आयुष्यातून आयुष्यच निघून चालले आहे.............
एक दिवस असा उगवतो की वाटते आता आयुष्यातून काहीतरी कमी होत चालले आहे. सगळी सुखे दाराशी हात जोडून उभी आहेत पण काय कमी होते आहे हेच कळत नाही. आत्तापर्यंत जे नव्हते ते मिळवण्यात सगळा वेळ गेला. जे मिळवले त्याचा उपभोग घेण्यात वेळ गेला. मित्र मंडळीसमवेत मजेने या आयुष्याची मजा घेतली पण आता असे वाटते आहे की काहीतरी हातातून सुटत चालले आहे. आत्तापर्यंत दु:खे ही अनेक भोगली आणि खोटे कशाला बोलू, त्यांचीही या आयुष्यात सोबतच होती. पण आजकाल -
तबियत इन दिनों बेगाना-ऐ-ग़म होती जाती है
मेरे हिस्से की गोया हर खुशी कम होती जाती है
असे वाटते की माझे आयुष्यातील दु:खांनीही माझी साथ सोडली की काय... माझ्या वाट्याची सुखे जणू काय आता कमी होत चालली आहेत......
वही है शाहिद और साकी मगर दिल बुझता जाता है
वही है शम्मा लेकिन रौशनी कम होती जाती है
जिच्यावर माझे प्रेम आहे अशी ती आणि मदीरा तीच आहे पण मग तिला बघितल्यावर होणारी माझ्या ह्र्दयातील ही धडधड कमी का होती आहे ? मैफिलीत तीच शम्मा आहे, मंडळी ही तीच आहेत पण या दिव्याची ज्योत मंद होत चालली आहे. या मैफिलीचा शेवट तर जवळ आलेला नाही ना ?
वही मैखाना-ऐ-साहेबा, वही सागर वही शिशा
मगर आवाज-ऐ-नोशानोश मद्दम होती जाती है
आजवर मित्रांबरोबर शहरातील हरएक अड्यावर मैफिल जमवली, त्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. अजूनही त्याची मजा घेतच आहे. मद्यालय तेच आहे, पेलाही तोच आहे, सुरईही तीच आहे पण बघितलय आजकाल मैफिलीत पूर्वीसारखा आवाज येत नाही. हास्य विनोद नरम पडले आहेत...एखाद्या मेजवानीमधे ज्या खुषीच्या लाटा येत असतात त्या कुठे नाहीश्या झाल्यात कोणास ठावूक...पूर्वी एखादा नसला तर त्याची आठवण हमखास काढली जात असे पण आजकाल मैफिल तशीच चालू रहाते.. तो येणार नाही हे गृहीतच धरले जात.. हे काय चालले आहे ?
क़यामत क्या ये ऐब हुस्न-ऐ-दो-आलम होती जाती है
के महफिल तो वही है दिलकशी कम होती जाती है
मैफिलीत काव्याला प्रतिसाद मिळत नाही, मैफिलीची ही अशी अवस्था पहावत नाही. पण हे प्रिये, असे तर होतच असते...त्यात काय एवढे ? पण मैफिल तीच आहे पण माझे मात्र त्यात मन रमत नाही...हेच मला कळत नाही...
वही है ज़िन्दगी लेकिन जिगर ये हाल है अपना
के जैसे ज़िन्दगी से ज़िन्दगी कम होती जाती है
सालं आयुष्य तेच आहे, मीही तोच आहे, मैफिलही तीच आहे, मदीराही तीच पण असं वाटातय की आयुष्यातील आयुष्यच कमी होत चाललंय... कमी होत चाललंय
मित्रांनो असे कधी तरी प्रत्येकाला वाटतेच. कधी अगोदर, कधी नंतर, संवेदनशील मनाला केव्हाही.....
जयंत कुलकर्णी...........
येथे ऐका -
प्रतिक्रिया
10 Jun 2012 - 7:32 pm | मन१
लेख भावला.
हापिसात असल्याने गाणी इथून ऐकता येत नाहित.
आजकाल सगळ्यांनाच असं उदास उदास का वाटतय बुवा?
तिकडं कुणाला तरी संन्यास घ्यावा वाटतोय?
इकडे भारताची अर्थव्यवस्था कोसळते आहे म्हणतात.
हे असं का?
छ्या. एकदा तरी "मोकलाया दाही दिशा" वाचलच पाहिजे पुन्हा आता.
10 Jun 2012 - 8:36 pm | जयंत कुलकर्णी
//हे असं का? //
तबियत इन दिनो......
10 Jun 2012 - 9:02 pm | चित्रगुप्त
वही है शम्मा लेकिन रौशनी कम होती जाती है.... महफिल तो वही है दिलकशी कम होती जाती है...
वाढत्या वयातली, कुणाला सांगताही येत नाही अशी, र्हदयात नित्य ठसठसणारी वेदना...
अगदी खोल मनातली जखमच कुणीतरी अचानक उघडी केली...
सलाम.
10 Jun 2012 - 9:44 pm | आळश्यांचा राजा
सारी जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे...त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा...
"बखर अंतकाळाची" वाचत होतो आणि हे दिसले. आता हा नैराश्याचा डोस पुरा करण्यासाठी अमेरिकन ब्युटी ही पाहून टाकावा म्हणतो!
11 Jun 2012 - 1:37 am | मोहनराव
छान लिहिलेत.
हा सगळा विचार करुन शेवटी "बालपणाचा काळ सु़खाचा" असे वाटते.
11 Jun 2012 - 2:16 pm | जोयबोय
मस्त लेख.................. वा.
एक म्हणवेसे वाटते.
तुझे आहे तुजपाशी परि जागा चुकलासी