मी निघालो हो कळफलक घेऊन
हो रस्त्यावर हो मार्गावर
ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली..
देवालाच माहिती नक्की कोणती कविता होती
जे न देखे मध्ये भावानुवाद करून घेतला
एक संस्थळ आले मी काथ्या पण कुटून घेतला..
त्या संस्थळावर मला ती भेटली
तिला पाहून माझी सटकली
तिच्या कवितेत लैला दिसली
मी मजनू बनून आलो
रसग्रहण करून आलो
सगळ्या निंदा आणि नालस्त्या
मी फाट्यावरती मारून आलो
ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली..
मग एकदा संपादक आला
धाग्यावरती काठ मारून गेला
काय माहिती कोण होता
मला मात्र कंपूबाज वाटला
मी अन्यायाला वाचा फोडली
अजून एक जिलबी पाडली
जिलबीने पुन्हा युद्ध पेटली
ओ काही संस्थळ आली.. मी खाज भागवून घेतली..
लाजले मग सदस्यही
स्वतःच्या थोबाडीत मारून त्यांनी घेतली
मी देखील टाळी वाजवली
संपादकही मागे हटले
मला भुक्कड ते समजले
मी लेखनकंडू चालूच ठेवले..
एकदम वादळ आले.. माझे खातेच उडाले
नवीन आयडी काढली.. मी पुन्हा जिलबी पाडून घेतली..
डायरीयाच्या आठवणी विसरता विसरत नाहीत.
त्या रोगाचीच एक झलक रुग्णाने दाखवली आहे. रुग्ण ? पाहा ओळखता आला तर!
हे प्रिस्क्रिप्शन मात्र माझेच आहे.
प्रतिक्रिया
18 Apr 2012 - 11:58 am | स्पा
=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
हसून हसून
सदेह वैकुंठास गमन केल्या गेले आहे
18 Apr 2012 - 12:16 pm | पिवळा डांबिस
सदेह वैकुंठास गमन केल्या गेले आहे
पण गमन करण्यासाठी 'एअर पौराणिक'च वापरल्या गेली आहे ना? मग काही हरकत नाही!!!!
नायतर मिपाकर उगीचच रागवायचे!!!
:)
बाकी परा, जिलबी कडक पडली आहे....
इतकी की जिलबी पाडतांना तू मस्त गांजाभरी चिलीम लावली असावीस असं चित्र डोळ्यापुढे उभं राहातं आहे!!!
:)
18 Apr 2012 - 12:33 pm | गणपा
पराची जिलबी आणि त्यावर यल्लो नॉटीचा पाक दोन्ही उत्तम.
आज मिपावर आल्याचे सार्थक झाले. ;)
18 Apr 2012 - 7:27 pm | प्रचेतस
+१
लै भारी.
18 Apr 2012 - 12:08 pm | कवितानागेश
विखरी, जळजळीत सत्य मांडणारी भयवाह वेदनादायी वीररसपूर्ण श्रुंगारीक कविता!
:D
लाजले मग सदस्यही
स्वतःच्या थोबाडीत मारून त्यांनी घेतली
अत्यंत विदारक अनुभवांची आठवण झाली.... ;)
18 Apr 2012 - 5:03 pm | चौकटराजा
विदारक अनुभव कोणता? दोन दे दोन घे इतपत ठीक आहे . पण विदारक अनुभव का यावा या आनंद दायी स्थळावर ? जरा मला व्यनि करून तरी सांगा ना !
19 Apr 2012 - 8:38 am | प्रीत-मोहर
माउ माउ अग काय एकेक प्रतिक्रिया... जान लोगि क्या?
बाकी परा ही गझल थोड्वी मीटरात बसली नाहीये. थोडा प्रयत्न करुन सुधारवु नक्कीच शकशील. ;)
18 Apr 2012 - 12:11 pm | इरसाल
कोण तो कोण तो ? व्यनि केलात तरी चालेल मला.
अवांतर : आताशा मला कमीत कमी ६/७ आयडींवर साँशय आहे .............. संशय संशय
18 Apr 2012 - 12:45 pm | बिपिन कार्यकर्ते
=))))))))))))))))))))))
18 Apr 2012 - 12:48 pm | ५० फक्त
निघालो घेउन कळीची फाळकी, टाकण्या संस्थळी नविन जिलेबी
निघालो घेउन कळीची फाळकी.....
18 Apr 2012 - 12:51 pm | नंदन
गझलेचा अनुवाद सुरेख वठला आहे!
श्री. परा यांनी 'इस्कूल के टैम पे, आना गोरी डैम पे' [पाठशाळेच्या समयासी, ये ग गौरवर्णीये धरणासी] ह्या भावविभोर गीताचाही मराठीत अनुवाद करावा, अशी त्यांना विनंती करतो.
18 Apr 2012 - 6:47 pm | रमताराम
[पाठशाळेच्या समयासी, ये ग गौरवर्णीये धरणासी] मेलोऽऽ.
हा प्रकार मूळ गीताला उगाचच सभ्य पातळीवर आणण्याचा, सबब दवणीय आहे. सबब श्री. नंदन दवणे, हा प्रकार तुम्हालाच अधिक चांगला जमेल. घ्या मनावर.
18 Apr 2012 - 12:52 pm | मूकवाचक
_/\_
18 Apr 2012 - 12:58 pm | सुहास झेले
हसून हसून सदेह वैकुंठास गमन केल्या गेले आहे +१
18 Apr 2012 - 1:01 pm | यकु
____/\___ !!!!!
18 Apr 2012 - 1:03 pm | नगरीनिरंजन
माझ्या मापाचा एकही नव्हता.
-चौपटबाजा
बाकी. अनुवाद प्रतिभेला _/\_.
18 Apr 2012 - 1:13 pm | स्मिता.
आपली प्रेरणा 'गदर' सिनेमातल्या 'मै निकला गड्डी लेके...' हे गीत आहे ना. बरोब्बर ओळखले की नाही.
बाय द वे, मागे तुम्हाला भावनुवादाकरता काही गाणी सुचवली होती, त्याची वाट बघत आहे. काये ना, मला काव्याचा आस्वाद मातृभाषेत घ्यायला जास्त आवडते.
18 Apr 2012 - 5:57 pm | श्रावण मोडक
कोणती गं, कोणती गाणी ती? मला सांग ना... :)
19 Apr 2012 - 2:14 pm | बॅटमॅन
एक्जॅक्टली हेच म्हणणार होतो!!! जबरी जिलबी!!!!!!!!!!!!!
18 Apr 2012 - 1:20 pm | अत्रुप्त आत्मा
18 Apr 2012 - 1:22 pm | मृत्युन्जय
मेल्या नक्की कोणाबद्दल लिहिलेस ते तरी सांग. सध्या मला किमान १० आयडींबद्दल संशय आहे. साले हे डु आयडी आमचेच का मिळत नाहित फक्त.
बाकी कविता वाचुन मी खुर्चीवरुन खाली पडलो आहे.
18 Apr 2012 - 1:28 pm | पियुशा
वाट लागली वाट
18 Apr 2012 - 1:35 pm | पैसा
वाचनखूण साठवणार आहे. फक्त तो कोण ते सांग!
18 Apr 2012 - 2:33 pm | सूड
मा. परा हे काही नीट जमलेले नाही. मला यमक, अलंकार वृत्ताचे उत्तम ज्ञान आहे. तुम्ही माझ्याकडे शिकायला येऊ शकता. हे मी परा माझ्या घरापासून एक तासाच्या अंतरावर राहतो म्हणून सांगतो आहे. मलाही तितकंसं येत नव्हतं, एका भिकार कवीकडे मी दोन वर्ष त्यासाठी शिकत होतो. शेवटी कवीच्या खालच्या फ्लोअरला राहणार्यांनी कवीची मांडी पोखरली, पण मांडी पोखरली तरी शिकवायचा हेका त्याने सोडला नाही.
(हेकटराजा)
18 Apr 2012 - 2:37 pm | परिकथेतील राजकुमार
मला यमक, अलंकार वृत्ताचे किती उत्तम ज्ञान आहे ते माझ्या क्षेत्रातील लोक जाणतातच. लवकरच माझ्या 'मी बप्पीदा आणि हिमेश ' ह्या लेखातून मी ते सविस्तर लिहिनच.
18 Apr 2012 - 3:14 pm | मृत्युन्जय
या कवितेत यमक अलंकाराच्या चुका नसतील तुझ्या मते तर तुझ्या पद्याच्या सेन्स ला व ज्ञानाला माझाच त्रिवार दंडवत !
न ही ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते
विद्या विनयेन शोभते
मरा
18 Apr 2012 - 5:06 pm | इरसाल
तुमचे अलंकार तुप देतात आता तर झाले. ह्याप्पी ?
18 Apr 2012 - 6:11 pm | सूड
ही भाषा नाईलाज म्हणून , मनात चरफडत सत्य मानावं लागणारे वापरतात. अर्थात अज्ञांस सांगणे न लगे.
नौरा(नौटाकराजा)
18 Apr 2012 - 6:31 pm | चौकटराजा
नौटाकराजा हे आपले टोपण नाव आपल्याला साजेसेच आहे. त्यामानाने हेकटप्रजा हे मी घेतलेले नाव फारसे साजेसे वाटत नाही कारण प्रजा
अनेकानी बनते राजा एकच असतो.
18 Apr 2012 - 6:36 pm | चौकटराजा
या लेखाची वाट पहात आहे.धाग्याची मी वाट लावणार नाही की त्याला वात लावणार नाही .पण लेखातच सूचना कृपया करू नये अशी पुणेरी पाटी
लावल्यास आभारी होईन. हेलदी धाग्याची मलाही आवड आहे .
18 Apr 2012 - 2:39 pm | स्पा
वा सुडोबा
चांगलीच विनम्रता दाखवलीत
मी एक काय सूचना केलीत.. तुम्ही कंपू घेऊन अंगावरच आलात..
हो आता वयोमानानुसार कुरापतींना मीच सुरुवात केलेली हे विसरलो.. तो भाग अलाहिदा
पण आता तुमच्या पिढीने तरी "साठी बुद्धी नाठी" हि म्हण समजून घ्यायला हवी न..
-- ब्यांड बाजा
18 Apr 2012 - 5:10 pm | चौकटराजा
परा,
अभिप्राय म्ह्टला की तो दोन्ही प्रकारे येणार पण एखाद्या सूचनेचा बाउ करून धागा हायवेकडून उकिरड्यात नेण्याची संवय आम्हास आहे. ज्यास
धागा लिहिलेला असतो त्याचे म्हणणे असे असू शकते ना की
सूचना मान्य आहे/नाही.
बस मिटला प्रश्न .पण आमची ही प्रजा भलतीच समजूतदार नाही बरं .हा राजकुमाराकरवी राजाला इशारा आहे
आपली
हेकटप्रजा
18 Apr 2012 - 2:39 pm | सहज
फेसबुक व फोरमच्यासाठी बनवलेला कळफलक नुकताच पहाण्यात आला होता. चालू द्या.
19 Apr 2012 - 8:26 pm | नितिन थत्ते
लै भारी..
त्यातही पाऊस पडतो आहे का हे खिडकीतून बाहेर न पाहता काम्पुटरलाच विचारण्याची कल्पना तर हुच्च.
18 Apr 2012 - 2:55 pm | चिंतामणी
ड्वॉले पाणावले.
18 Apr 2012 - 3:32 pm | मेघवेडा
दणकट! नंदनचा प्रतिसाद वाचून आणखी हहपुझा. खरच मनावर घ्या त्या गाण्याचं मालक.
18 Apr 2012 - 3:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बाजार उठविण्यात आला आहे :D :D :D
18 Apr 2012 - 6:43 pm | प्रीत-मोहर
परा महान आहेस तु
__/\__
18 Apr 2012 - 7:24 pm | प्यारे१
____/\____
धन्य हो पौरा आपलं परा जी!
18 Apr 2012 - 9:52 pm | अत्रुप्त आत्मा
@धन्य हो पौरा आपलं परा जी! >>>
धन्य हो पा-जी ,आपलं ते हे-प्यारे-जी ;-)
18 Apr 2012 - 7:37 pm | जेनी...
परा ' गुलजार नार ही ' लवकर पूर्ण कर रे .....:(