काही दिवसांपूर्वी आमच्या हाताला एका मिपाकर लेखकुची अद्भुत लेखनाने नटलेली डायरी लागली. त्याच दिवशी रमताराम व अन्या दातार हे देखील तिथेच उपस्थित असल्याने त्यांनी देखील ह्या डायरीतील लिखाणाचा मनमुराद आनंद लुटला. त्याच सुमारास भडकमकर मास्तरांची डायरी प्रकाशीत झाल्याने, आम्हाला गवसलेली डायरी काही कालावधीने मिपाकरांसमोर उघडावी असे ठरले. ह्या डायरीत मिपाकर लेखकुच्या जीवनातील घडामोडी तर आहेतच, पण जोडीला काही लिखाणाचे कच्चे मसुदे, काही पक्के मसुदे देखील आम्हाला गवसले. त्यातील निवड लिखाण मिपाकरांसाठी खुले करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
प.रा.राजवाडे
इतिहासाचार्य
१ जाने.
सकाळी सकाळी बोंबलत उठून बाहेर कोण जाणार ? नववर्षाची सुरुवात म्हणून सायी मध्ये साखर टाकून तेच खाल्ले. टेबलावरच मोबाइल पडला होता. फोटो काढून 'बॅचलर्स रबडी' ह्या नावाखाली पाककृती टाकून दिली.
५ जाने.
लाज वाटली पाहिजे मिपावरच्या स्वयंपाक्यांना !
माझ्या पाककृतीला १९ प्रतिसाद आलेले पाहून लगेच 'गायीच्या दुधाच्या सायीची रबडी' , ' म्हशीच्या दुधाच्या सायीची रबडी' , 'श्रावणासाठी शेळीच्या दुधाच्या सायीची रबडी' असल्या पाककृती टाकून लोकांनी वाहत्या रबडीत तोंड मारण्याचा घृणास्पद प्रकार केला.
१९ जाने.
शेवटी एकदाचे प्रवासाला जायचे ठरले. कुठेही गेलो तरी 'पहाटे उठून जाण्याची मजा लुटायची आहे' असा ठराव सगळ्यात आधी संमत झाला. मला, धम्याला आणि डान्याला तर सूर्योदय बघून आता बरीच वर्षे लोटली आहेत. पण सकाळी उठून जायचे तरी कुठे ? शेवटी नानबाने त्याच्या घरापासून पावणेसव्वापाच किमी. दूर असलेल्या सुलभ शौचालयाचे नाव सुचवले. नुकतेच उद्घाटन झाल्याने हा स्पॉट तसा जवळ जवळ व्हर्जिनच म्हणावा असा होता. आम्ही ताबडतोब तयारीला लागलो.
मी सकाळी पावणेपाचलाच स्वारगेट बस स्टँडला पोचलो. डान्या हडपसरहून आला. नानबा आम्हाला थेट पर्यटनस्थळीच भेटणार असल्याने त्याचा प्रश्नच नव्हता. धम्याचा मात्र अजून पत्ता नव्हता. त्याला फोन लावला, शेवटी साडेबत्तीसाव्या रिंगला साहेबांनी फोन उचलला. 'काल मटण हादडल्याने रात्री अडीचच्या सुमारालाच मला निसर्गाची हाक आली. आता पुन्हा तिकडे येऊन मी काय करू? अशा प्रश्नात धम्याने आमचा निम्मा धीर खचवला. त्याला कसेतरी समजावले. ह्या सगळ्या प्रकरणात निघायला सहा वाजले. नान्याने फोन करून करून उच्छाद मांडला होता तो वेगळाच. शेवटी पावणेसातच्या सुमारास सुलभ पर्यटनस्थळी पोचलो.
ऑड डे असल्याने बरीच गर्दी दिसत होती. कोणा महाभागाने ह्या पर्यटन स्थळाचा फोटो नुकताच वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्याचा हा परिणाम असल्याचे तिथल्या 'तिकिट कलेक्टरने' सांगितले. 'पर्यटनस्थळाला भेट द्यायच्या आधी 'मिसळ-पाव' खाणे हा नियम आहे' अशी डान्याने भुणभूण सुरू केली. 'सुलभची मजा घ्यायची असेल तर पोटात काहीतरी जळजळीत हवेच' असे नानाचे देखील मत पडले. शेवटी उदरभरण करून आम्ही उदरसरणाकडे निघालो. जाम धमाल आली. फोटो काढायला परवानगी मागावी लागली नाही ह्याचे विशेष वाटले. येताना एका टेम्पोवाल्याने लिफ्ट दिली. टेम्पोवाला मुसलमान होता, पण आश्चर्य म्हणजे त्याच्या टेम्पोत लालबागच्या राजाचा फोटो लावलेला होता. उद्या सकाळी 'सुलभ पर्यटन' नावाने भटकंतीचा धागा टाकावा म्हणतोय. पाय खूप दुखत आहेत, आता झोपावे.
२३ जाने.
नान्या भिकारचोट आहे. आज दोन दिवसांनी मिपावर लिखाण करायला गेलो, तर ह्या हरामखोराचा 'सुलभगड :- किती बसावे बसणार्याने' हा लेख हजर. त्यावरती रिकामटेकड्या लोकांच्या २०/२२ कामेंटा देखील दिसल्या. सगळा उत्साहच निघून गेला.
२५ जाने.
नान्याच्या लेखनात सगळी सहल कव्हर झालेली नाही हे माझ्या लक्षात आले. 'सुलभगड : एक वेगळा दृष्टिकोन' ह्या नावाने माझे लेखन आणि फोटो मिपावरती टाकून दिले आहेत. एकाने लिहिले म्हणून दुसर्याने लिहूच नये का काय ?
२ फेब्रु.
'प्रतिभाताई पाटलांना साड्या नेसण्याचा सेन्स आहे का?' हा माझा काथ्याकूट उडाला. कोणा दीडशहाण्याने 'औचित्याचा भंग होतो' अशी तक्रार केली म्हणे.
हा देश भिकारडा आहे, इथले मंत्री भिकारडे आहेत, हे मिपा टुकार आहे आणि इथले संपादक पण टुकार आहेत.
११ फेब्रु.
'दारू हितकारी का अहितकारी' ह्या धाग्या विषयी तक्रार नोंदवून आलो आहे. आजकाल कसलेपण भिकार काथ्याकूट मिपावरती येत असतात. लिखाणाचा दर्जा तर पार रसातळाला गेलेला आहे.
२७ फेब्रु.
आवडत्या संपादकांचा लेख वरती आणला आहे. रमताराम येऊन मला 'खाणसम्राट म्हणून गेला. त्याच्या खरडीला फाट्यावरती मारले आहे. हा लेख जमेस धरता आज मी बरोब्बर ४२ लेख वरती आणले. ५१ चा जादुई आकडा आता फारसा लांब नाही.
१ मार्च
'आज संपादकांना सुट्टी असावी का?' असा काथ्याकूट टाकून लगेच गमन केले. भिकारचोट लाइट दिवसभर गेल्याने काय दंगा झाला ते कळू शकले नाही.
२ मार्च
मिपावरती लॉग-इन होत नाहीये. मालकांना विरोपपत्र धाडले आहे.
४ मार्च
आग लागो त्या मिपाला.
अरे मला बॅन करतात म्हणजे काय ? भांचोत मिपाची साडेबत्तेचाळीस टक्के ट्यार्पी माझ्यामुळे आहे म्हणावं.
२० मार्च.
१५ दिवस मी नव्हतो तर मिपाला पार अवकळा आलेली आहे. शेवटी मालकांनी पत्र पाठवून बोलावून घेतलेच मला. पत्रात '१४ दिवस संपले आहेत', 'पुन्हा आगळीक नको' अशी काही डोक्यावरून जाणारी वाक्ये होती. मी दखल घेतली नाही. माझी किंमत त्यांना शेवटी कळली हे महत्त्वाचे.
२८ मार्च
आठवडाभर वाचनमात्र होतो. शेवटी 'मिपाकरांवरती कशाला राग ?' म्हणून 'प्यासी पडोसन' ह्या चित्रपटाची संगीत समीक्षा लिहिली आहे.
३० मार्च
'नाही ना कोणी दखल घेतली ?' , 'गप लिहायला लागलाच ना परत?' असले उर्मट प्रश्न विचारून धम्या सकाळी सकाळी डोक्याला शॉट लावून गेला. धम्या आत शिरो आणि ऑफिसची लिफ्ट बंद पडो.
१ एप्रिल
संपादकांची नवीन यादी जाहीर होणार असून त्यात बहुदा माझे नाव असण्याची शक्यता आहे अशी बातमी लागली आहे. हे कधी ना कधी त्यांना करावे लागणारच होते. ही ढिसाळ व्यवस्था सावरू शकेल असा दुसरा आहे तरी कोण ?
४ एप्रिल
'एक तर आधी लिखाण करून वैताग आणतच असतोस, वर त्या लिखाणाच्या लिंका कशाला रे खरडवहीत डकवतोस?' असला उद्धट प्रश्न तो देखील सार्वजनिकपणे खरडवहीत मला बिपिन कार्यकर्तेंकडून अपेक्षीत नव्हता. परवाच त्यांची 'माती' मी खालती वरती केल्याचे ते बहुदा विसरलेले दिसतात.
असो..
उपकाराची परतफेड अपकाराने करणारे मिपावरती कमी नाहीत.
१९ एप्रिल
भाच्याने मोबाइलची बटणे दाबून दाबून मोबाइलची आणि त्याच्या कॅमेर्याची पार वाट लावून टाकली आहे. त्यातलेच काही फोटो 'माझ्या बाथरूमच्या खिडकीतून दिसणारा फुटका पाइप' ह्या नावाने मिपावरती चढवून मोकळा झालो आहे.
२२ एप्रिल
त्या भिकार फोटोंच्या धाग्यावर देखील काही माहात्म्यांनी 'कुठला कॅमेरा, झूम किती ? पिक्सल किती ?, असे फोटो काढायला प्रचंड एकाग्रता पाहिजे' असल्या प्रतिक्रिया टाकून वात आणला आहे.
२७ एप्रिल
आज शेजारच्या काकूंकडचे रंगकाम संपले. त्यांनी भंगारात टाकलेल्या रंगाच्या डब्यापासून त्यांना एक टमरेल बनवून दिले. काकू भयानक खूश झाल्या. लगेच टमरेल घेऊन धावत सुटल्या. 'डब्यापासून टमरेलापर्यंतची' कृती, सजावट आणि फोटो आत्ताच मिपावर डकवून आलो आहे. 'हातात कला आहे' अशी अमोल खरेची कॉमेंट लगोलग आली आहे.
२९ एप्रिल
'परवा संपादकांना सुट्टी असावी का?' हा काथ्याकूट पुन्हा एकदा टाकण्याचा विचार करतो आहे. पण पुन्हा लॉग-इन बंद होण्याची धास्ती आहे. असो.. काय होईल ते होईल ! 'हिंम्मते मर्दा...'
(क्रमशः)
प्रतिक्रिया
21 Aug 2012 - 3:06 pm | स्पा
=))
=))
=))
ह्या ह्या ह्या
मेलो मेलो
21 Aug 2012 - 3:11 pm | कवितानागेश
'प्रतिभाताई पाटलांना साड्या नेसण्याचा सेन्स आहे का?'>
खतरनाक!! :D
21 Aug 2012 - 3:12 pm | विजुभाऊ
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
धम्या डान्या आणि नान्या...........
जय हो.............................
अवांतरः माताय या धम्याचं बरं आहे.....दिसला नाही तरी लोक विचारतात दिसला तरी विचारतात. कसं कय जम्तं बॉ याला?
अतीअवांतरः परा शेठ मस्त लिवलय्.कसं काय जम्तं हो इतक्या व्यापात अशा चान चान सहली काढायला आन इत्कं उब्दोढ्क ल्ह्यायला?
21 Aug 2012 - 3:28 pm | गणपा
=)) =)) =))
मनीच्या बाता : गण्या, मिपाकरांना आता फडताळांना आणि टेबलांनाही कुलुपं लावावी लागणार तर.
21 Aug 2012 - 3:37 pm | प्रभो
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
21 Aug 2012 - 3:42 pm | गवि
जबरा मजेशीर... येवंदे...
21 Aug 2012 - 3:47 pm | इरसाल
भुत-वर्तमान-भविष्यकाळाच्या अनुषंगाने झाडलेल्या गोळ्यांनी कोण कोण धारातीर्थी पडतो हे पहाणे अंमळ मजेशीर ठरणार तर.
बहुसंख्य लोकांच्या धाग्याच्या व खरडवहीच्या नाड्यांना डायरेक्ट हात घातलेला दिसत आहे.
21 Aug 2012 - 3:50 pm | मृत्युन्जय
मेल्या त्या सुलभ शौचालयाचा पत्ता तरी टाकायचास. बरेच लोक टमरेल घेउन पळत सुटनार आहेत बहुधा तिथे. खोलुन मारली आहे बर्याच जणांची. :)
21 Aug 2012 - 3:50 pm | नि३सोलपुरकर
एकदम जबरा..प.रा
बाकी पर्यटनस्थळ : १००+
ह.ह.पु.वा.
21 Aug 2012 - 3:55 pm | चौकटराजा
जबरर्राट रे पर्या !
मस्तच रे परूशीट !
लया खास रे पर !
सुलभ रे प !
फ्ल्श धो धो वाहिल्या गेला हाय रे पी !
खी खी खी
)) ))))))
सुलभ साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आता शोधायला नको हो राजवाडे !
21 Aug 2012 - 4:01 pm | विजुभाऊ
झाडलेल्या गोळ्यांनी कोण कोण धारातीर्थी पडतो
लिमलेटच्या गोळ्यानी धारातीर्थी कोण कशाला पडेल?
21 Aug 2012 - 4:05 pm | बिपिन कार्यकर्ते
=)))))))))))))))))))))
अरे काय लेखन आहे का काय हे? आणि त्या म्हातार्याची फूस त्याला परत! उडवतोच हा धागा!
;)
***
अवांतर : साफ मेलो आहे... मात्र अजून काय काय माल या हलकटाच्या पोतडीत पडला असेल याची कल्पना असल्यामुळे परत जिवंत होऊन जीव मुठीत धरून पुढील भागांची वाट बघतो आहे.
21 Aug 2012 - 7:32 pm | रमताराम
आता म्या काय क्येला? आम्ही फक्त ती डायरी वाचली.
आता खरं सांगा कार्यकर्ते, दुसर्याची - किंवा दुसरीची - डायरी तुमच्या हाती लागली तर न वाचता परत नेऊन देण्याइतके तुम्ही भोटम्-भावजी आहात का? तुम्हीही वाचूनच परत देणार, खरं की नै? घ्या शप्पत.
21 Aug 2012 - 4:13 pm | स्मिता.
अरे पर्या, एकावेळी झाडून-पुसून सगळ्यांना झोडपून घेणं कसं काय जमतं तुला? ह ल क ट सम्राट!
21 Aug 2012 - 4:15 pm | नाना चेंगट
अगागागागा
पुढच्या भागात कोणाची धोत्रं फेडणार रे ?
21 Aug 2012 - 4:16 pm | बॅटमॅन
हेहेहे टिपिकल परा ष्टैल. एकच नंबर!!
21 Aug 2012 - 4:17 pm | सूड
जबराच !! 'परा'धीन आहे जगती जनक डायरीचा' असं म्हणल्यास वावगं ठरु नये.
पुभाप्र !! :D
27 Aug 2012 - 6:26 pm | पुष्कर जोशी
++१
21 Aug 2012 - 4:25 pm | मूकवाचक
जबराच!!!
21 Aug 2012 - 4:27 pm | मी_आहे_ना
काही काही बाण डोक्यावरून गेले पण तरी वाचून... ह.ह.पु.वा.
21 Aug 2012 - 4:43 pm | प्रीत-मोहर
___/\___
धन्यवाद आहेस =)) =)) =)) =))
21 Aug 2012 - 4:50 pm | अन्या दातार
आयला! म्याटर वेगळाच दिसला. बोलणे काही वेगळेच झाले होते की रे. प्रतिभा प्रतिभा (पाटलांची नव्हे हं) म्हणतात ती हीच! ;)
21 Aug 2012 - 4:51 pm | रेवती
हा हा हा...
काय रे बाबा!
पराचा जय असो! म्हणजेच परा जय असो असे म्हणते. ;)
21 Aug 2012 - 5:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आपण धन्य आहात.
=)) =))
21 Aug 2012 - 5:31 pm | चैतन्य दीक्षित
ह.ह.पु.वा. झालेली आहे...
पुढल्या भागात काय येईल कोणास ठाऊक...
21 Aug 2012 - 5:38 pm | मोहनराव
भन्नाट!!
21 Aug 2012 - 5:48 pm | सविता००१
परा,
धन्य आहेस अगदी!!!!
ह.ह.पु.वा. झाली.
21 Aug 2012 - 5:54 pm | अत्रुप्त आत्मा
21 Aug 2012 - 6:31 pm | पैसा
आचार्यांची वासरी अतिशयच आवडली. पुढच्या भागाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
ते अन्या बिझी आहे म्हणत म्हातारबुवांबरोबर हिंडतंय काय? हम्म....
(खरी प्रतिक्रिया: हा पर्या हल्कत आच्रत आहे! त्यालाच सुटीवर पाठवते आता)
21 Aug 2012 - 6:42 pm | भडकमकर मास्तर
मजेदार आहे... वाचतोय.. येउंद्यात
21 Aug 2012 - 6:57 pm | चित्रा
मजेदार. आणि मार्मिक.
21 Aug 2012 - 7:29 pm | रमताराम
वारलो, खपलो, निर्वाणपदास पोहोचलो.
त्याच दिवशी रमताराम व अन्या दातार हे देखील तिथेच उपस्थित असल्याने त्यांनी देखील ह्या डायरीतील लिखाणाचा मनमुराद आनंद लुटला.
ह्या बाकी अगदी खरां हा. पण परागुरु, आम्ही जी वाचली ती डायरी ही नव्हे. हे त्या डायरीचे 'सुलभीकरण' आहे असे निरीक्षण नोंदवतो. ;)
'काल मटण हादडल्याने रात्री अडीचच्या सुमारालाच मला निसर्गाची हाक आली. आता पुन्हा तिकडे येऊन मी काय करू?
धम्या, अवसानघातकी कुठला. ;)
असो. पुढच्या 'प्रकरणांच्या' (पक्षी: पुढील भागांच्या) प्रतीक्षेत...
21 Aug 2012 - 8:35 pm | अन्या दातार
>>पण परागुरु, आम्ही जी वाचली ती डायरी ही नव्हे. हे त्या डायरीचे 'सुलभीकरण' आहे असे निरीक्षण नोंदवतो.
अगदी अगदी. सुलभीकरणही जरा जास्तच झालंय
जाता जाता: योग्य ते वैद्यकिय सल्ले वेळेवर घेत जा रे परा
21 Aug 2012 - 8:17 pm | तर्री
कहर झाला आहे !
21 Aug 2012 - 8:22 pm | छोटा डॉन
लेख 'बरा' जमला आहे असेच खेदाने म्हणावे लागेल.
लिहताना हात जरा आखडता घेतला होता काय ? ;)
बहुतेक बाबतीत तुमची जाज्वल, जहाल आणि जळजळीत मते आम्हाला डिट्टेलवारी माहित असल्याने हा लेख त्यापुढे अंमल फिक्काच वाटला बॉ, असो पुढच्या भागाकडुन जास्ती अपेक्षा ठेवतो.
आणि काय बे, ते परवाच्या कट्ट्याला किस्सा सांगितला होतास त्यावर अवाक्षर का नाही म्हणे ? ;)
- छोटा डॉन
21 Aug 2012 - 10:00 pm | राजेश घासकडवी
असंच म्हणतो. परासारख्या स्वयंसिद्ध लेखकाने दुसऱ्यांच्या वासऱ्या चोरून चोरून वाचून त्यातलंच म्याटर, तेही पातळ करून वाटल्याबद्दल मला कळवळून आलं. दुसराच कोणीतरी व्यास आणि परा गणपती, तेही सेन्सॉर करून लिहिणारा.... वाईट वाटतं.
तरीही काही गोळ्यांचे नेम बरोबर लागल्याचं समाधान तुझ्या चेहऱ्यावर विलसत असेलच. ;)
22 Aug 2012 - 4:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
राको आणि गुर्जी म्हणतात तर बराच असणार लेख. नाहीतर पर्याचं सुलभीकृत हिडीस लेखन कोण वाचणार?
21 Aug 2012 - 8:44 pm | मुक्त विहारि
झक्कास..
21 Aug 2012 - 9:04 pm | सस्नेह
'वर्मे' काढणारी' 'मार्मिक' दैनंदिनी !
पुष्कळ तारखा २-२ वाक्यात का आवरत्या घेतल्यात ते समजले नाही. हे काही 'परा' ष्टाईलला शोभत नाही. निषेध !
21 Aug 2012 - 9:07 pm | जाई.
=)) =))
भारीच आहे
21 Aug 2012 - 9:41 pm | कौशी
खतरा लिहिलय...
21 Aug 2012 - 10:10 pm | शिल्पा ब
बेकार धाग्यांना रिकामटेकडे लोक अशी म्हण वापरात आणावी काय ?
21 Aug 2012 - 10:12 pm | शुचि
आयला ..... टू गुड!!! =)) =))
21 Aug 2012 - 10:22 pm | सुमीत भातखंडे
=)) =))
लय भारी...
21 Aug 2012 - 10:45 pm | सानिकास्वप्निल
=)) =))=)) =))
=)) =))=))
=)) =))
जबरदस्त परा तुझ्यापुढे हात टेकले रे बाबा
खरच धन्य आहेस;)
21 Aug 2012 - 10:48 pm | सानिकास्वप्निल
=)) =))=)) =))
=)) =))=))
=)) =))
जबरदस्त परा तुझ्यापुढे हात टेकले रे बाबा
खरच धन्य आहेस;)
22 Aug 2012 - 7:15 am | निवेदिता-ताई
झकास...:)
22 Aug 2012 - 8:29 am | सहज
"असा हा आमचा पर्या! याला मेडल दिला पाहीजे", असे सन्माननीय राष्ट्रपतीजी, माननीय राणीसाहेबांना बहुदा सांगत असताना!
२२ ऑगस्ट
ह्या पराला अनेक लेखमाला सुरु करुन अर्धवट सोडायचा नाद आहे.. बघु दुसरा, तिसरा, चौथा भाग कधी येतो व आल्याशिवाय प्रतिक्रियाच द्यायची नाही.
22 Aug 2012 - 8:31 am | ५० फक्त
उत्तम, नाहीतरी हिरवे डोंगर अन हिरवे झेंडे पाहुन कंटाळा आला होता..
22 Aug 2012 - 8:51 am | पक पक पक
:d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d: :d:
22 Aug 2012 - 9:58 am | दिपक
’फुटका पाईप’ काय.. ’प्यासी पडोसनची संगित समीक्षा काय.. ’डब्ब्यापासुन टमरेल’ =))
सुस्साट परा..
=)) =)) =))=))
22 Aug 2012 - 10:32 am | श्रीरंग
अगदी अपेक्षेप्रमाणेच... भन्नाट!
22 Aug 2012 - 11:15 am | नंदन
टिपिकल 'प्रासादिक' लेखनाचा प्रत्यय आला ;)
28 Aug 2012 - 1:12 pm | सुहास झेले
:D :D :D :D :D
22 Aug 2012 - 11:15 am | तिमा
आणि त्या वरवर बाळबोध दिसणार्या धाग्यांना का सोडलेत हो ? का ते पुढल्या भागात ?
22 Aug 2012 - 11:45 am | किसन शिंदे
:D
ज ब र द स्त!!
याची खरोखरंच गरज होती.
पुढचा भाग कधी?
22 Aug 2012 - 12:30 pm | नितिन थत्ते
मस्तच....
स्वगतः बोंबला !!! या पराने काही लिहिलं तरी लोक वा वा म्हणतात. आता आम्ही काय कधी सुलभ मध्ये गेलो नाही का? पण जाउ द्या..... साला राज, बाळासाहेबांबरोबर ऊठवस असते याची. ठाण्या-मुंबईत रहायचं तर मस्त न म्हणून करतो काय. :(
22 Aug 2012 - 12:30 pm | कवितानागेश
च्यायला!!
याच्यात औषधोपचार आणि सद्भावना आहेत काय? :D
22 Aug 2012 - 1:13 pm | सुहास..
जुन्या बाटलीत नवीन दारू असली तरी पहिल्याच पेगाला किक बसली आहे याची नोंद घ्यावी. ;)
'नाही ना कोणी दखल घेतली ?' , 'गप लिहायला लागलाच ना परत?' असले उर्मट प्रश्न विचारून धम्या सकाळी सकाळी डोक्याला शॉट लावून गेला. >>>>
=)) =)) =))
या धम्याच्या पोटात काहीच रहात नाही ;)
22 Aug 2012 - 1:50 pm | आदिजोशी
पर्याची डायरी असल्याने शाब्दीक डायरीया आणि प्रचंड हि & हि लिखाण वाचायला मिळेल ह्या अपेक्षेने धागा उघडला. पण डाण्या म्हणाला त्या प्रमाने आमचा पोपट झाला. तुमची मते आणी तुमचा व्यासंग ह्या बद्दल आदर आहेच त्यामुळे पुढल्या भागाबद्दल (आलाच तर) अपेक्षाही जास्त आहेत.
27 Aug 2012 - 6:53 pm | नाना चेंगट
पुढचा भाग ????
28 Aug 2012 - 11:18 am | परंपरा
हा हा हा मस्तच !!!!
28 Aug 2012 - 11:55 am | रश्मि दाते
महान आहात आपण
=)) =))=)) =))
=)) =))=))
=)) =))
28 Aug 2012 - 12:58 pm | डॉ.प्रसाद दाढे
मस्तच रे परा! बर्याच दिसांनी मिपावर आलो त्याचं सार्थक झालं !
28 Aug 2012 - 2:40 pm | यकु
=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))
=))=))=))
=))=))
=))
30 Aug 2012 - 5:03 pm | प्राजक्ता पवार
=) =)
=)
4 Oct 2012 - 5:15 pm | वपाडाव
=)) =)) =))
20 Sep 2016 - 9:20 pm | जव्हेरगंज
=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))
अशक्य हसतोय.... =))=))=))=))=))=))=))=))
20 Sep 2016 - 10:54 pm | नीलमोहर
वाईट !!
20 Sep 2016 - 11:24 pm | सोनुली
छान लिहिलंय.