ठाणे कट्टा लाईव्ह.. पॉप टेट्सवर स्वारी.

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
29 Apr 2012 - 6:40 pm

पॉप टेटस ठाणे..

कट्टा सुरु झालेला आहे..

प्रास, विमें,चतुरचाणक्य,जयपाल, वरुण मोहिते,कस्तुरी,गवि,मन्या फेणे,सुहास झेले हे नग आत्तापर्यंत जमा झालेले आहेत.

ठाण्याची स्कायलाईन सुंदर दिसते आहे. पॉप टेट्सचे हॅपी अवर्स चालू आहेत..

कॅमेरामन मन्या फेणे के साथ गवि, ठाणे से..

देखते रहिये आप तक..

मांडणीमुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2012 - 12:24 pm | अत्रुप्त आत्मा

कुठे आहेत फोटू..? :-(

आणी अत्ता पर्यंत नुसते,भक्त आणी तीर्थ प्राशनाचेच फोटू टाकलेत... मधे मधे दिलेला प्रसाद पण दिसतोय...पण महानैवेद्य कुठे आहेत...काय काय हदडलं ..? ते कसं कसं होतं..? हे नै कळ्ळं.. :-(
हे (फोटूं सहित) कळ्ळं नाही तर धाग्याची मजा काय..?

आता तुम्हाला आणखी जळजळ करुन घ्यायचीच आहे तर.. ;)

अहो इतकं कायकाय मागवलं होतं की हळूहळू नोंद ठेवणं अशक्य झालं.

वर उल्लेख न झालेले पण माझ्या आठवणीत राहिलेले पदार्थ :

शाकाहारींनी मुख्यतः मशरूम रिसोत्तो , व्हेज बिर्याणी , गार्लिक ब्रेड, थाई करी विथ राईस आणि अन्य काही पदार्थ हादडले.

मांसाहारींनी प्रॉन्स बिर्याणी, कसलेतरी ग्रिल्ड चिकन, ग्रिल्ड पेस्तो फिश ..

त्या सर्व पदार्थांचे फोटो इतरांनी काढले असावेत अशी आशा आहे. कारण तोपर्यंत माझ्या प्रक्षेपण केंद्राची , कॅमेर्‍याची आणि माझी अशा सर्व बॅटर्‍या काहीशा डाऊन झाल्या होत्या..आणि अंधारही..

वैयक्तिक मत म्हणाल तर चवीच्या बाबतीत सर्व काही एकदम खास.. पॉप टेट्स रॉक्स..

आपल्या शहरात एखादं रेस्टॉरंट आहे याचा आनंद वाटायला लावणारी ही जागा आहे..

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2012 - 12:55 pm | अत्रुप्त आत्मा

@त्या सर्व पदार्थांचे फोटो इतरांनी काढले असावेत अशी आशा आहे. >>> मग त्यांना सांगा फोटू टाकायला...फोटू हवेतच ...नायतर णिषेध..!णिषेध..!णिषेध..! ;-)

काळोख झाल्यावर एकदम रंगलेल्या मैफिलीत फोटो काढला आहे.. अंधार असला तरी साक्षात प्रभूंच्या दर्शनासाठी काहीसे कष्ट होणारच.. तेव्हा डोळे ताणून दर्शन घ्यावे..

स्वातीविशु's picture

30 Apr 2012 - 12:28 pm | स्वातीविशु

कट्टाव्रुत्तांत फारच आवडला गेला आहे. :)

बादवे आम्ही काल सकाळी ठाण्यात आमंत्रण मधे मिसळपाव आणि लस्सी चापत होतो. आधी कल्पना असती तर कट्ट्यास हजेरी लावली असती. :(

आमची कट्टी सगळ्यांशी........ :(

धन्या's picture

30 Apr 2012 - 12:49 pm | धन्या

कट्टयाचा वृतांत लाईव्ह देण्याची कल्पना आणि कट्टयाचे फोटो एकदम भारी.

इनोची गरज भासली नाही. आनंदच झाला. :)

मी कस्तुरी's picture

30 Apr 2012 - 12:57 pm | मी कस्तुरी


धन्यवाद कस्तुरी..

शेवटी उरलेले आम्ही जे लोक होतो त्यातले बरेचजण आता सर्वांना माहीत झाले आहेत, तरी ज्यांना माहीत नाही त्यांजसाठी पात्रपरिचय :

उभे : डावीकडून उजवीकडे - प्रास, रामदासकाका,गवि,सर्वसाक्षी, प्रभू
बसलेले : डावीकडून उजवीकडे -विजुभाऊ, जयपाल, सुहास झेले, विश्वनाथ मेहेंदळे, नंदन, किसन शिंदे, वरुण मोहिते.

jaypal's picture

30 Apr 2012 - 2:39 pm | jaypal

या मधे कस्तुरी कशी दिसत नाही ते ? कट्ट्याला तर होती खरी :-(

चला गवि दिसले एकदाचे , ते डिक्टो सोकाजीन्सारखे दिसताय्त म्हनुन
गल्लत झालि .:)
आता मन्या फेने .
ते कुठेदिसतिल????

स्पा's picture

1 May 2012 - 11:13 am | स्पा

आता मन्या फेने .
ते कुठेदिसतिल

http://www.misalpav.com/node/21529#comment-392782

आमचा एकुलता एक फोटू इथे टाकल्या गेला आहे. पहिलाच :)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2012 - 1:18 pm | बिपिन कार्यकर्ते

जो कोणी गविंना पक्डून देईल त्याला दहा हज्जार डॉलर्स बक्षिस!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Apr 2012 - 3:34 pm | निनाद मुक्काम प...

हे बक्षीस तुम्ही तुमच्या स्थानिक चलनात जाहीर केले असते तर रुपयाला १३ म्हणजे सौदा स्वस्त पडला असता.
पण तुमच्या फतव्याचे स्वागत आहे.
आता पुणेकर काय क्लुप्ती लढवणार आहेत हे पाहणे मनोरंजक आहे.

अरे वा !! लाईव्ह वृत्तांत आवडला.

वरुण मोहिते's picture

30 Apr 2012 - 1:53 pm | वरुण मोहिते

मजा आली. पुढच्या कट्ट्याच्या प्रतिक्षेत...

jaypal's picture

30 Apr 2012 - 2:36 pm | jaypal

हेच म्हणतोय मी पण .
अन लै गमजा केल्या राव............ गुर्जीन
gurji

विनायक प्रभू's picture

30 Apr 2012 - 1:54 pm | विनायक प्रभू

मी खुपच उशीरा पोचलो.
त्या मुळे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता आला नाही.
फक्त एक आर. सी वर बोळवण झाली.
सोबत थोडेसे दही मिळाले.
ते मी स्टरर ने खाल्ले.
नंदन म्हणाला "मास्तर चमचा घ्या"
गुणी बाळ हो.
पण मी स्टरर चा चमचा सारखा वापर केला.
उशीर का झाला?
लग्न कार्य होते.
पुरोहीत मी.
माळा घालुन लगेच सटकलो.
लाजा होम, नातिचरामी ची शपथ वगैरे असिस्टंट ला सोपवले.
नातिचरामी ची फोड सर्व कट्टेकर्‍यांना आवडली.
न्+अती+चरामी
थोडेफार चरले तर चालते.
असो कट्टा छान झाला.
गेले काही महीने रेक्लुझिव राहील्यानंतर एक्स्क्लुझिव लोकांबरोबर इन्क्लुझिव झाल्याचा आनंद झाला.

गेले काही महीने रेक्लुझिव राहील्यानंतर एक्स्क्लुझिव लोकांबरोबर इन्क्लुझिव झाल्याचा आनंद झाला.

काल रात्री दहाच्या सुमारास हे बोलला असतात तर काय ते ताबडतोब समजलं असतं आता मात्र समजत नाहीये.. ;)

मुक्त विहारि's picture

30 Apr 2012 - 2:31 pm | मुक्त विहारि

कार्यक्रम छान झालेला दिसत आहे ...

प्रास's picture

30 Apr 2012 - 3:23 pm | प्रास

कालच्या दिवसातला पॉप टेट्सवरचा मिपाकरांचा हल्लाबोल फारच रंगतदार झाला. यापूर्वी सहभागी झालेल्या मिपाकट्ट्यांपैकी सर्वाधिक हजेरीचा कालचा कट्टा झाला. खरंतर मी आणि विमे दादरमध्येच चांगल्या ठिकाणी कट्टा जमवण्याचा विचार करत होतो पण ठाणेकरांनी नेहमीप्रमाणेच बाजी मारली. मात्र तसं असूनही पॉप टेट्स या खादाडीस्थानामुळे किमान आम्हाला दोघांना फारसं दु:ख झालं नाही. अर्थात मी त्या जागी पहिल्यानेच खाणार होतो.

मी नि विमे पाच च्या सुमारासच कोरम मॉलमध्ये पॉप टेट्सला पोहोचलो. काय करणार, "गविआज्ञा बलियसि।" गविंनी सांगितलं, रविवार असल्याने आधी जाऊन मिपाकरांसाठी व्यवस्थित जागा पकडणं आवश्यक आहे. त्यांचे अनुभवाचे बोल किती महत्त्वाचे होते ते आम्हा दोघांना तिथे गेल्या गेल्याच लक्षात आलं. रेस्टॉरन्ट पूर्ण भरलेलं होतं आणि एकही टेबल रिकामं नव्हतं. मग टेरेसवर एक बाजू रिकामी दिसली कारण तिथली सर्वीस सहा वाजल्यानंतर सुरू होणार होती. आम्हाला तरी कुठे घाई होती? आम्ही तिथेच स्थानापन्न झालो नि तेवढ्यातच सुहास झेले आमच्यात सामील झाले. कल्पना नाही कसं पण त्यांनी आणि त्यांच्या मागोमाग आलेल्या जयपालांनी आम्हाला लगेच हुडकून काढलं आणि मिपाकरांचा ट्रेडमार्क दंगा सुरू झाला कारण दरम्यान गवि आपलं नेटबूक सरसावून आमच्यात सामील झालेच होते. त्यांच्या कट्ट्याच्या लाईव अपडेट्सच्या कल्पनेला, उपस्थित आम्ही सर्वांनी च, "वॉट अ‍ॅन् आयडिया, सर जी!" म्हणून अनुमोदन दिलेलं होतं.

आता एक एक मिपाकर येऊ लागले आणि कुणालाच शोधाशोध करावी लागली नाही. सगळ्यात दंगेखोर कोपरा मिपाकरांचं राखीव कुरण बनला होता. स्पा उर्फ मन्या फेणे नि चचा आल्याबरोबर स्टार्टर्सची पहिली ऑर्डर गेली.

बाकी खाण्याचे पदार्थ आणि उपस्थित मिपाकर यांच्या बद्दल वरती लिहिलं गेलेलंच आहे म्हणून यापुढे निव्वळ माझा विचार - या पॉप टेट्सच्या कट्ट्याची माझ्यासाठी सगळ्यात मोठी उपलब्धी सिनियर मिपाकरांची भेट होती. रामदासकाका, विजुभाऊ, सर्वसाक्षी, नंदन, जयपाल, प्रभुगुरूजी आणि क्लिंटन या आत्तापर्यंत केवळ वाचनात आलेल्या आयडींच्या मागची व्यक्तिमत्त्वं बघायला मिळाली, त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्याशी चांगल्यापैकी गप्पा मारायला मिळाल्या. त्याबरोबरच वरुण, कॅ. जॅक स्पॅरो उर्फ स्फेणे सॉरी मन्या फेणे आणि कस्तुरी यांचीही ओळख झाली.

नेहमीप्रमाणेच या ठाणे कट्ट्याचा शेवट पुढला कट्टा मुंबईमध्येच होणार अशा घोषणेने झाला. ;-)

स्वाती दिनेश's picture

30 Apr 2012 - 5:40 pm | स्वाती दिनेश

लाइव प्रक्षेपण न पाहिल्यामुळे /वाचल्यामुळे आत्ता कट्ट्याचा साद्यंत वृत्तांत वाचला.
कट्टा सॉलिड्ड झालेला दिसतो आहेच,
स्वाती

नंदन's picture

30 Apr 2012 - 8:36 pm | नंदन

कालचा कट्टा दणदणीत झाला. संध्याकाळी पोचलो तेव्हा विमे, प्रास, जयपाल, सुहास, कस्तुरी, वरूण, गवि, स्पा ऊर्फ मन्या फेणे आणि चचा तिथे हजर होतेच. सुहास वगळता इतरांना प्रथमच भेटत असलो तरी पूर्वीच्या कट्ट्यांच्या आणि ट्रेक्सच्या फोटोंवरून बहुतेकांना ओळखता आलं.

चचांची कविता वाचून ही व्यक्ती अगदी इरसाल (आयडी नव्हे) असेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात एकदम सालस निघाले :). गविंची नेटबुकवर 'लाईव्ह अपडेट्स' देण्याची कल्पना भन्नाट होती. पॉप-टेट्सची निवडही परफेक्ट! दुपारी एका टिपिकल सीकेपी तिखट जेवणावर* [हा काय प्रकार असतो, त्याबद्दल प्रश्न असल्यास पिडांकाकांना खरड करावी ;).] आडवा हात मारून आल्यामुळे जरा कमीच खाण्याचा निश्चय आफ्रिकानो फिशच्या पहिल्याच डिशसोबत ढासळला. शिवाय गविंनी म्हटल्याप्रमाणे, बिअरचा ग्लास अर्ध्याहून रेसभरही रिकामी झाला तरी तो कटाह पुन्हा काठोकाठ भरण्याचे हक्क पॉप-टेट्सच्या वेटर्सकडे 'स्वाधीन' असल्यामुळे ती बाजूही भक्कम होती. अपेयपान न करणार्‍यांसाठी गविंनी रेकमेंड केलेले 'थ्री जी' नावाचे मॉकटेलही फक्कड होते.

स्पा आणि चचा अंमळ लवकर निघाले, पण नंतर क्लिंटन, सर्वसाक्षी, रामदासकाका आणि विजूभाऊ ह्या मातबर मंडळींचं आगमन झालं. रामदासकाकांनी आपली पोतडी उघडून पुस्तकं बाहेर काढली आणि मग (दवणीय भाषेत सांगायचं तर) आपली अनुभवांची पोतडी उघडून एकेक किस्से सांगायला सुरुवात केली. सलील चौधरी, उकाळो, धातुंचे भाव आणि गुन्हेगारीचं प्रमाण यांचा परस्परसंबंध, रेकॉर्डिंग टेप्समध्ये झालेले बदल हे काही वानगीदाखल विषय!

फायनान्सवरची लेखमाला पुन्हा सुरू करण्याचा वायदा करून क्लिंटनने निरोप घेतला. विजूभाऊंचा काव्यशास्त्रविनोद, रामदासकाका-गवि-सर्वसाक्षी यांचं गप्पाष्टक आणि बारा गावचं पाणी प्यालेल्या वरूण मोहिते-पाटलांच्या (याला लिहितं करायला हवं) अधनं-मधनं कॉमेंट्स अशी मैफल एका टेबलावर रंगली होती. प्रास-विमे-सुहास-जयपाल-कस्तुरी आणि उशीरा येऊन सामील झालेला किशन हे शेजारच्या टेबलावर होते. तेवढ्यात इल्युझिवली रेक्लुझिव प्रभूमास्तर आले. आल्याआल्या आम्ही उडदामेथी, अनसा-फणसाची भाजी या पदार्थांची आठवण काढून सामुदायिकरीत्या अं.ह. झालो. मास्तर अर्धा-पाऊण तासच होते, पण नॉन-क्रिप्टिक मोडमध्ये येऊन मैफल गाजवून गेले :)

प्रासरावांनी म्हटल्याप्रमाणे या कट्ट्यामुळे आत्तापर्यंत केवळ वाचनात आलेल्या आयडींच्या मागची व्यक्तिमत्त्वं बघायला मिळाली, त्यांच्याशी ओळख झाली आणि गप्पा मारायला मिळाल्या. याचं आयोजन करणार्‍या स्पा, विमे, प्रास, गवि (आणि अर्थातच) किशन यांचे आभार मानणं औपचारिक होईल, पण ह्या दणदणीत यशस्वी कट्ट्याचे श्रेय त्यांनाच.

तब्बल ९ महिन्यानंतर काल ठाण्यात कट्टा झाला आणि तो हि अगदी दणदणीत!!

विमे, रामदास काका, गवि, प्रास, सर्वसाक्षी काका हे सगळे नेहमीचेच होते पण विजुभौ, नंदन, क्लिंटन, जयपाल, कस्तुरी, सुझे, वरूण मोहिते या सगळ्यांची प्रथमच भेट झाली.

हे माझ्याकडील काही फोटो..

बापरे!! गवि इतक्या रागाने कोणाकडे पाहताहेत कोणास ठाऊक?

हे काय होतं माहीती नाही. सुझेनं याचा फोटो काढला होता.

प्रासभाऊ! बिलाचं वाचन करताना..

अजुन एक फोटो

नंदन's picture

30 Apr 2012 - 10:15 pm | नंदन

सुझेने काढलेला फोटो बहुतेक ग्रिल्ड पेस्तो फिशचा दिसतो आहे.

सर्वसाक्षी's picture

30 Apr 2012 - 9:55 pm | सर्वसाक्षी

कट्ट्याला धमाल आली.
हॅपी अवर्स काही नविन नाहीत पण ७.२७ नक्कीच नविन. म्हणजे असे की हॅपी अवर्स ७.२७ ला संपणार होते. ७.२७ का हा किडा अजुनही वळवळत आहे. घरी येऊन कालनिर्णय पाहिले तर सूर्यास्त तर ६.५८ चा होता. असो. एका वर एक पिचर हे प्रकरण आवडले आणि आनंद अक्षरशः द्विगुणीत झाला.

टोला लगावल्यावर फलंदाज क्षेत्रव्युहावर नजर टाकतो आणि मगच धाव घेण्यासाठी पळतो तद्वत आम्ही वेटरला बोलावल्यावर समोर लावलेल्या डिजिटल घड्याळाकडे पाहायचे आणि ऑर्डर द्यायचो. बरोबर ७.२७ ला देवळात पुजार्‍याने आरतीपूर्वी भक्तगणांना सूचित करायला केल्यागत हातात घंटा घेउन एक सेवक घण घण घण घण करत संपूर्ण गर्दीला एक प्रदक्षिणा घालुन आत निघुन गेला आणि पाठोपाठ हॅपी अवर्स संपल्याची घोषणा झाली. आम्ही बिनधास्त होतो कारण ऑर्डरची पिचर्स संपली असली तरी ऑर्डरच्या समप्रमाणात फुकट असलेली ३ पिचर्स ची राखिव कुमक अजुन बाकी होती.

मग काय, पी आणि चर!

कट्टा अंमळ लवकरच संपला. पण मजा आली.

पिवळा डांबिस's picture

1 May 2012 - 3:09 am | पिवळा डांबिस

वा, वा, झकास!!
बर्‍याच दिवसांनी एक झकास कट्टा आणि त्याचं सुरेख वर्णन बघायला मिळालं!
सर्व सामील सभासदांचं अभिनंदन!!
गवि, सर्वसाक्षी वगैरे पूर्वी न पाहिलेले लोक आणि प्रभूमास्तर, विजुभाऊ हे पुर्वी पाहिलेले नेहमीचे यशस्वी नग बघून खूप आनंद झाला....
गवि तर आमच्यासारख्याच पर्सनॅलिटीचे दिसताहेत, जमणार आमचं!!
रामदासांची अशी पुस्तके द्यायची खोड जुनीच आहे. धड नीटपणे जेवू देत नाहीत समोरच्या माणसाला!!! :)

आमची आठवण काढलीत का असं विचारणार होतो पण पिझ्झा पाहून इतर कुणाला नसली तरी विमेला तरी आमची आठवण आलीच असणार याची खात्री आहे!! ;)

कट्टा अंमळ लवकरच संपला. पण मजा आली.
अशी हुरहुर नंतर लागणं हेच कट्ट्याचं यश!
जियो!!

स्पा's picture

1 May 2012 - 10:57 am | स्पा

कट्ट्याला रंग चढत असतानाच निघाव लाग्ल्याने मूड साफ गेल्या होता
पण सुरुवातीच्या एक तासातही रास धमाल आली :)
झेले, वरुण, नंदन, कस्तुरी, प्रास आणि क्लिंटन इतके भरमसाठ मेंबर पहिल्यांदाच भेटले .. ;)

बाकी पोप टेत्स के क्या केहने .
अप्रतिम जागा आहे... जबराट :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2012 - 11:42 am | अत्रुप्त आत्मा

प्र.का.टा.आ.

शिल्पा ब's picture

1 May 2012 - 12:05 pm | शिल्पा ब

अगंबै!! का म्हणुन प्र.का.टा.आ. ? अं?

कट्टा एकदम सही झालेला दिसतो आहे :) फोटोही छान आहेत.
व्रूत्तांत तर एकदम मस्त. लाइव्ह टेलिकास्ट ची आयडिया अफलातून...
आयडींमागचे चेहरे पहायला मिळाले :-)
वृत्तांताबद्दल धन्यवाद.