बी रोमन इन रोम असे कुणीसे म्हंटले आहे. त्याचा अर्थ प्रत्येकजण आपआपल्या मकदुराप्रमाणे घेतो.माझ्या पुरता तरी तो आपले गाव सोडले की थोडे शिष्ठाचार बाजुला ठेवुन द्यावे. थोडे मोकळेढाकळे वागावे असा आहे. नव्या गावात जेथे कोणी आपल्याला ओळखत नाही तिथे थोडे वेगळे कपडे वापरले नेहमीचा कपड्यातला ईस्त्रीचा कडकपणा बाजुला ठेवुन झब्बा सलवार सारखा मोकळेपणा वागण्यात येतोच. अन्यथा एरव्ही अंबाडा दोनवेण्या तेल लावुन चापुनचोपुन असणारी काकुबाई हील स्टेशनला जीन्स घालुन बागडताना दिसली नसती. ही सगळी गणीते पुण्याला लागु होत नाहीत. पुण्यात कोठे कोण ओळखीचे निघेल ते सांगता नाही असाच एकदा पुण्याला काही कामानिमित्त गेलो होतो. काम झाले होते त्यामुळे त्या टेन्शन्मधुन मोकळाझालो होतो. बादशाही मेसाला पुन्हा एकदा बरेच वर्षानी भेट दिली इतक्या वर्षानन्तरही तीच चव होती.त्या चवी वरुन ब-याच आठवणीजाग्या झाल्या. कॊलेजचे फ़ुलपाखरी दिवस आठवले. मित्र मैत्रीणी आठवल्या .मन पुन्हा मागे गेले आणि त्याच मूड मधे बाहेर आलो. टिळक रोडवरुन सहज चक्कर मारुया म्हणुन चालत्च स प कॊलेजच्या दिशेने निघालो. समोरुन एक प्रसन्न चेहे-यांचा ताटवा किलबिलत येत होता. आपल्या वेळेत आणि आत्ता नक्की काय फ़रक झाल आहे ते न्याहळत बसलो. काय दिसतात ना या मुली... स्मार्ट... कॊन्फ़िडन्ट. एक दहा एक वर्षे उशीरा जन्मायला यायला हवे होते.असे उगीचच वाटुन गेले.एवढ्यात समोरुन एक तरतरीत चेहे-याची मुलगी आली.जीन्स टी शर्ट,एकदम मॊडर्न कॊन्फ़िडन्ट लूक; माझ्याकडे बघुन हसली. डोळ्यात ओळखीचे भाव. ते हसणे आपल्यासाठी नक्कीच नसेल. उगाच मोरु व्हायला नको म्हणुन मी मागे वळुन पाहीले. माझ्या मागे कोणीच नव्हते. मी आजुबाजुला पाहीले. बाकीचे येणारे जाणरे त्यांच्या तन्द्रीत होते. ती मुलगी पुन्हा हसली. मी पुन्हा आजुबाजुला पाहिले. ती आता माझ्याच दिशेने येत होती. मी आता थोडा गोंधळ्लो. "नमस्कार सर ओळखलेत मला?
मी कसनुसा हसलो. मी पूर्वी कॊम्प्युटर नेटवर्किंग शिकवायचो त्यावेळची कोणी विद्यार्थिनी असावी अन्यथा सर कशाला म्हणेल.चेहेरा आता थोडा ओळखीचा वाटु लागला. पण अजुन पुरती ओळख लागत नव्हती. मी थोडेसे खजीलसे होऊनच म्हणालो थोडेसे ओळखले पण नक्की नाव काय ते विसरलो
ती पुन्हा छानसे हसली आणि म्हणाली "सर विल यू बी माय स्पेन्सर"
त्या एका वाक्याने एकदम डोक्यात ट्यूब पेटली. अरे ..रौशनी तूम ? काय करते आहेस ? कशी आहेस ? काय चाललेय सध्या ? आणि पुण्यात केंव्हा पासुन आहेस? बरीच बदललीस ग.
त्यावर ती खळखळुन मोकळे हसली. हो सर बरीच बदलले. पण तुमच्यात जराही बदल नाही.
त्या वाक्याने माझे मन पाच एक वर्ष मागे गेले. त्यावेळी मी कॊम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग चे क्लासेस घ्यायचो. कॊलेजेस मध्ये मुलाना नवे करीअर चे नवे ऒप्शनस काय आहेत याची माहिती द्यायचो. निमशहरी ग्रामीण भागातील विद्यार्थाना बहुतेक वेळा नव्या सन्धी काय असतात तेच माहित नसते, त्या साठी काय शिकायचे ,नवे तंत्रद्न्यान कोठे शिकायला मिळेल तेच कळत नसते. त्यामुळे सरधोपट शिक्षणाकडेच त्यांचा कल असतो. नव्या शिक्षणा बद्दल कळाले तरी त्यासाठी शहरात जाउन रहाणे,कोर्सेस फ़ी हे सगळे परवडवण्या पलिकडचे असते.
इच्छा असुनही बुद्धीमत्ता असुनही ही मुले स्पर्धेत मागे पडतात. त्यातुन एक न्यूनगंड निर्माण होतो. मनात पक्का झालेला तो न्यूनगंड काढुन टाकणे साधे सोपेकाम नसते.
एका कॊलेजच्या प्रिन्सिपॊल नी मला ही गोष्ट सांगितली त्यांच्या मनात असे काही करता येते का यासाठी मला कॊलेज वर एक कार्यक्रम घेण्यास सांगितले. पॊझिटिव्ह थिंकिंग वर एक दीड तासाचा कार्यक्रम करायचा होता. मुलाना बोलते करणे त्यांच्या मनातले न्यून घालवण्यासाठी मी कुठेतरी वाचलेली पण एक सत्य गोष्ट सांगायचो. स्पेन्सर ची गोष्ट
शिक्षण घेतले तर केवळ स्वत:चेच नव्हे तर पुढच्या पिढ्यांचे आयुष्य कसे बदलते याची गोष्ट. जशी वाचली तशीच त्या कथा नायकाच्या तोंडुन जशी येईल त्या स्टाइल मधे सांगायचो......
आम्ही चौघे भावंडे ज्यावेळेस एकत्र जमतो तेंव्हा एकच विषय दरवेळेस निघतो. बाबाना तो माणुस भेटला नसता तर.
आम्ही चौघे भावन्डे दोन भाऊ दोन बहिणी चौघेही उत्तम शिकलेले दोघे भाऊ डॊक्टर मी कमर्शियल आर्टीस्ट तर धाकटी बहीण वकील चौघांची सांसारीक, आर्थिक स्थिती उत्तम
आमचे बाबा एक शेतमजुराच्या घरात जन्मलेले. त्याकाळी कापसाची शेती हा श्रीमन्तांचा मुख्य व्ययसाय होता. निग्रो गुलामांच्या काबाडकष्टावर धनदांडगे व्हायचे आणि निग्रोना मात्र एका वेळच्या अन्नासाठीही मोताद करायचे ही रीत होती. आमचे बाबा धरुन घरात आठ मुले.बाबा सर्वात धाकटे. गावात निग्रो मुलाना शिकवण्यासाठी साधारण दहावी पर्यन्त शिकत येईल इतपत एक शाळा होती. फ़ारशी मुले नसायचीच शाळेत.बहुतेक जण कोठेतरी शेतावर मजुरी करायला जायचे घर चालवायला हातभार लावायचे.माझी आजी; तिला आपल्या एकातरी मुलाने शिकावे असे वाटायचे. तीचे सारे आयुष्य शेतमजुरी करण्यात गेले.एका तरी मुलाने शिकावे असे तिला मनोमन वाटायचे. तिने बाबाना शिकवायचे असे ठरवले. निघ्रो मुलगा शिकला म्हणजे वाया गेला अशी सगळ्या गावाची समजुत. बहुतेकानी आजीलातेच सांगितले. पण आजी त्याना बरोबर उत्तर द्यायची. ती म्हणायची माझी सात मुले शेतात राबतातच की एखादा मुलगा वाया गेला असे समजु त्यात काय.तिच्या या असल्या बोलण्यापुढे लोक हारायचे.
गावात क्वीन नावाच्या एका श्रीमन्त बाईची शेती होती. बहुतेक गावकरी तिच्याच शेतात मजुरीला जायचे. बाबा आठवी पास झाले.मुलाला शेतावर कामाला पाठवा त्याला शिकवुन वाया कशाला घालवता म्हणुन क्वीन बाईचा आजोबाना सांगावा आला. आजोबा तयारही झाले.पण आजी खमकी तिने साफ़ सांगितले की मी या मुलाला शिकवणारच.जाउदे वाया गेला तर. आजीच्या आग्रहापुढे आजोबा नरमले. बाबा दहावी पास झाले. यापुढे शिकायची गावात सोय नव्हती. आजी ने बाबांच्या हातात एक कापडाची पुरचुंडी ठेवली म्हणाली मी माझ्या मजुरीच्या पैशातुन साठवलेली ही रक्कम घे ही मुला शहरात जा चांगल्या शाळेत नाव घाल शीक मोठा हो.
बाबा शहरात आले. शिकण्यासाठे शाळेत नाव घातले.आजीने त्यांना दिलेली ती शेतमजुरी करुन साठवलेली ती पुरचुंडी तरी कितीशी पुरणार? लौकरच संपली. बाबानी एक छोटी मोठी कामे करुन शिक्षन चालु ठेवले. निग्रो मुलाना नोकरी तरी कसली मिळणार. रात्री काम आणि दिवसा शिक्षण.....बाबाना रात्री लोकांच्या घरातले हीटर नीट चालु रहावे हे बघण्याचे काम मिळाले होते. लोकाना उबदार घरात छान झोप मिळावी म्हणुन बाबा रात्री कोळसाफ़ोडुन लोकांच्याघरातले फ़ायर प्लेस नीट रहावे म्हणुन जागुन हाडे फ़ोडणा-या थंडीत रस्त्यावरुन फ़िरावे लागत असे.
सततचे झोपाळु डोळे आणि वर्गात पेंगत असणारा हा मुलगा सर्वाना चेष्टेचा विषय होता,.अधुन मधुन हातातली पुस्तकही झोपेमुळे बाकावरुन खाली पडायची
बारावी झाली पुढचे शिक्षण कठीण. प्रवेश घायला पैसे नाहीत.आता काय करायचे बाबांपुढे हा मोठा प्रश्न होता.आता पुन्हा आलो तेथे जायचे शिक्षणाला रामराम ठोकुन मिळेल ते काम पत्करायचे.हा विचार करतच बाबा शिक्षण संस्थेच्या ऒफ़ीसमधे पोहोचले. ऒफ़ीसच्या नोटीसबोर्डवर त्याना एक जहिरात दिसली. "सूट्टीच्या कालावधीसाठी रेल्वे मध्ये नाईट अटेन्डन्ट हवे आहेत. ईच्छुकानी अर्ज भरावेत अशी काहिशी एक नोटीस बोर्डावर लावली होती. बाबानी त्या साठी अर्ज केला. त्याना ती नोकरी मिळाली.
रात्री प्रवास करण्या-या रेल्वे प्रवाशाना काय हवे नको ते बघायचे त्यांची सोय करायची असे ते कामाचे स्वरुप होते.
एकदा रात्री बाबा ते काम आटोपुन त्यांच्या नेहमीच्या दरवाजाजवळच्या झोपण्याच्या जागेवर झोपायच्या तयारीत होते तेव्हड्यात त्यांच्याजवळ एक गोरा माणुस आला. त्याच्या बायकोला खोकल्याची ढास लागली होती. त्याला दूध गरम करुन हवे होते. बाबानी तातडीने हीटरवर दूध गरम करुन त्या माणसाच्या कम्पार्टमेन्ट कधे नेउन दिले.थोड्या वेळाने तो गोरा माणुस बाबांच्या झोपायच्या जागेजवळ आला. त्याने बाबांना काय करतोस कुठे असतोस अशी विचारपूस केली. ज्या काळी गो-या माणसाशी बोलताना होय साहेब किंवा धन्यवाद मॆडम या व्यतिरिक्त निग्रोंचे बोलणे व्हायचे नाही त्या काळात हे असे वागणे म्हणजे अप्रुपच होते.
जाताना त्या माणसाने आख्खी पाच डॊलरची नोट टीप म्हणुन बाबांच्या हातावर टेकवली. गाढवा...मूर्ख या उपाधी शिवाय दुसरे काहीच पदरी न पडण्याच्या काळात पाच डॊलर ची टीप म्हणजे खूपच काहितरी जगावेगळे होते. ती त्याने चुकून दिली असेल असेच बाबाना वाटले.
ती सुट्टी संपली अधुन मधुन मिळालेली थोडीफ़ार टीप आणि दोन महिन्यांचा पगार मिळुन बाबांजवळ थोडे पैसे जमले होते कॊलेजची एक सेमिस्टर तरी निदान पूर्णवेळ अभ्यासावर लक्ष्य़ देउन अभ्यास करावा असे बाबाना खूप वाटायचे.या वेळी ते शक्य होईल असे वाटत होते . बाबानी घरी न जाता कॊलेजमधे शिकायचे ठरवले. ऎडमिशनचा फ़ॊर्म भरला. आणि घरी आले दुस-या दिवशी कॊलेज मधे गेल्यावर बाबाना वर्गात कॊलेजचा शिपाई बोलवायला आला. प्रिन्सीपॊल ने बोलावणे धाडले होते. बाबा प्रिन्सीपॊलकडे गेले. प्रिन्सीपॊलने बाबाना विचारले " तुम्ही र्सुट्टीत रेल्वे चा जॊब करत होतात?"
."हो"
"तिथे तुम्हाला कोणी स्पेन्सर नावाचे गृहस्थ भेटले होते?" बाबाना आठवत नव्हते कोण स्पेन्सर " नीट आठवुन बघा स्पेन्सर....तुम्हाला पूर्ण पाच डोलर्स ज्यानी टीप म्हणुन तुम्हाला दिली होती"
बाबाना आता ते स्पेन्सर नावाच गृहस्थ पूर्ण आठवले त्याना विसरणे शक्यच नव्हते.त्यानी प्रिन्सिपॊल ना काय सांगितले होते कोणास ठाउक "ते पाच बहुतेक डॊलर परत तर नसतील हवे त्याना ? बाबांच्या डोक्यात सत्तर विचार एकाच वेळेस येउन गेले. "हो सांगावे की सरळ नाही म्हणावे"
"हो... हो भेटले होते. त्यांचे काय ". बाबानी चाचरतच म्हंटले.
त्यानी तुमची कॊलेजची दोन वर्षाची पूर्ण फ़ी भरलीआहे" तुम्ही जाऊ शकता.
बाबाना नक्की काय प्रतिक्रिया द्यावी तेच उमजत नव्हते.
बाबा शिकले ते एक उत्तम वकील झाली लग्नानंतर आम्हा चार भावन्डांचा जन्म झाला. आमची उत्तम शिक्षणे झाली दोघेही भाऊ डॊक्टर मी कमर्शियल आर्टीस्ट तर धाकटी बहीण वकील.
आम्ही चौघेही जेंव्हा एकत्र भेटतो तेंव्हा आमच्या बोलण्यात अएकच विषय असतो.
बाबाना तो माणुस भेटला नसता तर?...आपणही कुठेतरी आज शेतमजुरी करत बसलो असतो...............................
मी सांगितलेली ही गोष्ट मुलाना नेहमीच आवडायची . ईच्छा असेल तर मार्ग मिळतो मदत मिळतेच. ही आशा मनात जागवुन त्यांना नवे विचार करायला प्रवृत्त करायचे हा माझा उद्देश.तो कार्यक्रम आटोपुन मी कॊलेज मधुन बाहेर पडलो.
दुसरे दिवशी ऒफ़ीसमधे गेलो एक काळीसावळी पण तरतरीत चेहे-याची मुलगी माझी वाट पहात होती.
केबीन मधे आल्यावर मी विचारले काय काम आहे.
"सर विल यु बी माय स्पेन्सर?
मला कळेना ती नक्की काय म्हणते आहे.
सर काल तुम्ही ती स्पेन्सर ची गोष्ट सांगितली. मला खूप शिकायचे आहे.
मी तुम्हाला विचारते... विल यु बी माय स्पेन्सर? त्या पोरीच्या डोळ्यात काही वेगळेच भाव होते. स्वप्नाळुपणा ,एक विश्वास, आशा आणि कसलीशी चमक होती.
तीचे वडील एका करखान्यात कॆज्युअल लेबर म्हणुन काम करत होते. तीन भावन्डे ही सगळ्यात मोठी. खूप शिकायचे काहितरी व्हायचे हे स्वप्न. नवे शिक्षण घेउन उत्तम नोकरी मिळेल हे माहित होते पण शिकण्यासाठी पैसे लागतात. वडीलांच्या पगारात काय होऊ शकते हे तिला माहीत होते.
ती बी एस सी करत होती. आपण चांगले शिकावे ब-यापैकी नोकरी मिळवावी आणि भावंडांना पण शिकवावे.असे काहिसे तिचे स्वप्न होते.
कोर्सेस्ची फ़ी कमी करणे माझ्या हातात नव्हते पण संस्था चालकाना सांगुन फ़ी थोड्या थोड्या थोड्या हप्त्यात भरण्याची सवलत द्या किंव्हा सहकारी पतसंस्था मधुन शिक्षणासाठी कर्ज मिळवुन द्या म्हणुन मी सांगु शकत होतो.मी त्याबद्दल तिला सांगितले. ती दुसरे दिवशी वडिलाना घेउन आली. त्या संस्थाचालकाने फ़ी हप्त्याहप्त्यात घेण्याची तयारी दाखवली.
फ़ीचा एखाद दुसरा हप्ता मागे पुढे व्हायचा. पण तिने शिक्षण पूर्ण केले. त्या नन्तर ती मला पुन्हा भेटली नाही.
कधितरी स्पेन्सर ची गोष्ट कुठे सांगितली की मला रौशनी ची आठवण यायची. काय करत असेल कुठे असेल की तिचे लग्न होऊन कुठेतरी अडाणी घरात चूल मूल करत असेल ?
तिच्या त्या "विल यू बी माय स्पेन्सर " या वाक्याचे कधितरी हसु ही यायचे
ती रौशनी मला अचानक ध्यानीमनीही नसताना भेटली.रौशनी आता पूर्ण बदलली होती तिचे रुपडे पालटले होते. तेंव्हाची लाजळु अबोल रौशनी;आता तिचा मागमुसही नव्हता.चेहे-यावर एक आत्मविश्वास झळकत होता.
काय ग कुठे असतेस अन अशी गायब कशी झाली होतीस.
सर मी बी एस सी झाले आणि त्या कोर्स च्या मुले मला एक जॊब ऒफ़र आली.चाकणला एका एम एस सी कम्पनीत नेटवक्र ऎडमिनिस्ट्रेटर म्हणुन काम करते सध्या मी.
एकदा सुट्टी घेउन मी तुम्हाला भेटायला यायचे ठरवले पण काहि ना काही गोष्टीनी ते लांबतच गेले.
माझे वडील आता रीटायर झाले. आम्ही सगळे आता पुण्यात रहातो.दोन्ही भावाना डिप्लोमाला ऎडमिशन मिळाली.त्यांचे सगळे मीच बघते.हे सांगताना तिच्या सांगताना आपण काही विषेश केले आहे ,सगळ्या घराला रौशन केले आहे हे तिच्या ध्यानीमनी ही नव्हते.
रौशनी पूर्ण बदलली नव्हती तिच्या मनातले सूप्त अंकुर आता पालवले होते.
यात मी काय केले होते फ़क्त तिला एक संधी मिळावी म्हणुन प्रयत्न माझ्याकडुन झाले असतील एवढेच. पण तोही माझ्या व्ययसायाचाच एक भाग होता.
कधीतरी कोणत्यातरी कार्यक्रमात मी अजुनही स्पेन्सर ची ती गोष्ट सांगतो पण आता रौशनीच्या गोष्टीसह.
कोणाच्या मनातला स्पेन्सर जागाही होत असेल कदाचित त्यामुळे. एखा्द्या रौशनीला सगळ्या घराला रौशन करायला मिळत असेल
प्रतिक्रिया
23 Jul 2008 - 9:26 am | II राजे II (not verified)
कधीतरी कोणत्यातरी कार्यक्रमात मी अजुनही स्पेन्सर ची ती गोष्ट सांगतो पण आता रौशनीच्या गोष्टीसह.
मस्त.
कथा ही उत्तम व तुमचा अनुभव देखील !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
23 Jul 2008 - 1:13 pm | टारझन
लई भारी विजाभौ ... अतिऊत्तम शब्दांकन....
अजुन येवून द्यात
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
23 Jul 2008 - 9:32 am | भडकमकर मास्तर
छानच झाली आहे ही गोष्ट / अनुभव...आपले अशा प्रकारचे लेखन अधिक आवडते... :) अजून येउद्यात...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
23 Jul 2008 - 9:34 am | यशोधरा
छान लिहिलेय विजूभाऊ, आवडले.
23 Jul 2008 - 9:40 am | शेखर
सुंदर लेख व अनुभव.
आपल्या भोवतालच्या जगात अश्या "रौशनी" सारख्या व्यक्ति पुष्कळ असतील... त्याना जर आपण मदत केली तर अशी लोक पुढे स्वतः दुसर्यांसाठी स्पेन्सर बनतील.
शेखर..
23 Jul 2008 - 9:41 am | स्नेहश्री
.......एक होता कार्व्हर ची.......
फारच छान डोळ्यासमोर चित्र उभे रहाते अगदी......!!!!!!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
23 Jul 2008 - 10:28 am | आनंदयात्री
खरेच कार्व्हर चीच आठवण झाली.
विजुभाउ उत्तम लेख, खुप आवडला, आतली स्पेन्सरची गोष्ट पण बोधप्रद. अशाच प्रकारचे टु बी स्पेसिफिक ललित गद्यलेखन वाचायला आवडेल.
23 Jul 2008 - 10:21 am | मनस्वी
छान कथा आणि अनुभव.
प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
23 Jul 2008 - 10:29 am | आनंदयात्री
प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच.
मस्त !! आवडला विचार.
23 Jul 2008 - 11:51 am | छोटा डॉन
स्वानुभवाची कथा उत्तम ...
मांडणीही छान ...
बाकी "प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच" हे पटले ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
23 Jul 2008 - 10:48 am | सहज
अनुभव [लेख] आवडला.
वेदश्री यांच्या सहज आठवलं म्हणून...ची आठवण झाली.
कर भला तो हो भला!!
अवांतर - मला वाटले विजुभौ तात्याच्या मागे लागले की रौशनीचा पुढचा भाग... :-)
23 Jul 2008 - 11:39 am | स्वाती दिनेश
रौशनी आणि स्पेन्सर दोघेही आवडले.कार्व्हरची आठवण लेख वाचताना सतत होत होतीच.
प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच.
हा विचारही आवडला.
स्वाती
अवांतरः गोष्टीचे नाव 'रौशनी आणि स्पेन्सर' असे जास्त समर्पक ठरले असते का? कारणे २
१. ही गोष्ट जितकी रौशनीची आहे तितकीच स्पेन्सरचीही आणि त्या शेतमजुराच्या मुलाच्या जिद्दीचीही आहे.
२. रौशनी म्हटले की "द रौशनी"-तात्याची रौशनी हे समीकरण इतके फिट्ट बसले आहे डोक्यात की दुसरी अशी 'ज्योत' पटकन डोळ्यासमोर येतच नाही.
23 Jul 2008 - 2:14 pm | अनिल हटेला
पुन्हा एकदा विजुभौ !!
छान अनुभव सान्गीतलाये !!
आणी नेहेमी प्रमाने आम्ही हा लेख वाचुन त्रुप्त झालो !!!
प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच.
हेच म्हणतो ......
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
23 Jul 2008 - 2:23 pm | प्रगती
सरांचा अनुभव खूपच आवडला.
स्पेन्सर चा अनुभव माझ्यापेक्षा जास्त कोणाच्या मनाला लागेल कारण मला देखील जेव्हा गरज होती तेव्हा एक स्पेन्सर भेटला
त्यामुळे आजची प्रगती घडू शकली. आता मी माझी कथा नाही सांगत बसत पण एवढच सांगेन की आयुष्यात जेव्हा आर या पार
अशी अवस्था असते तेव्हा आपल्या मनाचं ऐकून ( लोकांचं नाही ) सरळ स्वतःला झोकून द्यावं.
"प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच" हे पटले
मी कुणाची स्पेन्सर बनले आहे का माहीत नाही पण माझ्या एका मैत्रीणीला मी तिच्या पायावर उभं रहायला मदत केली आहे.
23 Jul 2008 - 2:46 pm | जादू
फारच छान
"प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच" हे पटले
23 Jul 2008 - 3:19 pm | इनोबा म्हणे
विजु भौ! फारच छान अनुभव...
"प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच" हे पटले
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
23 Jul 2008 - 4:33 pm | ब्रिटिश टिंग्या
विजु भौ! फारच छान अनुभव...
"प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच" हे पटले
सहमत!
23 Jul 2008 - 5:34 pm | शितल
मस्त लिहिले आहे,
कथा आवडली, खरंच एखाद्याला जर त्याच्या पडत्या काळात मदत केली तर मदत केलेली व्यक्ती ही त्याच्या आयुष्यभर लक्षात रहाते .
मनस्वीची प्रतिक्रीया ही छान आहे.
23 Jul 2008 - 6:00 pm | वरदा
लिहिलेय विजुभाऊ
प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच.
खरय
रौशनी आणि स्पेन्सर दोघेही आवडले....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
23 Jul 2008 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लिहिले आहे. स्पेन्सर आवड्ला आणि रोशनीही.
23 Jul 2008 - 10:36 am | मुक्तसुनीत
विजुभाऊ,
हा लेख खरोखर सुंदर जमलाय. प्रेरणादायी , हृदयस्पर्शी ! लेखाबद्दल अनेक आभार !
23 Jul 2008 - 10:54 am | चतुरंग
स्पेन्सर आणि रौशनी दोघेही भावले!
(अवांतर - वाचता, वाचता तुमच्या बरोबर मी ही थोडावेळ 'बादशाही' मधून बाहेर पडून स.प. कॉलेजच्या दिशेने चालत निघालो होतो.)
(स्वगत - रंग्या, बावळटासारखा पुढच्या भागाची वाट काय बघत बसलाहेस? हा सुंदर लेख क्रमशः नाहीये! B) )
चतुरंग
23 Jul 2008 - 11:52 am | पिवळा डांबिस
सुंदर, विजुभाऊ, सुंदर!!
प्रत्येकाने शक्य असेल तर एकदा तरी 'स्पेन्सर' बनावेच
अगदी खरं आहे! त्यामधून त्या व्यक्तिचं कल्याण तर होतंच पण 'स्पेन्सरला' सुद्धा एक अतीव मानसिक समाधान मिळतं.
सुंदर अनुभवकथन!!
(स्वगत - रंग्या, बावळटासारखा पुढच्या भागाची वाट काय बघत बसलाहेस? हा सुंदर लेख क्रमशः नाहीये! )
रंगाभाऊ, तुम्हाला क्रमशःची ओढ लागलीय वाटतं!!:)
जरा थोडी कळ काढा, तुमचीबी विच्छा पुरी करुयांत हां!!!:))
23 Jul 2008 - 10:36 pm | प्राजु
आवडला लेख. रौशनी आणि स्पेन्सर वाचताना कार्व्हर आठवला.
क्रमश: पेक्षा तुमचे असे लिखाण जास्ती भावते मला. अभिनंदन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Jul 2008 - 10:45 pm | सर्किट (not verified)
सुंदर अनुभवकथन. खूप आवडले.
फक्त लेखाच्या शीर्षकाला आमचा आक्षेप आहे.
ह्या लेखाचे शीर्षक "विल यु बी माय स्पेन्सर?" असे हवे.
- सर्किट
24 Jul 2008 - 11:00 am | मनस्वी
सहमत
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
24 Jul 2008 - 12:16 am | धनंजय
अनुभव, शैली, आशय, सर्व आवडले.
24 Jul 2008 - 11:15 am | पावसाची परी
>>कोणाच्या मनातला स्पेन्सर जागाही होत असेल कदाचित त्यामुळे. एखा्द्या रौशनीला सगळ्या घराला रौशन करायला मिळत असेल
अतिशय सुन्दर!
खुप सार्या स्पेन्सर्स ची गरज आहे .........रोशनीन्ची कमी नाही आपल्या महाराष्ट्रात सुध्धा!
25 Jul 2008 - 7:00 am | डॉ.प्रसाद दाढे
वाहवा विजुभाऊ! छानच लिहिल॑ आहेत..
25 Jul 2008 - 3:20 pm | पद्मश्री चित्रे
>>कोणाच्या मनातला स्पेन्सर जागाही होत असेल कदाचित त्यामुळे.
नक्किच.
छान लिहिल आहे..
28 Jul 2008 - 11:16 am | धमाल मुलगा
...
स्वगतः इतक्या छान अनुभवाला आपल्या फुटकळ प्रतिक्रिया लिहायच्या म्हणजे पैठणीला मांजरपाटाचं ठिगळ दिल्यासारखं दिसेल.
च्छ्या बॉ! नकोच काही लिहायला.....
फक्त पुन्हा पुन्हा वाचून अनुभवावं झालं.
29 Jul 2008 - 9:56 am | मनिष
एक अतिशय वेगळ्या प्रकारचा लेख...खूप आवडला!
अजून येऊ देत! :)