

वरील अवतरणांत "नेमके" पुरावे दिलेले नाहीत हे मान्य आहे, पण सध्या माझ्या हाताशी असलेला हा एकच सोर्स आहे, बाकीचे अधिक नेमके काही असेल तर ते नंतर बघून सांगेन.

रविंद्र भटांची ही कादंबरी वाचली आहे, मला ही कल्पना वाचायला फार आवडली होती. भगीरथ प्रयत्न ह्या वाकप्रचार अश्या प्रयत्नाला समर्पक वाटतो (खरे असेल वा खोटे, तप वगैरे करुन आणण्यापेक्षा केव्हाही वरचढ, तेव्हा काय सगळेच तप करायचे ;-) )

यावरुन एक आठवणः रविंद्र भट सज्जनगडावर जाउन लिखाण करत असत, एकदा आजोळावरुन असेच बसने येत असताना सातार्‍यात एक छानश्या आजी शेजारी येउन बसल्या, मी भयंकर बडबड्या असल्याने गप्पा टप्पा सुरु झाल्या. आमची मस्तच गट्टी जमली. मग त्यांनीच मी रविंद्र भटांची पत्नी, ते इथे सज्जनगडावर आहेत वगैरे सांगितले. त्यावेळी (फारसे वाचन नसले, तरी थोडेफार होते) रविंद्र भटांचे एकही पुस्तक वाचलेले नाही म्हणुन स्वतःची लाज वाटली होती.(मग घरी पोहोचल्यावर दुसर्‍याच दिवशी भगीरथ घेतली होती) योगायोगाने पुण्यात त्या आमच्या घराजवळच रहात होत्या. स्वारगेटाहुन आम्ही एकाच रिक्षेत बसुन गेलो. मी तुझी आजीच की म्हणुन त्यांनी माझ्याकडुन रिक्षेचे पैसेही घेतले नाही. कसं कुणाशी नातं जुळेल...

अप्पा जोगळेकर's picture

15 Aug 2010 - 9:39 am | अप्पा जोगळेकर

उप्रोल्लेखित पुस्तक वाचलेलं नसल्याकारणाने त्यावर भाष्य करु शकत नाही. पण जुन्या काळामध्ये खूप विकसित अशी संस्कॄती अस्तित्वात होती या गॄहीतकामुळे असे विचार निपजत असावेत. हिंदू जनजागॄती समितीची वेबसाईट पाहिली तर तिथेही अनेक पुरातन धार्मिक गोष्टी करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे किंवा आमचे पूर्वज वैज्ञानिक दॄष्ट्या किती पुढारलेले होते ( जसे हनुमान विमानाने लंकेला गेला, ब्रम्हास्त्र म्हणजेच अणुबॉम्ब होय, किंवा परशुरामाने बाणांनी भूमी मागे हटवली म्हणजे रेक्लमेशन केलं इत्यादी, बायकांनी कुंकू लावण्यामागे अमुक तमुक शास्त्रीय कारण आहे इत्यादी) हे ओढूनताणून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. बर्‍याचदा सुशिक्षित माणसांच्या बाबतीत असं होतं की विज्ञानाने केलेली प्रगती ढळढळीतपणे समोर दिसत असते आणि त्यामुळे त्यातून आलेले निष्कर्ष मान्य करावेच लागतात. पण त्याचबरोबर सनातनी मन मात्र कुठेतरी स्वतःच्या पुरातन संस्कॄतीबद्दलचे अभिमान आणि धार्मिक संस्कार यांच्यात अडकलेले असते. मग लॉजिकली न पटणार्‍या, पुराव्याने शाबीत न होउ शकणार्‍या धार्मिक रुढी (ज्याला अडगळ म्हणता येईल ), परंपरा किंवा पौराणिक कथा यांना वैज्ञानिक अ‍ॅप्रॉक्सिमेशन चा मुलामा दिला जातो. हे सगळे रंगीत कागदात दगड बांधून भेटवस्तू म्हणून दिल्यासारखे वाटते.

अप्पा काका हे पुस्तक वाचण्यासारखे आहे त्या बाबतीत,
शेवटची काही पाने चाळली तर कळून येईल
Von Daniken- Chariots of the Gods " alt="" />

अश्याच अर्थाचे पृथ्वीवर माणूस उपरा हे सुद्धा एक पुस्तक वाचनात आले होते.

क्लिंटन's picture

24 Aug 2010 - 3:58 pm | क्लिंटन

कोणत्याही गोष्टीसाठी कठोर परिश्रम करण्याला भगिरथ परिश्रम अशी मराठीत म्हणतात हे आपल्याला माहित आहेच.त्यामागे भगिरथाचा सो-कॉल्ड गंगा पृथ्वीवर आणायचा प्रयत्न आहे असे वाटते.

समजा भगिरथ अभियंता असला जरी तरी त्याचा सध्याच्या काळात नक्की काय फरक पडणार आहे?कारण का कोणास ठाऊक, भगिरथ अभियंता होता हे रामाकडे पुष्पक विमान होते, शंकराची पिंडी म्हणजे न्युक्लिअर रिऍक्टर वगैरे कुटुंबातील वाक्य वाटत आहे. अहो सध्याच्या काळातील अभियंत्यांचे कौशल्य बघायचे असेल तर लवकरच चीन तिबेटमध्ये मोठी धरणे बांधून ३८,००० मेगॅवॉट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प बांधणार आहे तेच बघावे. तिबेटसारख्या दुर्गम प्रदेशात अशी धरणे बांधून असे अवाढव्य प्रकल्प उभे करणे म्हणजे खायची गोष्ट नक्कीच नव्हे. अशा प्रकल्पांनाही तोंडात मारेल असे काहीतरी भव्यदिव्य आपण आपल्या देशात उभे करून दाखवू असे आपल्याला कधीच वाटत नाही. आपला इंटरेस्ट फक्त पुराणातील वांगी उगाळण्यात.

असे का?

क्लिंटन

मृत्युन्जय's picture

24 Aug 2010 - 4:17 pm | मृत्युन्जय

पुराणात ते लिहीलेले आहे तर त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही. आणि लिहिलेले असेलच तर त्याबद्दल अभिमान न बाळगण्याचेही काही कारण नाही.

राहिता राहिला प्रश्न चीनसारखे काहीतरी भव्यदिव्य करण्याचा तर तो मुद्दा मात्र मला एकदम मान्य आहे. पण आपण काहीच करत नाही आहे असेही नाही. आपली निम्मी शक्ती पाकिस्तानमुळे वाया जाते. चीनल तो प्रश्न नाही. त्यामुळे प्रगतीचा वेग चीनपेक्षा कमी असेलही कदाचित पण अगदीच नकारात्मक भूमिका घेण्याएवढा वाईटही नाही.

क्लिंटन's picture

24 Aug 2010 - 7:51 pm | क्लिंटन

पुराणात ते लिहीलेले आहे तर त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही. आणि लिहिलेले असेलच तर त्याबद्दल अभिमान न बाळगण्याचेही काही कारण नाही.

पुराणात काही लिहिले असेल तर ते नाकारण्यासारखे नाही हे मान्य.पण त्याचा फुकाचा अभिमान का बाळगावा?रामाकडे पुष्पक विमान होते पण २०१० मध्ये मोठी प्रवासी विमाने बनविणाऱ्या कंपन्या केवळ बोईंग आणि एअरबस. त्यापैकी अर्थात एकही कंपनी भारतीय नाही.पूर्णपणे भारताने विकसित केलेले (त्यातही इंजिन परदेशी बनावटीची) असे सारस हे हवाईदलासाठीचे एकमेव विमान. ते ही अजून हवाईदलात समाविष्ट झालेले नाही. असे असताना पुराणात रामाकडे विमान होते या गोष्टीचा अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे? उज्ज्वल भूतकाळापासून प्रेरणा घेऊन भविष्यकाळपण तसाच उज्वल व्हावा म्हणून पावले टाकली जात आहेत का? तसे तर दिसत नाही. आपला इन्टरेस्ट पुराणकाळी आमच्याकडे अमुक होते आणि तमुक होते असे म्हणून आपली कॉलर ताठ करण्यात. असला फुकाचा अभिमान काय उपयोगाचा?

मृत्युन्जय's picture

24 Aug 2010 - 8:33 pm | मृत्युन्जय

मान्य. :)

मुद्द्यांशी सहमत :
भारताचा (गरिबांसाठी) अर्धा पेला रिकामा आहे, आणि (धनिकांसाठी) अर्धा भरलेला आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Dec 2012 - 8:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१

आपल्याला एकूणच उज्वल इतिहासाचा फायदा करून घेता येत नाही एवढे मात्र खरे.

विंजिनेर's picture

24 Aug 2010 - 4:53 pm | विंजिनेर

असे का?

प्रश्न मनोरंजक आहे. उत्तर कदाचित - "ते जास्त सोपे आहे म्हणून" असे असू शकेल.

बा विंजीनेरा, का असे लोकांच्या श्रद्धेला धक्का लावत आहात? ;-)

बोलघेवडा's picture

16 Dec 2012 - 7:35 pm | बोलघेवडा

भगीरथ इंजीनियर ?
अहो काहीतरीच काय हो?
अहो भगीरथ इंजीनियर मग उद्या म्हणाल रावण गब्बरसिंग होता? :)