कॅमेरा vs कॅमेरामन

सौरव जोशी's picture
सौरव जोशी in कलादालन
12 Jan 2012 - 1:25 am

फोटोग्राफी हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, स्वतःला जरी तांत्रिक ज्ञान आणि त्यातली कला अवगत नसली तरी चांगल्-वाईट कळण्या इतपत फोटोग्राफी कळते (असा माझा अंदाज).

National Geography, Discovery अशा संस्थाळांवर नियमित फोटो पाहणे, तसेच आंतरजालावर विविध निष्णात फोटोग्राफर्स चे काम पहाणे याचा तर व्यासंगच जडलाय. मिपावर देखील बरीच गुणी फोटोग्राफर मंडळी आहेतच, त्यांच्या "कलादालन" या विभागात मी नित्यनियमाणे भेट देत असतो. इथे बरीच मंडळी " Exposure, Shutter Speed, Aperture, ISO, Focal Length” अशा काहितरी सांकेतिक भाषेत बोलत असतात, त्यातल मला तरी काही कळत नाही बुवा पण अगदी पूर्वीपासून भेडसवणारा प्रश्न लख्ख समोर उभा राहतो की "कॅमेरा (अर्थात उपकरण आणि तांत्रिक ज्ञान) महत्वाच की कॅमेरामन (अर्थातच Photographic Sense)...?

याच अगदी सोप्प उत्तर म्हणजे दोघांचा समतोल पण हे इतक सोप्प नाही हे मला माहित आहे. याच उत्तर शोधायच ठरल आणि लगेचच एक Digital Camera घ्यायच नक्की केल. SLR, DSLR या प्रकारांचा गंधही नसल्यामुळे SONY चा Cyber-shot DSC-HX100V Black Digital Camera (16.2 Megapixel - 4.80 mm-144 mm - 3" LCD - 30x Optical Zoom - Optical IS - 4608 x 3456 Image - 1920 x 1080 Video - MPEG-4) हा कॅमेरा घेतला. वापरायला सोप्पा, उत्तम Auto Option म्हणजेच टेंशन कमी आणि दिसायला देखील चांगला म्हणून हाच घेतला.

माकडाच्या हाती कोलित मिळाल आणि मी फोटो काढत सुटलो... User Manual पण नाही वाचल आणि फक्त Instinct वापरुन बरेच फोटो काढले. न ठरवताही बर्याच गोष्टी शिकलो... प्रकाश आणि सावली याचा खेळ लक्षात येउ लागला आणि तांत्रिक ज्ञान किती महत्वाचे आहे हे पुरत उमगल. काढलेले फोटो अगदीच basic म्हणजे बावळट असले तरी कॅमेराने आपले काम चोख बजावले होते, बरेच फोटो मला स्वतःला आवडले त्यामुळे उत्तम फोटोग्राफी हा जसा तांत्रिक ज्ञान, कॅमेरा आणि कलाकार (?) यांचा समण्वय जरी असला तरी चांगला कॅमेरा आपले काम चोख बजावतोच अशा मताला मी पोहचलो आहे.

मी काढलेले काही फोटो मी परिक्षणासाठी खाली देत आहे, जाणकारांनी कॄपया उचित मार्गदर्शन करावे. फोटो टुकार असल्यास खुशाल टुकार म्हणावेत... खर तर अशा परखड मतांच स्वागत आहे. त्याशिवाय माझ्यासारख्या अगदी नवख्या माणसाने सुरुवात कशी आणि कुठे करावी याचे मार्गदर्शन केल्यास मंडळ आभारी राहील.

१) माझ्या फोटोग्राफीच्या किड्याचे उगमस्थान : आमचे चिरंजीव

Innocence

२) बाल्कनीतला जास्वंद इतका सुंदर कधीच भासल नाही

Jaaswand

३) चिरंजीव "हाट रे, हाट रे" करायच्या आत टिपलेला क्षण

Aarav Friend

४) दादाची मनी माऊ... ! वय वर्षे २ दिवस...!

Mani Maau

धन्यवाद...!

सौरव जोशी

कलाछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

कौशी's picture

12 Jan 2012 - 1:50 am | कौशी

फोटोग्राफी छानच आहे.आवडली..
दादा आणि दादाची मनी माऊ फार आवडली.

सर्वच फोटो मस्त आहेत. जास्वंद आणी मनी माऊ जरा जास्तच आवडले.

--टुकुल

सगळे फोटो मस्तच आहेत.
पहिला फोटो वेगळ्या प्रकारचा आलाय असे वाटते आहे.

पहिला फोटो वेगळ्या प्रकारचा आलाय असे वाटते आहे.

रेवती, मला फारस कळले नाही.

रेवती's picture

12 Jan 2012 - 6:30 am | रेवती

प्रकाशयोजना किंवा फोटो काढण्याचे तंत्र वेगळे असल्यासारखे वाटते आहे.

कृष्णधवल असल्याने वेगळा वाटत असेल. (सोबत किंचीत ब्लर सेटिंग असावं.)

आवंतर : दोन्ही लेकरांची दृष्ट काढुन टाकायला सांगा भौ घरी.

५० फक्त's picture

12 Jan 2012 - 7:39 am | ५० फक्त

मस्त रे, आयुष्यातल्या छोटाश्या गोष्टी खुलवुन सागण्याची पद्धत छान वाटली.

मोदक's picture

12 Jan 2012 - 8:34 am | मोदक

छान फोटो..

मोदक

पप्पुपेजर's picture

12 Jan 2012 - 8:45 am | पप्पुपेजर

पण अगदी बेसिक आहेत माझ्या माहिति प्रमाणे कॅनोन आणि निकोन फोटोग्राफी चे क्लासेस भरवतात नवशिक्या लोकां साठी तुम्ही विचारणा करून बघा जनरली ते फ्री असतात जर तुम्ही त्यांचा कॅमेरा विकत घेतला असेल तर आणि काही ठराविक कालावधी मध्ये.
बाकी पुष्कळ माहिती जाला वर उपलब्ध आहेच :)

सर्वच फोटो छान आहेत !

कॅमेरा महत्वाचा की कॅमेरामन : दोघांचा समतोल, हे अगदि बरोबर बोललात तुम्हि. पण तरीहि कॅमेरामन जरा जास्तच महत्त्वाचा (वैयक्तीक मत). कारण मी कितीतरी सुरेख फोटो मोबाईल च्या कॅमेरातले (मात्र ३ mega px) पाहिले आहेत, ते केवळ ते फोटो काढण्यार्‍या कॅमेरामनच्या कौशल्यामुळेच :)

पुढील वाटचालिस शुभेच्छा!

तुमचे सुपुत्र अन माउ फार फार गोडुलॅ आहेत :)
फोटो ग्राफी आवड्ली :)
अजुन फोटु येउ द्यात :)

जाई.'s picture

12 Jan 2012 - 10:36 am | जाई.

सर्व फोटो छान आहेत

अमोल केळकर's picture

12 Jan 2012 - 10:54 am | अमोल केळकर

छान लेख. आणि फोटो ही :)

अमोल केळकर

जातीवंत भटका's picture

12 Jan 2012 - 11:12 am | जातीवंत भटका

छानच आहेत फोटोज.
आमचं फोटोविषयक ज्ञान फार काही थोर नाही, पण तरी पण हे आमचे दोन पैसे ...

चिरंजीवांचा फोटो थोडा एक्स्पोज झाला आहे डाव्या(त्यांच्या) गालावर. कॉम्पोझिशन छान आहे.
नंतर एडिट केला आहे का ?
पोर्ट्रेट काढताना फोटो फ्रेमिंगसाठी थोडी जागा जाणार, याचा अंदाज घेऊन फ्रेम घ्यावी.
फोटो १ आणि ४ मधे हा फरक चटकन लक्षात येईल

ही सुरुवात आहे .... कॅमेर्‍याच्या फिचर्सचा अभ्यास केलात तर फायद्याचं ठरेल.
तुमच्याकडे चांगल्या फ्रेमसाठी लागणारा अँगल आहे, हे चारही फोटो मधे दिसतं आहे...
मस्त !!
अजून येऊद्यात ...

सौरव जोशी's picture

12 Jan 2012 - 3:09 pm | सौरव जोशी

कॅमेर्‍याच्या फिचर्सचा अभ्यास केलात तर फायद्याचं ठरेल.
तुमच्याकडे चांगल्या फ्रेमसाठी लागणारा अँगल आहे, हे चारही फोटो मधे दिसतं आहे...
मस्त !!

आपका "सल्ला" सर-आंखोप सर जी..!

फोटो अतिशय सुन्दर आले आहेत ...........शेवट्चा फोटो तर खुपच मस्त आहे........

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2012 - 11:44 am | प्रभाकर पेठकर

सर्वच छायाचित्रे छान/मस्तं/उत्तम आली आहेत.

'आली आहेत' असा शब्दप्रयोग मुद्दाम केला आहे. कारण छायाचित्रे कॅमेराची स्वयंचलित सुविधा वापरून काढली आहेत. छायाचित्रकाराच्या कौशल्याचा वापर छायाचित्राची फ्रेम निवडणे, विषयापासूनचे उपकरणाचे अंतर निवडणे एवढेच सीमीत आहे.

उपलब्ध प्रकाश (नैसर्गीक/कृत्रीम), त्यानुसार अ‍ॅपरचर, स्पीड, सेन्सिव्हिटी (ए.एस्. ए), फोकसींग आदी कुठलीही प्रमाणे छायाचित्रकाराने स्वतः निवडलेली नाहीत. ती कॅमेराने निवडली आहेत. म्हणून छायाचित्रे छान 'काढली आहेत' असे न म्हणता 'आली आहेत' असा शब्दप्रयोग केला. असो.

"कॅमेरा (अर्थात उपकरण आणि तांत्रिक ज्ञान) महत्वाच की कॅमेरामन (अर्थातच Photographic Sense)...?

उत्तम छायाचित्रिकरणासाठी फक्त उपकरण आणि तांत्रिक ज्ञान ह्या दोनच गोष्टींची आवश्यकता नसून 'कलात्मक दृष्टीकोन'ही तितकाच महत्त्वाचा असतो. कारण उपकरण म्हणजे 'कॅमेरा' सर्वगुणसंपन्न घेतला, 'तांत्रिक ज्ञान' म्हणजे उपकरणात कोणकोणत्या सुविधा आहेत ह्याची माहिती. कशाप्रकारे ह्या सुविधा वापरल्या असता आपल्याला 'हवा तसा' परिणाम साधता येईल ह्याचे ज्ञान ही मिळविले. परंतू 'हवा तसा' म्हणजे कसा हे जाणण्यासाठी असावा लागतो 'कलात्मक दृष्टीकोन'. तो एखाद्याला उपजत असतो तर एखाद्याला अनेक छायाचित्रांचा अभ्यास करून मिळवावा/वाढवावा लागतो.
अनेक मान्यवरांची, जाहीरातीतील असंख्य छायाचित्रे पाहून त्यांचे कवितेप्रमाणेच 'रसग्रहण' करून आपला 'कलात्मक दृष्टीकोन' विस्तृत करावा लागतो.

एकेकाळी अत्यंत महागडी असणारी ही कला आता संगणक आणि डिजीटल युगात बरीच स्वस्त झाली आहे.

ऑटो पेक्षा मॅन्युअल मोडवर कॅमेरा वापरा. तंत्रज्ञानाची जास्त माहिती होत जाईल आणि कलात्मक दृष्टीकोन वाढवून तुम्हाला 'हवा तसा' परिणाम साधता येईल. त्याच बरोबर तुमचा नवनिर्मिती आनंद द्विगुणित होईल.

शुभेच्छा....!

सौरव जोशी's picture

12 Jan 2012 - 3:07 pm | सौरव जोशी

ऑटो पेक्षा मॅन्युअल मोडवर कॅमेरा वापरा. तंत्रज्ञानाची जास्त माहिती होत जाईल आणि कलात्मक दृष्टीकोन वाढवून तुम्हाला 'हवा तसा' परिणाम साधता येईल. त्याच बरोबर तुमचा नवनिर्मिती आनंद द्विगुणित होईल.

धन्यवाद...!

अशाच सकस प्रतिसादाच्या अपेक्षेत होतो. अगदी मान्य की ही कॅमेराची कमाल पण जस लेखात नमूद केलय की जरी तांत्रिक ज्ञान नसले तरी अगदीच auto mode मध्ये नाही काढ्ले फोटो. हळू हळू शिकतोय आणि तुम्ही दिलेले सल्ले नक्की लक्षात ठेवेन.

पेठकर काकांशी सहमत ! :)
प्रकाश हा फोटोचा आत्मा आहे,तो जर योग्य प्रकारे नियंत्रणात आणता आला तर फोटोमधे बरेच काही दाखवता येऊ शकते. :)
मी काही या विषयातला तज्ञ नाही,तुमच्या सारखाच शिकण्याचा प्रयत्न करतो आहे.
जमल्यास अ‍ॅपरचर प्रायॉरिटीवर फोटो काढण्यास सुरुवात करा...कारण त्यावर तुम्हाला बराच क्रिएटीव्ह कंट्रोल मिळु शकतो,उदा.depth of field (तुम्ही अ‍ॅपरचर प्रायॉरिटीवरच हे फोटो काढले आहेत ना ?)
वाचकांसाठी दुवा :--- Why I Use Aperture Priority Mode

बाकी, तुम्ही काढलेले फोटो सुंदर आहेत... :)

मी-सौरभ's picture

12 Jan 2012 - 11:46 am | मी-सौरभ

आवडेश :)

पिलीयन रायडर's picture

12 Jan 2012 - 3:50 pm | पिलीयन रायडर

तुमचा मुलगा कसला गोड आहे!!!!! असला पोरगा मला असेल तर मी हजारो फोटो काढेन त्याचे....!!
आणि मुलगी कसली क्युट आहे!!!
मुलाचं नाव काय आहे??

सौरव जोशी's picture

12 Jan 2012 - 4:28 pm | सौरव जोशी

असला पोरगा मला असेल तर मी हजारो फोटो काढेन त्याचे....!!

धन्यवाद पिलीयन रायडर...!

"आरव" (सौरव चा आरव) नाव आहे त्याच आणि कमीत कमी हजार फोटो असावेत माझ्याकडेही :) त्याचे इतरांनी काढलेले छान फोटो हेच फोटोग्राफीकडे वळण्याचे निमित्त ठरले.

स्मिता.'s picture

12 Jan 2012 - 4:04 pm | स्मिता.

सर्व फोटो आवडले. चिरंजीवांचा आणि जास्वंदीचा फोटो खूपच छान.

सौरव जोशी's picture

12 Jan 2012 - 4:33 pm | सौरव जोशी

तुम्हा सर्वांचे प्रतिसाद दिल्याबद्दल आभार ...

कौतुकाबरोबरच अनुभवी मिपा करांकडून मार्गदर्शनही मिळावे हा व्यापक हेतू होता आणि आहे... त्याच्याच प्रतीक्षेत आहे!

मुक्त विहारि's picture

12 Jan 2012 - 5:53 pm | मुक्त विहारि

पाण्यात पडलाच आहात्....आता....पोहा.......

जमतिल तसे आणि भरपुर फोटो काढा....

आपोआप जमेल......

kunal.deshpande@gmx.com's picture

12 Jan 2012 - 9:03 pm | kunal.deshpande...

फोटो उत्तम आहेत.छान आले आहेत. photography शिकण्यासाठी हि site रोज वाचत चला. चं माहिती आहे इथे. तुम्हाला नक्कीच फायदा होईल
http://www.digital-photography-school.com/

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2012 - 9:37 am | अत्रुप्त आत्मा

सगळे फोटू मस्त..मस्त..आणी मस्तच... पण ४च का टाकले..? :-(

सौरव जोशी's picture

13 Jan 2012 - 2:55 pm | सौरव जोशी

पण ४च का टाकले..?

चांगले जमायला लागले की आणखी टाकेन नक्कीच....

इनिगोय's picture

18 May 2013 - 12:44 am | इनिगोय

सुरेख फोटो.. आणखीही काढले असतील ना? टाका की.

चौकटराजा's picture

15 Jan 2012 - 6:55 pm | चौकटराजा

सगळीच प्रकाशचित्रे मस्त !
मी सुमारे सहा हजार प्रकाशचित्रे काढून पाहिली. त्यातली पन्नास एकच मनासारखी आली. कारणे अनेक
१, सर्वात महत्व फोकस ला.
२. दोन क्र . प्रकाशाला.
३. तीन क्र. रचनेला.

एकदा निशात बाग मधे पडणार्‍या पाण्याचे प्रकाशचित्र काढण्यासाठी स्लो शटर लावले. ते प्रकाशचित्र मस्त आले. नंतर २० फोटो भंगार आले . कारण सामान्य उपयोगासाठी स्लो शटर बेकार ! धोकादायक. सगळे
हललेले आले . याला म्हणायच अनुभव.