✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..

क
कॉमन मॅन यांनी
Fri, 01/27/2012 - 11:15  ·  लेख
लेख
परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्‍या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस. सार्‍या भारताने तुझं भरपूर कौतुक केलं आहे परंतु आता तू मानाने घरी बसावंस हे बरं.. तुला संघातून काढून टाकण्यापेक्षा तू स्वत:हूनच निवृत्त व्हावंस असं वाटतं.' आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते. अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली. परंतु पैशांच्या आणि व्यक्तिगत उच्चांकाच्या हव्यासापायी सचिन निवृत्त होण्यास तयार नाही. तीच गत राहूल आणि लक्ष्मणची आहे. ही म्हातारी खोडं जाणार केव्हा आणि नवीन रक्ताला वाव मिळणार तरी केव्हा..?? राष्ट्रपती महोदयांना नम्र विनंती की त्यांनी आत्ताच २०१३ चा भारतरत्न पुरस्कार सचिनला जाहीर करावा म्हणजे तरी तो घरी बसेल अशी आशा करता येईल. ता क - आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सचिन केवळ १३ धावा काढून तंबूत परतला आहे!! -- काँमॅ.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
16233 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

सेहवाग, गंभीर, धोनीचे

प्रचेतस
Fri, 01/27/2012 - 11:23 नवीन
सेहवाग, गंभीर, धोनीचे काय? त्यांना का नाही घरी बसवायचे? का केवळ थोडे तरूण आहेत म्हणून त्यांनी धावा केल्या नाहीत तरी चालतात का?
  • Log in or register to post comments

आधी म्हातार्‍यांना तर हाकला.

कॉमन मॅन
Fri, 01/27/2012 - 11:25 नवीन
आधी म्हातार्‍यांना तर हाकला. सेहवाग, गंभीर आणि धोणीकडे नंतर पाहता येईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

का बुवा? तुमचा त्रागा पाहून

प्रचेतस
Fri, 01/27/2012 - 11:27 नवीन
का बुवा? तुमचा त्रागा पाहून गंमत वाटली. खेळाकडे खेळ म्हणून न पाहण्याचा हा परिणाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

अहो वल्लीसाहेब, आजकाल खेळाकडे

रेवती
Fri, 01/27/2012 - 21:24 नवीन
अहो वल्लीसाहेब, आजकाल खेळाकडे खेळ म्हणून न पाहण्याचाच जमाना आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर जालावरही लोक गंमत म्हणून न येता शिरेसली येतात आणि गमतीचे प्रतिसादही शिरेसलीच घेतात. कश्याला किती महत्व द्यायचं यावर एक कार्यशाळा आयोजित करता काय?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी खरंय रेवतीआज्जे. बाकी

प्रचेतस
Fri, 01/27/2012 - 21:44 नवीन
अगदी खरंय रेवतीआज्जे. बाकी कार्यशाळा वैग्रे आयोजित करणे तुम्हीच बघा, आम्ही आपले विद्यार्थी म्हणूनच येऊ. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

"कुछ तो गडबड है दया, कुछ तो

प्यारे१
Fri, 01/27/2012 - 11:28 नवीन
"कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. तोड दो दरवाजा..!" आपली स्वाक्षरी बरंच काही बोलते आहे. शतकी धाग्यासाठी आधीच शुभेच्छा...! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

च्यायला दर वेळेस सचिन ,द्रविड

पक पक पक
Fri, 01/27/2012 - 12:25 नवीन
च्यायला दर वेळेस सचिन ,द्रविड ,लक्शम्ण यांनी शतके ठो़कलीच पाहि़जेत का..?गेल्या वर्षात द्रविड चे पर्फॉर्मसं बघा कि जरा.. जिंकलो कि डोक्यावर घेउन नाचायच आणी हरलो कि पायद्ळी तुडवाय्च काय पट्त नाय.. हा धागा म्हण्जे दुतोंडी .......... वाट्ते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

म्हातारे????

चिंतामणी
Fri, 01/27/2012 - 17:27 नवीन
>>>>>>>>आधी म्हातार्‍यांना तर हाकला. हाकलायचे कशासाठी?????? खेळ होत नाही म्हणून की म्हातारे झाले म्हणून? उगाचच त्रागा करू नये. वय वाढणे ही नैसर्गीक गोष्ट आहे. प्रत्येकजणाचे वय वाढणारच आहे. म्हणून दरवेळी पुढच्या पिढीने मागच्या पिढीला असे हिणवु नये. मागच्या इंग्लंड दौ-यात फक्त द्रवीडच सातत्याने खेळला हे विसरू नये. असो. खेळ होत नाही म्हणून हाकला असे म्हणायची पंचाईत. सो कॉल्ड यूथ आयकॉन्स घोनी, गंभीर, सेहवाग, इशांत शर्मा इत्यादी हे काय दिवे लावत आहेत?????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

फक्त हे तीन का?

विवेक मोडक
Fri, 01/27/2012 - 11:24 नवीन
सचिन्,राहुल आणि लक्ष्मण या सिरीजमधे अपयशी ठरले हे मान्य. पण सगळा दोष त्यांच्या माथी का?? सेहवागला अजुनही वनडे आणि कसोटीतला फरक कळत नसेल (दोन त्रिशतकं आणि एकदा २९३ काढुनदेखील) तर त्याला तोच न्याय लागु होत नाहि का? धोनीचं काय वेगळं आहे? गंभीरसुद्धा "नवीन रक्ता" पैकीच आहे ना?? त्याला या सिरीजमधे काय धाड भरली होती??? नविन रक्त वगैरे ठीक आहे पण त्या नवीन रक्तात फक्त आय पी एल च असेल तर कसोटीत काय उपटणार आहेत ते? गोलंदाजांविषयी जेवढं कमी बोलु तेवढं चांगलं आहे.
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/27/2012 - 11:32 नवीन
विमोंशी सहमत. त्याआधी क्रिकेट ह्या क्षेत्रातील कॉमन मॅन ह्यांच्या योगदानाविषयी अथवा ह्या विषयाच्या त्यांच्या आवाक्याविषयी जाणुन घ्यायला आवडेल. बरेच प्रश्न विचारायची इच्छा होते आहे, मात्र लगेच ते गूगलून उत्तरे मिळतील म्हणून गप्प आहे. अर्थात रोज उठून तद्दन फालतू डायर्‍या लिहिणार्‍यांना देखील घरी बसवावे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

(No subject)

पक पक पक
Fri, 01/27/2012 - 12:16 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे काय बरोबर नाय

कपिलमुनी
Fri, 01/27/2012 - 16:30 नवीन
आता चित्रपट परीक्षण लिहिणार्यांना तुम्ही कोणते कोणते चित्रपट दिगदर्शित केले आहेत असे विचारायचे का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ह्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/27/2012 - 16:54 नवीन
आता चित्रपट परीक्षण लिहिणार्यांना तुम्ही कोणते कोणते चित्रपट दिगदर्शित केले आहेत असे विचारायचे का ??
परिक्षण लिहिणार्‍यांनी 'ह्यांन हाकला, त्यांना चित्रपटात घेऊन नका, फलान्यांना घरी बसवा' अशी फुकाची बोंब केली तर त्यांना जरुर हा प्रश्न विचारावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पराशी

चिंतामणी
Fri, 01/27/2012 - 17:29 नवीन
१०० % समहत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

संदीप चित्रे
Fri, 01/27/2012 - 20:32 नवीन
>>त्याआधी क्रिकेट ह्या क्षेत्रातील कॉमन मॅन ह्यांच्या योगदानाविषयी अथवा ह्या विषयाच्या त्यांच्या आवाक्याविषयी जाणुन घ्यायला आवडेल. >> मी अगदी सहमत रे परा! >> अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला.... > त्याचं काय आहे 'कॉमन मॅन', तेंडल्याबद्दल हे प्रकार पूर्वी ही झाले आहेत (म्हणजे ते वाहिन्यांवरचे तज्ज्ञ इ.) पण 'उचलली जीभ...' ह्या प्रकारात आपण बोलणार्‍यांची तोंडं नाही बंद करू शकत ना! बाकी चालू द्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

रमताराम
Fri, 01/27/2012 - 12:57 नवीन
एकदम सहमत. च्यामारी त्यांना घरी बसवू हो, पण पर्याय अजून वाईट आहेत त्याचे काय. हे तिघे वगळता उरलेल्या तिघा 'तरूण' फलंदाजांची कामगिरी या 'म्हातार्‍यांहून वाईट आहे त्याचे काय. आणि हे जर देशातील पहिले तीन श्रेष्ठ 'तरुण' फलंदाज आहेत तर इतर 'तरुणांची'ची कामगिरी अजून वाईट असण्याची शक्यताच जास्त आहे. वर्षभरात एक त्रिशतक ठोकले की एरवी ३०च्या वर जायला परवानगी नसते असे समजणार्‍या सेहवागचे काय? तो तीसचा आकडा पार करायला कधी शिकणार? गंभीरही फॉर्ममधे कधी येणार? सहावा फलंदाज म्हणून गेल्या वर्षात आपण किती जणांना संधी दिली. ती जागा अजून स्थिर होत नाही, आणखी तीन मोकळ्या करून कोण दिवटे आणणार तिथे? रडतराऊंच्या सोयीसाठी रडतराऊंनी काढलेला धागा. सामाजिक जीवनात जसे राजकारणी, पोलिस इ. ना एकदा नालायक म्हणत ठो ठो बोंब ठोकली की आपली जबाबदारी झटकून टाकता येते तसे. उठसूठ या तिघांच्या नावे बोंब ठोकली की तर आठ जणांचा नालायकपणा झाकता येतो. जर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सतत २००-२५० मधे प्रतिस्पर्ध्याला उखडत असतील नि याचे कारण वेगवान खेळपट्ट्या हे असेल तर आपले गोलंदाज काय तिथे आट्यापाट्या खेळतात? त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया ६०० धावा करू शकते याचा अर्थ आपली गोलंदाजी सुमार, शाळकरी दर्जापेक्षाही सुमार आहे हे कधी मान्य करणार आपण? सातत्याने हीच स्थिती असताना इतक्या वर्षात वेगवान गोलंदाजाच्या प्रशिक्षणासाठी, त्यांना उपयुक्त ठरतील अशा खेळपट्ट्या देशात बनवण्यासाठी कधी सुरुवात होणार? पाटा खेळपट्ट्यांवर धावा रोखण्यापुरती गोलंदाजी करण्याची सवय त्यांना लागत असेल तर त्यांचा काय दोष? आणि आमचे स्पिनर ग्रेट हा मूर्खपणाचा समज कधी सोडणार आपण. चंद्रा-बेदी-प्रसन्नाची धार इतर कोणत्याही भारतीय स्पिनर्सना नव्हती, अगदी कुंबळेलासुद्धा हे स्वच्छ मनाने कधी मान्य करणार. अलिकडच्या काळातील श्रेष्ठ स्पिनर्समधेही कुंबळेचा क्रमांक मुरलिधरन नि वॉर्न यांच्या मागेच लागतो ते सत्य आपण मान्य करणार की नाही. त्यामुळे आपल्या देशात स्पिनर्सना अनुकूल खेळपट्ट्या बनवू नि मग बघून घेऊ हा दावा किती अज्ञानमूलक आहे हे कधी समजणार? काळ बदलतो हे कधी समजणार? आणि मग त्यानुसार धोरणे, पवित्रे डावपेच कधी बदलणार. केवळ सुदैवाने चांगला संघ मिळाल्याने फुकटचे श्रेय घेणारा धोनी स्वत:चे डोके चालवायला कधी शिकणार. त्याने मैदानावर कर्णधार म्हणून काही हालचाली केल्याचे शेवटचे कधी दिसून आले होते. कपिलदेवच्या काळापासून सेट झालेला गोलंदाजीचा पॅटर्न त्याने कधी बदलण्याचा प्रयत्न केला आहे का? नसल्यास यशाचे श्रेय त्याचे कसे, नि आता अपश्रेयाचे खापर फलंदाजांवर का फोडावे? गोलंदाजांनी काय दिवे लावले आहेत? या दौर्‍यात नि मागच्याही, किती वेळा हे गोलंदात प्रतिस्पर्ध्याचा सारा संघ बाद करू शकले आहेते? श्रेय आपले नि अपयशाचे धनी मात्र जुने खेळाडू हा स्वार्थी कावा का म्हणून? जरा वाईट घडू लागले की उठसूठ आपल्या -तथाकथित- देदिप्यमान भूतकाळाकडे चला चा नारा दिला जातो नाहीतर खापर फोडायला एखादा बकरा - पंचिंग बॅग - शोधली जाते. सचिनला मिळणारा पैसा हा नेहमीच मध्यमवर्गीयांच्या असूयेचा मुद्दा असल्याने तो आपले नेहमीचे गिर्‍हाईक आहेच. गेल्या संपूर्ण वर्षातील कामगिरी पाहिली तर अजूनही सचिन द्रविडच पहिले दोन क्रमांक राखून आहेत हे दिसून येते. यावर स्टॅटिस्टिक्स डजन्ट टेल एनिथिंग किंवा तत्सम बिनडोक तर्क दिले जातात. किंवा 'ऐनवेळी सचिन खेळत नाही' हे घोर अज्ञान (सुधीर काळेंनी साधार खोडून काढलेले असूनही) पुन्हा पाजळले जाते. तात्पर्य फारसे विचार न करणार्‍यांना त्रागा करायला दुगाण्या झाडायला चांगला धागा आहे. चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

बँग ऑन टार्गेट !

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/27/2012 - 14:01 नवीन
बाकी ते सुनिल गावसकर, रवी शास्त्री (आणि बहूदा मदनलाल) ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरुप बदलून त्या वेगवान करण्यासाठी उपाययोजना सुचवणारी जी समिती स्थापन झाली होती, तिचे काय झाले हो पुढे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

त्याचं काय झालं माहित

विवेक मोडक
Fri, 01/27/2012 - 14:17 नवीन
त्याचं काय झालं माहित नाहि. पण पुण्याच्या नेहरु स्टेडियमच्या क्युरेटरला जगभरातल्या खेळपट्ट्यांचं घाउक कंत्राट दिलं तर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नको!

पैसा
Fri, 01/27/2012 - 16:15 नवीन
जगातले सगळे गोलंदाज सामुदायिक आत्महत्या करतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/27/2012 - 16:26 नवीन
पण पुण्याच्या नेहरु स्टेडियमच्या क्युरेटरला जगभरातल्या खेळपट्ट्यांचं घाउक कंत्राट दिलं तर??
क्युरेटर मिर्च मसाला मध्ये बसलेला असतो आणि खेळपट्टी कोण तयार करतो हे तुम्ही जाणताच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं

५० फक्त
Fri, 01/27/2012 - 17:00 नवीन
पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं फोडु नका, कपिल सिब्बल तुमच्या इथं प्रतिसाद देण्यावर बंदी आणतील, इथं आधीच का हुच्च्भ्रु कमी आहेत म्हणुन अजुन गोंधळ वाढवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मिर्च मसाला

श्रावण मोडक
Fri, 01/27/2012 - 17:01 नवीन
मिर्च मसाला चालू असतं का रे? मध्यंतरी नाव वगैरे बदललं होतं ना? ही विचारणा अवांतर नाही. कारण मिर्च मसाला चालू असेल तर खेळपट्टीचं स्वरूप बदलतं. मिर्च मसालाची जागा दुसऱ्या कशानं घेतली असेल तरी खेळपट्टी बदलत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नै कै

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/27/2012 - 17:13 नवीन
पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं फोडु नका, कपिल सिब्बल तुमच्या इथं प्रतिसाद देण्यावर बंदी आणतील, इथं आधीच का हुच्च्भ्रु कमी आहेत म्हणुन अजुन गोंधळ वाढवा.
अहो वाहत्या गंगेत हात धुवून घेतोय झाले.
मिर्च मसाला चालू असतं का रे? मध्यंतरी नाव वगैरे बदललं होतं ना?
नाव बदलले असले तरी कार्य त्याच जोमाने चालू असते. ;)
ही विचारणा अवांतर नाही. कारण मिर्च मसाला चालू असेल तर खेळपट्टीचं स्वरूप बदलतं. मिर्च मसालाची जागा दुसऱ्या कशानं घेतली असेल तरी खेळपट्टी बदलत असते.
ज्जे बात ! त्यात मुंबई - पुणे रणजीच्या आदल्या रात्रीची मजाच वेगळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

त्यात मुंबई - पुणे रणजीच्या आदल्या रात्रीची मजाच वेगळी.

चिंतामणी
Fri, 01/27/2012 - 17:45 नवीन
गेले ते दिन गेले. :( :-( :sad: गहुंजाला काय काय सोई आहेत हे कोणी तज्ञ सांगेल काय?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यवाद रमताराम

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 01/27/2012 - 22:48 नवीन
क्रिकेटचा संदर्भ वगळताही निबंधवजा प्रतिसाद वाचनीय आणि विचार करण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अहो मी कीतीदा सांगितलं पण

शिल्पा ब
Fri, 01/27/2012 - 11:31 नवीन
अहो मी कीतीदा सांगितलं पण ऐकतच नैत बघा!!
  • Log in or register to post comments

मस्त!

कॉमन मॅन
Fri, 01/27/2012 - 11:32 नवीन
मस्त! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सिरिज गमावल्याचा दोष

सुहास..
Fri, 01/27/2012 - 11:31 नवीन
सिरिज गमावल्याचा दोष फलंदाजावर की गोलदांजावर हे ठरवा आधी. १ ) लेग ग्लान्स साठी फिल्डर घेतला की बॉल लो बाउन्स ऑफसाईड ला ??? ते पन पॉन्टीग ला ( ज्याच्यावर लगान पोर देखील कव्हर ड्राईव्ह मारेल ) २ ) तीन स्लिप घेवुन बॉल कुठ , तर पायात ??? ३ ) सेटल झालेल्या प्लेयर बॉल, फुटबॉल येव्हढा दिसायला लागतो , त्याल चेंज ऑफ पेस ??? मजा आहे !!
  • Log in or register to post comments

एक चुक

विवेक मोडक
Fri, 01/27/2012 - 11:39 नवीन
सुहास, चेंडु पायात पडत नाहि तर "बुंध्यात" पडतो (सौजन्यः श्री बाळ ज. पंडित यांचं मराठी समालोचन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

विमो , ' बुंधा ' म्हणजे

सुहास..
Fri, 01/27/2012 - 11:43 नवीन
विमो , ' बुंधा ' म्हणजे यॉर्कर , इथे पायात म्हणजे सरळ लेग ला कट किंवा फ्लिक करता येतो . क्रिकेट प्लेयर सुहास यांच्या स्वानुभवातुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

....

विवेक मोडक
Fri, 01/27/2012 - 11:45 नवीन
शब्द मागे घेण्यात आला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

थोडसं तरुण रक्ता विषयी

विवेक मोडक
Fri, 01/27/2012 - 11:37 नवीन
सुरेश रैना - चेंडु छातीच्या वर उसळला की बोंब सुरु. स्विंग बद्दल बोलायलाच नको. चेतेश्वर पुजारा - मैदानात कमी वेळ दुखापतग्रस्तांच्या यादीत जास्त बद्रीनाथ - नेहरु स्टेडियम पुणे किंवा तत्सम विकेट्सवर शतकं ठोकण्यात पटाईत, पण ग्रीनटॉपवर काय? अभिनव मुकुंद्,मुरली विजय, आणि अजुन बरेच जण आहेत यादीमधे
  • Log in or register to post comments

आपले मुद्देही योग्य आहेत.

कॉमन मॅन
Fri, 01/27/2012 - 11:40 नवीन
आपले मुद्देही योग्य आहेत. आम्ही केवळ सो कॉल्ड धुरंधरांना प्रातिनिधीक समजून लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

नाही, प्रातिनिधीक म्हणुन हेच

विवेक मोडक
Fri, 01/27/2012 - 11:44 नवीन
नाही, प्रातिनिधीक म्हणुन हेच तिघे का प्रत्येकवेळी??? बाकी काल विराट कोहलीने शतक पूर्ण केल्यावर जो शब्द तोंडातुन काढला हेच बहुतेक या तरुण रक्ताचं प्रातिनिधीक रूप असावं. उदा. कोहली,युवराज
  • Log in or register to post comments

हे म्हणजे अगदी त्या आजारी

५० फक्त
Fri, 01/27/2012 - 12:08 नवीन
हे म्हणजे अगदी त्या आजारी सासु सारखं झालं होत नसलं तरी कामं करायची ( तथाकथित भारतीय संघातुन खेळायचे) आणि मग सुन बाहेर काम करते (आयपिएल मध्ये) म्हणुन घरात काम करत नाही अशी तक्रार करायची.
  • Log in or register to post comments

त्रिकुटाला म्हातारे म्हणताय

अनामिका
Fri, 01/27/2012 - 12:21 नवीन
त्रिकुटाला म्हातारे म्हणताय ?आपण काय चिरतारुण्याचे वरदान प्राप्त करुन या धरती वर अवतरला आहात का ? अहो !" तो खेळ आहे कुणी तरी हरणार कुणी तरी जिंकणार'खेळा कडे खेळ म्हणून बघायला शिका...... थिल्लर वृत्त माध्यमांचे प्रतिनिधी देखिल मिपावर फेरफटका मारत असतात बहुदा? मिपा बरीच प्रसिद्ध झाली आहे याचे हे द्योतक आहे... हर्षभरीत मिपाकर
  • Log in or register to post comments

मला या आख्ख्या सिरीज मध्ये

सुहास..
Fri, 01/27/2012 - 12:29 नवीन
मला या आख्ख्या सिरीज मध्ये कपिल देव आणि थोड्या-फार फरकाने ' प्रवीण-कुमार ' आठवलाच ....श्रीशांत ही आठवला , किमान काही चाळे तरी केले असते ;)
  • Log in or register to post comments

भज्जी नाय आठवला का रे?

प्रचेतस
Fri, 01/27/2012 - 12:30 नवीन
भज्जी नाय आठवला का रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सध्या इतकंच म्हणेन.... अभ्यास

सुहास झेले
Fri, 01/27/2012 - 12:32 नवीन
सध्या इतकंच म्हणेन.... अभ्यास वाढवा.....!!
  • Log in or register to post comments

श्या!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 01/27/2012 - 12:47 नवीन
श्या!! सचिन, द्रविडला शिव्या देण्याची फ्याशनच आहे. बाकी तुम्ही शेवटची बॅटींग कधी केली होतीत? ;)
  • Log in or register to post comments

भारतात क्रिकेट आणि राजकारण

५० फक्त
Fri, 01/27/2012 - 13:00 नवीन
भारतात क्रिकेट आणि राजकारण यावर बोलण्या लिहिण्यासाठी त्यापैकी काही केलेलं असण्याची गरज असते का ? बाकी, इथला पैसा निवडणुकांमध्ये अडकलेला असल्याने या सिरिजमध्ये जास्त पैसा लागत नसेल आणि त्यामुळं असं होतं आहे का ? भारतातल्या निवडणुका आणि त्यावेळेस झालेल्या सिरिज यावर थोडा शोधा घ्यावा असा विचार आहे. यापुर्वी भारताच्या ऑस्ट्रेलियातल्या सिरिज आणि भारतीय शेअर मार्कॅट यामधल्या योगायोगावर लिहुन आलेलं होतंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

ते ठिक आहे

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 01/27/2012 - 13:38 नवीन
भारतात क्रिकेट आणि राजकारण यावर बोलण्या लिहिण्यासाठी त्यापैकी काही केलेलं असण्याची गरज असते का ?
ते ठिक आहे, पण निदान आपल्याला त्या विषयातले खुप काही समजते आणि आपण जणू काही मार्गदर्शक तत्वेच मांडत आहोत असा आव तरी आणू नये. असो. एकदा हुच्चभ्रुच व्हायचे ठरवल्यावर असे धागे काढणे हे क्रमप्राप्तचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चूक

रमताराम
Fri, 01/27/2012 - 13:04 नवीन
बॅटिंग केली होती का? अस प्रश्न हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

नाही

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 01/27/2012 - 17:22 नवीन
खरे तर बेटींग केली होती कां? असेच विचारायला हवे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

श्या!! सचिन, द्रविडला शिव्या

पुण्याचे वटवाघूळ
Mon, 01/30/2012 - 13:16 नवीन
श्या!! सचिन, द्रविडला शिव्या देण्याची फ्याशनच आहे. बाकी तुम्ही शेवटची बॅटींग कधी केली होतीत?
राजकारण्यांना विशेषतः संसद सदस्यांना शिव्या देण्याची फ्याशनच आहे. बाकी तुम्ही शेवटची निवडणुक कधी लढवली होतीत? (हे वैयक्तिक तुमच्याविषयी नाही. पण हेच मुद्दे वापरले तर कोणाविषयीच काहीच बोलायला नको. संसद सदस्यांना काही बोलायचे नाही कारण मी निवडणुक कधी लढवली नाही. मी बसलेल्या रिक्षाचा ड्रायव्हर नीट रिक्षा चालवत नसेल तर त्याला काही बोलायचे नाही कारण मी कधी रिक्षा चालवायला गेलो आहे? ब्यांकेत काऊंटरमागचा माणूस नीट काम करत नसेल तर त्याला काही बोलायचे नाही कारण मी कधी काऊंटरमागे होतो? असो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

:)

गणपा
Fri, 01/27/2012 - 12:59 नवीन
तुमच दळण चालुद्या. :) आवांतर : हुच्चभ्रु झाल्याबद्दल अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments

ठ्यां

रमताराम
Fri, 01/27/2012 - 13:05 नवीन
एक लुहारकी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+११११

मैत्र
Sat, 01/28/2012 - 03:20 नवीन
+११११ (दोन्ही प्रतिसादांना !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

एवढं सगळं सहन करण्यापेक्षा

बिपिन कार्यकर्ते
Fri, 01/27/2012 - 14:11 नवीन
एवढं सगळं सहन करण्यापेक्षा पब्लिक क्रिकेट बघणंच का नाही सोडून देत? न रहेगा बांस न बजेगी बांसुरी! ;)
  • Log in or register to post comments

+1

यकु
Fri, 01/27/2012 - 14:23 नवीन
सहमत. कॉमन मॅन यांनी क्रिकेटकडे लक्ष न देता संविधानावरील लेखमाला टाकावी . ;-) अवांतर ‍आणि खोडसाळ स्वगत: कॉमन मॅन हे चेसुगु आहेत काय? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा