एक शहरातला तरूण खेड्यात जातो. तिथे तो काही बदल घडवू इच्छितो.
इथले लोक इतके सुस्त कसे ? आपल्या प्रगतीसाठी ते काहीच हालचाल का करत नाहीत ?
असे प्रश्न त्याला पडतात. विजेचा भरोसा नाही , पिण्याच्या पाण्याचेही हालच.
गावात एका तरुणीने शाळा स्वरूपाचे काही कार्य चालू केले आहे.
सगळी 'स्वदेश' ची आठवण यावी अशी परिस्थिती.
यात भर म्हणजे चित्रविचित्र दाढी वाढलेला असंबद्ध वाटावं असं बोलणारा असा एक साधु बैरागीही यामधे आहे.
त्यात देशपांडे होता यात मकरंदच पण अनासपुरे आहे.
--
अलिकडच्या काळात ग्रामीण मराठी चित्रपट म्हटलं की जे शहरी लोक काम करतात त्यांच्यापैकी
एक म्हणजे मोहन आगाशे. पण समोर आहे कुलदीप पवार.
निदान ग्रामीण बाबतीत पवार सरस.
--
शहरातून आलेला तरुण सुबोध भावे. तरुणी मिता सावरकर.
नटसम्राट जितेंद्र जोशी पाटलाचा पोर. तो नेहमीप्रमाणे गळत गळत डायलॉग बोलत राहतो.
काही माफक बालवाडी जोक तो करतो, त्याला त्याचे चाहते दादही देतात.
'सारे भारतीय माझे बांधव आहेत' असं म्हटल्यावर
मग मी भारतातल्या कुनाबरूबर लगीन कसं करू असे महान प्रश्न त्याला पडतात.
लीडरोल त्याला दिला नाही हे आपलं भाग्य.
--
सगळं बरं चाललेलं असताना गळे काढून म्हटलेली गाणी बकाल वाटतात.
अशा गाण्यांना भीक देखील घालावाशी नाही वाटत.
त्यापेक्षा रेल्वे स्टेशनवरचे 'शोधीसी मानवा' कितीतरी बरे वाटते.
--
सुरुवातीला चित्रपट पकड घेत नाही. पण पुढे मात्र सारा प्रेक्षक गुंतत जातो.
सध्याची भारतातली परिस्थितीही त्याला कारण आहे. त्यामुळे सार्या भारतीयांना हा आपला चित्रपट वाटतो.
स्टोरीचे वेगळेपण सुबोध, कुलदीपचा अभिनय आणि संजय पवार यांचे खटकेबाज डायलॉग हे चित्राचे वैशिष्ट्य.
असल्या स्टोरीचे चित्रपट केवळ मराठीत न निघता हिंदीतही निघावेत,
म्हणजे बॉलिवूडमधे निर्माण झालेली प्रचंड पोकळी
काही प्रमाणात भरून निघेल.
शब्दाने केवळ शब्दच पोचवता येतो. त्यामुळे आपली उत्कंठा टिकेल इतपतच लिहावे म्हणतो.
प्रतिक्रिया
21 Aug 2012 - 1:29 am | मराठे
तुमच्या लेखावरून 'स्वदेस' सारखाच असावा असं वाटतंय.. त्यामुळे पुढे तो स्वदेस पेक्षा वेगळा कसा हे थोडं सांगितल्यास चित्रपट बघायची उत्कंठा टिकेल.
21 Aug 2012 - 1:34 am | आशु जोग
खरं तर स्वदेश हाही अजून कुणासारखा आहे.
पण ते मी नंतर लिहीनच.
'भारतीय' हा चित्रपट स्टोरी च्या द्रूष्टीने अगदी वेगळा आहे.
पहायला हरकत नाही...
पाहील्यावर बोलूच.
21 Aug 2012 - 1:37 am | अविनाशकुलकर्णी
जन्या मन्या तुक्या ..
21 Aug 2012 - 7:40 pm | jaydip.kulkarni
काय न पहाव ह्यात, मक्या चा न जमलेला हेळवी, बकवास गाणी , कलाकारांची चुकलेली निवड , खराब दिग्दर्शन आणि छायाचित्रण , जोश्याचे फालतू विनोद .........
काय ऐकाव पहाव ह्यात : संजय पवार चे संवाद , एक चांगली कथा .......
थोडक्यात काय एका उत्तम कथेचा बट्याबोळ ........
21 Aug 2012 - 7:56 pm | अर्धवटराव
तो शहारुख खान चा स्वदेस एक अत्यंत भंकस चित्रपट होता... त्याचं मराठीकरण करण्याची अवदसा का आठवली कोण जाणे...
अर्धवटराव
22 Aug 2012 - 6:48 pm | बॅटमॅन
शाहरुख भंकस आहे हे कोणीच अमान्य करणार नाही पण स्वदेस ला भंकस म्हणणे म्हंजे यू कांट बी मोर राँग.
22 Aug 2012 - 8:58 pm | अर्धवटराव
मला स्वदेस मध्ये शहारुख जेव्हढा भंकस वाटला तेव्हढाच त्या सिमेमाची स्टोरी आणि प्रेझेण्टेशन. निखालस भंकस.
पहिल्यांदा बघितला तेंव्हा ही प्रतिक्रिया होती. नेहमीप्रमाणे माझ्या प्रतिक्रियेवर (आमच्या ग्रुपमध्ये) वादंग माजले. मग काहि वर्षाने पुन्हा पाहिला हा चित्रपट... परत तेव्हढाच भंकस वाटला.
अर्धवटराव
22 Aug 2012 - 9:00 pm | अर्धवटराव
>>शाहरुख भंकस आहे हे कोणीच अमान्य करणार नाही
-- अहो शहारुख करता जान वगैरे कुर्बान करायला तयार असणारी फौजच्या फौज आहे सभोताल.
अर्धवटराव
21 Aug 2012 - 10:13 pm | अप्पा जोगळेकर
इंटर्व्हलनंतर चित्रपटावरची पकड पूर्णपणे गेलेली आहे. चित्रपटाची हिरोईन मात्र अतिशय सुंदर आहे हीच काय ती जमेची बाब.
22 Aug 2012 - 7:43 pm | आंबोळी
पर्या ,
पिच्चर पायला नायका बे आजून?
जोगांचे परिक्षण चांगल झालय...
पण आम्ही ठरवलय की पर्याचे परिक्षण वाचून मगच पिच्चरला जायचा का नाय ते ठरवणार
23 Aug 2012 - 1:53 am | आशु जोग
>> जोगांचे परिक्षण चांगल झालय...
का त्यांना वावडे आहे का चांगल्याचे...
---
बाकी
तुकारामच्या वेळेस प.रा. यांनी मोठाच कात्रज केला होता सर्वांचा
23 Aug 2012 - 3:16 am | आशु जोग
हा चित्रपट 'स्वदेस' ची कॉपी नाही एवढे मात्र नक्की
23 Aug 2012 - 8:52 am | सोत्रि
परिक्शन काही पटले नाही. एक प्रयत्न म्हणून ठीक.
शेवटी म्हटले आहे की 'उत्कंठा' टिकेल इतपत लिहीले आहे, पण कुठेही उत्कंठा वाटावी असे लेखात काहिच नाही.
सुरुवातीचा भाग एकदम निगेटीव्ह भाष्य करतो. त्याने उत्कंठा वाढते असे म्हणायचे असेल तर माझा पास...
मोहन आगाशे, कुलदिप पवार यांच्यावर असलेल्या परिच्छेदातील मताशी सहमत व्हायला मन धजावत नाही.
जितेंद्र जोशी गळत गळत बोलतो म्हणजे काय? किंवा तो जे काही बालवाडी जोक करतो ते त्याने केलेले नसतात, ते पटकथाकाराने लिहीलेले असतात आणि दिग्दर्शक ठरवतो त्याने कसे बोलायचे ते.
असो....
-(भारतिय) सोकाजी
23 Aug 2012 - 9:37 am | शिल्पा ब
<<<जे काही बालवाडी जोक करतो ते त्याने केलेले नसतात, ते पटकथाकाराने लिहीलेले असतात आणि दिग्दर्शक ठरवतो त्याने कसे बोलायचे ते.
+१
23 Aug 2012 - 7:21 pm | सूर्यपुत्र
हे परिक्षण 'भारतीय' आवर्जून पाहण्यासाठी आहे की न पाहण्यासाठी?
-सूर्यपुत्र.
25 Aug 2012 - 12:01 am | आशु जोग
हे परीक्षण नाही
एका सामान्य प्रेक्षकाच्या चित्रपट पाहील्यावरच्या भावना आहेत.
त्यामुळे आपण तो चित्रपट पहावा आणि नंतर त्यावर परिसंवाद करावा ही अपेक्षा आहे.
--
जाता जाता
'भारतीय' चित्रपट सर्वत्र चांगली गर्दी खेचत आहे. आम्ही स्वतः हाऊसफुलच्या पाट्या पाहिल्या.
25 Aug 2012 - 7:32 am | ऋषिकेश
अत्यंत भिकार दिग्दर्शन, संवाद, क्यामेरा, संगीत वगैरे वगैरे..
कथेचे वेगळेपण काही क्षण ठिक वाटत होते नंतर अती होते.. अजिबात वेळ वाया घालवु नका..