परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.
सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस. सार्या भारताने तुझं भरपूर कौतुक केलं आहे परंतु आता तू मानाने घरी बसावंस हे बरं.. तुला संघातून काढून टाकण्यापेक्षा तू स्वत:हूनच निवृत्त व्हावंस असं वाटतं.'
आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते. अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली. परंतु पैशांच्या आणि व्यक्तिगत उच्चांकाच्या हव्यासापायी सचिन निवृत्त होण्यास तयार नाही. तीच गत राहूल आणि लक्ष्मणची आहे. ही म्हातारी खोडं जाणार केव्हा आणि नवीन रक्ताला वाव मिळणार तरी केव्हा..??
राष्ट्रपती महोदयांना नम्र विनंती की त्यांनी आत्ताच २०१३ चा भारतरत्न पुरस्कार सचिनला जाहीर करावा म्हणजे तरी तो घरी बसेल अशी आशा करता येईल.
ता क - आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सचिन केवळ १३ धावा काढून तंबूत परतला आहे!!
-- काँमॅ.
प्रतिक्रिया
28 Jan 2012 - 1:48 am | मोदक
या ८०% मध्ये सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आहेत का..?
28 Jan 2012 - 3:40 am | शेखर काळे
आणखी काही दिवसात एक दिवसीय श्रुंखला सुरु होईल, त्यात सचिन तेन्डुलकर आपले १००वे शतक काढेल, भारत २-३ सामने जिंकेल. सर्वजण आपापल्या घरी सुखाने नांदू लागतील.
हेही दिवस जातील !
28 Jan 2012 - 8:48 am | स्पा
@वरील सर्व वाक्पटू पंडितांना एक सल्ला
आता सर्व काही विसरा आणि फू बै फ़ू बघा
28 Jan 2012 - 10:22 am | पुण्याचे वटवाघूळ
क्रिकेटमध्ये लक्ष घालणे कमी केल्यापासून डोक्याला होणारा किती ताप आणि अन्यथा फुकट गेलेला किती वेळ मी वाचवत आहे याचाच विचार करत आहे कालपासून या धाग्यावरील गरमागरम चर्चा वाचून.
28 Jan 2012 - 1:49 pm | कॉमन मॅन
छान माहितीपूर्ण चर्चा. सर्वांच्या मताचा आदर आहेच..! :)
बाय द वे, आज ऑस्ट्रेलियाने ४-० अशी मालिका जिंकली आणि आपण आपला परदेशातला सलगच्या ८ व्या पराभवाचा विश्वविक्रम नोंदवला!
सचिन, द्रविड आणि लक्ष्मणसह सर्व धुरंधर खेळाडूंचा विजय असो..! :)
28 Jan 2012 - 2:16 pm | गणपा
झोपलेल्याला उठवता येतं. झोपेचं सोंग घेतलेल्याला नव्हे. ;)
शेंचुरी मारुनच दम खाणार बघा तुम्ही.
यांना घ्यारे (भारतीय संघाच्या) आत.
=))
28 Jan 2012 - 2:39 pm | वेताळ
क्रिकेट ११ लोकाचा खेळ आहे.तो जितका ताकतीने खेळता येतो त्याबरोबर डोक्याचावापर करुन देखिल खेळावे लागते.सचिन,द्रविड किंवा लक्ष्मण ह्यांच्यावर टिका करण्याअगोदर त्याची जागा भरुन काढणार्या ३ खेळाडुंची नावे तरी दे बाबा इथे.देवाने हात व मालकानी मिसळपाव उपलब्द करुन दिले म्हणुन काहीबाही लिहणे बंद कर.
लेका सचिन किंवा इतराना म्हातारे म्हनण्यापेक्षा दिवसभर एकाद्या मैदानावर नुसते चालुन तरी दाखव मग तुझा तुझ्याबद्दलचा गैरसमज दुर होईल.
28 Jan 2012 - 2:50 pm | कॉमन मॅन
आम्ही मैदानात चालण्या, न चालण्यामुळे सचिन आणि इतर खेळाडूंच्या परदेशात सलग ८ वेळा तोंडावर आपटण्याच्या नाकर्तेपणाचे समर्थन कसे होऊ शकते हे समजले नाही.
मानणार नसलो तरी आपल्या मौलिक सुचनेचा आम्ही आदर करतो..
धन्यवाद.
28 Jan 2012 - 3:12 pm | वेताळ
पण त्याला म्हातारा किंवा त्याने घरी बसावे हे सांगण्याची आपली योग्यता आहे का ते तपासुन पहावे.सचिनने कधीच स्वःताचे गोडवे गायले नाहित किंवा कधीच कुणावर टिका केलेली नाही. त्याला प्रत्येकवेळी टारगेट करणे हे चुकीचेच आहे.त्याने किती पैसे मिळवावे हे ठरवणारे तुम्ही कोण? बरे अजुन सचिनने पैसे मिळवताना देखिल काही नियम पाळले आहेत. तो कधीच मद्याची,सिगारेट किंवा इतर प्रक्षोभक जाहिराती करुन पैसे कमावत नाही.तो फिट नसताना सहसा खेळत नाही.नावे ठेवताना जरा विचार करावा. बाकी काही नाही.
30 Jan 2012 - 12:23 pm | कॉमन मॅन
असे आम्ही कुठेच म्हटलेले नाही. त्याचा पूर्वीचा खेळ पाहता तो आमचा निश्चितच एक आवडता फलंदाज आहे.
अशी योग्यता आवश्यकच आहे असे आम्ही मानत नाही. अर्थात, आपल्या मताचा आदर आहेच!
त्याच्या व्यक्तिगत गुणांबद्दल आम्ही कुठेच शंका घेतलेली नाही.
आम्ही त्याला आमच्या आठवणीप्रमाणे सदरहू धाग्यात प्रथमच टार्गेट केलेले आहे. 'प्रत्येकवेळी' हा शब्द वापरण्यापूर्वी आम्ही सचिनला टार्गेट केल्याची अन्य काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.
आम्ही निश्चितच कुणी नाही. परंतु आयपीएलसारख्या सामन्यांमधून स्वत:चा लिलाव करून घेण्याऐवजी देशाकरता उत्तम खेळून भरपूर पैसे अगदी अवश्य मिळवावेत असे आम्हाला केवळ सचिनच नव्हे तर भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूबाबत वाटते.
मद्याची,सिगारेट किंवा इतर प्रक्षोभक जाहिराती करुन पैसे मिळवणे अथवा न मिळवणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे आम्हाला वाटते. सचिन जर तसे पैसे मिळवत नसेल तर तो त्याचा गुण नसून व्यक्तिगत निर्णय आहे असे आम्हाला वाटते.
ते अपेक्षितच आहे. किंबहुना तेच अपेक्षित आहे!
विचार करूनच नावे ठेवली आहेत. त्याच्याबद्दल आदर आहे आणि म्हणूनच त्यानं स्वत:चं अधिक हसं करून न घेता सन्मानाने घरी बसावं असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं.
वेताळजी, या निमित्ताने चर्चा करून आम्हाला आमचे मुद्दे मांडण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. धन्यवाद..
29 Jan 2012 - 5:51 am | चौकटराजा
आता त्ये पल्डे नि ह्ये बरळल्ये आशी आपल्या द्येशाच्यी ष्टाईलच हाय ! आ ! आता त्येला कोन काय करनार ? आरं पॉंटिंगला बी घरी बशिवा आसं म्हणत व्होतेयेच की. मुद्दा काय हाये जो ख्याळ करतो न्ह्व्व्ह त्येला बराबर समाजतं आपुन संपलो किइ न्हाई ? नुस्त्या गप्पा काय कामाच्या ?
29 Jan 2012 - 11:19 am | रमताराम
काही नाही. सचिनच्या नुसत्या नावावर नुसत्या धांग्याच्यापण सेंच्युरा होतात हे दाखवण्यापुरती 'शंभरी' भरवतोय.
29 Jan 2012 - 11:23 am | सुहास झेले
29 Jan 2012 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंडियन वॉल ला आपली कारकिर्द शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि नवीन खेळाडूंना संधी दिली पाहिजे वगैरेचा साक्षात्कार झाला आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. [संदर्भ] आता राहीला सच्याचा आणि लक्ष्मणचा प्रश्न तर बांग्लादेशाबरोबर एखादा दौरा आयोजित करुन सच्याचे महाशतक होऊ द्यावे, म्हणजे सच्या आता खूप खेळलोय असे म्हणून विश्रांती घेत राहील आणि नव्यांना संधी मिळेल. लक्ष्मनचा काही प्रश्न नाही, त्याला आता विश्रांतीच आहे.
-दिलीप बिरुटे