परिक्रमा ही एक थोर अध्यात्मिक साधना आहे याची बालंबाल खात्री झाल्यानं नवग्रह ती करायला निघाले. आत्मझिरो हा `परिक्रमाकिंग' खरं तर लीडर होणार होता पण त्याची आता अशी परिस्थिती झाली होती की `आपण प्रदक्षिणा करतोय का दोन परिक्रमांच्यामधे कुठे तरी थांबलोय' हेच त्याला कळायचं नाही, त्यात तो एकटा मधेच सटकून भलत्याच मार्गानं जाण्याची शक्यता होती. पुन्हा बर्याचदा त्याला काय म्हणायचय ते कुणालाच नक्की समजायचं नाही, तर असा लिडार काय कामाचा? त्यामुळे त्याचा पत्ता कट झाला आणि मतदान घेणं क्रमप्राप्त झालं.
किटेकरबुवांना आपला क्लेम लागेल असं वाटलं होतं कारण ते उदासबोधप्रवीण होते पण त्यांना फक्त मूर्खाच्या लक्षणांशिवाय काही माहिती नसल्यानं ते बोलायला उभे राहता क्षणी त्यांना बसवण्यात आलं, तरीही बसता बसता त्यांनी श्लोक टाकलाच : सर्वांस आहे स्खलन ! म्हणोनी राखावे दडपण! यावर सर्व ग्रुपनं एकच कल्ला करुन हा श्लोक कोणत्या अध्यायात आहे? असा सवाल केला, त्यावर हा अध्याय अप्रकाशित असून तो फक्त खाजगीत सांगितला जातो असं म्हणून त्यांनी पटकन बसून घेतलं.
आत्मगुप्त एकदम मौन राखोन होते त्यांचा कुंडलिनीपासून ते गंडवलिनीपर्यंत अध्यात्माचा दांडगा व्यासंग होता, नुकतेच ते कुठूनसे शक्तीपात वगैरे पण घेऊन आले होते. त्यांच्या मागे त्यांचे गुरु आणि त्यांच्या मागे त्यांचे गुरु अशी थोर परंपरा होती पण अशी परंपरा सांगणारे अनेक असल्यानं त्यांची वर्णी सहज लागण्याची चिन्ह नव्हती. त्यांचं नॉमिनेशन झाल्यावर, "त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तकं निव्वळ फुकट वाटून देखील कुणी घेत नाही की वाचत नाही" अशी चर्चा उसळल्यानं त्यांना तिकीट मिळालं नाही.
बॅडमॅन आणि हाराकिरी हे अंडरवर्ल्डचे दोन रिटायर्ड सदस्य नवग्रहात होते, चंबळच्या खोर्यातून जाताना त्यांचा उपयोग होणार होता पण बॅडमॅनला बालपणापासून अॅसिडिटीचा त्रास होता, जरा कुणाचं बरं दिसलं की त्याचा पोटशूळ उठे. आता परिक्रमेत खायचे हाल त्यात हा अॅसिडमॅन काय कामाचा म्हणून सर्वानुमते तो बाद ठरला. हाराकिरी नुसता नामधारी होता, नांव सोडता त्याच्या कशालाच धार नव्हती त्यामुळे तो नाराज झाला तरी ग्रुपला काय पण फरक पडणार नव्हता सो हराकिरीला ऑईलकॅन बहाल करुण्यात आला. यावर तो उसळला, "मायला म्हणजे आम्ही गेलो का तेल लावत?" यावर किटेकरबुवांनी त्याला "सर्व परिक्रमी दमल्यावर त्यांचे पाय रगडून देण्याचं सेवाव्रती काम तुला देण्यात आलंय" असं समजावलं . आता हे पुण्याकर्म कसं नाकारणार? काय करतो बिचारा, लिडरशिप फार पुढची गोष्ट झाली, प्रदक्षिणेतूनच पत्ता कट व्हायचा म्हणून झक मारत हो म्हणाला!
सगळ्यांना आशा सर्किटची होती कारण गुंतागुंतीच्या कुणालाही न कळणार्या बेफाम थियरीज मांडण्यात त्याची कमालीची तयारी होती. आता सर्किटचा आतला प्रॉब्लम (बीनभाषी सोडता) कुणालाच माहिती नव्हता. नको त्या कॉंप्लिकेटेड थिअरीज डोक्यात बसल्यानं सर्किटचा `आतला सर्किट' शॉर्ट झाला होता; त्यामुळे सर्किट इतका सर्किट झाला होता की चारचौघात तुम्ही कोण? विचारलं तर स्वत:ची ओळख तो खरं नांव सांगण्या ऐवजी `मी सर्किट' अशी करुन द्यायचा. अशा माणसाला लिडर करणं ही ग्रुपची हेटाई होईल हे ओळखून त्याला बाद करण्यात आला.
सर्किटची शेवटार्यंत बीनभाषी आपल्याला नॉमिनेट करेल अशी आशा होती पण त्यात स्सॉलिड गोची होती. सर्किटचा आतला प्रॉब्लम बीनभाषीला माहिती असला तरी बीनभाषीचा आतला प्रॉब्लम सर्किटला माहिती नव्हता. बीनभाषीनं मौनाचा अती दीर्घ अभ्यास केल्यामुळे `आपलं मन बोलतय की आपण बोलतोय' हेच त्याला कळायचं नाही. कधी कधी तर तो मनातल्या मनात इतकं स्पष्ट बोलायचा की आपलं बोलून झालयं असं त्याला वाटायच!
नॉमिनेशनची मुदत संपली तरी आपल्या नांवाला आपल्या सख्या मित्रानं अनुमोदन दिलं नाही हे बघून सर्किट खवळला, त्यानं बीनभाषीला फैलावर घेतला. त्यावर बीनभाषी म्हणाला `आयला मी तुझ्या नांवाला इतकं जोरदार अनुमोदन दिलं आणि कुणालाच ऐकू आलं नाही?' सर्किटनं कपाळावर हात मारुन घेतला! तरीही त्याला नवीन थिअरम सापडलाच "शॉर्टसर्किट आणि न बोलता बोलल्यासारखं वाटणं हे ट्वीन, मीन आणि सीनमधे बसवले तर नक्की काय स्पीन होईल ?" मग त्या आनंदात त्यानं बीनभाषीला माफ करुन टाकला!
आता खरं तर दोघंच उरले होते, ड्युप्लिकेट सह्या मारण्यात नांव कमावलेला बोरू आणि कशीबशी नोकरी सांभाळत जगणारा अशिक्षित. एकाला मंत्री आणि दुसर्याला उपमंत्री करुन परिक्रमेची वाजंत्री वाजली असती पण आपल्याला पद नाही म्हटल्यावर दुसर्याला ते सहज कसं मिळू द्यायचं या भावनेनं सगळे इरेला पेटले तशात त्यांच्यात नव्यानं सामिल झालेल्या कान्यानं त्यांना निवडणूक व्हायलाच पायजेल अशी नैतिक तंबी दिली. नान्या प्रदक्षिणेला येणार नव्हता आणि तो बेभरवश्याचा असल्यानं नक्की ग्रुपमधे आहे की नाही याची कुणाला खात्री नव्हती पण त्याचा पूर्वी दबदबा वगैरे होता म्हणून मंडळी राजी झाली.
अशिक्षितनं मोक्याच्या टायमाला मुद्दा काढला, "हा बोरू इतक्या ड्युप्लिकेट सह्या करतो की आता स्वत:ची पण ड्युप्लिकेट सही ठोकायला लागला आहे, तस्मात हा इतर मेंबरांच्या ड्युप्लिकेट सह्या मारुन परिक्रमाफंडाचा घपला करणार नाही कशावरुन?" झालं! बोरुचा मोरु झाला. आपलं कौशल्यच आपल्याला दगा देईल असं त्याला कधी वाटलं नव्हतं पण अशिक्षित नोकरदार आहे आणि बॉसला टरकून असतो त्याची मिरासदारी दुसरी नोकरी मिळेपर्यंतच आहे हे बोरुला माहिती होतं म्हणून तो गप बसला. अशा तर्हेनं अशिक्षितकडे परिक्रमेची लिडरशिप आली.
परिक्रमा मोहिमेचा सॉलिड गाजावाजा करुन प्रसिद्धी मिळवायची आणि ती पूर्ण झाल्यावर प्रत्येकी वेगवेगळे अड्डे खोलायचे, कुणी कुणाशी पंगा घ्यायचा नाही यावर ग्रुपच एकमत झालं. चौकात उभे राहून त्यांनी आपल्या मोहिमेचे बॅनर उंचावले आणि मोठ्या अभिमानानं ते लोकांच्या प्रतिसादाची वाट बघायला लागले. दोन दिवस झाले, तीन दिवस झाले एकमेकांना धीर देऊन ते थकले, पण कुणी बघायला देखील तयार नाही.
शेवटी सर्किटनं नवा थियरम काढला तो म्हणाला "आयला परिक्रमा परिक्रमा म्हणजे शेवटी काय गोलगोल फिरणंच ना? धरा एकमेकांचे हात, करा रिंगण, म्हणा `नर्मदे हर' आणि करा सुरु प्रदक्षिणा, साला हाय काय आणि नाय काय! "
यावर आत्मझिरो खवळला, आयला म्हंजे आम्ही इतके दिवस येडे होतो की काय परिक्रमा करायला? आत्मगुप्त म्हणाला आयला झक मारली तुमच्यात येऊन, इतक्या वेळात माझी कुंडलिनी जागृत झाली असती. किटेकर बुवांच्या मनात तत्क्षणी मूर्खांची सर्व लक्षणं उचंबळून आली पण मोठ्या संयमानं त्यांनी श्लोक मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली. बॅडमॅन आणि हाराकिरीला "साली ही शहाणी माणसं एकदम ग्रुपचा बल्या कशी करायला निघाली" ते कळेना. बीनभाषीला आतला आवाज ऐकावा का बाहेरचा असा गहन प्रश्न पडला. बोरुकडे वरिजिनल काही नव्हतच त्यामुळे "आपण लिडरशिप घेतली नाही ते बरं झालं" असं आत्मिक समाधान करुन घेऊन तो गप्प झाला. अशिक्षितची ज्याम गोची झाली, मायला कशीबशी रजा टाकून हे परिक्रमेचं जमवलं आता उद्या जॉइन होऊ तेव्हा बॉसला काय सांगायचं? या धसक्यानं तो आपल्या अष्टमित्रांकडे उत्तराच्या अपेक्षेनं पाहू लागला.
प्रतिक्रिया
22 Jul 2012 - 1:58 am | चित्रगुप्त
मस्त मस्त मस्त...
मजा आली वाचून. नर्मदामैय्या की जय हो.
22 Jul 2012 - 2:19 am | बॅटमॅन
ऐला बॅडमॅन!!! छान नामकरण हो संजयजी. अगदी बॅडॅस वैग्रे वाटलं बघा हीथ लेजरी जोकर स्टाईलमध्ये. त्यात परत अॅसिडमॅनची सुपरपॉवर दिली त्याला.
22 Jul 2012 - 5:19 am | अर्धवटराव
अश्या तर्हेने भ्रमीत दुग्धसमुद्राने आपली बंद पडलेले घड्याळ विकुन मिळालेल्या पैशातुन झोपेचे सोंग देणार्या खास गोळ्या विकत घेतल्या, व ऊंटावर बसुन भरपूर निरा ढोसुन पुढील गोंधळा टंकायला तो मिसळेच्या गाडीकडे निघाला. त्याच वेळी हे "निरा"कार ओझं भास आहे, पाय भास आहे, दुखणं भास आहे वगैरे मंत्र आसमंतात घुमु लागले. ऊंट मात्र " गेट वेल सून मामू" म्हणत पाठीवरच्या १+०.५ शहाणपणावर हसत राहिला.
अर्धवटराव
22 Jul 2012 - 7:04 am | ५० फक्त
हा लेख परिक्रमेवरच्या लेखांचा लेखमालिकांचा निदान या संवत्सातरातला तरी शेवटचा असावा, ही प्रार्थना.
22 Jul 2012 - 10:02 am | स्पंदना
परिपाक!
22 Jul 2012 - 10:14 am | आत्मशून्य
मजा आली...
संजय भाउ तुमचं जेव्हडं लिखाण वाचलं त्यामधलं हे सर्वोत्तम... (फक्त) असेच लिहीत रहा.
22 Jul 2012 - 5:08 pm | संजय क्षीरसागर
दिलदारीला मनःपूर्वक दाद देतो आणि रात्री उशीरानं लेख पोस्ट केल्यामुळे दोन किस्से सांगायचे राहिले ते सांगतो
आत्मगुप्त वेगवेगळी नांव धारण करुन वेगवेगळ्या गावात अध्यात्मिक प्रवचनं करत फिरायचे आणि त्यांची पुस्तकं खपवायला बघायचे हे ग्रुपला माहिती होतं. हराकिरी कधीकधी मधेच एकदम धार दाखवायचा, ते बोलायला उठले तेव्हा तो म्हणाला "आहो, त्याचं कसये आत्मगुप्त "वासांसि अंती जीर्णानि यथाविहाय" यावर आत्मगुप्त एकदम कावले म्हणाले "याचा माझ्याशी काय संबंध आहे?" त्यावर हाराकिरी म्हणाला "हाये ना त्याचा संमंध, कवरं बदलली म्हणून पुस्तकातलं मटेरियल काय बदलत नाही!" आत्मगुप्तांना सॉलिड गुगली पडला त्यांनी लगबगीनं हाततालं पुस्तक पिशवीत दडवलं .
किटेकरबुवांना तर त्यानं भलतच अडचणीत आणलं, म्हणाला "काय वो किटेकरबुवा साला तुम्ही उदासबोधप्रविन ना?" किटेकरबुवांना वाटलं चला एकजण तरी श्लोकाचा अर्थ ऐकायला तयार झाला, ते सरसावून म्हणाले, "अरे हराकिरी, विचारना, कोणताही प्रश्न विचार" हराकिरी म्हणाला "मायला हा स्खलनाचा दडपन भ्रह्मचारी मानसाला कसा वो कळला? किटेकरबुवा पार गोरेमोरे झाले, "अरे हराकिरी, इतक्या सरळ श्लोकात कसले तिरकस अर्थ काढतोस तू? आणि मग हलक्या आवाजात म्हणाले, "हा श्लोक मीच एकांतात बसल्याबसल्या जुळवलाय पण साला कुणाला सांगू नकोस हां"
24 Jul 2012 - 12:27 pm | रमताराम
रात्री उशीरानं लेख पोस्ट केल्यामुळे ....
हम्म.
23 Jul 2012 - 9:22 am | विटेकर
ह ह पु....
मस्तच जमलयं विडंबन !
प्रचंड आवडेश !
अरे , तुम्हाला एवढं छान लिहिता येतं तर आम्हाला घेऊन कोठे अध्यात्माच्या जंगलात भटकत होता?
च्यायला , गुडघे फुटले .. ठेचा लागल्या ( त्यातून ठेच लागली म्हणायची चोरी... तुम्ही म्हणणार .. " पाय " हाच भास आहे !)
span style="color: #0000FF;">संजय भाउ तुमचं जेव्हडं लिखाण वाचलं त्यामधलं हे सर्वोत्तम... (फक्त) असेच लिहीत रहा.
याच्याशी २०० ट़क्के सहमत !
एकूण संक्षी सूक्ष्मांतून वृत्तीवर आले .. ते ही अगदी आठ्वड्याच्या सुरुवातीला.. सोमवासरी.. यापरतां दुसरे भाग्य कोणते ?
" हा लेख परिक्रमेवरच्या लेखांचा लेखमालिकांचा निदान या संवत्सातरातला तरी शेवटचा असावा, ही प्रार्थना."
>>>>असहमत !
23 Jul 2012 - 10:32 am | ईश आपटे
एक विडंबन ओशोंची पुणे - अमेरिका - पुणे अशा परिक्रमेवर ही येउ द्या की.... किंवा ओशोंनी केलेले योग व तंत्र साधनेचे विडंबन..........
23 Jul 2012 - 12:43 pm | चैतन्य दीक्षित
मंत्र.... आणि त्याची मात्रा लागू पडली म्हणायची :)
जय साध्वाभास!
23 Jul 2012 - 12:55 pm | संजय क्षीरसागर
पण परिक्रमींना, त्यांनी दिलखुलास दाद दिलीये!
23 Jul 2012 - 1:02 pm | चैतन्य दीक्षित
याला आमच्या भाषेत 'स्वतःचीच लाल करून घेणं' असं म्हणतात.
असो....
23 Jul 2012 - 1:38 pm | संजय क्षीरसागर
पडी तो पडी लेकीन मेरीच तंगडी खडी म्हणतात ! (तुमच्या लेखावर प्रतिसाद देणार्या लोकांनी माझ्या लेखाची तारीफ केलीये हो, नीट बघा)
23 Jul 2012 - 2:16 pm | चैतन्य दीक्षित
पडी तो पडी लेकीन मेरीच तंगडी खडी !
हा.. चालेल... असेही म्हणता येईल.. लाल करून घेणे वगैरे पेक्षा सोफिस्टिकेटेड नाही का.
>तुमच्या लेखावर प्रतिसाद देणार्या लोकांनी माझ्या लेखाची तारीफ केलीये
हो का? गुड गुड.
असेच उत्तरोत्तर स्वतःला हवे तसे प्रत्येक शब्दाचे, वाक्याचे आणि प्रतिसादाचे अर्थ काढत रहा.
वत्सा, तुजप्रत कल्याण असो.
जय साध्वाभास !
23 Jul 2012 - 2:39 pm | संजय क्षीरसागर
या लेखानं तुमच्या लेखाचा बाजा वाजलाय आणि तुम्हाला सारवासारवी करावी लागतेय
23 Jul 2012 - 2:49 pm | चैतन्य दीक्षित
तुम्ही फार विनोदी आहात बुवा.
ह. ह. पु. वा होतेय आज.
23 Jul 2012 - 2:59 pm | संजय क्षीरसागर
आहो तुम्हाला इथे यावं लागलय याचा अर्थ तुम्हाला मात्रा लागू पडलीये! सर्किट परवडला हो तुमच्यापेक्षा निदान खवळला तरी आहे. तुम्हाला नक्की काय चाललय तेच कळत नाहीये
23 Jul 2012 - 3:33 pm | आत्मशून्य
अरे अरे संजय भाउ असं वाटतय की या धाग्याच्या खेळीमेळीला जरा वेगळच वळणं लागत आहे... म्हणुनच जर तुम्हाला हरकत नसेल तर खेळीमेळीला वेगळ वळणं लागण्यापुर्वीच मी सुध्दा या चर्चेत भाग घेतो.
ठीक आहे ? माझ्या मुद्याला सुरुवात करतो... पण तत्पुर्वी हा लेख हा लेखकाच्या गाढवपणाचा व मुर्खपणाचा एक उत्तम व परंतु वाचनीय व वाखाणन्याजोगा नमुना आहे हे जर स्वतः या धाग्याच्या लेखकाने इथेच खुल्याचर्चेतच मान्य केले तर तुम्हाला त्यावर काही आक्षेप आहे का ?
23 Jul 2012 - 8:26 pm | अर्धवटराव
आता फार काहि टंकु नकोस. साक्षी भावाने जगणार्या कालज्जयी आत्म्याची इतकी केवीलवाणी तडफड आणखी बघवत नाहि. असो. नामदेवाला गोरोबा काका भेटतीलच केंव्हा तरी. तोवर आपण गेट वेल सून म्हणायचं बस.
अर्धवटराव
23 Jul 2012 - 4:36 pm | Dhananjay Borgaonkar
हा हा हा....
मस्त लेख्..अशा लेखाला दाद नाही देणार नाहीतर कुठल्या लेखाला देणार.
लय मजा आली वाचुन. असेच लेख लिहित जा..किमान स्वत:चेच असे लेख वाचुन तुम्ही तरी खुश व्हाल ;)
नवसागर
--------------------
जातो तिथे माती खातो.
23 Jul 2012 - 5:36 pm | संजय क्षीरसागर
लेखात एकाचाही नमोल्लेख नाही पण बरोबर योग्य तीच मंडळी येऊन लेखात वर्णन केलेले गुण दाखवून `मीच तो' हे सदोहारण दाखवून देतायेत!
23 Jul 2012 - 6:03 pm | आत्मशून्य
मुळ प्रतीसाद काढुन टाकत आहे.
23 Jul 2012 - 5:59 pm | प्यारे१
क्षीरसागर भो,
अध्यात्म 'जगता' म्हणताय नि असल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या प्रतिक्रियांमध्ये अडकताय?
एकतर जे काही टाकलंय ते काही जमलेलं नाही वाटत नि एखादा बोलला की त्याला लगेच नडताय?
एकनाथांचं नाव घ्याल नि कुणी एकदा नुस्तं बाजूला जरी थुंकलं तरी चिडून परत उलट थुंकाल?
पुढचं लिहायला मला जमेलच असं नाही पण तुम्ही समजून घ्यायला तरी जमवालच नाय???
;) ;)
23 Jul 2012 - 6:06 pm | ईश आपटे
ह्या विडंबनाला, मत्सराची छटा आहे.
23 Jul 2012 - 7:38 pm | स्पा
भिकार लेख.
23 Jul 2012 - 8:07 pm | संजय क्षीरसागर
मला संयम, शिकवायचा?
प्यारे, अध्यात्म म्हणजे तुम्हाला कुणीही ठोकावं आणि तुम्ही गप बसावं असा अर्थ इतर कुणासाठी असेल पण माझ्यासाठी नाही. माझ्या दृष्टीनं या लेखावरचे सगळे प्रतिसाद येऊन कालच गोष्ट संपली होती, नव्यानं कुणी सुरुवात केलीये ते पाहा.
आणि इथे मी एकालाही व्यक्तीशः ओळखत नाही की कुणा विरुद्ध काही लिहित नाही पण गप बसून ऐकून घ्यायच ही अपेक्षा अवाजवी आहे.
24 Jul 2012 - 12:49 pm | मितभाषी
स्पावड्या हा लेख म्हणजे एक भासच आहे. त्यामुळे तो भिकार आहे की चांगला हे गौन आहे.
लेख परत वाच. नाही कळला तर आणखी परत वाच. भले पारायण कर. नक्कीच काहीतरी कळेल. अर्थात तूला काही कळले आहे असे वाटले तर तो सुध्दा एक भासच असेल.
अचाट सिध्दांत सांगून लोकांना चकीत करणे. मग हळूच त्यांच्याकडून पैसे मागणे हा सुध्दा एक भासच आहे. :D
23 Jul 2012 - 8:36 pm | प्रचेतस
लिखाण आवडले.
परिक्रमींच्या फ्याडांवर आणि धाग्यांवर असा उतारा हवाच होता.
23 Jul 2012 - 8:41 pm | सूड
आता अध्यात्म म्हणजे काय हे सांगत फिरणार्या, अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांवर एक लेख यायला अजिबात हरकत नाही. :D
23 Jul 2012 - 8:47 pm | बॅटमॅन
पण मुळात अध्यात्म हाच एक भास आहे हे विसरलात का हो सूडभौ :D :P
23 Jul 2012 - 9:43 pm | सूड
>>पण मुळात अध्यात्म हाच एक भास आहे हे विसरलात का हो सूडभौ
विसरायला ते आधी लक्षात यावं लागतं. :D
24 Jul 2012 - 12:50 pm | बॅटमॅन
हीहीही :D
23 Jul 2012 - 8:47 pm | प्रचेतस
हो ना राव.
उगा काम धाम सोडून नदीला फेरी मारत बसायचं आणि म्हणायचं आम्ही मोठे परिक्रमी.
23 Jul 2012 - 9:01 pm | आत्मशून्य
परिक्रमी बनण्यापेक्षा कट्टेकरी बनणेच जास्त योग्य.
23 Jul 2012 - 9:03 pm | प्रचेतस
अगदी बरोबर.
कधी येतोय शाजीत? पराठे वाट पाहायलेत.
24 Jul 2012 - 12:52 pm | बॅटमॅन
शाजी काऽये?
(निरागस + अज्ञानी) बॅटमॅन.
24 Jul 2012 - 1:18 pm | प्रचेतस
अरे ये वटवाघूळम्यान शाजी नै जानता.
हा बघ शाजीचा पराठेवाला कट्टा.
24 Jul 2012 - 3:44 pm | बॅटमॅन
ऐला भारी! जायलाच पाहिजे एकदा मग तर.
23 Jul 2012 - 9:10 pm | मदनबाण
नारायण ! नारायण ! ;)
एव्हढच म्हणतो...
.
.
.
.
.
चालु द्या. ;)
23 Jul 2012 - 9:48 pm | सुजित पवार
कोनि परिक्रमा केलि तर तुम्हाला त्रास आहे का?
23 Jul 2012 - 10:12 pm | संजय क्षीरसागर
हा लेख माझ्या लेखावर केलेल्या विडंबनाला उत्तर आहे
23 Jul 2012 - 11:00 pm | सुजित पवार
प्रतिक्रियेला उत्तर दिल्याबद्दल आभार. वाटले म्हनुन विचारले.
राग नसावा लोभ असुदे
25 Jul 2012 - 12:23 pm | कवितानागेश
अरेच्चा!
....
अरेरे!!
25 Jul 2012 - 1:02 pm | इरसाल
अगबाइ ! राहीलं काय ?
11 Aug 2013 - 2:11 am | धन्या
जमाडी जंमत आहे सगळी.