भगव्या वस्त्राला आपल्याकडे एक वेगळे स्थान आहे.
समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद हे भगवी वस्त्रे परिधान करीत.
ज्याने सार्या भैतिक सुखांचा त्याग केला आहे अशांनीच भगवे कपडे घालावेत असा काही संकेत असावा.
भारतीय राजकारणात वावरणार्या काही व्यक्तीदेखील भगवे कपडे वापरताना दिसतात.
त्यामुळे जाणून घ्यावेसे वाटते
भगवी वस्त्रे घालण्यासाठी काही नियम आहेत का ?
कुणा अधिकारी गुरूने दिक्षा द्यावी लागते का !
भगवे कपडे घातल्यानंतर घरादाराचा त्याग करावा लागतो का ?
भगवी वस्त्रे घालूनही घरातच राहिल्याने स्वतःवर काही वाइट परिणाम होतो का ?
प्रतिक्रिया
26 Feb 2012 - 1:18 am | आबा
:)
26 Feb 2012 - 1:51 am | चेतनकुलकर्णी_85
तुमचे नाव आणि प्रश्न हे एकमेकांना अत्यंत पूरक असे आहेत... :)
26 Feb 2012 - 10:38 am | डॉ.श्रीराम दिवटे
भगवीच वस्त्रे नव्हे तर हिरवी कफनी घालणारे फकीरही संसाराचा त्याग करुन फिरतांना आढळतात. पांढरे डगले चढवणारे बगळे राजकारणात नाव कमावतात असा अनुभव आहे
26 Feb 2012 - 11:01 am | चेतनकुलकर्णी_85
बगळे कि गिधाडे???
26 Feb 2012 - 1:16 pm | सचिनमिसलप्रेमी
(हिन्दू ) सन्यासी भगवी वस्त्रे परिधान करतात आणि सर्व सन्यासी जनान्नी सर्वसन्गपरित्याग करावा असे ग्रुहितक आहे. तरि पण सन्यास घेउन सन्सार केलेले जन सापडतात. सन्यासी लोकान्चे अन्त्य सन्स्कार देखिल वेगळ्या प्रकाराने करावे लागतात.
बाकि चेतनशी गिधाडान्बाबत प्रचन्ड सहमत.
26 Feb 2012 - 8:18 pm | मोदक
अनुस्वार = Shift + M
27 Feb 2012 - 11:49 am | सचिनमिसलप्रेमी
मोदकराव,
धन्यु.
27 Feb 2012 - 9:12 am | अमृत
या प्रकारत मोडणारे आहे. असो.
एक शंका. आमच्या उड्या ह्या नेहमी भगव्या रंगावरच का पडतात? का भगव्या रंगावर केलेली शेरेबाजी सहिष्णुता म्हणुन खपवुन घेतली जाते म्हणुन का? अर्थातच हा धागा पुढे जाऊन धार्मिक गोष्टींवर जाणार हे वर्तवायला भास्कराचार्य असण्याची अट नाही. तरी संपादक मंडळ 'जागते रहो'
अमृत
27 Feb 2012 - 12:45 pm | पुण्याचे वटवाघूळ
उड्या सगळ्या रंगांमधील गैरप्रकारांवर पडायला हव्यात ही गोष्ट खरी आहे. पण इतर रंगांवर उड्या पडत नाहीत (किंवा कमी उड्या पडतात) म्हणून भगव्याच्या नावावर केलेले गैरप्रकार समर्थनीय कसे ठरतात?
27 Feb 2012 - 11:48 am | सचिनमिसलप्रेमी
मोदकराव,
धन्यु.
27 Feb 2012 - 11:56 am | सचिनमिसलप्रेमी
पडला आहे प्रतिसाद. चुक सुधार्ण्यात आलेली आहे परन्तु वरिल प्रतिसाद उडवुन टाकण्यात यावा ही संपादक मंडळाला विनंती.
(आगाऊ आभारी) सचिन