जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
28 Jul 2008 - 9:53 am

जॉर्ज कॉल्डवेल - भाग १
जॉर्ज कॉल्डवेल - भाग २
जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३

(पूर्वसूत्रः असं शिकता शिकता चार महिने कसे उलटले ते आम्हाला समजलंही नाही.... आणि दुसरा कसला विचार करायला जॉर्जने आम्हाला अवसर तरी कुठे ठेवला होता म्हणा!! आणि मग एकदा ती वेळ आली....... काळरात्रीची भयाण वेळ.........)

आमच्या अंतिम परीक्षेचा दिवस येऊन ठेपला. खरं तर परीक्षा दुपारी बारा वाजता होती. आम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन बसलो होतो पण जॉर्जचा पत्ताच नव्हता.......

एक वाजता जॉर्ज उगवला. आमची नाराजी जाणून म्हणाला,

"मला माहीत आहे की मला यायला उशीर झालाय! पण तुम्ही काळजी करु नका. मी तुम्हाला अगदी भरपूर वेळ देणार आहे. असं बघा, मला हा पेपर सोडवायला तीन तास लागतील. आत्ता वाजलाय एक. मी तुम्हाला पाच तास, अगदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ देतो. मग तर झालं समाधान!"

आमचं समाधान व्हायच्याऐवजी पोटात खड्डा पडला. स्वतः जॉर्जला सोडवायलाच तीन तास लागणार म्हणजे तो पेपर किती कठीण असेल!!! प्रश्नपत्रिका वाचल्यावर आमची ती भीती खरी ठरली.....

जॉर्ज प्रश्नपत्रिका वाटून तिथून निघून गेला. पुढले पाच तास आम्ही त्या पेपराशी झुंजत होतो....

आम्ही म्हणजे सर्व इंटरनॅशनल विद्यार्थी!!! अमेरिकन पोरं-पोरी पहिल्या एका तासातच हताश होऊन पेपर फेकून निघून गेली होती......

त्यांनी बहुदा हा पेपर सोडवण्याऐवजी मॉलमध्ये नोकरी करणं पसंत केलं असावं! हो, त्यांच्यापाशी तो ऑप्शन होता! आमच्यापाशी दुर्दैवाने नव्हता....

सहा वाजून गेले तरी जॉर्ज परत आला नव्हता.....
आमचा पेपरही सोडवून पूर्ण झाला नव्हता....

अखेर रात्री आठ वाजता जॉर्ज उगवला....

"आर यू डन?" त्यानं विचारलं. आम्ही नकारार्थी मान डोलावली...
"ओके, मी तुम्हाला अजून अर्धा तास देतो. त्यानंतर तुमचा पेपर माझ्या ऑफिसच्या दाराच्या फटीतून आत सरकवा", राजा उदार झाला आणि अर्धा तास जास्त दिला.....

पण इथे सात तास झुंजून आमचे मेंदू इतके थकले होते की आणखी अर्ध्या तासात आम्ही काय नवीन उजेड पाडणार होतो? असो. यथावकाश आम्ही आमचे पेपर त्याच्या केबिनमध्ये सरकवून निघून गेलो...

त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. काही खायची वासना तर नव्हतीच! माझा पेपर पूर्ण सोडवून झाला नव्हता! माझाच काय पण कोणाचाच!!

आता भवितव्य काय? रात्रभर हेच विचार डोक्यात घोळत होते. या अभ्यासक्रमात आत्तापर्यंत अडीच-तीन वर्षे खर्ची घातलेली होती. मग आता अंतिम फळ काय? काहीच नाही?
आणि आता घरी काय कळवायचं? डिग्री न घेताच परत इंडियाला जायचं? पराभूत होऊन?
नाही, नाही, काहीही झालं तरी असं होऊ देणार नाही मी.....

डोळ्यासमोर एकदम त्या प्रयोगशाळेच्या बाहेर असलेले खड्डे चमकले! म्हणजे जॉर्ज अगदीच थट्टा करत नव्हता तर!!!
अगदी ते खड्डे कोणी वापरले नसतील पण त्या तोडीचा विचार अगदीच कुणा विद्यार्थ्याच्या मनात आलाच नसेल का?

छे, छे, काहीतरीच!!!

मनातले विचार मी झटकून टाकले. बेसिनकडे जाऊन तोंडावर नळाचं गार पाणी मारलं.....
लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी म्हणून टीव्ही लावला पण दोनच मिनिटांत वैतागून बंद केला.......

नुसतं पोटातच नव्हे तर सबंध शरीरात काहीतरी डुचमळत होतं.... हिंदकळत होतं...... बाहेर पडण्याची वाट शोधत होतं......
पलंगावर पाय पोटाशी घेऊन मी पडून राहीलो! अति-तणावाने ओकारी येण्याची वाट पहात.....

पहाटसुद्धा साली खूप खूप उशीरा आली.....

दुसर्‍या दिवशी मला संध्याकाळपर्यंत काम होतं. कामात लक्ष नव्हतंच!! माझं काम झाल्यावर रात्री मी डिपार्टमेंटमध्ये जाउन पहातो तर जॉर्जने त्याच्या केबिनच्या दरवाजावर रिझल्ट चिकटवलेला होता. आम्ही पाच-सहा विद्यार्थीच असल्याने आमचे (अपूर्ण!) पेपर तपासायला त्याला एक दिवसही पुरला होता. रिझल्ट म्हणजे काय तर आमची नांवं आणि समोर पास/फेल लावलं होतं. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या रिझल्टबद्दल चर्चा करायची असल्यास अपॉइंटमेंटचे टाईम-स्लॉटही दिले होते....

अरे हो, सांगायचं राहिलंच!! मी पास झालो होतो!! कसा ते जॉर्जलाच माहीत!!!!

मी, तो चिनी मुलगा आणि ती कोरियन मुलगी एव्हढे पास!! बाकी सगळ्यांची दांडी उडाली होती....

सर्वप्रथम मी काय केलं असेल तर धावतच बाथरूममध्ये गेलो आणि भडाभडा ओकलो......सगळं टेन्शन आता बाहेर पडत होतं.....

माझ्या अपॉइंटमेंटच्या वेळेस मी जॉर्जच्या ऑफिसात गेलो. त्याने माझं स्वागत केलं. समोरच्या खुर्चीवर बसवलं. पास झाल्याबद्दल माझं अभिनंदनही केलं....
"तुला तुझ्या पेपरबद्दल काही प्रश्न विचारायचेत का?" तो मृदुपणे म्हणाला. माझी भीड चेपली.
"नाही म्हणजे मला एकच विचारायचं होतं की तुम्ही या पेपरांमध्ये पास-फेल ठरवतांना काय निकष वापरले?" मी शक्य तितक्या डिप्लोमॅटिकली विचारलं. पण तो जॉर्ज होता, माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्याने पचवले होते, माझ्या प्रश्नाचा रोख त्याच्या झटकन ध्यानी आला....
"तुला असं विचारायचय ना की तुम्हा सर्वांचे पेपर अपूर्ण असूनही तुम्ही तिघं पास का अणि बाकीचे फेल का?"
"जवळ जवळ तसंच"
"असं बघ, हा पेपर इतका कठीण होता की मलाही सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आली नसती! मी तुम्हाला शिकवल्यापैकी काहीच इथे डायरेक्टली विचारलेलं नाहीये. पण तुम्ही वर्गात जे शिकलांत त्याचा वापर करून, एप्लीकेशन करून हा पेपर सोडवायचा तुमचा प्रयत्न किती सफल होतोय ते मला बघायचं होतं. उद्या तुम्ही बाहेरच्या जगात जाल तेंव्हा तुम्हाला आपापल्या क्षेत्रामध्ये या ज्ञानाचा वापर करून प्रश्न सोडवावे लागतील. नुसतं शिकण्याला महत्त्व नाही, त्या ज्ञानाच्या ऍप्लीकेशनला महत्त्व आहे."

"पण जॉर्ज, मग आता या फेल झालेल्या लोकांचं काय?" जणु काही मी त्यांचा वकील!!
माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पहात जॉर्ज उद्गारला, "वेल! मॅन प्रोपोझेस ऍन्ड जॉर्ज डिस्पोझेस!! त्यांनी पुन्हा प्रयत्न करावा! विद्यार्थी जोपर्यंत माझ्या दृष्टीने तयार होत नाही तोपर्यंत मी त्याला पास करणार नाही. आणि मला टेन्यूर असल्याने याबाबतीत कोणीही माझं काहीही वाकडं करू शकत नाही."

मी गप्प राहिलो. ते पाहून जॉर्जच म्हणाला, "बरं आणखी काही प्रश्न?"
"फक्त एकच!" आता मी पास झाल्यामुळे तो माझं तसं काही बिघडवणार नाही अशी खात्री वाटल्याने मी विचारलं,

"तुम्हाला राग येणार नसेल तर विचारतो. तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतःला 'जॉर्ज' असं संबोधायला का भाग पाडता? तुमच्याकडे डॉक्टरेट आहे, तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, इतकी पब्लिकेशन्स आहेत, प्रचंड नॉलेज आहे, काय बिघडलं आम्ही तुम्हाला प्रोफेसर म्हटलं तर?"

मला वाटलं आता तो मला काहीतरी फेकून मारणार. पण जॉर्ज माझ्याकडे बघत राहिला.... मग शांतपणे म्हणाला....

"तू म्हणतोस ते सगळं खरं आहे. वरील सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत. येस, आय टीच केमेस्ट्री, आय डू रीसर्च इन केमेस्ट्री, आय पब्लिश इन केमेस्ट्री!!! बट आय कॅन नॉट प्रोफेस ऑन केमेस्ट्री,.......यट! माझ्यामध्ये अजून तरी प्रोफेसिंगची, प्रयोग करण्याची जरूर न भासता माझी मतं अचूकतेने जाहीर करण्याची क्षमता आली नाहीये. जेंव्हा ती क्षमता येईल तेंव्हा मी जरूर स्वतःला प्रोफेसर म्हणवून घेईन. पण तोपर्यंत स्वतःला तसं म्हणवुन घेणं ही मी माझ्या प्रोफेशनल प्राईडशी केलेली प्रतारणा ठरेल!! मी ते कधीच सहन करू शकणार नाही...."

मी आ वासुन त्याच्याकडे बघतच राहिलो....

एक साठीच्या घरातला, स्वत:च्या विषयातली अंतिम पदवी असलेला, आपल्या व्यवसायाचा चाळीस वर्षांहून जास्त अनुभव असलेला, स्वत:चं केमिस्ट्रीमध्ये संशोधन अनेकवेळेला प्रसिद्ध केलेला हा शास्त्रज्ञ, हा प्रकांडपंडित, हा ज्ञानाचा हिमालय, मला सांगत होता की अजून मी प्रोफेसर झालेलो नाही.

का? तर माझा विषय प्रोफेस करायची क्षमता माझ्या अंगी अजून आलेली नाही.....

मी काही न बोलता चटकन उठुन त्याच्या बुटाला हात लावून नमस्कार केला....

"यू इमोशनल इंडियन्स!!!" मी अश्या प्रकारे व्यक्त केलेला आदर कसा स्वीकारावा हे न कळून तो गुरगुरला,

"नाऊ गो! गेट आउट ऑफ माय ऑफिस, समोसा!! टेक युवर करीयर सिरियसली!!! द होल वर्ल्ड इज वेटिंग फॉर यू!! मेक मी प्राऊड, माय सन!!!"

(संपूर्ण)

(टीपः या व्यक्तिचित्रातील व्यक्तींचे कुणाशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.)

देशांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

एकलव्य's picture

28 Jul 2008 - 10:01 am | एकलव्य

पिडाकाका,

असा गुरु लाभायला भाग्य लागते (आणि तुमच्यासारखी तपश्चर्याही).

हे सारे आमच्यासाठी येथे जिवंतपणे तुम्ही उभे केल्याने आम्हीही भाग्यवानच.

(गुरुप्यासा) एकलव्य

डॉ.प्रसाद दाढे's picture

30 Jul 2008 - 12:27 pm | डॉ.प्रसाद दाढे

वाहवा डा॑बिसराव मजा आणलीत. तिन्ही भाग परत वाचले. एखादी नजर खिळविणारी फिल्म पाहतो आहोत असे वाटले. तुमची शैली एकदम ओघवती आहे. आवडली.
धन्य ते गुरू आणि (यशस्वी) विद्यार्थी. भाग्यवान आहात.

माझ्यामध्ये अजून तरी प्रोफेसिंगची, प्रयोग करण्याची जरूर न भासता माझी मतं अचूकतेने जाहीर करण्याची क्षमता आली नाहीये. जेंव्हा ती क्षमता येईल तेंव्हा मी जरूर स्वतःला प्रोफेसर म्हणवून घेईन.

नतमस्तक
(लेक्चरर) प्रसाद

धमाल मुलगा's picture

31 Jul 2008 - 6:26 pm | धमाल मुलगा

डॉक्टरांशी पुर्ण सहमत!

असे शिक्षक जर मिळाले तर का नाही मुलांचा अभ्यासाचा दृष्टिकोन बदलणार?
आणी महत्वाचं म्हणजे "वर्षभर चोखा, अन् वर्षाअखेरीस ओका" असं न होता आयुष्यभराची बेगमी ठरेल.

नतमस्तक
(पुर्वाश्रमीचा कॉर्पोरेट ट्रेनर) ध मा ल.

यशोधरा's picture

28 Jul 2008 - 10:04 am | यशोधरा

सहीच! शिष्याचा स्वीकार केला तर गुरुने! :)

गुंडोपंत's picture

28 Jul 2008 - 10:07 am | गुंडोपंत

झकास!
मस्त आहे हा अनुभव.
असे घासून घेणारे शिक्षक हल्ली खरोखरच दिसत नाही हे पण तितकेच खरे.
आपल्याला असे काही लाभले हे तुमचे भाग्य.

आपला
गुंडोपंत

मनस्वी's picture

28 Jul 2008 - 10:21 am | मनस्वी

असा गुरु लाभायला भाग्य लागते (आणि तुमच्यासारखी तपश्चर्याही).

हेच म्हणते.

मस्त!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

भाग्यश्री's picture

28 Jul 2008 - 10:22 am | भाग्यश्री

सुंदर !! पास-फेल करण्यामागचं कारण सहीच.. आपल्याकडे कधी येणार असं ? जसंच्या तसं उत्तर येण्यापेक्षा विद्यार्थी विचार कसा करतो, जसं तुम्ही म्हणालात ज्ञान ऍप्लाय कसं करतो हे खरंच कौतुकास्पद आहे!
खूप आवडला 'जॉर्ज'! तुमची लिहीण्याची हातोटी मस्त आहेचे! त्यात काही वाद नाही.. अजुन असे खूप लेख येऊदेत !!
बाकी, समोसा->मि.इंडीया-> माय सन हे रुपांतर आवडलं!! :)

सहज's picture

28 Jul 2008 - 10:31 am | सहज

जॉर्ज कॉल्डवेल नक्की लक्षात राहील.

सुंदर लेख पिडा काका

धन्यवाद.

प्रमोद देव's picture

28 Jul 2008 - 10:45 am | प्रमोद देव

शैलेशराव तुम्ही खूपच सुंदर लिहिता(हे मी सांगायची खरंच काही जरूरी आहे काय?). तिन्ही भाग वाचले .
तुमची शैली अतिशय ओघवती आहे आणि प्रसंग वर्णन करण्याची हातोटी विलक्षण आहे. तुमच्या वर्गात मी देखिल बसलो होतो असे वाटण्याइतपत जीवंत वर्णन झालंय(ऑरगॅनिक केमेस्ट्री कशाशी खातात हे देखिल मला माहीत नाही ही गोष्ट अलाहिदा).
असेच लिहिते राहा आणि आम्हाला तुमच्या उत्तमोत्तम अनुभवात सामील करून घ्या हीच विनंती.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

श्रीमंत दामोदर पंत's picture

28 Jul 2008 - 10:52 am | श्रीमंत दामोदर पंत

भाग्यवान आहात तुम्ही........

असा गुरू मिळायला फार भाग्य लागतं............

खूप नशिबवान आहात...............

डोमकावळा's picture

28 Jul 2008 - 10:53 am | डोमकावळा

पिडा काका...
काय अफलातून व्यक्तीमत्व असेल याची फक्त कल्पना करू शकतो..

माझ्यामध्ये अजून तरी प्रोफेसिंगची, प्रयोग करण्याची जरूर न भासता माझी मतं अचूकतेने जाहीर करण्याची क्षमता आली नाहीये. जेंव्हा ती क्षमता येईल तेंव्हा मी जरूर स्वतःला प्रोफेसर म्हणवून घेईन. पण तोपर्यंत स्वतःला तसं म्हणवुन घेणं ही मी माझ्या प्रोफेशनल प्राईडशी केलेली प्रतारणा ठरेल!! मी ते कधीच सहन करू शकणार नाही....

खरच, काय प्रामाणिक मत आहे... सोळा आणे पटलं.

धन्य तो जॉर्ज....

काका तुमच्या पुढच्या लेखनाची आतुरतेने वाट पहातोय...

- डोम...

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jul 2008 - 11:05 am | बिपिन कार्यकर्ते

पिडां भाऊ, मी हा प्रतिसाद उभा राहून टंकत आहे. आंतरजालावर 'स्टँडींग ओवेशन' बहुधा असेच द्यावे लागेल. तुमचा लेख तर आवडलाच, पण जॉर्ज कॉल्डवेल तर ग्रेटच. जो माणूस खरी ज्ञानसाधना करतो तोच असं काही बोलू शकतो.

मला पु.लं. च्या अपूर्वाई मधे उल्लेखलेल्या प्रसंगाची आठवण झाली. युद्धावर निघालेल्या विद्यार्थ्यांना एक वयोवृद्ध प्रोफेसर निरोप देत असतात. तो मुलगा गंमत म्हणून त्यांना विचारतो, "सर, तुम्ही नाही येत लढायला?" तेव्हा ते विचारतात, "तू का जातो आहेस लढायला?" विद्यार्थी उत्तरतो, "मानवतेच्या / संस्कृतीच्या, संरक्षणासाठी, टू प्रोटेक्ट द सिव्हिलायझेशन". त्यावर ते म्हणतात "आय ऍम द सिव्हिलायझेशन, माय सन." पुढे पु.लं. म्हणतात की हे आधुनिक ऋषिच आहेत.

पिडां, मला तुमच्या जॉर्ज मधे असाच एक आधुनिक ऋषि दिसतो आहे.

=D> =D> =D> =D> =D>

बिपिन.

धनंजय's picture

28 Jul 2008 - 11:16 am | धनंजय

प्रभावी रेखाटले आहे व्यक्तिमत्त्व.
प्रभावी व्यक्तिमत्त्व रेखाटले आहे.

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 11:23 am | विसोबा खेचर

एक साठीच्या घरातला, स्वत:च्या विषयातली अंतिम पदवी असलेला, आपल्या व्यवसायाचा चाळीस वर्षांहून जास्त अनुभव असलेला, स्वत:चं केमिस्ट्रीमध्ये संशोधन अनेकवेळेला प्रसिद्ध केलेला हा शास्त्रज्ञ, हा प्रकांडपंडित, हा ज्ञानाचा हिमालय, मला सांगत होता की अजून मी प्रोफेसर झालेलो नाही.

नतमस्तक!

डांबिसा, केवळ अप्रतीम व्यक्तिचित्र. जियो.....!

आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2008 - 11:26 am | स्वाती दिनेश

तुम्ही वर्गात जे शिकलांत त्याचा वापर करून, एप्लीकेशन करून हा पेपर सोडवायचा तुमचा प्रयत्न किती सफल होतोय ते मला बघायचं होतं. उद्या तुम्ही बाहेरच्या जगात जाल तेंव्हा तुम्हाला आपापल्या क्षेत्रामध्ये या ज्ञानाचा वापर करून प्रश्न सोडवावे लागतील. नुसतं शिकण्याला महत्त्व नाही, त्या ज्ञानाच्या ऍप्लीकेशनला महत्त्व आहे."
+++१
बट आय कॅन नॉट प्रोफेस ऑन केमेस्ट्री,.......यट! माझ्यामध्ये अजून तरी प्रोफेसिंगची, प्रयोग करण्याची जरूर न भासता माझी मतं अचूकतेने जाहीर करण्याची क्षमता आली नाहीये. जेंव्हा ती क्षमता येईल तेंव्हा मी जरूर स्वतःला प्रोफेसर म्हणवून घेईन. पण तोपर्यंत स्वतःला तसं म्हणवुन घेणं ही मी माझ्या प्रोफेशनल प्राईडशी केलेली प्रतारणा ठरेल!!
ह्याला तपस्या म्हणायचं नाही तर काय म्हणायचं!
बाकी, समोसा->मि.इंडीया-> माय सन हे रुपांतर आवडलं!!
स्वाती

नंदन's picture

28 Jul 2008 - 12:09 pm | नंदन

व्यक्तिचित्र, अतिशय आवडले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विष्णुसूत's picture

28 Jul 2008 - 12:12 pm | विष्णुसूत

दोन दिवस वाट पहात होतो ह्या भागाची !!
ग्रेट...

टारझन's picture

28 Jul 2008 - 12:28 pm | टारझन

वाचताना तोच टोन कायम राखण्यात यशस्वी ठरलात काका ! जबराट. लै भारी ...
(पुण्यात तरी) शिक्षणाच बाजारूपण वाढत चाल्लय आणि हे शिक्षक काय ट्युबा पेटवतात हे सांगणे न लगे !!

(कचोरीच्या शोधातला समोसा) कुबड्या खवीस

अन्जलि's picture

28 Jul 2008 - 12:46 pm | अन्जलि

तिन्हि भाग वाचुन प्रतिक्रिया द्यायला काहि शब्द्च नाहित. इतके सुन्दर वर्णन.  अशि माणसे  परत परत भेटत नाहित सलाम त्याना.

केशवसुमार's picture

28 Jul 2008 - 12:56 pm | केशवसुमार

डांबिसशेठ,
सुंदर व्यक्तीचित्र.. आवडले..
(वाचक) केशवसुमार
स्वगतः ह्या मानस शिष्याला शिकवायला आता असा अरडाओरडा करावा लागणार की काय? #o

प्राजु's picture

28 Jul 2008 - 11:07 pm | प्राजु

मस्त आहे व्यक्तीचित्र एकदम. आपल्या या गुरूसमोर आम्ही नतमस्तक.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

28 Jul 2008 - 1:51 pm | भडकमकर मास्तर

बट आय कॅन नॉट प्रोफेस ऑन केमेस्ट्री,.......यट!
कॉल्डवेल बाबा भन्नाट आहे....
मला पण अगदी त्याच्या पाया पडावेसे वाटले... असे शिक्षक मिळायला नशीब लागते....
बेस्ट....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ध्रुव's picture

28 Jul 2008 - 2:23 pm | ध्रुव

तिनही भाग सलग वाचले. अप्रतिम लेखन.

--
ध्रुव

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 3:00 pm | आनंदयात्री

>>"यू इमोशनल इंडियन्स!!!" मी अश्या प्रकारे व्यक्त केलेला आदर कसा स्वीकारावा हे न कळून तो गुरगुरला,
>>"नाऊ गो! गेट आउट ऑफ माय ऑफिस, समोसा!! टेक युवर करीयर सिरियसली!!! द होल वर्ल्ड इज वेटिंग फॉर यू!! मेक मी प्राऊड, माय सन!!!"

अत्यंत सुरेख शेवट केलाय, जॉर्ज मनात येउन बसला अगदी.

मनिष's picture

28 Jul 2008 - 3:02 pm | मनिष

"तुम्ही वर्गात जे शिकलांत त्याचा वापर करून, एप्लीकेशन करून हा पेपर सोडवायचा तुमचा प्रयत्न किती सफल होतोय ते मला बघायचं होतं. उद्या तुम्ही बाहेरच्या जगात जाल तेंव्हा तुम्हाला आपापल्या क्षेत्रामध्ये या ज्ञानाचा वापर करून प्रश्न सोडवावे लागतील. नुसतं शिकण्याला महत्त्व नाही, त्या ज्ञानाच्या ऍप्लीकेशनला महत्त्व आहे."

कधी कळेल (किंवा पटेल) हे इथल्या लो़कांना? अजूनही (कित्येकदा कालबाह्य) पुस्तकी शिक्षणावरच भार..त्यातून आपल्या 'टिपीकल' परिक्षा म्हणजे अजून एक मुर्ख प्रकार...जाऊ दे!

आम्ही पी.जी. साठी C-DAC पुणे मधे असतांना एक वेगळा 'मास्तर' मिळाला होता...स्वतः IITan होता, पण तसा एकदम माणसालेला....फ्रेंडली. तसा शिकवल नाहिच फार त्याने काही.....भरपूर गप्पा मारायचा...फॉन्ट मधे मॅक किती सरस आहे...टी. टी. फ. चे टाइप्स...मायक्रोसॉफ्टच्या चोर्‍या आणि असेच बरेच काही. त्यामुळे बाकी गोष्टी लॅब मधेच करून शिकाव्या लागत...दिवसाला १४ तासांचे अधिकृत वेळापत्रक...पण त्यात काम कधीच पुर्ण व्हायचे नाही....मग रात्री-बेरात्री असेच काम करत बसायचो. त्या मास्तरने लॅब पेपर मात्र असाच अफलातून दिला....शिकवलेले कसे वापरता येईल ते तपासणारा....शिवाय त्यात मी काय बघणार ह्याचेही थोडे तपशील...थोडा ठोबळ सांगाडा....१०-१२ ओळींचा एक साध्या इंग्लिशमधला परिच्छेद हा आमचा प्रोग्रॅमिंगचा पेपर....फाटली होती चांगलीच...बरेच निघून (> ९०%) गेले....आम्ही थोडे झगडत राहीलो. खूप उत्सुकता होती काय होईल म्हणून...मला बघायचे होते मला काय आणि कशा प्रतिक्रिया मिळाल्या....पण शेवटी बाकी मुलांच्या सांगण्यावरून ती परिक्षाच रद्द झाली...आणि मग नंतर आम्ही एक नेहमीसारखा पेपर दिला.....

पिडा-काका, अपून तो एकदम फॅन हो गया....गावित मास्तर असो किंवा जॉर्ज कॉल्डवेल, तुम्ही गुरुंच्या बाबतीत एकदम लकीच हा, नाहितर आम्ही! :) धोंडॉपंतांना विचारले पाहिजे काय योग असतात कुंडलीत! :))

मनिष
अवांतर - स्वतःचे कसले योग घेऊन बसलायस लेका, 'शिष्य' चांगला नको का मुळात? ;)

नारदाचार्य's picture

28 Jul 2008 - 5:08 pm | नारदाचार्य

व्यक्तिचित्र. आवडले. व्यक्तिमत्त्व पुढे येऊन उभं राहिलं. परफेक्ट फ्लेश आऊट.
क्रमशः प्रकार मात्र रुचला नाही. आस्वादात खंड येतो. हे टाळता येईल का?

शितल's picture

28 Jul 2008 - 5:47 pm | शितल

पिडा काका,
लेखाचा शेवट नितांत सुंदर केला आहे.
मनात घर करून राहतात जॉर्ज आणि त्याची शैली तर केवळ अप्रतिम.
विद्यार्थ्याना असेच गुरू भेटले पाहिजेत आणी अशाच परिक्षा हव्यात ज्यातुन कल्पनेला वाव मिळेल. :)

II राजे II's picture

28 Jul 2008 - 7:24 pm | II राजे II (not verified)

व्यक्तिचित्र, अतिशय आवडले.

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

बिपीनजीं प्रमाणे,

आपलेही स्टँडींग ओवेशन,
डांबीसरावांना आणी त्यांच्या महान गुरूंना!

आमच्या देशात असे शिक्षक आणी अशी शिक्षण व्यवस्था कधी येणार?

जाता जाता फार पूर्वी वाचलेली अशीच एक गोष्ट (अर्थात अमेरिकन विद्यापीठातली) आठवली:

एका प्रकांडपंडित विद्यार्थीनीने फिलॉसॉफीचा पेपर कोराच दिला. आपल्या गुरुंना तीने सांगीतले की, आज काही लिहावेसेच वाटत नाही. तरिहि त्या गुरुने तीला उत्तम गुणांनी पास केले.
भारतात हे घडणे अशक्य.

आमची शिक्षण व्यवस्था स्वतंत्र विचारबुद्धीला वाव देत नाही.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 10:44 pm | विसोबा खेचर

एका प्रकांडपंडित विद्यार्थीनीने फिलॉसॉफीचा पेपर कोराच दिला. आपल्या गुरुंना तीने सांगीतले की, आज काही लिहावेसेच वाटत नाही. तरिहि त्या गुरुने तीला उत्तम गुणांनी पास केले.

आयला! हे तर लै भारी! हीदेखील एक फिलॉसॉफीच म्हणावी काय? :)

की ती विद्यार्थीनी दिसायला लै भारी होती अन् तिच्या गुरुचा तिच्यावर जीव जडला होता? कशावरून ही फिलॉसोफी शक्य नाही? :)

तात्या.

(स्वगतः हिंदुस्थानात शक्य आहे... प्रा. डॉ. बिरुटेसरांना विचरले पाहिजे)

असे काही त्या गोष्टित दिले नव्हते.

ही तत्ववेत्ती फार प्रसिद्ध आहे.
च्यायला तिचे नांव तोंडावर काही येत नाही (तिचे नांव गेर्त्रुड असे काहिसे.., आडनांव काही आठवत नाही)

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2008 - 10:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(की ती विद्यार्थीनी दिसायला लै भारी होती ....
स्वगतः हिंदुस्थानात शक्य आहे... प्रा. डॉ. बिरुटेसरांना विचरले पाहिजे)

खरं म्हणजे काय शक्य नाही,अनेक उदाहरणं सांगता येतील. पण नाचक्की माझ्या व्यवसायाची, शिक्षण व्यवस्थेची होईल म्हणुन थांबतो !!!

धनंजय's picture

29 Jul 2008 - 11:17 pm | धनंजय

तिच्याबद्दल ही कथा मला पूर्वी माहीत नव्हती. गूगलून काढली.

(पण ती त्या प्राध्यापक जेम्स यांची "स्टार" विद्यार्थिनी होती. त्यामुळे परीक्षेत उत्तम मार्क आदल्या परीक्षांच्या/चर्चांच्या जोरावर दिले होते.)

(कॉलेजनंतर गर्ट्रूड स्टाईन हिचे ऍलिस बी टोक्लास या बाईशी प्रेमसंबंध जुळले ते आयुष्यभरासाठी. बहुतेक कॉलेजमध्येही प्राध्यापक जेम्स यांच्याशी केवळ अभ्यासपूर्णच नाते असावे.)

झकासराव's picture

28 Jul 2008 - 8:53 pm | झकासराव

वा!
अफाटच आहे की जॉर्ज :)

अवांतर : आम्हाला अप्लाइड मेकॅनिक्सला किंचित जॉर्ज होता. फक्त भारतीय. नाव बी डी देशपांडे. भन्नाट मास्तर होता. पोराना अर्थातच आवडत नसे. कधीच कौतुक करत नसे कोणाचच. मी माझ्या वर्गात त्या विषयात टोपर आलो होतो. म्हणुन माझा एका मित्राने त्या सराना माझे मार्क सांगितले तर त्यानी अरे आमची एक चुक झाली रे, ह्यावर्षी पेपर तपासायला मी नव्हतो अस एक सेकंद देखील वेळ न लावता सांगितल होत. वर चॅलेन्ज दीलं होत की ह्यावर्षी मी स्ट्रेन्थ ऑफ मटेरिअल शिकवणार आहे आणि तु असेच मार्क पाडुन दाखव :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

महेश हतोळकर's picture

28 Jul 2008 - 11:54 pm | महेश हतोळकर

असतील. ती ही अशीच वल्ली होती. स्ट्रेंथ ऑफ मटेरीयल साठी एकदा खुल्या पुस्तकांची चाचणी घेतली होती. बरीच आधी कल्पना दिली होती. तुम्हाला काय पुस्तक वापरायचे, कोणत्या नोट्स घ्यायच्यात त्या घेऊन बसा पण कोणी कोणाशी बोलू नका. रीझल्ट - ८० पैकी १० पोरे पास.

अभिज्ञ's picture

28 Jul 2008 - 11:46 pm | अभिज्ञ

डांबिसकाका,
व्यक्तीचित्र अफ़लातून जमले आहे.
लिखाणाची शैली सुरेखच.

अजुन लेख येउ द्यात.

अभिनंदन

अभिज्ञ

जॉर्जऋषींच्या आश्रमातली आपली ज्ञानसाधना परिपूर्ण झालेली वाचून धन्य झालो! :)

(स्वगत - सोमरसाची दीक्षा पिडाकाकांनी ह्या ऋषींकडूनच घेतली की काय? :W :? )

चतुरंग

सर्किट's picture

29 Jul 2008 - 12:43 am | सर्किट (not verified)

नुसतं शिकण्याला महत्त्व नाही, त्या ज्ञानाच्या ऍप्लीकेशनला महत्त्व आहे.

वा ! धन्य तो गुरू आणि धन्य तो शिष्य !

जियो डांबिसकाका !

आम्ही पार्ट टाईम शिक्षकी एकेकाळी केलेली असल्याने आम्हाला ह्या विषयांत खूप आवड आहे. (असे, त्याविषयी पुन्हा कधीतरी.)

तुमचा मास्तर आम्हाला खूपच आवडला.

- सर्किट

केशवराव's picture

29 Jul 2008 - 1:22 am | केशवराव

केवळ अप्रतिम ! तुमची लिहीण्याची शैली , लेखाचा विषय , कथा नायकाचे स्वभाव वैशिष्ट्य - - - सर्व अप्रतिम.
आमच्याकडे १२ वी ला शिकवीणारे सुद्धा स्वतःला 'प्रोफेसर ' म्ह्टले जावे अशा अपेक्षेत असतात.
लेखा बद्दल अभिनंदन !

मदनबाण's picture

29 Jul 2008 - 4:17 am | मदनबाण

सर्वच भाग सुंदर आहेत काकाश्री..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मुक्तसुनीत's picture

29 Jul 2008 - 4:25 am | मुक्तसुनीत

आताच दुसरा नि तिसरा भाग एकदम वाचले. खूप आवडले नि अंतर्मुख करणारे वाटले...
आगे बढो , समोसा ! :-)

पल्लवी's picture

29 Jul 2008 - 10:29 pm | पल्लवी

काका,
मला खरंतर टंकायचा भारी कंटाळा.. खूप काही आवडलं तरी ते मनातच राहतं.. पण आज रहावलं नाही.. तुमचा लेख अप्रतीम झाला आहे..
अ-मे-झिं-ग !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2008 - 10:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डांबिसराव,
गुरुजी आवडले आणि त्या गुरुजींचा शिष्यही !!!
अप्रतिम व्यक्तिचित्र !!!

अवांतर : नुसती पीएच.डी पदवी मिळाल्यावर नावासमोर प्रा.डॉ. लावून मिरवणारे कुठे आणि प्रोफेसर असूनही जॉर्ज म्हणवून घेणारा प्रा. कुठे !!!

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Jul 2008 - 12:40 am | ब्रिटिश टिंग्या

आवडले!

साती's picture

30 Jul 2008 - 12:38 pm | साती

जॉर्ज आणि त्यांच्या विद्यार्थ्याची लेखनशैली, दोन्ही आवडले.

साती

सुवर्णमयी's picture

31 Jul 2008 - 3:12 am | सुवर्णमयी

व्यक्तीचित्र अतिशय आवडले. लेखन आणि शैली दोन्ही प्रभावी.
शुभेच्छा

सुचेल तसं's picture

31 Jul 2008 - 8:35 am | सुचेल तसं

सर्व भाग आत्ताच वाचून काढले. एकदम भारी लिखाण!!!

http://sucheltas.blogspot.com

छोटा डॉन's picture

31 Jul 2008 - 6:52 pm | छोटा डॉन

आपलेही स्टँडींग ओवेशन,
डांबीसरावांना आणी त्यांच्या महान गुरूंना!

असा हा जॉर्ज म्हणजे जणु एक आधुनिक ऋषिच ...

डांबिसकाकांचा "जॉर्ज" एकदम अत्युत्तम म्हणावा असा . वाचताना मी जणु त्यात हरवुन गेलो होतो व जणु त्या क्लासचा एक भाग झालो होतो. कधीकधी वाटायचं की आत्ता हा माणुस आपल्यावर ओरडेल ...
डांबिसकाकांच्या शैलीला सलाम ...

असे शिक्षकच हे उत्तम विद्यार्थी व पर्यायाने राष्ट्र घडवतात ...

लेख वाचुन पुर्ण झाल्यावर मला पण ते पुलंचे "आय ऍम द सिव्हिलायझेशन, माय सन." आठवले. शिरीष कणेकर पण याचा नेहमी उल्लेख करतात ...

अवांतर : यावरुन मला आमचे १२ चे भौतीकशास्त्राचे "अभ्यंकर [ याला पर्याय नाही, ] मास्तर " आठवले.
त्यांनी क्लासच्या पहिल्याच दिवशी फळ्यावर " हे माझे फळ्यावरचे पहिले आणि शेवटचे वाक्य " असा मजकुर लिहला होता.
पण त्यानंतर त्यांनी जे फिजीक्स शिकवले त्याला तोड नाही ...
त्याच्या प्रयत्नांमुळेच मी त्या विषयात ९९ मार्क घेऊ शकलो ...
त्यांचे बोलणेही असेच फटकळ व सडेतोड. माझी किती वेळा इज्जत काढली याची मोजदोज नाही ...
पण काय सांगु , तो माणुस म्हणजे ग्रेटच ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इरसाल's picture

5 Apr 2013 - 9:43 am | इरसाल

पुन्हा कधी पिडांकाका लिहीतिल तो सुदिन.

केव्हा लिहीताय मग ?

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Apr 2013 - 3:11 pm | श्री गावसेना प्रमुख

भारतात चांगले प्रोफेसर असल्यावर

पिशी अबोली's picture

9 Apr 2013 - 5:21 pm | पिशी अबोली

काय माणूस आहे..ग्रेटच..

मनराव's picture

10 Apr 2013 - 5:37 pm | मनराव

भारी...!!!

असा गुरु लाभायला भाग्य लागते

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2021 - 9:23 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुरेख-सुंदर !
व्यक्तीचित्र खुप आवडले. लेखन आणि शैली दोन्ही झकासच !

सुबोध खरे's picture

21 Oct 2021 - 11:58 am | सुबोध खरे

विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि परीक्षेचा निकाल यांचा संपूर्ण संबंध असतोच असे नाही.

बरेच विद्यार्थी लेखनाची हातोटी नसल्याने लेखी परीक्षेत चांगले लिहू शकत नाहीत परंतु तोंडी परीक्षेत मात्र व्यवस्थित विचार मांडू शकतात

आणि याच्या उलट सुद्धा होते.

मी ए एफ एम सी मध्ये एम डी चा परीक्षक असताना आलेले काही अनुभव आहेत. काही परीक्षक विद्यार्थ्याला "किती येत नाही" याची शेखी मिरवताना दिसले. यातील एका अतिशहाण्या बाह्य परीक्षकाला "आपण येथे विद्यार्थ्याला किती येते आहे हे तपासायला आलो आहोत, किती येत नाही ते नव्हे." असे मी सभ्य शब्दात सुनावले होते.

एखाद्या विद्यार्थ्याला एम डी परीक्षेत पास करताना त्याला विषयाचे बर्यापैकी ज्ञान आहे कि नाही आणि विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासणे आवश्यक असते. निदान किमान पातळीचे ज्ञान त्याने तीन वर्षात मिळवले आहे हे तपासण्यासाठी परीक्षा घेतली जाते.
आज त्याला सखोल ज्ञान नाही हे गृहीत धरणे आवश्यकअसते. तीन वर्षात एका विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होणे हि केवळ अशक्य गोष्ट आहे.

डॉक्टरेट मिळवली म्हणजे त्याविषयीचे संपूर्ण ज्ञान आले असे नव्हे तर इतर लोकांपेक्षा त्याला त्या विषयाचे जास्त ज्ञान आहे एवढाच अर्थ असतो.
पदवी मिळाल्यावर तर खरा अभ्यास चालू होतो.

उमेदवार परिक्षार्थी आहे कि ज्ञानार्थी आहे हे समजून घेणे आवश्यक असते.

विजुभाऊ's picture

24 Oct 2021 - 11:01 am | विजुभाऊ

परत वाचताना परत एकदा पिडां भाउंच्या शैलीची पकड जाणवली.
तुम्ही लिहीते व्हा डाम्बीस भाउ

Bhakti's picture

24 Oct 2021 - 2:53 pm | Bhakti

मस्त लेखनशैली !
माझ्या लेकरान्च (विद्यार्थी )यान्च असाच नात होत.पहिले तीन वर्ष मला असेच घाबरायचे,कारण मी योग्य्,मेहनतीच विद्यार्थ्याना शोधत असायचे.आणि त्यातले अन्तिम वर्षातले योग्य विद्यार्थी माझे सुह्रद मित्रच व्हायचे.

शाम भागवत's picture

24 Oct 2021 - 6:10 pm | शाम भागवत

शेवटची मुलाखत वाचताना डोळे भरून आले.
🙏

Jayant Naik's picture

26 Oct 2021 - 10:03 pm | Jayant Naik

आपल्या कडील सध्याचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे शिक्षक कुठे आणि हे जॉर्ज कुठे ? बाकी आपल्याकडे सुद्धा एकेकाळी अतिशय ज्ञान वृद्ध शिक्षक होते. अजूनही असतील पण त्यांची संख्या कमी झाली आहे. अती सुरेख अनुभव कथन. असेच लिहित रहा.

श्वेता व्यास's picture

28 Oct 2021 - 10:45 am | श्वेता व्यास

लेखन खूप भावले.