मागल्या शनिवारी अर्थात ७ जुलैला आमचे नित्याचेच उद्योग चालू होते. त्यातच ऐन दुपारी मोबाइलने मान टाकली आणि तो दुरुस्तीला द्यावा लागला. रात्री मोबाइल ताब्यात घेतला आणि घराकडे कूच केली. साधारण रात्री १०.३० च्या सुमाराला मिस कॉल अॅलर्ट मिळाला की 'हे नराधमा तुला एकूण ३१ मिस कॉल येऊन गेलेले आहेत.' येवढी कोणा कोणाला बॉ माझी आस लागली आहे, असा विचार करून एकेका मिस कॉलला डायल करायला सुरुवात केली. पहिला फोन लावला तो आमचे मित्र कीर्तिकुमार ह्यांना मुंबईला.
'काय रे फोन करत होतास का ? माझा डब्बा दुरुस्तीला दिला होता, आत्ता चालू केला आहे.'
"प्रसाद, अरे किती फोन लावायचे तुला? तुला उद्या मातोश्रीला जायचे आहे, तुझ्या प्रकाशनाच्या पुस्तकाचे बाळासाहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे,"
पुढे तो काय काय बोलला हे मला अजूनही आठवत नाही. आ.श्री. दिवाकर रावते ह्यांच्या 'मी मंत्रालय बोलतोय..' ह्या पुस्तकाचा मी प्रकाशक असल्याने त्या पुस्तकाच्या उद्घाटनाला मी हजर राहायलाच हवे आहे येवढेच माझ्या डोक्यात शिरले. काही वेळाने डोके काम करायला लागल्यावरती पुन्हा एकदा फोना फोनी करून ही गंमत नसल्याची खातरजमा करून घेतली. अर्थात त्या क्षणानंतर जी धाकधूक आणि काहीशी विचित्र मन:स्थिती होती तिचे वर्णन करणे खरेतर अशक्यच आहे. सकाळी ११ च्या सुमाराला समारंभ असल्याने पहाटेच मुंबईला निघणे आवश्यक होते. मन अजूनही खात्री देत नव्हतेच. अशातच श्रावण मोडकांना फोन करून त्यांच्या कानावरती बातमी घातली आणि कौतुकाचे चार बोल ऐकून घेतले.
सकाळी शिवनेरीने थेट दादर गाठले. मातोश्री परिसरातला बंदोबस्त पाहून हबकलोच. अहो एक चिलखती गाडी देखील तिथे उभी होती. श्री. दिवाकर रावतेंनी आमची नावे आधीच देऊन ठेवली असल्याने, आणि स्वतः ते देखील उपस्थित असल्याने चौकशी टळली, मात्र सलग तीन ठिकाणी तपासणीला सामोरे जावेच लागले. एकेक तपासणी नाका पार करत एकदाचे मातोश्री मध्ये प्रवेशकर्ते झालो आणि पुन्हा एकदा मातोश्रीच्या अंगणात तपासणीला सामोरे जावे लागले. पायर्या चढून मातोश्रीत शिरलो आणि कसेतरी दाबून धरलेले दडपण पुन्हा एकदा उसळी मारून वरती आले. आजूबाजूचे काय बोलत आहेत, काय विचारत आहेत हे देखील पटकन कळत नव्हते. हॉल मधून आत शिरताच लक्ष वेधून घेते ते माँ साहेब आणि बाळासाहेबांचे फुलसाईझ भव्य चित्र. जणू दोघे समोरच उभे आहेत असा सतत भास होतो. काही वेळाने 'साहेब आले आहेत, वरती बोलावले आहे. पण फक्त पाच जणांनीच चला' असा निरोप आला आणि आम्ही लिफ्ट मधून वरच्या मजल्यावरती पोचलो.
लिफ्टमधून बाहेर आलो तर समोरच्या जिन्यात साध्याश्या टीशर्ट आणि पँट मध्ये श्री. उद्धव ठाकरे उभे होते. त्यांना मी ओळखलेच नाही, इतक्या साधेपणाने ते तिथे वावरत होते. सगळ्यात पुढे श्री. दिवाकर रावते, त्यानंतर सामना, नवाकाळचे दोन पत्रकार, फोटोग्राफर आणि सगळ्यात मागे थांबलेलो मी. रावते साहेब आत गेले तेव्हा आम्ही बाहेरच थांबलो होतो. सगळ्यात शेवटी जावे आणि शक्यतो मागेच थांबावे अशा विचारता मी असतानाच आतून 'ताम्हनकर, या आत या' असा आवाज आला आणि आपोआप मोकळी झालेली वाट तुडवत मी साहेबांच्या बैठकीच्या खोलीत प्रवेश केला. आजवर फक्त न्यूज चॅनलमध्येच ही खोली पाहिली होती. खोली कसली, मस्त मोठा हॉल आहे तो. हॉल डाव्या हाताच्या भिंतीजवळ त्यांच्या नेहमीच्या खुर्ची वरती साहेब बसले होते. इतका मोठा हॉल तो, पण बाळासाहेबांच्या नुसत्या उपस्थितीनेच भरल्यासारखा वाटत होता. आत गेल्यानंतर काही वेळाने हा हॉल नुसता भरलेलाच नसून भारलेला देखील आहे हे जाणवले.
आत शिरल्या शिरल्याच मा. बाळासाहेबांनी 'ए कोणी वाकून नमस्कार वगैरे करू नका बरं का. मला अजिबात आवडत नाही ते' असा खणखणीत आदेशच दिला. एका हाताच्या अंतरावरून त्या हिंदूहृदयसम्राटाला बघताना आणि तो गरजता आवाज ऐकताना असे काही रोमांच उभे राहिले म्हणून सांगू.. अंग चोरतच कसा तरी मी साहेबांच्या डाव्या हाताला उभा राहिलो. सोबत आणलेला पुष्पगुच्छ साहेबांच्या हातात देताना माझ्या हातांची थरथर मलाच जाणवच होती. साहेबांनी पुष्पगुच्छ हातात घेताच मी पटकन हात मागे घेतले. हो उगाच हाताची थरथर जाणवायला नको.
"अहो थांबा, हात लावून ठेवा. फोटो काढतायत ते."
पुन्हा एकदा आमचे हात पुष्पगुच्छाला चिकटले. फोटो काढून होताच पुष्पगुच्छ बाजूला ठेवण्यात आला आणि तीच संधी साधून मी साहेबांच्या पाया पडून घेतले. पाठीवरती हात आला आणि मी उभा राहिलो. साहेबांनी एकदा माझ्याकडे पाहिले आणि काहीतरी विचारायला रावते साहेबांकडे वळले. अचानक पुन्हा माझ्याकडे वळले आणि त्या भारून टाकणार्या आवाजात साहेबांनी विचारले "कानात काय घातले आहे हो तुम्ही ते?"
झाले, आमची हवा गुल. कोरडे पडलेले ओठ आणि सुकलेला घसा ओला करत कसेतरी ' भि क बा ळी' हे शब्द तोंडात गोळा करत असतानाच साहेबच पुन्हा म्हणाले. "भिकबाळी आहे का हो ती? "
"हो साहेब.."
"खर्या भिकबाळीचे डिझाइन असे नसते, हे जरा वेगळे दिसते आहे. कोणाची युक्ती ही ?"
"म म म.. माझीच साहेब."
"छान दिसते आहे. मग पेशवे का तुम्ही ?
ह्या प्रश्नावर काय बोलावे तेच सुचेना. तेवढ्यात बाजूला सामनाचे श्री. द्विवेदी साहेब उभे होते. ते पटकन म्हणाले "साहेब, अहो पुण्याचेच आहेत ते."
साहेब पुन्हा माझ्याकडे बघून विचारते झाले, "पुण्याचे का? मग गाता का तुम्ही?" ह्या प्रश्नावरती आजूबाजूला छान हशा पिकला आणि आमचे 'त त प प..' पुन्हा वाढले.
"नाही साहेब गात नाही."
"मग काय करत ?"
"साहेब प्रकाशन करतात ते" परस्पर कोणीतरी माहिती पुरवली.
"फक्त प्रकाशन करता ? किती प्रकाशन केलीत आजवर?" साहेबांचा कळीचा प्रश्न आला.
"अं.. भरपूर केलीत साहेब." काय पण उत्तर दिले मी. वाह ! पुन्हा एकदा आजूबाजूला छानशी खसखस पिकली.
त्या परिस्थितीतून माझी सुटका करायला रावते साहेब अगदी देवासारखे धावले आणि त्यांनी साहेबांसाठी आणलेली शाल माझ्यापुढे केली. एकतर साहेब बाजूला उभे असल्याचे दडपण, त्यात त्यांच्या प्रश्नांनी उडालेली भंबेरी अशा अवस्थेत मला धड शालीची घडी देखील उलगडता येईना. शेजारी श्री. उद्धव ठाकरे छानशे माझी अवस्था बघून गालातल्या गालात हसत होते. शेवटी रावते साहेबांनीच शाल उघडून दिली आणि ती थरथरत्या हाताने मी बाळासाहेबांना पांघरली. मखमली कापडात गुंडाळलेल्या पुस्तकाच्या प्रती आल्या आणि मा. बाळासाहेब आणि श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते 'मी मंत्रालय बोलतोय..' ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
आता कधी एकदा इथून बाहेर पळतोय अशी माझी अवस्था झाली होती. प्रकाशन आटोपले आणि बाळासाहेब पुन्हा एकदा विचारते झाले, "हं कशावरती केले आहे पुस्तक ?"
"साहेब, मंत्रालयाला जी आग लागली, त्या घटनेवरती केले आहे." रावते साहेबांनी माहिती दिली.
"अरे ! येवढ्यात छापून देखील आले ?" येवढे बोलून साहेब माझ्याकडे वळले आणि म्हणाले, "तुम्हाला माहिती होते का आधी हे घडणारे म्हणून ? आधीच तयारीला लागला होतात का काय ?" हास्याची एक जोरदार लाट उसळली आणि त्या लाटेत मी आपले कसेतरी गुळमुळीत 'नाही नाही..' येवढेच बोलू शकलो. मग पुन्हा एकदा तोच प्रश्न रावते साहेबांना देखील विचारला गेला.
साहेबांनी पुस्तक चाळले, त्याच्या किमतीची माहिती करून घेतली, त्यातील लेखांची माहिती घेतली, सामनातले कुठले कुठले लिखाण त्यात समाविष्ट केले आहे ते देखील आवर्जून जाणून घेतले. ते रूप, तो आवाज, तो करारीपण, प्रत्येक गोष्टीवरचे बारीक लक्ष पाहून क्षणभर वाटले की 'साहेबांच्या प्रकृतीची, ते भाषण करू शकतील का नाही' ह्याची सतत विनाकारण वांझोटी चिंता करणार्या काही सुमार पत्रकारांना ह्या क्षणी इथे बोलावावे आणि 'आता लिहा बरं तुमची बातमी' असे सांगावे.
जाता जाता :- शक्यतो महिन्याभरातच माझ्या नवीन ग्रंथदालनाची सुरुवात करतो आहे. ह्या प्रसंगी मिपाकरांना खास सवलतीत पुस्तके देण्याचा मानस आहे. तरी ज्यांची खरेदीची इच्छा असेल त्यांनी व्यनी अथवा खरडीतून नोंदणी करावी अशी विनंती. पुस्तके तुमच्या हातात पडल्यावरतीच पैशाची देवाण घेवाण होणार आहे. ह्या व्यवहाराचा व मिपाचा काहीही संबंध नाही.
प्रतिक्रिया
17 Jul 2012 - 2:17 pm | प्रभो
बेस्ट रे माणसा!!!!
19 Jul 2012 - 12:00 pm | मृगनयनी
ग्रेट्ट रे पर्या!!!... भाग्यवान आहेस्स!!.. बाळासहेबांबरोबरची ही भेट म्हणजे खरोखरच "सुवर्णक्षण"!!!
ओव्हरऑल या सुवर्णक्षणा'तल्या सगळ्यांच्याच टाईममॅनेजमेन्ट'ला सॅल्यूट!!
कीप इट अप!!!!! :)
-आळशी नयनी! ;)
18 Nov 2012 - 3:33 pm | मृगनयनी
खरंच भाग्यवान आहेस तू परा.... बाळासाहेबांबरोबरचे सुवर्ण क्षण, त्यांची कौतुकाची थाप, त्यांचा आशीर्वाद... हे सगळं अनुभवायला खरंच भाग्य लागतं!!.... तुझे ४ महिन्यांपूर्वीचे भारावलेले क्षण आज फोटोंमध्ये पाहिले... की नकळत हात जोडले जातात.....
बाळासाहेबांसारखा योद्धा खरोखर हजारो वर्षांमध्ये एखादाच जन्माला येतो!!!...
एक तळपता सूर्य आज कायमचा मावळला जाणार.... हे अन्तिम सत्य पचवणं खूप अवघड जातंय..... :(
18 Nov 2012 - 9:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या एका मिपाकर मित्राची आणि साहेबांची भेट झाली त्याचं वर्णन मी आणि साहेबच भेटलो अशी केली.
-दिलीप बिरुटे
(दु:खी)
17 Jul 2012 - 2:19 pm | स्वाती दिनेश
प्रकाशन समारंभाचा वृत्तांत आवडला,
स्वाती
17 Jul 2012 - 2:20 pm | स्मिता.
वाचतांना मलाच भारावल्यासारखे वाटत होते. खरोखर, बाळासाहेबांसारख्या व्यक्तिमत्त्वाची प्रत्यक्षात भेट हा सुवर्णक्षणच आहे. नवीन पुस्तकाकरता हार्दिक अभिनंदन! असे अनेकोनेक सुवर्णक्षण आपल्या आयुष्यात येवो अशी शुभेच्छा!!
17 Jul 2012 - 2:21 pm | कुंदन
अभिनंदन रे पर्या!
17 Jul 2012 - 2:23 pm | स्वाती दिनेश
प्रकाटा
17 Jul 2012 - 2:21 pm | सुमीत
हा प्रसंग जगलात तुम्ही, बाकी ग्रंथदालनाची वाट पहात आहे.
17 Jul 2012 - 2:25 pm | स्वाती दिनेश
प्रकाटाआ
17 Jul 2012 - 2:23 pm | स्वाती दिनेश
प्रकाटाआ
17 Jul 2012 - 2:21 pm | स्पा
नव्या इनिन्ग्स साठी अभिनंदन रे परा.....
:)
तुझ्या ग्रंथ दालनाची आणि प्रकाशन संस्थेची अशीच भरभराट होत राहो हि शिव चरणी प्रार्थना :)
17 Jul 2012 - 2:22 pm | मन१
शुभेच्छा.
17 Jul 2012 - 2:26 pm | प्यारे१
बेस्ट रे!
(माणसा कसं म्हणावं आता पराला? प्रकाशक झाला नै तो? )
17 Jul 2012 - 2:28 pm | चित्रगुप्त
खूप छान वाटले वाचून आणि फोटो बघून.
बाळासाहेब आणि उद्धव याखेरीज कोणते कोण, हे ठाऊक नसल्याने कृपया खुलासा करावा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
17 Jul 2012 - 2:29 pm | प्रचेतस
अभिनंदन आणि शुभेच्छा.
17 Jul 2012 - 2:30 pm | sneharani
मस्त. पुन्हा एकदा अभिनंदन!! एका नव्या सुरवातीसाठी खूप सार्या शुभेच्छा!!!
:)
17 Jul 2012 - 2:31 pm | मी_आहे_ना
प.रा.शेठ, खरोखरच सुवर्णक्षणाचे अनुभव घेतलेत, आणि त्य भारावलेल्या क्षणांचा इथे वृत्तांत टंकलात त्याबद्दल धन्यवाद. तसेच आपले हार्दिक अभिनंदन!!!
17 Jul 2012 - 2:32 pm | मी_आहे_ना
प.रा.शेठ, खरोखरच सुवर्णक्षणाचे अनुभव घेतलेत, आणि त्या भारावलेल्या क्षणांचा इथे वृत्तांत टंकलात त्याबद्दल धन्यवाद. तसेच आपले हार्दिक अभिनंदन!!!
17 Jul 2012 - 2:38 pm | इरसाल
बाळासाहेबांना भेटल्यावर अंमळ मुठ्भर मांस अंगावर आलेले दिसतेय. ( टोबर्या टोबर्या गालावरुन )
अभिनंदन.
आम्हाला काही पुस्तके हवी आहेत.तुम्ही यादी कधी जाहीर करणार ?
17 Jul 2012 - 2:40 pm | मोहनराव
परा अभिनंदन!
17 Jul 2012 - 2:41 pm | दिपक
भारावलेल्या प्रसंगाचे भारावुन टाकणारे वर्णन. मस्तच.
बाकी शुभेच्छा आहेतच आणि कायम राहतील. घौड्दौड अशीच चालुच ठेवा :-)
चला आता पुस्तकांची यादी बनवायला घेतली पाहिजे.
17 Jul 2012 - 3:10 pm | सूड
अभिनंदन आणि शुभेच्छा !
17 Jul 2012 - 3:19 pm | प्रभाकर पेठकर
भव्य प्रकाशनच्या आटोपशीर समारंभाचा भारावलेला वृत्तांत खुप आवडला.
श्री. चित्रगुप्त म्हणतात त्या प्रमाणे बाळासाहेब आणि उद्धव ह्या खेरीज कोणालाही ओळखत नसल्याने समुह छायाचित्राखाली नामावली दिल्यास सोयिस्कर होईल.
धन्यवाद.
17 Jul 2012 - 3:20 pm | स्वप्निल घायाळ
लई भारी परा !!!
असेच चांगले लेख लिहित जा !!!
17 Jul 2012 - 3:37 pm | बॅटमॅन
भारी भारी!!
हार्टी काँग्रेसचं अधिवेशन **!!
**संदर्भः शाळा, आंबेकर टु फावड्या.
17 Jul 2012 - 3:42 pm | गवि
क्या बात प्रकाशकसाहेब.
पुस्तकाबद्दल अभिनंदन. :)
मातोश्रीवरची ही भेट थरारक असणार यात शंका नाही...
17 Jul 2012 - 3:47 pm | जागु
अभिनंदन.
17 Jul 2012 - 3:49 pm | विजय_आंग्रे
अभिनंदन आणि शुभेच्छा.
17 Jul 2012 - 3:49 pm | श्रीरंग
मस्तच! नवीन ग्रंथदालनासाठी खूप खूप शुभेच्छा!
17 Jul 2012 - 3:50 pm | ज्ञानोबाचे पैजार
अभिनंदन...
पुस्तकांच्या यादीची वाट पहात आहे.
17 Jul 2012 - 3:50 pm | ज्ञानोबाचे पैजार
अभिनंदन...
पुस्तकांच्या यादीची वाट पहात आहे.
17 Jul 2012 - 3:56 pm | प्रीत-मोहर
ऑस्सम :)
17 Jul 2012 - 4:10 pm | प्रेरणा पित्रे
ग्रंथदालनासाठी शुभेच्छा !! पुस्तकांची यादी करुन ठेवते...
अवांतर : मला फोटो दिसत नाहिये..
17 Jul 2012 - 4:18 pm | Dhananjay Borgaonkar
अभिनंदन परा.
पुढील वाटचालीकरता शुभेच्छा.
17 Jul 2012 - 4:33 pm | तुषार काळभोर
wonderful!!!
Awsome!!!
Lai Bhaari!!!!
17 Jul 2012 - 4:41 pm | जोशी 'ले'
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.. :-)
17 Jul 2012 - 4:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा......पराशेठ, प्रकाशक झाल्याबद्दल अभिनंदन......!
वृत्तांत भारीच.
बाय द वे, आपल्याकडे कोणकोणती पुस्तकं आहेत. कै यादी-बीदी चाळायला मिळेल काय ?
-दिलीप बिरुटे
17 Jul 2012 - 4:47 pm | आनंद
परा अभिनंदन!
17 Jul 2012 - 4:47 pm | सर्वसाक्षी
आणि शुभेच्छा!
भाग्यवान आहात.
17 Jul 2012 - 4:54 pm | चतुरंग
तुझ्या पुस्तकदालनाची वाट बघतो आहे.
बाळासाहेबांचा एकूण दरारा बघता 'मातोश्री'वरच इतिश्री होते की काय असे तुला वाटत असल्यास नवल नाही. ;)
एकुणात आयुष्यभर जपून ठेवावा असा सुवर्णक्षण तू अनुभवलास हे नक्की. पुन्हा एकदा अभिनंदन!!
-रंगा
17 Jul 2012 - 6:00 pm | प्रसाद प्रसाद
असेच म्हणतो.
23 Jul 2012 - 10:56 am | ऋषिकेश
असेच म्हणतो.
आभिनंदन! :)
17 Jul 2012 - 5:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मनापासून अभिनंदन पराशेट.
फोटो बघून एक मिपाकर असल्याचा अभिमान वाटला. :)
17 Jul 2012 - 5:58 pm | राजघराणं
अभिनंदन.
17 Jul 2012 - 6:03 pm | सहज
उद्घाटन प्रसंगाचे वर्णन आवडले
शुभेच्छा!
17 Jul 2012 - 6:11 pm | मितभाषी
पराशेठ अभिनंदन !!!!!!
पुस्तक यादीची वाट पहात आहे.
17 Jul 2012 - 6:12 pm | आत्मशून्य
असे सुवर्णक्षण तुम्हाला क्षणोक्षणी लाभत राहोत ही शुभेच्छा.
17 Jul 2012 - 6:34 pm | पिंगू
पराशेठ, वाघाच्या गुहेत जाऊन वाघाची भेट घेतल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन..
बाकी तुमच्या पुस्तकदालनात हजेरी लावणे होईलच..
17 Jul 2012 - 6:44 pm | बिपिन कार्यकर्ते
पराण्णा! अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
17 Jul 2012 - 7:09 pm | ढब्बू पैसा
मस्तच!
मनापासून अभिनंदन.
असेच मोठे होत रहा ;)
17 Jul 2012 - 7:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे
भारी ! लई भारी !!
जाता जाता, परा-ठाकरे भेट आणि कालच्या घटना यावरून खालील दोन ओळी सुचल्या.
पराचिया दादुलेपणाचा उबारा । न साहवेचि युवराजकुमारा ।।
भेणे थरथरोनी राजभरा । आला हार्ट अटॅक* ।।
* विनोदाचा क्षीण प्रयत्न आहे. फार गंभीरपणे घेउ नये.
17 Jul 2012 - 7:30 pm | मदनबाण
अभिनंदन ! :)
17 Jul 2012 - 7:33 pm | अशोक पतिल
अभिनंदंन ! पराजी !
छान !
17 Jul 2012 - 7:40 pm | मराठमोळा
इथे मुंबई आणि पुणे वाद न करता अभिनंदन दिलेल्या सर्व मराठी लोकांचे अभिनंदन!!!!!!!
17 Jul 2012 - 7:49 pm | आप्पा
अभिनंदन पराशेठ,
आपल्या ग्रंथदालनास भेट देऊन आपला परिचय करुन घेण्यास नक्की आवडेल
17 Jul 2012 - 8:08 pm | पैसा
तुझ्या नशीबाचा हेवा वाटतोय! मस्त लिहिलंस!
17 Jul 2012 - 8:40 pm | संजय क्षीरसागर
आधीच तयारीला लागला होतात का काय ? या हजरजवाबी प्रश्नाचं कौतुक आणि परा तुझं अभिनंदन!
17 Jul 2012 - 8:49 pm | चौकटराजा
हा खरे तर रा रा बाळासाहेब ठाकरे ( आमचे त्यातल्या त्यात आवडते राजकारणी ) यांच्या आयुष्यातील " सुवर्णक्षण " आहे. इतर सर्व नररत्नांबरोबर बाळासाहेबांचा फोटो म्हणजे ......... अहो भाग्यम !
17 Jul 2012 - 8:57 pm | प्राध्यापक
परा,खरच तुम्ही भाग्यवान आहात,आयुष्यात असे फार थोडे क्षण येतात ज्या बद्दल आपल्याला स्वत्;चाच अभिमान वाटायला लागतो, हे सुवर्णक्षण जपण्याच्या योग्यतेचेच आहेत्,तुमच्या ग्रंथदालनास शुभेच्छा.
त्यामध्ये इतिहासाची पुस्तके असल्यास त्याची यादी व्य.नि.तुन कळविल्यास बरे होइल.
17 Jul 2012 - 9:01 pm | फारएन्ड
आणि वर्णनही मस्त!
17 Jul 2012 - 9:15 pm | कौशी
मस्तच!
मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
17 Jul 2012 - 9:25 pm | जाई.
अभिनंदन रे पर्या
17 Jul 2012 - 9:26 pm | सुनील
वृत्तांत आवडला. अभिनंदन आणि शुभेच्छा!
वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे फोटोत बाळासाहेब आणि उद्धव वगळता अन्यांची नावे द्यावीत.
17 Jul 2012 - 9:40 pm | शैलेन्द्र
पराशेठ , अभिनंदन...
उभे असलेल्यांपैकी दिवाकर रावते व द्विवेदी ओळखता येतायेत.. अर्थातच ठाकरे व परा सोडुन..
17 Jul 2012 - 10:00 pm | खेडूत
मस्त! अभिनंदन..
ग्रंथ दालनाची पण वाट पहातोय!
17 Jul 2012 - 10:03 pm | मृत्युन्जय
हाबिणंदन. आता तरी पार्टी द्या.
17 Jul 2012 - 10:09 pm | अत्रुप्त आत्मा
अभिनंदन.....:
17 Jul 2012 - 11:17 pm | रेवती
अभिनंदन!
17 Jul 2012 - 11:24 pm | क्लिंटन
वृत्तांत खूप आवडला. किप इट अप.
17 Jul 2012 - 11:32 pm | रमताराम
वाघाच्या गुहेत जाणारी पावलेच फक्त दिसतात म्हणे.... पण इथे तुझी परतणारी पावलेच नव्हे तर अख्खा पर्या दिसतोय म्हणजे वाघोबा दिलदार असावेत. :)
श्रावण मोडकांना फोन करून त्यांच्या कानावरती बातमी घातली आणि कौतुकाचे चार बोल ऐकून घेतले.
'... पण ते इथे चारचौघात उच्चारण्याजोगे नसल्याने इथे टंकले नाहीत' हा खुलासा लिहायचा राहिला का रे?
18 Jul 2012 - 10:19 am | बिपिन कार्यकर्ते
असं नाही! मोडक म्हणून म्हणून काय म्हणणार पर्याला... "आता मोठे व्हा लवकर" ... असंच म्हणणार. ते अख्ख्या दुनियेला माहित आहे. मग कशाला लिहायचं? म्हणून नाही लिहिलं त्याने. ;)
17 Jul 2012 - 11:33 pm | चिगो
अभिनंदन, कौतूक आणि शुभेच्छा.. जियो पराशेठ..
17 Jul 2012 - 11:36 pm | चित्रगुप्त
बाकीच्यांचं जाऊ द्या, आमचे पराशेठ कोणते ? हेच मुळात परगावी असणार्या अनेक मिपाकरांना ठाऊक नाही, त्यामुळे खुलाशाची अपेक्षा करत आहे.
18 Jul 2012 - 11:49 am | प्रास
यातले गोबर्या गालाचे तरूण म्हणजेच प्रकाशक साहेब उर्फ परा होत....
अभिनंदन आणि शुभेच्छा पराशेठ!
17 Jul 2012 - 11:41 pm | अभ्या..
वाघाचा सामना. मार्मिक पणे.
अभिनन्दन.
18 Jul 2012 - 12:08 am | नंदन
हार्दिक अभिनंदन!
18 Jul 2012 - 1:05 am | अर्धवटराव
खरोखर सुवर्णक्षण अनुभवलेत तुम्ही. अभिनंदन.
अर्धवटराव
18 Jul 2012 - 1:48 am | पिवळा डांबिस
बाळासाहेबांचा सेन्स ऑफ ह्यूमर टेरेफिक आहे. त्याची पराशेठला थोडी झलक मिळाली....
:)
बाकी तुमच्या त्या नवीन दालनात आमच्यासाठी कमीतकमी एखादी सतरंजी राखून ठेवावी ही विनंती...
_/\_
18 Jul 2012 - 1:55 am | शुचि
परा मनःपूर्वक अभिनंदन!!
18 Jul 2012 - 5:54 am | टुकुल
मस्त रे परा. नशीबवान आहेस :-)
--टुकुल
18 Jul 2012 - 8:21 am | विवेक मोडक
मोठ्ठं आभिनंदन मित्रा!!!
18 Jul 2012 - 8:24 am | किसन शिंदे
अभिनंदन आणि शुभेच्छा!!
ग्रंथदालनाची यादी लवकरात लवकर जाहिर करा. :)
18 Jul 2012 - 8:34 am | ५० फक्त
मस्त रे, अभिनंदन आणि नविन उपक्रमासाठी भरघोस शुभेच्छा.
18 Jul 2012 - 9:05 am | इन्दुसुता
अभिनंदन व अनेक शुभेच्छा
18 Jul 2012 - 9:31 am | घाशीराम कोतवाल १.२
हार्दिक अभिनंदन
बाकि माझा रुमाल टाकतो आहे ग्रंथदालनाच्या उदघाटन सोहळ्याचा ...
नक्की येउ पुस्तक घ्यायला
18 Jul 2012 - 9:56 am | मूकवाचक
परा यांना प्रकाशन व्यवसायातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
18 Jul 2012 - 10:21 am | Madhavi_Bhave
पराजी खूप खूप अभिनंदन. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अश्या पद्धतीने आपण मोठ्या माणसाना नावे ठेवायला तयार असतो आणि वेळ प्रसंगी अपशब्द देखील वापरायला कमी करत नाही पण प्रत्यक्ष भेटलो तर आपली कशी वाट लागते आणि आपली स्वताची "औकात" (हे मी माझ्या बद्दल लिहिले आहे) हे कळून चुकते. अश्या मोठ्या माणसाना भेटलो कि अगदी बोबडी वळते आणि आपण नक्की काय बोलतो आहे तेच कळत नाही.
पुन्हा एकदा अभिनंदन आणि आपल्या पुस्तकांची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करा. आम्ही उत्सुक आहोत.
माधवी
18 Jul 2012 - 10:30 am | अमोल केळकर
मनापासून अभिनंदन !!! :)
अमोल केळकर
18 Jul 2012 - 11:16 am | श्रीवेद
हार्दिक अभिनंदन