१ मे.
सकाळी सकाळी बायकोशी हातापायी झाली. सासर्याने धक्के मारून घरातून हाकलून दिले." उद्या मी नसेन तर काळे कुत्रे तरी तुमच्या पोरीकडे पाहणार आहे का ?" असे त्याला ठणकावून दरवाज्याला लाथ मारून बाहेर पडलो. थोड्यावेळाने सासर्याला रस्त्यातूनच फोन लावला. "शांत झालात का?" असे विचारले. "तू घरात नसलास की सगळी सोसायटीच शांत असते" असे म्हणाला थेरडा.
घरी पोचतो तोच इलियासचा फोन आला. 'काय? विसरला का? उद्या येताय की नाही भाड्या?' "उद्या कशाला ? आताच येतो !" असे सांगून इलियासच्या बारचा रस्ता धरला. हातात एक पेला घेऊन इलियास दारातच उभा होता, त्याच्या रूपात मला जणू लास्ट सपरचा वाइन ग्लास उंचावणारा येशूच दिसला. नान्या आणि ते आधी सोबत प्यायला बसायचे. नेहमीच्या वादावाद्या व्हायला लागल्यावर काय करणार. नान्या म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीवरून कितीही वेळ वाद घालायचा भारी कंड! हे आपले इलियासराव म्हणजे फादर माणूस. कुठेतरी अती झाल्यावर ते म्हणे, नानबा, तू आपला तुझ्या रस्त्यावरच्या बार मध्ये जात जा, मी माझ्या जातो. मला कशात काय घालून पितात काही कळत नाही, आणि मी वाद घालत नाही. उगाच रोजचा वेटरला ताण नको.
वेड्यासारखी दारू प्यायलो. आताही प्रत्येक घटना क्रमवार आठवत नाहीय, म्हणून लिहिण्यात थोडासा विस्कळीतपणा आलाय. एका काउंटरवर बारबाला उभ्या होत्या. इलियास म्हणाले 'मला बारबाला फार आवडतात. आज रात्री ड्याण्स बघू.' म्हटलं बघून टाकू. दोन हजार रुपये देऊन ड्याण्स बघितला.
काळ्या काचांची गाडी नसल्याने पुढचा प्रोग्रॅम रहित केला आणि धर्मशाळेत जाऊन झोपलो.
३ मे.
सासरा झक मारत पाया पडत आला. सन्मानाने घरी घेऊन गेला. रात्री सासूशी "आता कामवाली सुट्टीवर आहे तोवर अडचण आहे, सहन केले पाहिजे" असले काय काय फालतू बडबडत होता. मी जास्ती लक्ष दिले नाही. भांडी घासली आणि निवांत जाऊन झोपलो.
"पाकिस्तान विरुद्ध भारताचा पुचाट निषेध" असा झणझणीत धागा उद्या मिपावरती टाकतो आहे. पाच पैशाच दम नाही ह्या भिकारड्या आणि लोचट राजकारण्यांच्यात.
१५ मे.
सकाळी सकाळी हैदौसचा मादक विशेषांक हातात पडला. पिवळे पुस्तक किंवा मचाकचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - आठ पेग झाल्यानंतरही सायकलची दोन्ही पँडल पहिल्याच झटक्यात सापडण्याच्या झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे.
बघा बाबा टेबलावर वेटर हा आला, हातात घेऊन ९० चा पेला
बर्फाचे घातले हे खडे ग्लासभरीं, त्यावरून डौलानें ये स्कॉचस्पर्शाची ही खुमारी
१९ मे.
'काही बायका अशा तशा' हा माझा धागा का उडाला ते कळले नाही. 'धाग्यात काही वावगे नव्हते' अशी श्रामोंची साक्ष काढावी काय ? आंतरजालावरती कुठलीही गोष्ट पटवून द्यायची असेल तर श्रामोंची साक्ष काढतात असे कुठेसे वाचले होते. बहुदा घासकडवी गुर्जींनी लिहिले असावे. ह्या एक घासकडवी नावाच्या संस्कृतीद्वेष्ट्याला आणि धर्मबुडव्याला गुर्जी का म्हणतात काय माहिती ? बघावे तेव्हा कसले तरी 'ज्वलन' करून आल्या सारखेच प्रातिसादीक निखारे टाकत असतो.
१ जून.
पल्याडच्या नव्या संस्थळावरती सभासदत्व घेऊन आलो. इकडे लाथ पडली तर तिकडे ओळख असलेली बरी. इकडच्या संस्थळावरती तिकडच्या संस्थळद्वेष्ट्यांच्या कंपूत असतो आणि तिकडे ह्या संस्थळद्वेष्ट्यांच्या कंपूत असतो.
राजकारण म्हणजे काय ते माझ्याकडून शीक म्हणावं त्या जाणत्या राजाला.
११ जून.
VIP का AMUL Macho ?
डॉक्टरांच्या सल्ल्यावरून शेवटी चड्डी वापरण्याचे ठरवले आहे. कुठला पर्यायच उरलेला नाही. पण नक्की कुठली चड्डी घ्यावी ? ह्या आधी चड्डी वापरण्याचा अनुभव नाही. माझे बजेट साधारण १५० ते १८० रुपये आहे. चांगली फिट होणारी आणि लवकर वाळणारी अशी चड्डी हवी आहे. ह्या आधी चड्डी वापरत नसल्याने पावसाळ्यात स्पेअरला काहीच नसते, त्यामुळे लवकर वाळणारी असावी. मी गोर्या रंगाचा आहे तर चड्डीचा रंग कोणता निवडावा ? ह्या दोन कंपन्या सोडून बाजारात अजूनही काही चांगले ब्रँड उपलब्ध आहेत का ? कृपया मिपाकरानी ह्या वैद्यकीय अडचणीत मदत करावी.
हा धागा वैद्यकीय अडचणीच्या निवारणासाठी काढला असल्याने कृपया फालतू प्रतिक्रिया किंवा अवांतर टाळावे. टाईमपास साठी इतर बरेच धागे पडलेले आहेत.
अनिवासी मिपाकरांनी कृपया भारतात उपलब्ध असणारे व मध्यमवर्गीय माणसाला परवडतील असेच ब्रॅंड सुचवावेत.
मुख्य म्हणजे फक्त चड्डी वापरणार्यांनीच प्रतिक्रिया द्याव्यात. उगाच फालतूपणा नको.
१३ जून
"काय रे तुझ्या धाग्यावर एकाही महिलेची प्रतिक्रिया कशी नाही?" असा कुच्छीत प्रश्न व्यनीतून एका काकांनी विचारला. प्रश्नात सहजता असली तरी आसुरी आनंद लपत नव्हता. ताबडतोब ग-बोल्या वरी जाऊन ३/४ महिला सदस्यांना धाग्याची लिंक देऊन निदान 'हि हि हि' तरी करून या अशी विनंती केली आहे.
२१ जून.
घर आवरताना शाळेतली चित्रकलेची वही सापडली. त्यातले कावळ्याचे चित्र लगेच मिपावरती स्कॅन करून टाकून दिले. अर्थात नेहमीप्रमाणे मिपावरील पिकासो आणि एम. एफ. हुसेन ह्यांची परवानगी न घेताच चित्र टाकल्याने त्यांनी अपेक्षीत अशा 'मी लै भारी' प्रतिक्रिया दिल्याच. बर्याच जणांनी 'हातात येवढी कला असताना पुढे चित्रकला का सोडली' असे कळवळून विचारले. साला कॉलेजात ट्रेसिंग पेपर वापरून देत नाहीत मग काय करणार ? मेली आमची चित्रकला शाळेतच.
२७ जून.
'खराट्याच्या काड्यांपासून कंगवा स्वच्छ करणारा ब्रश कसा बनवावा' हे आज कलादालनात टाकून आलो आहे. डाण्या वैग्रे भिकारचोटांनी 'कोणाचा, रँबोचा कंगवा का?' असले तद्दन फालतू प्रश्न तिकडे विचारले. त्यांना प्रतिक्रिया म्हणून एक इनोचे चित्र डकवले आहे.
५ जुलै
'गाऊनचे अध्यात्म' ह्या लेखमालेला आज सुरुवात केली. "आय इन द यू अँड यू इन द आय" अशी धडाकेबाज वाक्याने सुरुवात केलेली आहे. 'सगळे आंतरजालाच्या नादाला लागलेले एकदा तरी संस्थळ सोडून जातात, तुमचा 'मला पहा फुले वाहा' नाही का काही लेख आणि सिंहीण सोडून गेला? ' अत्यंत भेदक संवाद आणि त्याला भावनेची डूब हे माझ्या लेखनाच्या कौशल्याचं मर्म आहे. तुम्ही कधी अवांतर अवांतर खेळला असाल तर निष्णात मिपापटू साधारण सहा प्रतिसादांची एक शालजोडी स्ट्रॅटजी आखतो आणि त्याचं कौशल्य असं असतं की नवलेखकाला अजिबात पत्ता न लागू देता त्या सहा प्रतिक्रिया तो अशा काही उलट सुलट देतो की स्ट्रॅटजी पूर्ण झाल्यावरच नवलेखकाला काय प्रसंग ओढवलाय ते कळतं.
१९ जुलै
जाणार
डा.चंच ला उंद रे या सिद्ध हस्त लेखिका.त्यांनी लिहिलेले एक पुस्तक परवा वाचनात आले. त्या पुस्तकाला डा.वसंत चारो ळी करांनी प्रस्तावना लिहिली आहे, साधार ण पणे अनिवासि भार तिया ना NRI किंवा Non Reliable Indians अशी उपाधी लाव ण्यात येते पण चंचला ताईनी व डां. चारोळीकरांनी त्याला No Returning (to) India असा छान सा शब्द वाप र ला आहे.म्हणजे घर ट्या कडे परत न येणा रे भार तिय--
भारतातील लोक पर देशी जाण्याची कार णे - १) पर देशा मधील तथाक थित गोर्या बायका ( मड्डमा )
२) डॉल र्स ची हाव ३) स्वच्छ रस्ते ४) न थु़ं कणारे लो क.
या पुस्त कात पर देशी चाललेल्या व्य क्ती व काही जोड्पी जे देशात विस,तिस,पन्ना स किंवा साठ वर्षे राहुन देखिल परदे तात उधळली आहेत त्याच्या मुलाखाती आहेत व त्याना घर ट्या मधे किवा माय भुमि मधे पर त न आलेलेले भार् तिय म्ह्ट्ले आहे
मला वाट्ते पुण्यात काही वर्षापुर्वी NRIPA (Non Reliable Indiansना परत आणा) या संस्थे बद्दल ऐ कले होते,परंतु आता त्याचे कार्य चालु आहे का माहित नाही
जाणारे NR भार तिय कि जाणारे भार् तिय
मिपा करांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाट्ते आहे --
(क्रमशः)
प्रतिक्रिया
29 Aug 2012 - 2:19 pm | अत्रुप्त आत्मा
29 Aug 2012 - 2:23 pm | स्पा
भारीये..
पण पहिल्या भागा एवढी मजा नाय आली
29 Aug 2012 - 2:45 pm | मोहनराव
असेच म्हणतो
31 Aug 2012 - 10:53 am | पुष्कर जोशी
+१
29 Aug 2012 - 2:21 pm | प्यारे१
___/\___
साष्टांग नमन हे माझे ताम्हणकर कुलोत्पन्ना! :)
29 Aug 2012 - 2:22 pm | गवि
महान आहात हो पराषेट...
29 Aug 2012 - 2:24 pm | sagarpdy
टांगा पलटी घोडा फरार!
29 Aug 2012 - 2:24 pm | प्रचेतस
खल्लास.
29 Aug 2012 - 2:26 pm | अन्या दातार
29 Aug 2012 - 2:39 pm | मी_आहे_ना
"आठ पेग झाल्यानंतरही सायकलची दोन्ही पँडल पहिल्याच झटक्यात सापडण्याच्या झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना ...." ह.ह.पु.वा....फुटलो.
29 Aug 2012 - 2:46 pm | किसन शिंदे
:D
...पण पहिला भागच ब्येष्ट!
29 Aug 2012 - 2:54 pm | सानिकास्वप्निल
भारी!!
29 Aug 2012 - 3:07 pm | प्रभो
मजा नाय आली रे नेहमीची!!
29 Aug 2012 - 3:23 pm | बॅटमॅन
अग्गायायायायायाया!!!!!!!! पार बाजार उठवलाय!
हे तर अशक्य जबरा!!!
29 Aug 2012 - 11:29 pm | कवितानागेश
ही & ही & ही !!! :D
29 Aug 2012 - 11:50 pm | बॅटमॅन
यातला तिसरा "ही" हा ९० च्या पेल्यामुळे आलाय का ;) उचकी वैग्रे :P
30 Aug 2012 - 10:11 am | परंपरा
अगदी सहमत.
कितीजणांची लक्तरं वेशीला टांगणार आहात तुम्ही मान्यवर लेखुकु महोदय? ;)
29 Aug 2012 - 3:32 pm | मृत्युन्जय
काहीही न बोलता इतक्या जणांची मारली आहे की मी हसून हसून वेडा झालो. झक्कास.
29 Aug 2012 - 3:39 pm | गणपा
पहिल्या भागामुळे वाढलेल्या अपेक्षा पुर्ण झाल्या नाही रे.
पुलेशु.
१९ जुलैचा अंमल मात्र नोंदीत जाणवला. ;)
29 Aug 2012 - 4:02 pm | श्री गावसेना प्रमुख
"
29 Aug 2012 - 4:10 pm | आदिजोशी
अर्थात ह्यातले बरेच टोमणे कळण्यासाठी वाचक जुना जाणता मिपाकर असणं गरजेचं आहे.
29 Aug 2012 - 4:58 pm | ५० फक्त
अगदी अगदी, पण गणपा म्हणतात ते ही खरंय.
29 Aug 2012 - 5:14 pm | पैसा
लै भारी! लेखाच्या शेवटी क्रमशः बघून बरं वाटलं.
29 Aug 2012 - 5:46 pm | llपुण्याचे पेशवेll
शेवटच्या परिच्छेदात फारच चढली आहे असे वाटते. हात जड झाल्याची जाणीव प्रत्यक्ष लेखातही दिसत आहे.
29 Aug 2012 - 6:36 pm | शुचि
हाहा .... काय रे परा वाभाडे काढतोस!!!
29 Aug 2012 - 6:51 pm | रेवती
भांडी घासली आणि निवांत जाऊन झोपलो.
छान.
लेखन आवडले. पहिला भाग जास्त आवडला.
मला वाटतं आता तू जुनं लेखन आधी पूर्ण करावस.
29 Aug 2012 - 8:04 pm | ब्रिटिश टिंग्या
हॅ हॅ हॅ!
29 Aug 2012 - 9:32 pm | पक पक पक
29 Aug 2012 - 9:32 pm | रामदास
तू आपला तुझ्या रस्त्यावरच्या बार मध्ये जात जा, मी माझ्या जातो. मला कशात काय घालून पितात काही कळत नाही, आणि मी वाद घालत नाही. उगाच रोजचा वेटरला ताण नको.
हे तर फारच ओळखीचे वाटले.
29 Aug 2012 - 10:18 pm | जयनीत
मी पण जातो उद्या पूर्ण वाचुन प्रतीसाद देईल..
आता कटकट सुरु आहे.
नेट वाल्याची................
लिहित रहा असंच छान,
29 Aug 2012 - 10:28 pm | पक पक पक
अनिवासी मिपाकरांनी कृपया भारतात उपलब्ध असणारे व मध्यमवर्गीय माणसाला परवडतील असेच ब्रॅंड सुचवावेत.
मुख्य म्हणजे फक्त चड्डी वापरणार्यांनीच प्रतिक्रिया द्याव्यात. उगाच फालतूपणा नको.
हे अन एकंदरीतच सगळ ...... बाप रे बाप... :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
29 Aug 2012 - 10:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
१९ मे चा भाग फारच आवडला.
(बरं झालं परस्पर खोड जिरली या श्रावण आणि राजेशची!)
30 Aug 2012 - 12:11 am | श्रावण मोडक
१९ मेनंतर १ जूनची नोंद. ;-)
29 Aug 2012 - 11:08 pm | जाई.
_/\_
29 Aug 2012 - 11:13 pm | जेनी...
ही ही ही ....
( बघरे गबोल्यावर सांगितल्या प्रमाणे ही ही ही केलय ) :P
29 Aug 2012 - 11:30 pm | चिगो
हाणा तिज्यायला.. भारीच. चारोळी तर खतराच एकदम.. :-D
30 Aug 2012 - 12:34 pm | राजेश घासकडवी
धागा वाचायला घेतला आणि सासऱ्याने हाकलून दिल्यावर बारात जाणाऱ्या पराचं चित्र डोळ्यासमोर येऊन गंमत वाटली. सासऱ्याने 'ये, बस आपण थोड्या गप्पा मारू' म्हटल्यावरही परा ताबडतोब बारात पळणार. 'पऱ्याला पावट्याचं निमित्त' ही का अशीच काहीतरी म्हण आठवली. वाघोबा म्हटलं तरी खातो (पितो) वाघ म्हटलं तरी खातो (पितो) असं असताना वाघ्याच का म्हणू नये?
यासारख्या वाक्यांनी हसून मुरकुंडी वळत होती. एकंदरीत या धाग्याचा मस्त लुफ्त लुटत असतानाच माझी नजर माझ्याविषयीच्याच उल्लेखांवर पडली आणि खट्टू झालो. माझ्या सारख्या संस्कृतीप्रेमी (हो, होतं तिचं नाव संस्कृती! आपण नाही लाजत सांगायला.) माणसाला धर्मबुडव्या वगैरे म्हटल्याने माझ्या ह्रूदयाला तडे गेले. असो.
तरी मी मूळचा उदारमतवादी असल्यामुळे पऱ्याचा हाही अपराध पोटात घालतो. (आणि लोक म्हणतात बीअर बेली वगैरे...)
हे वाचून फुटलो. पण तरी मला वाटतं या विषयावर थोडं अजून खुलून लिहायला हवं होतं. म्हणजे चड्डीचं एक्स्पोजर आणि ऍपर्चर रेंज किती असावी, फोकल लेंग्थ किती ठेवता यावी, फ्लॅश मारावा का, चड्डीसाठी ट्रायपॉड वापरावा की हातातच धरून वापरावी... वगैरे तांत्रिक बाबींची चर्चा व्हायला हवी होती.
पुढच्या डायरीत काय सापडतंय याची उत्कंठा लागून राहिली आहे. एकदा आपली खेचली गेली तेव्हा अजून खेचली जाणार नाही यामुळे मोकळं मोकळंही वाटतं आहे.
30 Aug 2012 - 2:51 pm | इरसाल
लोकांना डायर्या देता देता श्री.परा वाभाडे हे स्वतः डायरी लिहु लागल्यामुळे
१. डॉले पाणावले
२.लेखातील १९मेच्या विधानांची अंमळ मौज/ गम्मत वाटली.
३.काही प्रतिसादकर्त्यांनी " मोठे व्हा" (इन्डायरेक्ट) म्हटल्याचे दिसुन आले.
४. आता या वर मला " वाढदिवसाच्या शुभेच्छा" नाही मिळा ल्या म्हणजे मि ळ विली.
30 Aug 2012 - 2:54 pm | नाना चेंगट
हल्कत
30 Aug 2012 - 3:47 pm | सूड
हा हा हा !! आवडलं.
काहीही म्हण परा, मिपावरचे लोक बाकी कृतघ्न हो !! तू येवढा आपुलकीनं डायर्या देतोस लोकांना आणि तू डायर्या लिहायला लागल्यावर एकानंही तुला डायरी देऊ नये ? असो. मला माहितीये तुझ्याकडे असतील डायर्या, पण त्या लोकांना द्यायला!! ह्यातली डायर्यांतली हवी ती घे हो तुस.
30 Aug 2012 - 9:49 pm | रमताराम
'धाग्यात काही वावगे नव्हते' अशी श्रामोंची साक्ष काढावी काय ? आंतरजालावरती कुठलीही गोष्ट पटवून द्यायची असेल तर श्रामोंची साक्ष काढतात असे कुठेसे वाचले होते.
हे मात्र एकदम पटले बरं का रे.
30 Aug 2012 - 11:07 pm | नंदन
झक्कास! पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.
31 Aug 2012 - 5:04 am | स्पंदना
लई वांड झालाय पर्या.
31 Aug 2012 - 10:36 am | प्यारे१
झालाय????????????
आक्षेप आक्षेप!
31 Aug 2012 - 10:48 am | स्पंदना
का? का?
31 Aug 2012 - 10:55 am | प्यारे१
जन्मजात/ देवदत्त असं काही असतं की नाही??????????? ;)
31 Aug 2012 - 10:50 am | पुष्कर जोशी
++१
31 Aug 2012 - 12:26 pm | दिपक
डायरीतले पुढचे पान लवकरात लवकर टाक परा.
31 Aug 2012 - 3:06 pm | बिपिन कार्यकर्ते
हं! छान!
(दिला रे प्रतिसाद! आता सारखा त्रास देऊ नकोस प्रतिसाद पाहिजे म्हणून!)
1 Sep 2012 - 2:49 am | राजेश घासकडवी
तुम्हाला पराने 'हि हि हि' करून येण्याच्या यादीत टाकलेलं दिसतंय. हा दोष नक्की कोणाचा असा विचार करतोय? की गेल्या दोन वर्षांत काही मूलभूत बदल घडून आलेले आहेत?
31 Aug 2012 - 11:15 pm | एस
पराच्या सायकलला (पराचे) कितीही पेग झाल्यानंतरही पराचे दोन्ही पाय पहिल्याच टांगेत गवसतात व तेही डाव्याला डावा व उजव्याला उजवा पाय, हे 'पौर्णिमे'ला स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिले आहे... ;)
बाकी त्या 'धमाल' काथ्याकुटात मला 'फट' पाडता आली नव्हती तरी नुसते ऐकायलाही जाम मजा आली.
31 Aug 2012 - 11:21 pm | एस
बाडिस... ;)
1 Sep 2012 - 9:27 am | सुहास झेले
हा हा हा ... लईच :) :) :)
1 Sep 2012 - 10:56 pm | चिंतामणी
सगळेच भारी.
पण " १९ मे" वाचून फूटलो.
2 Oct 2012 - 2:11 pm | वपाडाव
पुढचा भाग लौकर टाका...