मराठी साहित्यातल्या असामान्य कलाकृतींची जर यादी करायची म्हटले तर ती शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय” शिवाय सुरुही होणार नाही आणि संपणार देखील नाही. याच कादंबरीने लोकांना महाभारत ये एका महान ग्रंथाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनाने पहाण्यास प्रवृत्त केले. कर्ण किती महान होता हे याच पुस्तकामुळे लोकांना कळू शकले. आयुष्यभर अवहेलना सोसणाऱ्या कर्णासाठी, वाचताना नकळतच एक आदराची जागा आपल्या मनात बनते. एवढा दानशूर असूनदेखील भगवंत कृष्ण त्याचाशी एवढे निर्दयीपणे का वागले? नको नको म्हणत असताना देखील त्यांनी अर्जुनाला नि:शस्त्र कर्णावर बाण चालवण्यावस का भाग पाडले असेल? पु. ल. देशपांडेंचा ही लेखनात एका ठिकाणी पु. ल. म्हणतात की “कृष्ण देखील कधीतरी कर्णाबरोबर चीडीचा डाव खेळला असे मला वाटते”.
मला स्वतंत्रपणे विचार करताना असे वाटते की ज्या प्रकारचा मृत्यू श्री कृष्णांनी कर्णासाठी ठरवला तो कदाचित बरोबरच होता. अनेक वेळेला त्यांनी अर्जुनाला पाठीशी घातले हा देखील एक कृष्णानितीचाच भाग होता. असे मला वाटते. या सर्व गोष्टीत अर्जुनाला वाचवण्यापेक्षा त्यांचा कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान देण्याचा त्यांचा हेतू असावा असे मला वाटते.
एक विचार सर्वांनी करून पहा की जर अर्जुनाने कर्णाला सरळ युद्धात हरवले असते तर कर्णाला आज कोणी महान म्हटले असते का? किंवा युद्धात रथाचे चाक जमिनीत रूताल्यावर ते जमिनीतून बाहेर काढणे हे त्या वेळी महत्वाचे होते का? कर्ण रथाचा वापर न करता लढू शकत नव्हता का? जेंव्हा अर्जुन बाण चालवत होता तेंव्हा कर्णाने रथाचे चाक मोकळे करायचे सोडून धनुष्य का नाही उचलले? या प्रश्नांचे उत्तर मिळवायचा कोणी कधी प्रयत्न केला आहे का? मला वाटतं की कर्णाला देखील कृष्णांचा हा डाव कळला असावा म्हणूनच त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न नाही केला.
अर्जुन आणि कर्ण यांमध्ये नि:संशय रित्या कर्ण जास्त महान धनुर्धर होता. परंतु त्याच्या आयुष्यात त्याने अनेक चुका देखील केल्या होत्या. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला कपटाने मारण्यात कर्ण देखील होता. अभिमन्यू चे कवच मागून भेदण्याचे कामही त्याचेच. परशुरामाशी खोटे बोलून दिव्या अस्त्र मिळवणारा कर्ण देखील हाच होता. ध्युतामध्ये पांडवांवर मोहिनी टाकून त्यांना कपटाने हरवनाऱ्या कौरवांच्या बाजूने कर्ण लढला कारण काय तर त्याच्या पडत्या काळात दुर्योधनाने त्याला मदत केली. पण याच कर्णाने कधी दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी हा कर्ण शांत राहिला कारण काय तर द्रौपदीने त्याला साकडे घातले नाही? हा युक्तिवाद तर कधीही न पाटण्याच्या पलीकडचा वाटतो.
तरीही श्री कृष्णांनी त्याला नि:शस्त्र असताना अर्जुनाकडून मृत्यू आणविला. याचमुळे आज कर्णाला सहानुभूती तरी मिळते. लोक आजही सर्वकालीन महान धनुर्धर म्हणूनच उल्लेख करतात. जर श्री कृष्णांनी सरळ युद्धात कर्णाला मृत्यू दिला असता तर आज “मृत्युंजय” चा शेवट आणि एकंदर संपूर्ण विषयाच पूर्ण पणे वेगळा असता असे मला वाटते.
प्रतिक्रिया
29 Mar 2012 - 1:57 pm | एक मुलगा
(फक्त बलरामाना माहित नसल्याचे मला माहित होते ..असो..)
जर तुम्ही महाभारताच्या या प्रतिला खरे मानत असाल तर भागवताबद्दल का शन्का आहे.
त्यातल्या प्रत्येक भागाचि विषयवस्तु एकच आहे (जर तुम्हाला काही भाग नन्तर टाकलेली वाटत असेल तर...). जरासन्धाला मारणे जमले नाहि ....असे म्हणणे म्हणजे स्वताच्या आवडीणे काही भाग सत्य मानुन घेणे आणी काही भाग असत्य.. नास्तिकता सिध्द करणारे हे वाक्य आहे.
29 Mar 2012 - 2:39 pm | मृत्युन्जय
भागवतात आणी महाभारतात जेव्हा अंतर पडते तेव्हा महाभारत प्रमाण मानावे लागते. कारण भागवत बरेच नंतर लिहिले गेले आहे.
भागवत किती एकांगी आहे याची अनेक उदाहरणे देता येतील. त्यापैकी एक द्यायचे झाल्यास शिव - कृष्णाची लढाई. शिव पुराणात अगदी उलटी गोष्टदेखील वाचायला मिळते.
असो. मी नास्तिक नाही हे मिपावरचा पक्का नास्तिक पण सांगेल. :)
असो बर्याच गोष्टी वाचुन त्याची गोळाबेरीज केली आहे त्यामुळे काही भाग खरा वाटतो काही वाटत नाही. हे सगळे म्हणून मग मी स्वत:च्या तर्कावर तासले आणि जो काही प्रॉडक्ट आला तो मांडला.
असो. कशाला उगाच भांडायचे. झाली ४००० वर्षे त्याला आता (हा सुविचारीपंणा थोड्याच वेळात गायब होइल आणी परत थोड्याच वेळात मी परत भांडायला (अर्र्र्र, चुकलं चुकलं. चर्चा करायला) सुरुवात करेन बहुधा)
29 Mar 2012 - 2:54 pm | एक मुलगा
म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार " जरासन्धाला मारणे जमले नाही" हेच का??
(काही प्रोब्लेम नाही, फक्त होय किवा नाही सान्गा.. आपल्या वाचणाचा आदर आहेच :) )
29 Mar 2012 - 3:17 pm | मृत्युन्जय
होय.
कृष्णाचे मल्लनैपुण्य लक्षात घेता कदाचित जमलेही असते. पण जरासंधाने त्याला रणछोडदास पदवी घ्यायला लावली हे खरे. आता ती कालयवनाची कृपा असेही तुम्ही म्हणु शकता. पण कृष्णाला जमले नाही हे खरे. जमलेच नसते असे काही म्हणत नाही.
29 Mar 2012 - 3:27 pm | एक मुलगा
कळाल्या तुमच्या भावना, आता तुम्ही आणी मी दोघेही शान्तपणे कामाला लागुया :)
29 Mar 2012 - 10:50 am | निश
मुळात पाडंवांचच्या वडिल जे पांडु राजा , त्याने वनवासात जाताना राज्य हे दान केल होत त्याच्या भावाला . म्हंजे कौरवानाच ते दान केल होत म्हंजे राज्याचा त्याग केला होता. अस असताना जे राज्य दान म्हणुन दिल ते च राज्य पांडव परत मागत होते. ते मुळातच चुक होत.
कर्ण ह्याच्या बद्दल तुम्हि जे विवेचन केल आहेत ते योग्यच आहे.
अपमानित झालेला माणुस रागाच्या भरात जे करेल तेच कर्ण ह्याने केले ते म्हंजे पांडवांचा द्वेष.
मुळात महाभारत हे वेदव्यास ह्या नी लिहिल आहे आणि ते पांडवांवर जास्त माया करणारे होते. म्हणुन महाभारत हे जेत्यानी लिहिलेल आहे. त्यामुळे ते जेत्यांच्या बा़जुच आहे.
12 Dec 2013 - 1:47 am | संदीप चित्रे
हा प्रतिसाद अत्यंत आवडला त्यामुळे न राहवून दाद देतोय!
असेच उत्तम प्रतिसाद दिसले की खर्या अर्थाने एखादी चर्चा जीवंत होते.
बाकी चालू द्या :)
12 Dec 2013 - 1:49 am | संदीप चित्रे
कृपया माझा प्रतिसाद उडवून टाकावा ही संपादकांना विनंती !!
28 Mar 2012 - 8:06 pm | विजय_आंग्रे
छान प्रतिक्रिया!
28 Mar 2012 - 9:23 pm | स्वछन्दि
उत्तम प्रतिसाद.....
मृत्युन्जय यान्चि प्रतिक्रिया खुप अभ्यासपुर्वक..
28 Mar 2012 - 10:10 pm | अशोक पतिल
मूळ महाभारतात कर्ण ही व्यक्तीरेखा व्यासानी त्रोटक अशी लिहीलेली आहे. त्यानुसारअर्जुन हा निश्शय सर्वश्रेष्ठ धनुर्धर व वीर होता . नन्तर मात्र इतर गोष्टी प्रविष्ट केल्या गेल्या असे वाटते .इमेज लार्ज्र देन लाइफ असे कर्णा विषयी झालेले वाट्ते. तो हेकट, अहकारी होता हे वेळोवेळी त्याने केलेल्या वल्गनाच दर्शवतात .
28 Mar 2012 - 11:38 pm | दादा कोंडके
कोणे एके काळी 'मृत्युंजय' भारावल्या सारखं वाचून काढलं होतं. शोण रथामागून 'दादा, दादा' म्हणत मागं पळतानाच्या सीनला तर हुमसून हुमसून रडलो होतो. :)
पण आता वरील लेख आणि प्रतिसाद कुठल्यातरी गोष्टीतल्या दोन पात्रांविषयी हमरी-तुमरीवर येउन चर्चा केल्यासारखे वाटतायेत. वयाचा पर्रिणाम दुसरं काय...
29 Mar 2012 - 5:49 pm | जगदिश देशमुख
दादा कोंडके ला जस वाटल तश्या हुबेहूब माझ्या पण "मृत्युन्जय" वाचल्या नंतर च्या भावना होत्या, भारावून गेलो होतो.
कोणे एके काळी 'मृत्युंजय' भारावल्या सारखं वाचून काढलं होतं. शोण रथामागून 'दादा, दादा' म्हणत मागं पळतानाच्या सीनला तर हुमसून हुमसून रडलो होतो.
वयाचा पर्रिणाम दुसरं काय...
एव्हढाच नाही तर मी एक चांदीच "धनुष्य" करून गळ्यात घातल होत, लोकांना मी कट्टर शिव-सैनिक आहे अस वाटत होत आणि येत जाता कुठल्याही नदीच्या पाया पडत होतो.
असो ..चर्चा चालू द्या
28 Mar 2012 - 11:48 pm | यकु
मृत्यूंजयाचा प्रतिसाद उत्तम आहेच याविषयी वाद नाही.
पण त्याच्याही प्रतिसादानंतर वेगळ्या बाजू मांडणारे तसेच विस्तृत प्रतिसाद अपेक्षित होते, आहेत.
योगप्रभू यांचा तेवढाच काय तो त्रोटक प्रतिसाद आला आहे.
29 Mar 2012 - 1:38 am | आत्मशून्य
बाकी त्यावेळच्या जातीच्या राजकारणाचा फारसा अभ्यास नाही पण अशी धारणा आहे की कर्णाचा जन्म हा मुळातच एखाद्या राज्याचा वारस म्हणून झालेला नसल्याने तत्कालीक समाजव्यवस्थेनुसार तो कोणत्याही राज्याचा वारस ठरत नाही. **
असो, फालतु मुद्यांवर खल करत मिपाचा वेळ घालवण्यापेक्षा आपण मुख्य गोश्टच (रुट कॉझ) समजुन घेऊया, म्हणजे आपल्या दानशुर व शुरवीर कर्णाचा घात नक्कि कोणी केला याचा परामर्श होऊ शकेल. थोडक्यात कर्णाची व्यथा काहीही असो म्हणजे समाज रचना अथवा जातीचं राजकारण असो, त्याच्या बाबतीत सर्वात मुख्य संकटाला सुरुवात ही एका स्त्रिच्या स्वभावाच्या विचीत्र वर्तनातील परीपाकाने झाली ही तर काळ्या दगडावरील रेघ.
थोडक्यात स्त्रिया पुरुषांना कशा कायमचं गोत्यात आणतात त्यांच्या छळाला, त्रासाला, र्हासाला कारणीभुत असतात याचं क्लासीक उदाहरणच होय. पण मी म्हणतो अहो कीती दिवस पुरुषांनी स्त्रि कडुन असा एखादा कठोर अन्याय सहन करत आयुष्य होरपळुन घ्यायचं ? अहो महाभारत काळापासुन पुरुषांवर अन्याय होतो आहे ज्यात महारथी कर्णसुध्दा आयुष्यभर होरपळुन निघाला आहे याला वाचा कधी फुटणार आहे की नाही ? या आजच्या मीतीला अतीशय ज्वलंत बनलेल्या विषयावर जाणकारांनी नक्किच उजेड टाकवा. व कर्णाने जे कश्ट एक पुरुश म्हणुन सोसले (खरं तर त्याचं अख्ख आयुष्यच स्त्रिमुळे धुळीस मिळालं, प्रचंड अन्यायाला सामोर जावं लागलं )त्या बलीदानाला न्याय द्यायचा प्रयत्न समस्तांनी करावा ही विनंती.
**जर त्याच्या आजोबाला (कुंतीचे वडील) वारस असेल तर, अथवा कुंतीला भाउ असेल तर.
29 Mar 2012 - 5:20 am | शिल्पा ब
यासाठी तुम्ही युयुत्सुंना विचारावं...या विषयावर त्यांचा प्रचंड म्हणजे खुपच अभ्यास आहे. (पण आजकाल ते म्हणे देवादिकांवर अभ्यास करताहेत.
29 Mar 2012 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार
अपेक्षित वाद विवाद !
बाकी इतिहास हा कायम जेत्यांकडून लिहिला जात असल्याने, आपापल्या बुद्धी नुसार आपण स्वतःचा अभ्यास वाढवून सत्य काय ते शोधावे.
29 Mar 2012 - 12:29 pm | योगप्रभू
राक्षस पद्धतीने आवडत्या राजकन्येला पळवून न्यायचे, असले प्रकार मस्तवाल पुरुष नेहमी करत. परंतु महाभारत संपल्यानंतरच्या काळात स्त्रियांनी 'सौ सुनार की एक लोहार की' असा दणका द्यायचे ठरवले. बाणासुराची मुलगी उषा हिने चक्क श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध यालाच पळवून नेले. कुठे तर कामरुप देशाची राजधानी प्राग्ज्योतिष्पूरला (आज लोक त्याला गुवाहाटी म्हणतात). त्यानंतर हे प्रकार कमी झाले. स्त्रियांनी असेच मच्छिंद्रनाथांनाही आपल्या राज्यात डांबून ठेवले होते. (स्त्रियांनी कळपाने राहावे आणि काही पुरुषांना पाळावे, असा सल्ला नुकताच एका धाग्यावर दिलेला दिसला. पण भारतात हे पूर्वीच घडले होते, याचा हा पुरावा) बिचार्या गोरखनाथांना शेवटी स्वतः जाऊन मच्छिंद्रनाथांना सोडवावे लागले. अलिकडच्या काळात पृथ्वीराज चौहानाने संयोगितेला पळवले, तेवढे उदाहरण वगळता अशी घटना घडल्याचे स्मरणात नाही.
इसको कहते है असली 'महिला सबलीकरण' :)
29 Mar 2012 - 12:34 pm | शिल्पा ब
हे माहीत नव्हतं. :) डेंजरस बायका होत्या म्हणायच्या!!
29 Mar 2012 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार
डेंजरस आणि बायका ही द्विरुक्ती आहे.
29 Mar 2012 - 3:16 pm | निनाद मुक्काम प...
ह्यावर लहानपणी पुस्तक वाचले आहे.मुळात कुष्णाचा मुलगा हा पूर्वजन्मीचा मदन त्याच्या प्रेमात झुरणारी त्यांची पत्नी रती मग हा पुत्र मोठा झाल्यावर एका फिल्मी कथेसारखे जन्मोजन्मीच्या प्रेमी युगालांचे मिलन, त्यात एका असुर विलन.
आणि ह्यांचा मुलगा अनिरुध्ध ( प्रेमाचा देवता मदन त्याचा पुत्र म्हणजे...)
त्याच्यापुढे आजकालचे हिरो म्हणजे पानीकम
पुढे बाणासुर व कृष्ण ह्यांचे युद्ध ह्यात बाणासुर ह्यांच्या मदतीला त्यांचे दैवत शंकर उतरल्याने विष्णूचा अवतार कृष्ण आणि शंकर ह्यांच्यात युद्ध झाले. हे पाहून नारदाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या.
तेव्हा माझ्या मनात विचार आला आता त्रिशूल विरुद्ध सुदर्शन चक्र उभे टाकले तर कोण जिंकणार ?
मग मोहिनी अस्त्र टाकून कृष्ण शंकरांना निद्रेस धाडतो. व ते जेव्हा जागे होतात. तेव्हा बाणासुर खलास व नायक व नायिका ह्यांचे मिलन शंकर प्रसन्न
- पूर्वीच्या काळी त्रिशूल , सुर्दर्शन चक्र , वज्र , ब्रमास्त्र, नारायनास्त्र पाशुपास्त्रे .अशी काही अमोघ अस्त्रे होती.
ह्यात सर्वात दाहक म्हणजेच सर्वात श्रेष्ठ शत्रे कोणते ह्यावर काथ्याकुट करूया का? बलात्कारी कोण म्हणजे त्याकाळात बलात्काराची व्याख्या ह्यापेक्षा शास्त्रतेज वर्धित करणारा विषय आपण हाताळूया का ? माझे चिमुकले मनगट बाहु आणि वितभर छाती आताच फुरफुरायला लागली आहे.
( ह्या निमित्ताने वैष्णव आणि शैशव मिपाकर एकमेकांना भिडतील ) मी नारदा सारखा सरत शेवटी मूळ लेखाच्या हून मोठा प्रतिसाद देईन ( साईज मेटर, कंटेंट काय ..)
अती अवांतर
अजून एक किडा डोक्यात आला कि कुरुशेत्रात अस्त्रे वापरायला बंदी होती असे उडत उडत वाचले आहे. पण जर दिव्यास्त्रे वापरायची मुभा असती तर कोणाचे पारडे जड ठरले असते?
म्हणजे ह्या निमित्ताने कोणाच्या भात्यात कोणती शत्रे होती ह्याचे जनरल नॉलेज तसेस कोणत्या शस्त्राला कोणता उपाय किंवा प्रती उत्तर होते ह्या विषयी माहिती मिळेल तसेस कलियुगात ह्या अस्त्रांचे पुनर्जीवन करून मग हिंदू राष्ट्रे एवढीच महत्वाकांक्षा न ठेवता समस्त जग केशरी कसे करता येईन ह्यावर चिंतन करता येईन.
माझ्या लहानपणी रामायण मलिक सुरु असतांना आम्ही खराट्या च्या काडीला फुलपुडीचा दोरा बांधून गांडीव तयार करत असू .मग दोन सेना बनवून गच्चीवर आमचे युद्ध चालायचे. मग '' अब , संभाल मेरा अग्न्यास्त्र ,ह्यावर , उसपे मेरा पर्जनास्त्र असे हिंदीतून संवादाच्या फैरी झडत.पुढे महाभारत सुरु झाल्यावर सोसायटी मध्ये पिताश्री , माताश्री अश्या आरोळ्या घुमू लागल्या.
आजकाल राजकारणावर लिहिणे त्यातही आंतराष्ट्रीय मला अजिबात मजा येत नाही. सुका वी मिस यु, ( ह्या चिमण्यांनो ..............)
हे म्हणजे अती अती अवांतर
29 Mar 2012 - 1:00 pm | सहज
एका पुढे एक गहन प्रश्न...
सहज गुगळे
29 Mar 2012 - 4:12 pm | राघव
बराच उशीर झाला प्रतिसाद द्यायला.. असो. मागे दुसर्या एका धाग्यावर या संदर्भात प्रतिसाद दिलेला होता तो मांडावासा वाटतो -
मृत्युंजय वाचल्यावर असे होणे साहजिक आहे. मीही ते अनुभवलेले आहे. पण माझ्या मते ती श्री शिवाजी सावंतांच्या लेखणीची कमाल आहे. कादंबरी कलाकृती म्हणून नि:संशय श्रेष्ठ आहे.
यावर उतारा म्हणून धनंजय वाचावी. लेखक राजेन्द्र खेर.
दोन्ही शेवटी कादंबर्याच. दोन्हींमधे उणीवा आहेत. पण त्यांनी अनुक्रमे कर्ण/अर्जुन यांचे उदात्तीकरण करतांना आपापल्या बाजू खूप सशक्तपणे मांडलेल्या आहेत. असो.
मला महाभारत म्हणजे नेहमीच अॅनालिसिसचा विषय वाटत आलाय. अर्थात् महाभारत खरेच घडले होते असे गृहितक मी धरलेले आहे. :)
पांडवांचा वनवास काळ एकूण किती असावा बरे?
पांडूच्या निधनानंतर कुंती पांडवांना परत घेऊन आली त्यावेळी युधिष्ठीराचं वय बहुदा १०/१२ असावं.
वारणावतानंतर द्रौपदी स्वयंवर अन् इंद्रप्रस्थ वस्तीस्थान होईतोवर ते परागंदाच होतेत. किती काळ होता त्याचा अंदाज नाही मला. इंद्रप्रस्थ वस्तीनंतर नियमभंगा साठी दंड म्हणून अर्जुन पुन्हा एकटा वनात निघून गेला ते वेगळे.
द्युतानंतरही पुन्हा १२+१ वर्षे वनातच.
या सर्व वेळी कौरव काय करत होतेत बरे?
राजमहालातच होतेत. सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेलेला कर्णही.
कौरवांवर झालेले अन्याय -
- पांडव परत आल्यानंतर युधिष्ठीराची युवराजपदासाठी लागलेली वर्णी.
- भीमानं लहानपणापासून केलेली सर्वांची धुलाई.
- द्रोणांनी अर्जुनाला दिलेली विशेष वागणूक [अश्वत्थाम्याला सुद्धा]
- कर्णाला पदोपदी मिळणारी हिणवणारी वागणूक, द्रौपदी स्वयंवरातला अवमान विशेष.
- धृतराष्ट्रांना अंध म्हणून द्रौपदीनं हिणवणं
- कर्ण कवचकुंडल हरण
- भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन यांचं अन्याय्यपद्धतीनं झालेलं वंधन.
एकलव्यावर झालेला अन्याय हा कौरवांवर झालेला अन्याय असं म्हणता येत नाही.
पांडवांवर झालेले अन्याय -
- युधिष्ठीराला युवराजपद देण्याची धृतराष्ट्रांची अनिच्छा
- भीमावर केलेला विषप्रयोग
- वारणावत
- पांडवांचा पक्ष घेणारे भीष्म, द्रोण, विदुर सर्वांचे महत्त्व शून्य करणे
- कुरुराज्याचे दोन भाग करणे
- खांडववनाचा भाग राज्य म्हणून मिळणे
- द्युत प्रसंगी शकुनीचे कपटाचलन, वस्त्रहरण, अनुद्युत
- कृष्णशिष्टाई विफल करणे.. पाच गावंसुद्धा न देण्याची भूमिका
- अभिमन्यूचं अन्याय्य पद्धतीनं झालेलं वंधन
- पांडवांचा समूळ नाश करण्याचा दुर्योधनाचा अश्वत्थाम्याकरवी शेवटचा प्रयत्न.
विराटपर्वात एकट्या अर्जुनावर सर्व सेनेनिशी केलेले आक्रमण अन्याय या सदरात घालण्याचा मोह होतो पण बृहन्नडेच्या रूपात कुणीही न ओळखणे शक्य आहे.
संजय जेव्हा शिष्टाईसाठी पांडवांकडे जातो, तेव्हाही केवळ एकच गोष्ट बोलतो.. धर्म पाळा. का?
दुर्योधनानं धर्माचा जेवढा कुशलतेनं वापर करून घेतलेला आहे तो कुणीही केलेला नाही. माझ्यामते दुर्योधनासारखा अत्यंत कुशल राजकारणी कृष्णाशिवाय कुणीही नाही. किंबहुना कृष्ण नसता तर केवळ राजकारणाच्या जोरावर दुर्योधनानं पांडवांना हरवलं असतं.
जनसामान्यांचा बुद्धीभेद करून जनमत आपल्या बाजूनं वळवण्याचं प्रभावी अस्त्र जे आजचे राजकारणी वापरतात, ते त्यानं किती अचूकपणे तेव्हा वापरलेलं आहे याचं राहून राहून कौतुक वाटतं. मला वाटतं केवळ कथा म्हणून सुद्धा महाभारताकडं बघीतलं तर ऑल टाईम ग्रेट खलनायक पात्रांमधे दुर्योधनाला मात देणारं क्वचितच कुणी असेल. :)
राहिली कर्णाची कवचकुंडलं अन्यायानं काढून घेण्याची गोष्ट. ते चूकच आहे अन् अन्यायच आहे. पण ती असती तर अर्जुनानं पाशुपतास्त्र चालवलं असतं काय अन् महाभारत युद्धात काय झालं असतं हे केवळ कल्पनाभरारीचेच काम आहे. कवचकुंडलं असतांना देखील तो ३ दा पराभूत झालेला आहे की. निष्पक्षपणे ते मान्य करायला त्रास का व्हावा?
अर्जुनही पराभूत झालेला आहे. पण शंकरांशी झालेले युद्ध सोडल्यास महाभारत युद्धा नंतर दोनदा. तोवर आणिक प्रसंग असेल तसा तर माझ्या वाचनात आलेला नाही.
राघव
29 Mar 2012 - 4:32 pm | प्यारे१
>>>कौरवांवर झालेले अन्याय -
- पांडव परत आल्यानंतर युधिष्ठीराची युवराजपदासाठी लागलेली वर्णी.
राजा पंडु मुळातच राजा म्हणून हस्तिनापूरा वर सिंहासन ग्रहण करुन होता. त्याच्या अनुपस्थितीत धृतराष्ट्राने विश्वस्त म्हणून राज्य कारभार सांभाळलेला होता.
पंडु मृत्यू पावल्यावर कुंती आणि पांडव परत आल्यावर त्याला युवराज म्हणून बसव णं हेच उचित होणार होतं. यात कौरवांवर अन्याय कसा झाला?
- भीमानं लहानपणापासून केलेली सर्वांची धुलाई.
मान्य. त्याबरोबरच कौरवांनी भीमावर केलेला विषप्रयोग हा अन्याय नाही?
- द्रोणांनी अर्जुनाला दिलेली विशेष वागणूक [अश्वत्थाम्याला सुद्धा]
पांडवांचा यात काय हात्/सहभाग? अर्जुन वॉज अ ब्राईट स्टुडंट. ;)
- कर्णाला पदोपदी मिळणारी हिणवणारी वागणूक, द्रौपदी स्वयंवरातला अवमान विशेष.
कर्णाला स्वयंवरात निमंत्रित केले गेले होते का हा मूळ प्रश्न आहे.
- धृतराष्ट्रांना अंध म्हणून द्रौपदीनं हिणवणं
मान्य.
- कर्ण कवचकुंडल हरण
आपणच म्हटल्याप्रमाणं कर्ण यासहित पराजित झाला होता. तरी देखील मान्य. युद्धात सर्व काही क्षम्य असतं असं म्हणताना सर्वांना हा नियम असला पाहिजे.
- भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन यांचं अन्याय्यपद्धतीनं झालेलं वंधन.
युद्धात सर्व काही क्षम्य असतं असं म्हणताना सर्वांना हा नियम असला पाहिजे. डिट्टो. अभिमन्यूचा मृत्यू हे उदाहरण आहेच. लाक्षागृहात सगळ्यांना पाठवून पेटवून देणं हे नीतीत बसत होतं?
29 Mar 2012 - 9:14 pm | राघव
कौरवांच्या व त्यांची बाजू मानणार्यांच्या दृष्टीनं त्यांच्यावर झालेले अन्याय. तसेच पांडवांच्या बाबतीतही.
हे अगोदरच न लिहिणे ही माझी चूक झाली. पूर्णपणे मान्य. :)
राघव
29 Mar 2012 - 5:16 pm | ५० फक्त
च्यायला सचिननं एक शतक काय केलं, लागले सगळे जुने मुडदे उकरायला,
तो ९९ वर अडकला होता तेच बरं होतं, निदान एक महत्वाचा आणि मुख्य म्हणजे कल्पनाशक्तीचे तारे न तोडता, पाहिलेल्या मॅचचे रेकॉर्ड घेउन, आकडेवारीचे पुरावे घेउन वाद घालायला चांगला वर्तमानातला विषय होता. असो.
29 Mar 2012 - 5:32 pm | जगदिश देशमुख
दादा कोंडके ला जस वाटल तश्या हुबेहूब माझ्या पण "मृत्युन्जय" वाचल्या नंतर च्या भावना होत्या, भारावून गेलो होतो.
कोणे एके काळी 'मृत्युंजय' भारावल्या सारखं वाचून काढलं होतं. शोण रथामागून 'दादा, दादा' म्हणत मागं पळतानाच्या सीनला तर हुमसून हुमसून रडलो होतो.
वयाचा पर्रिणाम दुसरं काय...
एव्हढाच नाही तर मी एक चांदीच "धनुष्य" करून गळ्यात घातल होत, लोकांना मी कट्टर शिव-सैनिक आहे अस वाटत होत आणि येत जाता कुठल्याही नदीच्या पाया पडत होतो.
असो ..चर्चा चालू द्या
29 Mar 2012 - 5:33 pm | जगदिश देशमुख
दादा कोंडके ला जस वाटल तश्या हुबेहूब माझ्या पण "मृत्युन्जय" वाचल्या नंतर च्या भावना होत्या, भारावून गेलो होतो.
कोणे एके काळी 'मृत्युंजय' भारावल्या सारखं वाचून काढलं होतं. शोण रथामागून 'दादा, दादा' म्हणत मागं पळतानाच्या सीनला तर हुमसून हुमसून रडलो होतो.
वयाचा पर्रिणाम दुसरं काय...
एव्हढाच नाही तर मी एक चांदीच "धनुष्य" करून गळ्यात घातल होत, लोकांना मी कट्टर शिव-सैनिक आहे अस वाटत होत आणि येत जाता कुठल्याही नदीच्या पाया पडत होतो.
असो ..चर्चा चालू द्या
26 Nov 2013 - 10:57 am | सागरलहरी
आपणाला विनन्ती आहे की कै. प्रा. अ. दा. आठवले (नन्तरचे स्वामी वरदानन्द भारती) यान्चे आक्षेपान्च्या सन्दर्भात महाभारत हे पुस्तक जरुर अगदी जरुर वाचावे. यामधे त्यानी इरावती कर्वे, पेन्डसे, इ. च्या महाभारत विषयक लिखाणाचा साधार पन्चनामा केला आहे. त्या करिता त्यानी मूळ भारतामधील श्लोकान्चाच बहुशः आधार घेतला आहे. तर्कसन्गत उत्तम युक्तीवाद प्रतिवाद यासाठी हा ग्रन्थ मिळवुन सर्वांनीच जरुर वाचावा.
27 Nov 2013 - 12:33 pm | प्रमोद देर्देकर
या सृष्टीत सगळे कसे गूढ आहे. जे आहे ते सर्व आभासी आहे. आपण काल काय केले ते काही जणांना आठवत नाही तर एवढ्या वर्षापूर्वी काय घडले ते कसे बरे छातीठोकपणे सगळे सांगू शकतो. शक्या अश्क्यतेच्या बर्याच गोष्ठी आहेत. तसेच निनाद याने म्हटल्या प्रमाणे महाभारत नंतर ही असे अनेक विषय आहेत ज्या वर उहापोह होवू शकतो . अहो अन्तोजी ची बखर , वि. का. राजवाडे , बाबा साहेब पुरेंदरे यांचे इतिहासातील योगदान माहित आहेच. पण कोणालाही शिव जन्माविषयी का बरे संभ्रम असावा. कारण आज आपण शिवाजी महाराजांची जयंती २ वेळा साजरी करितो. अर्थात या विषय वरही २ ही बाजूने जोरदार चर्चा घडतील. अशा अनेक घटना आहेत ज्या बाबतीत आपणास नोंदी करण्यास भरपूर वाव/ साधने असताना सुद्धा आपण त्याबाबत संभ्रम आहोत. जसे लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू , नेताजी सुभास चंद्र बोसे यांचे पुढे काय झाले . वरील सर्व प्रतिसाद बघता जो धिंगाणा चालला आहे त्याने काय बरे सध्या होणार आहे जे झाले ते झाले आपण याकुच्या म्हणण्या प्रमाणे
कुणीच कुणाचं काही ** मतपरिवर्तन करु शकत नाहीत (झालं तरी काय दिवे लागणार आहेत
हे पटते. निनाद, मृत्युन्जय - यांचा प्रतिसाद खूप छानमृत्युन्जय:- तुम्हला व्य. ने. केला आहे.
11 Dec 2013 - 12:54 pm | म्हैस
लाखो लायक, हुशार लोक जगात आहे ज्यांना केवळ so called खालच्या जातीचे म्हणून दाबून टाकण्यात आले अहे. म्हणून प्रत्येकाने अधर्माची साथ द्यायची म्हणली तर काय होईल ? कर्णाला फक्त श्रेष्ठ धनुर्धर म्हणवून घ्यायचं होतं . त्याच्या वाटेला अवहेलना आली म्हणून इतरांच्या वाटेला ती येवू नये असा कुठलाही प्रयत्न त्याने केला नहि. अर्जुन, कृष ह्यांच्याशी त्याने विनाकारण वैर ओढवून घेतलं . अनेकवेळा कपटा ने वागला . केवळ दानशूर आहे म्हणून तो मोठा होत नहि. दान सुधा सत्पात्री असावं लागतं . बली राजा सुधा दानशूर होता कि . पण त्याच्या अव्यावहारिक दानशूर पणामुळे जगाला वाचवायला भगवंतांना बटूक रूप घ्यावा लागला न.
तरीही कोणाला कृष्ण कपटी वगेरे वाटत असेल तर, आई वडील जसे मुलांच्या भल्यासाठी , रक्षणासाठी कधीतरी कठोर वागतात तसाच कृष्ण जगत्पिता असल्यामुळे त्यांना कधी कठोर व्हावं लागलं हे लक्षात घ्यावं .
हे दोन्हि दोन्ही प्रतिसाद देणाऱ्या मुर्खाला, अज्ञानाने ग्रासलेला बालिश समजून माफ करावे अशी श्री कृष्णाना प्रार्थना