ज्यु. अर्धवटराव

अर्धवटराव's picture
अर्धवटराव in जनातलं, मनातलं
26 Apr 2012 - 3:01 am

गणपा भाऊंच्या लेकीचे "तारे जमीं पर" वाचताना आमच्या चिरंजीवांचा, अर्थात ज्यु. अर्धवटरावांचा एक किस्सा आठवला. किस्सा तसा साधाच, पण मला एका क्षणात अपरंपार सुख देणारा.
मागच्याच आठवड्यातील गोष्ट. मी १०% वेळ ऑफीसचं काम आणि ९०% वेळ मिपावर पौराणीक विमाने, धर्म, वगैरे बौद्धीके पचवून थोडा वैतागलेल्या अवस्थेत संध्याकाळी घरी परतलो. ज्यु. अर्धवटराव खेळण्यात दंग होते. त्यांची मला वेलकम करायची एक खास स्टाईल आहे. त्यानुसार आमचे आगत-स्वागत झाले आणि मी स्थानापन्न झालो. डोक्यात या निष्ठूर-पापी-व्यवहारी वगैरे वगैरे दुनीयादारीचे तसलेच काहि व्यवहारी विचार घोळत होते. तेव्हढ्यात चिरंजीव त्यांचे प्राणीसंग्रहलय घेऊन आले आणि माझ्या मांडीवर डेरा जमवला.
आता त्यांच्याशी खेळताना त्या प्राण्यांवरच एखादं कथानक उभं करावं म्हणुन मी त्या "झू" मध्ये हात घातला आणि एक वाघोबा व हरीण उचलले. उजव्या हातात हरीण आणि डाव्या हाती शेरखान असा पाठशिवणीचा खेळ सुरु होता आणि माझे कथानक वाघोबाचे उदरभरण करायला हरणावर झेप घालणार एव्ह्यढ्यात ज्यु. अर्धवटरावांनी माझ्या हातावरच झडप घातली, वाघोबा आणि हरीण ताब्यात घेतले, पाठमोर्‍या हरणाला "टर्न अराऊंड" करुन वाघोबाशी "फेस टू फेस" केले आणि पप्पी-पप्पी-पप्पी म्हणुन त्यांचे झकास चुंबन दृष्य सुरु केले.
त्या इवल्या इवल्या हातांनी भुकेल्या वाघाला आणि जीव वाचवत पळणार्‍या हरणाला एका क्षणात गाढ प्रेमालींगनात गुंफले . त्या एका क्षणात माझ्या मनातला व्यवहारी कोरडेपणा कुठच्याकुठे पळाला आणि प्रेम-आनंद-हळवेपणा-वात्सल्य-मैत्रीभाव... अशीच काहिशी मीश्र, आत्यंतीक तीव्र भावना मनात चमकून गेली. चिरंजीवांना थोपटत मनात विचार आला... लेका, शेवटी तुही पक्का अर्धवटरावच... एरवी कोण शहाणा वाघ आणि हरणाला गळ्यात गळे घालायचे स्वप्न बघेल...

बालकथाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

26 Apr 2012 - 3:08 am | पाषाणभेद

तुम्ही तसा विचार केला यातच सुजाण पालकत्व दिसून येते.

क्लास!!!
तुमच्या आनंदाचा तुकडा एवढ्या अलगद आमच्याकडे दिल्याबद्दल धन्यवाद !
:)

बहुगुणी's picture

26 Apr 2012 - 4:14 am | बहुगुणी

कोरड्या, व्यवहार-कठोर जगातून चिरंजीवांनी तुम्हाला इतक्या सहजपणे प्रेमळ जगात आणून सोडलं, आणि तुम्ही आलात, हे फार छान!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2012 - 7:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लास!!!तुमच्या आनंदाचा तुकडा एवढ्या अलगद आमच्याकडे दिल्याबद्दल धन्यवाद !

असेच म्हणतो....!!!

-दिलीप बिरुटे

मूकवाचक's picture

26 Apr 2012 - 8:42 am | मूकवाचक

+३

प्यारे१'s picture

26 Apr 2012 - 9:40 am | प्यारे१

'बामनाचं पप्या' (यक्याला आक्षेप नाही हे ठाऊक आहे :) ) हायच हुश्शार... आमाला जे म्हनायचं हुतं त्ये आदीच बोलून म्वोकळं!

अमोल केळकर's picture

26 Apr 2012 - 3:40 pm | अमोल केळकर

असेच म्हणतो :)

अमोल केळकर

पुष्कर जोशी's picture

27 Nov 2012 - 5:46 pm | पुष्कर जोशी

जिवंत करा

स्पंदना's picture

26 Apr 2012 - 5:56 am | स्पंदना

टचींग!

जरा तुमच स्पेशल स्वागत कस असत ते पण सांगा ना? माझा लेक धावत धावत जाउन एकदम पाय जोर जोराने आपटत, फक्त लेगडान्स करायचा पप्पा आल्यावर. अर्थात हातातली नोटबुकची बॅग सांभाळत पप्पा पण तेव्हढ्याच जोरजोरात नाचायचे. मजा यायय्ची ते पहायला.

अर्धवटराव's picture

27 Apr 2012 - 5:25 am | अर्धवटराव

>>माझा लेक धावत धावत जाउन एकदम पाय जोर जोराने आपटत, फक्त लेगडान्स करायचा पप्पा आल्यावर. अर्थात हातातली नोटबुकची बॅग सांभाळत पप्पा पण तेव्हढ्याच जोरजोरात नाचायचे. मजा यायय्ची ते पहायला.
-- हा बापलेकाचा डान्स काय धमाल उडवत असेल, आय कॅन इमॅजीन :). ज्यु. अर्धवटराव मला बघताच एक झकास स्माईल देतो, दोन्ही हात विमानाच्या पंख्यासारखे पसरवतो, आणि कंबरेत वाकुन घरभर धावत एक चक्कर मारतो. मग मला झप्पी :)

अर्धवटराव

रेवती's picture

26 Apr 2012 - 6:23 am | रेवती

पलभरमें थकव्यावरचे औषध मिळाले. भारी.

स्पा's picture

26 Apr 2012 - 8:58 am | स्पा

मस्त

क्या बात है!

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2012 - 10:18 am | प्रभाकर पेठकर

काSSSSश ये दुनिया इतनी सीधी होती ।

कधी कधी लहान मुले अगदी आगळे वेगळे तत्वज्ञान सुचवून जातात. आपल्याही वाटतं, खरंच अस असायला काय हरकत आहे?
मस्तं प्रसंग चितारला आहे.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 10:21 am | मृत्युन्जय

एरवी कोण शहाणा वाघ आणि हरणाला गळ्यात गळे घालायचे स्वप्न बघेल...

हे खासच. किती जणांना या वाक्याचा अर्थ कळाला आहे देव जाणे :)

सहज's picture

26 Apr 2012 - 10:47 am | सहज

एक जुनी चित्रफीत आठवली.

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2012 - 11:45 am | प्रभाकर पेठकर

'अनाकलनीय वागणे' इतर प्राण्यांच्या माद्यांमध्येही दिसून येते हे पाहून हायसे वाटले.

गणपा's picture

26 Apr 2012 - 1:00 pm | गणपा

फार दुर्मीळ असतात असे किस्से.

अजुन एक.

नितिन थत्ते's picture

26 Apr 2012 - 11:50 am | नितिन थत्ते

किस्सा आवडला.

पॅ. नितिन थत्ते

सानिकास्वप्निल's picture

26 Apr 2012 - 12:17 pm | सानिकास्वप्निल

छान :)

jaypal's picture

26 Apr 2012 - 12:38 pm | jaypal

"लेका, शेवटी तुही पक्का अर्धवटरावच."

ardhavat

वाचताना माझ्याही मनात संमीश्र भावनांच+आठवांच काहुर माजवलत आणि पार मागे नेलत. धन्यवाद :-)

गणपा's picture

26 Apr 2012 - 12:50 pm | गणपा

मस्त किस्सा रे ज्युनियरचा.

अर्धवट म्हणवत नाही, तुलाही आणि तुझ्या लेकालाही. :)

स्मिता.'s picture

26 Apr 2012 - 1:01 pm | स्मिता.

ज्यु. अर्धवटरावांचा किस्सा आवडला.

तुमच्या आनंदाचा तुकडा एवढ्या अलगद आमच्याकडे दिल्याबद्दल धन्यवाद

+१

चिगो's picture

26 Apr 2012 - 1:32 pm | चिगो

वर पेठकर काकांनी म्हटल्याप्रमाणे "काSSSSश ये दुनिया इतनी सीधी होती ।". किस्सा आवडला. जियो बेटा..

(टेढ्यामेढ्या दुनियेतला) चिगो.

इरसाल's picture

26 Apr 2012 - 4:16 pm | इरसाल

+१

पैसा's picture

26 Apr 2012 - 9:17 pm | पैसा

अगदी मनाच्या तळापर्यंत पोचला.

ऋषिकेश's picture

27 Apr 2012 - 9:10 am | ऋषिकेश

:)