महाभारतातील कथा-१

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
17 May 2012 - 4:38 pm

महाभारतातील कथा -१.
( महाभारतातील काही कथा द्यावयाचा विचार आहे.गोष्ट सुरस व मनोरंजक असेलच पण त्यातून आजही काही विचार करावयास लागावे असे सापडेल.)

मांडव्य ऋषी
मांडव्य ऋषी मोठे तपस्वी होते. रानातील आपल्या झोपडीबाहेरील झाडाखाली ते एकदा मौनव्रत धारण करून तप करीत बसले होते. शेजारच्या राजधानीत चोरी करून काही चोर पळून रानात आले. मागे राजाचे शिपाई पाठलाग करत होते. चोर झोपडीत लपून बसले. शिपाई मागून आले व मांडव्यांना विचारू लागले की "चोरांना पाहिले का ?" मौनव्रत असल्याने माडव्य काही बोलले नाहीत. शिपायांना संशय आला. त्यांनी झोपडीत तपास केला व चोरांना पकडले. धनही मिळाले. मांडव्य काही बोलला नाही म्हणजे तोही चोरांचा साथीदार असला पाहिजे असे समजून त्यालाही पकडून राजधानीत नेले. राजाला कळवल्यावर त्याने चौकशी न करता सगळ्यांना सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. सुळावर चढवल्यावरही काही न बोलता मांडव्य वेदपठन करत तपच करत होते. काही दिवसांनी रक्षकांच्या ध्यानात आले हा एकच वेदना होत असतांनाही ओरडत नाही व इतके दिवस अन्नपाण्याशिवाय जिवंत आहे. त्यांनी राजाला त्याप्रमाणे कळविले व राजा घाईघाईने तेथे आला व आपली चूक लक्षात आल्यावर हात जोडून मांडव्यांना म्हाणाला "अज्ञानाने माझ्या हातून चूक झाली, मला क्षमा करा." माडव्यांनी "तुझी काही चूक नाही" असे सांगितले. मग त्यांना सुळावरून खाली उतरवले व सूळ काढण्याचा प्रयत्न केला. पण सुळाचे टोक पोटात अडकून बसले होते ते निघेना. शेवटी शूळ तोडून काढला व टोक तसेच पोटात राहिले. त्याच्या वेदना सहन करत मांडव्य तपश्चर्या करत राहिले व त्यांनी तपाने प्राप्त होणारे सर्व दुर्लभ लोक प्राप्त करून घेतले. मग एकदा यमध्रर्माच्या सभेत जाऊन त्यांनी धर्मराजाला विचारले " प्रभो, माझ्या हातून जाणूनबुजून तर काही अपराध घडला नाही, तर मग कोणत्या नकळत घडलेल्या अपराधामुळे मला सुळावर चढण्याची शिक्षा मिळाली ? " यमधर्म म्हणाला " लहानपणी तू एका पतंगाच्या पृच्छाला काडी टोचली होतीस.त्याचे हे फळ. लहानसे दान केले तरी त्याचे नोठे फल मिळते तसे स्वल्प अधर्माचे फल मोठे दु:ख देणारे मिळते. "
मांडव्य म्हणाले " धर्मा ! जन्मापासून बारा वर्षेपर्यंत जीवाच्या हातून जे काय होते त्याबद्दल तो जबाबदार नाही. या वयात त्याच्या हातून पातक होतच नाही. धर्मशास्त्रज्ञ या वयातील कृत्ये हिशेबातच घेत नाहीत. असो. माझा अपराध लहान असतांना तू मला ही असह्य पीडा होईल असा दंड केलास म्हणून मनुष्यजातीच्या शूद्र वर्णात तुला जन्म प्राप्त होईल. मी आजपासून असा धर्मफलाचा उदयकारी नियम बांधून देतो की यापुढे चौदा वर्षेपर्यंत घडलेल्या दुष्कृत्याबद्दल जीवास दंड असू नये, कारण ते त्याचे दुष्कृत्य अज्ञानजन्य असल्याने पापकारक होत नाही,."

(१) मांडव्यांनी वयोमर्यादा १२ पासून १४ पर्यंत वाढवली. आज जगभर असेच बालागुन्हेगारांबद्दल कायदे आहेत. पण आज (कलीयुगांत) परिस्थिती बदलेली दिसते. पुण्यात बालगुन्हेगारांनी जाणीवपूर्वक एका मुलाचा खून केला व नंतर खंडणीही वसूल केली ! बातम्या वाचतांना असे अनेक गुन्हे निदर्शनास येतात. हे गुन्हे अज्ञानजनक नसतात. मग आता उलटे पाऊल टाकणे गरजेचे आहे का ?

(२) हस्तिनापुरातील दासीला व्यासांपासून झालेला मुलगा म्हणजे यमधर्माचा अवतार, विदूर. दासीपुत्र म्हणून हा सूत. याला राज्याचा अधिकार नाही. हा अर्थ व धर्म या दोन्ही शास्त्रांमध्ये निपुण होता.पण हा राजा होऊ शकला नही. अंध व कपटी धृतराष्ट्राने राज्याधिकार भोगला व विदूर शेवटपर्यंत मंत्रीच राहिला.लहानपणच्या पांडवांना कौरवांपासून वाचविण्यात याचा मोठा भाग होता. लाक्षागृहाची कल्पना यानेच युधिष्ठिराला दिली व भुयार खणणारा माणुसही पुरवला. "दुर्योधनाचा त्याग कर" असे त्याने वारंवार धृतराष्ट्राला बजावले. तेरा वर्षे कुंती याच्याच घरात राहिली. युद्धानंतर धृतराष्ठ्र-गांधारी व कुंती वनात निघाली तेव्हा हा त्यांच्याबरोबर वनात गेला तेथेच त्याने आपला प्राण सोडला. त्या वेळी युधिष्ठिर तेथे होता. विदुराने आपले डोळे त्याच्या डोळ्यात मिळवून योगबलाने आपले प्राण युधिष्ठिराच्या प्राणात व आपली इंद्रिये युधिष्ठिराच्या इंद्रियात मिळवून टाकली.

(३) डॉ. इरावती कर्वे यांच्या मते विदुर हा युधिष्ठिराचा बाप. पण हे पटत नाही. व्यास हे फार रोखठोक लिहणारे लेखक आहेत. त्यांना तसे सुचवावयाचे असते तर त्यांनी तसे सरळ लिहले असते. पण दुसर्‍या एका विचारसरणीने हे बरोबरही वाटते. विदुर हा यमधर्माचा अवतार व युधिष्ठिर हा कुंतीला यमधर्मापासून झालेला
मुलगा. तेव्हा हे नाते जुळतेही.

शरद

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

17 May 2012 - 5:33 pm | प्रचेतस

छान कथा सांगितलीत काका.
महाभारतातील अशाच अजून वेचक कथा येऊ द्यात.

बापु देवकर's picture

17 May 2012 - 6:26 pm | बापु देवकर

अनि हि नविन माहितीही आवडली.

विकास's picture

17 May 2012 - 6:54 pm | विकास

कथा नक्कीच आवडली. :-)

विदूर हा (व्यासांच्या महाभारताप्रमाणे अधिकृत) यमधर्माचा अवतार होता हे माहीत नव्हते.

विदुर हा यमधर्माचा अवतार व युधिष्ठिर हा कुंतीला यमधर्मापासून झालेला मुलगा. तेव्हा हे नाते जुळतेही.

त्या संदर्भात मग तत्कालीन राजनियमांनुसार, युधिष्ठीर देखील मग शूद्र ठरतो (कारण विदूर शूद्र). तसे असेल तर त्याला राज्य कसे मिळाले. त्याचाच जास्त विस्तार केल्यास लक्षात येते की मग आईचे कूळ-जात-पात मुलाला मिळायची का? कारण व्यास तर शूद्र नव्हते अथवा क्षत्रिय नव्हते आणि त्यांचा अधिकृत पुत्र विदूर मात्र आईच्या जाती-कर्मामुळे शुद्र ठरला अथवा धॄतराष्ट्र-पंडू सारखा त्यांच्या आईंच्या जन्म-लग्न जातीमुळे क्षत्रिय ठरला.

अतिअवांतरः लहानपणी तू एका पतंगाच्या पृच्छाला काडी टोचली होतीस.त्याचे हे फळ. याचा अर्थ महाभारतकालात (अथवा कथा खरी धरली तर त्याही आधी) भारतात पतंग होते? मी ऐकल्याप्रमाणे मांडव्यऋषींनी लहानपणी पक्षांना त्रास दिला होता अशी देखील गोष्ट असावी...

प्रचेतस's picture

17 May 2012 - 7:41 pm | प्रचेतस

विदुर असो वा युधिष्ठिर, दोन्ही संतती नियोगाद्वारे झाल्या होत्या.
नियोगकर्त्याला पिता म्हणून त्याचे नाव लावता येत नसे.
व्यासांना घाबरल्यामुळे ऐनवेळी अंबिकेने स्वत:ऐवजी तिच्या दासीला व्यासांसमोर उभे केल्यामुळे विदुर शूद्रयोनीत निपजला. अन्यथा क्षत्रिय झाला असता. अर्थात नियोग दासीशी झाल्यामुळे रूढार्थाने तो अंबिकेचा अथवा विचित्रवीर्याचाही पुत्र होऊ शकला नाही. (मांडव्य ऋषींच्या शापामुळे यमधर्माचा अवतार इतकाच काय तो यमाशी संबंध).

युधिष्ठिर शुद्र ठरू शकत नाही कारण कुंती व पांडू दोघेही क्षत्रिय होते. व दोघांच्याही संमतीने नियोग झाला होता.

मृगनयनी's picture

17 May 2012 - 7:41 pm | मृगनयनी

शरद'जी.. हा नवा उपक्रम आवडला! :)

विकास'जी...

या संदर्भात मग तत्कालीन राजनियमांनुसार, युधिष्ठीर देखील मग शूद्र ठरतो (कारण विदूर शूद्र). तसे असेल तर त्याला राज्य कसे मिळाले. त्याचाच जास्त विस्तार केल्यास लक्षात येते की मग आईचे कूळ-जात-पात मुलाला मिळायची का? कारण व्यास तर शूद्र नव्हते अथवा क्षत्रिय नव्हते आणि त्यांचा अधिकृत पुत्र विदूर मात्र आईच्या जाती-कर्मामुळे शुद्र ठरला अथवा धॄतराष्ट्र-पंडू सारखा त्यांच्या आईंच्या जन्म-लग्न जातीमुळे क्षत्रिय ठरला.

हे तत्कालीन "राजनियम" काय होते... ते सांगू शकाल का?

आणि वेदव्यास हे शूद्र नाहीत. ते पाराशर ऋषींचे पुत्र असल्याने "ब्राह्मण" पित्याचे पुत्र आहेत. त्यांची आई 'सत्यवती' ही मत्स्यकन्या होती. परन्तु तिचे वडील एक क्षत्रिय राजा होते. आणि सत्यवतीचे पालनपोषण एका कोळ्याच्या घरी झाले होते. त्यामुळे महर्षि व्यासांचे वडील ब्राह्मण तर आई क्षत्रिय होती... त्यामुळे ते ब्राह्मण आणि क्षत्रिय रक्ताचा मिलाप आहेत! :)

अतिअवांतरः लहानपणी तू एका पतंगाच्या पृच्छाला काडी टोचली होतीस.त्याचे हे फळ. याचा अर्थ महाभारतकालात (अथवा कथा खरी धरली तर त्याही आधी) भारतात पतंग होते? मी ऐकल्याप्रमाणे मांडव्यऋषींनी लहानपणी पक्षांना त्रास दिला होता अशी देखील गोष्ट असावी...

"पतंग" हा एक कीड्याचा प्रकार आहे. :)

हे तत्कालीन "राजनियम" काय होते... ते सांगू शकाल का?

"दासीपुत्र म्हणून हा सूत. याला राज्याचा अधिकार नाही. हा अर्थ व धर्म या दोन्ही शास्त्रांमध्ये निपुण होता.पण हा राजा होऊ शकला नही." असे मूळ लेखात जे लिहीले होते त्या संदर्भात मी "तत्कालीन राजनियम" असे म्हणले होते.

आणि वेदव्यास हे शूद्र नाहीत. ते पाराशर ऋषींचे पुत्र असल्याने "ब्राह्मण" पित्याचे पुत्र आहेत. त्यांची आई 'सत्यवती' ही मत्स्यकन्या होती. परन्तु तिचे वडील एक क्षत्रिय राजा होते. आणि सत्यवतीचे पालनपोषण एका कोळ्याच्या घरी झाले होते. त्यामुळे महर्षि व्यासांचे वडील ब्राह्मण तर आई क्षत्रिय होती... त्यामुळे ते ब्राह्मण आणि क्षत्रिय रक्ताचा मिलाप आहेत!

मी जाती मानत नाही आणि आपण देखील वरील माहिती देताना केवळ पुर्वीच्या काळातली/कथांमधली म्हणून दिली असावी (पक्षी: आज तशीच लागू करत नसाल) असे गृहीत धरतो.

"पतंग" हा एक कीड्याचा प्रकार आहे.

धन्यवाद. :-)

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 1:21 pm | परिकथेतील राजकुमार

हे तत्कालीन "राजनियम" म्हणजे फार मोठा विनोदच असावा.

धृतराष्ट्र जन्मजात आंधळा म्हणून राज्य सांभाळायला नालायक ठरवला गेला आणि पांडुला राजा बनवण्यात आले. पुढे हाच पांडु जेंव्हा शापदग्ध होऊन वनात निघून गेला तेंव्हा मात्र सगळ्यांना लगेच धृतराष्ट्र राजा म्हणून चालून गेला. तेव्हा कुठलेही नियम वैग्रे आड आले नाहीत. पण ह्याच धृतराष्ट्राची मुले मात्र वारस नाहीत, वार्स फक्त पांडुची मुले.

विकास's picture

18 May 2012 - 8:38 pm | विकास

सहमत. असले बरेच विरोधाभास दिसू शकतात... म्हणूनच "तत्कालीन" म्हणले :-)

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 1:25 pm | परिकथेतील राजकुमार

खॉडरबर

मृत्युन्जय's picture

17 May 2012 - 9:03 pm | मृत्युन्जय

त्यामुळे ते ब्राह्मण आणि क्षत्रिय रक्ताचा मिलाप आहेत

या हिशोबाने ते सूत ठरतात. परंतु मला वाटते पराशरांनी सत्यवतीला आशिर्वाद दिला होता के तिचा मुलगा सूत म्हणुन ओळखला जाणार नाही. असाच आशिर्वाद शुक्राचार्यांनी देवयानीला दिला होता.

मृत्युन्जय's picture

17 May 2012 - 6:58 pm | मृत्युन्जय

कथा माहिती होतीच. पण आवडली.

अशीच एक कथा (मूळ मानल्या जाणार्‍या महाभारतात नसलेली) भीष्मांबद्दल देखील ऐकली आहे. भीष्मांनी वसूच्या रुपात एकदा एका बेडकाला भाला मारलेला असल्याने त्यांच्या बाणाच्या शय्येवर झोपण्याची वेळ आली असे कथाबीज आहे थोडक्यात त्याचे.

पैसा's picture

17 May 2012 - 7:53 pm | पैसा

कथा माहिती असली तरी काही भाग विसरले जातात. त्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! विदुर दासीचा मुलगा असला तरी मंत्री होऊ शकला. त्याला राजपुत्रांसारखंच शिक्षण मिळालं होतं. त्याची योग्यता मोठी होती आणि तो मोठा भगवत्भक्त होता. मग विदुर अगदी गरीब होता अशा कथा नंतर का प्रसृत झाल्या असाव्यात? (संदर्भः विदुराघरच्या कण्या श्रीकृष्णाने खाल्ल्याची कथा).

१४ वर्षांपर्यंत बालक समजण्याचा मुद्दा आहे, तो त्या काळाप्रमाणे आहे. तेव्हा ८ व्या वर्षी मुलांचं शिक्षण सुरू होत असे. आणि २० व्या वर्षी संपत असे. १४ वर्षे म्हणजे अर्धे शिक्षण पूर्ण झालेली मुलं. आता आपण मुलांना ५ व्या वर्षीच शाळेत घालतो. म्हणजे ३ वर्षे आधीच त्यांचा जगाशी संबंध येऊ लागतो. १४ वर्षांची मुलं साधारण १० वीत गेलेली असतात. आणि त्याना बर्‍यापैकी समजही आलेली असते. तेव्हा या बालवयाच्या मर्यादेचा फेरविचार करावा असं तुम्ही म्हणताय ते योग्यच आहे!

मृत्युन्जय's picture

17 May 2012 - 9:04 pm | मृत्युन्जय

तुमचे वयाचे लॉजिक भन्नाटच आवडले आहे.

अर्धवटराव's picture

17 May 2012 - 10:37 pm | अर्धवटराव

इतनी छोटिसी बातची (म्हणजे माझ्या दृष्टीने छोटिसी...) इतनी मोठी सजा... अर्धवटराव, आपले कर्म आठवा... आणि काय काय सजा मिळु शकते याचा विचार करा ( विचारानेच अंगात कापरं भरलय :( )
अश्या वेळी आपण (सोयिस्कररित्या) विज्ञानाचा आधार घेतो बॉ... आयला, तिथे पुनर्जन्म वगैरे प्रकारच नाहि... म्हणजे या जन्मातल्या चुकांची शिक्षा पुढील जन्मी वगैरे वगैरे भोगायचा प्रश्नच येत नाहि (ओह्ह्ह्ह्ह... व्हॉट अ रिलीफ :) ) बाकि राहिली या जन्मातल्या कायदे कानुनची भिती.... हा हा हा.. हटा सावन कि घटा.. इथे आपल्याला भारतीय असण्याचा फायदा होतो (त्याचा अभिमान देखील वाटतो ) साला... इथं पब्लीक चोर्‍या, दरोडे, लाच, खुन, बलात्कार... जे काय करण्यासारखं म्हणुन ते सर्व करतात आणि आरामात जगतात... आपण तर फार सौम्य त्यामानाने :)

अर्धवटराव

अर्धवटराव's picture

17 May 2012 - 9:17 pm | अर्धवटराव

कथा फार छान आहे... पण एक शंका... (छिद्रांन्वेषीपणा जात नाहि) मौनव्रतधारी ऋषी "त्यात तुझी चुक नाहि" असं कसं म्हणाले राजाला ?? आणि तसं म्हणण्याचा काहि पर्याय उपलब्ध होते , तर सुळावर चढण्यापुर्वीच का नाहि सांगितलं तसं ? एक तर त्यांची साधना सुळावर चढल्यानंतर काहि दिवसांनी संपली असावी, किंवा दुसर्‍या कुठल्या चुकीची शिक्षा म्हणुन त्यांना ऐनवे़ळी आपली बाजु मांडता आलि नसावी... कि अजुन काहि???

अर्धवटराव

एवढंच समजलं, कुठंही काड्या सारु / करु नयेत,

अमृत's picture

18 May 2012 - 12:43 pm | अमृत

अमृत

रोज गुड नाईट लावून झोपते, झुरळांवर बेगोन फवारते...या सगळ्याची काय शिक्षा असेल?

नाना चेंगट's picture

18 May 2012 - 2:06 pm | नाना चेंगट

वय काय तुमचे?

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 2:12 pm | परिकथेतील राजकुमार

शारीरिक का मानसिक ?

नाना चेंगट's picture

18 May 2012 - 2:15 pm | नाना चेंगट

बौध्दीक

मृत्युन्जय's picture

18 May 2012 - 2:30 pm | मृत्युन्जय

तुम्ही प्रत्येक जन्मात श्वास बंद झाल्याने मराल् असा त्याचा अर्थ होउ शकतो.

५० फक्त's picture

18 May 2012 - 3:18 pm | ५० फक्त

एका बंद खोलीत मध्यभागी मोठ्य टोपलीत गोव-या पेटवुन त्यावर मिरच्यांचि धुरी दिली आहे आणि त्या खोलीत किचेन्तै उडत आहेत असं दृश्य आलं डो़ळ्यासमोर.

स्पंदना's picture

18 May 2012 - 4:57 pm | स्पंदना

हं!

एकुण अस आहे तर. मांडव्यांच्या शापान यमधर्मास व्याप!! पण फक्त विदुरांच अस काहीच वेगळ कथानक नाही का महाभारतात?
काय मजा आहे ना? मृत्यु! ज्याच भय सार्‍या जगास, तो सर्वात धर्मान वागणारा, किंवा धर्माचा स्वामी असावा? ज्याच्या घावान अनेक जण आक्रोशत फिरतात तो सर्वात धर्मशिल किंवा धर्म मानला जावा! मला खरच भारतिय पुराण कथांच कौतुक वाटत. नुसत काळ वा पांढर अस काही नसतच , अस आपण ठरवुच शकत नाही .

विकास's picture

18 May 2012 - 8:45 pm | विकास

कथानक असे थोडेफार जाता-येता आहेच. पण विदूर म्हणल्यावर विदूर निती येते! त्यावरचे पॉवरपॉईंट जालावर शोधल्यावर मिळाले. वाचून झाल्यावर एक चर्चा टाका. ;)

स्पंदना's picture

19 May 2012 - 3:37 pm | स्पंदना

त्याच काय आहे विकास भाउ, माझ झालय लगिन्...आता विचारा त्यान काय फरक पडतो...अहो पडतो ना! आठवा बघु, तुम्ही बायकोशी शेवटचा वाद कधी घातला होता? आता तुम्ही समजत असाल तुम्ही वाद घातला होता पण बायकोला विचाराल तर एक घाव दोन तु़कडे करुन तिन ते तुमच्या हाती दिले होते.
तर एकुण माझा वाद किंवा चर्चा किंवा काथ्याकुट जे काय असेल ते दुसर्‍या किंवा तिसर्‍या वाक्यात संपलेल असत. बहुतेकदा जित हमारी असते. त्यामुळे मला कधी सुद्धा त्या काथ्याकुटात जादा ताणुन धरता येत नाही. आपल आपल सरळ, "माझ म्हणन हे आहे पाहिजे तर घे नाहीतर जा खड्ड्यात." असा अ‍ॅटिट्युड असलेला वाद रंगायचा कसा?

मस्त कलंदर's picture

19 May 2012 - 4:05 pm | मस्त कलंदर

बोला बोला.. विकास या सार्वत्रिक मुद्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? सगळीकडे हाच प्रश्न पुन्ना पुन्ना डोकं वर काढतो आहे. ही सर्व माणसांना भेडसावणारी समस्या आहे, तिचं निराकरण व्हायलाच असं माझं माझं मत आहे. आपण हवंतर जनतेकडूनही पोल घेऊ की त्यांना काय म्हणायचंय. पण त्या आधी मला हे जाणून घ्यायचंय की हे असं तुमच्याकडेही होतं कां? होत असेल तर त्याची कारणं काय असावीत आणि त्यावर उपाय काय असू शकतील? त्याचबोबर अशा समस्यांमुळे चर्चा नीट होत नसाव्यात का हाही प्रश्न पुन्ना पुन्ना माझ्यासमोर येत आहे. चर्चाच होत नसतील तर त्याचे दुष्परिणाम काय असावेत आणि ते कितपत, कुणाकुणावर होत असतील हे सुद्धा मला जाणून घ्यायचंय. चित्रातै, तुम्ही शांत रहा, तुम्हालाही बोलू दिलं जाईल. पण त्या आधी विकासरावांना काय म्हणायचंय हे आपण जाणून घेऊयात. विकास, पुन्ना पुन्ना तुम्हाला इतके प्रश्न विचारले जाऊनही तुम्ही शांत का? उत्तर द्या..

काही विशेष नाही, देशपांडे सतत वागळेचे शोज पाहतात, त्यामुळे संगती सदोषेण, इतकंच! :-)

स्पंदना's picture

19 May 2012 - 4:58 pm | स्पंदना

किती बोलतेस? मी सांगितल ना? दोन नाहीतर तिन वाक्यात कंडका पाडायचा. हेच तर आमच्या सुखी संसाराच गमक आहे.

पैसा's picture

19 May 2012 - 5:07 pm | पैसा

तुम्ही दोघी तुमच्या नवर्‍यांना २/३ वाक्यं तरी बोलायला देता? माझा नौरा २/३ शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि माझी खात्री आहे. घरात वाद घालता येत नाही म्हणून विकासभाऊ इथे एवढे मोठे प्रतिसाद लिहितात! ;)

स्पंदना's picture

19 May 2012 - 5:20 pm | स्पंदना

बाकि आमच्या कडुन

स्विकारा!

मस्त कलंदर's picture

19 May 2012 - 6:02 pm | मस्त कलंदर

अगं दोघी बायांनो.. तिथे खाली पांढर्‍या अक्षरात पण काहीतरी लिहिलंय तेही वाचा... मला बोलू न देता घरात निखिल वागळे चे कार्यक्रम पाह्यले जातात. अर्थात मी त्याला(वागळेला) रिमोटच्या एका बटनात बंद करते हा भाग अलाहिदा..

विकास's picture

19 May 2012 - 7:51 pm | विकास

एक नवीन महाभारत तयार करून वस्त्रहरणाचा नवीन प्रवेश तयार करण्याचा यात कुटील डाव दिसतोय!

घरात वाद घालता येत नाही म्हणून विकासभाऊ इथे एवढे मोठे प्रतिसाद लिहितात!

(त्याला विकासनिती म्हणतात. ;) )

चर्चाच होत नसतील तर त्याचे दुष्परिणाम काय असावेत आणि ते कितपत, कुणाकुणावर होत असतील हे सुद्धा मला जाणून घ्यायचंय. .

चर्चा होतात ना! वाद होत होत नाहीत ;) त्यामुळे दुष्परीणाम माहीत नाही... :-)

आठवा बघु, तुम्ही बायकोशी शेवटचा वाद कधी घातला होता?

वाद म्हणजे काय, तो कशाशी खातात तेच माहीत नाही! :( जोक्स अपार्ट... एक खरे उदाहरण देतो: अमेरीकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीतील रॉमनी ह्या उमेदवाराच्या बायकोने सांगितलेले: त्यांचे लग्नाला मला वाटते ४५+ वर्षे झाली आहेत. त्यांचे म्हणणे फक्त एकदाच भांडण (वाद) झाले (झाला) आहे, तो देखील ती साधारण विशीच्या जवळ असताना!

चित्रा's picture

20 May 2012 - 9:06 am | चित्रा

उद्या घरात काही विषयांवरून तातडीने 'चर्चा' करावी म्हणते.

पैसा's picture

20 May 2012 - 9:54 am | पैसा

rofl

आमचा तुला संपूर्ण पाठिंबा!

स्पंदना's picture

21 May 2012 - 7:11 am | स्पंदना

हा घ्या पुरावा.
किती वाक्य बोलावी लागली चित्रा ताईंना? नुसत एक. एक वाक्य नुसत! बास. इकड आम्ही बाया हसुन हसुन लोळतोय तर तिकडे पण लोळणच! आता अधिक काय बोलाव म्या पामरान. चर्चेस शुभेच्छा!

तिमा's picture

19 May 2012 - 6:34 pm | तिमा

संसदेत वावरणारी सर्व ' चौदा वर्षांखालची बालके' आहेत का ?