मी गोनिदा अन् ओ पी नय्यर - लेखांक २

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
17 Apr 2012 - 4:35 pm

मी गोनिदा अन ओ पी नय्यर
मागून पुढे चालू
मला इतिहासात फार रमायला आवडत नाही. माझा इतिहासाचा व्यासंग (?) १८५७ पासून चालू होतो. मग पुढे गांधीयुग, टि़ळक , कॉग्रेस, सावरकर, दुसरे महायुद्ध वगैरे ईचे थोडेफार वाचन झाले.पण एकूणच या विषयाची सखोल माहिती नाही आवड नाही. आणि अप्पा तर जालिम शिवभक्त .बमो, दमा, पुल, लता, आशा, बाळासाहेब ( कलानगर वाले नव्हे) हे त्यांचे मैतर . त्यांच्या कडे वाचक या नात्याने मी फारसा
फिरकलो नाही. त्यांच्या बरोबर एकही गडावर गेलो नाही ( अवेअर नेस कमी होता माझा या बाबतीत .. आप्ला वल्ली , मोदक सारखा हुश्शार मी नव्हतो या बाबतीत ) .मला गोनिदा हे छंदिष्ट म्हणून अधिक पसंत होते.मग मधून त्यांच्याकडे चक्कर मारायचो. आपल्याकडे सांगायला दाखवायला पुष्कळ आहे पण गावातील पोराटोरानी यायला पाहिजे असा आग्रह ते बोलताना करीत. एकदा असेच गेलो असताना
" तुला आज अमूल्य खजिना दाखवतो. " असे म्हणून त्यानी बर्‍याच वस्तू पुढे केल्या.' हे काय आहे.? कशाचा यंत्राचा तुकडा वाटतो." मी म्हणे. तसे "हे मी खेमकरण भागात गेलो होतो लढाईनंतर. सैनिकानी दिला हा आपण जि़कलेल्या " अमेरिकन" पॅटन्र रणगाड्याच्या पट्ट्याचा तुकडा आहे .अमूल्य आहे." असे ते त्यांच्या खास शैलीदार आवाजात सांगत. मग आता हे पहा.. हे फोसील आहे. ते फॉसील हे द्राक्षाच्या
पानाच्या सारख्या पानाचे रेखीव आखीव फॉसील होते. ज्यानी पाहिले आहे ते खरेच भाग्यवान. मग हे काय? " अरे लक्षात नाही आले ? " हे तर नैसर्गिक सोने ! एका पारदरर्शक दगडात बंदी झालेली सोन्याची धार दाखवत ते . मग नाणी बिणी याना तोटाच नसे.

१९७२ च्या सुमाराला त्याना आणखीनच काही छंद जडले होते. याचे उल्ल्लेख त्यानी याच विषयावर लिहिलेल्या पुस्तकात वाचकानी वाचले असतील. काही तपशील त्यांच्याच कन्येने लिहिलेल्या " मस्त कलंदर फकीर " या पुस्तकात आला आहे. गोनीदा आमच्या घरावरून बर्‍याचदा ग्रामदेवतेच्या दर्शनाला जात. तळेगावात पोस्टात, बाजारात जाताना सफेद बंडी व कमरेभेवती धोतराची लुंगी नेसून जात.एक्दा एक गंमत
झाली, मी असाच रस्त्याने जात असताना एका वयस्क प्रतिष्ठा प्राप्त व्यक्तीने मला नमस्कार केला . खुश होऊन हस्यवदनाने मीही केला. तरीही विस्मय सम्पला नव्हता. मागे पाहिले तर पोस्टातील काम संपवून आप्पा घरी चाललेले माझ्या मागूनच येत होते त्याना तो नमस्कार होता. त्या दरम्यान माझा भाउ बी एस्स सी च्या एस वाय ला गेला. त्यात एक विषय होता जिऑलोजी. पुन्हा गोनीदा कडे आम्ही वरचे वर जाण्याचा प्रघात सुरू झाला.त्याला कारण असे की. पायाने पायदाब वापरून एक कर्बोरेम्डमची चकती फिरवायची व त्यावर निरनिराळे दगड घासून ( सेमी प्रेशस) निर्निराळे बदाम चौकट आकाराचे तुकडे तयार करायचे असा तो छंद. गिरीकुहारमधून भटकत असताना त्यानी भरपूर रॉ मटीरिअल गोळा केले होते. मग माझ्या भावाला ते विचारीत हा अ‍ॅगेट् आहे की जास्पर ? मग माझा भाउ तज्ञाचा आव आणून म्हणे
आप्पा हा अमेथिस्ट आहे. मग आम्हाला त्या यंत्राव्रर थोडीफार मजुरी करावी लागे.

एकदा असाच गेलो असताना ते ग रा टिकेकर अनुवादित इयान फ्लेमिंगचे जेम्स बॉड चे पुस्तक वाचत होते. मी विचारले आप्पा हे पुस्तक आणि तुम्ही वाचताय ....? ते म्हणाले साहित्य हे फक्त दोनच प्रकाराचे असते चांगले व वाईट. बरे दिसले म्हणून वाचतोय. एकदा मला म्हणाले येतोस का मजबरोबर ? ( हा माझ्याबरोबर ला गोनीदांचा खास प्रतिशब्द) .आपण रिकाम्याचा शेतात जाउ. मग आम्ही शेत तुडवीत गेलो.
त्यानी मस्त मस्त रंगबिरेंगी टणटनीची फुले गोळा केली. मी विचारले आप्पा, याचे काय करायचे? म्हणाले याचा काही गुल़कंद होत नाही. घरी चल मग मी तुला एक नवीन विश्व दाखवतो. घरी गेलो. त्यानी लॉरेन्स मेयोच्या फोर्टच्या दुकानातून बॅटरी कम भिंग अशी असेंब्ली असलेले एक यंत्र विकत घेतले होते. एरवी मेथीची भाजी व भाकरी खाणारे मध्यमवरगीय फकीर एकदम छंद म्हटले की श्रीमंत व्हायचे. फोटू
काढायचे व मोठ्या आकारात एनलार्ज करायचे. तर काय सांगत होतो.घरी गेल्यावर त्यानी ती फुले पाण्यात भिजविली व भिंगाखाली ठेवली व म्हणाले पहा आता ते विश्व ! मी पाहिले तर ईश्वराने केलेली अगाध कशीदाकारी तिथे विसावली होती. मखमल , तिच्यावर पडलेले ते जलमोती. क्या बात है मी उदगारलो. ( हाच छंद त्यानी पुढे देवास मुक्कामी कुमारगंधर्वाना लावला . कुमारांकडे फुलांना तोटा नव्हताच.
क्रमशः

मौजमजा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

17 Apr 2012 - 4:52 pm | स्पंदना

नशिबवान आहात चौरा.
आत्ताच दोन्ही भाग वाचले. सच्च्या शब्दात लिहिल आहे. पुढे वाचायला आवडेल.

विसुनाना's picture

17 Apr 2012 - 4:53 pm | विसुनाना

आवडत आहे. वाचतो आहे.

गो.नि. दांची रानभूली विसरता विसरत नाही..
मस्त स्मरणरंजन.

प्रचेतस's picture

17 Apr 2012 - 5:32 pm | प्रचेतस

सुंदर लिखाण.
गोनीदा माझे अत्यंत आवडते लेखक. सध्या कादंबरीमय शिवकाल वाचायला सुरुवात केलीय.

तुम्ही भाग्यवान. प्रत्यक्ष त्यांचा सहवास तुम्हांस लाभला.

मूकवाचक's picture

17 Apr 2012 - 5:34 pm | मूकवाचक

+१

मनराव's picture

17 Apr 2012 - 5:40 pm | मनराव

मस्त......!!!

पैसा's picture

17 Apr 2012 - 7:58 pm | पैसा

गोनीदा म्हणजे खरा भटक्या आणि छांदिष्ट! नशीब तुमचं तुम्हाला एवढ्या जवळून पहायला मिळाले त्यांना!

प्रास's picture

17 Apr 2012 - 8:24 pm | प्रास

हा दुसरा भागही आवडलाय. लवकर टाकलात हे फारच चांगले केलेत.

आता पुलेप्र.

पिवळा डांबिस's picture

18 Apr 2012 - 1:41 am | पिवळा डांबिस

गोनिदांच्या त्या पुस्तकाचं नांव आहे, "छंद माझे वेगळे".
त्यात त्यांच्या ह्या भिंगाखाली लहान फुले पहाणे, चकाकत्या दगडांना घासून स्फटिकाचा आकार देणे, भारत-पाक रणांगणावरून आणलेल्या तोफेच्या पोलादी गोळ्याचा भाल्याचा फाळ बनवणे वगैरे छंदांचं वर्णन आहे...
मागच्या वेळेला चौकशी केली तेंव्हा हे पुस्तक आउट्-ऑफ्-प्रिंट असल्याचं कळलं. जर कुणाकडे असेल आणि त्याला विकायचं असेल तर मला व्यनि करून कळवा. मी त्यासाठी योग्य ती किंमत मोजायला तयार आहे.

चौकटराजा's picture

18 Apr 2012 - 9:35 am | चौकटराजा

आपण पुणेकर असाल तर " महाराष्ट्र ग्रंथालय" चितळे बंधु जवळ शनिपार पुणे या पत्यावर प्रयत्न करावा. आपण गोनिदाचे चाहते असल्याने
गडावर जाण्याची सवय असेलच ! मग नो प्रॉब्लेम ! कारण चार जिने चढून जावे लागते.

खुप छान माहिती, अतिशय धन्यवाद काका.

मस्त लिहिलेय. पुढील भाग कधी?