✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी निघालो हो कळफलक घेऊन..

प — परिकथेतील राजकुमार, Wed, 04/18/2012 - 11:55
मी निघालो हो कळफलक घेऊन हो रस्त्यावर हो मार्गावर ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली.. देवालाच माहिती नक्की कोणती कविता होती जे न देखे मध्ये भावानुवाद करून घेतला एक संस्थळ आले मी काथ्या पण कुटून घेतला.. त्या संस्थळावर मला ती भेटली तिला पाहून माझी सटकली तिच्या कवितेत लैला दिसली मी मजनू बनून आलो रसग्रहण करून आलो सगळ्या निंदा आणि नालस्त्या मी फाट्यावरती मारून आलो ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली.. मग एकदा संपादक आला धाग्यावरती काठ मारून गेला काय माहिती कोण होता मला मात्र कंपूबाज वाटला मी अन्यायाला वाचा फोडली अजून एक जिलबी पाडली जिलबीने पुन्हा युद्ध पेटली ओ काही संस्थळ आली.. मी खाज भागवून घेतली.. लाजले मग सदस्यही स्वतःच्या थोबाडीत मारून त्यांनी घेतली मी देखील टाळी वाजवली संपादकही मागे हटले मला भुक्कड ते समजले मी लेखनकंडू चालूच ठेवले.. एकदम वादळ आले.. माझे खातेच उडाले नवीन आयडी काढली.. मी पुन्हा जिलबी पाडून घेतली.. डायरीयाच्या आठवणी विसरता विसरत नाहीत. त्या रोगाचीच एक झलक रुग्णाने दाखवली आहे. रुग्ण ? पाहा ओळखता आला तर! हे प्रिस्क्रिप्शन मात्र माझेच आहे.

प्रतिक्रिया द्या
10089 वाचन

💬 प्रतिसाद (41)

=))=))=))=))=))=))=))=))=))=)

स्पा
Wed, 04/18/2012 - 11:58 नवीन
=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) हसून हसून सदेह वैकुंठास गमन केल्या गेले आहे
  • Log in or register to post comments

+१

पिवळा डांबिस
Wed, 04/18/2012 - 12:16 नवीन
सदेह वैकुंठास गमन केल्या गेले आहे पण गमन करण्यासाठी 'एअर पौराणिक'च वापरल्या गेली आहे ना? मग काही हरकत नाही!!!! नायतर मिपाकर उगीचच रागवायचे!!! :) बाकी परा, जिलबी कडक पडली आहे.... इतकी की जिलबी पाडतांना तू मस्त गांजाभरी चिलीम लावली असावीस असं चित्र डोळ्यापुढे उभं राहातं आहे!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

पराची जिलबी आणि त्यावर यल्लो

गणपा
Wed, 04/18/2012 - 12:33 नवीन
पराची जिलबी आणि त्यावर यल्लो नॉटीचा पाक दोन्ही उत्तम. आज मिपावर आल्याचे सार्थक झाले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+१ लै भारी.

प्रचेतस
Wed, 04/18/2012 - 19:27 नवीन
+१ लै भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

विखरी, जळजळीत सत्य मांडणारी

कवितानागेश
Wed, 04/18/2012 - 12:08 नवीन
विखरी, जळजळीत सत्य मांडणारी भयवाह वेदनादायी वीररसपूर्ण श्रुंगारीक कविता! :D लाजले मग सदस्यही स्वतःच्या थोबाडीत मारून त्यांनी घेतली अत्यंत विदारक अनुभवांची आठवण झाली.... ;)
  • Log in or register to post comments

कुठला हा अनुभव ?

चौकटराजा
Wed, 04/18/2012 - 17:03 नवीन
विदारक अनुभव कोणता? दोन दे दोन घे इतपत ठीक आहे . पण विदारक अनुभव का यावा या आनंद दायी स्थळावर ? जरा मला व्यनि करून तरी सांगा ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

माउ

प्रीत-मोहर
गुरुवार, 04/19/2012 - 08:38 नवीन
माउ माउ अग काय एकेक प्रतिक्रिया... जान लोगि क्या? बाकी परा ही गझल थोड्वी मीटरात बसली नाहीये. थोडा प्रयत्न करुन सुधारवु नक्कीच शकशील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

नवीन आयडी काढली.. मी पुन्हा जिलबी पाडून घेतली..

इरसाल
Wed, 04/18/2012 - 12:11 नवीन
कोण तो कोण तो ? व्यनि केलात तरी चालेल मला. अवांतर : आताशा मला कमीत कमी ६/७ आयडींवर साँशय आहे .............. संशय संशय
  • Log in or register to post comments

=))))))))))))))))))))))

बिपिन कार्यकर्ते
Wed, 04/18/2012 - 12:45 नवीन
=))))))))))))))))))))))
  • Log in or register to post comments

निघालो घेउन कळीची फाळकी,

५० फक्त
Wed, 04/18/2012 - 12:48 नवीन
निघालो घेउन कळीची फाळकी, टाकण्या संस्थळी नविन जिलेबी निघालो घेउन कळीची फाळकी.....
  • Log in or register to post comments

वा!

नंदन
Wed, 04/18/2012 - 12:51 नवीन
गझलेचा अनुवाद सुरेख वठला आहे! श्री. परा यांनी 'इस्कूल के टैम पे, आना गोरी डैम पे' [पाठशाळेच्या समयासी, ये ग गौरवर्णीये धरणासी] ह्या भावविभोर गीताचाही मराठीत अनुवाद करावा, अशी त्यांना विनंती करतो.
  • Log in or register to post comments

अगायाया

रमताराम
Wed, 04/18/2012 - 18:47 नवीन
[पाठशाळेच्या समयासी, ये ग गौरवर्णीये धरणासी] मेलोऽऽ. हा प्रकार मूळ गीताला उगाचच सभ्य पातळीवर आणण्याचा, सबब दवणीय आहे. सबब श्री. नंदन दवणे, हा प्रकार तुम्हालाच अधिक चांगला जमेल. घ्या मनावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

=))))))))))))))))))))))

मूकवाचक
Wed, 04/18/2012 - 12:52 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
Wed, 04/18/2012 - 12:58 नवीन
हसून हसून सदेह वैकुंठास गमन केल्या गेले आहे +१
  • Log in or register to post comments

____/\___ !!!!!

यकु
Wed, 04/18/2012 - 13:01 नवीन
____/\___ !!!!!
  • Log in or register to post comments

मी गाऊन पाहिले.

नगरीनिरंजन
Wed, 04/18/2012 - 13:03 नवीन
माझ्या मापाचा एकही नव्हता. -चौपटबाजा बाकी. अनुवाद प्रतिभेला _/\_.
  • Log in or register to post comments

मै निकला...

स्मिता.
Wed, 04/18/2012 - 13:13 नवीन
आपली प्रेरणा 'गदर' सिनेमातल्या 'मै निकला गड्डी लेके...' हे गीत आहे ना. बरोब्बर ओळखले की नाही. बाय द वे, मागे तुम्हाला भावनुवादाकरता काही गाणी सुचवली होती, त्याची वाट बघत आहे. काये ना, मला काव्याचा आस्वाद मातृभाषेत घ्यायला जास्त आवडते.
  • Log in or register to post comments

कोणती

श्रावण मोडक
Wed, 04/18/2012 - 17:57 नवीन
कोणती गं, कोणती गाणी ती? मला सांग ना... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

एक्जॅक्टली हेच म्हणणार

बॅटमॅन
गुरुवार, 04/19/2012 - 14:14 नवीन
एक्जॅक्टली हेच म्हणणार होतो!!! जबरी जिलबी!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

निर्वाण...मोक्ष...मुक्ति... =))))))))))

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/18/2012 - 13:20 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मेल्या नक्की कोणाबद्दल

मृत्युन्जय
Wed, 04/18/2012 - 13:22 नवीन
मेल्या नक्की कोणाबद्दल लिहिलेस ते तरी सांग. सध्या मला किमान १० आयडींबद्दल संशय आहे. साले हे डु आयडी आमचेच का मिळत नाहित फक्त. बाकी कविता वाचुन मी खुर्चीवरुन खाली पडलो आहे.
  • Log in or register to post comments

वाट लागली वाट

पियुशा
Wed, 04/18/2012 - 13:28 नवीन
Image removed. वाट लागली वाट
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Wed, 04/18/2012 - 13:35 नवीन
वाचनखूण साठवणार आहे. फक्त तो कोण ते सांग!
  • Log in or register to post comments

मा. परा हे काही नीट जमलेले

सूड
Wed, 04/18/2012 - 14:33 नवीन
मा. परा हे काही नीट जमलेले नाही. मला यमक, अलंकार वृत्ताचे उत्तम ज्ञान आहे. तुम्ही माझ्याकडे शिकायला येऊ शकता. हे मी परा माझ्या घरापासून एक तासाच्या अंतरावर राहतो म्हणून सांगतो आहे. मलाही तितकंसं येत नव्हतं, एका भिकार कवीकडे मी दोन वर्ष त्यासाठी शिकत होतो. शेवटी कवीच्या खालच्या फ्लोअरला राहणार्‍यांनी कवीची मांडी पोखरली, पण मांडी पोखरली तरी शिकवायचा हेका त्याने सोडला नाही. (हेकटराजा)
  • Log in or register to post comments

हे बघ बाळा

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/18/2012 - 14:37 नवीन
मला यमक, अलंकार वृत्ताचे किती उत्तम ज्ञान आहे ते माझ्या क्षेत्रातील लोक जाणतातच. लवकरच माझ्या 'मी बप्पीदा आणि हिमेश ' ह्या लेखातून मी ते सविस्तर लिहिनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

या कवितेत यमक अलंकाराच्या

मृत्युन्जय
Wed, 04/18/2012 - 15:14 नवीन
या कवितेत यमक अलंकाराच्या चुका नसतील तुझ्या मते तर तुझ्या पद्याच्या सेन्स ला व ज्ञानाला माझाच त्रिवार दंडवत ! न ही ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते विद्या विनयेन शोभते मरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बरं बाबा

इरसाल
Wed, 04/18/2012 - 17:06 नवीन
तुमचे अलंकार तुप देतात आता तर झाले. ह्याप्पी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ही भाषा

सूड
Wed, 04/18/2012 - 18:11 नवीन
ही भाषा नाईलाज म्हणून , मनात चरफडत सत्य मानावं लागणारे वापरतात. अर्थात अज्ञांस सांगणे न लगे. नौरा(नौटाकराजा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

हे तुमचे टोपण नाव की काय

चौकटराजा
Wed, 04/18/2012 - 18:31 नवीन
नौटाकराजा हे आपले टोपण नाव आपल्याला साजेसेच आहे. त्यामानाने हेकटप्रजा हे मी घेतलेले नाव फारसे साजेसे वाटत नाही कारण प्रजा अनेकानी बनते राजा एकच असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

शुभेच्छा !

चौकटराजा
Wed, 04/18/2012 - 18:36 नवीन
या लेखाची वाट पहात आहे.धाग्याची मी वाट लावणार नाही की त्याला वात लावणार नाही .पण लेखातच सूचना कृपया करू नये अशी पुणेरी पाटी लावल्यास आभारी होईन. हेलदी धाग्याची मलाही आवड आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वा सुडोबा

स्पा
Wed, 04/18/2012 - 14:39 नवीन
वा सुडोबा चांगलीच विनम्रता दाखवलीत मी एक काय सूचना केलीत.. तुम्ही कंपू घेऊन अंगावरच आलात.. हो आता वयोमानानुसार कुरापतींना मीच सुरुवात केलेली हे विसरलो.. तो भाग अलाहिदा पण आता तुमच्या पिढीने तरी "साठी बुद्धी नाठी" हि म्हण समजून घ्यायला हवी न.. -- ब्यांड बाजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

परा

चौकटराजा
Wed, 04/18/2012 - 17:10 नवीन
परा, अभिप्राय म्ह्टला की तो दोन्ही प्रकारे येणार पण एखाद्या सूचनेचा बाउ करून धागा हायवेकडून उकिरड्यात नेण्याची संवय आम्हास आहे. ज्यास धागा लिहिलेला असतो त्याचे म्हणणे असे असू शकते ना की सूचना मान्य आहे/नाही. बस मिटला प्रश्न .पण आमची ही प्रजा भलतीच समजूतदार नाही बरं .हा राजकुमाराकरवी राजाला इशारा आहे आपली हेकटप्रजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

:-)

सहज
Wed, 04/18/2012 - 14:39 नवीन
फेसबुक व फोरमच्यासाठी बनवलेला कळफलक नुकताच पहाण्यात आला होता. चालू द्या. Image removed.
  • Log in or register to post comments

लै भारी.. त्यातही पाऊस पडतो

नितिन थत्ते
गुरुवार, 04/19/2012 - 20:26 नवीन
लै भारी.. त्यातही पाऊस पडतो आहे का हे खिडकीतून बाहेर न पाहता काम्पुटरलाच विचारण्याची कल्पना तर हुच्च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

पराजेंद्रकृष्णांची गजल वाचून

चिंतामणी
Wed, 04/18/2012 - 14:55 नवीन
ड्वॉले पाणावले.
  • Log in or register to post comments

दणकट! नंदनचा प्रतिसाद वाचून

मेघवेडा
Wed, 04/18/2012 - 15:32 नवीन
दणकट! नंदनचा प्रतिसाद वाचून आणखी हहपुझा. खरच मनावर घ्या त्या गाण्याचं मालक.
  • Log in or register to post comments

==))

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 04/18/2012 - 15:42 नवीन
बाजार उठविण्यात आला आहे :D :D :D
  • Log in or register to post comments

परा महान आहेस तु __/\__

प्रीत-मोहर
Wed, 04/18/2012 - 18:43 नवीन
परा महान आहेस तु __/\__
  • Log in or register to post comments

____/\____ धन्य हो पौरा आपलं

प्यारे१
Wed, 04/18/2012 - 19:24 नवीन
____/\____ धन्य हो पौरा आपलं परा जी!
  • Log in or register to post comments

@धन्य हो पौरा आपलं परा जी!

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/18/2012 - 21:52 नवीन
@धन्य हो पौरा आपलं परा जी! >>> Image removed. धन्य हो पा-जी ,आपलं ते हे-प्यारे-जी ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

परा ' गुलजार नार ही ' लवकर

जेनी...
Wed, 04/18/2012 - 19:37 नवीन
परा ' गुलजार नार ही ' लवकर पूर्ण कर रे .....:(
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा