काशीबाई काशीबाई
काशीबाई काशीबाई तुमच्या साडीचा कसोटा घट्ट खोचा
वारा येईल भसाभसा तर होईल मोठा लोचा ||धृ||
अशी कशी हो तुम्ही नेहमीच करता घाई
कामावर यायची उगाच करता नवलाई
भांडी निट घासा नाहीतर आणाल त्यांना पोचा ||१||
तुम्ही सांगून बोलून रजा घेत जा हो
न सांगता दांडी मारू नका हो
निट मी सांगते नका असे भांडू कचाकचा ||२||
नगरसेवक पुतण्या अन हवालदार तुमचा भाचा
तालेवार व्याही असून एक नाही काही कामाचा
सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडी तुम्हां सांगती गौर्या वेचा ||३||
बरं जावूद्या शेजारीण काय बोलली ते जरा सांगा
चुगलखोर कळलावी मेली घेतेय माझ्याशी पंगा
बोलणं आपलं दोघींचं काय झालं सांगू नका वचावचा ||४||
- पाषाणभेद
प्रतिक्रिया
17 Mar 2012 - 11:06 pm | दादा कोंडके
यमक "चा" असल्यामुळे शेवटची ओळ वाचली आणि हुश्श झालं! :)
18 Mar 2012 - 12:37 am | अत्रुप्त आत्मा
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट प्रसंग चित्रण... :-)
18 Mar 2012 - 7:04 am | पैसा
कवितेच्या पहिल्या दोन ओळी वाचून जरा घाबरले होते, पण मग कडवी नेहमीच्या ओळखीतली पाहिली आणि बरं वाटलं.
18 Mar 2012 - 8:27 am | चौकटराजा
ज्याला जमते त्याला कशावरतीही उत्तम कविता करता येते याचे हे उदाहरण .मस्त !