सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..

कॉमन मॅन's picture
कॉमन मॅन in जनातलं, मनातलं
27 Jan 2012 - 11:15 am

परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.

सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्‍या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस. सार्‍या भारताने तुझं भरपूर कौतुक केलं आहे परंतु आता तू मानाने घरी बसावंस हे बरं.. तुला संघातून काढून टाकण्यापेक्षा तू स्वत:हूनच निवृत्त व्हावंस असं वाटतं.'

आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते. अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली. परंतु पैशांच्या आणि व्यक्तिगत उच्चांकाच्या हव्यासापायी सचिन निवृत्त होण्यास तयार नाही. तीच गत राहूल आणि लक्ष्मणची आहे. ही म्हातारी खोडं जाणार केव्हा आणि नवीन रक्ताला वाव मिळणार तरी केव्हा..??

राष्ट्रपती महोदयांना नम्र विनंती की त्यांनी आत्ताच २०१३ चा भारतरत्न पुरस्कार सचिनला जाहीर करावा म्हणजे तरी तो घरी बसेल अशी आशा करता येईल.

ता क - आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सचिन केवळ १३ धावा काढून तंबूत परतला आहे!!

-- काँमॅ.

क्रीडामत

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Jan 2012 - 11:23 am | प्रचेतस

सेहवाग, गंभीर, धोनीचे काय?
त्यांना का नाही घरी बसवायचे? का केवळ थोडे तरूण आहेत म्हणून त्यांनी धावा केल्या नाहीत तरी चालतात का?

आधी म्हातार्‍यांना तर हाकला. सेहवाग, गंभीर आणि धोणीकडे नंतर पाहता येईल असे वाटते.

प्रचेतस's picture

27 Jan 2012 - 11:27 am | प्रचेतस

का बुवा?
तुमचा त्रागा पाहून गंमत वाटली. खेळाकडे खेळ म्हणून न पाहण्याचा हा परिणाम.

अहो वल्लीसाहेब,
आजकाल खेळाकडे खेळ म्हणून न पाहण्याचाच जमाना आहे.
आता उदाहरणच द्यायचं झालं तर जालावरही लोक गंमत म्हणून न येता शिरेसली येतात आणि गमतीचे प्रतिसादही शिरेसलीच घेतात. कश्याला किती महत्व द्यायचं यावर एक कार्यशाळा आयोजित करता काय?;)

प्रचेतस's picture

27 Jan 2012 - 9:44 pm | प्रचेतस

अगदी खरंय रेवतीआज्जे.
बाकी कार्यशाळा वैग्रे आयोजित करणे तुम्हीच बघा, आम्ही आपले विद्यार्थी म्हणूनच येऊ. :)

प्यारे१'s picture

27 Jan 2012 - 11:28 am | प्यारे१

"कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. तोड दो दरवाजा..!"

आपली स्वाक्षरी बरंच काही बोलते आहे.
शतकी धाग्यासाठी आधीच शुभेच्छा...! ;)

च्यायला दर वेळेस सचिन ,द्रविड ,लक्शम्ण यांनी शतके ठो़कलीच पाहि़जेत का..?गेल्या वर्षात द्रविड चे पर्फॉर्मसं बघा कि जरा..
जिंकलो कि डोक्यावर घेउन नाचायच आणी हरलो कि पायद्ळी तुडवाय्च काय पट्त नाय..

हा धागा म्हण्जे दुतोंडी .......... वाट्ते....

चिंतामणी's picture

27 Jan 2012 - 5:27 pm | चिंतामणी

>>>>>>>>आधी म्हातार्‍यांना तर हाकला.

हाकलायचे कशासाठी?????? खेळ होत नाही म्हणून की म्हातारे झाले म्हणून?

उगाचच त्रागा करू नये. वय वाढणे ही नैसर्गीक गोष्ट आहे. प्रत्येकजणाचे वय वाढणारच आहे. म्हणून दरवेळी पुढच्या पिढीने मागच्या पिढीला असे हिणवु नये.

मागच्या इंग्लंड दौ-यात फक्त द्रवीडच सातत्याने खेळला हे विसरू नये.

असो.

खेळ होत नाही म्हणून हाकला असे म्हणायची पंचाईत. सो कॉल्ड यूथ आयकॉन्स घोनी, गंभीर, सेहवाग, इशांत शर्मा इत्यादी हे काय दिवे लावत आहेत?????????

विवेक मोडक's picture

27 Jan 2012 - 11:24 am | विवेक मोडक

सचिन्,राहुल आणि लक्ष्मण या सिरीजमधे अपयशी ठरले हे मान्य.
पण सगळा दोष त्यांच्या माथी का?? सेहवागला अजुनही वनडे आणि कसोटीतला फरक कळत नसेल (दोन त्रिशतकं आणि एकदा २९३ काढुनदेखील) तर त्याला तोच न्याय लागु होत नाहि का?
धोनीचं काय वेगळं आहे? गंभीरसुद्धा "नवीन रक्ता" पैकीच आहे ना?? त्याला या सिरीजमधे काय धाड भरली होती???
नविन रक्त वगैरे ठीक आहे पण त्या नवीन रक्तात फक्त आय पी एल च असेल तर कसोटीत काय उपटणार आहेत ते?
गोलंदाजांविषयी जेवढं कमी बोलु तेवढं चांगलं आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2012 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार

विमोंशी सहमत.

त्याआधी क्रिकेट ह्या क्षेत्रातील कॉमन मॅन ह्यांच्या योगदानाविषयी अथवा ह्या विषयाच्या त्यांच्या आवाक्याविषयी जाणुन घ्यायला आवडेल. बरेच प्रश्न विचारायची इच्छा होते आहे, मात्र लगेच ते गूगलून उत्तरे मिळतील म्हणून गप्प आहे.

अर्थात रोज उठून तद्दन फालतू डायर्‍या लिहिणार्‍यांना देखील घरी बसवावे का ?

पक पक पक's picture

27 Jan 2012 - 12:16 pm | पक पक पक

:D :D :D

कपिलमुनी's picture

27 Jan 2012 - 4:30 pm | कपिलमुनी

आता चित्रपट परीक्षण लिहिणार्यांना तुम्ही कोणते कोणते चित्रपट दिगदर्शित केले आहेत असे विचारायचे का ??

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2012 - 4:54 pm | परिकथेतील राजकुमार

आता चित्रपट परीक्षण लिहिणार्यांना तुम्ही कोणते कोणते चित्रपट दिगदर्शित केले आहेत असे विचारायचे का ??

परिक्षण लिहिणार्‍यांनी 'ह्यांन हाकला, त्यांना चित्रपटात घेऊन नका, फलान्यांना घरी बसवा' अशी फुकाची बोंब केली तर त्यांना जरुर हा प्रश्न विचारावा.

चिंतामणी's picture

27 Jan 2012 - 5:29 pm | चिंतामणी

१०० % समहत.

संदीप चित्रे's picture

27 Jan 2012 - 8:32 pm | संदीप चित्रे

>>त्याआधी क्रिकेट ह्या क्षेत्रातील कॉमन मॅन ह्यांच्या योगदानाविषयी अथवा ह्या विषयाच्या त्यांच्या आवाक्याविषयी जाणुन घ्यायला आवडेल. >>
मी अगदी सहमत रे परा!

>> अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला.... >
त्याचं काय आहे 'कॉमन मॅन', तेंडल्याबद्दल हे प्रकार पूर्वी ही झाले आहेत (म्हणजे ते वाहिन्यांवरचे तज्ज्ञ इ.) पण 'उचलली जीभ...' ह्या प्रकारात आपण बोलणार्‍यांची तोंडं नाही बंद करू शकत ना! बाकी चालू द्या....

रमताराम's picture

27 Jan 2012 - 12:57 pm | रमताराम

एकदम सहमत. च्यामारी त्यांना घरी बसवू हो, पण पर्याय अजून वाईट आहेत त्याचे काय. हे तिघे वगळता उरलेल्या तिघा 'तरूण' फलंदाजांची कामगिरी या 'म्हातार्‍यांहून वाईट आहे त्याचे काय. आणि हे जर देशातील पहिले तीन श्रेष्ठ 'तरुण' फलंदाज आहेत तर इतर 'तरुणांची'ची कामगिरी अजून वाईट असण्याची शक्यताच जास्त आहे. वर्षभरात एक त्रिशतक ठोकले की एरवी ३०च्या वर जायला परवानगी नसते असे समजणार्‍या सेहवागचे काय? तो तीसचा आकडा पार करायला कधी शिकणार? गंभीरही फॉर्ममधे कधी येणार? सहावा फलंदाज म्हणून गेल्या वर्षात आपण किती जणांना संधी दिली. ती जागा अजून स्थिर होत नाही, आणखी तीन मोकळ्या करून कोण दिवटे आणणार तिथे?

रडतराऊंच्या सोयीसाठी रडतराऊंनी काढलेला धागा.

सामाजिक जीवनात जसे राजकारणी, पोलिस इ. ना एकदा नालायक म्हणत ठो ठो बोंब ठोकली की आपली जबाबदारी झटकून टाकता येते तसे. उठसूठ या तिघांच्या नावे बोंब ठोकली की तर आठ जणांचा नालायकपणा झाकता येतो. जर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सतत २००-२५० मधे प्रतिस्पर्ध्याला उखडत असतील नि याचे कारण वेगवान खेळपट्ट्या हे असेल तर आपले गोलंदाज काय तिथे आट्यापाट्या खेळतात? त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया ६०० धावा करू शकते याचा अर्थ आपली गोलंदाजी सुमार, शाळकरी दर्जापेक्षाही सुमार आहे हे कधी मान्य करणार आपण? सातत्याने हीच स्थिती असताना इतक्या वर्षात वेगवान गोलंदाजाच्या प्रशिक्षणासाठी, त्यांना उपयुक्त ठरतील अशा खेळपट्ट्या देशात बनवण्यासाठी कधी सुरुवात होणार? पाटा खेळपट्ट्यांवर धावा रोखण्यापुरती गोलंदाजी करण्याची सवय त्यांना लागत असेल तर त्यांचा काय दोष? आणि आमचे स्पिनर ग्रेट हा मूर्खपणाचा समज कधी सोडणार आपण. चंद्रा-बेदी-प्रसन्नाची धार इतर कोणत्याही भारतीय स्पिनर्सना नव्हती, अगदी कुंबळेलासुद्धा हे स्वच्छ मनाने कधी मान्य करणार. अलिकडच्या काळातील श्रेष्ठ स्पिनर्समधेही कुंबळेचा क्रमांक मुरलिधरन नि वॉर्न यांच्या मागेच लागतो ते सत्य आपण मान्य करणार की नाही. त्यामुळे आपल्या देशात स्पिनर्सना अनुकूल खेळपट्ट्या बनवू नि मग बघून घेऊ हा दावा किती अज्ञानमूलक आहे हे कधी समजणार? काळ बदलतो हे कधी समजणार? आणि मग त्यानुसार धोरणे, पवित्रे डावपेच कधी बदलणार. केवळ सुदैवाने चांगला संघ मिळाल्याने फुकटचे श्रेय घेणारा धोनी स्वत:चे डोके चालवायला कधी शिकणार. त्याने मैदानावर कर्णधार म्हणून काही हालचाली केल्याचे शेवटचे कधी दिसून आले होते. कपिलदेवच्या काळापासून सेट झालेला गोलंदाजीचा पॅटर्न त्याने कधी बदलण्याचा प्रयत्न केला आहे का? नसल्यास यशाचे श्रेय त्याचे कसे, नि आता अपश्रेयाचे खापर फलंदाजांवर का फोडावे? गोलंदाजांनी काय दिवे लावले आहेत? या दौर्‍यात नि मागच्याही, किती वेळा हे गोलंदात प्रतिस्पर्ध्याचा सारा संघ बाद करू शकले आहेते? श्रेय आपले नि अपयशाचे धनी मात्र जुने खेळाडू हा स्वार्थी कावा का म्हणून?

जरा वाईट घडू लागले की उठसूठ आपल्या -तथाकथित- देदिप्यमान भूतकाळाकडे चला चा नारा दिला जातो नाहीतर खापर फोडायला एखादा बकरा - पंचिंग बॅग - शोधली जाते. सचिनला मिळणारा पैसा हा नेहमीच मध्यमवर्गीयांच्या असूयेचा मुद्दा असल्याने तो आपले नेहमीचे गिर्‍हाईक आहेच. गेल्या संपूर्ण वर्षातील कामगिरी पाहिली तर अजूनही सचिन द्रविडच पहिले दोन क्रमांक राखून आहेत हे दिसून येते. यावर स्टॅटिस्टिक्स डजन्ट टेल एनिथिंग किंवा तत्सम बिनडोक तर्क दिले जातात. किंवा 'ऐनवेळी सचिन खेळत नाही' हे घोर अज्ञान (सुधीर काळेंनी साधार खोडून काढलेले असूनही) पुन्हा पाजळले जाते.

तात्पर्य फारसे विचार न करणार्‍यांना त्रागा करायला दुगाण्या झाडायला चांगला धागा आहे. चालू द्या.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2012 - 2:01 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी ते सुनिल गावसकर, रवी शास्त्री (आणि बहूदा मदनलाल) ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरुप बदलून त्या वेगवान करण्यासाठी उपाययोजना सुचवणारी जी समिती स्थापन झाली होती, तिचे काय झाले हो पुढे ?

विवेक मोडक's picture

27 Jan 2012 - 2:17 pm | विवेक मोडक

त्याचं काय झालं माहित नाहि.
पण पुण्याच्या नेहरु स्टेडियमच्या क्युरेटरला जगभरातल्या खेळपट्ट्यांचं घाउक कंत्राट दिलं तर??

पैसा's picture

27 Jan 2012 - 4:15 pm | पैसा

जगातले सगळे गोलंदाज सामुदायिक आत्महत्या करतील!

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2012 - 4:26 pm | परिकथेतील राजकुमार

पण पुण्याच्या नेहरु स्टेडियमच्या क्युरेटरला जगभरातल्या खेळपट्ट्यांचं घाउक कंत्राट दिलं तर??

क्युरेटर मिर्च मसाला मध्ये बसलेला असतो आणि खेळपट्टी कोण तयार करतो हे तुम्ही जाणताच. ;)

पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं फोडु नका, कपिल सिब्बल तुमच्या इथं प्रतिसाद देण्यावर बंदी आणतील, इथं आधीच का हुच्च्भ्रु कमी आहेत म्हणुन अजुन गोंधळ वाढवा.

श्रावण मोडक's picture

27 Jan 2012 - 5:01 pm | श्रावण मोडक

मिर्च मसाला चालू असतं का रे? मध्यंतरी नाव वगैरे बदललं होतं ना?
ही विचारणा अवांतर नाही. कारण मिर्च मसाला चालू असेल तर खेळपट्टीचं स्वरूप बदलतं. मिर्च मसालाची जागा दुसऱ्या कशानं घेतली असेल तरी खेळपट्टी बदलत असते.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2012 - 5:13 pm | परिकथेतील राजकुमार

पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं फोडु नका, कपिल सिब्बल तुमच्या इथं प्रतिसाद देण्यावर बंदी आणतील, इथं आधीच का हुच्च्भ्रु कमी आहेत म्हणुन अजुन गोंधळ वाढवा.

अहो वाहत्या गंगेत हात धुवून घेतोय झाले.

मिर्च मसाला चालू असतं का रे? मध्यंतरी नाव वगैरे बदललं होतं ना?

नाव बदलले असले तरी कार्य त्याच जोमाने चालू असते. ;)

ही विचारणा अवांतर नाही. कारण मिर्च मसाला चालू असेल तर खेळपट्टीचं स्वरूप बदलतं. मिर्च मसालाची जागा दुसऱ्या कशानं घेतली असेल तरी खेळपट्टी बदलत असते.

ज्जे बात !
त्यात मुंबई - पुणे रणजीच्या आदल्या रात्रीची मजाच वेगळी.

गेले ते दिन गेले. :( :-( :sad:

गहुंजाला काय काय सोई आहेत हे कोणी तज्ञ सांगेल काय?????

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jan 2012 - 10:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्रिकेटचा संदर्भ वगळताही निबंधवजा प्रतिसाद वाचनीय आणि विचार करण्यासारखा आहे.

शिल्पा ब's picture

27 Jan 2012 - 11:31 am | शिल्पा ब

अहो मी कीतीदा सांगितलं पण ऐकतच नैत बघा!!

कॉमन मॅन's picture

27 Jan 2012 - 11:32 am | कॉमन मॅन

मस्त! :)

सुहास..'s picture

27 Jan 2012 - 11:31 am | सुहास..

सिरिज गमावल्याचा दोष फलंदाजावर की गोलदांजावर हे ठरवा आधी.

१ ) लेग ग्लान्स साठी फिल्डर घेतला की बॉल लो बाउन्स ऑफसाईड ला ??? ते पन पॉन्टीग ला ( ज्याच्यावर लगान पोर देखील कव्हर ड्राईव्ह मारेल )

२ ) तीन स्लिप घेवुन बॉल कुठ , तर पायात ???

३ ) सेटल झालेल्या प्लेयर बॉल, फुटबॉल येव्हढा दिसायला लागतो , त्याल चेंज ऑफ पेस ???

मजा आहे !!

विवेक मोडक's picture

27 Jan 2012 - 11:39 am | विवेक मोडक

सुहास,
चेंडु पायात पडत नाहि तर "बुंध्यात" पडतो (सौजन्यः श्री बाळ ज. पंडित यांचं मराठी समालोचन)

सुहास..'s picture

27 Jan 2012 - 11:43 am | सुहास..

विमो , ' बुंधा ' म्हणजे यॉर्कर , इथे पायात म्हणजे सरळ लेग ला कट किंवा फ्लिक करता येतो .

क्रिकेट प्लेयर सुहास यांच्या स्वानुभवातुन ;)

विवेक मोडक's picture

27 Jan 2012 - 11:45 am | विवेक मोडक

शब्द मागे घेण्यात आला आहे

विवेक मोडक's picture

27 Jan 2012 - 11:37 am | विवेक मोडक

सुरेश रैना - चेंडु छातीच्या वर उसळला की बोंब सुरु. स्विंग बद्दल बोलायलाच नको.
चेतेश्वर पुजारा - मैदानात कमी वेळ दुखापतग्रस्तांच्या यादीत जास्त
बद्रीनाथ - नेहरु स्टेडियम पुणे किंवा तत्सम विकेट्सवर शतकं ठोकण्यात पटाईत, पण ग्रीनटॉपवर काय?
अभिनव मुकुंद्,मुरली विजय, आणि अजुन बरेच जण आहेत यादीमधे

कॉमन मॅन's picture

27 Jan 2012 - 11:40 am | कॉमन मॅन

आपले मुद्देही योग्य आहेत. आम्ही केवळ सो कॉल्ड धुरंधरांना प्रातिनिधीक समजून लिहिले आहे.

विवेक मोडक's picture

27 Jan 2012 - 11:44 am | विवेक मोडक

नाही,
प्रातिनिधीक म्हणुन हेच तिघे का प्रत्येकवेळी???
बाकी काल विराट कोहलीने शतक पूर्ण केल्यावर जो शब्द तोंडातुन काढला हेच बहुतेक या तरुण रक्ताचं प्रातिनिधीक रूप असावं. उदा. कोहली,युवराज

५० फक्त's picture

27 Jan 2012 - 12:08 pm | ५० फक्त

हे म्हणजे अगदी त्या आजारी सासु सारखं झालं होत नसलं तरी कामं करायची ( तथाकथित भारतीय संघातुन खेळायचे) आणि मग सुन बाहेर काम करते (आयपिएल मध्ये) म्हणुन घरात काम करत नाही अशी तक्रार करायची.

त्रिकुटाला म्हातारे म्हणताय ?आपण काय चिरतारुण्याचे वरदान प्राप्त करुन या धरती वर अवतरला आहात का ?
अहो !"
तो खेळ आहे कुणी तरी हरणार कुणी तरी जिंकणार'खेळा कडे खेळ म्हणून बघायला शिका......
थिल्लर वृत्त माध्यमांचे प्रतिनिधी देखिल मिपावर फेरफटका मारत असतात बहुदा?
मिपा बरीच प्रसिद्ध झाली आहे याचे हे द्योतक आहे...
हर्षभरीत मिपाकर

मला या आख्ख्या सिरीज मध्ये कपिल देव आणि थोड्या-फार फरकाने ' प्रवीण-कुमार ' आठवलाच ....श्रीशांत ही आठवला , किमान काही चाळे तरी केले असते ;)

प्रचेतस's picture

27 Jan 2012 - 12:30 pm | प्रचेतस

भज्जी नाय आठवला का रे?

सुहास झेले's picture

27 Jan 2012 - 12:32 pm | सुहास झेले

सध्या इतकंच म्हणेन.... अभ्यास वाढवा.....!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Jan 2012 - 12:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

श्या!! सचिन, द्रविडला शिव्या देण्याची फ्याशनच आहे.
बाकी तुम्ही शेवटची बॅटींग कधी केली होतीत? ;)

भारतात क्रिकेट आणि राजकारण यावर बोलण्या लिहिण्यासाठी त्यापैकी काही केलेलं असण्याची गरज असते का ?

बाकी, इथला पैसा निवडणुकांमध्ये अडकलेला असल्याने या सिरिजमध्ये जास्त पैसा लागत नसेल आणि त्यामुळं असं होतं आहे का ? भारतातल्या निवडणुका आणि त्यावेळेस झालेल्या सिरिज यावर थोडा शोधा घ्यावा असा विचार आहे.

यापुर्वी भारताच्या ऑस्ट्रेलियातल्या सिरिज आणि भारतीय शेअर मार्कॅट यामधल्या योगायोगावर लिहुन आलेलं होतंच.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Jan 2012 - 1:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भारतात क्रिकेट आणि राजकारण यावर बोलण्या लिहिण्यासाठी त्यापैकी काही केलेलं असण्याची गरज असते का ?

ते ठिक आहे, पण निदान आपल्याला त्या विषयातले खुप काही समजते आणि आपण जणू काही मार्गदर्शक तत्वेच मांडत आहोत असा आव तरी आणू नये.
असो.
एकदा हुच्चभ्रुच व्हायचे ठरवल्यावर असे धागे काढणे हे क्रमप्राप्तचं!

रमताराम's picture

27 Jan 2012 - 1:04 pm | रमताराम

बॅटिंग केली होती का? अस प्रश्न हवा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Jan 2012 - 5:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

खरे तर बेटींग केली होती कां? असेच विचारायला हवे ;)

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Jan 2012 - 1:16 pm | पुण्याचे वटवाघूळ

श्या!! सचिन, द्रविडला शिव्या देण्याची फ्याशनच आहे.
बाकी तुम्ही शेवटची बॅटींग कधी केली होतीत?

राजकारण्यांना विशेषतः संसद सदस्यांना शिव्या देण्याची फ्याशनच आहे.
बाकी तुम्ही शेवटची निवडणुक कधी लढवली होतीत?

(हे वैयक्तिक तुमच्याविषयी नाही. पण हेच मुद्दे वापरले तर कोणाविषयीच काहीच बोलायला नको. संसद सदस्यांना काही बोलायचे नाही कारण मी निवडणुक कधी लढवली नाही. मी बसलेल्या रिक्षाचा ड्रायव्हर नीट रिक्षा चालवत नसेल तर त्याला काही बोलायचे नाही कारण मी कधी रिक्षा चालवायला गेलो आहे? ब्यांकेत काऊंटरमागचा माणूस नीट काम करत नसेल तर त्याला काही बोलायचे नाही कारण मी कधी काऊंटरमागे होतो? असो.)

गणपा's picture

27 Jan 2012 - 12:59 pm | गणपा

तुमच दळण
चालुद्या. :)

आवांतर : हुच्चभ्रु झाल्याबद्दल अभिनंदन. :)

रमताराम's picture

27 Jan 2012 - 1:05 pm | रमताराम

एक लुहारकी.

मैत्र's picture

28 Jan 2012 - 3:20 am | मैत्र

+११११
(दोन्ही प्रतिसादांना !)

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jan 2012 - 2:11 pm | बिपिन कार्यकर्ते

एवढं सगळं सहन करण्यापेक्षा पब्लिक क्रिकेट बघणंच का नाही सोडून देत? न रहेगा बांस न बजेगी बांसुरी!

;)

यकु's picture

27 Jan 2012 - 2:23 pm | यकु

सहमत.
कॉमन मॅन यांनी क्रिकेटकडे लक्ष न देता संविधानावरील लेखमाला टाकावी . ;-)
अवांतर ‍आणि खोडसाळ स्वगत: कॉमन मॅन हे चेसुगु आहेत काय? ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jan 2012 - 3:58 pm | अत्रुप्त आत्मा

कॉमन मॅन हे चेसुगु आहेत काय? अगं बाबो...

कपिलमुनी's picture

27 Jan 2012 - 4:48 pm | कपिलमुनी

अजुन प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद ,उपउपप्रतिसाद ,उपउपउपप्रतिसाद नाहीत दिले ..त्यामुळे चेसुगुंची शक्यता वाटत नाही

छ्‍या: ! ते चेसुगु असलेच तर या अवतारात त्या स्टायलीत कशाला उपउपउपप्रतिसाद देतील?
तसे उप, उपप्रतिसाद दिले असते तर इथल्या कुटिलमुनींच्या ;-) चाणाक्ष नजरेतून ते सुटले असते काय?

मोहनराव's picture

27 Jan 2012 - 5:08 pm | मोहनराव

कुटिलमुनीं>>
हहपुवा!! :)

मेघवेडा's picture

27 Jan 2012 - 2:22 pm | मेघवेडा

गप्प राहायचं ठरवलं आहे.

तीन पत्ते.

मोहनराव's picture

27 Jan 2012 - 2:40 pm | मोहनराव

याच म्हातार्‍या लोकांनी जेव्हा सामने जिंकुन दिले तेव्हा डोक्यावर घेउन नाचला होतात ना, मग त्यांच्या इच्छेप्रमाणं त्यांना खेळुद्या की त्यांना वाटतंय तोपर्यंत. निदान नवीन लोकांपेक्षा तरी ते बरे म्हणायचे!!

घरी बसुन टिका करत बसणे सगळ्यात सोपी गोष्ट आहे व ती करत बसणे सगळ्यात आवडता उद्योग असतो आपल्या लोकांचा!!

रमताराम's picture

27 Jan 2012 - 3:04 pm | रमताराम

जरा इथे पहा बरं. जो वर्ल्ड-कप नुकताच जिंकला म्हणून यंग ब्रिगेड वगैरेचे कौतुक झाले त्यात भारताकडून सर्वाधिक धावा कोणाच्या नि सर्वाधिक बळी कोणी घेतले आहेत ते बघा बरं जरा. वर आम्ही स्पिनर्सबद्दल जो एक मुद्दा मांडला तो ही इथे तपासून पाहता येईल. आपल्याच भूमीवर खेळत असून जहीर, मुनाफ आणि तीनच सामने खेळलेला नेहरा (तीन बळी) या वेगवान गोलंदाजांनी इतर सार्‍या स्पिनर्सच्या (ज्या युवराज हा पार्टटाईम गोलंदाज सर्वाधिक बळी घेऊन गेलाय.) एकुण बळींपेक्षा अधिक बळी मिळवले आहेत. टाईम्स हॅव चेन्जड. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणारा तो एक म्हाताराच आहे. 'ही माझी स्टाईल आहे मी असाच खेळणार' निर्लज्जपणे म्हणत पाच-दहा षटकातच तिसर्‍या फलंदाजाला मैदानावर यायला भाग पाडणारा, खालच्या फलंदाजांना नव्या चेंडूचा सामना करायला लावणारा आणि तरीही स्वतःला आघाडीचा फलंदाज म्हणवून घेणारा कधी बदलणार?'

कुल डौन आजोबा... आपलीच तब्येत बिघडायची अश्याने.
कुणी सुर्यावर थुंकायचा प्रयत्न केला तर काय होते ठौक आहे ना. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2012 - 5:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> यंग ब्रिगेड वगैरेचे कौतुक झाले...

झालं गेलं कौतुक मान्य आहे. पण, नै म्हणजे अजून किती वर्ष सलगपणे ही मंडळी खेळली पाहिजे असे आपल्याला वाटते ?

-दिलीप बिरुटे

५० फक्त's picture

27 Jan 2012 - 5:33 pm | ५० फक्त

'नै म्हणजे अजून किती वर्ष सलगपणे ही मंडळी खेळली पाहिजे असे आपल्याला वाटते ? '

सर अतिशय महत्वाचा प्रश्न जो विचारणा-यांना नीट विचारता येत नाहीये आणि उत्तर देणा-यांना याचं उत्तर देता येणार नाहीये, इथं मला वाटतं जयंत सरांची स्वाक्षरी आहे ना तसा प्रकार आहे - मी गप्प बसतो त्यांची अडचण होउ नये म्हणुन.

खरंतर, क्रिडा क्षेत्रात अन राजकारणात निवृत्तीसाठी वय / विक्रम / सहभाग वगैरे असे नियम केले पाहिजेत.

या बाबतीत कुंबळे अन सौरव हुशार निघाले, वेळच्या वेळी बाहेर पडुन / पाडले जाउन आज आहेत त्या स्थितीत बरे आहेत.

रमताराम's picture

27 Jan 2012 - 5:34 pm | रमताराम

त्याची चिंता मला कशाला. मला अजून तरी बीशीशीआयने निवड समितीत घेण्याची आफर दिलेली नाही. तोवर कशाला बाजारात तुरी....
अवांतरः या प्रश्नाचा कौल बनवायची आय्ड्या कशी वाटते?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2012 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> मला अजून तरी बीशीशीआयने निवड समितीत घेण्याची आफर दिलेली नाही.

आपण निवड समितीत असता तर सचिन, द्रविड आणि लक्ष्मणच्या फलंदाजीचा विदा वर्षानुवर्ष दाखवून सन्मानीय क्रिकेटपटूंना (क्रिकेटच्या देवांना) ते पन्नाशी-साठीचे झाले असते (पायाची हालचाल करतांना त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या) तरी त्यांना खेळवले असते त्याच बरोबर अपयशाचं खापर फोडायला खेळपट्ट्या असणारच होत्या तेव्हा नशीब आम्हा क्रिकेट रसिकांचं की आपल्याला निवड समितीची ऑफर नाही. ;)

अवांतरः या प्रश्नाचा कौल बनवायची आय्ड्या कशी वाटते?

आय्ड्या उतनी बुरी नही. :)

-दिलीप बिरुटे

५० फक्त's picture

27 Jan 2012 - 10:40 pm | ५० फक्त

+१००, मग नाहि तर काय ,बरं ते जाउ दे, एक सामान्य क्रिकेट चाहता म्हणुन, विशिष्ट खेळाडुचा चाहता म्हणुन नव्हे, बिरुटे सरांच्या प्रश्नाचं उत्तर द्या की.

रमताराम's picture

27 Jan 2012 - 11:19 pm | रमताराम

याच धाग्यात. वाचायची तसदी घेतली तर मिळेलही. वर मूळ प्रतिसादात क्रिक-इन्फोचा दुवा आहे. चार महिन्यापूर्वीची विश्वचषकातील दोन शतके, दोन अर्धशतकांसह भारतातर्फे सर्वाधिक धावांची कामगिरी आज संघात असण्यासाठी पुरेशी नसेल तर काय फक्त कालच्या कामगिरीचा निकष लावायचा काय?

आणि आम्ही तुलनात्मकदृष्ट्या उरलेल्या आठ खेळाडूंच्या कामगिरीबद्दल - काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - हजार प्रश्न आमच्या एकाहुन अधिक प्रतिसादांतून विचारले आहेत त्याचे उत्तर देण्याचे तुम्ही, महामहीं बिरुटेसर किंवा धागामास्तर कधी मनावर घेणार? की उत्तरे देण्याची जबाबदारी फक्त आमच्यावर आहे नि तुम्हाला काय टीका करण्याचे अधिकार थोरल्या महाराजांनी लिहून दिलेत?

ठीक आहे. हे आमचे उत्तर. जर वर्षातून चार शतके, पाच-सहा वेळा नव्वदीत बाद होणारा खेळाडू असेल जो पंचेचाळीसच्या पेक्षा अधिक वार्षिक सरासरी प्रत्येक वर्षी (लॉन्ग-टर्म अ‍ॅवरेजही नव्हे, त्या त्या वर्षीची सरासरी) तर तो पन्नासच काय शंभर वर्षाचा असला तरी तीसच्या सरासरीने खेळणार्‍या तथाकथित तरूण खेळाडूपेक्षा लाखपटीने परवडला. खेळता येत नाही बोंबलायला तर तारूण्य काय मखरात सजवायचंय? का आज या, उद्या त्या हिरविणीबरोबर गॉसिप म्यागेजिन्स मधून मिरवायचंय?

अहो आम्हाला कळेल अशा शब्दांत लिहा वो काहीतरी. हे सगळं आम्हाला कळत नाही. आम्ही फक्त फेल गेल्यावर आरोप करणं जाणतो!

गप्प बस रे मेव्या.
चार मोठी माणसं चरचा करत असताना लहानग्यांनी मध्ये मध्ये लुडबुड करु ने.

५० फक्त's picture

27 Jan 2012 - 11:47 pm | ५० फक्त

''चार महिन्यापूर्वीची विश्वचषकातील दोन शतके, दोन अर्धशतकांसह भारतातर्फे सर्वाधिक धावांची कामगिरी आज संघात असण्यासाठी पुरेशी नसेल तर काय फक्त कालच्या कामगिरीचा निकष लावायचा काय? - पण ही कामगिरी भारतातल्या मठ्ठ विकेटवरची झाली, गेल्या महिन्याभरात काय झालंय ऑस्ट्रेलियात ? आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या तरी निघाल्यात का ? ज्या द्रविडच्या स्टंम्पला महिनोनमहिने बॉल लागत नसे तो चार पाच वेळा बोल्ड होतो हा फक्त योगायोगच मानायचा का ?

रात गयी बात गयी, जर प्रत्येक मॅच नविन असेल तर प्रत्येक मॅच मधलं हरणं आणि जिंकणं हे सुद्धा नवीनच असतं, आणि त्याचा तेवढाच आनंद किंवा दुख: होतं, आता हे तर मॅच मागुन मॅच हरणं चाललंय आणि ते सुद्धा कोणताही विरोध न दाखवता मग तो सहवाग सचिन द्रविड नाहीतर लक्ष्मण, एखादा दोन दिवस टिकतील पिचवर नाहीच, थोडा टिकेल असं वाटलं की घातलीच बॅच आसाऑस्टं मध्ये. हेच करायचं असेल तर या सगळ्यांनाच टिम ए ला नॅशनल टिम म्हणुन पाठवायचा एक प्रयोग करुन पाहायला काय हरकत आहे.

ज्या पिचवर ऑस्ट्रेलियन सहाशे रन काढतात तिथं आपल्याला चारशे करता येउ नयेत, या सगळ्या थोर खेळाडुंचा थोरपणा यातच आहे की त्यांनी बाजुला सरकुन मोकळं व्हावं, पुढं नंतर येणारे सांभाळतील नाहीतर रसातळाला नेतील, काही क्रिकेटवाचुन देशाचं अडलेलं नाहीये, मिळतात का ऑलिंपिक मध्ये पदकं, नाही, मग काही अडलंय का त्यामुळ ? उगा आपण बाजुला सरकलो तर भारतीय क्रिकेट बुडेल असा फार्स कशाला करायचा ?

ठीक आहे. हे आमचे उत्तर. जर वर्षातून चार शतके, पाच-सहा वेळा नव्वदीत बाद होणारा खेळाडू असेल जो पंचेचाळीसच्या पेक्षा अधिक वार्षिक सरासरी प्रत्येक वर्षी (लॉन्ग-टर्म अ‍ॅवरेजही नव्हे, त्या त्या वर्षीची सरासरी) तर तो पन्नासच काय शंभर वर्षाचा असला तरी तीसच्या सरासरीने खेळणार्‍या तथाकथित तरूण खेळाडूपेक्षा लाखपटीने परवडला. खेळता येत नाही बोंबलायला तर तारूण्य काय मखरात सजवायचंय? का आज या, उद्या त्या हिरविणीबरोबर गॉसिप म्यागेजिन्स मधून मिरवायचंय? -

भावना बाजुला ठेवुया जरा, पण सध्या जेवढं क्रिकेट खेळलं जात आहे, ते पाहता पन्नास पर्यंत सचिन काय कोणालाच खेळणं शक्य नाही, त्यामुळं ही तुलना जरा गैर वाटते. आणि हिरविणी बरोबर मिरवण हे काय नविन आहे का, ती तर परंपराच आहे आपल्याकडं.

मेघवेडा's picture

28 Jan 2012 - 12:25 am | मेघवेडा

भारतातल्या मठ्ठ विकेटवरची कामगिरी? जिथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही टेस्ट्स शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या विकेटपर्यंत लढल्या गेल्या त्या विकेट्सना मठ्ठ म्हणायचं? जिथं फास्ट बोलर्स विकेट्स काढून जातात त्या विकेट्सना मठ्ठ म्हणायचं? नाही, म्हणजे मग स्पोर्टिंग विकेट म्हणजे तरी काय तुमच्या दृष्टीनं? तुमचा प्रतिसाद हा अ‍ॅन्टि त्रिमूर्ती नसून अ‍ॅन्टि क्रिकेटच वाटतो आहे! (तुमचे पूर्वीचे काही प्रतिसादही - या धाग्यावर नव्हे, जुन्या धाग्यांवर - याचीच ग्वाही देतात.) चर्चा त्रिमूर्तींबद्दल चालली आहे तिथं क्रिकेटवर - मुळावरच - घाव घालू नका.

तुम्ही म्हणता ज्या द्रविडच्या स्टंम्पला महिनोनमहिने बॉल लागत नसे तो चार पाच वेळा बोल्ड होतो हा फक्त योगायोगच मानायचा का ?! बरं, झाला तो बोल्ड. काय बिघडलं? तेवढ्या पाच इनिंग्स बघता, त्याआधीच्या २८० इनिंग्ज बर्‍या विसरता सोयीस्करपणे! राहुलनं किती सेंचुरीज मारल्या आणि किती रन्स केले २०११ मध्ये याचं गणित मांडलंय? आणि आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या नाही निघाल्या या सीरीजमध्ये पण यालाही पूर्ण संघच जबाबदार नाही काय? सगळंच नेहमी गोग्गोड नसतं की हो आयुष्य! यश आहे तसं अपयशही येणारच! पण 'सीनियर्स म्हातारे झाले' ही पराभवाची कारणमीमांसा ठरूच शकत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. 'आपण बाजूला झालो तर भारतीय क्रिकेट बुडेल' असा फार्स कुणी केलाय हो आणि? हे बरे मनाचे श्लोक! वर्ल्ड कप जिंकला, टेस्ट्समध्ये पहिलं रँकिंग मिळालं तेव्हा हेच सगळे सीनियर्स गळ्यांतले ताईत झाले होते आमच्या! या पराभवामागं कोच हाही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे! ज्याला धोनीचं धूर्त, कुशल नेतृत्व वगैरे म्हणून गौरवण्यात आलं (तो चांगला कर्णधार आहेच, वाद नाही) ते गॅरी कर्स्टनच्या 'परफेक्ट प्लान्स' चं कुशल एक्झिक्युशन होतं! डंकन फ्लेचरकडं तसे ट्रम्प्स नसावेत! Seniors cannot become old and useless in just 2 series, they would have faded gradually.

१९७१ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सीरिज जिंकल्यावर वाडेकरचा उदो उदो करणार्‍यांनीच पुढे १९७४ मध्ये इंग्लंडमध्ये सीरिज हरून आल्यावर त्याला चपलांचे हार घातले हे आठवलं.

' तुमचा प्रतिसाद हा अ‍ॅन्टि त्रिमूर्ती नसून अ‍ॅन्टि क्रिकेटच वाटतो आहे!' - शंभर टक्के कारण तेच अति होतंय आणि अति तिंथं माती होते आहे त्यामु़ळं, या त्रिमुर्ती बद्दल बोलतच नाहीये, कारण मग ती व्यक्तीपुजा होते तो सांधिक खेळ राहातच नाही, क्रिकेट या तिघांपेक्षा फार मोठं आहे, पण आपला मिडिया आणि आपण सगळेच उगाचच वैयक्तिक खेळाडुंना खेळापेक्षा मोठं करत आहे.

'सीनियर्स म्हातारे झाले' ही पराभवाची कारणमीमांसा ठरूच शकत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. '' - हे सुद्धा मान्य, पण सिनियर्सनी जो सिनियरपणा (पक्षी प्रौढत्व) दाखवायला हवा तो दाखवला जात नाही किंवा गेला नाही याबद्दल वाईट वाटतंय.

'तेवढ्या पाच इनिंग्स बघता, त्याआधीच्या २८० इनिंग्ज बर्‍या विसरता सोयीस्करपणे! ' - छे विसरत नाहीये, पण नवीन पराभवाच्या जखमा जुन्या आठवणींच्या मलमांनी भरुन काढता येत नाहीत, आणि ते देखील चार चार पराभव पाठोपाठ. एका पराभवाचा वचपा काढला जातो, किंवा सुड घेतला जातो तेंव्हाच ती जखम भरली जाते.

खेळ मग तो फुटबॉल असो, क्रिकेट असो किंवा बुद्धिबळ हे सगळे युद्धाचा बेस असलेल्या सांघिक किंवा वैयक्तिक कृति आहेत. सभ्य आणि सर्वमान्य प्रकार आहेत हे युद्धाचे, आणि युद्ध म्हणलं की विजय आणि पराभव आलेच, आणि त्यात विजेत्यांची वाढलेली मग्रुरी आणि आणि त्यातुन पराभुतांनी घेतलेली सुड उगवण्याची तयारी ही आलीच, जर हे होणारच नसेल तर कशाला पाहिजेत ही नाटकं. बेंगलोरातच बहुतेक प्रसादनं काढलेली सोहेलची विकेट आणि झिदाननं मारलेली धडक ही याचीच रॉ उदाहरणं आहेत.

'आणि आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या नाही निघाल्या या सीरीजमध्ये पण यालाही पूर्ण संघच जबाबदार नाही काय? ' - याला मुख्यत्वे जबाबदार ६-७ फलंदाजच,धावा काढणे हे त्यांचंच काम आहे, गोलंदाजांचं नाही, उलट ते तर भरुभरुन धावा देउन आपल्या फलंदाजांना संधी देत आहेत आपले कौशल्य दाखवण्याची.

Seniors cannot become old and useless in just 2 series, they would have faded gradually. - but what about old seniors and new seniors, who are actually either fading or have faded, even then not only refuse to accept the fact but also refuse to play well for the country, but will play well for the money in IPL.

'१९७१ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सीरिज जिंकल्यावर वाडेकरचा उदो उदो करणार्‍यांनीच पुढे १९७४ मध्ये इंग्लंडमध्ये सीरिज हरून आल्यावर त्याला चपलांचे हार घातले हे आठवलं.' - history repeats itself, nothing new in it.
आणि ज्यांनी हे केलं ते आपलेच काका-मामा होते, कोणी वेगळे नव्हते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2012 - 12:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - हजार प्रश्न आमच्या एकाहुन अधिक प्रतिसादांतून विचारले आहेत त्याचे उत्तर देण्याचे तुम्ही, महामहीं बिरुटेसर किंवा धागामास्तर कधी मनावर घेणार? की उत्तरे देण्याची जबाबदारी फक्त आमच्यावर आहे नि तुम्हाला काय टीका करण्याचे अधिकार थोरल्या महाराजांनी लिहून दिलेत?

प्रश्न काही विशिष्ट खेळाडूंबद्दलचा नाही. प्रश्न आहे, सच्या, द्र्वीड आणि लक्ष्मणचा. मान्य की संघात तिघांशिवाय खेळाडू आहेत. परंतु मूळ धागामास्तर आणि महामहिमांचा प्रश्न असा आहे की, किती दिवस या सिनियर्संना खेळवणार ? आणि आपले सर्व प्रतिसाद वाचूनही, नुसतं वाचूनही नव्हेच तर आपल्याला नेमकं काय म्हणायचं असाव अशा अंदाजानेही आपले प्रतिसाद डोळ्यात तेल घालूनही वाचल्यानंतर मूळ प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी इतर फलंदाजाची तुलना, त्यांच्या जवाबदार्‍या, भारतीय गोलंदाजी, पाटा खेळपट्ट्या, वेगवान गोलंदाजांचा अभाव, भूतकाळातील स्पीनर्सच्या वर्तमान काळातील गोलंदाजांशी तुलना करणे यापेक्षा आपले प्रतिसाद सरळ प्रश्नांच्या उत्तराकडे पाठ फिरवतांना दिसतात असा एक सामान्य वाचक म्हणून आमचा समज झाला आहे. अर्थात आपण सर्वच प्रश्नाची उत्तरे मोठी अभ्यास करुन दिला आहे, असा आपल्या समजाचा आम्हाला आदर आहेच. अर्थात अशा उतरांचे आम्हाला काही नवलही नाही. देवांचे
अपयश झाकण्यासाठी अशा सारवा-सारवीची गरज ' देवांच्या पडत्या काळात' भूतकाळातील विदाची शिदोरी बांधून चाललेली वकिली अनेक करत आहेत. तेव्हा त्यात काही नवे नाही. बाकी, आपल्याही प्रतिसादात
नवीन,अद्भूत , अनपेक्षित, अशी माहिती सांगणारा प्रतिसाद आपला आहे, असे आम्हाला वाटत नाही.

बाकी, असे सांगण्याचा अधिकार कोणा थोरल्या महाराजांनी दिला नसला तरी धागाकर्त्याच्या चर्चा-संवादात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य आपल्यासोबत आम्हालाही आहेच.

कधीतरी सिनियर्सलाही वगळावे लागेल. कधी वगळायचं याचं उत्तर कधी तरी आपणाला नव्हे तर काळालाही द्यावेच लागणार आहे. पण, यापेक्षा उत्तम काळ कोणता किंवा येणार आहे, हे खेळाडूंला ठरवावेच लागणार आहे, तो पर्यंत नसती वकिली आम्हालाही झेलावी लागणारच आहे. :)

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jan 2012 - 2:40 pm | परिकथेतील राजकुमार

काही काही प्रतिक्रिया वाचून खरंच मौज वाटली.

सचिन, राहूल आणि लक्ष्मण हे संघावरती भार झालेले असून, ते फॉर्म मध्ये नसताना देखील केवळ वरिष्ठ म्हणून त्यांना सहन करावे लागत आहे असा काहीसा सुर ह्या प्रतिक्रियांमध्ये दिसला. पण मुळात परिस्थीती अशी आहे का ?

क्रिकेटकडे खेळ म्हणून बघणे हा झाला आपला सामान्य रसीकांचा दृष्टीकोन. मात्र बोर्ड आणि आयसीसी चे मुख्य उद्देश म्हणजे गर्दी आणि पैसा. आता गर्दी आणि पैसा हे गणित जुळवायचे तर ज्यांना दर्शकांनी देवतुल्य बनवले आहे आणि ज्यांना खेळताना बघण्यासाठी दर्शक खिसे रिकामे करायला तयार आहेत, त्या खेळाडूंना खेळवणे भागच आहे ना ? आज निव्वळ सचिन संघात नाही म्हणून मॅच न बघणारे अनेक लोक मला माहिती आहेत. हे खेळाडू खेळत नसून त्यांना खेळवले जात आहे हे आपल्या लक्षात कधी येणार ? सर्व संघानी आंतरराष्ट्रीय दौर्‍यात आपला तुल्यबळ संघच पाठवायला हवा, हा आयसीसीचा पहिला नियम आहे. त्यामुळे तर काही काळापूर्वी दुबळा संघ सचिनच्या हाताखाली राष्ट्रकुलला आणि तुल्यबळ संघ ट्राय सिरीज खेळायला रवाना झाला होता.

गंमतीचे उदाहरण सांगतो. गेल्या २ वर्षात आगरकर, झहिर खान पासून अनेक भारतीय संघात खेळणारे किंवा पदार्पण करणारे खेळाडू पुण्यात विविध सामन्यांसाठी येऊन गेले. आगरकर रणजीसाठी तर झहिर बहूदा ऑईल कंपन्यांच्या सामन्यासाठी येऊन गेला. ह्या खेळाडूंना बघायला ५० प्रेक्षक देखील हजर नव्हते. आणि जेंव्हा सचिनचा मुलगा अर्जुन शालेय सामन्यासांठी पुण्यात आला तेंव्हा त्याला बघायला २५० च्या वर लोकांची गर्दी. ह्याला म्हणतात नाममहात्म्य.

उद्या कोहलीच्या कर्णधारपदाखीला त्रिमुर्ती,सेहवाग, धोनी ह्यांना वगळून संघ पाठवला तर किती लोक पहाटे उठून सामना बघतील ? किती प्रेक्षक मैदानात हजेरी लावतील ? आणि मुख्य म्हणजे ह्या संघाच्या सामन्यांना कोण प्रायोजक आपले पैसे लावेल ? दोन वर्षापूर्वीच्या आयपीएलला सचिन शेवटी एकदाचा फिट घोषीत होऊन खेळायला येईपर्यंत मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना काय गर्दी होत होती ? सचिन आल्यावर तिच गर्दी किती वाढली ? प्रत्यक्ष तुम्हीच घेतलेला हा अनुभव आहेत.

शेवटी रेस मध्ये भाग घ्यायचा का नाही हे घोडा ठरवू शकत नाही हेच खरे.

आयसीसी चे मुख्य उद्देश म्हणजे गर्दी आणि पैसा. आता गर्दी आणि पैसा हे गणित जुळवायचे तर ज्यांना दर्शकांनी देवतुल्य बनवले आहे आणि ज्यांना खेळताना बघण्यासाठी दर्शक खिसे रिकामे करायला तयार आहेत, त्या खेळाडूंना खेळवणे भागच आहे ना ?

मुद्यात दम आहे.

ठाण्याला, युवीची फलंदाजी आणि युवीला जवळून बघायला मिळावे म्हणून ऐववेळी आयपीएलच्या तिकिटासाठी केलेला खटाटोप आणि धावपळ आठवली.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

27 Jan 2012 - 3:34 pm | कपिलमुनी

सेंच्युरी नाही म्हणून सचिनला घरी बसवा ...

महाराष्ट्राची प्रगती नाही म्हणून सी एम ना घरी बसवा..

जनलोकपाल नाही म्हणून अण्णांना म्हणून घरी बसवा..

( मंदाकिनी , भन्नाट पूर्ण न के ल्याबद्दल परा ला घरी बसवा)

बादवे मिपा वर अजुन कोणा़ कोणाला घरी बसवता येइल ?

मोहनराव's picture

27 Jan 2012 - 4:01 pm | मोहनराव

बादवे मिपा वर अजुन कोणा़ कोणाला घरी बसवता येइल ?>>>

तु कंपनीत असताना मिसळपाव उघडुन बसतोस, तुलाही घरी बसवता येईल! ;)

चिरोटा's picture

27 Jan 2012 - 3:43 pm | चिरोटा

१२० कोटींतल्या ११ना , २ कोटींतल्या ११ कडून हरताना पाहून एक मिपाकर म्हणून मान शरमेने खाली गेली.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jan 2012 - 4:06 pm | अत्रुप्त आत्मा

ते कसेही खेळोत..पण हा धागा शं-भर मारणार हे नक्की ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2012 - 4:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..

हम्म, सहमत आहे.

आवडता विषय काथ्याकुटायला घेतल्याबद्दल आभारी.

-दिलीप बिरुटे
(ऑष्ट्रेलियात चव गेल्याने नाराज असलेला)

असुर's picture

27 Jan 2012 - 5:21 pm | असुर

चवकशीच्या कुठल्या अ‍ॅक्टान्वये हा धागा काढला आहे हे धाग्याच्या सुरुवातीलाच (किंवा मध्ये, किंवा शेवटी, किंवा कुठेही) स्पष्ट न केल्याने सदर धाग्याला फाट्यावर मारण्यात आलेले आहे.

बाकी ररा पुरेसे बोलले आहेतच. आणि त्यांच्या प्रतिसादातूनही काही कळले नसेल, तर काहीही कळण्यापलिकडे गेल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गप्प रहायचे ठरवण्यात आले आहे.

पराषेटना 'डायरीदान' या नावाने लेखमाला सुरु करण्याची विनंती!

--असुर

---- मुळीच घरी बसवू नये.
क्रिकेट सारख्या मोठया खेळात हरण्याच्या अश्या छोट्या छोट्या घटना होतच असतात. त्याचं काय मोठं मनाला लावून घ्यायचं? अश्या छोट्या घटनांमुळे आपण त्यांनाच काय, कोणालाही घरी बसवू नये.

प्रशांत उदय मनोहर's picture

27 Jan 2012 - 7:20 pm | प्रशांत उदय मनोहर

आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते.

१०० % सहमत. उदा. सुनील, कपिल यांनी घेतलेली निवृत्ती. पण शतकांचे शतक पूर्ण होणं ही बाबही असामान्य आहे आणि ती न साधण्याइतकं सचिन "हे" झाला नाही अजून. त्यानंतर मात्र त्याने सन्मानाने निवृत्त होणेच चांगले.

अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली.

१. सध्याचा परफ़ॉर्मन्स बघितल्यावर वरील तिघांसह इतर आठांवरही जळजळीत टीका होणं आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे.
आणि काय होतं, की क्रिकेटला इतकं महत्त्व दिलं जातं आपल्याकडे, की घरात एखाद्याचा दहवा/तेरावा असेल तरी जर क्रिकेट मॅच चालू असेल तर दुःख गेलं तेल लावत.. पण क्रिकेटचा विचार सोडवत नाही. क्रिकेट या खेळाचं नाव जर विष्णु, किंवा कृष्ण किंवा तत्सम देव/देवी असतं, तर त्याबद्दलच्या विचाराने कळत-नकळत अनेक भारतीयांना मोक्ष मिळाला असता!

२. सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा.

श्रावण मोडक's picture

27 Jan 2012 - 7:23 pm | श्रावण मोडक

सुनीलसोबत कपीलचं नाव पाहून आश्चर्य वाटलं. कपीलची निवृत्ती लांबली. इतकी, की सचिनची आत्ताची कामगिरी परवडली, अशी कपीलची स्थिती झाली होती. तो हॅडलीचा विक्रम एकदाचा पार झाला आणि मग अनेकांनी हुश्श केलं होतं.
निवृत्तीबाबत अलीकडच्या काळातला सर्वाधिक हुशार खेळाडू सुनीलच. अगदी अनपेक्षीतपणे त्याने निवृत्तीची घोषणा केली. :)

>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा.

=) ) =) ) =) ) =) ) =) )

लेखामागची परिस्थिती काय जब्बरदस्त टिपलीय.
खपलो हे वाचून..

मोदक's picture

27 Jan 2012 - 7:54 pm | मोदक

>>>>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा.

बहुदा या वाक्याचा कॉपीराईट छोटा डॉन कडे आहे. :-D

प्रशांत उदय मनोहर's picture

28 Jan 2012 - 10:35 am | प्रशांत उदय मनोहर

आम्ही इतरांची वाक्ये चोरत नाही.

मोदक's picture

29 Jan 2012 - 1:00 am | मोदक

ते तर तुमचेच वाक्य आहे...

उगाच चाळीमधल्या संडासासमोरच्या रांगेतला माणूस संडासाचं दार उघडायची वाट पाहतो तसे करू नका.

http://www.misalpav.com/node/19879#comment-355215

आमची मेमरी थोडी गंडली असावी. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2012 - 8:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा.

लबर एक. प्रशांतराव दंडवत घ्या आमचा. :)

-दिलीप बिरुटे

५० फक्त's picture

27 Jan 2012 - 10:41 pm | ५० फक्त

उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. -

कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?

प्रशांत उदय मनोहर's picture

28 Jan 2012 - 11:08 am | प्रशांत उदय मनोहर

कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?

ते ठीक आहे हो!
पण क्रिकेट मॅचमधल्या पराभवानंतर चर्चा करताना लोकांना स्वतःला गळका-टमरेलधारी चाळकर्‍याच्या भूमिकेत जायला का आवडतं एवढं, हा प्रश्न नेहमी पडतो मला.

बाय द वे, वर जाताना जर खाल्लेलं घेऊन जाल तर कदाचित् वरच्या संडासासमोरील रांगेत उभे रहावे लागेल तुम्हाला. ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2012 - 12:16 am | निनाद मुक्काम प...

अनेक वर्षापासून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाने अती क्रिकेट भारतीय जनतेच्या आणी खेळाडूंच्या माथी मारले आहे. त्यात आय पी एल ह्या व्यावसायिक स्पर्धेची भर पडली .त्यात तर सामन्यांचा रतीब असतो. पूर्वी सचिनने २० २० देशासाठी खेळायचे टाळले होते. पण आता तोही'' दुनिया हिला देंगे'' म्हणत ह्या सर्कशीत दाखल झाला आहे.
आपले खेळाडू एक तर प्रचंड थकलेले आहेत किंवा दुखापती लपवून खेळत आहेत.
भारतीय संघाबद्दल म्हटले तर कुंबळे गेल्यावर एकहाती गोलंदाजीची धुरा वाहणारा एकही पर्याय उपलब्ध नाहीं आहे. जहीर दुखापतीने त्रस्त बाकीचे आयाराम ,गयाराम आहेत. क्रिकेट सामने गोलंदाज जिंकून देतात.

परदेशात ८ सामने सलग हरणे कुणालाच मान्य होणार नाहीं.
कणेकरांचे एक वाक्य आठवले . एकदा कपिल देव पाकिस्तान विरुद्ध हरल्यावर म्हणाला होता '' हा खेळ आहे. कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार'' त्यावर ते म्हणतात '' हे आम्हालादेखील कळते, पण हरणारा संघ नेहमी आपलाच का असतो.
ता .क आता आय पी एल ५ चे बिगुल वाजले आहे. त्यात पाटा खेळपट्टीवर फटाक्यांची आतिषबाजी पहायला सज्ज होऊया.

श्रीरंग's picture

28 Jan 2012 - 12:44 am | श्रीरंग

क्रीडा मंत्रालयाने कच खाऊन बीसीसीआय समोर सपशेल लोटांगण घातले नसते, आणी WADA ची नियमावली बंधनकारक केली असती तर ८०% क्रिकेटपटू डोप टेस्ट मधे फेल होऊन घरीच बसले असते.