मराठी साहित्यातल्या असामान्य कलाकृतींची जर यादी करायची म्हटले तर ती शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय” शिवाय सुरुही होणार नाही आणि संपणार देखील नाही. याच कादंबरीने लोकांना महाभारत ये एका महान ग्रंथाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनाने पहाण्यास प्रवृत्त केले. कर्ण किती महान होता हे याच पुस्तकामुळे लोकांना कळू शकले. आयुष्यभर अवहेलना सोसणाऱ्या कर्णासाठी, वाचताना नकळतच एक आदराची जागा आपल्या मनात बनते. एवढा दानशूर असूनदेखील भगवंत कृष्ण त्याचाशी एवढे निर्दयीपणे का वागले? नको नको म्हणत असताना देखील त्यांनी अर्जुनाला नि:शस्त्र कर्णावर बाण चालवण्यावस का भाग पाडले असेल? पु. ल. देशपांडेंचा ही लेखनात एका ठिकाणी पु. ल. म्हणतात की “कृष्ण देखील कधीतरी कर्णाबरोबर चीडीचा डाव खेळला असे मला वाटते”.
मला स्वतंत्रपणे विचार करताना असे वाटते की ज्या प्रकारचा मृत्यू श्री कृष्णांनी कर्णासाठी ठरवला तो कदाचित बरोबरच होता. अनेक वेळेला त्यांनी अर्जुनाला पाठीशी घातले हा देखील एक कृष्णानितीचाच भाग होता. असे मला वाटते. या सर्व गोष्टीत अर्जुनाला वाचवण्यापेक्षा त्यांचा कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान देण्याचा त्यांचा हेतू असावा असे मला वाटते.
एक विचार सर्वांनी करून पहा की जर अर्जुनाने कर्णाला सरळ युद्धात हरवले असते तर कर्णाला आज कोणी महान म्हटले असते का? किंवा युद्धात रथाचे चाक जमिनीत रूताल्यावर ते जमिनीतून बाहेर काढणे हे त्या वेळी महत्वाचे होते का? कर्ण रथाचा वापर न करता लढू शकत नव्हता का? जेंव्हा अर्जुन बाण चालवत होता तेंव्हा कर्णाने रथाचे चाक मोकळे करायचे सोडून धनुष्य का नाही उचलले? या प्रश्नांचे उत्तर मिळवायचा कोणी कधी प्रयत्न केला आहे का? मला वाटतं की कर्णाला देखील कृष्णांचा हा डाव कळला असावा म्हणूनच त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न नाही केला.
अर्जुन आणि कर्ण यांमध्ये नि:संशय रित्या कर्ण जास्त महान धनुर्धर होता. परंतु त्याच्या आयुष्यात त्याने अनेक चुका देखील केल्या होत्या. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला कपटाने मारण्यात कर्ण देखील होता. अभिमन्यू चे कवच मागून भेदण्याचे कामही त्याचेच. परशुरामाशी खोटे बोलून दिव्या अस्त्र मिळवणारा कर्ण देखील हाच होता. ध्युतामध्ये पांडवांवर मोहिनी टाकून त्यांना कपटाने हरवनाऱ्या कौरवांच्या बाजूने कर्ण लढला कारण काय तर त्याच्या पडत्या काळात दुर्योधनाने त्याला मदत केली. पण याच कर्णाने कधी दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी हा कर्ण शांत राहिला कारण काय तर द्रौपदीने त्याला साकडे घातले नाही? हा युक्तिवाद तर कधीही न पाटण्याच्या पलीकडचा वाटतो.
तरीही श्री कृष्णांनी त्याला नि:शस्त्र असताना अर्जुनाकडून मृत्यू आणविला. याचमुळे आज कर्णाला सहानुभूती तरी मिळते. लोक आजही सर्वकालीन महान धनुर्धर म्हणूनच उल्लेख करतात. जर श्री कृष्णांनी सरळ युद्धात कर्णाला मृत्यू दिला असता तर आज “मृत्युंजय” चा शेवट आणि एकंदर संपूर्ण विषयाच पूर्ण पणे वेगळा असता असे मला वाटते.
प्रतिक्रिया
28 Mar 2012 - 6:03 pm | निश
स्वानंद वागळे साहेब , मस्त लेख.
“कृष्ण देखील कधीतरी कर्णाबरोबर चीडीचा डाव खेळला असे मला वाटते”. - हे वाक्य ह्या लेखाती ल high point आहे.
संपादित.
पण तुमचा लेख मस्त. अजुन येउ द्यात.
28 Mar 2012 - 6:05 pm | प्रास
कृपया महाभारत मूळातून वाचावे ही विनंती.
28 Mar 2012 - 10:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे
प्रास साहेब, हे सांगून सांगून कित्येक थकले, मी पण सोडून दिले आता सगळ्यांना सांगणे. कधी कधी मूड लागला तर सांगतो.
पण मला वाटते की हा सावंतांच्या प्रतिभाशक्तीचा गौरव आहे की तद्दन खोट्या (मूळ महाभारताशी फारकत घेतलेल्या) गोष्टींनाच लोक खरे समजतात आणि वरून त्यावर निबंध लिहितात, चर्चा पण करतात.
आता तर मी लोकांना सांगणार आहे कि राधेय वाचा !!!
त्यामुळे माझे पण इत्यलम् च :-)
29 Mar 2012 - 2:46 am | Nile
जय, भारत की महाभारत?
29 Mar 2012 - 10:25 am | प्रास
कृपया वांझोटे फाटे फोडू नयेत.
29 Mar 2012 - 11:06 am | विश्वनाथ मेहेंदळे
योग्य उत्तर!!!
खरे तर मी माझ्या मागच्या प्रतिसादात लिहिणार होतो, की परत कुणी विचारू नका जय, भारत की महाभारत म्हणून. कारण दर वेळेला किमान एक जण बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतोच. एक तर तीन ग्रंथांची थिअरी पण वादग्रस्त आहेतच. तो संपूर्ण वेगळा मुद्दा आहे.
29 Mar 2012 - 11:33 am | Nile
उत्तरांबद्दल धन्यवाद. मागे कोणीतरी महाभारत वादग्रस्त आहे असेही म्हणाला होता. असेल कोणी तरी वांझोटा! तुमच्या पोथी पुराणात व्यत्यय नको! चालुंद्या.
29 Mar 2012 - 5:10 pm | प्रास
प्रतिसादादरम्यान वांझोटे फाटे फोडण्याचा व्यत्यय न आणण्याचे ठरवल्याबद्दल आभारी आहे.
28 Mar 2012 - 6:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
झाला आहे लेख, पण एकदा इरावती कर्व्यांचे युगांत वाचून पहा.
कदाचित तुमच्या मतांमध्ये फरक होईल.
बाकी पुलंचे जे वाक्य तुम्ही दाखल्याखातर दिले आहे ते बरोबर वाटले नाही.
ते वाक्य एका मोठ्या प्रासंगिक विनोदाचा भाग आहे.
एका लहान शाळकरी मुलाच्या मनातले विचार मांडतांना ते वाक्य आले आहे, ते पुलंचे मत असेल असे वाटत नाही.
28 Mar 2012 - 7:19 pm | सुधीर
तेच म्हणतो, इरावती कर्वे यांचे युगांत वाचून "दिमागकी घंटींया बजता है साला" असं झालं होतं. अजून एक पुस्तक आहे, पर्व - एस एल भैरप्पा, कोणी अनुवाद केला आहे ते आठवत नाही.
28 Mar 2012 - 7:19 pm | यकु
>>>पर्व - एस एल भैरप्पा, कोणी अनुवाद केला आहे ते आठवत नाही.
एस. एल. भैरप्पा म्हटलं की उमा कुलकर्णी या नावाची दिमाग में घंटी बजती है.. कुठंतरी ऐकलं असणार.. वाचलेलं नाहीच.
28 Mar 2012 - 7:34 pm | सुधीर
बरोबर! पण नाही आठवलं, कारण युगांत सर्वप्रथम वाचले होते, त्यामुळे त्याची छाप जास्त होती. शिवाय तुम्ही बरोबर पकडलतं, कारण लायब्ररीतून आणलं होतं, पण काही कारणास्तव पूर्ण करणं शक्य नाही झालं. त्यामूळे विस्मृतीत गेले.
12 Dec 2013 - 6:50 am | भाग्यश्री कुलकर्णी
खरच फार भारी आहे ही कादंबरी.महाभारतातल्या सगळ्या गोष्टींचे लॉजिकल विश्लेषण आहे यात.माझ्या आवडत्या पुस्तकापैकी एक आहे हे.त्यांची "मंद्र" नाही भावली फारशी.
29 Mar 2012 - 11:10 am | विश्वनाथ मेहेंदळे
सखाराम गटणे आणि त्याचे पुलंच्या लेखनातील जीवन विषयक सूत्र आठवले !!!
पुलंचा विनोद समजायला इतका कठीण असेल असे वाटले नव्हते कधी.
28 Mar 2012 - 6:18 pm | आदिजोशी
कर्णाला अर्जूनाने अनेकवेळा समोरासमोर हरवले आहे. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी समस्त कौरव बंधू + कर्ण ह्यांना भीम आणी अर्जूनाने पिदवले, विराट राजाच्या सैन्यासोबत अख्ख्या कौरव सेनेला (कर्णासकट) नि:शस्त्र करून पिटाळून लावले. त्यामुळे श्रेष्ठ धनुर्धर अर्जूनच होता ह्यात वाद नाही. कपटाने वागलेल्या माणसाला मॄत्यूही तसाच मिळतो हे जगाला दाखवण्यासाठी कर्णाचा मॄत्यू नि:शस्त्र असताना घडवून आणला.
कर्णाला अवहेलना सहन करावी लागली कारण त्याने जनमानसात ओळख सूतपूत्र असूनही राजकुमारासारख्या प्रतिष्ठेची अपेक्षा धरली. अर्थातच लोकांनी शिव्या घातल्या जे समाजरितीला धरूनच होते. जर कर्णात खरोखर धमक असती तर दुर्योधाचं आंदण राज्य न स्विकारता स्वतःच्या जिवावर लढाया करून तो सम्राट बनू शकला असता. त्यापासून त्याला कोणी रोखू शकले नसते. पण त्यानेही सोप्पा मार्ग स्विकारला.
अँटी हीरो टाईपच्या मॄत्युंजय मधील व्यक्तीचित्रणामुळे कर्णाला उगाच भलतेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे. कर्णाला त्याच्या आईने जन्म होताच त्यागले ह्या एका घटनेमुळे त्याच्या पुढच्या आयुष्यात त्याने केलेल्या अनेक भयानक चुका लोकांनी आंधळ्या प्रेमाने नल अँड व्हॉईड केल्या. कर्णाचे अपराध आणि चुका मोजत बसलात तर त्या जवळ जवळ दुर्योधना इतक्याच होतील.
कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान कॄष्णाने नव्हे तर शिवाजी सावंत ह्यांनी दिले.
अवांतरः पु.लं.चं ते वाक्य बिगरी ते मॅट्रीक मधील एका शाळकरी मुलाच्या तोंडी आहे. त्यामुळे त्याला कितपत सिरियसली घ्यायचे ते बघा.
28 Mar 2012 - 6:35 pm | बॅटमॅन
>>कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान कॄष्णाने नव्हे तर शिवाजी सावंत ह्यांनी दिले.
+१.
हेच खरं.
28 Mar 2012 - 6:36 pm | प्यारे१
बळंचकर आहे मृत्यूंजय...!
द्रौपदी वस्त्रहरणाची आयडीया मूळात कर्णाचीच होती...
अॅण्टी हिरो/ खलनायकाला ग्लॅमर देऊन त्याला मोठं करायची लाटच आल्यासारखं झालंय हल्ली.
28 Mar 2012 - 7:38 pm | sagarpdy
-१
मृत्युंजय हातात यायच्या आधीपासूनच कर्णाला एक वेगळंच वलय आहे असंच वाटत आलंय
+१
ठकासी असावे महाठक, असे समर्थ रामदासांनी म्हटलेच आहे.
28 Mar 2012 - 7:06 pm | सुधीर
मराठी साहित्यातल्या असामान्य कलाकृतींची जर यादी करायची म्हटले तर ती शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय” शिवाय सुरुही होणार नाही आणि संपणार देखील नाही.
तुम्हाला "मृत्युंजय" वाटतं तर मला "ययाति"! मृत्युंजयचा साहित्यिक दर्जा नक्कीच महान आहे. पण ययाति वैचारिक पातळीवर अजून महान वाटते.
28 Mar 2012 - 7:08 pm | विजय_आंग्रे
>>कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान कॄष्णाने नव्हे तर शिवाजी सावंत ह्यांनी दिले.<<
"सूर्यराव म्हणजे सामान्य योध्दा नव्हे. भारती जैसा कर्ण योध्दा, त्याच प्रतिमेचा असा शूर पडला."
वरिल उल्लेख "सभासद बखरीत" साल्हेरच्या लढाईत मारल्या गेलेल्या "सूर्यराव काकडे" यांच्या बाबतीत मिळतो. सभासद बखरही शिवाजी सावंतानी लिहली आहे का.?
28 Mar 2012 - 7:14 pm | यकु
पण मी काय म्हंटो,
कर्ण महान होता की कृष्ण लुच्चा होता की शिवाजी सावंतांनी हाईप केली यापेक्षा कृष्ण, कर्ण आणि शिवाजी सावंतदेखील एवढा महानपणा या सगळ्यांच्या अंगी असूनही कुणीच कुणाचं काही ** मतपरिवर्तन करु शकत नाहीत (झालं तरी काय दिवे लागणार आहेत म्हणा ;-) ) , सगळेच ज्याला जे भावतं तेच छातीला धरुन बसतात हे मजेशीर आहे.. ;-)
स्वगत: भागो, नै तो लै टोले पडेंगे... ;-)
28 Mar 2012 - 7:26 pm | sagarpdy
+१
28 Mar 2012 - 7:21 pm | विकास
या संदर्भात, दाजीशास्त्री पणशीकरांचे, "कर्ण खरा कोण होता?" हे पुस्तक देखील वाचण्यासारखे आहे.
28 Mar 2012 - 7:47 pm | योगप्रभू
कर्ण अर्जुनाइतका श्रेष्ठ धनुर्धर नव्हता.
तो हलक्या कानाचा, द्रौपदीला कायम वखवखलेल्या नजरेने बघणारा, नीच विचार करणारा आणि भर सभेत ते बोलून दाखवण्यास न लाजणारा होता. दुर्योधनाला चुकीचे सल्ले देणार्या दुष्ट चौकडीत कर्ण होताच होता.
पांडव वनवासात असताना त्यांना खिजवण्यासाठी दुर्योधन दास-दासी-वैभव-सैन्य घेऊन गेला. ती कल्पना कर्णाचीच होती. त्यावेळी चित्ररथ गंधर्वाशी झालेल्या लढाईत कर्ण दुर्योधनाला सोडून पळून गेला होता कारण चित्ररथाशी मायावी युद्धात कर्णाचा निभाव लागला नव्हता. मात्र त्याच चित्ररथ गंधर्वाला अर्जुनाने स्वतःच्या बाणांचे पाणी पाजले होते आणि जीवदान देऊन स्वतःचा मित्र बनवले होते. त्या मैत्रीला जागून चित्ररथाने अर्जुनाच्या विनंतीवरुन बांधलेल्या दुर्योधनाला सोडून दिले.
अर्थात कर्ण पराक्रमी होताच यात वाद नाही. तो निष्ठावान सूर्योपासक आणि दानवीरही होता. पण 'ढेकणाच्या संगतीने हिरा तो भंगला' अशी त्याची अवस्था झाली.
29 Mar 2012 - 3:43 am | सुहास..
आदि जोशींचे बरोबर आहे... >>>
एक दम सत्य !! महाभारत घडले तेव्हा आमचा उनकचा अध्यक्ष अॅड्या आणि योगप्रभु काका, ईतर पांडवासवे द्रोणांकडे शिकायला जात होते ;) विशेष म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण होताना, ज्या साड्या कृष्ण पुरवित होता त्या खुद्द अॅड्या ने तुळशी बागेतल्या लक्ष्मी साडी सेंटर मधुन आणल्या होत्या आणि प्रभु काकांकडे म्हणे युध्दात बाण पुरवायचं कॉन्ट्रॅक्ट होतं ;)
( मार खातय अॅड्याचा )
29 Mar 2012 - 12:10 pm | योगप्रभू
माझ्या शिक्षकांबाबत सुहास यांच्या नोंदीत थोडी दुरुस्ती करतो.
मी द्रोणांकडे शिकायला गेलो, पण ते पैसे घेऊन फक्त कौरव राजपुत्रांना शिकवत असत. इतरांना कृपाचार्य शिकवत असत. त्यामुळे द्रोणांनी मला कृपाचार्यांकडे हाकलले. मी इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासमधील असल्याचे समजताच त्यांनीही मला हाकलून दिले. त्यानंतर निराश मनःस्थितीत असताना मला मिपा नावाचे रम्य उपवन दिसले. तेथे मी सोकासुर, धम्यासुर, परासुर आदिंच्या संगतीला लागलो. पुन्हा विद्या शिकण्याची उबळ आली. आता इबीसी नको तर कास्ट सर्टिफिकिटच्या जोरावर प्रवेश मिळवून बघू म्हणून परशुरामांकडे गेलो. बोलण्याच्या नादात मी असुरांच्या संगतीत राहिल्याचे सांगताच परशुरामांनीही मला 'भ्रष्ट ब्राह्मण' म्हणून हाकलून दिले. अखेर मी सांदिपनी मुनींच्या मोफत गुरुकुलात शिकलो. तेथे पूर्वी सुदामा हा गरीब ब्राह्मणही मोफत शिकला होता.
युद्धात बाण पुरवायचं कॉन्ट्रॅक्टही माझ्या अंगाशी आले. युद्ध संपताच सगळ्यांनी बिल देण्याबाबत काखा वर केल्या. दिवाळखोर अशा स्थितीत मी वणवण भटकू लागलो. उपासमारीने माझी भूक इतकी वाढली, की मी मिपा उपवनातील एकचक्रा नगरीत शिरुन भोजन फस्त करु लागलो. लोकांनी माझे नाव बकासुर ठेवले. मध्यंतरी एकचक्रा ग्रामस्थ आणि माझ्यात समेट झाला. एकचक्रा नगरीतील सानिका-स्वप्नील, जागुताई आदी गृहिणींच्या सुंदर पाककृतींचा डबा मला मिपा उपवनात आरामात मिळू लागला. मग मी एकचक्रा नगरीतील ग्रामस्थांना छळणे सोडले. त्याऐवजी पुराणातील भंकस गोष्टी मिपा उद्यानात बागडणार्या मुलांना सांगून त्यांचे मनोरंजन करण्याचे काम पत्करले.
आता हा तपशील नीट लक्षात ठेवाल ना? :)
29 Mar 2012 - 1:52 pm | कवितानागेश
:D
28 Mar 2012 - 7:48 pm | कपिलमुनी
मृत्यूंजय शब्द्बंबाळ वाटला ..
राधेय बरेच संतुलीत अहे
28 Mar 2012 - 7:51 pm | अमेरिकन त्रिशंकू
आठवी-नववीमध्ये कधीतरी मृत्युंजयची पारायणे करून भारावून गेलो होतो पण नंतर कधीतरी पुन्हा एकदा वाचायला घेतलं पंचवीशीत तेव्हा अतिशय शब्दबंबाळ वाटलं होतं आणि अजुनही वाटतं. एखाद्या व्यक्तीला किती ग्लोरिफाय करावं ह्याचं उत्तम उदाहरण आहे मृत्युंजय म्हणजे.
अशीच थोडीफार परिस्थिती (शब्दबंबाळपणा) बाबासाहेब पुरंदर्यांच्या "राजा शिवछ्त्रपती"ची आहे.
बाबासाहेबांनी निदान त्यात काल्पनिक प्रसंग घुसडले नाहीयेत. अर्थात मृत्युंजय ही कादंबरी असल्याने शिवाजी सावंतांनी थोडेफार स्वातंत्र्य घेतले असेल काल्पनिक प्रसंग घालण्याचे.
वरील ३-४ ओळी या पूर्णपणे माझी वैयक्तिक मते आहेत.
28 Mar 2012 - 7:52 pm | मृत्युन्जय
कर्णाचे महानपण त्याचे श्रेष्ठ धनुर्धर असण्यात नाही आहे तर त्याच्या असामान्य जिद्दीत, चिकाटीत आणि शब्दाला जागण्याच्या वृत्तीत आहे.
कर्णाने त्याच्या प्रतिज्ञेतुन कधीच पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला नाही. वास्तविक काहितरी कारण काढुन इंद्राला कवच कुंडले नाकारणे किंवा कुंतीला तिच्या ४ मुलांच्या जन्माची भीक घालणे तो टाळु शकला असता.
कर्ण जसा वागला तसा तो का वागला याचे कारण शोधायचे झाल्यास त्याला जन्मभर केवळ त्याच्या सामाजिक स्थितीवरुन जी अवहेलना सहन करावी लागली त्याकडे बघायला लागेल.
ज्या काळात स्त्री ही पुरुषाची केवळ विषयवस्तु अथवा धन मानली जायची आणि त्याउप्पर पुरुषांनी दिली नाही तर जिला फारशी किंमत नव्हती त्याकाळात द्रौपदीने त्याचा तेजोभंग केला. त्याचीच परिणिती वस्त्रहरणात झाली. आजच्या काळचा विचार करता तो चक्क बलात्काराचा प्रयत्न होता पण त्या काळच्या रितीरिवाजांप्रमाणे नव्हता. त्या काळचे मापदंड आजच्या काळाला लावुन आपण महाभारतातील व्यक्तिरेखांचे मुल्यमापन करु लागलो तर कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी होते (कृष्णाने मित्रविंदेशी तर अर्जुनाने सुभद्रेशी पळवुन नेउन लग्न केले. त्यातील मित्रविंदेच्या हरणाबद्दल दुमत आहे. सुभद्रा हरणाबद्दल माझ्यामते नाही. चु. भू. द्या. घ्या. ), पांडव खूनी होते (वारणावरतात जाळलेले ५ अभागी आदिवासी आणि त्यांची आई), युधिष्ठिर आणी त्याचे भाऊ वासनांध होते (द्रौपदीबद्दल ती भावाची बायको होणार आहे हे माहिती असताना तिच्याबद्दल मनात निर्माण झालेली अभिलाषा)
यातल्या वरीलपैके प्रत्येक मुद्द्यावर किमान १०० पानी चर्चा करता येइल. दोन्ही बाजूंनी. महाभारत एवढे सरळ असले असते तर ते एवढे मोहक झालेच नसते. यातल्या प्रत्येक पात्राला काळी आणि पाढरी अश्या दोन्ही बाजू आहेत आणि त्या समजुन घेउन प्रत्येक पात्राचे मूल्यमापन केले तर बरे होइल.
अर्जुन आणु कर्ण दोघेही महान धनुर्धर होते पण तरीही अर्जुन कांकणभर सरसच होता. महाभारतात अनेक वीरांनी प्रसंगी इतरांना धोबी पछाड दिली आहे. कर्णाला सात्यकी, भीम आणि अर्जुनाने हरवले त्यर कर्णानेही या तिघांनाही हरवले (अर्जुन त्याच्या भार्गवास्त्राला घाबरुन पळुन गेला. जोपर्यंत वैजयंती शक्ती त्याच्याकडे होती तोपर्यंत त्याच्याशी युद्ध टाळले). अभिमन्युने सर्वांना हरवले पण अखेर दौशासनी कडुन हरला. भीष्मांनी सगळ्यांना हरवले पण अभिमन्युशी त्यांची एक प्रकारे टाय झाली.
कर्णही असाच काही जणांकडुन हरला, बर्याच जणांना त्याने हरवले. कृष्ण ज्याला हरवु शकलानाही त्या जरासंधाला त्याने हरवले. भीमाला जरासंधाला मारण्यासाठी १८ दिवस खर्ची करावे लागले तर कर्णाने अर्ध्या दिवसापेक्षा कमी वेळात त्याला प्राणांची भीक मागायला लावली.
युद्धात आजूबाजूला कौरवांकडचे सगळे अतिरथी पडल्यानंतर, स्वतःचा मुलगा मेल्यानंतरही तो निकराने लढला. हाती आलेल्या ४ पांडवांना जीवदान दिले, अर्जुनाला मारण्याची पराकाष्ठा केली, मुख्य म्हणजे स्वतःच्या शब्दाला त्याने जीवापाड जपले कारण आयुष्यभर सग्ळे कमावुन्देखील त्याला मिळाली नव्हती ती प्रतिष्ठा, शब्दाला जागुन त्याने ती मिळवली.
महाभारताचे वर्ण एका वाक्यात करता येइल "कुंतीच्या पाच मुलांविरुद्ध कुंतीच्या एका मुलाच्या बळावर लढले गेलेले युद्ध"
एक इंग्रजी म्हण आहे "Success is to be measured not by the positino he has achieved but by the obstacles which he has overcome to achieve that position". राजपुत्राचा शिक्का बसल्यावर बाहुबळावर जग जिंकुन घेणे खुप सोप्पे आहे. पण एका सूतपुत्राला ते केवळ बाहुबळावर शक्यच नव्हते. त्या काळची सामाजिक स्थिती बघता हे सहज लक्षात येइल की केवळ शूद्र होता म्हणुन शंभुक मारला गेला, सूत होता म्हणुन अमर्यादित शक्ती आणि सत्ता असुनही कीचक पडद्यामागे राज्य चालवत राहिला राजा नाही होउ शकला, फक्त निम्न जातीतला होता म्हणुन एकलव्याला शिक्षण नाकारले गेले आणि मग अंगठा सुद्धा गमवावा लागला. त्या समाजरचनेत समाजाच्या नाकावर टिच्चुन राज्य करायचे असेल तर, प्रतिष्ठा मिळवायची असेल तर थोडेफार खोटे बोलणे भाग आहे हे कर्ण उमजला होता. मुळात तो परसुरामांशी खोटे देखील या कारणाने बोलला की :
१. द्रोणांनी त्याला ब्रह्मास्त्र नाकारले आणि
२. परशुराम देखील केवळ ब्राह्मणांना विद्या शिकवीत.
लिहित बसलो तर मिपाची बँडविड्थ कमी पडेल त्यामुळे आवरते घेतो. पण एवढे जरुर म्हणेन की कर्ण महान नक्की होता. त्याच्या हातुन चुका घडल्या. तश्या त्या महाभारतातील सर्वच पात्रांच्या हातुन घडल्या. काहींच्या झालक्या गेला, काहींच्या चुकांना धर्माचा मुलामा मिळाला पण कर्णाच्या चुकांना चुकाच ठरवले जाउनसुद्धा त्याच्यामागे अद्भुत तेजाचे, विस्मयतेचे, दानाचे, निश्चयाचे, जिद्दीचे, विजीगुषु वृत्तीचे जे वलय आहे त्या साठी तो महान होता. युद्धात तो अर्जुनाला भारी पडला की नाही किंवा तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता की नाही किंवा तो खरोखर दानी होता की नाही हे गौण आहे. मर्त्य मानवांमध्ये तो असामान्य होते यात त्याचे महानपण आले
28 Mar 2012 - 8:35 pm | पिवळा डांबिस
अत्यंत सुरेख प्रतिक्रिया!
कर्णाच्या चुकांना चुकाच ठरवले जाउनसुद्धा त्याच्यामागे अद्भुत तेजाचे, विस्मयतेचे, दानाचे, निश्चयाचे, जिद्दीचे, विजीगुषु वृत्तीचे जे वलय आहे त्या साठी तो महान होता. युद्धात तो अर्जुनाला भारी पडला की नाही किंवा तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता की नाही किंवा तो खरोखर दानी होता की नाही हे गौण आहे. मर्त्य मानवांमध्ये तो असामान्य होता यात त्याचे महानपण आले
क्या बात है!
जियो!!!
28 Mar 2012 - 11:08 pm | सर्वसाक्षी
१००% सहमत.
28 Mar 2012 - 8:43 pm | ५० फक्त
सुंदर प्रतिसाद, अतिशय धन्यवाद, मुळ लेखापेक्षा तुमचा प्रतिसादच जास्त वाचनीय आहे. तुमच्या कडुन या विषयावर ऐकायला आवडेल, कधी संधी मिळते आहे ते बघु.
28 Mar 2012 - 8:55 pm | गणपा
प्रतिसाद आवडला रे मृत्युंजया.
28 Mar 2012 - 10:19 pm | शुचि
सुंदर प्रतिक्रिया.
"Success is to be measured not by the positino he has achieved but by the obstacles which he has overcome to achieve that position".
क्या बात है!
28 Mar 2012 - 11:49 pm | एक मुलगा
>> कृष्ण ज्याला हरवु शकलानाही त्या जरासंधाला
तुम्ही कृष्णाला तुमच्या आमच्या प्रमाणे एक माणूस समजता काय?
जरासन्धाला का मारले नाही हे तुम्हाला माहीत आहे काय?
या धाग्यावर प्रतिक्रीया करणार्या लोकाना श्रीमद भागवतम थोडीही माहीत असती तरे असे मूर्ख पणाचे प्रतिसाद आले नसते
यालाच मूर्खपणाचे मेन्टल स्पेक्युलेशन म्हण्तात
29 Mar 2012 - 10:27 am | मृत्युन्जय
तुम्ही कृष्णाला तुमच्या आमच्या प्रमाणे एक माणूस समजता काय?
देवातला माणूस समजा अथवा माणसातला देव. यापैकीच एक मानतो. तुम्ही कसे समजता त्यावर अवलंबुन आहे. एकदा मानव जन्म घेतला की त्याच्या सग्ळ्या लिमिटेशन्स सकट जगले राम आणि कृष्ण दोघेही. काळानुरुप दोघांच्या विचारसरणीत फरक होता एवढेच.
जरासन्धाला का मारले नाही हे तुम्हाला माहीत आहे काय?
जमले नाही म्हणुन मारले नाही. हंस आणी डिंभक कसे मेले माहिती आहे का तुम्हाला? त्यांना सरळ सरळ का नाही मारले? फक्त भागवतात लिहिले आहे म्हणुन एखादी गोष्ट माझ्याच्याने मान्य होत नाही. त्याबरोबर थोडाफार (फारसा करुन उपयोग नसतो नाहितर सगळे महाभारतच खोटे वाटायला लागते) विचारही करावा आणि (असल्यास) स्वतःची बुद्धीही वापरावी
या धाग्यावर प्रतिक्रीया करणार्या लोकाना श्रीमद भागवतम थोडीही माहीत असती तरे असे मूर्ख पणाचे प्रतिसाद आले नसते
मी श्रीमदभागवत, हरिवंश, महाभारत (के एम गांगुली भाषांतरित), जैमिनी भारत, गीतारहस्य, पर्व (के एल भैरप्पा), महाभारतावरच्या नावाजलेल्या जवळ जवळ सगळ्या कादंबर्या, रमेश मेनन यांचे महाभारत, युगांत, व्यासपर्व इत्यादी सर्व वाचले आहे. याउप्पर काही वाचण्यायोग्य असेल तर जरुन सांगावे. नक्की वाचेन. हे सग्ळे वाचुन हे मत बनले आहे. मृत्युंजय हे मी महाभारतावरचे वाचलेले पहिले आणि शेवटचे पुस्तक नाही. श्रीमदभागवत केवळ वाचण्याऐवजी समजुन घेतले असते तर असा मुर्खपणाचा प्रतिसाद आला नसता.
यालाच मूर्खपणाचे मेन्टल स्पेक्युलेशन म्हण्तात
याला विचार बुद्धीचा अभाव म्हणतात जो मतिमंदांमध्ये अपेक्षितही नसतो.
29 Mar 2012 - 10:58 am | प्यारे१
>>>>मी श्रीमदभागवत, हरिवंश, महाभारत (के एम गांगुली भाषांतरित), जैमिनी भारत, गीतारहस्य, पर्व (के एल भैरप्पा), महाभारतावरच्या नावाजलेल्या जवळ जवळ सगळ्या कादंबर्या, रमेश मेनन यांचे महाभारत, युगांत, व्यासपर्व इत्यादी सर्व वाचले आहे.
आपल्या वाचनाचा आदर आहे. पण... कदाचित कर्णाची व्यक्तीरेखा आपल्या मनात वर दिल्या प्रमाणे (पहिला प्रतिसाद) असेल तर ते या 'बर्याचशा' वाचनाचं आणि त्यानंतरच्या आपल्या निष्कर्षाचं फलित म्हणावं/मानावं लागेल.
मुळात व्यासांनी लिहीलेला जय नावाचा इतिहास, त्याचा हरिवंश नावाचा ग्रंथ आणि त्याचंच विस्तारीत महाभारत असा प्रवास आहे. (बरोबर ना लोक हो? )
मूळातून एखादी गोष्ट वाचण्याचं कारण असं असतं की जर आपण त्या लेखकाचे शब्द वाचले तर फक्त त्याच शब्दांचा अर्थ लावण्याचं काम आपल्यावर येतं नी खरोखरीच लेखकानं त्या व्यक्तीरेखेला नेमक्या कशा प्रकारे सादर केलं आहे ते समजू शकतं.
त्या वेळच्या सामाजिक परंपरा, चालीरिती, मान्यता इ.इ. चा आजच्या बदललेल्या काळाशी लावून त्या त्यानुसार इन्टरप्रिटेशन करण्यापेक्षा मूळ लेखकानं काय लिहीलंय ते आणि तेच आपण आपल्या बुद्धीनुसार घेतलं तर ते जास्त उपयोगी ठरतं.
बॉन्ड मूव्हीमध्ये बॉन्ड अनेक जणींबरोबर झोपतो म्हणून त्याच्यावर व्यभिचारीपणाचा शिक्का आपण लावत नाही. किंवा त्यानं केलेल्या नासधुसी बद्दल त्याच्यावर खटला देखील दाखल केला जात नाही. अनेक लोक अकारण बळी पडतात त्यांच्या खुनाची शिक्षा बॉन्डला होत नाही कारण खलनायकाला संपवणे हा मुख्य हेतू असतो. आणि त्यावर मुख्य फोकस असतो. आणि तसाच असणं अपेक्षित असतं.
खलनायकाला संपवताना खलनायकाच्या चांगल्या गुणांचा विचार आपण करत नाही. तो भलेही एखाद्या देशाच्या/ नागरिकांच्या भल्यासाठी लढा देत असला तरी तो खलनायक'च' ठरतो, ठरवला जातो.
वाल्मिकींची सीता वनात जाताना 'मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे' म्हणाल्याचं कुठं वाचलं नाहीये. पण आज आपल्याला राम त्या कारणासाठी अन्याय्य वाटतो कारण आपण गीतरामायण वाचले/ऐकलेले असते....
बघा पटतंय का!
29 Mar 2012 - 11:38 am | मृत्युन्जय
आपल्या वाचनाचा आदर आहे. पण... कदाचित कर्णाची व्यक्तीरेखा आपल्या मनात वर दिल्या प्रमाणे (पहिला प्रतिसाद) असेल तर ते या 'बर्याचशा' वाचनाचं आणि त्यानंतरच्या आपल्या निष्कर्षाचं फलित म्हणावं/मानावं लागेल.
मी कित्ती वाचले आहे हे सांगायचा तो क्षीण प्रयत्न नव्हता पण "भागवत वाचले असते तर......" या प्रतिसादाचे ते उत्तर होते. वाचयचेच आहे ना? मग फक्त भागवत का? सगळेच वाचा.
भागवत आज सग्ळ्यात करप्ट (म्हणजे नंतर भाग घुसडलेले) मानले जाते हे प्रतिसादकर्त्याला माहिती असेलच अशी आशा आहे. सगळे वाचावे, स्वत: विचार करावा, त्यातुन स्वतःचा बोध घ्यावा. सगळ्यांनी तो एकाच प्रकारे घ्यावा अशी काही सक्ती नाही. पण म्हणुन वेगळा विचार करणार्यांना मुर्ख म्हणने बौद्धिक दिवाळखोरी ठरेल.
मुळात व्यासांनी लिहीलेला जय नावाचा इतिहास, त्याचा हरिवंश नावाचा ग्रंथ आणि त्याचंच विस्तारीत महाभारत असा प्रवास आहे. (बरोबर ना लोक हो? )
अरेरे. त्या वादात नका हो पडु तुम्ही. काय फरक पडतो की काय कशाच सबसेट आहे की नाही ते?
मूळातून एखादी गोष्ट वाचण्याचं कारण असं असतं की जर आपण त्या लेखकाचे शब्द वाचले तर फक्त त्याच शब्दांचा अर्थ लावण्याचं काम आपल्यावर येतं नी खरोखरीच लेखकानं त्या व्यक्तीरेखेला नेमक्या कशा प्रकारे सादर केलं आहे ते समजू शकतं.
बरोबर बोललात,
त्या वेळच्या सामाजिक परंपरा, चालीरिती, मान्यता इ.इ. चा आजच्या बदललेल्या काळाशी लावून त्या त्यानुसार इन्टरप्रिटेशन करण्यापेक्षा मूळ लेखकानं काय लिहीलंय ते आणि तेच आपण आपल्या बुद्धीनुसार घेतलं तर ते जास्त उपयोगी ठरतं.
हेच मी वरती लिहिले आहे. आजच्या काळानुरुप त्या काळाचे मुल्यमापन करु नये.
बॉन्ड मूव्हीमध्ये बॉन्ड अनेक जणींबरोबर झोपतो म्हणून त्याच्यावर व्यभिचारीपणाचा शिक्का आपण लावत नाही. किंवा त्यानं केलेल्या नासधुसी बद्दल त्याच्यावर खटला देखील दाखल केला जात नाही. अनेक लोक अकारण बळी पडतात त्यांच्या खुनाची शिक्षा बॉन्डला होत नाही कारण खलनायकाला संपवणे हा मुख्य हेतू असतो. आणि त्यावर मुख्य फोकस असतो. आणि तसाच असणं अपेक्षित असतं.
बरोबर आहे. बॉण्डपटात बॉण्ड कधीच चुकीचा नसतो. तसेच जर कृष्णार्जुनाबद्दल म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला. अन्यथा मतमतांतरांना जागा आहे.
खलनायकाला संपवताना खलनायकाच्या चांगल्या गुणांचा विचार आपण करत नाही. तो भलेही एखाद्या देशाच्या/ नागरिकांच्या भल्यासाठी लढा देत असला तरी तो खलनायक'च' ठरतो, ठरवला जातो.
खलनायक कोण हे कसे ठरवणार?
महाभारत मुळात धर्मयुद्ध कसे?
दुर्योधन खलनायक कसा?
मुळात तोच खलनायक नसेल तर इतर कसे?
मी काय म्हणतो तो या धाग्याचा विषय नाही. वेगळा धागा सुरु करा. धुमाकूळ घालु :)
वाल्मिकींची सीता वनात जाताना 'मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे' म्हणाल्याचं कुठं वाचलं नाहीये. पण आज आपल्याला राम त्या कारणासाठी अन्याय्य वाटतो कारण आपण गीतरामायण वाचले/ऐकलेले असते....
हॅ हॅ हॅ. तुम्ही माझेच मुद्दे मांडता आहात की? दुर्योधन (आणी कर्ण) खलनायक वाटतो कारण तसे महाभारतात लिहिले आहे. त्याचे चूक की बरोबर हा विचार मूळात कोणी केला आहे का?
29 Mar 2012 - 2:13 pm | प्यारे१
>>>>दुर्योधन (आणी कर्ण) खलनायक वाटतो कारण तसे महाभारतात लिहिले आहे. त्याचे चूक की बरोबर हा विचार मूळात कोणी केला आहे का?
माझं तेच म्हणणं आहे की जर लेखकानं ते पात्र तसं रंगवलंय तर त्याला तसंच ठेवा की.... चूक बरोबर चा निर्ण य तुम्ही का घेताय?
आपली (वैयक्तिक नका घेऊ) अक्कल कुणी का पाजळावी.
शोले मध्ये रमेश सिप्पीनं अमिताभच्या पात्राला मारलं.
आजच्या काळात ठाकूरच्या विधवा बहूला नवरा मिळेल म्हणून कुणी दिग्दर्शक अमिताभच्या पात्राला जिवंत ठेवील. आणि दोन चार पोरं वीरुकडं गोष्टी ऐकायला जातील.
व्यासांना अपेक्षित त्यांनी संजयाच्या तोंडी सांगून ठेवलंय... यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर
विषय संपला ना?
तुम्हाला इन्टरप्रिटेशन करायचीत ना? करा. पण ती तुमची असतील. मूळ लेखकाची नव्हे.
29 Mar 2012 - 2:26 pm | एक मुलगा
अतिशय प्रामाणिकपणे सहमत. (कुणी व्ययक्तिक घेउ नये)
29 Mar 2012 - 2:29 pm | मृत्युन्जय
माझं तेच म्हणणं आहे की जर लेखकानं ते पात्र तसं रंगवलंय तर त्याला तसंच ठेवा की.... चूक बरोबर चा निर्ण य तुम्ही का घेताय?आपली (वैयक्तिक नका घेऊ) अक्कल कुणी का पाजळावी.
आता पुस्तक न वाचताच कोणी आपली अक्कल का पाजळावी? आणि वाचल्यानंतर मग जर स्वतःची बुद्धी वापरायचीच नसेल तर वाचन कशाला करावे? आपल्यावर राज्य करणारा गोरा साहेब म्हणाला म्हणुन हिटलर दुष्ट आणि स्वतः साहेब मात्र देवाचा अवतार होय हो? आणि स्टॅलिन देवाचा मित्र म्हणुन परमदयाळु मानायचा काय हो? लेखकाने जे लिहिले आहे त्यावर स्वतःची बुद्धी वापरावीच (असेल तर. वैयक्तिक नका घेउ)
व्यासांना अपेक्षित त्यांनी संजयाच्या तोंडी सांगून ठेवलंय... यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर
व्यासांनी स्वतः काहीच मतप्रदर्शित केलेले नाही देवा. त्यांनी फक्त कथा सांगितली. त्यात जन्मेन्जयाला जे ऐकायची इच्छा होती ते त्याला वैशंपायनांनी सांगितले. त्यांनी जेव्हा त्याला सांगितले ते सौतीने ऐकले. सौतीने जे ऐकले ते त्याने काही ब्राह्मणांना सांगितले. त्या ब्राह्मणांनी इतरांना सांगितले किंवा त्यांच्यापैकी कोणीतरी ते स्वतः लिहिले. यात व्यासांचे स्वत:चे काहीच मत नाही आहे. त्यांनी दुर्योधनाला सुष्ट ही म्हणले नाही आणि दुष्टही नाही. वेळोवेळी इतर लोक त्यांच्याबद्दल काय बोलले ते त्यात आहे. आणि वैंशंपायन *जज्ञ्मेंजयाला कथा सांगतोय म्हटल्यावर जे पात्र पांडवांबद्दल चांगले बोलले तेवढेच त्यात येणार की हो.
* जन्मेंजय = == अर्जुन -आभिमन्यु - परीक्षित - जन्मेंजय.
विषय संपला ना?
आत्ता कुठे सुरु झाला.
तुम्हाला इन्टरप्रिटेशन करायचीत ना? करा. पण ती तुमची असतील. मूळ लेखकाची नव्हे.
वर सविस्तर मतप्रदर्शन आहे.
29 Mar 2012 - 2:43 pm | प्यारे१
>>>आता पुस्तक न वाचताच कोणी आपली अक्कल का पाजळावी? आणि वाचल्यानंतर मग जर स्वतःची बुद्धी वापरायचीच नसेल तर वाचन कशाला करावे? आपल्यावर राज्य करणारा गोरा साहेब म्हणाला म्हणुन हिटलर दुष्ट आणि स्वतः साहेब मात्र देवाचा अवतार होय हो? आणि स्टॅलिन देवाचा मित्र म्हणुन परमदयाळु मानायचा काय हो? लेखकाने जे लिहिले आहे त्यावर स्वतःची बुद्धी वापरावीच (असेल तर. वैयक्तिक नका घेउ)
अधोरेखित वाक्याबाबत सहमती. मूळ पुस्तक/ ग्रंथ च (त्याची कॉपी) वाचावा. त्यात लेखकाला काय म्हणायचे आहे ते पाहावे. मुख्यत्वे काय अपेक्षित आहे ते जाणून घ्यावे. बाकीचा विषय सोडावा.
बाकी व्यासांना महाभारतकार म्हणून उगीच क्रेडिट दिले जाते नाही?
अवांतर : माणसानं मोराचा फुललेला पिसारा बघावा.... त्याचा पार्श्वभाग बघायला कशाला जावं?
29 Mar 2012 - 2:53 pm | मृत्युन्जय
अधोरेखित वाक्याबाबत सहमती. मूळ पुस्तक/ ग्रंथ च (त्याची कॉपी) वाचावा. त्यात लेखकाला काय म्हणायचे आहे ते पाहावे. मुख्यत्वे काय अपेक्षित आहे ते जाणून घ्यावे. बाकीचा विषय सोडावा.
आपल्या दोघांना तर एकच म्हणायचे आहे की. वा वा.
बाकी व्यासांना महाभारतकार म्हणून उगीच क्रेडिट दिले जाते नाही?
तर हो. अजुन २ वर्षांनी शिवाजी सावंतदेखील मृत्युंजयकार म्हणुन प्रसिद्ध पावतील की. व्यासांचा महिमा महान तर आहेच. एवढे मोट्ठे काव्य सुत्रबद्ध करणे सोप्पे थोडेच आहे भावा
अवांतर : माणसानं मोराचा फुललेला पिसारा बघावा.... त्याचा पार्श्वभाग बघायला कशाला जावं?
:) :) :) :) :D :D :D :D :D
असेच म्हणतो. मोराने पिसार फुलवला नसेल तर तो त्याला फुलवायला लावावा आणि बघावा. माणूस पार्श्वभागालाच पिसारा समजायला लागला तर मात्र पिराब्लेम आहे बर का.
30 Mar 2012 - 1:08 am | आत्मशून्य
मृत्युन्जय आपण खरच अभ्यासपुर्ण प्रतीसाद देत आहात व अनेक पैलु समोर आणत आहात. पण काही मुलभुत शंका माझ्या मनात खरोखर उरत आहेत ज्या बहुदा फारच सामान्य बुध्दी असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या मनात अजुनही आपल्या अथवा इतरांच्या अभ्यासपुर्ण माहीती नंतरही कदाचीत जशाच्या तशाच असतील.
जसं की महाभारत कोणीही लिहो कोणाच्याही फेवरमधे अथवा विरोधात लिहो पण जर त्यात श्रीकृष्णाने सांगीतलेल्या जशाच्या तशा "गीता" या ग्रंथाला/काव्याला कोणी "अनुभवांच्या वा विचारांच्या" पातळीवर सर्वोत्कृश्ट तत्वज्ञान अथवा जिवनाचे संपुर्ण सार मानायला तयार आहे काय ? याचे उत्तर हो असेल तर पुढील गोश्ट सुस्पश्ट होते की श्रीकृष्णाच्या प्रत्येक कृतीत "दम" आहे. थोडक्यात तो चुकणे अशक्य ठरते.
म्हणुनच महाभारतातील कोणत्याही व्यक्तीरेखेचे आचरण काय आहे व त्या बद्दल कोणत्या महाभागाने काय लिहले आहे, मग ते लिखाण इथे मिपावर तुम्हा आम्हा पासुन झालेले लेखन असो की अगदी या महाकाव्याच्या प्रत्यक्श प्रसवदात्याकडुन घडलेले असो आणी त्याने हे लिखाण एखाद्या विशीष्ठ बाजुच्या फेवरमधे अथवा विरोधात मुद्दम केलेले असो. आज या घडीला केवळ चर्चा ही दोन्ही बाजुंकडुन अत्यंत हीरीहीरीने अनंतकाळ कोणत्याही निर्णयावर न येता होत राहु शकते. म्हणुनच प्रत्यक्शात दुशासन कोमल स्वभावाचा होता व अर्जुन नालायक होता वगैरे वगैरे तत्सम उचल खाणार्या मुद्यांची पडताळणी प्रत्यक्ष निश्कर्शाच्या द्रुश्टीकोनातुन कुचकामी ठरते. कारण प्रत्यक्ष तिथे काय घडलं यापेक्षा जो तो एखाद्या व्यक्तीरेखेबद्दल आपला निश्कर्श काय आहे यालाच चिक्टुन राहील व वाद चिघळत राहील.
म्हणुनच या सावळ्या गोंधळात कोण सभ्य होतं? कोण चुक, बरोबर अथवा नैतीक होतं ? या शोधण्याला जी एकमेव महत्वाची गोश्ट प्रमाण उरते ती म्हणजे प्रत्येक कृतीत "दम" असणार्या अथवा कधीही न चुकणार्या अथवा अथांग जिवनाचेच न्हवे तर प्रत्येकाच्या अस्तीत्वाचे तत्वज्ञान मांडणार्या श्रीकृष्णाने साथ कोणाला दिली ? पण अर्थातच "गीता" या ग्रंथाला कोणी सार मानायला तयार नसेल व महाभारतातील व्यक्तिरेखांच्या वर्तनाबद्दल स्वतःचे निरीक्षणच अतिंम सत्य म्हणुन ग्राह्य धरत असेल तर मग सगळच पुन्हा "रिलेटीव्ह" बनतं, सामान्यांचा बराच गोंधळ वाढवतं, कारण या पध्दतीने आज सावंत पटतील तर उद्या एखाद्या महर्षीची बाजु योग्य वाटेल...
म्हणुनच इथे महत्वाचा मुद्दा हा नाही की आपल्याला कोण पटतंय काय वाटतयं तरयापेक्शाही नक्कि खरचं योग्य कोणाला व का मानायचं ? मग भलेही ते सक्रुतदर्शनी न पटो पण विरोधाभासांच्या या प्रवाहात दोन्ही बाजुनां मान्य असणारी अशी एकही गोश्ट अस्तीत्वात नाही काय जीचा वापर तोडगा निघण्यास दोन्ही बाजुनां प्रमाण म्हणुन होऊ शकेल ?
असो... विरोधाभासांची मजाही तीतकीच गोड असते ;)
31 Mar 2012 - 11:42 am | मृत्युन्जय
या धाग्याचे भरीत झाले आहे म्हणुन इथे प्रतिसाद देत नाही. सविस्तर प्रतिसाद खवत देतो
पण थोडक्यात सांगायचे झाले तर गीतेचे सार अमूल्य असे आहे. तत्वज्ञानात, व्यवहारात गीता अजोड आहे. गीत पुर्णपणे अंमलात आणली तर वेगळे कुठलेही तत्वज्ञान शिकण्याची गरज नाही.
स्वतः कृष्ण (महाभारतातील वर्णनानुसार, त्यातील माहितीनुसार. घटनाक्रमानुसार आणि या सर्वाचा नीट सांगोपांग विचार करता) एक अतिशय महान तत्वज्ञ होता, अतिधुरंधर राजकारणी होता, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा जगाच्या कल्याणाची जास्त चिंता असणार होता, प्रचंड शूर होता तितकाच पराक्रमीदेखील पण त्याहुनही महत्वाचे म्हणजे युद्धशास्त्रात सर्वांना कोळुन प्यायला होता, अतिशय हरहुन्नरी होता, कमालीचा बुद्धिमान होता, जन्मजात नेता होता पण संपत्तीची / सत्तेची लालसा नसणारा होता, म्हटल्यास व्यवहारी म्हटल्यास कपटी होता, काळापेक्षा लाख पावले पुढे होता आणि याहुन सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक कमालीच्या दृढ आणी करिष्मेटिक व्यक्तिमत्वाचा माणूस होता.
पण तरीही............ तो नेहमीच बरोबर होता किंवा अजेय होता किंवा दोषरहित होता हे मला मान्य नाही.
असो. सविस्तर प्रतिसाद नंतर सवडीने खवत देइन.
29 Mar 2012 - 2:48 pm | एक मुलगा
>>> जज्ञ्मेंजयाला कथा सांगतोय म्हटल्यावर जे पात्र पांडवांबद्दल चांगले बोलले तेवढेच त्यात येणार की हो
तुम्ही तर फारच खात्री ने सान्गत आहात हो :).......जसे काही तुम्ही जन्मेजयाला व्ययक्तीक रित्या ओळखता :)
29 Mar 2012 - 2:55 pm | मृत्युन्जय
तुम्ही ज्या खात्रीने बोलता आहात ते बघता तुम्ही कृष्णाला ओळखत असावात बहुधा. धन्य झालो. देवाला भेटलेला एक तरी माणूस मिळाला म्हणायचा.
29 Mar 2012 - 3:12 pm | एक मुलगा
हा जळपट प्रतिसाद आहे..मुद्दाला धरुन नाही. तुमची चिड दिसतेय.......... जीवनात असेच काम करत राहलात तर रवरव नर्कात कदाचित नम्बर लागेल
29 Mar 2012 - 3:15 pm | मृत्युन्जय
जीवनात असेच काम करत राहलात तर रवरव नर्कात कदाचित नम्बर लागेल
वोक्के. मग वर भेटात तेव्हाच कडकड करा ना. उगा इथे कशाला माझ्या डोक्याची मंडई करताय?
बादवे तुम्हाला रौरव नरकात असे म्हणायचे आहे काय? जे काही लिहायचे आहे ते नीट लिहा हो.
29 Mar 2012 - 3:31 pm | एक मुलगा
तुमची विद्वत्ता माहीत आहे म्हनुन मी काळजी करत नाही हो. मी चुक ही लिहिले तर तुम्हाला माहिती आहेच, म्हनुन प्रोब्लेम नाही. :)
29 Mar 2012 - 3:23 pm | मृगनयनी
माननीय प्यारे'जींचा अतिशय विचारी , अभ्यासू आणि सडेतोड प्रतिसाद!!!....
प्यारे'जी... तुमच्याबद्दल वाटणारा आदर दुणावल्या गेल्या आहे!!!!!!
कीप इट अप!!! :)
29 Mar 2012 - 11:18 am | एक मुलगा
>> जमले नाही म्हणुन मारले नाही
जे लोक शास्त्राना भौतिक पुस्तक समजुन वाचतात त्याना त्यावर टिका करण्याचा हक्कच नसतो. तुमची मूर्खता नवीन नाही. तर्क लावण्याच्या अभिमानाने पिसाळलेली मनुष्ये अशीच असतात. मला तुमच्या निरागसतेवर हासावे कि रडावे हे हि कळत नाही
29 Mar 2012 - 11:43 am | मृत्युन्जय
जे लोक पुराणांना शास्त्र म्हणून पुजतात त्यांना तर तोंड उघडण्याचाच हक्क नसावा. बुद्धी गहाण ठेवुन इतिहासाच्या आंधळ्या अभिमानाने पिसाळलेले प्राणी असेच वागतात. मला तुमच्या निर्बुद्धपणावर हसूही येत नाही आणि रडूही येत नाही.
स्वत: अतिशहाणे आणि इतर निर्बुद्ध या गैरसमजातुन बाहेर आल्यास पुढचा प्रतिसाद देणे अन्यथा आपणा दोघांचा वेळ फुकट वाया घालवु नये. तुम्ही रिकामटेकडे असाल मला इतर बरीच कामे आहेत.
यापुढे आंतरजालावर किमान सभ्यता पाळुन पर्सनल कमेंट्स केल्यात तर बरे होइल. ते जमत नसल्यात संगणक बंद करुन चिखलात लोळायला जाणे उत्तम.
असो. तुम्ही नसत्या कमेंट्स करणे थांबवणार नाही. तुम्ही तर मुर्ख आहातच. मी कशाला माझा वेळ दवडु.
काही चर्चा करायची असल्यास सांगणे अथवा आमचा रामराम. तुम्हाला मनसोक्त काय शिव्या द्यायच्या त्या द्या. मी या मुर्खपणाला प्रतिसाद देणार नाही.
29 Mar 2012 - 12:49 pm | एक मुलगा
तुम्ही स्वतला नास्तिक/अधर्मी घोषीत करा, मला तुमचे सगळे प्रतिसाद मान्य आहेत. कारण तुम्हाला हे सगळे फक्त इतिहास वाटत आहे.
तुम्ही घोषणा नाही केली तरी ते अभिप्रेत आहेच.
शास्त्र कशाला म्हणावे ते ही सान्गून द्या थोड !
29 Mar 2012 - 4:34 pm | पिलीयन रायडर
अगदीच रहावलं नाही म्हणुन...
तुम्ही असे का प्रतिसाद देताय? अकारण वाद घातल्या सारखे....
जर तुम्हाला म्रुत्यंजय ह्यांचे मत मान्य नसेल तर तुम्ही मुद्द्यावर मत द्या.. तुम्ही कशावरुन तुमचे मत बनवलेय ते लिहा..आवडेल आम्हाला दुसरी बाजु वाचायला...
पण जिथे म्रुत्यंजय एवढे सविस्तर प्रतिसाद देत आहेत तिथे तुम्ही बाकी काहीही न बोलता .... "मुर्खपणा" असे शब्द का वापरताय तेच कळत नाहिये...
अरे??
29 Mar 2012 - 5:19 pm | एक मुलगा
कारण त्यानी धर्माबद्दलच्या गोष्टीत असे लिहु नये असे आमचे मत आहे. "बलात्कारी" असे शब्द या सन्दर्भात शोभत नाहीत. ज्या बद्दल कोणालाच पुर्णपने माहीत नाही, तेव्हा निर्णय देने चुकिचे ठरते. "मुर्खपणा" वाला सोडून प्रत्येक प्रतिसाद मुद्दाला धरुणच होता. मिपावर सहा महिन्यापासुन येत राहुनही आम्ही कधी कोनाशी व्यर्थ वाद घातलेले नाहीत. पण या बाबतीत बोलणे आम्हाला कर्तव्याचाच भाग वाटला
मी म्रुत्यंजय याना कधीच मुर्ख म्हटल नाही. फक्त प्रतिसादाला मुर्खपणा म्हटले. त्यानी मात्र मला खुप वेळा मतिमन्द, बुध्दिहिन म्हटले. त्याच आम्हाला वाइट हि वाटत नाही. कदाचित या बाबतीत ते बरोबरही असतील. फक्त इतके जाणुन घ्या, वैष्णवाना असे बोललेले आवडत नाही. "जे आपल्यासाथि भगवन्त नाहीत ते दुसर्यासाठि असु शकतात याचि सामाजिक जाणिव ठेवावी, हीच अपेक्षा राहिल"
पाकिस्तानात अशी ब्लास्फेमि केलि तर थेट म्रुत्यदन्ड मिळतो. अर्थातच आम्ही त्याचे समर्थन करित नाही. पण स्वात्नत्र्याचा गैरवापर होउ नये.
29 Mar 2012 - 5:31 pm | पिलीयन रायडर
तुमची काही मते आहेत... आणि त्यांची पण...
हे बघा... तुम्हाला जे मानायचं आहे ते तत्वज्ञान तुम्ही माना.. पण दुसर्या कुणी त्यावर बोलुच नये असं कसं होइल? बर ते काही उथळ बोलत नाहीयेत.. बरच वाचन आहे त्यांच.. तुम्ही त्यांचे मुद्दे खोडुन काढा.नसेल जमत तर सोडुन द्या.. श्रद्धा मध्ये न आणुन चर्चेला वाव ठेवा...
प्रतिसादला मुर्ख म्हणण म्हणजे त्या व्यक्तीला म्हणण असं नाही का?? प्रतिसाद त्या मणसाचे विचार दाखवतात आणि एखाद्याच्या विचाराला मुर्खात काढण म्हणजेच तर त्या व्यक्तीला मुर्खात काढणं...तुम्ही सुरुवात केली आणि त्यांनी कंटाळुन शेवट असं वाचणार्याला वाटतय..
महाभारत, क्रुष्ण, कर्ण इ वर चर्चा करणे हा मला तरी "स्वात्नत्र्याचा गैरवापर" वाटत नाही.. मग मुळात जे कोणी तुमच्या श्रद्धेच्या विरोधात बोलतील ते सगळ्च तुम्हाला चुक वाटेल...
इथे बरेच जण त्यांच्या विरोधात पण लिहित आहेत.. पण कुणिही तुमच्या सारख्या भाषेत लिहिलेल नाही..
29 Mar 2012 - 5:31 pm | मृत्युन्जय
"बलात्कारी" असे शब्द या सन्दर्भात शोभत नाहीत. ज्या बद्दल कोणालाच पुर्णपने माहीत नाही, तेव्हा निर्णय देने चुकिचे ठरते.
मी कृष्णाला बलात्कारी म्हटलेले नाही हे तर त्याहुन जास्त लक्षात घ्या. स्वातंत्र्याचा गैरवापर होउ नये अशी अपेक्षा. आपण नीट वाचले तर केवळ पोरगी पळवुन नेली किंवा पळवुन नेल्यासा साह्य केले म्हणुन कृष्णाला बलात्कारी म्हणता येणार नाही असा अर्थ माझ्या वाक्यातुन निघति हे आपल्याल दिसुन येइन. मी निर्णय दिला असेलच तर कॄष्ण अर्जुन दोषी नव्हते असा दिलेला आहे ज्यासाठी मला दोष देता येणार नाही.
आपण माझ्यावार खुपच चुकीचा आरोप करत आहात आणि यास्तव जगातल्या सगळ्याच देशात मानहानीचा दावा दाखल होउ शकतो आणि आम्ही त्याचे समर्थनच करतो.
कारण त्यानी धर्माबद्दलच्या गोष्टीत असे लिहु नये असे आमचे मत आहे.
तुमची मते तुम्ही मांडलीत धन्यवाद. मला मान्य नाहित. मी लिहिणार. विषय संपला. आंतरजालावर आपल्या सल्ल्याने लोकांनी लेखन / विवेचन करावे असा आपला आग्रह का आहे हे कळत नाही?
"मुर्खपणा" वाला सोडून प्रत्येक प्रतिसाद मुद्दाला धरुणच होता. मिपावर सहा महिन्यापासुन येत राहुनही आम्ही कधी कोनाशी व्यर्थ वाद घातलेले नाहीत.
मी तर गेल्या ३ वर्षात कोणाशी व्यर्थ वाद घातलेले नाहीत मिपावर.
मी म्रुत्यंजय याना कधीच मुर्ख म्हटल नाही. फक्त प्रतिसादाला मुर्खपणा म्हटले. त्यानी मात्र मला खुप वेळा मतिमन्द, बुध्दिहिन म्हटले. त्याच आम्हाला वाइट हि वाटत नाही. कदाचित या बाबतीत ते बरोबरही असतील.
तुमची मूर्खता नवीन नाही.
आपल्या या प्रतिसादानंतर मी आपणास मुर्ख म्हटले आहे हे कृपया लक्षात घ्या.
फक्त इतके जाणुन घ्या, वैष्णवाना असे बोललेले आवडत नाही. "जे आपल्यासाथि भगवन्त नाहीत ते दुसर्यासाठि असु शकतात याचि सामाजिक जाणिव ठेवावी, हीच अपेक्षा राहिल"
कमाल आहे ब्वॉ मला तर वाटले की वैष्णव कृष्णाला मानतात मग तो बलात्कारी नाही असे म्हटल्यास तुम्हाला आवडु का नये?
पाकिस्तानात अशी ब्लास्फेमि केलि तर थेट म्रुत्यदन्ड मिळतो. अर्थातच आम्ही त्याचे समर्थन करित नाही. पण स्वात्नत्र्याचा गैरवापर होउ नये.
आपणही कडवे आणि माथेफिरु मूलतत्ववादी आहात काय? मूळात मी धर्मावर टीका केलीच कुठे आहे? मी कॄष्णाचे चारित्र्याहनन तरी कुठे केले आहे? आपण माझा प्रतिसाद नीट वाचला काय?
29 Mar 2012 - 6:03 pm | एक मुलगा
>>यास्तव जगातल्या सगळ्याच देशात मानहानीचा दावा दाखल होउ शकतो
चर्चत टिका झाली तर मानहानी. तुम्ही काय आमचि आरती ओवाळली नाही
>> मी लिहिणार. विषय संपला
मग प्रतिसादाना घाबरता का?? मी तुमच्या मला इतकेबोलण्याचि कधीच तक्रार केली नाही. चालु द्या चर्चा
>>मी तर गेल्या ३ वर्षात कोणाशी व्यर्थ वाद घातलेले नाहीत मिपावर
अभिनन्दनच आहे तुमचे यासाठी
>>तुमची मूर्खता नवीन नाही.
हे तुम्हाला उद्देशुन नव्हते. तुमच्या भुमिकेस होते
>> आपणही कडवे आणि माथेफिरु मूलतत्ववादी आहात काय?
"अर्थातच आम्ही त्याचे समर्थन करित नाही", हे तुम्ही वाचले नाही कदाचीत.
>> मी कॄष्णाचे चारित्र्याहनन तरी कुठे केले आहे?
हे तुम्ही नक्कीच केले आहे. असे आमचे मत आहे. तुम्हाला याचि तक्रार नसावी
29 Mar 2012 - 6:37 pm | पिलीयन रायडर
म्हणजे.. त्या काळाचे आणि आजचे मापदंड वेग वेगळे आहेत.. आजच्या रिती नुसार महाभारताकडे बघता येणार नाही असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे... त्यामुळे "कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी" नाहित तर ते त्या वेळेच्या रीती नुसार वागले...
हेच कदाचित त्यांनापण म्हणायचे आहे....
29 Mar 2012 - 6:53 pm | एक मुलगा
ते कळाले होते हो आणि मी तो मुद्दा उचलला ही नव्हता. तुमच्या प्रतिसादाच्या पहिले मी कुठेही त्याचा उल्लेख केला नव्हता. खालील चर्चा तर मुद्देशीरच होती
29 Mar 2012 - 7:37 pm | मृत्युन्जय
मी तुमच्या प्रतिसादांना घाबरतो आणि तुम्ही मुद्द्याचे प्रतिसाद देउ नये असे कुठेही म्हणलेले नाही.
तुमचे मत काहीही असले तरी जे मी म्हणालोच नाही (आनि जे तुम्ही सुद्धा मान्य केले आहे) ते मी म्हणालो असे तुम्ही जे म्हणत आहात ते अत्यंत चुकीचे आहे. अर्थात तुमच्या मतांवर मी पामर काय भाष्य करणार.
असो. आता पळतो कारण काही लोक माझ्या शोधार्थ फिरत आहेत असे आमच्या एका सद्मित्रांनी सांगितले आहे आणि उर्जा योग्य ठिकाणी वापरायचा सल्लासुदीक दिला आहे. तरी जयहिंद, जय महाराष्ट्र.
29 Mar 2012 - 8:05 pm | गणपा
बा मृत्युंजया कितीही प्रयत्न केला तरी पाणी वहातं होण कठीण दिसतय. ;)
29 Mar 2012 - 8:06 pm | एक मुलगा
>> मी तुमच्या प्रतिसादांना घाबरतो आणि तुम्ही मुद्द्याचे प्रतिसाद देउ नये असे कुठेही म्हणलेले नाही.
बरोबर आहे. हेच अपेक्षित आहे
>> तुमचे मत काहीही असले तरी जे मी म्हणालोच नाही (आनि जे तुम्ही सुद्धा मान्य केले आहे) ते मी म्हणालो असे तुम्ही जे म्हणत आहात ते अत्यंत चुकीचे आहे
मी अर्थाचा अनर्थ केला नव्हता. तुम्ही नाही म्हणालात
>>असो. आता पळतो
जय महाराष्ट्र. शुभ रात्री
29 Mar 2012 - 9:49 pm | शिल्पा ब
तुम्ही वैष्णव का? छान!! बाकी " तुमचा" देव अगदीच "हा" दिसतोय...नै तुमच्यासारख्या मर्त्य माणसाला त्याचं वकीलपत्र घ्यावं लागतंय म्हणुन म्हंटलं!!
असो, आता गंभीरपणे,
एक तर तुम्ही पाकीस्तानात नाहीत. तुमचा जर काही मुद्दा असेलच तर तो व्यवस्थीत मांडा. नुसत्या शिव्या देउन तुम्ही स्वत:चंच "ज्ञान" का झाकताय? तुम्ही जर धर्मांध विचारसरणीचे असाल तर हे व्यासपीठच नाही तर देशच चुकीचा आहे तुमच्यासाठी.
29 Mar 2012 - 10:44 pm | एक मुलगा
इच्चा नाही तरी आता शेवटचा प्रतिसाद करित आहे. कारण माझ्यासारख्या मुर्खामुळे वैष्णवाच नाव खराब होत आहे.
>>तुम्ही वैष्णव का? छान!! बाकी " तुमचा" देव अगदीच "हा" दिसतोय...नै तुमच्यासारख्या मर्त्य माणसाला त्याचं वकीलपत्र घ्यावं लागतंय म्हणुन म्हंटलं!!
देवाला तर कोणि कितिही शिव्या दिल्या तरि काही फरक पडणार नाही.
>> एक तर तुम्ही पाकीस्तानात नाहीत.
तुम्ही सगळे प्रतिसाद वाचले नाहीत.
>> नुसत्या शिव्या देउन तुम्ही स्वत:चंच....
शिव्या नाही हो दिल्या...एकही शिवी नाही वरील प्रतिसादात !
26 Nov 2013 - 5:46 pm | आरोह
खालील उतारा काहि प्रकाश टाकू शकेल काय??जाला वरिल चार्चा
""Jarasandh Some how wanted to Take up Mathura as a Vengeance for widowing his daughters. So He attacked the city of Mathura again and again. Krishna could have killed Jarasandh Easily. But the problem was Jarasandh, could be killed only by a physical Duel with him like wrestling, and Jarasandh never gave a chance for this. And if at that instance Jarasandh was to be Killed, His Prajas, and his supporters in Mathura (Which he did have as he was the Father in law of their Old King Kansa - Thoe who enjoyed in Kansas Rule.) would start continuing the war. Krishna Knew this. Though Krishnas Narayani Sena had the Power to defeat Jarasandh How much ever times as necessary it was not advisable.
If a country is going to be constantly at war, how do you expect its people to Live in Peace And Harmony? It will Worsen the living condition of People and The Happiness of the Prajas would be Lost. Krishna Understood this well. His main aim was the happiness of his Praja rather than Killing Jarasandh.
So he decided to shift His dwelling from Mathura to Dwaraka.
In most instances it is mistook that Krishna did some thing like Mohamed Bin Tuglaq, In making his entire people shift from Mathura to Dwarka. But the Fact is, Mathura was a smaller place and Krishna had planned well before taking such shifting steps as to not affect any of his Prajas Livelihood. Dwaraka is a well Planned city. These can be refereed to in Bagavatham, Dasama skandham.
People can ask Why, Krishna, at that time itself call Jarasandh to a Wrestling. One main reason behind is, If Krishna had done such a thing, People would have said that, Krishna was going behind people to fight and finds pleasure in Killing People. The next thing is, He wanted to show the strength of Bheem. Moreover, he liked to give Jarasandh a chance for a Living, As Krishna Thought, Jarasandh was born to Good Parents, so After all, he might be good, except for his vengeance over Krishna, Which any Father in law might Have. ""
29 Mar 2012 - 12:57 am | मोदक
सुंदर प्रतिक्रिया... :-)
29 Mar 2012 - 1:04 am | शिल्पा ब
प्रतिसाद अगदी १००% आवडला.
बाकी खर्रखुर्र महाभारत कुठे वाचायला मिळेल, गेला बाजार इंटरनेटावर त्याची एखादी प्रत मिळेल का हे विमेंनी सांगावं जेणेकरुन आम्हाला आमचं ज्ञान थोडंसं वाढवता येईल. धन्यवाद.
29 Mar 2012 - 10:45 am | मृत्युन्जय
ज्याला आज मूळ महाभारत म्हणतात त्याचे इंग्रजी भाषांतर किसारी मोहन गांगुली यांनी केले आहे. त्याची पीडीफ प्रत जालावर उपलब्ध आहे. हवी असल्यास मला सांगावे विरोपपत्रातुन धाढुन देइन.
तळटीपः चांगले ३००० पानी पुस्तक आहे. :)
29 Mar 2012 - 10:48 am | प्रचेतस
महाभारताची प्रमाण प्रत भांडारकर प्राच्य विद्या संशोधक मंडळाने केली आहे ना?
बहुतेक ठिकाणी संदर्भ म्हणून तीच वापरली जाते.
29 Mar 2012 - 5:11 pm | मृत्युन्जय
नाही बोरी प्रत वेगळी. भांडारकर मधील तज्ञांनी अभ्यास करुन असे निष्कर्ष काढले की महाभारतात बर्याच गोष्टी नंतर घुसडण्यात आल्या आहेत. त्यांची काटछाट करुन त्यांनी एक सुधारित संक्षिप्त आवृत्ती प्रसिद्ध केली जी त्यांच्या मते मूळ लेखनाशी प्रामाणिक आहे. त्यांची मतेही बर्यापैकी ग्राह्य मानली जातात.
महाभारताच्या कथेतील तपशील देशाप्रमाणे बदलत गेले आहेत. इंडोनेशियन महाभारत वाचुन तर चक्रावुन जाशील. त्यात शल्याला अनन्य महत्व आहे. कारण त्यानुसार तो अर्जुन, कर्ण आणि दुर्योधन असा तिन्हींचा सासरा आहे. तसेच त्या कथेनुसार कर्ण आणि अर्जुन युद्धाआधी एकदा भेटले आणि कृष्णाने अर्जुनाला कर्णाबद्दल सत्य सांगितले. त्यावेळेस कर्णाने अर्जुनाला विजयी होण्याचा आशिर्वाद दिला. :)
इंडोनेशियन महाभारतात स्थूनकर्ण नावाच्या बाणाचा देखील उल्लेख आहे जो केवळ युधिष्ठीराकडे होता. त्यामु़ळेच तो शल्याला मारु शकला. आपल्याकडे हाच बाण कर्णाच्या भात्यात असल्याचा उल्लेख आहे. :)
29 Mar 2012 - 6:44 pm | परिकथेतील राजकुमार
हे घे :-
आणि आपले डोके आपट ह्याच्यावरती.
तुला आता उर्जा पार्कात (जुनी पेशवे पार्क) नेऊन उर्जा कुठे आणि कशी सन्मार्गी लावावी ह्यावरती एक लेक्चर द्यायला हवे. च्यायला जो वाद घालायला निघतानाच "माझेच बरोबर आणि मी म्हणेन तेच खरे" असे ठरवुनच आला आहे, त्याच्यासमोर तू कितीही ज्ञानप्रदर्शन केलेस तरी उपयोग शून्य.
बाकी तू आमच्या श्रद्धास्थानांना 'बलात्कारी' म्हणाला असल्याने, आमचे काही कार्यकर्ते काळा रंग, एक गाढव, रिकामे डबडे आणि फटाक्यांची माळ घेउन तुला शोधत आहेत.
29 Mar 2012 - 7:40 pm | मृत्युन्जय
काळा रंग, एक गाढव, रिकामे डबडे आणि फटाक्यांची माळ
काळा रंग: माझ्या गाडीची नंबर प्लेट अशीही खराब झाली आहे. उपयोगी पडेल.
एक गाढवः समदु:खी , समविचारी मित्र मिळेल
रिकामे डबडे: सकाळची सोय झाली
फटाक्यांची माळ: दिवाळीचा थोडा खर्च वाचला
सज्जन अहिंसक गांधी मोड समाप्त
30 Mar 2012 - 9:05 am | प्यारे१
वा .... वा .... वा....!
<<<फू बै फू फेम टाळ्या वाजवू स्वप्निल जोशी मोड>>> ;)
29 Mar 2012 - 1:31 pm | निनाद मुक्काम प...
ब ह्यांनी अत्यंत मोलाचा प्रश्न विचारला कि खरे खुरे महाभारत कुठे मिळेल?
मुळात. खरे खुरे महाभारत नक्की कोणते ?
हे ज्यावेळी घडले तो काळ काही हजार वर्षापूर्वीचा
त्या काळी जे घडले ते व्यासांनी सर्वप्रथम लेखणीतून साकारले. आता मूळ महाभारताची प्रत कोणती? ह्यावर सुद्धा एक लेख पडू शकतो
मात्र हजारो वर्षात त्यात अनेक लेखकांनी आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेनुसार त्यांचा नजरेतून हे महाभारत लिहिले.
अलीकडच्या शतकातील उदाहरण द्यायचे तर दाजी पणशीकर ( नाट्य सम्राट पणशीकर ह्यांचे जेष्ठ बंधू व ह्या शतकातील संस्कुत भाषेचे प्रकांड पंडित .त्यांचे सामना मधील सदर खूपच वाचनीय असते )
किंवा इरावती कर्वे व शिवाजी सावंत ह्यांनी आपल्या आवडत्या व्यक्ती रेखाच्या अनुषंगाने महाभारत व त्यातील अनेक कथानके लिहिली व ते वाचून आज आभासी आणि वास्तविक जीवनात अनेक जण तात्विक वाद घालत असतात. मात्र एक गोष्ट साफ विसरतात कि भारताचा पुराव्याने शाबित होईल असा इतिहास माझ्या मते अशोकाने जे स्तंभ उभारले कि लेणी बनवली तेव्हापासून सुरु होतो. ( जाणकार ह्या बाबत अधिक भाष्य करतील )
ह्या आधीच्या गोष्टी म्हणजे निव्वळ दंतकथा
ह्याचा अर्थ महाभारत व रामायण घडलेच नाही असे नाही मात्र आज आपल्याला जे माहित आहे तेच महाभारत ओरीजनल आहे हे आपण पुराव्याने शाबित करू शकत नाही. तो श्रद्धेचा भाग आहे.
एक उदाहरण देतो. टिपू सुलतान ह्या विषयो समस्त भारतीयांना म्हणजे कर्नाटक सोडल्यास काय माहित होते ह्यावर प्रवाद निर्माण होऊ शकतात. मात्र संजय खान ह्याने टीवी वर ह्या सुलतानाला ज्या रीतीने सादर केला की माझ्या बालवयात असतांना हा सुलतान म्हणजे इंग्रजांचा कर्दनकाळ ,हिंदू मुस्लीम ऐक्याचा कट्टर पुरस्कर्ता अशी एक भंपक इमेज निर्माण झाली होती.
आज पानिपतच्या लढाया किंवा पहिले, दुसरे महायुध्द, भारताची स्वातंत्र्य चळवळ ह्या विषयावर जर वाद विवाद झाले तर त्यामागील दावे हे पुराव्याने शाबित होऊ शकतील कारण ह्या घटना पाहिलेल्या व्यक्तींनी बखर किंवा लेखन करून ते कालखंड जतन केले आहे. आज पानिपत ह्या पुस्तकातील निर्मितीमागील संधर्भ ग्रंथ पहिले तर दोन्ही बाजूने केलेले लिखाण वाचून पानिपतची निर्मिती झाल्याचे कळते. पुरंदरे ह्यांनी शिवचरित्र लिहितांना हेच केले आहे.उदा शाहिस्तेखान आणि तुटकी बोटे हि घटना कोणीही नाकारू शकत नाही कारण शाहिस्तेखानाची रोजनिशी हा सबळ पुरावा किंवा महाराजांचा राज्याभिशेष हि वस्तुस्थिती आहे कारण पुरंदरे ह्यांनी त्याचे बहुतेक वर्णन हे महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या इंग्रज वकिलांचे त्याच्या कंपनीला केलेले रिपोर्टिंग खुद पुरंदरे ह्यांनी लंडन मध्ये जाऊन वाचले आहे. त्यावर आधारित आहे.( आजही हॉलंड मध्ये लाखो अशी कागदपत्रे तत्कालीन भारतीय राजनैतिक घटनांवर आधारित आहेत. त्यावर जर संशोधन झाले तर नव इतिहास समोर येईन असे खुद पुरंदरे म्हणतात. नुकतेच एका विदुषीने इंग्लंड मधील वृत्तपत्रात सुरत लुटीचे वर्णन वाचून त्यावर लेख लिहिला तर अफजाखन खान व कोथळा हि भाकडकथा नसून ती वाघनखं आजही इंग्रजानाकडे संग्रही आहेत. त्यांचे काही वर्षापूर्वी मुंबईत प्रदर्शन मांडले होते.
आज पाकिस्तानात जिना ह्यांची काही हस्त लिखिते व भाषणे ह्यांचा आधार घेत असा दावा तेथील प्रसारमाध्यमे करत आहेत कि पाकिस्तानची निर्मिती हि मुस्लामांच्या अस्तित्वासाठी नव्हती.
मुळात हिंदुस्थानात मुसलमानावर म्हणजे सामान्य जनतेवर अजिबात अन्यान्य नव्हता. मात्र राजकीय व आर्थिक सूत्रे हि हिंदू लोकांकडे होती. व पंजाब व बंगाल मधील मुस्लीम बहुल प्रांतात तेथील जमीनदार व मोठ्या धेंडांनी स्वताचा प्रांत तेथे स्वतःची मोनोपोली किंवा स्वतःचे अस्तित्व निर्माण होण्यासाठी कवी इकबाल ह्यांना पाठिंबा दिला.व इक्बाल ह्यांनी ह्या चळवळीचे नेतृत्व त्यांच्या समाजातील सुशिक्षित व विजनवासात गेलेल्या जिना ह्यांना दिले. ह्याला इंग्रजांनी फुस दिली कारण साम्यवादाच्या विरुद्ध छोटी धर्मावर आधारित राष्ट्रे हा तोडगा त्यांच्या मनात होता म्हणुनच ज्यू राष्ट्र व मुस्लीम राष्ट् ह्यांना गांधी ह्यांचा विरोध होता.
ह्यांचा अर्थ गांधी साम्यवाद मानत होते असे नव्हे. ह्यावर सविस्तर परत कधीतरी
तेव्हा मतितार्थ एवढाच उदारणार्थ राज कि उद्धव ह्यावर सरस कोण ह्यावर मत मांडण्यासाठी अत्यंत योग्य व्यक्ती म्हणजे त्यांना बालपणापासून पाहणारे शिवसैनिक.
आता वृत्तपत्रातून आलेले लिखाण वाचन जर मी ह्यावर मत व्यक्त केले तर तो मूर्खपणा ठरेल.
सरत शेवटी मी वी स खांडेकर ह्यांचे उदाहरण देईन. त्यांनी ययाती ह्या कांदबरीचा शेवट मूळ पुराणातील कथेहून निराळा केला. ह्यावर झालेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले कि माझ्या मते ययाती ह्यांच्या व्यक्तिरेखेचे तर्क शुद्ध विवेचन केले तर जो ज्या रीतीने आपल्या जीवनात वागला असेल त्याबद्दल मी अनुमान मांडले आहे. म्हणून हि कादंबरी वास्तविकतेच्या दिशेने झुकते. व तिला जनाश्रय मिळाला.
तेव्हा माझ्यामते आज उपलब्ध असलेले महाभारत हे त्या लेखकांचे महाभारतातील व्यक्तिरेखेवर त्याकाळातील सामाजिक नितीमुल्ये ह्यांच्याकडे त्यांचा पाहण्याचा स्वतंत्र असा दृष्टीकोन आहे.किंबुना ह्यात त्या लेखकांची स्वतःची मते व विचार व त्यावर आधारित महाभारतातील पात्रांचे वर्तन अवलंबून आहे.
म्हणूनच आपण सर्वांनी आजच्या काळातील नीती अनीती ./ न्याय ,अन्याय ह्यावरील मापदंड निकष मानून त्याकाळातील घटनांवर चर्विचरण करू नये ( ते करण्यासाठी अनिवासी ,निवासी .मुंबई पुणे किंवा गांधी गोडसे असे अनेक हुकमी विषय आहेत.
29 Mar 2012 - 1:40 pm | परिकथेतील राजकुमार
आवडेश.
29 Mar 2012 - 1:58 pm | मृत्युन्जय
खरेच सुंदर प्रतिसाद
29 Mar 2012 - 1:59 pm | स्पा
निनाद फारच सुंदर रे...
चायला.. आता हा प्रतिसाद वाचूनही कोणाला वादविवाद करावासा वाटला.... तर तो गाढवपणाच ठरेल
29 Mar 2012 - 2:40 pm | स्मिता.
अतिशय सुंदर प्रतिसाद दिलाय निनाद! आवडला.
29 Mar 2012 - 3:03 pm | प्रीत-मोहर
प्रतिक्रिया खूप आवडल्या गेली आहे.
29 Mar 2012 - 3:03 pm | प्रीत-मोहर
प्रतिक्रिया खूप आवडल्या गेली आहे.
29 Mar 2012 - 5:01 pm | ५० फक्त
अतिशय सुंदर प्रतिसाद निनाद, खुप आवडला. धन्यवाद.
30 Mar 2012 - 4:48 pm | महानगरी
महाभारताचे इंग्रजी रुपांतर ह्या दुव्यावर मिळेल
http://www.holybooks.com/mahabharata-all-volumes-in-12-pdf-files/
उतरवुन घेता येतील अशा पिडिफ वह्या आहेत. हे भाषांतर /रुपांतर प्रताप चंद्र रॉय यांनी केलेले आहे.
29 Mar 2012 - 10:05 am | अमृत
|कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी होते
हे कसे काय माझ्या माहितीप्रमाणे कृष्ण आणि अर्जुन यांनी प्रियंवदा व सुभद्रा यांना मर्जी विरूद्ध पळवून नेले नाही. लिखाणाच्या ओघात काही च्या काही लिहावे काय???? इतरांनीपण असल्या फालतू विधानांवर डोळेझाक कारावी याचे आश्चर्य वाटले.
या विधानावर तीव्र आक्षेप. प्रतिक्रीया देताना संयम बाळगावा व कुणच्या धार्मिक भावना 'आधुनीक विचरांच्या' नावाखाली दुखावल्या जाणार नाही याचा कटाक्ष ठेवावा एव्हडेच सुचवू इच्छितो.
अमृत
29 Mar 2012 - 10:13 am | पैसा
फक्त ते प्रियंवदा ऐवजी मित्रविंदा असे वाचावे.
29 Mar 2012 - 10:40 am | मृत्युन्जय
या विधानावर तीव्र आक्षेप
मी स्पष्ट लिहिले आहे की मित्रविंदेला पळवुन नेण्याबद्दल दुमत आहे. मित्रविंदा कृष्णाची आत्येबहिण होती आणि विंद आणि अनुविंद त्याचे मामेभाऊ. हे नंतर कृष्णाच्या हातुनच शहीद झाले. काही स्त्रोतांप्रमाणे रुक्मिणीसारखेच मित्रविंदानेही त्याला पळवुन नेण्याचे साकडे घातले तर काही स्त्रोतांप्रमाणे कृष्णाने तिला स्वयंवरातुन तिच्या आणि तिच्या भावांच्या मर्जीविरुद्ध उचलुन नेले.
सुभद्रा हरण तर बळानेच झाले होते. त्याला कृष्णाची संमती होती पण बलरामाची आणि सुभद्रेची नव्हती. तिचे लग्न दुर्योधनाशी ठरते आहे हे देखील अर्जुनाला माहिती होते.
अंबा, अंबिका आणी अंबालिका यांना देखील भीष्माने पळवुन नेले होते.
महाभारतात लग्नाचे जे ८ प्रकार सांगितले आहेत त्यातील पिशाच्च विवाह सोडुन बाकी सर्व विवाहांना समाजमान्य मानाचे स्थान होते. राक्षस विवाहा (वरील उदाहरणे) क्षत्रियांत मानाची मानली जात मुलीच्या बापाला पैसे देउन भार्या विकत घेण्याची पद्धत मद्र देशात होती जी काही ठिकाणी रुढ होती मात्र उत्तरेकडील हस्तिनापुर, पांचाल आदि देशात त्यांना कमी मानाचे स्थान होते. या गोष्टीवरुनच कर्णाने शल्याचा अपमान केला (शल्याने कर्णाचा तेजोभंग करायचा प्रयत्न केल्यानंतर)
बाकी माझे खालील वाक्य नीट वाचा. मी अर्जुन आणि कृष्ण बलात्कारी होते असे म्हटलेले नाही आहे.
त्या काळचे मापदंड आजच्या काळाला लावुन आपण महाभारतातील व्यक्तिरेखांचे मुल्यमापन करु लागलो तर कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी होते (कृष्णाने मित्रविंदेशी तर अर्जुनाने सुभद्रेशी पळवुन नेउन लग्न केले. त्यातील मित्रविंदेच्या हरणाबद्दल दुमत आहे. सुभद्रा हरणाबद्दल माझ्यामते नाही. चु. भू. द्या. घ्या. ),
अजुन काही चर्चा करायची असल्यास खव मध्ये जरुर करुयात कारण तो या धाग्याचा विषय नाही. धन्यवाद.
29 Mar 2012 - 12:54 pm | एक मुलगा
+११११११११
>> त्याला कृष्णाची संमती होती पण बलरामाची आणि सुभद्रेची नव्हती.
तुम्ही काय बोलताय साहेब
29 Mar 2012 - 1:11 pm | मृत्युन्जय
When I heard that Subhadra of the race of Madhu had, after forcible seizure been married by Arjuna in the city of Dwaraka
या वाक्याचे भाषांतर बहुधा बळजबरीने पळवुन नेले आणि लग्न केले असाच होतो. किसारी मोहन गांगुली भाषांतरित महाभारतातुन उचलले आहे हे.
खालील परिच्छेद वाचा, कृष्ण स्वतः म्हणतो आहे की एखाद्या बाईला बळजबरीने पळवुन नेणे आणि तिच्याशी लग्न करणे हे क्षात्रधर्माला अनुसरुन आहे. हे ज्ञान तो अर्जुनाला स्वत:च्या बहिणीच्या बाबतीत देतो आहे:
'O bull amongst men, self-choice hath been ordained for the marriage of Kshatriyas. But that is doubtful (in its consequences), O Partha, as we do not know this girl's temper and disposition. In the case of Kshatriyas that are brave, a forcible abduction for purposes of marriage is applauded, as the learned have said. Therefore O Arjuna, carry away this my beautiful sister by force, for who knows what she may do at a self-choice.
हे पण वाचा:
The son of Kunti, afflicted with the shafts of the god of desire, suddenly rushed towards that Yadava girl of faultless features and forcibly took her into his car. Having seized that girl of sweet smiles, that tiger among men proceeded in his car of gold towards his own city (Indraprastha).
इथे पण कुठे सुभद्रेची संमती दिसत नाही. उलट बळजबरी दिसते.
पुढे वाचा, सुभद्राहरण झाले आहे हे कळल्यावर देखील कृष्ण शांत आहे हे बघुन बलरामाने त्याला काय विचारले:
Then Rama, that oppressor of foes, spoke unto Vasudeva, saying, 'Why, O Janardana, sittest thou, gazing silently? O Achyuta, it was for thy sake that the son of Pritha had been welcomed and honoured by us. It seemeth, however, that that vile wretch deserved not our homage. What man is there born of a respectable family that would break the plate after having dined from it! Even if one desireth to make such an alliance, yet
remembering all the services he hath received, who is there, desirous of happiness, that acts so rashly? That Pandava disregarding us and thee too hath today outraged Subhadra, desiring (to compass) his own death. He hath placed his foot on the crown of my head. How shall I, O Govinda, tamely bear it? Shall I not resent it, even like a snake that is trodden upon? Alone shall I today make the earth destitute of Kauravas! Never shall I put up with this transgression by Arjuna.' Then all the Bhojas, Vrishnis, and Andhakas, present there, approved of everything that Valadeva had said, deeply roaring like unto a kettle-drum or the clouds.'"
वरील परिच्छेदातुन स्पष्ट होते की बलरामाला सुद्धा सुभद्राहरणकांडा बद्दल काहीही माहिती नव्हती. तोही प्रचंड चिडला होता.