मुंबईचे संत डॉ. झाकीर नाइक यांच्याबाबत बरेच ऐकले होते
म्हणून थोडा मागोवा घेतला आणि बरेच विचारधन पदरात पडले.
इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांच्या भाषणाचे निरनिराळ्या ठिकाणी
कार्यक्रम होत असतात.
या कार्यक्रमामधे ते इस्लामबाबत निरनिराळ्या मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतात.
लोकांच्या शंकांना उत्तरे देतात. कार्यक्रमाला मुस्लिम, गैरमुस्लिमही हजर असतात.
प्रचंड संख्येने हजर असतात.
मुद्दा मांडत असताना झाकीर नाइक कुराण, वेद, बायबल मधील श्लोकांचा अचूक संदर्भ देतात. स्मरणशक्ती अफाट आहे.
अध्याय नं १६ श्लोक नं १९ असे उल्लेख धडाधड येतात.
त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन काही तरुण, काही तरुणी इस्लामच्या शरणमधे येतात.
आता डॉ. झाकीर नाइक यांनी आपल्या भाषणात मांडलेले काही मुद्दे पहा.
एका मुलीने झाकीरना विचारले, ' तुम्ही म्हणता एवढा इस्लाम चांगला आहे मग लोकांना स्वीकारायला इतका वेळ का लागतोय'
यावर डॉ. झाकीर म्हणतात' प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात. इस्लाम स्वीकारणे तेवढे सोपे नाही.
इस्लाममधे दारु हराम आहे. लफडेबाजीला परवानगी नाही.
त्यामुळे इस्लाम स्वीकारायचा तर आधी दारू सोडावी लागते, लफडेबाजीचा त्याग करावा करावा लागतो.
यामुळे लोकान्ना इस्लाम स्वीकारायला वेळ लागतो."
पण मनात प्रश्न येतो, "आमचा धर्म दारू प्या, लफडी करा' असे सांगतो की काय ? " डॉक्टर तुम्हाला अप्रत्यक्षपणे असे सुचवायचे आहे का !
कधी एखाद्या भाषणात झाकीर कोणकोणती वाद्ये इस्लाममधे निषिद्ध आहेत ते सांगतात
यामधे बासरी निषिद्ध आहे.
एखादा श्रद्धाळू उभा राहतो, विचारतो "भगवान श्रीकृष्णांच्या हातात बासरीच होती"
यावर झाकीर विचारतात "ते बासरी कशासाठी वापरीत?"
श्रद्धाळू म्हणतो "गोपी स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी"
झाकीर खूष होऊन जातात. म्हणतात पहा "यासाठीच इस्लाममधे बासरी निषिद्ध आहे, बासरीमुळे मन उद्दीपित होते, शांत होत नाही"
--
त्यांच्या भाषणात अनेक मुस्लिम राष्ट्रांचा उल्लेख होतो.
पाकिस्तान आणि पाकिस्तानपेक्षाही सौदी अरेबियाचे कौतुक फार.
एकदा कुणी विचारले, "सौदी अरेबियामधे इतर धर्मांना परवानगी का नाही ?"
तर ते उदाहरण देतात, " गणित शिकवणारा एक शिक्षक म्हणतो २+२ = ५
दुसरा म्हणतो २+२ = ६ आणि तिसरा म्हणतो २+२ = ४, मग आपण २+२ = ४ म्हणणार्या
शिक्षकालाच शिकवायला ठेवणार ना ? बाकीची उत्तरे चूक आहेत आपल्याला माहीत असते.
मग बाकीच्या गोष्टी चूक आहेत माहीत असताना त्या आपण कशा स्वीकारणार ?"
अतिशय धक्कादायक -
डॉ. झाकीर ओसामाचं उघड समर्थन करतात.
ते म्हणतात, "He is terrorising the terrorist then it is ok"
अमेरीका हीच खरी टेररीस्ट आहे अशी एक धारणा आहे. त्यामुळे अमेरीकेविरुद्ध काहीही केलं तरी ते क्षम्य आहे.
त्यांची भाषाही ठीक नाही
त्यांना एका महिलेने विचारले, "एका पुरुषाने ४ स्त्रियांशी लग्न करणे योग्य आहे का ?
हा स्त्रियांवर अन्याय नाही का ?"
यावर झाकीर म्हणतात, "It is better to become private property than public property"
यावर ते स्त्रियांबद्दल बरेच काही बोलतात पण त्या गोष्टी इथे लिहिणे प्रशस्त वाटत नाही.
एका स्त्रीला सोडून तिचा नवरा परदेशात गेला. तिथे त्याने दुसर्या महिलेशी लग्न केले
आणि आपल्या पहिल्या बायको नि मुलांना वार्यावर सोडले.
या स्त्रीने डॉ झाकीर नाइक यांना प्रश्न विचारला,'असे न सांगता नवरा दुसरं लग्न करत असेल तर याबाबत इस्लाम काय म्हणतो'
झाकीर म्हणतात, नवर्याने पहिल्या बायकोला इन्फॉर्म करणे गरजेचे आहे पण परवानगी घेणे बंधनकारक नाही
शंकर, गणपती या देवां बद्दलही वेडेवाकडे विचार ते प्रकट करतात. विचित्र उद्गार काढतात.
जमलेल्या लोकांनाही ते तसेच विचार प्रसृत करण्याचा सल्ला देतात.
असे विचार प्रकट करून श्रद्धावंतांच्या भावना दुखावल्या तरी हरकत नाही, परवा करू नका असेही सांगतात.
पुढे
'या देशाला वंदन करायला आम्हाला आमचा मजहब परवानगी देत नाही' असे दिव्य ज्ञानही ते समोर बसलेल्या अनुयायांना देतात.
यावर काय बोलणार
तुका म्हणे उगी रहावे
जे जे होइल ते ते पहावे.
---
ashujog @ gmail.com
प्रतिक्रिया
21 May 2012 - 10:56 pm | बॅटमॅन
कसले हे संत, हे तर वायझेड विचारजंत|
द हिंदूमध्ये याचा इंटरव्ह्यू प्रसिद्ध झाला होता, त्यात त्याने अशीच मुक्ताफळे ओकली होती. त्याचे ते बकवास पीटीव्ही चॅनेलपण त्याची ओकलेली गरळे ब्रॉडकास्ट करीत असते.त्याच्यासारख्या लोकांसाठी एकच स्ट्रॅटेजी योग्यः
तुका म्हणे ऐशा नरा| मोजूनी माराव्या पैजारा|
बाकी दारुल उलुम देवबंद या भारतातील मुसलमानांच्या सर्वोच्च धार्मिक संस्थेने त्यांच्या संकेतस्थळावर स्पष्ट केलेले आहे की झकिर नाईकला कुरान वगैरेंची घंटा काही जाण नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवू नये. हा पहा दुवा.
http://sunninews.wordpress.com/2008/05/10/deobandi-fatwa-against-zakir-n...
21 May 2012 - 11:29 pm | कवितानागेश
हा हा हा.
"ते बासरी कशासाठी वापरीत?"
श्रद्धाळू म्हणतो "गोपी स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी">
कॉलिंग पंडित हरीप्रसाद चौरासिया ! :)
22 May 2012 - 2:24 pm | श्रावण मोडक
विजूभाऊंना विचारा! ते 'हो' असंच म्हणतील. हरिप्रसादांची साक्ष कशाला? ;-)
23 May 2012 - 9:32 am | चिंतामणी
नुसते हरिप्रसाद नका म्हणू.
नुसते "हरिप्रसाद " म्हणल्या दूसरे डोळ्यासमोर आले हो.;)
21 May 2012 - 11:35 pm | दादा कोंडके
मागच्या महिन्यातच एका मित्राने हा विडिओ बघायला सांगितला.
अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले होते. मी पण तिथं असलो असतो तर क्षणाचाही विलंब न करता बाटलो असतो. आणि तिथेच बांग दिली असती. :)
असो, तो योगच नव्हता. :(
22 May 2012 - 11:59 am | हारुन शेख
शिल्पा ब , आपण उगीचच सर्व मुसलमान आणि त्यांच्या संस्कृतीवर घसरलात , झाकीरनाईकांना भारतातल्या सर्व मुस्लिमांनी आपले निर्विवाद नेतृत्व बहाल केलय असा आपला गैरसमज झालेला दिसतो. अशी लोकं ( नाईकांसारखी ) सगळीकडेच थोडीफार असतात त्यावरून सरसकट सगळ्या समाजाला वेठीला धरणे हि हिटलरी वृत्ती वाटते. प्रवीण तोगडिया किंवा अशोक सिंघल प्रभृती विद्वान लोक जे बरळत असतात त्यावरून निदान मी तरी सर्व हिंदू लोकांच्या संस्कृतीचे मूल्यमापन करणार नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
23 May 2012 - 8:37 am | आशु जोग
हारुन शेख
आपणच विचार करा. लोक असं का म्हणतायत ते
23 May 2012 - 1:29 pm | हारुन शेख
श्री. आशु जोग , विचारांती मला काय वाटते ते वर मी दिलेल्या प्रतिसादात लिहिलेले आहेच. शिल्पा ब यांचे संपूर्ण मुसलमान लोक आणि त्यांची संस्कृती यावर खालच्या पातळीवर टीका करणारं वाक्य मला एकांगी आणि द्वेषमूलक वाटतं. धर्मान्ध लोक नसलेला एक तरी धर्म जगात आहे काय ? केवळ अशा लोकांची उदाहरणं देवून त्या धर्मातल्या सगळ्या लोकांना नावं ठेवणं आपल्याला समर्थनीय वाटतं का ? झाकीर नाईकांच बुजगावणं पुढं करून सगळ्या मुस्लीम समाजावर चिखलफेक व्हावी असा तुमचा छुपा हेतू दिसतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
23 May 2012 - 8:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नवीन आहात. होईल हळूहळू सवय :-)
23 May 2012 - 9:42 pm | शिल्पा ब
संपुर्ण जगावर दहशतवादाची छाया आहे तो दहशतवाद कोण करतंय हो? तो करायला लोकं कुठुन मिळताहेत?
भारतात संसदेत वंदे मातरतम म्हणायला नाही कोण म्हणतं? फायदे घ्यायला काही ना नसते पण इतरवेळी "आम्ही मुसलमान" ही लोकसंख्येच्या बळावर मुजोरी!!
दोनचार लोकांची नावं फेकुन आमचा समाज कसा चांगला हे ऐकवु नका. अन जर हे बुजगावणं आहे तर त्याला तुमच्या समाजातुन काय विरोध होतोय ते सांगा? त्याच्या मुर्खपणाच्या लॉजिकला कोण अन कसा प्रतिवाद करतंय त्याच्या लिंका इथं द्या.
बाकी फक्त याच धाग्यावर बरे उगवले तुम्ही!!
24 May 2012 - 10:29 pm | हारुन शेख
संपुर्ण जगावर दहशतवादाची छाया आहे तो दहशतवाद कोण करतंय हो?
----- दहशतवादी, आणि दहशतवाद हाच त्यांचा धर्म.
तो करायला लोकं कुठुन मिळताहेत?
----- जिथे गरिबी, उपासमार आणि त्यातून येणारी अगतिकता आहे अशा ठिकाणांतून.
भारतात संसदेत वंदे मातरतम म्हणायला नाही कोण म्हणतं?
----- वंदे मातरम म्हणणे हा देशप्रेमाचा एक आणि एकच निकष ही संघाची विचारसरणी. भारतमातेचे मूर्त देवता हे रूप संघाने पसरवले. (त्यात माझं काहीच म्हणणं नाही हे कृपया लक्षात असुदे ) आमच्या सोसायटीतच तशी चित्रे असलेली स्टिकर्स बर्याच दरवाज्यांवर लावलेली आहेत. आता मुळात मूर्तीपूजाच बाद मानणाऱ्या इस्लाम धर्मात 'वंदे मातरम' म्हणणे हे त्या देवतेपुढे नतमस्तक होण्याचा प्रकार. मुस्लिमांच्या मुलभूत धार्मिक तत्वात ते बसणे शक्यच नाही. त्याचा सोयीस्कर अर्थ मुस्लीम देशद्रोही आहेत असा होत नाही. उद्या भारतमातेचे मंदिर बांधून मुसलमान लोकांनी त्या मंदिरात दर्शन घ्यायला यावेत असा दुराग्रह कराल. अनेक मुस्लीम क्रांतिकारक 'वंदे मातरम' न म्हणताही फाशीवर गेले आहेच. एक वेगळा मानव समूह , वेगळ्या धार्मिक कल्पना असलेला समाज त्यांच्या धार्मिक तत्वांना अनुसरून तुमचे देशप्रेमाचे निकष पूर्ण करत नसेल तर त्यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य आपल्या घटनेनेच दिलेले आहे. आणि लॉजिकल पण आहे.
फायदे घ्यायला काही ना नसते पण इतरवेळी "आम्ही मुसलमान" ही लोकसंख्येच्या बळावर मुजोरी!!
----- काय फायदे मिळतात हा संशोधनाचाच विषय आहे . 'सर्वधर्मनिरपेक्षता' हे मुलभूत तत्व मान्य केलेल्या लोकतांत्रिक देशात अल्पसंख्याकांनी आपल्या हितांबाबत जागरूक असणे याला 'मुजोरी' म्हणत नाही.
दोनचार लोकांची नावं फेकुन आमचा समाज कसा चांगला हे ऐकवु नका. अन जर हे बुजगावणं आहे
----- काही चूक होते आहे काय. मी कुणाचीच नावे फेकलेली नाहीत. एखादा समाज चांगला अथवा वाईट ठरवण्याचा हा निकष नव्हे.
तर त्याला तुमच्या समाजातुन काय विरोध होतोय ते सांगा? त्याच्या मुर्खपणाच्या लॉजिकला कोण अन कसा प्रतिवाद करतंय त्याच्या लिंका इथं द्या.
----- कृपया याच धाग्यावरील श्री. बॅटमॅन किंवा हुप्प्या यांचे प्रतिसाद बघावेत. लिंक मिळतील.
बाकी फक्त याच धाग्यावर बरे उगवले तुम्ही!!
----- कोण ही असहिष्णुता. कुठल्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत अथवा देऊ नयेत हे स्पष्ट कराल काय. शोधूनही तशी नियमावली सापडली नाही. आणि फक्त तुमच्या समाधानाकरता सांगतो कि इतर बर्याच धाग्यावर मी उगवतो आणि प्रतिसादही देतो. त्याच्या लिंक हव्या असतील तर त्याही देतो. (काय दुर्दैव आहे !)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
25 May 2012 - 12:02 am | शिल्पा ब
<<आता मुळात मूर्तीपूजाच बाद मानणाऱ्या इस्लाम धर्मात 'वंदे मातरम' म्हणणे हे त्या देवतेपुढे नतमस्तक होण्याचा प्रकार.
वा!! वा!! " वंदे मातरम" म्हणजे मातेला वंदन हेच नको असेल तर उत्तम. बाकी आम्ही देशद्रोही वगैरे म्हंटलेलं नाही की "वंदे मातरम" कसलाही निकष ठरवलेला नाही हे लक्षात असु द्यावं.
बाकी उत्तरं तर झकास!!
25 May 2012 - 1:52 am | चिंतामणी
>>>वंदे मातरम म्हणणे हा देशप्रेमाचा एक आणि एकच निकष ही संघाची विचारसरणी.
वंदे मातरम् ही रचना बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांची असून त्यांच्या "आनंदमठ" या कादंबरीतुन १८८२मधे लोकांसमोर आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. के.ब. हेडगेवार यांनी १९२५ मधे म्हणजेच वंदे मातरम् नंतर ३३ वर्षानी केली.
दरम्याच्या काळात जी आंदोलने झाली, त्यात भाग घेणारे "वंदे मातरम्"चा उद्घोष करीत असत.
इथे देशाला मातेची उपमा दिली आहे. कुठलाही धर्म मातेला वंदन करू नका असे म्हणणारच नाही.
25 May 2012 - 3:16 pm | llपुण्याचे पेशवेll
>>इथे देशाला मातेची उपमा दिली आहे. कुठलाही धर्म मातेला वंदन करू नका असे म्हणणारच नाही.
कदाचित इस्लाम म्हणत असेल तसे. :)
25 May 2012 - 8:29 pm | हारुन शेख
कुठलाही धर्म मातेला वंदन करू नका असे म्हणणारच नाही.
-----इस्लाम पण तसे म्हणत नाही. स्वतः अल्लाहने कुरानात आईच्या पायाखाली जन्नत (स्वर्ग) आहे असे म्हंटले आहे, इस्लाम मध्ये आईला अनन्यसाधारण महत्व आहे. अर्थात वंदन करणे हि फक्त शारीरिक क्रिया अपेक्षित असेल तर मी स्वतः कधी माझ्या आईच्या पाया पडलेलो नाही. तसे आमच्याकडे करत नाहीत. हो.. घरातून निघतांना आईच्या हाताचा मुका घेऊन तो दोन्ही डोळ्यांना टेकवायचा हे अगदी शाळेत होतो तेव्हापासून करतो. आई पण मग 'अल्लाह तुम्हारी हिफाजत करे' वैगरे म्हणून डोक्यावरून हात फिरवते. खूप मस्त वाटतं..मायाळू वाटतं. आता बोला काय राहून गेलं पाया नाही पडलो तर.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
25 May 2012 - 10:26 pm | शिल्पा ब
तुमच्या घरी आईच्या पाया पडा नैतर हाताचा मुका घ्या आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही...
ज्या देशात तुम्ही राहता - सुरक्षितपणे- त्या देशाला नमस्कार करण्यात वंदन करण्यात काय प्रॉब्लेम आहे. नैतर आता देशाच्या हाताचे मुके कसे घेणार ते सांगा.
23 May 2012 - 9:51 pm | आशु जोग
>>झाकीरनाईकांना भारतातल्या सर्व मुस्लिमांनी आपले निर्विवाद नेतृत्व बहाल केलय असा आपला गैरसमज झालेला दिसतो. अशी लोकं ( नाईकांसारखी ) सगळीकडेच थोडीफार असतात त्यावरून सरसकट सगळ्या समाजाला वेठीला धरणे हि हिटलरी वृत्ती वाटते <<
हारुन शेख
माझ्या लिखाणात मी फक्त डॉ. झाकीर नाइक यांच्याबद्दलच लिहिले आहे.
सगळ्या समाजावर चिखलफेक, सरसकटीकरण केलेले नाही.
तुमचा आक्षेप "शिल्पा ब" यांच्या मुद्द्यांना असेल तर ते तुमचे तुम्ही पाहून घ्या.
>> झाकीर नाईकांच बुजगावणं पुढं करून सगळ्या मुस्लीम समाजावर चिखलफेक व्हावी असा तुमचा छुपा हेतू दिसतो <<
छुपा हेतू कुठलाही नाही. जे करायचे ते उघडपणे करायला मला काहीच अडचण नाही.
झाकीर नाइकांचे समर्थन करण्याचा तुमचा छुपा डाव दिसतोय
बघा कसे रागावलायत ते
24 May 2012 - 10:32 pm | हारुन शेख
माझ्या लिखाणात मी फक्त डॉ. झाकीर नाइक यांच्याबद्दलच लिहिले आहे.
सगळ्या समाजावर चिखलफेक, सरसकटीकरण केलेले नाही.
------ मी तुम्ही असे केले असे म्हंटले नाही. शिल्पा ब यांच्याच प्रतिसादाला दिलेल्या उत्तरात तसे लिहिले आहे.
तुमचा आक्षेप "शिल्पा ब" यांच्या मुद्द्यांना असेल तर ते तुमचे तुम्ही पाहून घ्या.
------ ठीक आहे.
>> झाकीर नाईकांच बुजगावणं पुढं करून सगळ्या मुस्लीम समाजावर चिखलफेक व्हावी असा तुमचा छुपा हेतू दिसतो <<
छुपा हेतू कुठलाही नाही. जे करायचे ते उघडपणे करायला मला काहीच अडचण नाही.
------ तसं तुम्हाला करता यायला फक्त संपादकांचीच अडचण होऊ शकते. आणि तसे करण्यास इथले संपादक (सुदैवाने) अडचणच आहे.
झाकीर नाइकांचे समर्थन करण्याचा तुमचा छुपा डाव दिसतोय
----- समर्थन करायचे असते तर अगदी तर्कशुद्ध आणि मुद्द्यासकट केले असते. तसे करावेसे वाटत नाहीच.
बघा कसे रागावलायत ते
----- वाद खालच्या पातळीवर घेऊन जाण्याची ही क्लुप्ती असेल तर दुर्लक्ष केले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
25 May 2012 - 12:03 am | आशु जोग
क्लुप्ती काय नि छुपा डाव काय?
--
तुम्ही व्यक्तिगत पातळीवर अजिबात घेऊ नका...
आणि हो
डॉ झाकीर नाइक यांच्या मुद्यांना तुमचाही विरोध असेल तर प्रश्नच मिटला
मग तुम्हीही आमचेच की...
--
आपली लढाई वृत्तीशी आहे
व्यक्तीशी नाही हे ध्यानात ठेवायचं
22 May 2012 - 12:41 am | अत्रुप्त आत्मा
फार हुशार आणी विद्वान माणुस वाटवा... असं व्यक्तिमत्व आहे... मी त्यांची पुण्या/मुंबैतली भाषणं प्रत्यक्ष ऐकली आहेत... प्रतिपक्षाच्या प्रत्येक मुद्याला चतुराईनी उत्तरं देण्यात अत्यंत पटाईत आहे हा माणूस.बराचसा हजर जबाबी पण आहे... अडचणीच्या मुद्यांना सोइनी बगल देण्यातही पटाईत आहे. बरेचदा बालिश युक्तिवादही करतो...४/५ वर्षापूर्वी पुण्यात आझम कँम्पसमधे झालेल्या एका भाषणाच्या वेळेस आमच्या एका मित्राने , हा (वैचारिक दृष्ट्या) लादेन पेक्षाही डेंजर आहे,असे मत मिष्किलपणे नोंदविले होते.
भाषणात काही गमतीशीर मुद्दे होते... ( हिंदू व इस्लाम मधली साम्यस्थळे-हा भाषणाचा विषय होता)
हिंदूंमधली निर्गुण निराकार ब्रम्हा ची कल्पना इस्लामला समांतर आहे...
समोर उपस्थित मुस्लिम बांधवांना उद्देशून--- तुंम्ही हिंदूंशी (इथे) सलोख्याने वागले पाहिजे,जर तुंम्हाला कोणी काही सांगून दंगा/फसाद करायला प्रवृत्त करत असेल तर ते चुकिचे आहे...
या शिवाय संपूर्ण भाषणात,रामायण/महाभारत/वेद/मनुस्मृती या सगळ्या ग्रंथांमधील इस्लामी विचारांशी...म्हणजेच कुराणातील आयातींशी,साम्य दाखवणारी वचने हा माणूस झटाझट काढून दाखवत होता... हिंदू/मुस्लिम दोघेही बांधव एखादे जादूचे प्रयोग पहावे,तसे पहात होते व टाळ्याही वाजवत होते...
शेवटी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरू झाला...
आमच्या कंपू कडूनचा एक प्रश्न घेतला गेला...
''दर्गा इस्लाम नुसार पाक (शुद्ध संकल्पना) आहे का..? ''
उत्तर- ''ती कल्पना भारतात लागू आहे..आणी इस्लामला समांतर आहे...''
इतरही उपस्थित दोन्ही समुदायांकडून (स्त्री/पुरुषांकडुन) प्रश्न विचारले जात होते...
त्यातला एका आय.टी. सेक्टरवाल्या(सुशिक्षित) हिंदू मुलीनी विचारलेल्या एका प्रश्न मालिकेला झाकिर नाइकांनी दिलेली उत्तरे अभ्यास वाढावावा अशी होती ---
मुलगी- हिंदू मुलगी आणी मुस्लिम मुलगा विवाह करु शकतात का..?
झा.नाइक- करु शकतात ,पण मुलिनी इस्लाम स्विकारला पाहिजे...
मुलगी- का...?
झा.नाइक- नाहितर ती मुलगी मरणोपरान्त नरकाची वाटेकरी होइल... आणी मला नाही वाटत,की कोणिही मुलगा/पुरुष स्वतःच्या बायकोला नरकात पडू देइल.
मुलगी- पण मुलिनी मुस्लिम झालच पाहिजे असं का बरं?
झा.नाइक - मी आपल्याला एक प्रश्न विचारु इच्छितो... विचारु का..?
मुलगी-विचारा..
झा.नाइक- एक गाडी आहे... तीचं एक चाक तुटलं, तर दुसर चाक तुंम्ही त्याच गाडिचं बसवाल का... ट्रकला सायकलचं चाक बसवलेलं चालतं तुम्हाला....
या उत्तरावर उपस्थित दोंन्ही कडचा समुदाय जोरदार हसला... व त्या मुलिने यापुढे काहि विचारण्यात अर्थ नाही,असा चेहेरा करुन घेऊन... धन्यवाद म्हणत रजा घेतली...
----------------------------------
गंमत म्हणजे या उत्तरावर आमच्या आजुबाजुला चालु असलेल्या कुजबुज/चर्चेत कुणालाही पुढे हा प्रश्न मनात शिवला असेल का...?... की , धर्म वेगवेगळे असले तरी सहजीवनासाठी त्यातल्या दोघांची अवस्था/स्थिती-वेगवेगळ्या वहानांच्या टायर सारखी परस्पर विसंगत असते..?
नैसर्गिक रित्या विचार केला तर उत्तर नाही असं निघतं...
सामाजिक रित्या विचार केल्यास उत्तर हो असं निघतं...
23 May 2012 - 9:04 pm | अप्पा जोगळेकर
एक गाडी आहे... तीचं एक चाक तुटलं, तर दुसर चाक तुंम्ही त्याच गाडिचं बसवाल का... ट्रकला सायकलचं चाक बसवलेलं चालतं तुम्हाला....
गाडी कोणती, ट्रक कोणता आणि सायकल कोणती हे पटकन विचारुन मोकळं व्हायचं ? असो. निदान त्या मुलीने प्रश्न विचारला हे आवडले.
22 May 2012 - 3:18 am | निनाद मुक्काम प...
भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणीही आपले विचार मुक्तपणे मांडतात. व अनेक तथाकथित संत किंवा धार्मिक नेते ते आपल्या भाषणातून अनुयायांच्या माथी मारतात.
नाईक ह्यांची अनेक भाषणे तू नळीवर आहेत. व ती पाहून हा माणूस ब्रेन वॉशिंग कारणासाठी अत्यंत माहीर आहे हे सहज कळून येते.
त्याचे तर्क व लॉजिक बालिश व बाष्कळ म्हणण्यापेक्षा काहीबाबतीत अत्यंत सनातनी व मागास आहेत.
उदा सानियाने स्कर्ट घालून का खेळू ह्या एका हिंदू महिलेच्या प्रश्नावर त्यांनी ऋग्वेदातील एक ऋचा तिचा क्रमांक सांगत सांगितले कि हिंदू धर्मात स्त्रियांनी कोणती वस्त्रे घालावीत व कशी नेसवीत ह्या बाबतीत असाच दाखला दिला.
पण त्याच वेळी त्याने जिहाद संकल्पना नीट समजून सांगतांना निरपराध माणसांचा बळी जाणे धर्मात मंजूर नसल्याचे सांगितले आहे.
२) भारत हा मुस्लिमांसाठी सुरक्षित देश आहे. येथे सर्वधर्मीय लोक आपल्या धर्माचे पालन करू शकतात हे एका पाकिस्तानी नागरिकाला उत्तर देतांना सांगितले.
३)
त्याने फाळणी हि चुकीची असून मुस्लिमांचे त्यात कसे नुकसान झाले ह्याबाद्द्दल सुरेख उदाहरण दिले आहे.
त्याच्यामते संयुक्त भारत आज अस्तित्वात असता तर बांगलादेश व आजचा पाकिस्तान व भारतातील मुस्लीम असे ३० कोटी मुस्लीम एका देशात नांदले असते. व त्यांना राजकीय व आर्थिक फायदे भारतात मिळाले असते. कारण राजकारणात त्यांचे स्वतःचे एक अस्तित्व असते.
बाकी मुळात त्याच्या सनातनी विचारसरणी मुळे जगभरात त्याचे अनुयायी आहेत पण ज्या प्रमाणात रवी शंकर ह्यांचे आर्ट ऑफ लिविंग जगभरात प्रसिद्ध आहे व अध्यात्मिक संत म्हणून जगभरात अगदी पाकिस्तान ते लोकप्रिय आहेत व पाकिस्तानी शहरामध्ये त्यांचे आर्ट ऑफ लिविंग ची शिबिरे जोमात चालतात. त्यांनी तेथे आपले आश्रम स्थापन केले आहेत व इतर आपले अनेक अध्यात्मिक गुरु / बाबा , अम्मा ह्यांची ची चलती जगभरात आहे. ते वलय झाकीर साहेबांना नाही.
नाईक ची एका सभेत वादविवाद झाल्यावर रवी शंकर ह्यांनी एका शिबिरात झाकीर साहेबांची मस्तपैकी पोल खोल केली.
आज भारतीयांना झाकीर म्हटले की पहिले आठवतात
झाकीर हुसेन ,
नाईकांचा नंबर नंतर येतो.
अवांतर
मी आसाराम बापूंचे भक्तगण सुद्धा पहिले आहेत व त्यांचे अमुल्य विचार हे भक्तगण स्वतःच्या आयुष्यात आचरण्याचा आचरट पणा करतांना पहिले आहे. त्यामुळे नाईकांचे मला इतके नवल वाटत नाही.
22 May 2012 - 5:08 am | शिल्पा ब
http://www.youtube.com/watch?v=u7kRXXnBnFg&feature=related
मुर्खपणाचा कळस.. अन या बाकीच्या मुसलमानांना समजत नाही असं कसं म्हणावं?
काय तर म्हणे इतर कोणत्याही धर्मात ह्युमॅनिटीच्या विरुद्धचं लिहिलंय.. प्रश्नाचं उत्तर देतानाचं आकांड तांडव पाहण्यासारखं सॉरी ऐकण्यासारखं आहे..इथल्या काही सदस्यांची आठवण आली.
22 May 2012 - 5:40 am | हुप्प्या
वरवर पाहिले तर हा अरबी भाषा, कुराण, वेद ह्यातील प्रकांडपंडित वाटतो. पण ह्याचे अरबी शब्दांचे सोयीचे अर्थ लावले आहेत असा दावा अली सिना ह्या गृहस्थाने केला आहे. एवढेच नव्हे तर त्याला अली सिनाने ऑनलाईन वाद विवाद करण्याकरता आमंत्रित केले पण नाईकाने त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
http://www.faithfreedom.org/debates/ZakirNaik.htm
असा वाद घालता येणार नाही याबद्दलची अत्यंत उथळ आणि तकलादू कारणे नाईकाने दिली आहेत असे माझे मत आहे. खरे कारण असे की आपली डाळ शिजणार नाही आणि आपले पितळ उघडे पडेल अशी खात्री आहे म्हणून.
१९७९ मधे सौदी अरेबियामधे एक उठाव झाला होता.
(http://en.wikipedia.org/wiki/Grand_Mosque_Seizure)
काबा मशिदीवर ताबा मिळवायचा एक जोरदार प्रयत्न झाला होता. सौदी सरकारच्या सुदैवाने आणि फ्रेंच सैनिकांच्या मदतीने तो मोडून काढला गेला. हा प्रयत्न सौदी मधील कडव्या गटाने केला होता. सौदी सरकार भ्रष्ट आहे, ते इस्लामच्या विपरित वागते आहे वगैरे भावना डोके वर काढू लागली होती त्यातून हा उठाव झाला. ( ह्याच गटातून ओसामा बिन लादेन वगैरे मंडळी आणि अल कायदा वगैरे संघटना बनल्या.) सौदी सरकारने ह्या उठावात सामील असलेल्या सगळ्यांची डोकी उडवलीच पण ह्याला उत्तर म्हणून, असे पुन्हा होऊ नये म्हणून आपल्या अमाप संपत्तीचा एक भाग वहाबी ह्या जालीम (रानटी) इस्लामचा प्रचार करायला वेगळा काढला. त्यातून अफ्रिका, आशिया इथे अनेक मदरसे, मशिदी, धर्मगुरू निर्माण केले जे ह्या कडव्या धर्माचा प्रचार करु लागले.
शतकानुशतके इस्लाम वेगवेगळ्या भागात रुळून त्याचे थोडे सौम्य रुप प्रचलित होऊ लागले होते. जसे भारतातील सुफी, पीर, दर्गे, मझार. अफ्रिकेतही तिथला जादूटोणा इस्लामने स्वीकारला होता आणि तिथला इस्लाम थोडाफार सौम्य झाला होता. पण सौदीतून येणार्या पैशामुळे पुन्हा तो मूळचा कडवा इस्लाम डोके वर काढू लागला आहे.
झाकीर नाईक हा ह्याच मोहिमेतील एक प्यादे आहे.
अशा प्रकारचा इस्लाम भारताकरता घातक आहे. त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. अगदी वैचारिक पातळीवर ह्या माणसाच्या पोकळ दाव्यांचा समाचार घेऊन प्रत्युत्तर दिलेच पाहिजे.
सौदीच्या पैशाच्या श्रीमंतीला विचाराने, प्रतिवादाने उत्तर देणे हाच उपाय आहे.
22 May 2012 - 12:24 pm | हारुन शेख
आपल्या मुद्यांमध्ये तथ्य आहे आणि आपण सुचविलेला उपाय ही उत्तम !
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
22 May 2012 - 12:31 pm | JAGOMOHANPYARE
कोई बिगाड सकत नही तेरो
मेरो अल्ला मेहेरबान
अरे, हाही लेख जोगसाहेबांचाच काय? प्रश्न प्रश्न .. चा पुढचा भाग का?
:)
22 May 2012 - 12:39 pm | पुष्करिणी
मी आणि माझा एक मित्र टिव्हीवर ह्यांचे विनोदी कार्यक्रम खूप बघायचो, इकडे हा चॅनल फुकट पाहता येतो.
मित्राची बायको खूप घाबरायची; तिला वाटायचं की पोलिस तिच्या घरावर वॉच ठेउन असावेत :).. पण खरच इतकी भडक / हिंसक मतं या कार्यक्रमातून प्रसारित केलेली असतात. तिनं सध्या हा कार्यक्रम पहायला बंदी घातली आहे.
पण मी संत नाइकांची आभारी आहे कारण त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेउन मी आजकाल मिटिंग मधे ' अमूक अमूक डॉक्यूमेंट च्या अबक पानावर अमूक तमूक पॅरामधे असं लिहिलय..' असं कमीत कमी ३ वेळा तरी बोलते :). डॉक्यूमेंट बरोबर असतं पण पान / पॅरा अंदाजपंजे धाहोदरसे , आत्तापर्यंत कोणीही उलट प्रश्न केला नाहीये :) :) ट्राय इट !!
डॉ. झाकिर नाइक आता जुने झाले..नविन सेंसेशन, युथ आयकॉन ( टीन एजरच आहे ) वगैरे वगैरे चि. नाइक ( यांच नाव विसरले ) यांना पाहिलं / ऐकलं नाही का ?? इफ सो देन यू आर मिसिंग समथिंग ...
22 May 2012 - 12:55 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) ... हे करमणूकीचं नवीन साधन निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी पुष्कर्णीचा तहेदिल शुक्रगुजार झालोय! क्या बात! क्या बात! बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह!
23 May 2012 - 12:47 am | आशु जोग
>> डॉ. झाकिर नाइक आता जुने झाले..नविन सेंसेशन, युथ आयकॉन
फारीक नाइक
रुष्दा नाइक
22 May 2012 - 1:00 pm | चिंतामणी
ह्या माणसाला संत म्हणण्याला (भले ते उपरोधीकपणे का असेना) आक्षेप आहे. चुकूनसुद्धा हे पद ह्याच्यासारख्या माणसाला लावता कामा नये.
लेखाचा उद्देश चा़ंगला असला तरी मुद्यांचा विस्तार कमी वाटतो. झकीर यांचे चित्र तुकड्या तुकड्यामधे आल्यासारखे वाटते.
22 May 2012 - 2:42 pm | स्वातीविशु
मारुन मुटकून संत (वैद्यबुवा)..... बिरबलाची गोष्ट आठवली. :)
बाकी निराशा झाली लेख वाचून :( . संत? मंडळी असा स्वतःच्या ज्ञानाचा, स्मरणशक्तीचा दुरुपयोग का करतात, देव जाणे?
पुष्करिणी तैंचा सल्ला आवडेश, अंमलात आणला जाईल. ;)
अवांतर : एका प्रसिद्ध खानाच्या वक्तव्याने हल्ली फार वात आणलाय. काही लोक त्याला दहशतवादी म्हणत आहेत, ते योग्यच वाटते नाही?
22 May 2012 - 9:07 pm | हुप्प्या
सोयीचे असेल तेव्हा हा माणूस वेद गीता उद्धृत करतो. पण ह्याल कोणीतरी विचारावे की वेद मानणारा तोच हिंदू वा गीता मानणारा तोच हिंदू हे कुठे लिहिले वा म्हटले आहे?
वेद व गीता हे जुने कालबाह्य ग्रंथ आहेत (कुराणासारखेच). एक ऐतिहासिक साहित्य म्हणून त्यांचे महत्त्व आहे. पण आधुनिक काळातील सगळे त्यात आधीच ओळखून ते लिहिले आहे हे मानणे मूर्खपणाचे आहे. ते देवाने सांगितले आहे. त्यात काडीचाही बदल करणे म्हणजे पाखंड असे मानणेही बिनडोकपणाचे आहे ( हे कुराणालाही लागू पडते).
23 May 2012 - 9:09 pm | अविनाशकुलकर्णी
मी पुर्विचा[म्हणजे इस्लाम स्विकारण्या आधि] ब्राह्मण आहे असे तो सांगतो.
23 May 2012 - 9:20 pm | आशु जोग
>> मी पुर्विचा[म्हणजे इस्लाम स्विकारण्या आधि] ब्राह्मण आहे असे तो सांगतो.
निजामशहा नगरचा मूळचा कुलकर्णी होता
23 May 2012 - 9:45 pm | बॅटमॅन
>>निजामशहा नगरचा मूळचा कुलकर्णी होता.
संदर्भ? पुरावा?
24 May 2012 - 11:39 pm | Nile
निजामशहा बहुतेक देशमुख होता असे वाचल्याचे आठवते. संदर्भ आता आठवत नाही.
24 May 2012 - 11:53 pm | आशु जोग
तो कुलकर्णी होता
'राजा शिव छत्रपति' वाचा
25 May 2012 - 12:09 am | सुनील
आयला!!
नंतर निजामच झाला ना मग पूर्वी कुलकर्णी होता की देशमुख की देशपांडे, काय फरक पडतो?
आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही वगैरे ज्या मूळच्या बहामनी राज्यातून निर्माण झाल्या त्या बहामनी राज्याचा संस्थापक हसन गंगू बहामनी (ब्राह्मणी) होता, एवढे ठाउक आहे.
25 May 2012 - 12:22 am | आशु जोग
>> हसन गंगू बहामनी (ब्राह्मणी) होता
ब्राह्मणी म्हणजे
25 May 2012 - 1:08 am | Nile
कुलकर्णी देशमुख देशपांडेच काय अगदी गोखले, टिळक, बर्वे असता तरी काही फरक पडत नाही हो. फक्त इतिहासातील तपशीलात चुका नकोत म्हणून आपली नोंद. ;-)
हे नविन आहे. मला तर बहामनी म्हणजे पर्शिनय वाटत होते.
25 May 2012 - 1:21 am | सुनील
मला तर बहामनी म्हणजे पर्शिनय वाटत होते.
हसन गंगू बहामनीच्या मूळाच्या तशा बर्याच थियर्या प्रचलीत आहेत. त्या पैकी ही सुद्धा एक.
23 May 2012 - 11:18 pm | आशु जोग
एक सहज मनात आले
खोमेनींचे फोटो घरात लावणारे लोक आहेत
अरे त्यापेक्षा ए पी जे अब्दुल कलामांचे फोटो लावा ना ?
जमलं यावेळी तर त्यांना राष्ट्रपति करण्यासाठी दबाव आणा
पण नाही...
24 May 2012 - 10:46 am | मदनबाण
हा कसला संत ? हा तर ठार धर्मवेडा !
25 May 2012 - 12:20 am | आशु जोग
>>आता मुळात मूर्तीपूजाच बाद मानणाऱ्या इस्लाम धर्मात 'वंदे मातरम' म्हणणे हे त्या देवतेपुढे नतमस्तक होण्याचा प्रकार. मुस्लिमांच्या मुलभूत धार्मिक तत्वात ते बसणे शक्यच नाही. <<
आता हे काय नवीन ?
माझ्या गणपती मंडळामधे किती तरी मुस्लिम आहेत. गणपतीला नमस्कार करायला
आरती म्हणायला त्यांना काहीही अडचण येत नाही.
आणि मूर्ती, प्रतिमा बाद कुठली ?
मक्केच्या काबाचे भिंतीवर फोटो(प्रतिमा) लावणारे, खोमेनीची प्रतिमा
दुकानाच्या भिंतीवर लावणारेही अनेकजण आहेत
25 May 2012 - 2:00 pm | JAGOMOHANPYARE
मालक, नवीन धागा काढा... हा धागा बुडाला.
25 May 2012 - 8:34 pm | हारुन शेख
माझ्या गणपती मंडळामधे किती तरी मुस्लिम आहेत. गणपतीला नमस्कार करायला
आरती म्हणायला त्यांना काहीही अडचण येत नाही.
----- तुमच्या गणपती मंडळात येण्यासाठी त्यांना तसे करावे लागत असेल असे म्हणायला जागा आहे. बाकी कुणी तसे मनापासून करत असतील तर त्यांना तसे करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच की. कुणाला तसे करायचे नसेल तर त्यांना ही तसे करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या श्रद्धा कश्या विकसित कराव्यात ह्यावर बंधन घातले जाऊ शकत नाही.
आणि मूर्ती, प्रतिमा बाद कुठली ?
मक्केच्या काबाचे भिंतीवर फोटो(प्रतिमा) लावणारे, खोमेनीची प्रतिमा
दुकानाच्या भिंतीवर लावणारेही अनेकजण आहेत
----- मूर्त रूप भजणे इस्लाम ला अमान्य आहे. इस्लाम मध्ये निराकार ईश्वराची संकल्पना आहे. कुरानमध्ये असेच लिहिलेले आहे. आता काबाविषयी - ती जगातली सर्वात पहिली मशीद. आणि तिचे मुसलमानांकरिता धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. केवळ एकसूत्रीपणा असावा म्हणून मुस्लीम लोक काबा च्या दिशेने तोंड करून नमाज पढतात. प्रेषिताने तसे मुद्दाम ठरवून दिले त्यात धार्मिक पेक्षा व्यावहारिक विचार जास्त. जेव्हा एक मुस्लीम त्या दिशेने तोंड करून नमाज पढतो तेव्हा तो त्या इमारतीला भजतो असे नाही तर तो अल्लाह्चीच प्रार्थना करतो. समजा तो घरी आहे आणि नमाज पढतांना त्याच्या समोर सोफा आहे किंवा भिंत आहे किंवा आणखी काही तर तो त्या सोफ्याला , भिंतीला किंवा आणखी कशाला वंदन करतोय असे नव्हे तो प्रार्थना करतो अल्लाह्चीच. ज्याला रूप नाही आणि आकारही नाही. काबाचेही तसेच. काबा पवित्र वास्तू मानली गेल्यामुळे तिचा फोटो (प्रतिमा) घरात लावतात. पूजा वंदन करत नाही.
खोमेनीची प्रतिमा मी तरी कुठल्याच घरात पहिली नाही. दुकानात म्हणाल तर जर ते हार्डवेअर चे असेल आणि बोहोरा मुस्लीमचे असेल तर ते खोमेनी नसून त्यांचे धर्मगुरु आहेत. इस्लाम मध्ये घरात जिवंत किवा मृत व्यक्तीचा फोटो लावण्यास अजिबात मनाई नाही. फक्त त्याची पूजा अथवा वंदन करत नाहीत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
25 May 2012 - 8:57 pm | बिपिन कार्यकर्ते
बाकी सगळ्यांचं सगळ्म चालूच दे... मात्र,
हे अजिबातच पटले नाहीये. सुरूवातीला नमाज पढताना अल-कुद्सकडे (जेरूसलेम) तोंड करायची पद्धत होती. मात्र मधेच एकदा नमाज पढत असतानाच स्वतः महंमदांनी तोंड मक्केकडे वळवले. ही घटना घडली ती किब्लतैन मशिद आजही दाखवली जाते. (किब्लतैन म्हणजे दोन किब्ला केले गेले ती मशिद.) नुसताच व्यावहारिक भाग असता तर तोंड जेरुसलेमला केलं काय आणि मक्केला केलं काय? फरक पडता कामा नये. आणि मुख्य म्हणजे महंमदाची प्रत्येक कृती ही अल्लाहच्या प्रेरणेने व्हायची असे तेच स्वतः म्हणत.
***
मूळात ईश्वर निर्गुण निराकार आहे. मात्र ते सगळे मानवी बुद्धीला (सामान्य माणसांना तर नक्कीच) झेपण्यासारखे नाही. त्याचे अस्तित्व दर्शवण्यासाठी काही तरी संकेत, रूप, दृश्य परिमाण लागतेच. मग ती मूर्ती असो अथवा एक काळा दगड नाही तर उभे आडवे चिकटवलेल्या लाकडाच्या दोन फळ्या! सगुण उपासनेतही मूर्ती ही ईश्वराच्या रूपाचे फक्त एक संकेत असते, ती मूर्ती साक्षात ईश्वर आहे असे नव्हे.
25 May 2012 - 9:18 pm | हारुन शेख
सुधारणेबद्दल धन्यवाद बिपीनसाहेब.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
25 May 2012 - 9:26 pm | बिपिन कार्यकर्ते
वेलकम!
25 May 2012 - 2:06 pm | JAGOMOHANPYARE
देशाला माता म्हणून एक संस्कृतात गाणे लिहिले तर काय त्याचे कौतुक!
पण मुसलमानानीही देशाला पिता म्हणून गाणे लिहिलेले आहे की... अवधच्या नबाबाला जेंव्हा इंग्रजानी पकडून राज्याबाहेर काढले, तेंव्हा तो बोलला.........
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)
मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...
आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...
بابُل مورا، نیہر چھُوٹو ہی جائے
بابُل مورا، نیہر چھُوٹو ہی جائے
چار کہار مِل، موری ڈولِیا سجاویں (اُٹھایّں)
مورا اَپنا بیگانا چھُوٹو جائے ، بابُل مورا۔۔۔
آںگنا تو پربت بھیو اؤر دیہری بھیی بِدیش
جائے بابُل گھر آپنو میں چلی پیّا کے دیش ، بابُل مورا ۔۔۔
देशाला पिता म्हणणं देशप्रेम दाखवायला पुरेसं नाही का? संस्कृतात वंदे मातरमच म्हटले पाहिजे हा अट्टाहास कशाला?
25 May 2012 - 9:22 pm | हारुन शेख
हि अमीर खुस्रो ची रचना ना ? बाकी किशोरीबाईंनी गायलेली ही भैरवी लाजवाबच !
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
25 May 2012 - 9:43 pm | JAGOMOHANPYARE
नाही. ही रचना अवध लखनौचे नबाब वाजीद अली यांची आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Wajid_Ali_Shah
ही रचना लोकप्रिय केली पं. भीमसेन जोशी यानी.
25 May 2012 - 9:58 pm | हारुन शेख
माझ्याकडे 'बाबुल मोरा चं' १९७४ मध्ये किशोरीबाईंनी गायलेले रेकॉर्डिंग आहे. भीमसेन जोशींचे नाही ऐकलेले शोधून ऐकतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
25 May 2012 - 8:51 pm | Nile
हारुन शेख यांचे तर्कसंगत प्रतिसाद आवडले. फक्त वंदे मातरम् कोणी म्हणत नसेल म्हणजे लगेच तो काही देशद्रोही होत नाही. देशावरचे प्रेम त्यांच्या देशाप्रती असलेल्या भावनांवर ठरवावे इतरांनी लादलेल्या प्रमाणांवर नव्हे.
भारतीय मुस्लिमां बरोबरच हिंदुही देशावर कमीअधिक प्रेम असणारे दिसतात हे ही लक्षात ठेवावे. दहशतवाद फक्त इस्लाम धर्माचे लोक करतात हा ही गैरसमज आहे. अनेक धर्मात कट्टर धर्मांध लोक आहेत प्रमाण(टक्केवारी) फक्त कमी जास्त असू शकेल.
25 May 2012 - 10:29 pm | शिल्पा ब
टक्केवारीनेच तर फरक पडतो ना साहेब!!
आणि वंदे मातरम न म्हंटल्याने कोणी देशद्रोही ठरतो हे कोणी म्हंटलं? असलं तर लिंकवा जरा.
26 May 2012 - 12:15 am | दादा कोंडके
नुसतं वंदे मातरम न म्हणण्यावरून भांडणं म्हणजे कै च्या कैच. देशप्रेम, दहशतवाद हे विषय आले की एकुणच मुस्लिम समाजा कडे संशयानी बघितलं जाण्याच कारण, मुस्लिम लोकांबरोबरच बिगर मुस्लिमपण आहेत असं वाटतं.
25 May 2012 - 9:57 pm | बॅटमॅन
लोकहो दुसरा धागा काढा....झकिर नाईकसारख्या निव्वळ मूर्ख माणसापायी उगीच कशाला एनर्जी वाया घालवताय? झकिर नाईक हा विषय सोडून चर्चा इस्लाम, वंदे मातरम वगैरे नेहमीच्या विषयांवर घसरतेय...जसे पाश्चिमात्य लोक बहुसंख्य असलेल्या चॅटरूमवर कालांतराने नाझींची चर्चा होतेच-मग मूळ विषय तो असो किंवा नसो- तसेच इथे वंदे मातरमसारख्या विषयांबद्दल होतेय. कृपया गपा जरा सर्वांनी :)
नेटवरील नाझींच्या डिस्कशनबद्दलचा हा संदर्भ रोचक आहे:
http://en.wikipedia.org/wiki/Godwin's_law
26 May 2012 - 12:01 am | आशु जोग
>> तुमच्या गणपती मंडळात येण्यासाठी त्यांना तसे करावे लागत असेल असे म्हणायला जागा आहे. बाकी कुणी तसे मनापासून करत असतील तर त्यांना तसे करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच की. <<
मित्रा हारुन
तुला सोयीस्करपणे तुमच्या माझ्या शब्द अंडरलाइन का करावे लागताहेत
तुझे मुद्दे संपले का...
जाता जाता सांगतो
आमचे गणपती मंडळ मी असण्याच्या कितीतरी आधीपासून अस्तित्वात आहे.
हे लोक आधीपासून होते. त्यामुळे ते माझ्या मंडळात नव्हे मीच त्यांच्या मंडळात सामील झालो आहे.
>> तुमच्या गणपती मंडळात येण्यासाठी त्यांना तसे करावे लागत असेल असे म्हणायला जागा आहे<<
या असल्या गोष्टी स्वतःच्या मनानी दडपून का लिहितो आहेस ?
>>झाकीरनाईकांना भारतातल्या सर्व मुस्लिमांनी आपले निर्विवाद नेतृत्व बहाल केलय असा आपला गैरसमज झालेला दिसतो.>>
एका बाजूला हे असं लिहायचं आणि झाकीर यांच्या सगळ्या मुद्यांना पाठिंबा द्यायचा !
चर्चा रूळ सोडून जात आहे. ती डॉ. झाकीर नाइक यांच्या मुद्यांबाबत व्हावी.
26 May 2012 - 1:22 am | विकास
यावरून आठवले:
Salman Khan to celebrate Ganesh Festival at home ही बातमी वाचा आणि खालील चित्रफीत देखील बघण्यासारखी आहे. (पप्पूचा नाच दुर्लक्षित केला तरी चालेल ;) )
बाकी तुमची चर्चा चालूंदेत... "हा कसला बाबा संत, हा संत नव्हे एजंट" ह्या जुन्या ओळी मात्र त्यानिमित्ताने आठवल्या, इतकेच... :-)
26 May 2012 - 12:15 am | आशु जोग
दहशतवाद
>> तो करायला लोकं कुठुन मिळताहेत?
----- जिथे गरिबी, उपासमार आणि त्यातून येणारी अगतिकता आहे अशा ठिकाणांतून <<
दहशतवाद म्हणे गरीबीतून, उपासमारीतून येतो(ही सगळी झाकीरचीच भाषा)
जीनांनी जो दहशतवाद केला पाकिस्तानप्राप्तीसाठी. काय गरीबी होती त्यांची.
मलबार हीलवर बंगला होता त्यांचा.
मुंबईमधे ९३ साली बॉम्बस्फोट झाले दाऊदची कसली होती उपासमारी.
याकूब मेमनची कसली होती गरीबी.
लादेनचा दहशतवाद - त्याची गरीबी काय होती जरा सांगणार का ?
आणि गरीबी असेल नाहीतर श्रीमंती
माणसांचे जीव घेणे कसे समर्थनीय ठरू शकते ? हे कसलं तत्वज्ञान !
26 May 2012 - 12:32 am | JAGOMOHANPYARE
मालक, या एवढ्या प्रतिसादाचाच नवीन धागा काढा आता.
26 May 2012 - 12:36 am | आशु जोग
धाग्यासाठी धागा नको
आपल्याला प्रश्नांचा अभ्यास करायचाय, नंतर त्याची उत्तरेही मिळवायचीत
26 May 2012 - 2:29 am | आशु जोग
विकास
सलमानखानच्या घरातील गणपती पाहीला,
शाहरुखच्या घरीही गणपती असतो, त्याचा मूर्तीला विरोध नाही.
इतकेच काय तर अनेक ठिकाणी
काबा आणि गणपतीच्या प्रतिमा एकाच फ्रेममधे लावलेल्याही पहायला मिळतात
आता डॉ. झाकीर नाइक यांनी काय करावे !
26 May 2012 - 2:31 am | शिल्पा ब
त्याला डॉक्टर का रे म्हणता? कशाचा अन कुठला डॉक्टर तो?
26 May 2012 - 2:40 am | आशु जोग
मुळामधे झाकीर नाइक हे डॉक्टर. ते एम बी बी एस आहेत मुंबई विद्यापीठाचे.
नव्या पिढीतील अनेक मुस्लिम युवकांचा
इस्लामकडे ओढा कमी झाला आहे. अनेकांना आपला धर्म आउटडेटेड झाला आहे असे वाटते.
त्यामुळे आपली मुस्लिम आयडेंटीटी लपवावी असाही त्यांचा प्रयत्न असतो.
म्हणून डॉक्टर झाकीर नाइक यांनी इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यास सुरुवात केली.
26 May 2012 - 7:56 pm | कापूसकोन्ड्या
इंडोनेशिया च्या करन्सी नोट वर गणेशाचे चित्र आहेच पण त्यांच्या एअयलाईन चे नांव गरूडा आहे.
हे चित्र पहा
चर्चेला कसे उधाणा आले आहे ते इथे पहा.
http://indianmuslims.in/ganesha-on-indonesian-currency/
धन्यवाद
26 May 2012 - 6:11 pm | आशु जोग
दुसरी गोष्ट म्हणजे जगातील कोणत्याही गोष्टीवर मते नोंदवणे
मग ते सानियाने स्कर्ट घालावा की नाही असेल नाहीतर
स्त्रियांनी गाडी चालवावी का असेल
--
डॉ झाकीर नाइक यांच्या चॅनेलचे नाव 'पीस' असे आहे
पण शांततेशी त्याचा कितपत संबंध आहे कुणास ठाऊक
--
26 May 2012 - 8:21 pm | आबा
किंवा,
कोणी वंदे मातरम म्हणावे यावर...
........
हारून भाऊ तुमचे प्रतिसाद आवडले.
27 May 2012 - 7:15 pm | संपादक मंडळ
चर्चेचा मूळ विषय बाजूला राहून धार्मिक तेढ वाढवणारे प्रतिसाद सातत्याने येत राहिल्यामुळे हा धागा वाचनमात्र करण्यात येत आहे.