आमचा प्रोजेक्ट (उपक्रम).......आमचे आकाशदर्शन

स्वातीविशु's picture
स्वातीविशु in जनातलं, मनातलं
27 Feb 2012 - 4:03 pm

आम्ही त्रुतीय वर्षाच्या वर्गात पाऊल ठेवले, अन नेहमी झोपेत असलेले जागे झालो. या वर्षी आम्हाला एक प्रोजेक्ट करुन तो वर्षअखेरीस सादर करणे सक्तीचे होते. (१०० गुण होते त्यासाठी..;)) त्यामुळे एक वेगळाच उत्साह आणि भीती वाटत होती. थोडेसे वैज्ञानिकाचे वारे कानात आणि मनात भरलेले होते. त्यामुळे काहीतरी हटके करायचे असे वाटत होते.

झाले....शोधमोहीम सुरु झाली. आमचे एक आवडते गुरुवर्य सतत याबद्द्ल मार्गदर्शन करत होते. आमच्या वा-याची बहुतेक त्यांना कल्पना आली असावी. ते आम्हाला दिशा देण्याचे प्रयत्न करत होते. त्यांच्या सांगण्यावरुन आम्ही जुने प्रोजेक्ट रिपोर्ट चाळले. पण त्यातला कुठलाही उपक्रम रुचला नाही. मात्र त्यांतूनच काही सवंगड्यांनी त्यांचे विषय निवड्ले आणि प्रोजेक्ट्च्या (ढापेगीरीच्या.....;)) मार्गाला लागले.

नंतर आम्ही लायब्ररीकडे मोर्चा वळविला. (नाहीतरी तेथेच पडिक असायचो. ;)) तिथे वाचता वाचता हवामानविभागात काम करणा-या एका काकांची अन माझी ओळख झाली. आम्ही राहायचो त्या पलीकड्च्या गल्लीतच ते रहात होते. झाले.....नंतर त्यांच्या घराचे उंबरठे झिजवले व त्यांनी त्यांच्या कार्यालयात बोलाविले. तिकडे १-२ दिवस जाऊन पुस्तके चाळली, एकदोघांना भेटले. पण तिथे आम्हाला वेगळे काही करण्यासारखे वाटले नाही.

एव्हाना आमचे सोबती त्यांच्या अभ्यासात व उपक्रमात गुंतले होते. ऑगस्ट उजाडला तरी आमचा उपक्रमाचा विषयच ठरला नव्हता. एक दिवस अचानक आमच्या कॉलेजची माजी विद्यार्थीनी सरांना भेटायला आली. तिची व माझी ओळख झाली. तिला माझ्या प्रोजेक्टबद्द्ल सांगितले तेव्हा तिने एका खगोलशास्त्रातील एका नामवंत संस्थेचे नाव, तिथे जाऊन कोणाला भेटायचे त्यांचे नाव व फोन नं. दिला. अर्थात तिनेही तिच्या उपक्रमाचे तारे तिथेच तोडले होते.

वेळ न दवड्ता आम्ही कॉईनबॉक्सवरून त्या सरांना फोन केला आणि त्यांनी मला एकदाचे भेटायला बोलाविले. दुसरीकडे आम्ही हुश्श झालो. मनात कुठेतरी वाटत होते की, इकडे आपले मनासारखे प्रोजेक्ट नक्की मिळेल. येणा-या रविवारी आम्ही त्यांना भेटायला जाणार होतो. प्रोजेक्टसाठी कॉलेज बंक करणे, कोणीही चालू दिले नसते.

क्रमशः

विज्ञानशिक्षणअनुभव

प्रतिक्रिया

काय हे?
ते वरचं तरी कशाला लिहीलंत.

''क्रमश:'' असा एकच शब्द लिहिला असता तरी चाललं असतं ना..

मोहनराव's picture

27 Feb 2012 - 4:27 pm | मोहनराव

'क्रमश:'' असा एकच शब्द लिहिला असता तरी चाललं असतं ना..

धन्या's picture

27 Feb 2012 - 4:44 pm | धन्या

आम्हीही यकु कृष्णमूर्तींनी दिलेले रोखठोक उत्तर वाचून फुटलोच. :)

पियुशा's picture

27 Feb 2012 - 4:33 pm | पियुशा

श्शी बाब्बा ....यकु अस नाय करायच ,अशी नाव नै ठॅवायची ;)
लेखिकेला लिहायच आहे ,नविन असेल, नाही तर पहिलाच प्रयत्न असेल तीचा तिला प्रोत्साहन द्या ,म्हणजे ती पुढल्या भागात व्यवस्थित अन विस्तारीत लिहील :)

गोमटेश पाटिल's picture

27 Feb 2012 - 4:25 pm | गोमटेश पाटिल

एकदा टिक आहे पण असल हे अर्धवट ले़ख नहि रुचायचा....

स्वातीविशु's picture

27 Feb 2012 - 4:36 pm | स्वातीविशु

अहो... आमच्याकडे आज विजेची लपाछपी चालू असल्यामुळे सध्या एवढेच लिहू शकले. त्यासाठी सर्वांची माफी मागते. उद्या विज्ञानदिनाच्या निमित्ताने पुढचा भाग पुर्ण करेन. :)

गोमटेश पाटिल's picture

27 Feb 2012 - 4:45 pm | गोमटेश पाटिल

माफि मागन्यासरख काहि नाहि ... तुम्हि लिहित रहा अम्हि वाचत राहु.. तुमचा जो प्रोब्लेम आहे ना तोच अमचाहि आहे त्यमुळे असे चान्गले अनुभवि लेख अमच्याकडुन मिस होन्याचि शक्यता असते ...

वपाडाव's picture

27 Feb 2012 - 5:02 pm | वपाडाव

त्या तोडलेल्या तार्यातुन एकाला ट्युबलाइट बनवुन घरात लावा अन मग पुर्ण करा लेख... मग दिवे लावले तरी म्हणता येइल किमान...

प्यारे१'s picture

27 Feb 2012 - 5:03 pm | प्यारे१

यकु,
बडे बुढे ;) कह गये हय की ऐसे नये लेखकोंको हतोत्साह न करके उनका उत्साह बढाना चाहिए|
-जितेन्द्रच्या 'भोला कोणीतरी'चा पंखा प्यारे१ (कंपनीबसमधल्याटीव्हीसीडीप्लेअरचीकृपा)

येशा,
आमच्या गाववाल्या पोरीला काय म्हनलास तर बगच मग. ;)
- वाईकर प्यारे१

बडे बुढे कह गये हय की ऐसे नये लेखकोंको हतोत्साह न करके उनका उत्साह बढाना चाहिए|

प्यार्‍या मी उत्साहच वाढवत होतो रे.. मी तर एकच शब्द लिहीला असता तरी चाललं असतं म्हणालो ना :p

आमच्या गाववाल्या पोरीला काय म्हनलास तर बगच मग.

हो का? स्वातीकाकु तुमच्या गावच्या आहेत का?
स्वारी बर्का स्वातीकाकू...
आता पुढच्या वेळी तुम्ही खरंच नुसतं ''क्रमश:'' लिहीलं तरी काही म्हणणार नाही आम्ही. :p

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2012 - 8:47 am | अत्रुप्त आत्मा

@आता पुढच्या वेळी तुम्ही खरंच नुसतं ''क्रमश:'' लिहीलं तरी काही म्हणणार नाही आम्ही.>>>

गणेशा's picture

27 Feb 2012 - 9:15 pm | गणेशा

पुढिल लेखनास शुभेच्छा !

५० फक्त's picture

28 Feb 2012 - 7:55 am | ५० फक्त

उत्तम सुंदर लेखन