पॉप टेटस ठाणे..
कट्टा सुरु झालेला आहे..
प्रास, विमें,चतुरचाणक्य,जयपाल, वरुण मोहिते,कस्तुरी,गवि,मन्या फेणे,सुहास झेले हे नग आत्तापर्यंत जमा झालेले आहेत.
ठाण्याची स्कायलाईन सुंदर दिसते आहे. पॉप टेट्सचे हॅपी अवर्स चालू आहेत..
कॅमेरामन मन्या फेणे के साथ गवि, ठाणे से..
देखते रहिये आप तक..
प्रतिक्रिया
29 Apr 2012 - 6:43 pm | पैसा
ही आयडिया मस्तच आहे! पुढचे अपडेट्स देत रहा! आम्ही जळत राहूच!
30 Apr 2012 - 8:14 pm | Nile
इथे अमेरीकेत आम्ही महत्प्रयासाने नंदनला पुस्तकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्यावर पाणी फिरवले म्हणून ठाणेकरांचा निषेध!
भारतात आधीच वीज, अन्न आणि बँडविड्थची टंचाई असताना असले लाईव्ह प्रक्षेपण करणार्या गविंचासुद्धा निषेध!
विधायक गोष्टीं करता एकत्र यायचे सोडून असल्या चैनीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवणार्या समस्त कट्टेकर्यांचा निषेध!
असल्या चुकीच्या प्रथांना आळा घालायचा सोडून प्रोत्साहन दिल्याबद्दल पैसाकाकू संपादक यांचाही निषेध!
29 Apr 2012 - 6:50 pm | गवि
मुख्य सेलेब्रिटी रामदासकाका, सर्वसाक्षी आणि विजुभाऊ पोचले आहेत..
नंदन, खास उपस्थिती.. हेही हजर झाले आहेत.
29 Apr 2012 - 6:57 pm | परिकथेतील राजकुमार
कृपया कोणीतरी जयप्याला चार कचकचीत शिव्या माझ्यातर्फे घाला. कारण सांगायची गरज नाही, तो समजून जाईल.
29 Apr 2012 - 11:39 pm | jaypal
जळजळ आणि कचकचीत शिव्या पोचल्या. ;-) आभारी आहे.
29 Apr 2012 - 6:58 pm | यकु
भन्नाट आहे!
पहात आहोत.. प्रसारण बंद करु नये ;-)
29 Apr 2012 - 7:14 pm | गवि
क्रिस्पी चीज बॉल्स.. आफ्रिकानो फिश आणि अन्य चमचमीत स्नॅक्सनी आनंदसोहळ्याची सुरुवात..
पंधरा मिपाकर आत्तापर्यंत जमा.
क्लिंटन आला..
29 Apr 2012 - 8:06 pm | निनाद मुक्काम प...
किती तरी दिवसांनी राजा कोळी चे दर्शन जाहले.
लाइव प्रक्षेपण
भन्नाट कल्पना ( गवीचे डोके भारी सुपीक )
माझी भूक ( पोटाची )
आणी वासना ( जिव्हेची )
चाळवल्या गेली आहे.
इनो सुद्धा घरी नाही आहे असह्य जळजळ
देही वणवा पिसाटला.
चमचमीत जेवण व त्याहून चमचमीत गप्पा
ह्याला नशीब लागते.
" जो नही दिल को मिल सकता
दिल को उसीकी चाहत हे
मुझ को दिल से येही शिकायत हे
30 Apr 2012 - 1:13 pm | स्मिता.
क्रिस्पी चीज बॉल्स अन् आफ्रिकानो फिश का काय अते बघून प्रचंड जळाजळ झालीये.
पणा लाईव्ह टेलिकास्ट न बघता डायरेक्ट रेकॉर्डिंग पाहिल्याने दर १० मिनिटानी जळजळ होण्यापेक्षा जी व्हायची ती एकदाच झाली हेच काय ते समाधान!
@मुंबई आणि पुणे: आम्ही कधी येवू तेव्हाही असेच कट्टे करायचे लक्षात ठेवा बरं का ;)
29 Apr 2012 - 7:18 pm | यकु
चला, आधी ईनोचें बॉक्स आणून जवळ ठेवतो ;-)
29 Apr 2012 - 7:42 pm | प्रचेतस
हेच म्हणतोय.
बॉक्स तर आता शेजारीच ठेवून बसलेलो आहे.
29 Apr 2012 - 7:57 pm | चिंतामणी
चिज बॉल्स आणि ड्रॉट बिअर पाहूनच
याची गरज भासली.
29 Apr 2012 - 7:23 pm | गवि
मोहितो.. विमें..
रामदासकाकांनी प्रत्येकाला एकेक खास पुस्तक भेट दिलंय..
अगदी प्रत्येकाची आवडनिवड ओळखून...
नंदनला सगळ्यांनी आपल्या स्वाक्षर्या करुन ग्रंथ सप्रेम भेट दिला..
29 Apr 2012 - 8:59 pm | जयंत कुलकर्णी
चायला माहिती असते तर एक पुस्तक मिळाले असते ना ! कुठे फेडाल हे पाप.....रामदासजी !
:-)
Enjoy.............
29 Apr 2012 - 11:22 pm | मोदक
+१११११११
:-(
29 Apr 2012 - 7:33 pm | गवि
विजुभाऊ, रामदासकाका आणि जयपाल यांचं काहीतरी जबरदस्त गुफ्तगू चालू आहे.
बाकी सर्वांच्या चर्चेला आणि गप्पांना जबरदस्त रंग चढला आहे..
हॅपी अवर्स संपल्याची घंटा वाजली आहे. त्याच्या एकच मिनिट आधी सफाईने रिपीट ऑर्डर देऊन अधिकाधिक पिचर्स मिळवल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावर आहे..
पॉप टेट्सचे थाई टॉस्ड फिश अफलातून आहेत..
29 Apr 2012 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय आणि पाहतोय. :)
अपडेट्सबद्दल आभारी.
-दिलीप बिरुटे
29 Apr 2012 - 7:50 pm | प्रभाकर पेठकर
पुढच्या भारतभेटीत पॉप टेट्सला बैठक नक्की. विजुभाऊ, सर्वसाक्षी लक्षात ठेवा. खबरदार नाही म्हणाल तर. कोर्टात खेचेन. पुराव्यादाखल, माझ्याजवळ (रंगीत) छायाचित्रे आहेत. जज्जाच्या टेबलावरच फेकीन सगळी.
30 Apr 2012 - 10:37 am | सर्वसाक्षी
आम्ही आहोतचः)
30 Apr 2012 - 8:27 pm | प्रभाकर पेठकर
घाबरले..घाबरले. असो . सर्व व्यवस्थित योजना आखून कळवितो.
29 Apr 2012 - 7:54 pm | गवि
आणखी काही क्षणचित्रे..
29 Apr 2012 - 7:59 pm | यकु
कॅप्टन जॅक स्पॅरो शिस्तीत रे ;-)
लाल होतोयस हळूहळू :p
1 May 2012 - 11:05 am | स्पा
=))
=))
29 Apr 2012 - 8:02 pm | गवि
या पॉप टेट्सच्या वेटर्सचा दणादणा रिकाम्या ग्लासात बियर ओतण्याच्या सपाटा पाहून मला पुण्याच्या बादशाही बोर्डिंगमधल्या झपाट्याने आमटी आणि ताकाच्या वाट्या भरणार्या वाढप्यांची आठवण होते आहे.. जरा वाटीकडे दुर्लक्ष झालं की भरलीच परत. हे सर्वजण एक्स बादशाही बोर्डिंग एंप्लॉयी तर नाहीत?
29 Apr 2012 - 8:20 pm | प्रभाकर पेठकर
हेSSS देवाSSS! स्वर्गात नेऊन बसविलं तरी ह्यांना पुण्यातल्या आमटीच्या आणि ताकाच्या वाट्याच आठवणार.
29 Apr 2012 - 11:28 pm | गवि
ठ्ठो.. :-)
29 Apr 2012 - 8:16 pm | नावातकायआहे
लै भारी कल्पना....
वाचतोय / बघतोय..
29 Apr 2012 - 8:23 pm | जोशी 'ले'
सही धमाल चालुये...:-)
अब आप कइसा महसुस कर रहे हो
29 Apr 2012 - 8:41 pm | यकु
असेच म्हणतो
=)) =)) =))=)) =)) =))
=)) =)) =))
=))
29 Apr 2012 - 8:27 pm | सानिकास्वप्निल
लाईव्ह अपडेटची कल्पना भारी आवडली :)
सगळ्यांची मस्त धमाल सुरु आहे तर छान छान :)
29 Apr 2012 - 8:37 pm | गवि
भलाथोरला पेशावरी चिकन पिझ्झा हजर झालेला आहे आणि रामदासकाका आणि विजुभाऊ साईड बदलून अस्मादिकांजवळ येऊन बसले आहेत. सोबत आपापले कमंडलू तीर्थ वगैरे घेऊन गप्पांना तुफान रंग आला आहे..
जोडीला फॅब फाईव्ह, पॉप टेट्स स्पेशल पिझ्झा..
अधिकृत टेस्टर म्हणून मी दोन्ही आयटेम चाखले आहेत आणि दोन्ही खरोखर अफलातून आहेत..
या फोटोमागे प्रासदादासारख्या निर्व्यसनी माणसाची केवळ बदनामी एवढा एकच उद्देश आहे..
सर्वसाक्षी आणि क्लिंटन एका खास मोमेंटमधे..
29 Apr 2012 - 8:48 pm | यकु
पहिल्या फोटोमध्ये गवि अंमळ एखादी गझल म्हणताना तान घेत असतानाच्या पोजमध्ये आहेत,गझल कोणती होती ;)
ही: ही: ही:
गुरु प्रास यांना समव्यसनी अड्ड्यात सामील करुन घेण्यासाठी आग्रह जरा कमी पडतोय का गवि ;-) की त्यांनी 'प्रासप्रतिज्ञा' केलीय :p
30 Apr 2012 - 10:43 am | गवि
अहो यकु.. ती गझल म्हणतानच्या तानेची पोझ नाहीये.. पिझ्झ्याचा तुकडा तोंडात घालण्याची पोझ आहे.. नीट पहा.. चर्मचक्षूंनी नव्हे.... उघडा तुमचा अंतश्चक्षू.. ;)
30 Apr 2012 - 2:22 pm | यकु
हॅहॅहॅ
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))
अण्टचक्क्षुने बरोब्बर दिसले हो.. ;-)
29 Apr 2012 - 9:24 pm | अन्या दातार
अरेरेरे! क्लिंटन असा अंग चोरुन का बसला आहे? त्याला सांगा रे कुणीतरी की, तो घरी नाहीये ;)
सत्कारमूर्ती नंदनशेठ कुठे आहेत नेमके?? त्यांचे दर्शन घडवा ना
रच्याकने, मॉलमध्ये दिवे दिसत आहेत. पॉप टेट्समध्ये ग्रीन अवर्स चालू आहेत का? प्रकाशाची कमतरता दिसत आहे म्हणून विचारतोय.
30 Apr 2012 - 12:44 am | विश्वनाथ मेहेंदळे
http://misalpav.com/node/21529#comment-392782
यातील शेवटच्या फोटोत उजवीकडचा नंदन !!!
दिवे मंद लावले तर बिल कमी लावणार असे म्हणाले ते, म्हणून आम्ही आमच्या टेबलावरचे दिवे बंद केले. ;-)
29 Apr 2012 - 11:33 pm | छोटा डॉन
२ नंबरचा पिझ्झा बघुन मेलो तिच्यायला.
अशक्य टेम्प्टिंग फोटो !
- छोटा डॉन
30 Apr 2012 - 2:05 am | प्रभाकर पेठकर
सर्वसाक्षीजी भरलेल्या चषकाच्या वजनाने उजव्या बाजूस कलंडल्यासारखे वाटत आहेत.
30 Apr 2012 - 10:39 am | सर्वसाक्षी
.. आता कुणी 'डावीकडे' कल असल्याचा अरोप करणार नाही:))
30 Apr 2012 - 8:30 pm | प्रभाकर पेठकर
पण तुम्हाला 'उजवीकडे' कललेले राहण्यासाठी कायम हातात बिअरचा भरलेला ग्लास द्यावा लागेल नं!
29 Apr 2012 - 8:38 pm | रेवती
भारी कल्पना.
बेसुमार जळजळ.
नंदनची मज्जा आहे बुवा!;)
29 Apr 2012 - 8:42 pm | गवि
मिपा रिपोर्टर्स...
असाच एक खास क्षण..
रामदासकाका आणि विजुभाऊंनी मैफिलीत खरोखर रंगत भरली आहे.
प्रभूमास्तर येऊ घातले आहेत...
लॅपटॉपची विजेरी संपल्याने आता बाकी वृत्तांन्त यथावकाश...
29 Apr 2012 - 8:46 pm | पिंगू
लगे रहो. कट्ट्याला यायची इच्छा असून पण येता आले नाही... :(
त्याची कसर पुणे कट्ट्यावर भरुन काढली जाईल... ;)
- पिंगू
29 Apr 2012 - 9:17 pm | गणपा
@#*&^@#*&^
29 Apr 2012 - 10:12 pm | सोत्रि
@#*&^@#*&^@#*&^@#*&^@#*&^@#*&^
हे वरचे सगळे माझे मलाच. सगळ्या दिग्गजांना भेटण्याचा चान्स हुकल्याची हळहळ होते आहे जळजळ न होता :(
असो, और भी है मंजिल-ए-जिन्दगी...
गवि, धन्यवाद!
- (हळहळ होत असलेला) सोकाजी
29 Apr 2012 - 9:31 pm | गवि
किसनदेव आणि प्रभूमास्तर यांची काहीशी उशिरा एंट्री झाली असली तरी मैफ़िल नव्याने चालू झाली आहे.. प्रभूंनी गप्पांना नवीन खाद्य दिलंय आणि जणू पुन्हा पहिल्यापासून गप्पाष्टक रंगायला लागलंय. हा माहोल बघून रात्रभरही चालत राहू शकेल ही सुंदर बैठक असं वाटतंय..
एक विलक्षण योग आहे हा. मिपाव्यसन सार्थकी लागण्याच्या क्षणांपैकी एक..
29 Apr 2012 - 9:41 pm | छोटा डॉन
जळजळ , जळजळ. त्रास आहे च्यामारी नुस्ता.
हा धागा आता अजिबात उघडायला नको !
- छोटा डॉन
29 Apr 2012 - 9:48 pm | जेनी...
आर्अॅअरेअरेअॅअरेअरर्अॅअरेअ
अरे चालु ठेवा रात्रभर मी त्र आत्ताच बघतेय :(
सगळ्याना माझ्यातर्फे हेल्लो:))
चालु ठेवा मी आहेच ंमध्ये मध्ये गप्पा मारिन :)
29 Apr 2012 - 9:55 pm | चिगो
भारी कट्टा आणि त्याहून भारी थेट प्रक्षेपण.. मजा करा, राव. आमची जळतेय.
29 Apr 2012 - 10:04 pm | जेनी...
अरे गविना बघायचय मला ह्या सगळ्यातले गवि कोन्ते ?
29 Apr 2012 - 10:14 pm | टिवटिव
...गविंचा पंखा...
29 Apr 2012 - 10:15 pm | गणपा
जो सगळ्यात वाळलेला प्राणी दिसतोय ना तोच गवि.
29 Apr 2012 - 10:23 pm | शिल्पा ब
अशाने ते स्पा लाच गवि समजायचे. :p
29 Apr 2012 - 10:26 pm | जेनी...
इथे बरेच वाळलेले जिव दिसताय्त ,त्यात्ले किति प्रमानात वाळलेलेलेले? गवि ??
ताजा ताजा फटो टाका कि.....
29 Apr 2012 - 10:29 pm | सोत्रि
मिपा रिपोर्टर्स ह्या फोटोतले हिरव्या शर्टातले आहेत गवि.
- (गविपंखा) सोकाजी
29 Apr 2012 - 10:31 pm | लॉरी टांगटूंगकर
!!!!!!! गविनि चुकून सिरीअसली घेतले तर?
अजिबात न वाळलेला हिरवा शर्ट मंजे गवि!!!! कळले का?
29 Apr 2012 - 10:39 pm | जेनी...
न वाळलेला हिरवा शर्ट घालुन बसलेले गवि का??:(
29 Apr 2012 - 11:06 pm | लॉरी टांगटूंगकर
१जाक्तली !!!!!!!!
29 Apr 2012 - 10:35 pm | जेनी...
नाय राव नाय कळत
लायनिन्गवाला शर्ट आहे कि प्लेन ???
अजुन काहि खुना सांगाना :(
29 Apr 2012 - 11:43 pm | कुंदन
स्पा , मेल्या गवि कडुन शिक काहितरी. साला ठाकुर्लीचे नाव बदनाम केलेस तु.
विजुभौ चा विग परत पडला वाट्ट , लोकलच्या गर्दीत.
30 Apr 2012 - 1:01 am | सुहास झेले
जबरदस्त कट्टा झाला.... खूप मज्जा आली. सगळ्यांना भेटून खूप छान वाटले....
आता पुढचा कट्टा कधी? :) :)
30 Apr 2012 - 6:43 am | सहज
लाईव्ह वृत्तांत!!! कट्टाकथनाची नवी सुरवात!!
30 Apr 2012 - 7:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कट्याला सुरु होऊन बारा तास झाले आहेत. समारोप झाला की अजून कार्यक्रम चालू आहे. ?
मंडळी तिथेच कलंडली की काय ? ;)
-दिलीप बिरुटे
30 Apr 2012 - 7:47 am | गवि
पॉप टेट्समधून बाहेर पडल्याला बरेच तास झाले पण सर्वांच्या मनात,निदान माझ्यातरी,कार्यक्रम अजून चालूच आहे. अन्य उपस्थित कट्टेक-यांकडून उर्वरित वृत्त आणि छायाचित्रांच्या प्रतीक्षेत..
30 Apr 2012 - 7:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पॉप टेट्समधून बाहेर पडल्याला बरेच तास झाले पण सर्वांच्या मनात,निदान माझ्यातरी,कार्यक्रम अजून चालूच आहे.
स्सही.........!!!
-दिलीप बिरुटे
30 Apr 2012 - 7:47 am | मदनबाण
अरेरे चांगला कट्टा मिस झाला ! :(
30 Apr 2012 - 8:30 am | ५० फक्त
लई भारी रे मित्रांनो, मज्जा आली रिपोर्ट वाचुनच.
30 Apr 2012 - 8:31 am | लीलाधर
कट्टा खुपच छान झाला मजा आली...
30 Apr 2012 - 9:05 am | अमृत
आयडीया.....सर्व कट्टाकर्यांनी भर्पूर एंजॉय केलेलं दिसतय...
स्वगत : मिपावर Live Streaming ची सोय असती तर......................
अमृत
30 Apr 2012 - 9:15 am | चौकटराजा
अ आ नी आमचा कट्टा काव्यातून मिपावर आणला .आपण तो लाईव्ह फोटो ट्रान्स्मिशन मधून आणला. वेगळेपण शोधणे हे कलावंताचे ब्रिद आपण उत्तम रित्या पार पाडले आहे. मी खवय्या नसल्याने पिझा पाहून जळलो वैगैरे काही नाही. वेळ, पैसा शक्ती व कल्पकता खर्च करण्याला
सलाम ! सलाम! सलाम!
बादवे, हिरव्या शर्टातील बाळ्सेदार गवि आहेत काय ? असले तर ते एम आर आय च्या मशीनमधे कसे जावू शकले ? ही आपली एक पुणेरी शंका !
पेठकर काकांचा दुबई कट्टा लाईव्ह चलचित्र असेल अशी आशा आहे !
आपला चौ रा
30 Apr 2012 - 10:31 am | गवि
कसेबसेच जाऊ शकले म्हणून तर एवढे टरकले ना... ;)
30 Apr 2012 - 9:23 am | अत्रुप्त आत्मा
चांगलाच दंगा घातलेला दिसतोय... ;-)
30 Apr 2012 - 9:32 am | ऋषिकेश
वा! एकूणच लै धमाल केलेली दिसतेय!
30 Apr 2012 - 9:35 am | मृत्युन्जय
सगळे बिग बॉसेस आले होते असे दिसतय. उत्तम. कट्टा जोरदार झाला असणार यात शंकाच नाही.
30 Apr 2012 - 10:05 am | पियुशा
अरे बाप रे !!!!!!!
हे लाइव्ह कट्टा दाखवुन जळ्वन्याची आइडीया कुणाच्या सुपिक डो़क्यातुन आली म्हणायची ? ;)
असो... कट्टा एकदम "तब्बेतीत " झालेला दिसतोय :)
30 Apr 2012 - 10:11 am | जेनी...
सगळ्यात अफलातुन होती ती लाइव्ह शो चि कल्पना .त्याहुनहि दिसुन आलि ती एकमेकाना भेटन्याची ओढ आणि सर्वात अप्रतिम वाटले ते एकमेकान्च्या सोबतित असताना सगळ्यान्चे खुललेले चेहेरे .
आपलि नसतानाहि फक्त आपलिच वाटनारि माणसं ,केवळ लिखानातुन आपूलकि जानव्ते आणि त्यातुन भेटन्याची ओढ निर्मान होते ,मग भेटुन चार क्षण आनंद आणि भेटन्यासाठी आतुरलेलि नजर ह्यांच दर्शनहि आपोआप व्हायला लागतं.
मी ओळखत नाहि चेहेर्याने बर्याच जनाना .पण आज एकेकाचे फोटो बघुन वाटत होतं .यानी हे लिहिलय ..त्याण्ची ते वालि पोस्ट मी वाचलिय .मग ओळखिचेच कि ..अनोळखि कसे?
विजुभाऊंशी मी एकदाच फोन वर बोललिय ..खुपस सहज साध सिम्पल व्यक्तिमत्व वाटल आवाजावरुन .आज त्याना पाहिल . विजुभाऊ छान वाटल होत तुमच्याशि बोलुन आणि आज तितकच छान वाटल तुमचि हसरि मुद्रा पाहुन .
असेच नेहेमि हसत रहा .:)
चतुर चानक्य ह्याच्याशि सुद्धा हल्लीचिच मैत्रि .मस्त सदाबहार आहे .:)
विमे ( विशु ) मस्त बोलघेवडा . ;)
प्रास ,ऑर्कुटवरची ओळख ,अतिशय शांत आणि सिरिअस माणुस .:D
गवि ...इनके तो क्या केहेने ....मला ह्यांच लेखन आवडतं .पोटतिडकिने विषय मांडन्याची जी कला आहे ,तिच भावते .
बाकि सगळयाना नमस्कार __/\__,
पण भारतात आल्यानंतर मिपाचा एकतरि कट्टा अट्टेंड करण्याची इच्छा आहे .
अनोखं स्नेहसम्मेलन अगदि आपणहि तिथे असायला हवे होतो अस वाटुन जान्याइतक अफ्लातुन .
:)
30 Apr 2012 - 10:30 am | चिंतामणी
इच्चा चांगली आहे. पण तुमच्या आगमनाची वर्दी मिळाली आणि प्रत्यक्ष दर्शन झाले तरच शक्य आहे.
30 Apr 2012 - 10:33 am | जेनी...
शक्यता चांगली आहे काका ...पण अश्या कमेंट पडल्या कि मग इच्छा मरुन गेलि तर त्याला जवाबदार कोन??\(
30 Apr 2012 - 11:44 am | चिंतामणी
अपेक्षीत प्रतिसाद.
येणे अपेक्षीत आहेच. पण.... ..........
असो.
मराठीत फार छान छान म्हणी आहेत. जरा आठवुन बघ.
30 Apr 2012 - 10:36 am | गवि
लॅपटॉपची बॅटरी संपणे या विघ्नामुळे अधिकाधिक काळ अपडेट्स देत राहता आले नाहीत..
वास्तविक "लाईव्ह"चा मुख्य उद्देश की कट्ट्याला हजर न राहू शकलेल्या पण जगभरातून लॉगिन झालेल्या मित्रांना थेट कट्टेकर्यांशी दुतर्फी संवाद करता यावा.
पण हा उद्देश नीटसा साध्य झाला नाही.
धाग्यावर आलेल्या सर्व प्रतिक्रियांचं कट्ट्यावर उच्चारवाने जाहीर वाचन होत होतं आणि निम्म्या ठाण्याला ते कळले असतील अशी खात्री आहे.. पण कट्टेकर्यांची प्रत्युत्तरं मात्र उलटटपाली टंकायला झालं नाही..
असो.. आता इतर हजर कट्टेकर्यांवर हा वृत्तांत अधिक चांगला आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आहे.. अरे लोक्स.. ते बाकीचे फोटो कुठायत??
अजून एक फोटो..
पराषेटनी रात्री कामातून सवड मिळताच आवर्जून दूरध्वनीद्वारे कट्ट्याला शुभेच्छा दिल्या आणि खास वृत्तांत घेतला.. त्यामुळे कट्ट्याला अजून एक वेगळेपण प्राप्त झाले..
30 Apr 2012 - 12:06 pm | संजय क्षीरसागर
गंडवागंडवी सुरू झाली आहे
30 Apr 2012 - 12:16 pm | गवि
अहो संक्षी.. त्याचवेळी काढलेला फोटो आहे तो.. आणि तोच अपलोडवायचा होता, पण टेबलवर बसून वेगवेगळी कार्डे कॅमेर्यातून काँप्युटरात आणि मिळतील ते फोटो काँप्युटरातून पिकासावर टाकण्यात आणि नंतर लिंक करण्यात वगैरे त्यातील अनंत अडचणींमधे जे फोटो आधी अपलोड होऊ शकले ते पब्लिश केले. नंतर अधिक चांगला मिळाला म्हणून इथे दिला.
तरीही त्या फोटोंमधे किमान सहा फरक सांगता येतील.
१. तीन सुहृदांचे गळ्यात मैत्रीपूर्ण हात
२. सर्वसाक्षींचे हास्य
..
..
इ.इ.
इच्छुकांनी शोधावेत.. ;)
30 Apr 2012 - 3:14 pm | विजुभाऊ
तरीही त्या फोटोंमधे किमान सहा फरक सांगता येतील.
माताय असल्या प्रत्येक चित्रात नेहमी सहाच फरक कसे असतात हो?
30 Apr 2012 - 10:50 am | सुहास..
लई भारी गवि !!
गवि , लाईव्ह कल्पना आवडल्या गेली आहे ;)
30 Apr 2012 - 11:10 am | इरसाल
खास तुमच्यासाठी टोप्या उडवल्या गेल्या आहेत.
धन्य आहात.
बाकी कट्टा एकदम खंगरी/जबरी झालेला दिसतोय.
30 Apr 2012 - 11:12 am | टुकुल
अतिशय मस्त आयडिया कट्टा वृतांत द्यायची.
आमच्या ठाण्याची तर नेहमी आठवण येत असते पण आज जरा जास्तच आली. ठाण्यात असतो तर नक्की हजेरी लावली असती.
बाकी क्लिंटनला पहिल्यांदाच पाहीले : )
--टुकुल
30 Apr 2012 - 11:53 am | मी कस्तुरी
धन्यवाद मिपाकर....कालचा कट्टा अगदी भारी जमला होता....
गवी महाराज, क्षमा असावी....ग्रुप फोटो उशिरा डकवत आहे.
30 Apr 2012 - 12:00 pm | गवि
फोटो दिसत नाही.. बहुधा अपलोड झाला नसावा.. फोटोचा पाथ लोकल काँप्युटरसारखा वाटतोय..
पिकासा-गूगल किंवा फ्लिकरमधे अपलोडवून इथे लिंकवता येईल.
30 Apr 2012 - 12:09 pm | मी कस्तुरी
ह्म्म्म....परत एडीट करते.
30 Apr 2012 - 12:11 pm | गवि
वा वा.. धन्यवाद...
बर्याच मोठ्या संख्येने मिपाकर आल्याने काहीजणांना वरती माळ्यावर चढून फोटोसाठी उभं राहावं लागलं.. ;)
अर्थात हा फोटो शेवटी काढलेला असल्याने बरेच गळती ऑलरेडी झालेली होती.. पण मोठा फोटू आला असता तर अधिक नीट पाहता आला असता..