बायकांचं वागणं हे फार पूर्वीपासून पडलेलं कोडय.
त्यांना केव्हा कोण नि काय आवडेल हे काही सांगता येत नाही.
बहुधा आपल्याकडे एखाद्या मुलीचे लग्नाचे वय झाले की
तिच्यासाठी वरसंशोधन सुरू होते.
शेजारीपाजारी विचारणा करतात,
मग काय... सुरू झाले का संशोधन ?
किती झाले कांदेपोह्याचे कार्यक्रम ?
मुलीची पत्रिका देऊन ठेवा... आमच्या नणंदेच्या जावेचा भाच्चा आहे लग्नाचा.
बाय द वे
मुलीच्या अपेक्षा काय आहेत ?
काय सांगता पटवर्धनांना होकार कळवलात, नाही म्हणून सांगा.
अहो त्याचा एकदा साखरपुडा होऊन तुटलय!
अशाप्रकारे पोरीच्या लग्नाची जातायेता चर्चा चालू होते.
यात अजून एक प्रकार,
बर्याच मुलींना
विशेषतः मुलांना हे ठरवून लग्न बिग्न कमीपणाचं वाटतं.
आपलं लव्हमॅरेज आहे असं सांगण्याची यांची फार हौस.
परवा आमच्याकडे एक जण आला होता, नुकताच लगीन झालेला,
त्याला आमच्या मातोश्रींनी विचारले "तुमचं काय अॅरेंज्ड मॅरेज का ?"
तर पट्ठ्या म्हणतो "अल्मोस्ट लव्ह मॅरेज."
तर एकूण काय
निर्णय घेण्यापूर्वी मुलाची अशी सर्व बाजूंनी माहीती मिळवली जाते...
चांगला अधिक चांगला, दिसायला बरा त्याहून बरा,
अधिक पगार मिळवणारा, घरी गाडी बंगला असणारा
वडलांची स्वतःची इंडस्ट्री.
एकूलता एक असेल तर उत्तम.
असे अनेक निकष क्रायटेरीया लावत उत्तमातली उत्तम निवड केली जाते.
चांगला पर्याय मिळाला की पूर्वी पाहीलेल्या पर्यायाला
नकार कळवला जातो.
इत्यादी... इत्यादी.
प्रतिक्रिया
9 Apr 2012 - 1:57 am | नर्मदेतला गोटा
याऊलट पहा
एखादी आघाडीची हिंदीतली हिरॉइन जिला देशातला सारा तरुण वर्ग चाहतो
जी कोणालाही पटवू शकेल, कुणालाही कटवू शकेल.
जिच्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत. त्या ऑप्शनमधून उत्तमातला उत्तम पर्याय ती निवडू शकेल
अशी स्थिती असते ती यातले काही न करता भलत्याच व्यक्तीला निवडू लागली तर कसे वाटेल.
उदा:
वैजयंतीमाला - मधुमतीमुळे लाखों दिलोंकी धडकन बनलेली.
लग्न करताना मात्र मुळात विवाहीत असलेल्या डॉ. बाली ची निवड का करते
हेमा मालिनी - ही तर ड्रीम गर्ल
ती देखील मुळात लग्न झालेल्या चार अपत्यांचा बाप असलेल्या धर्मेंद्रची निवड का करते.
सुचित्रा कृष्णमूर्ती - आपल्यापेक्षा वयाने ३० वर्षाने मोठ्या असलेल्या शेखर कपूरची निवड का करते.
श्रीदेवी - विवाहीत असलेल्या बोनी कपूरशी का जोडी जमवते
यात अजून लक्षणीय गोष्ट - या सार्या नायिका तमिळ आहेत
आणि यांनी पसंत केलेले जोडीदार पंजाबी आहेत.
यावरून आठवलं आमचा एक मित्र होता
मॉन्टी - पंजाबी होता. त्याच्यामागे लागली होती, एक तमिळ मुलगी श्रीजया नावाची.
त्याला मी नेहमी सांगत असे. तूझ्या मनात असो वा नसो तू शादी करेगा तो भी जयाका पीछा नही छुटनेवाला आणि मग त्याला वरच्या सगळ्या तमिळ अप्सरांचे आणि त्यांनी पटवलेल्या
पंजाब्यांचे दाखले देत असे.
तेव्हा खरच कोडं पडतं ज्यांना कुणीही अविवाहीत तरूण मिळू शकला असता
त्या असा विवाहीत ऑप्शन का स्वीकारतात ?
हीच यादी करीष्मा कपूर, शिल्पा शेट्टी अशी वाढू शकेल...
जुन्या बाजाराचा आग्रह का !
आमच्या एका मानसशास्त्रज्ञ मैत्रीणीने याचाही अभ्यास केलाय
ती म्हणते - या सेलिब्रिटी बायकांना आपली आयडेंटीटी, स्पेस घालवायची नसते.
बरं संसारात गुरफटून घेणंही जमणारं नसतं.
त्यामुळे कुठलं मोठं फंक्शन, समारोह असेल तर याच्याबरोबर जोडीने मिरवायचे
आणि नवरा आजारीबिजारी पडला तर सेवा सुशृषेकरता पाठवून द्यायचे
पहिल्या बायकोकडे
इ. इ.
तर कळत नाही असे कसे हे या बायकांचे वागणे...
8 Apr 2012 - 10:59 pm | रेवती
नाय ब्वॉ, काय पटलं नाय.
एकंदरच धबधब्यासारखे प्रतिसाद अपेक्षित असतील तर ठीक आहे.
आजकाल सदस्य कंटाळलेत हो अश्या धाग्यांना.....तरी आपण आशा (हो, मुलगी असली तरी) सोडायला नको.;)
8 Apr 2012 - 11:12 pm | पक पक पक
आपल्या काय अपेक्षा आहेत..? ;)
9 Apr 2012 - 11:46 am | जेनी...
काय खर नाय ..:(
आपल्या मराठीच पोरि बर्या ,माधुरि दिक्षित ,ममता कुलकर्णी ,अश्विनी भावे
कोराकरकरित नवरा बघुन सेट्ट्ल आहेत :)
त्यांचा अभ्यास कराकि जरा . हे नको ते खुळ कशाला तामिळांच \(
9 Apr 2012 - 7:50 pm | सोत्रि
हिच्या बद्दल न बोललेलेच बरे. तुम्हीही बहुदा अनावधानानेच तिचे नाव लिहीले असावे.
अधिक खुलाश्यासाठी लालू प्रसाद व राजद बिहार नेते ह्यांच्याशी संपर्क साधावा.
- (बित्तंमबाज) सोकाजी
9 Apr 2012 - 8:17 pm | जेनी...
का हो ..मला तर तिने लग्न केल्यानंतर कुठे गॉसिपिन्ग मद्ध्ये अडकल्याच ऐकिवात नाहि
तस असेल तर मग माझि चुक झालि मान्य करते ..
( सोकाजिनचा मतावर चुक मान्य करनारि एक अबला ) नारि ;)
9 Apr 2012 - 8:25 pm | धन्या
तुम्हीच सांगून टाका ना. त्या बिहारमधल्या लालूंनी किंवा राजद नेत्यांना विचारायला जाण्यापेक्षा आपल्या जवळच्या माणसाने सांगितलेलं अधिक चांगलं. कसं? ;)
10 Apr 2012 - 10:20 am | इरसाल
कोराकरकरित नवरा बघुन सेट्ट्ल आहेत .
जरासं आक्षेपार्ह विधान आहे :o, :(
10 Apr 2012 - 11:47 am | जेनी...
कस काय आक्षेपार्ह ?
आधि लग्न न झालेला ,ज्याच पहिलं वहिलं लग्न ह्या अर्थाने वापरलाय तो शब्द
गैर्समज करुन घेवु नये ..झालच असेल तर तो का झाला हे सुद्ध सांगावे ही विनन्ति ...
9 Apr 2012 - 12:08 pm | धन्या
हे सगळं मुलांकडूनही होतं बरं का.
म्हणजे ती दिसायला सुंदर आणि अगदी चवळीच्या शेंगेसारखी शिडशिडीत हवी, तिच्याकडे इंजिनीयरींगची डीग्री हवी, गलेलट्ठ पगाराची आयटीमधील नोकरी हवी, तिला शनिवार रविवार अशी दोन दिवस विकांताची सुट्टी हवी वगैरे वगैरे...
आणि हे सगळं असल्यानंतर तिला जेवण बनवता येत असेल तर तो बोनस पॉईंट.
9 Apr 2012 - 12:27 pm | वपाडाव
आण्भव आण्भव आण्भव...
9 Apr 2012 - 1:02 pm | धन्या
पण मांडवाखालून जायच्या तयारीत असताना टाळी कधी या बाजूने वाजते तर कधी त्या बाजूने.
त्यामुळे कधी "लग्नाच्या बाजारात मुलांकडून असे असे अनुभव येतात" असे ऐकायला मिळते तर तर कधी "हल्लीच्या मुलींच्या अपेक्षा अवास्तव वाढलेत हो" असेही ऐकायला मिळते.
या विषयावर अजूनही चर्वितचर्वण करायला आवडेल, पण थोडा ठीणगी पेटायला हवी. ;)
9 Apr 2012 - 4:44 pm | जेनी...
समत समत समत :D
9 Apr 2012 - 6:19 pm | बॅटमॅन
>>>या विषयावर अजूनही चर्वितचर्वण करायला आवडेल, पण थोडा ठीणगी पेटायला हवी.
असेच म्हणतो ;)
9 Apr 2012 - 6:31 pm | अत्रुप्त आत्मा
@पण थोडा ठीणगी पेटायला हवी. Wink >>> हि घ्या काड्या-पेटी :-p
9 Apr 2012 - 7:58 pm | सूड
यावरुन आमचे एक मित्र आखूडशिंगी, बहुगुणी शोधत होते तो प्रसंग आठवला.
9 Apr 2012 - 8:11 pm | धन्या
तुमच्या मित्राला सांगा आखूडशिंगी आणि बहुगुणी मिळण्याचा काळ इतिहासजमा झाला. आता त्यातल्या त्यात कमी टोकदार शिंगांची, जरा कमी जोरात दुगाण्या झाडणारी मिळते का हे पाहण्याचे दिवस आहेत.
10 Apr 2012 - 4:51 pm | ५० फक्त
धनाजीराव, अस्वस्थता समजली,
शनिवार रविवार अशी दोन दिवस विकांताची सुट्टी
9 Apr 2012 - 6:23 pm | सुहास..
शिल्पा ब यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ;)
9 Apr 2012 - 6:34 pm | अत्रुप्त आत्मा
;-) ;-)
10 Apr 2012 - 3:25 am | शिल्पा ब
तुझी सही भलतीच आवडल्या गेली आहे.
9 Apr 2012 - 6:39 pm | परिकथेतील राजकुमार
फारच 'जळजळी'त लेख.
9 Apr 2012 - 7:36 pm | मराठी_माणूस
काय म्हणायचे आहे ते काहीच कळले नाही
9 Apr 2012 - 8:32 pm | मदनबाण
मुलीच्या अपेक्षा काय आहेत ?
त्यापेक्षा त्यांच्या घरच्यांच्या ! ;)
कोकणस्थच पाहिजे हा तर फार महत्वाचा मुद्दा ! ;)
(देशस्थ बायडीचा कर्हाडी नवरोबा) ;)
9 Apr 2012 - 8:43 pm | धन्या
हो रे हो.
एरव्ही दुनिया पादाक्रांत करणार्या उच्चशिक्षीत मुली बर्याचदा लग्नाच्या बाबतीत आई-बाबा वाक्यं प्रमाणम मानतात. म्हणजे आई बांबाचं म्हणणं ऐकायचंच नाही असं मला म्हणायचं नाही. परंतू आई बाबांच्या "कोकणस्थच हवा", "वेस्टर्नवरचाच हवा" या असल्या अट्टाहासा़ंना बाजूला ठेवून आपल्याला काय हवंय याचा विचार करायला हवा. "म्हणजे माझा पत्रिकेवर विश्वास नाही रे. पण आई बाबांना पाहायची आहे." हे एक ठरलेलं वाक्य. तेव्हा त्या कन्यकेला सांगावसं वाटतं की बाई गं तुझा विश्वास नाही ना, मग समजाव ना ते घरच्यांना, त्यांच्या हो ला हो का करते आहेस.
9 Apr 2012 - 9:07 pm | मदनबाण
परंतू आई बाबांच्या "कोकणस्थच हवा"
अरे धन्या मला तर कोकणस्थी लोकांचे लयं बेक्कार अनुभव आलेले आहेत !
इथे लिहायच झाला तर मिपाचा प्रोसेसर गरम व्हायचा ! ;)
बरं इतक असल तरी माझ्या पाहणातल्या कोकणस्थ पोरींनी इतर जातीय पोरांबरोबर सूत जमवले आणि लग्न केले !
थोडक्यात कोकणस्थ नाही तर इतर चालतात यांना पण कर्हाडे देशस्थ नकोच ! कुठे जमेना तर मग इतर ! ;)
शेवटी माझ्या वधु संशोधनाच्या वेळा कोकणस्थांचे कोकणस्थी वर्तन अनुभवास आल्यानंतर कोकणस्थ मुलींची स्थळे पाहणेच टाळले आणि देशस्थीण केली !
समाधानी आहे ! ;)
9 Apr 2012 - 10:15 pm | रेवती
मला तर अगदी उलटा अनुभव आला रे!
9 Apr 2012 - 10:24 pm | मदनबाण
मला तर अगदी उलटा अनुभव आला रे!
सर्वच कोकणस्थ तसेच नसतात याची खात्री आहे हो मला ! ;)
काही कोकणस्थ तर फार प्रेमळ असतात ! ;)
10 Apr 2012 - 1:47 am | रेवती
आता बघ तुझ्या धाग्यांना प्रतिसाद देते का!;)
10 Apr 2012 - 11:19 am | परिकथेतील राजकुमार
तुला द्राक्षे आवडतात का रे ?
10 Apr 2012 - 2:48 pm | रमताराम
पर्या हलकटा. =). अरे पण एकुण धागाच द्राक्षासवाचा आहे ना. ;)
-(तटस्थ) रमताराम.
10 Apr 2012 - 2:59 pm | अत्रुप्त आत्मा
@तुला द्राक्षे आवडतात का रे ? >>>
10 Apr 2012 - 4:35 pm | मदनबाण
तुला द्राक्षे आवडतात का रे ?
इनो घेणे ! ;)
द्राक्षच काय पण बेदाणे अन् काळ्या मनुकाही आवडतात हो मला ;)
तुझ काय ? ;)
10 Apr 2012 - 5:00 pm | परिकथेतील राजकुमार
मी तू कोल्हा आहेस का ते फक्त चेक करत होतो. ;)
10 Apr 2012 - 4:33 pm | मदनबाण
*
14 Apr 2012 - 8:32 am | प्राजु
मेल्या... जीवंत रहायचय ना तुला मिपावर??? :) ;)
(सरळ सरळ धमकी)
तुला शाप : तुला मुल्गा झाला तर कोकणस्थ मुलगी आणेल आणि मुलगी झाली तर कोकणस्थाचा हात धरुन पळून जाईल. ;)
(हलके घेशीलच) :)
14 Apr 2012 - 8:39 am | मदनबाण
मेल्या... जीवंत रहायचय ना तुला मिपावर???
खीखीखी,,,खपलो ! ;)
तुला शाप : तुला मुल्गा झाला तर कोकणस्थ मुलगी आणेल आणि मुलगी झाली तर कोकणस्थाचा हात धरुन पळून जाईल.
चालेल्,जे काय होईल ते निदान भटा बरोबरच होईल ना ! हरकत इल्ले ! ;)
(सदाटेस्टी;)काजु ;) (हलकेच घेशील याची खात्री आहे. ;))
15 Apr 2012 - 9:21 pm | रेवती
येताजाता देशस्थांना नावं ठेवणार्यांना कुणीतरी भेटलं म्हणायचं.:) काय प्राजु?
11 Apr 2012 - 11:48 am | दिपक
14 Apr 2012 - 12:08 am | नर्मदेतला गोटा
>>काही कोकणस्थ तर फार प्रेमळ असतात !
लग्नाबाबतीतला कोणताही
विषय कोकणस्थांवर आलाच पाहीजे का !
मूळ विषय असा आहे. लग्न ठरवताना सामान्य मुली एवढ्या गोष्टींची शहानिशा करून घेतात.
तर मग हिंदीतल्या असामान्य नायिका विवाहीत मनुष्याबरोबर लग्न का करतात ?
यामुळे एका स्त्रीवर अन्यायही होतो असा सामाजिक विचार यामध्ये आहे.
14 Apr 2012 - 8:14 am | मदनबाण
मूळ विषय असा आहे. लग्न ठरवताना सामान्य मुली एवढ्या गोष्टींची शहानिशा करून घेतात.
तर मग हिंदीतल्या असामान्य नायिका विवाहीत मनुष्याबरोबर लग्न का करतात ?
सदर लेखन प्रकारात अनुभव हा पर्याय निवडलेला आहे, त्यामुळे मी माझा व्यक्तीगत अनुभव लिहला त्यात गैर ते काय ?
आणि मूळ लेखन वाचताना हिंदीतल्या असामान्य नायिका विवाहीत मनुष्याबरोबर लग्न का करतात ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल असं दिसत नाही तर ते तुम्ही तुमच्याच दिलेल्या पहिल्या प्रतिसादात दिसुन येते.
विषय कोकणस्थांवर आलाच पाहीजे का !
का येतो बरं ? असा जरा विचार करुन पहा ना मग ! ;)
14 Apr 2012 - 8:34 am | प्राजु
तुला बर्याच कोकणस्थ मुलींनी नकार दिलेला दिसतोय!! ;)
14 Apr 2012 - 1:40 pm | अमोल खरे
मलापण हाच डाऊट आहे. पण बाणाने कितीही बालिश विधाने केली तरी तो मनाने फार चांगला मुलगा आहे असे म्हणुन मी माझे २० शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
14 Apr 2012 - 6:16 pm | मदनबाण
@ प्राजु तै :---
तुला बर्याच कोकणस्थ मुलींनी नकार दिलेला दिसतोय!!
तसं असत तरी सुद्धा मला वाईट किंवा दुखः वाटलं नसतं !
असो यावर मला अधीक बोलायचे नाही... स्वभावाला औषध नाही हेच खरे ;)
@अमोल खरे
पण बाणाने कितीही बालिश विधाने केली तरी तो मनाने फार चांगला मुलगा आहे असे म्हणुन मी माझे २० शब्द संपवतो
खरे खरे ...खरं सांग तुझ्याशी गप्पा टप्पा मारताना कधी तुला माझ्यात आकस दिसला काय रे ? ;) च्यामारी नवा कॅमेरा घेतला तेव्हा तुलाच आधी कळवले होते, ते ही तू कोकणस्थ असुन सुद्धा ! ;)
सत्य आणि अनुभव हे कितीही कटु असले तरी ते सत्यच असते त्याला बालिश विधाने म्हणुन टाळता येत नाही रे ! ;)
15 Apr 2012 - 12:41 am | नर्मदेतला गोटा
करीना + सैफ
राणी मुकर्जी + आदित्य चोप्रा
या जोड्या आता चर्चेत आहेत
तिथेही तेच
15 Apr 2012 - 9:26 am | अन्नू
प्रथम लेख पटला म्हणून जाहीर करतो!
आता मुली अशा का वागतात तर त्याचे मुख्य कारण पैसा हे असावे, आणि सिनेतारकांच्या बाबतीत पैसाबरोबरच प्रसिद्दी हेही एक कारण असते म्हणजे असावे!
अवांतरः- (((((आंम्हाला तर बाबा, श्रीदेवीचा आणि बोनी कपूरची जोडी भयंकर आवडते. कुठे जाईल तिथे ही पंजोबा नातीची जोडी कशी अगदी शोभून दिसते, नाही? ;) ))))
15 Apr 2012 - 9:33 pm | नर्मदेतला गोटा
>> प्रथम लेख पटला म्हणून जाहीर करतो!
अहो तुम्हालाच काय ? सगळ्यांनाच पटलाय
पण ते मान्य करवत नाही ना म्हणून कोकणस्थ देशस्थ असा टाइमपास चालवलाय
15 Apr 2012 - 10:42 pm | रेवती
खरच की काय?
अनियमीतपणे का होईना भेटाणार्यांपेक्षा कधीही न भेटलेल्यांनाच बरे ही गंमत माहीत?
15 Apr 2012 - 11:24 pm | नर्मदेतला गोटा
अन्नू
>> आता मुली अशा का वागतात तर त्याचे मुख्य कारण पैसा हे असावे, आणि सिनेतारकांच्या बाबतीत पैसाबरोबरच प्रसिद्दी हेही एक कारण असते
हेही खरे आहे
17 Apr 2012 - 12:16 pm | नर्मदेतला गोटा
श्रीदेवी आणि श्रीदेवी बनू पाहणार्या अशा दोन कॅटेगर्या यापुढे कराव्या लागतील