खरचं तु हवी होतीस ..
वाळुतल्या त्या शिंपल्यांना
नवे साज देण्या तु हवी होतीस ..
वाळुतल्या पावलांना घुंगरांचा
आवाज देण्या तु हवी होतीस ..
किती लाटा किना-यांवरुन,
परत फिरुन उदास गेल्या....
त्या लाटांना पावलाचा,
स्पर्श देण्या तु हवी होतीस ..
प्रकाशाने आस सोडली,
तु परत येण्याची,
अंधारल्या त्या किना-याला
कवडसा देण्या तु हवी होतीस ..
विखुरलेले शब्द सारे,
त्यांना पाश देण्या तु हवी होतीस ..
अर्थ हरविलेल्या शब्दांचे काही
आभास देण्या तु हवी होतीस ..
शब्दांनी पंख
केव्हाच पसरले होते,
त्या विस्फारल्या स्वप्नांना
आकाश देण्या तु हवी होतीस ..
मैत्री -दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!
-पंचम
प्रतिक्रिया
3 Aug 2008 - 4:15 pm | पावसाची परी
खरच खुप खुप सुन्दर भावना आणि शब्द आहेत्......मनाला भावल
3 Aug 2008 - 4:50 pm | शितल
सुंदर काव्य रचना :)
3 Aug 2008 - 5:13 pm | फटू
खुप छान लिहिलं आहे...
(अनुभवामधुन उतरलेलं दिसतंय ;) )
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
3 Aug 2008 - 6:58 pm | II राजे II (not verified)
वा !
काव्य नेहमी अनुभवातून व्यक्त होतं असे वाचून आहे....
विखुरलेले शब्द सारे,
त्यांना पाश देण्या तु हवी होतीस ..
अर्थ हरविलेल्या शब्दांचे काही
आभास देण्या तु हवी होतीस ..
उत्तम !
शब्दांनी पंख
केव्हाच पसरले होते,
त्या विस्फारल्या स्वप्नांना
आकाश देण्या तु हवी होतीस ..
मनातील बोलं !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
3 Aug 2008 - 7:17 pm | प्राजु
शब्दांनी पंख
केव्हाच पसरले होते,
त्या विस्फारल्या स्वप्नांना
आकाश देण्या तु हवी होतीस ..
खूप छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Aug 2008 - 1:13 pm | मयुरयेलपले
छान कविता!!!!!!!!!!!!!!
आपला मयुर
4 Aug 2008 - 3:24 pm | विसोबा खेचर
किती लाटा किना-यांवरुन,
परत फिरुन उदास गेल्या....
त्या लाटांना पावलाचा,
स्पर्श देण्या तु हवी होतीस ..
वा! क्या केहेने...!
4 Aug 2008 - 6:12 pm | मनीषा
.... कविता
शब्दांनी पंख
केव्हाच पसरले होते,
त्या विस्फारल्या स्वप्नांना
आकाश देण्या तु हवी होतीस .. खुप छान