त्याचीच.. अटॅचमेंट (नवी बाजू).

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
1 Nov 2012 - 6:41 pm

गुंतून राहणं चांगलं की गुंतल्यानंतरही वेळ येईल तेव्हा शांतपणे विलग होणं चांगलं यावर जे बोलणं झालं त्यातून त्याची डिटॅचमेंट हे प्रकटन याआधी लिहिलं गेलं.

निसर्ग हा इतका जिवंत, इतका व्हर्सटाईल आहे, की प्रत्येकाला तो वेगळा दिसतो, नवं काही देतो.
लेखावर आलेल्या प्रतिसादांमधूनही हेच जाणवलं. अनेकांनी त्यांना जाणवलेल्या - पटलेल्या आणि न पटलेल्या - गोष्टी तिथे मांडल्या.
ही मूळ चर्चा ज्यांच्याशी झाली, त्यांनाही तो जसा जाणवला तसा.. त्यांच्याच शब्दात.

---------------------------------------------------------------------------------

अटॅचमेंट व डिटॅचमेंट... वेदना की आनंद?

सूर्योदय असो की सूर्यास्त, दोन्ही वेळा आकाशात रंग उधळत असतात.
पण सूर्योदय आल्हाददायक वाटतो तर सूर्यास्त एक अनामिक उदास कढ आणतो..
रंग सारखे असले तरी एक सुरुवात असते, आणि दुसरी अखेर असते.
समुद्राच्या लाटांप्रमाणे हरघडी वेगळे रूप, वेगळी छटा आणि वेगळा भाव.

नुकतेच जन्मलेले तान्हे मूल, खळाळत्या झर्‍याच्या रूपात उगम पावणारी नदी, वेलीवर उमललेली कळी, मातीच्या काळ्या लाटेमधून उगवलेला नाजूकसा कोंब किंवा झाडावरचे इवलेसे पोपटी पान या अफाट सृष्टीशी, निसर्गाशी आपली नाळ जोडण्यासाठी सतत धडपडत असतात. एकरूपता अशीच साधली जाते, नाही का?

विश्वाच्या या पसार्‍यात हे सगळे जीव संपूर्ण असतात, आपलं वेगळेपण जपतात आणि तरीही सृष्टीलाही परिपूर्ण बनवतात.
पूर्णातून पूर्ण काढले तर काढलेले पूर्ण असते आणि शिल्लक असते तेही पूर्णच असते.

निसर्ग वेगळा आहेच.
सर्व सजीव वैविध्यांना सामावून घेऊन प्रत्येक क्षणी नवीन कुणालातरी आपलंसं करण्यासाठी तो उत्सुक असतो.
जाणार्‍यांना जसा तो अलिप्तपणे निरोप देतो तसाच तो येणार्‍यांचेही स्वागत करतो, अलिप्तपणेच...
पण त्या अलिप्ततेतही एक ओलावा असतो.
निसर्ग प्रत्येक घटकाला प्रगतीची, उत्कर्षाची ओढ लावतो.. तारुण्याची ओढ लागलेल्या बालकाप्रमाणे.

दुसर्‍याचा स्वतःइतका किंबहुना स्वतःपेक्षा जास्ती उत्कर्ष घडवणार्‍या निसर्गाच्या या 'स्व'भावाला एकरूपता म्हणावे की आणखी काही..? हीच ना अटॅचमेंट?

मुक्तकप्रकटनप्रतिसाद

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

2 Nov 2012 - 5:59 am | स्पंदना

खरच की!

जन्मलेल्या तान्ह्यासाठी दुधाचा उमाळा असतो. अंकुरणार्‍या कोंबासाठी, बिजाची नाळ असते जीतुन आवश्यक ते पोषण लाभत. फुटणार्‍या पालवीसाठी वळीवाची शिंपण.

हे ही स्फुट विचारात पाडुन गेल. सांगु का इनिगोय जरा अवांतर होइल,पण सांगते.
माझ्या इथे फ्लिंच अन मॅगपाय ना पिल झाली. मिलनकाळात या मॅगपायच गाण ऐकाव. फार छान! तर त्यांना पिल झाली अन त्या पिलांची चिवचिव सुरु झाली. घरात बसुन वाटणारी ती चिवचिव जर बाहेर जाउन पाहिल तर एकसारख केविलवाण रडुन मागितलेल खाण असत. अक्षरशः दमुन गेले मी ते त्या दोघा मात्यापित्यांची धावपळ पाहुन. तोंडच मिटत नाहीत ही पिलं. पण मग मागल्यावर्षी एक दिडमहिन्यान पिल ओरडत फिरत होती अन हे दोघेही अक्षरशः दुर्लक्ष्य करत बसुन होते. आता शिकवल ना काय खायच कस खायच ते? प्रत्येकवेळी उडताना दोनदोन तास बसुन राहिलो ना तुझ्याजवळ? आता उड अन खा! तूझ तू खा! मोठ करताना एव्हढ्या खस्ता खाउनही त्यान परत येउन आता मला भरवाव अशी अपेक्षा नाह दिसली. ना ही मोठा होउन तो व्यवस्थीत राहिल ना, याची काळजी.
निसर्ग जे शिकवतो त्याच्या पल्याड जाउन काही करण म्हणजे त्याचा अव्हेरच म्हणावा लागेल. त्यानच वाढते गुंतागुंत.
आता थांबते नाहीतर तुमच्या लेखापेक्षा मोठा होइल प्रतिसाद.

मी_आहे_ना's picture

2 Nov 2012 - 10:54 am | मी_आहे_ना

संयत लेखाला साजेसा प्रतिसाद. ह्या एकाच प्रतिसादात 'अ‍ॅटॅचमेंट' अन् 'डिटॅचमेंट' दोन्हीतली सहजता जाणवते. दोघांनाही धन्यवाद...

इनिगोय's picture

2 Nov 2012 - 8:14 pm | इनिगोय

तुमचं निरीक्षण आवडलं. जो निसर्गाला इतका निरखू शकतो, त्याला वागावं कसं हे समजायला कुठेच जावं लागत नाही.

तिमा's picture

3 Nov 2012 - 11:34 am | तिमा

लेख व अपर्णा अक्षय यांचा प्रतिसाद आवडला.
निसर्गाविषयी इतका सखोल विचार कधी केला नव्हता.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2012 - 10:40 am | ज्ञानोबाचे पैजार

हम्मSSS,
हे ही आवडले
पैजारबुवा,

सुहास..'s picture

2 Nov 2012 - 11:31 am | सुहास..

छान ...आता सवयी वर पण येवु द्यात

अनिता ठाकूर's picture

2 Nov 2012 - 8:06 pm | अनिता ठाकूर

निसर्ग आपले काम, बर्‍याच अंशी, नेमाने व चोख करतो ही खरंच चकीत करणारी बाब आहे.