आज मराठी भाषा दिवस... त्या निमित्ताने माझ्या काही कविता.
वहितली कविता मी माझ्या ब्लॉगवर ताकली,
सर्वांनी वाचावी म्हणुन पत्रिके सारखी वाटली!
माझी कविता वाचून त्यावर भरपूर रिप्लाय यावेत,
कवितेत कमी पण रिप्लाय मधे शब्द जास्त असावेत!
माझी कविता वाचून यावी ओठांवर गाणी
भावुक शब्दांनी यावे डोळ्यात पाणी!
अशी असावी माझी कविता जी सांगुन जाइल खूप काही,
प्रत्येक जण आपली कविता त्यात पाही!
मग,
माझी ही कविता त्याने तिला फॉरवर्ड करावी,
आवडते ती त्याला ह्याची ती पावती असावी !
प्रतिक्रिया
27 Feb 2012 - 8:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलं प्रेमकाकाव्य वाचुन डोळ्यात पाणी येईल की नाही माहिती नाही.
आपली कविता 'तिला' आवडेल की नाही तेही माहिती नाही.
आपली कविता खुप काही सांगते का ? तेही माहिती नाही.
पण, आज मायमराठीच्या गौरवाचा दिवस असल्यामुळे
आपल्या लेखनाला प्रोत्साहान नक्कीच देईन. :)
तेव्हा....... छान छान लिहिते व्हा. :)
-दिलीप बिरुटे
28 Feb 2012 - 10:30 am | अन्या दातार
पहिली वहिली जिलबी आज मिपावर टाकली
साखरपाकात बुडवून परातीत काढली
माझी जिलबी खाऊन सर्वांची वाहव्वा यावी
जिलबीत कमी पण पाकात गोडी जास्त असावी
जिलेबी वाचण्याऐवजी म्हणावीत गाणी
भावाचा अभाव पाहून यावे डोळ्यात पाणी
अशी असावी माझी जिलबी जी सांगण्याचा प्रयत्न करेल खूप काही
प्रत्येक जण दुर्दैव आपले त्यात पाही
मग
माझी ही जिलेबी त्याने कुणालाही फॉरवर्ड करावी
आवडली तर ती त्याच्या मूर्खपणाची पावती असावी
28 Feb 2012 - 10:35 am | प्रचेतस
हॅहॅहॅ
एक नंबर विडंबन.
समस्त हलवाई मंडळीनी यातून काही बोध घ्यावा ही अपेक्षा.
28 Feb 2012 - 9:24 pm | हंस
अन्या काय झालय काय तुला? पहाव तिथे जोरदार टोलवा-टोलवी चालू आहे! लगे रहो................
मूळ कविता आणि विडंबन आवडेश.
1 Mar 2012 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा
@जिलबीत कमी पण पाकात गोडी जास्त असावी>>>
28 Feb 2012 - 10:58 am | मराठी_माणूस
मराठी भाषा दिवसानिमित्त कविता आणि त्यात ईंग्रजी शब्दाचा वापर !!!!!!!!!!