"जेंव्हा तुम्हाला जे हवे ते मिळत नाही, तेंव्हा जे मिळते त्याला अनुभव म्हणतात...हे जगणे म्हणजे फक्त तुमची स्वप्ने साकार करणे नव्हे तर ते आपण आपल्या जीवनाचे कसे नेतृत्व करतो, या संदर्भातील आहे. जर तुम्ही तुमचे आयुष्य योग्य रीतीने पुढे नेत रहाल तर तुमची कर्मे आपोआप बाकीच्या गोष्टींची (यशाची) काळजी घेतील. आणि तुमची स्वप्ने साकार होतील." - शेवटचे भाषण (स्वैर अनुवाद "लास्ट लेक्चर")
- प्रोफेसर रँडी पॉश्च, (Randy Pausch, October 23, 1960 – July 25, 2008), कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी.
माणसे आयुष्य कशी जगतात त्यावर जसे त्यांचे नाव होते तसेच अटळ आणि अचानक वाट्याला आलेल्या मरणाच्या संकटाला कसे सामोरे जातात यातून पण कधी कधी प्रचंड प्रेरणा देऊन जातात. प्रोफेसर रँडी पॉश्च हे त्यातीलच एक व्यक्तिमत्व होते. कार्नेगी मेलन सारख्या विश्वविख्यात विद्यापिठात संगणकीय शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या या महाशयाला ऑगस्ट २००६ मधे पँन्क्रीऍटीक कॅन्सर झाल्याचे कळले. ह्या कॅन्सरला काही उपाय नाही आणि ४६ व्या वर्षीच मरण जवळ आले आहे हे समजून चुकले. केमोथेरपी चालू झाल्यावर वर्षभरात, डॉक्टरांनी त्याला सांगीतले की कॅन्सर पसरलेला आहे आणि त्याच्याकडे आता फक्त ३-६ महीने उरले आहेत...
सप्टेंबर २००७ मधे ४०० विद्यार्थी, प्राध्यापक मित्र आणि हितचिंतकांच्या गराड्यात प्रोफेसर रँडी पॉश्च भाषणाला उभे राहीले. भाषण सुरू होण्याआधीच लोकांनी उभे राहून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. तो थांबवत ते शांतपणे म्हणाले की, "(असेच कौतूक करू नका) मला ते मिळवूंदेत!" अर्थात लगेच प्रेक्षकातून कोणीतरी बोलले की "तुम्ही ते मिळवलेत!" ह्या भाषणात कुठेही नैराश्य नव्हते, उदास हावभाव नव्हते तर किंबहूना ते विनोद आणि आनंदाने भरलेले होते.
या भाषणाचे मूळ नाव आहे: "Last Lecture," titled "Really Achieving Your Childhood Dreams" . ते लेक्चर युट्यूबवर आले आणि जगभरच्या लाखो लोकांनी पाहीले. त्याचे पुढे पुस्तकात रुपांतर झाले. त्यावर भाष्य करताना, प्रोफेसर रँडी पॉश्चचे मूळ शब्द होते:
"I am flattered and embarassed by all the recent attention to my "Last Lecture." I am told that, including abridged versions, over six million people have viewed the lecture online. The lecture really was for my kids, but if others are finding value in it, that is wonderful. But rest assured; I'm hardly unique. Send your kids to Carnegie Mellon and the other professors here will teach them valuable life lessons long after I'm gone....-We can't change the cards we're dealt, just how we play the hand. If I'm not as depressed as you think I should be, I'm sorry to disappoint you."
Randy Pausch family photo "Under the ruse of giving an academic lecture, I was trying to put myself in a bottle that would one day wash up on the beach for my children," Pausch says. He's seen here with with Dylan, 6, on his shoulders, Logan, 3, and Chloe, 22 months.
लास्ट लेक्चर पुस्तकाची प्रकाशीत झाल्यापासून ३० भाषांत भाषांतरे झाली. आज, २५ जुलै, २००८ ला कॅन्सरशी लढताना त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. एक काँप्यूटर सायन्सचा प्रोफेसर ज्याने स्वतःच्या क्षेत्रात असामान्य काम मन लावून केलेच पण त्याच बरोबर जीवन जगतानाच त्याच्या अटळ सांगतेची परीपूर्ती कशी करावी हे जगाला तितक्याच असमान्य आणि प्रेरणा देणार्या कृतीतून दाखवून दिले.
विकासराव, क्षमा करा परंतु यूट्यूबची चित्रफीत इथून काढली आहे कारण त्यामुळे बर्याचदा बर्याच जणांना आय ई उघडयला तांत्रिक अडचणी येतात. म्हणून खाली त्याचा केवळ दुवा देत आहे. -- आणिबाणीचा शासनकर्ता.
ह घ्या दुवा -
प्रतिक्रिया
26 Jul 2008 - 12:58 am | चतुरंग
फारच चटका लावून देणारी ओळख.
मध्यंतरी मी यू ट्यूबवर काहीतरी शोधत असताना हा व्हिडीओ समोर आला होता पण माझ्याकडून तो तसाच राहून गेला.
आता जरुर बघेनच पण त्या आधीही प्रतिक्रिया देणे मला गरजेचे वाटले.
दुव्याबद्दल धन्यवाद!
चतुरंग
26 Jul 2008 - 1:09 am | प्राजु
ओळख खूपच चटका लावून गेली. १ तासाची व्हिडीओ फाईल आहे ही. निवांतपणे बघून प्रतिक्रिया देते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Jul 2008 - 1:03 am | llपुण्याचे पेशवेll
लास्ट लेक्चर बघितलंच पाहीजे. प्रेरणादाई लेख.
या थोर प्राध्यापकाला श्रध्दांजली.
पुण्याचे पेशवे
26 Jul 2008 - 1:26 am | मिसळपाव
विकास, रँडी पॉश्च च्या कामची माहिती कुठे मिळेल सांगितलंस तर बरं पडेल. मी त्यांच्या कर्करोगाच्या सामन्याबद्दल वाचलं होतं पण त्याच्यां कामाबद्दल, माझ्यासारख्या बिगर संगणकिय व्यक्तिला कळेल अशा स्वरूपाचं लिखाण (तुला किंवा आणिक कोणाला) माहिती असल्यास जरूर कळवा. धन्यवाद.
26 Jul 2008 - 2:11 am | विकास
कार्नेगीच्या "एन्टटरटेन्मेंट टेक्नॉलॉजी सेंटर - प्राध्यापकांची माहीती" भागात त्यांची अजूनही माहीती आहे.
त्यांच्या माहीतीच्या (बायोडेटाच्या) वेबसाईट आत्ता उघडली जाउ शकली नाही. स्कॉलर.गुगल.कॉम वर त्यांचे नाव घातले तर अनेक पब्लिकेशन्स दिसू शकतात. शिवाय विकीवर पण त्यांच्या "प्रोफेशनल अचिव्हमेंट्स" लिहीलेल्या आहेत.
26 Jul 2008 - 4:20 am | धनंजय
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद, विकास.
26 Jul 2008 - 8:42 am | प्रकाश घाटपांडे
विकास यांना धन्यवाद.
अन्यथा प्रो . रॅंडी पॉश्च यांचे विचार समजलेच नसते. आदरांजली.
प्रकाश घाटपांडे
26 Jul 2008 - 11:12 am | श्रीमंत दामोदर पंत
विकास धन्यवाद..........
मनाला चटका लावणारी ओळख....................
दुव्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.............
26 Jul 2008 - 11:18 am | सुनील
चटका लावणारा लेख.
बफरींगमध्ये खूप वेळ जात असल्यामुळे चित्रफीत नीट बघता आली नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Jul 2008 - 12:20 pm | स्वाती दिनेश
चटका लावणारी ओळख !
हेच म्हणते.
स्वाती
26 Jul 2008 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोर प्राध्यापकाची,मनाला चटका लावणारी ओळख !!!
27 Jul 2008 - 12:41 pm | विसोबा खेचर
विकासराव,
थोडक्यात परंतु फार सुंदर ओळख करून दिलीत!
If I'm not as depressed as you think I should be, I'm sorry to disappoint you."
हे वाक्य खूप काही सांगून जाते!
या थोर प्राध्यापकाच्या बाबतीत "जीवन त्यांना कळले हो!" असे म्हणावेसे वाटते! त्यांना माझा अलविदा व त्यांच्या स्मृतीस सलाम...!
तात्या.
--
I'm hardly unique..!
27 Jul 2008 - 2:32 pm | यशोधरा
सुरेख! आवडला लेख.
27 Jul 2008 - 4:03 pm | मदनबाण
हेच म्हणतो..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
27 Jul 2008 - 5:32 pm | भडकमकर मास्तर
फीत डाउनलोड करायला लावली आहे...
उत्तम ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद..
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
28 Jul 2008 - 5:04 am | विकास
सर्व प्रकाशीत-अप्रकाशीत प्रतिसादांना धन्यवाद. मी पण हे पुस्तक आधी दुकानात पाहीले होते आणि ऐकून माहीत होते. पण शुक्रवारी जेंव्हा त्यांच्या निधनाची बातमी समजली तेंव्हा प्रथमच त्यांच्याबद्दल नीट वाचले आणि ते सर्वांना कळवावेसे वाटले म्हणून लेखनप्रपंच केला.
विकास