रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता -
का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता!
निवृत्तीत सुमार - काव्यप्रतिभा याची रुळा सोडते!
जैशी का अनिरुद्ध होत स्रवते, वाटा नव्या शोधते.
("विडंबकाची कात चढवल्यानंतरही उत्तम कवींच्या प्रतिभेच्या प्रसवास मुळीच निरोध होत नाही," असे काही लोकांचे मत आहे. मिसळपावावरील दोन सिद्धहस्त कवींची उदाहरणे लक्षात घेता हे मत मला पटत नाही.)
प्रतिक्रिया
8 Aug 2008 - 10:53 pm | विसोबा खेचर
धनंजया,
मानलं रे तुला! तुझ्या अवघ्या चार ओळी खूप काही सांगून गेल्या!
आपला,
(मिपावर मधुशालेच्या सुरेख अनुवादाची वाट पाहणारा!) तात्या.
8 Aug 2008 - 10:55 pm | प्राजु
मिपावर मधुशालेच्या सुरेख अनुवादाची वाट पाहणारा!) तात्या.
मीही वाट पहाते आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Aug 2008 - 11:15 pm | मेघना भुस्कुटे
असं काही वाचलं ना, की मिसळपाववर आल्याचा अभिमान वाटतो.
8 Aug 2008 - 11:54 pm | प्राजु
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता -
का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता!
धनंजय, मानलं तुम्हाला. दरवेळी गाडी घसरली खाली की, तिला रूळावर नेण्यासाठी आपल्या सारख्याच जाणकार चालकाची गरज पडते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Aug 2008 - 12:05 am | विसोबा खेचर
असं काही वाचलं ना, की मिसळपाववर आल्याचा अभिमान वाटतो.
मेघनाताई, मी आपल्याशी सहमत आहे! लोकांना मिपावर येणे नकोसे वाटावे या प्रयत्नात काही मंडळी असतात परंतु त्याचसोबत धन्याशेठच्या उत्तुंग प्रतिभेचे अवघे चार शब्द मिपाची शोभा वाढवतात! आणि अशी धन्याशेठसारखी मंडळी जोवर इथे आहेत तोवर मिपावर येणे माझ्यासारख्या सामान्य वाचकाकरता निश्चितच आनंददायी ठरते/ठरेल!
या निमित्ताने एक सामान्य वाचक म्हणून अजून एक व्यक्तिगत मत नोंदवू इच्छितो! ते असे की मिपावर आताशा विडंबनांचा इतका प्रचंड भडिमार होत आहे की त्याचा अक्षरश: उबग यावा! आणि म्हणूनच निदान मी तरी पुढचा काही काळ मिपावरील कोणत्याच विडंबनाला बरा-वाईट असा कुठलाच प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले आहे! अर्थात, हा माझा केवळ एका सामान्य वाचकाच्या भूमिकेतून घेतलेला निर्णय आहे, माझ्या व्यक्तिगत चॉईसचा अन् इच्छेचा तो एक भाग आहे!
बाकी कुणी काय लिहावं अन् काय लिहू नये, विडंबने लिहावीत की लिहू नये, हा प्रत्येकाचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचाही मी आदरच करतो!
बट आय विश टू क्विट! सो लेट मी....! :)
तात्या.
9 Aug 2008 - 4:15 pm | घाटावरचे भट
या निमित्ताने एक सामान्य वाचक म्हणून अजून एक व्यक्तिगत मत नोंदवू इच्छितो! ते असे की मिपावर आताशा विडंबनांचा इतका प्रचंड भडिमार होत आहे की त्याचा अक्षरश: उबग यावा!
हेच म्हणतो....
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
9 Aug 2008 - 1:21 am | चतुरंग
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता -
का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता!
निवृत्तीत सुमार - काव्यप्रतिभा याची रुळा सोडते!
जैशी का अनिरुद्ध होत स्रवते, वाटा नव्या शोधते.
वा! क्या बात है!
आपले हे काव्यात्म चपखल कान पिळणे आम्हाला चांगलेच लागले! पार डोक्यापर्यंत कळ गेली!
रंगांची चतुरस्र फेक भरुनी, आणेल प्याला पुन्हा
झाले जरा विडंबन अती तरी, माफाल आम्हा गुन्हा
निवृत्तीत सुमारही वसतसे काव्यांबरी शोभतो
सिद्धहस्त अनिरुद्ध कवी तो कविता पहा रेखितो
चतुरंग
9 Aug 2008 - 1:34 am | मुक्तसुनीत
रंगास्की ! उत्तम प्रतिसाद ! मात्र "वजनात मारण्याकरता" ;-) तुमच्या ताजमहालाला आमच्या विटा जोडतोय !
रंगांची चतुरस्र फेक भरुनी, आणेल प्याला पुन्हा
झाले जरा विडंबन अती तरी, सोडुनि द्यावा गुन्हा
निवृत्तीत सुमारही वसतसे काव्यांबरी शोभतो
प्रत्युन्मती अनिरुद्ध श्रेष्ठ कवी तो कविता पहा रेखितो
9 Aug 2008 - 2:10 am | सर्किट (not verified)
पण जरा छोटे वाटले.
पूर्ण लिहा, तेवढी प्रतिभा तुमच्यात आहे नक्कीच.
- (वृत्त प्रेमी) सर्किट
9 Aug 2008 - 4:02 pm | केशवसुमार
काय लिहावे उत्तर थोडा विचार केला
दिर्घ एक मग छाती मध्ये श्वास घेतला..
धनंजया मज पटते आहे तुमचे म्हणणे
एक तर्हेचे व्यसन असे विडंबन लिहिणे
शिघ्र काव्य लिहिण्यात असे ती नशा वेगळी
विडंबने लिहिताना अन ती मिळते सगळी
वाव्वांची त्या नंतर इतकी सवय लागते
ना येता त्या लगेच अन अस्वस्थ वाटते
अहं स्वतःचा सुखावण्या मग लिहित राहतो
विडंबना मागून विडंबन करत राहतो
फुलून येण्या काव्य कुठे मग वेळ राहतो
बनुन विडंबक रहण्यातच तो धन्य मानतो
विडंबकाची कात जरी ही बरी वाटते
अबोल अनवट आत कविता ती गुदमरते
म्हणून टाकली कात मी फाडून शेवटी
आणि घेतली विडंबनातून मी निवृत्ती
रंग्या मेल्या सावध हो तू अत्तापासून
नकोस देऊ तुझ्या आतली कविता नासून
धनंजयाचे ऐक निवेदन कर वेषांतर
मधुशालेचे पुर्ण अधी कर तू भाषांतर
10 Aug 2008 - 4:06 am | विसोबा खेचर
अबोल अनवट आत कविता ती गुदमरते
वा केशवा! अप्रतीम कविता...!
तात्या.
9 Aug 2008 - 7:19 pm | ऋषिकेश
वा धनंजय! सुचक, नेमक्या आणि वृत्तबद्ध ओळी आवडल्या
रंगराव, प्रतिसाद आवडला फक्त "माफाल" शब्द वाचुन एकदम दातात सुपारी अडकल्यागत झाले :) ;)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
9 Aug 2008 - 7:38 pm | चतुरंग
जाणून बुजून वापरला! विडंबनाच्या धारेतून बाजूला होतानाचे काही शेलके शब्द उरलेत ते टाकले समजा!
चतुरंग
9 Aug 2008 - 9:13 pm | धनंजय
एक नव्हे दोनदोन बल्लवाचार्यांकडून मेजवानी मिळणार. शिवाय इथे आणखी कितीतरी छुप्या कवींना त्यांच्याकडून स्फुरण मिळेल.
मधुशालेला ५-१०च प्रतिसाद येत, पण हरखून नि:शब्द होणारे वाचक खूप आहेत. तसेच अनिरुद्धांच्या आजकालच्या कवितांना - प्रतिसाद थोडे येतात. पण ह.ह.पु.वा. होत प्रतिसाद देऊन ती कडवी झटकता येत नाहीत. दोनदोनदा तीनतीनदा परत येऊन वाचन होते. कवीला मात्र ते दिसत नाही... पण मनोमन खात्री असावी.
(किती लोकांनी वाचनखुणा साठवल्या आहेत तो आकडा देणे शक्य आहे का? लिखित प्रतिसाद आला नाही, तरी कवीला तो आकडा बघून आपल्या चाहात्यांकडून पोच मिळेल.)
10 Aug 2008 - 10:49 pm | चित्तरंजन भट
एकंदर छान.
"रुद्ध प्रतिभा चतुरस्त्र वाहू दे" ह्या ओळी एखाद्या बद्धकोष्ठाने पीडित प्रतिभावंताला उद्देशून केल्यासारख्या वाटल्या. कविता छान आहे. काव्यात आणि संस्कृतात थोडीबहुत गती असलेल्या वृत्तसाक्षर अशा निवृत्त काकांनी विरंगुळ्यासाठी लिहिल्यासारख्या ओळी आहेत. हे जरा कठोर झाले असावे. एवढे नाही पण थोडेबहुत असेच.
अर्थातच ह्या ओळी धनंजय ह्यांनी विरंगुळ्यासाठीच लिहिल्या असाव्यात.
11 Aug 2008 - 9:24 am | सर्किट (not verified)
काव्यात आणि संस्कृतात थोडीबहुत गती असलेल्या वृत्तसाक्षर अशा निवृत्त काकांनी विरंगुळ्यासाठी लिहिल्यासारख्या ओळी आहेत.
लीव्ह इट टु चित्तोपंत टु स्टेट इट प्रिसाईजली !!!
(आणि हो, अशाच ओळींसाठी मिसळपावावर अनेकांना यावेसे वाटते, असे वरील काही प्रतिसादांतून दिसते ;-)
- (वृत्तसाक्षर पण अनिवृत्त, म्हणूनच अद्यापही कार्यरत ;-) सर्किट
11 Aug 2008 - 6:01 pm | धनंजय
पण नाही, केवळ वृत्तविरंगुळा नव्हता. टीकाही होती. टीका केलेली प्रवृत्ती बद्धकोष्ठ प्रतिभा नाही खास. "अंगावरुन अती जाण्यामुळे गर्भ राहात नसलेली प्रतिभा" असे म्हटले तर अधिक समर्पक सारांश होईल.
हे माझे नेहमीचे "शो मी द डेटा" कसावर वाद घालणे होते.
ज्यांची नावे गोवली होती त्यांनी सुयोग्य उत्तरे दिलीही आहेत.
11 Aug 2008 - 3:29 am | मुक्तसुनीत
विरंगुळ्याकरता लिहीलेली कविता नि कंडुशमनार्थ लिहीलेले प्रतिसाद.... चांगले इंटरप्रिटेशन ! ;-)