अग्नीधनूष्य हा एक फार दुर्मिळ अद्भूत असा नैसर्गिक चमत्कार आहे. हा घडायला आकाशात तंतूमय ढग असावे लागतात व त्यांची उंची वीस हजार फुटाहून अधिक असावी लागते. एवढेच नाही तर या ढगात भरपूर बर्फाचे कणही असावे लागतात.
सुर्याचे किरण या ढगांवर बरोबर अठ्ठावन्न अंशाचा कोन करून पडावे लागतात. असे झाले तर हे इंद्रधनुष्य़ आग आकाशाला आग लागल्यासारखे दिसू लागते.
या चमत्काराचे शास्त्रीय नाव आहे “सरकमहॉरीझाँटल आर्क”.
हे नेहमी दिसणारे इंद्रधनुष्य नाही. जेव्हा प्रकाश उंचीवर असलेल्या तंतूमय ढगातून जातात तेव्हा हे चमत्कार दिसतात. यातील बर्फाचे षटकोनी स्फटीक हे जाड थाळ्यांच्या आकाराचे लागतात व ते जमिनीला समांतर असावे लागतात.
प्रकाश या स्फटीकाच्या बाजूने आत शिरतात व खालच्या बाजूने बाहेर पडतात. हे होताना या किरणांचे अपवर्तन होऊन त्यातून रंग बाहेर पडतात. एवढे होऊन चालत नाही तर या बर्फाच्या स्फटीकांची एकामेकांशी एका विशिष्ठ प्रकारे रचना व्हावी लागते. हे सगळे जर झाले व आपण तेथे असलो तर नशिबवान माणसाला हा चमत्कार दिसतो.
आपल्याही हे केव्हातरी दिसेल. फारच भारी दिसतो हा प्रकार..............!
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
4 Jul 2012 - 5:11 pm | प्रचेतस
फारच भन्नाट.
भाग्यवान आहात.
4 Jul 2012 - 5:14 pm | sagarpdy
फोटू कुठे काढलात ?
4 Jul 2012 - 5:18 pm | जयंत कुलकर्णी
हा हा, पुण्यात माझ्या टेबलावरून......खरंच.
4 Jul 2012 - 5:36 pm | इनिगोय
फटू दिसत नाहीये :(
4 Jul 2012 - 5:42 pm | हरिप्रिया_
अप्रतिम!!!
4 Jul 2012 - 5:47 pm | सूड
फटु दिसत नाहीयेत.
10 Jul 2012 - 6:10 pm | अत्रुप्त आत्मा
हे सगळे जर झाले व आपण तेथे असलो तर नशिबवान माणसाला हा चमत्कार दिसतो.>>> १०० % सहमत... जबरदस्त आहे हा निसर्गचमत्कार :-)
4 Jul 2012 - 6:06 pm | पिंगू
नशिबवान आहात काका.. बघायला आणि फोटो काढायला पण मिळाला..
4 Jul 2012 - 7:03 pm | चित्रगुप्त
व्वा...अद्भुत आहे हा प्रकार.
आणि तुम्हाला ही सर्व शास्त्रीय माहिती आहे, हे आणखी विशेष.
अनेक आभार.
5 Jul 2012 - 9:13 am | जयंत कुलकर्णी
दोन वर्षापूर्वी हा सोहळा मी एकदा बघितला होता तेव्हा ही माहिती काढली होती अर्थात नेटवरून. तेव्हा फोटो काढता न आल्यामुळे मतात हुरहुर राहिली होती ती यावेळी दूर झाली.
4 Jul 2012 - 7:10 pm | स्मिता.
अतिशय भन्नाट प्रकार दिसतोय हा... पुण्यात घरबसल्या असं अद्भुत दृष्य दिसायला खरोखर भाग्यवान आहात.
हा सुरेख फोटो येथे शेअर केल्याबद्दल अनेक आभार!
4 Jul 2012 - 8:49 pm | अन्या दातार
....
4 Jul 2012 - 8:52 pm | जाई.
भन्नाट
5 Jul 2012 - 3:54 pm | जोयबोय
मी ओडीशामधे असताना वर्तुळाक्रुती इन्द्रधनू पाहीले होते. पुर्ण गोल इन्द्रधनू सुर्याभोवती निर्माण झाले होते.
फारच अद्भुत होता नजारा.
6 Jul 2012 - 12:49 pm | बॅटमॅन
त्याला इंद्रवज्र म्हणतात असे गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत दिलेले आहे. तुम्ही दिलेला अनुभव त्यांनादेखील (बहुतेक) सिंहगडावर आला होता.
6 Jul 2012 - 12:59 pm | प्रचेतस
इंद्रवज्र मी रतनगडाच्या पश्चिम कड्यावरून पाहिलेले आहे.
फारच भन्नाट प्रकार आहे तो. आपलीच प्रतिमा आपल्याला डोळ्यासमोरच्या कड्यात दिसते.
6 Jul 2012 - 1:04 pm | बॅटमॅन
लै भाग्यवान बगा तुम्ही. ते वर्णन वाचताना असलं भारी वाटलं होतं काय सांगू.
10 Jul 2012 - 2:48 pm | सागर
धागाकर्ते जयंत सर यांच्या धाग्याचे महत्त्व वाचकांच्या लक्षात यावे यासाठी ही २ चित्रे
10 Jul 2012 - 2:55 pm | प्रचेतस
ग्रेट.
तेजाळलेले आकाशच जणू.
11 Jul 2012 - 12:28 pm | टुकुल
विश्वास ठेवायला अवघड असा सुंदर फोटो काढलात आणी पुरेपुर माहीती हि दिलीत. धन्यवाद.
--टुकुल.
12 Jul 2012 - 5:39 pm | पैसा
खरंच फार मोठं नशीब असायला पाहिजे हे दिसण्यासाठी!
12 Jul 2012 - 5:49 pm | सागर
खरंच फार मोठं नशीब असायला पाहिजे हे दिसण्यासाठी!
अवांतरः मी येथे दिलेले फोटो स्वतः काढलेले नाहियेत
12 Jul 2012 - 6:12 pm | तर्री
निसर्ग असा अद्भुत होताना पाहाणे हा काय अजब प्रकार असतो.
छान फोटो !